नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, ३० मार्च, २०२०

मराठी वर्तमानपत्रे (ई पेपर)

महाराष्ट्रात विविध मराठी वर्तमानपत्रे (ई पेपर)
लोकमत मराठी पेपर
लोकमत मराठी लेटेस्ट न्यूज

 सकाळ मराठी पेपर
 सकाळ मराठी लेटेस्ट न्यूज

 पुढारी मराठी पेपर
 पुढारी मराठी लेटेस्ट न्यूज

 लोकसत्ता मराठी पेपर
 लोकसत्ता मराठी लेटेस्ट न्यूज

 नवाकाळ मराठी पेपर
 नवाकाळ मराठी लेटेस्ट न्यूज

मटा ई पेपर.
मटा मराठी लेटेस्ट न्यूज

  सामना मराठी पेपर
 सामना मराठी लेटेस्ट न्यूज

 तरुण भारत मराठी पेपर
तरुण भारत मराठी लेटेस्ट न्यूज

 प्रहार मराठी पेपर
 प्रहार मराठी लेटेस्ट न्यूज

रविवार, २९ मार्च, २०२०

बाबूराव थोरात

 बाबूराव थोरात (स्वतन्त्रता सेनानी)                                                     *जन्म- 1925*                                             💁‍♂️ *परिचय*
बाबुराव थोरात यांचा जन्म 1925. मध्ये महाराष्ट्रातील चंदा जिल्ह्यातील चंद्रपूर गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री केशव थोरात होते. ते सुतार होते. 3 ऑगस्ट, 1955 रोजी गोवा सीमेवर प्रवेश करणार असलेल्या सत्याग्रह्यांच्या गटाचे नेतृत्व बाबुराव थोरात यांनी केले. सत्याग्रह्यांचा गट गोवा सीमेवर प्रवेश करण्यात यशस्वी झाला, परंतु पोलिसांच्या नजरेतून त्यांना सुटू शकले नाही.
        गोवा पोलिस खूप कठोर होते आणि त्यांनी गोळ्यापेक्षा कमी बोलले नाही. त्यांनी सत्याग्रहांवर गोळीबार केला आणि बाबुराव थोरात यांना गोळ्या घालून ठार केले.                                                                                                🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳  
          🙏 *विनम्र अभिवादन*🙏

शनिवार, २८ मार्च, २०२०

अर्थ अवर Earth Hour

आज अर्थ अवर


पृथ्वीसाठी एक तास..
पर्यावरण संवर्धनासाठी एक तास..
वीज वाचवण्यासाठी आज रात्री एक तास सर्वत्र अंधार होईल. याचे कारण म्हणजे आज ‘अर्थ आवर’ दिवस साजरा केला जात आहे. वीज आणि पर्यावरण जतन करण्याच्या हेतूने ‘अर्थ आवर’ दिवस सुरु करण्यात आला आहे. वीज वाचवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणजे ‘अर्थ आवर’ दिवस होय. या मोहिमेचे संपूर्ण नाव ‘अर्थ आवर वर्ल्ड वाइड फंड’ असे आहे. जे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर ऑर्गनायझेशनने सुरू केले असून, या मोहिमेशी संबंधित कार्यालय सिंगापूरमध्ये आहे.
वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या स्वयंसेवी संघटनेने ‘अर्थ अवर’ची संकल्पना मांडली. वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला. त्यावर आधारित मोहीम दरवर्षी जगभर राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत आपण आपल्या परिसरात, रहिवासी संकुलात, वस्तीत, गाव किंवा शहरात, व्यवसायाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वर्षांतून एक दिवस हा तास पाळायचा आहे. या तासाभरात आपल्याला शक्य तेवढे विजेवर चालणारे दिवे बंद करायचे आहेत. ही मोहीम दर वर्षी मार्च महिन्याचा शेवटच्या आठवडय़ातील शनिवारी राबवली जाते. त्यानुसार यंदाचा ‘अर्थ अवर’ हा आज-  रोजी पाळायचा आहे. या दिवशी सायंकाळी ८.३० ते ९.३० आपण सर्वानी या जागतिक मोहिमेत सहभागी व्हायला हवे.
आजच्या अतिव्यवधानांच्या काळात आपण अनेक गोष्टी स्वत: करायचे विसरू लागलो आहोत. व्यायाम म्हणून काही करू, पण जिने चढून आपण घरात जात नाही. उठून टीव्ही बंद करीत नाही. थोडय़ा अंतरासाठी वाहन शोधतो. उद्वाहन किंवा सरकता जिना शोधतो आणि वापरत राहतो. रात्री घरातले सर्व कोपरे प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतो. घरातील टीव्ही समोर प्रेक्षक नसताना चालू असतो. सर्व रस्त्यांवरील दिवे, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणचे दिवे, मोठमोठय़ा जाहिरातींचे विजेवर प्रकाशणारे किंवा संगणक संचालित फलक या साऱ्यातून अखंडित वीजप्रवाह वाहत असतो. एकुणात, आपले सर्व जीवन हे वाहणाऱ्या विजेबरोबरच वाहत असते.
मात्र यासाठी सतत आपण नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर करतो. म्हणूनच जागतिक तापमानवाढ, ऊर्जेचा अनिर्बंध वापर यांबद्दल जागरूकता निर्माण करणारा हा ‘अर्थ अवर’ गरजेचा आहे. परंतु तो या समस्यांवरील उपाय नाही. तर हा तास म्हणजे या समस्यांकडे पाहण्याची, त्याविषयीचे चिंतन करण्याची सवड आहे. पृथ्वीबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची संधी आहे. २००७ साली सर्वप्रथम सिडनी या ऑस्ट्रेलियामधील शहरात हा दिवस ‘दिवे बंद करा दिवस’ म्हणून पाळला गेला. शहरात ६० मिनिटांसाठी सर्व दिवे बंद करून हा उत्सव साजरा करण्यात आला होता. ‘अर्थ आवर’ दिवसांच्या दिवशी, अनिवार्य विद्युतीय उपकरणे बंद ठेवण्याची तात्काळ आवश्यकता असते. यासाठी अनेक लोक सामाजिक साइटवर देखील अपील करतात. वीज वाचवणे आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या संस्थेचे मूळ उद्दीष्ट आहे. आता तो पृथ्वीवरील तब्बल सात हजार शहरांत आणि १८७ देशांत पाळला जातो. त्यातून विजेच्या वापराबद्दल आणि एकूणच पर्यावरणाबद्दल जनजागृती होते.

नुसत्या तासाभराच्या ‘अर्थ अवर’मधून कार्बन उत्सर्जन किती कमी झाले किंवा किती वीज वाचली, असा विचार यात अध्याहृत नाही. मात्र, स्वत:च्या कार्बन पदचिन्हांचा (कार्बन फूटप्रिंट्स) विचार करून आपण व्यक्तिगत किंवा समूहाने तसेच उद्योजक किंवा सरकार म्हणून विजेच्या उपयोगाबाबत विवेकी विचार करावा ही अपेक्षा आहे. उद्या सायंकाळी ८.३० ते ९.३० हा एक तासभर नको असलेले विजेचे दिवे आणि इतर विजेची उपकरणे बंद ठेवून आपण पर्यावरण संवर्धनाच्या मोठय़ा प्रवाहात सामील होऊ शकतो.
#दुर्मिळ_झाडे_व_प्रजाती_वाचवूया_निसर्गाला🌳

दहा देशांमध्ये सामील झाला आहे.
💡अर्थ अवर म्हणजे काय
ऊर्जेचा प्रचंड वापर आणि हाेणारे जलवायू परिवर्तन राेखण्याचे पाऊल म्हणून २००४ पासून अर्थ अवर साजरा केला जाताे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,भारतात लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ५७ टक्के उर्जा कोळाशाच्या ज्वलनातून तयार होते. अंदाजे १ किलो वॅट ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या ज्वलनापासून ८६५ ग्रॅम एवढा कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित होतो. साधारणपे ६० वॅटचा एक घरगुती बल्ब एक तास वापरला तर ६० ग्रॅम कार्बनची निर्मिती होते. कार्बन डाय ऑक्साइड हा ग्रीन हाउस गॅसेसमधील एक वायू असून ग्लोबल वॉर्मिंगासाठी जबाबदार घटक आहे. याद्वारे उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जाईल.अर्थ अवर दिवशी जगभरातील बर्‍याच ऐतिहासिक इमारतींचे दिवे बंद ठेवले जातात. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलि अशा 24 जगप्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. भारतामध्येही या दिवशी राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींमध्ये दिवे बंद करतात.
'पृथ्वी बचावासाठी हवामान बदल (Climate Change to Save Earth)' ही अर्थ अवर २०२१ ची थीम आहे.
अर्थ अवर 2022 ची थीम 'तुमचे भविष्य वाचवा" वर केंद्रित असेल.
• सदर दिवस म्हणजे WWE द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील एक चळवळ आहे WWF बाबत महत्वपूर्ण माहिती अर्थ: WWF म्हणजेच World Wide Fund for Nature अर्थात निसर्गासाठी जगातिक निधी होय.
मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅन्ड, स्वित्झर्लंड हे WWE च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
स्थापना वर्ष: २९ एप्रिल १९६१ रोजी मॉर्गेस, स्वित्झर्लंड येथे WWE ची स्थापना करण्यात आली होती.
इस बार अर्थ आवर की थीम 'शेप अवर फ्यूचर' है। यह विषय इस बात का प्रतीक है कि हमारा ग्रह आज जिन महत्वपूर्ण मुद्दों का सामना कर रहा है, उन पर ध्यान देकर अपने भविष्य को आकार देना हमारे ऊपर है। अर्थ आवर 2021 की थीम क्लाइमेट चेंज टू सेव अर्थ थी और संदेश था कि जलवायु परिवर्तन को रोकना ही पृथ्वी को बचाने का एकमात्र तरीका है। 2020 में, थीम ‘ क्लाइमेट एक्शन एंड सस्टेनेबल डेवलपमेंट' थी और फोकस फिर से जलवायु परिवर्तन और सतत विकास पर था। 2019 में रिड्यूस, रीयूज, चेंज द वे वी लिव थीम थी, और मुख्य फोकस रीसाइक्लिंग और पुन: उपयोग को बढ़ावा देना था। अर्थ आवर का पहला वर्ष थीम हमने लाइट्स आउट कर दिया है पर केंद्रित है । अब आपकी बारी है, और यह लोगों को एक सरल कार्य के लिए प्रोत्साहित किया - लाइट बंद कर दें।

गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना जनजागृती

खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
        मुंबईत कोरोनाची साथ पसरली होती.आकाशची शाळा बंद होती.रस्त्यावर जिकडेतिकडे शुकशुकाट होता.सगळी माणसे घरीच थांबून होती.काही जण तोंडाला मास्क लावून फिरत होते.आकाशही घरीच थांबला होता.तो घरातच बसून आपला अभ्यास पूर्ण करत होता.त्याला वाटे मुलांशी खेळायला जावे.परंतु तो टी व्ही वरील बातम्या पाहून फक्त सरकार ने दिलेल्या सूचनांचे पालन करत होता.अफवांवर विश्वास ठेवत नव्हता.आपल्या आईबाबांनाही काळजी घेण्याबाबत सांगत होता.

उतारा प्रश्न-1.आकाशला सुट्टी का मिळाली होती?

अ ) मजा करण्यासाठी

ब ) कोरोनापासून काळजी घेण्यासाठी

क ) 10 वी ची परीक्षा सुरू होती म्हणून

ड ) गावी जाण्यासाठी

उतारा प्रश्न 2-लोकांनी तोंडाला मास्क वास येतो म्हणून लावले होते. चूक की बरोबर ते लिहा

अ ) चूक

ब ) बरोबर

उतारा प्रश्न 3-आकाश घराबाहेर का पडत नव्हता?

अ) आई ओरडेल  म्हणून

ब) कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी

क) त्याचा अभ्यास अपूर्ण होता

ड) त्याचा दरवाजा बंद होता म्हणून

उतारा प्रश्न 4-आकाशने कोणाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे ?

अ) आईच्या

ब) सरकारच्या

क) मित्रांच्या

ड) बाबांच्या

उतारा प्रश्न 5- कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी घरात थांबू नये. रोज बाहेर मुलांबरोबर खेळावे.चूक की बरोबर ते लिहा.

अ) बरोबर

ब) चूक

उतारा प्रश्न 6 - 'आकाशला कोरोनाची लागण झाली आहे'.या वाक्यात ठेवलेले नाव कोणते आहे?

अ) लागण

ब) आकाश

क) झाली

ड) आहे

कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावा!

सध्या भारत व जगभर पसरत असलेल्या कोव्हिड-१९ (कोरोना व्हायरस)चा संसर्ग एकमेकांना होऊ न देण्यासाठी काळजी घ्या. यासाठी
१. दोन व्यक्तीमध्ये १ मीटर अंतर राखून व्यवहार करा.
२. आपली थुंकी हवेत उडू देऊ नका.
३. रस्त्यात किंवा इतर ठिकाणी थुंकू नका.
४. स्थानिक सरकारकडून घालून दिलेल्या सगळ्या नियम व कायद्यांचे काटेकोर पालन करा.

उषा मेहता (भारतीय क्रांतिकारक)

🔥⛓👩🏻⛓️📻 उषा मेहता                                          (भारतीय क्रांतिकारक)                                      
जन्म : २५ मार्च १९२०
मृत्यू : ११ ऑगस्ट २०००                                                      छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील सुरतजवळील सारस या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी साबरमती आश्रमात त्यांनी पहिल्यांदा गांधीजींचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या गावानजीक गांधीजींनी घेतलेल्या शिबिरात त्या सहभागी झाल्याने महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्याचा व खादीची वस्त्रे परिधान करण्याचा संकल्प केला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सायमन कमिशनच्या विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला (१९२८).

त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडा, भडोच येथे झाले. चांदरामजी हायस्कूल, मुंबई येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९३५ मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उषा मेहतांचे वडील सरकारी सेवेत न्यायाधीश असल्याने ते त्यांना स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्यास प्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊ शकत नव्हते. पुढे वडिलांच्या निवृत्तीनंतर (१९३०) त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले (१९३२) व त्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. स्वातंत्र्यचळवळीतील इतर मुलामुलींसोबत त्या गुप्तपत्रके वाटत व इतर कार्यांतही भाग घेत. १९३९ साली त्यांनी तत्त्वज्ञान विषयात प्रथमश्रेणीत पदवी प्राप्त केली. पुढे कायदेविषयक पदवीकरीता प्रवेश घेतला, तथापि १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांचे शिक्षण थांबले. गांधीवादी जीवनशैलीचे अनुकरण करून त्यांनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले.

दुसऱ्या महायुद्धापासून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरायने परस्पर भारताला युद्धात खेचल्याच्या निषेधार्थ सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध संताप व्यक्त होत होता. महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यातच १९४० मध्ये मुस्लीम लीगने लाहोर येथील आपल्या अधिवेशनात द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देशाच्या फाळणीची मागणी केली. यावेळी जागतिक युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली होती. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी हिंदी जनतेचे युद्धात सहकार्य मिळविण्यासाठी हिंदुस्थानला भरीव राजकीय सुधारणा देण्याबाबत आग्रह धरला होता. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. क्रिप्स योजनेमुळे देशातील कोणत्याही प्रांताला किंवा देशी संस्थानिकाला फुटून निघण्याचा अधिकार मिळणार असल्याने देशाचे विघटन होण्याचे संकट उभे राहिले. यामुळे भारताच्या अखंडतेला धोका निर्माण होणार असल्याने गांधीजींनी ही योजना फेटाळली व ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी केली. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ मध्ये मुंबईस भरलेल्या काँग्रेस समितीसमोर स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू झाले.

९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधी व इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ज्या स्वातंत्र्यसेनानींनी तिरंगा फडकाविला त्यांत उषा मेहता आघाडीवर होत्या. १४ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे उषा मेहतांनी बाबुभाई खक्कर, विठ्ठलदास जव्हेरी व शिकागो रेडिओचे संचालक नानक मोटवानी यांच्या सहयोगाने स्वतंत्र भारताचे गुप्त काँग्रेस नभोवाणी केंद्र (काँग्रेस रेडिओ स्टेशन) सुरू केले. यासाठी त्यांना अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकमदास, सुचेता कृपलानी, राम मनोहर लोहिया यांचे सहकार्य मिळाले. या नभोवाणी केंद्रावरून त्या स्वातंत्र्यचळवळीविषयक महत्त्वाच्या बातम्या व इतर माहितीचे निवेदन करत असत. गांधीजी व इतर नेत्यांचे संदेश या केंद्रावरून प्रसारित केले जात. अत्यंत धाडसाने त्यांनी या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून स्वातंत्र्यआंदोलनात योगदान दिले. ब्रिटिश पोलिसांना या केंद्राच्या इमारतीची माहिती मिळाली आणि १२ नोव्हेंबर १९४२ रोजी इमारतीला घेराव घालून उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी सहा महिने त्यांची कसून चौकशी केली. त्या एकमेव महिला कैदी होत्या. या काळात त्यांना एकांतवासाच्या कैदेत ठेवण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली (१९४२) व त्यांना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे  मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली (१९४६). सुटका करण्यात आलेल्या त्या पहिल्या राजकीय कैदी होत्या. मात्र तुरुंगवासात झालेल्या प्रकृतिअस्वास्थ्याचा त्रास त्यांना आयुष्यभर सोसावा लागला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांनी ‘महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक विचार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात नुकत्याच सुरू झालेल्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात त्या अधिव्याख्याता, प्राध्यापक, विभागप्रमुख या पदांवर काम करून सेवानिवृत्त झाल्या (१९८०). या दरम्यान आणीबाणीनंतर राजकारणात येण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहणे पसंत केले. अध्यापनाबरोबरच व्याख्याने, संशोधन, कार्यशाळा व परिषदा यांमधूनही त्या सक्रिय राहिल्या. नगरपालिका, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग येथील विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय लोकसेवा आयोग व गुजरात राज्याच्या कार्यालयीन सुधारणा आयोगाच्याही त्या सदस्य होत्या. विमेन अँड मेन व्होटर्स द 1977-80 इक्सपेरिमंट (१९८१), गांधीज कॉन्ट्रिब्यूशन टू द इमॅन्स्पिेशन ऑफ विमेन (१९९१), महात्मा गांधी अँड ह्यूमनिझम (२०००) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ.

गांधी स्मारक निधीसमितीवर अध्यक्ष, गांधीजींचे वास्तव्य राहिलेल्या मुंबईतील मणिभवन या वास्तूत गांधी जीवनदर्शन संग्रहालयाची उभारणी, नवी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशनच्या सदस्या आदी जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई; मुंबई विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवीने गौरविले. भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).

🏠मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
                                                                             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳  
      🙏 *विनम्र अभिवादन*🙏
 स्त्रोतपर माहिती 

मंगळवार, २४ मार्च, २०२०

विश्व् क्षयरोग दिवस - 24 मार्च


क्षयरोग : हा रोग प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतीय वैद्यकात त्याचा उल्लेख राजयक्ष्मा किंवा क्षय असा आढळतो. क्षय हा शब्द झीज या अर्थाने वापरला जात असल्यानेव इतर दीर्घकालिक आजारांमध्येही शरीराची झीज होत असल्यानेत्याची व्याप्ती आजच्यापेक्षा अधिक असावी. तरीही फुप्फुसाच्या क्षय-रोगास कफक्षय या नावाने ओळखले जात असावे. ग्रीक वैद्यकातही ॲरिस्टॉटलच्या काळापासून हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्यास होत असल्याचे माहीत होते. इंग्रजीत कन्झम्पशन हा शब्द क्षय या अर्थाने वापरला जातो.क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.
आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक (ॲलोपॅथी)
एकोणिसाव्या शतकात लूई (ल्वी) पाश्चर यांचा सूक्ष्मजंतुवाद रोगनिर्मितीच्या कारणांमध्ये अंतर्भूत होऊ लागला. त्याच सुमारास १८६२ मध्ये ए. जे. विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यांनी कफक्षयामुळे मेलेल्या एका माणसाचे शवविच्छेदन केले. त्यात आढळलेल्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) एका सशाला दिल्यानंतर साडेतीन महिन्यांनी त्याच्या फुप्फुसात कफक्षय झाल्याचे विलेमिन यांना आढळले. लवकरच १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख या जर्मन शास्त्रज्ञांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढले. त्या शोधामुळे क्षयरोगाचे कारण निश्चित झाले. अनेक वर्षे हा विकार ‘कॉख विकार’ या नावाने ओळखला जात असे.
क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. एका शिंकेमध्ये सु. ४०,००० सूक्ष्मथेंब बाहेर पडतात व प्रत्येक सूक्ष्म थेंब क्षयरोग पसरवू शकतो. हवेत पसरलेल्या या थेंबात हे सूक्ष्मजंतू अनेक तास जिवंत राहू शकतात. निरोगी व्यक्तीचा अशा सूक्ष्मजंतूंशी श्वसन मार्गे वारंवार संपर्क आल्यामुळेरोगसंसर्ग होतो. संसर्ग झालेल्या जवळपास ९०% रुग्णांमध्ये लक्षणेदिसत नाहीत. क्षयग्रस्त मातेकडून तिच्या भ्रूणास किंवा जन्म झाल्यानंतर अर्भकास संसर्ग होण्याची शक्यता असते. या सूक्ष्मजंतूंची दुसरी एक प्रजातीमा. बोव्हीस या नावाने ओळखली जाते. तिचा संसर्ग दुभत्या जनावरांकडून पाश्चरीकरण न केलेल्या दुधामुळे माणसास होऊ शकतो.
क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत शिरकाव झाल्यावर शरीराची प्रतिकार यंत्रणा त्यांचा नाश करते परंतु तसे न झाल्यास, म्हणजे प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास, संसर्गाच्या ठिकाणी म्हणजे फुप्फुसाच्या एखाद्या भागात श्वेत कोशिका आणि तंतुमय ऊतक यांच्या मदतीने तो बंदिस्त केला जातो. अशा बंदिस्त स्थितीत हे सूक्ष्मजंतू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यास [उदा., उतारवय, रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स), कुपोषण, दीर्घ काळ स्टेरॉइड औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर] ते परत सक्रिय होतात व आसपासच्या ऊतकांचा नाश करू लागतात किंवा रक्तातून शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.
लक्षणे : फुप्फुसाच्या क्षयरोगात अशक्तपणा, वजन घटणे व खोकला या लक्षणांपासून प्रारंभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी अतिशय घामयेतो. रोगाची तीव्रता वाढू लागल्यावर प्रामुख्याने सकाळी उठल्यावर खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. कधीकधी त्यात रक्ताचा अंश आढळू लागतो. बारीक ताप येतो. फुप्फुसावरणाचा शोथ होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास [→ परिफुप्फुसशोथ] किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत नवीनच रोग संसर्ग झाला असल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो [→ गंडमाळा].
क्षय रोगाची लक्षणे
कमी होणारे वजन
थकवा
श्वास घॆण्यास त्रास होणॆ
ताप
रात्री येणारा घाम
भूक न लागणे
आजार टाळण्याचे उपाय "
क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे
पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
क्षय रोग तपासण्या करून घेणे
क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
तोंड झाकणे. 

बसंती देवी

बसंती देवी (२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.
बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला.१८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली.
जन्मतारीख: २३ मार्च, १८८०
जन्मस्थळ: आसाम
मृत्यूची तारीख: ७ मे, १९७४
शिक्षण: लोरेटो हाउस
पती/पत्नी: चित्तरंजन दास
पुरस्कार: पद्म विभूषण (१९७३)
  १९१७ मध्ये चितरंजन दास जेव्हा राजकारणात उतरले तेव्हा बसंती देवीनेही त्यांचे पूर्ण समर्थन केले.गांधीजींनी सुरू केलेल्या 'असहयोग चळवळी'मध्ये ती सामील झाल्या. लोकांमध्ये खादीचा प्रचार केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती आणि फक्त  १९२१ मध्ये त्यांचे पती व मुले अटक केली गेली होती.खादी प्रचाराच्या प्रसिद्धीप्रकरणी लोकांनी बसंती देवीच्या अटकेचा निषेध केला.देशातील अनेक नामांकित बॅरिस्टर्सनीही यास विरोध दर्शविला आणि हे प्रकरण व्हायसरॉयकडे नेले. यानंतर सरकारने त्यांना सोडले.तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही, बसंती देवीने परकीय सत्तेला विरोध केला.तिने देशातील विविध ठिकाणी जाऊन चित्तरंजन दास यांच्या राजकीय दृष्टिकोनाची ओळख लोकांना दिली. १९२२ मध्ये चितरंजन दास, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस इ. यांना अटक  करण्यात आली.
 चितरंजन दास हे चटगांव राजकीय परिषदेचे अध्यक्ष होते. परंतु त्यांच्या अटकेनंतर स्वत: बसंती देवी या परिषदेचे अध्यक्ष होते.

सोमवार, २३ मार्च, २०२०

राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग

 

 भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्वीकारले. त्या क्रांतिकारांकांची आठवण होताच तीन चेहरे आपसूकच डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे –भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव!
भगतसिंगांबद्दल तर सगळेच जाणतात. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे तरुणांसाठी नवचैतन्याचे प्रतिक आहे. सुखदेव यांचा जीवनप्रवास देखील लोकांना माहित आहे. पण राजगुरू नावाचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व मात्र अजूनही लोकांपर्यंत म्हणावे तितके पोचलेले नाही. एक क्रांतिकारक म्हणून ते कसे घडले? त्यांची पार्श्वभूमी काय? याबद्दल आजही सामान्यजण अनभिज्ञ आहेत.

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला.
सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली.
लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.
शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपार्वात अढळ करणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा!!
⇰⇰ राजगुरू याची सहनशीलता दाखवणारे प्रसंग
प्रसंग १ : एकदा राजगुरू भट्टीतल्या निखाऱ्यांवर आपल्या क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखाऱ्यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला, तरच मला कौतुक वाटेल', असे म्हटले. आपल्या सहनशीलतेविषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई उन करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?'' राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली', असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.
प्रसंग २ : कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकाऱ्यांची नावे न सांगणे : `एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीका उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत.
प्रसंग ३ : स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणारे राजगुरू : फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.''

 सुखदेव रामलाल थापर
( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.
सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :
(१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
(२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे.
(३) जातियतेविरुद्घ लढणे
(४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे.
या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.
नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पक्षपाती, वसाहतवादी दृष्टीने ग्रासलेल्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न म. गांधीजींनी केले; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या या अन्यायी, पक्षपाती वृत्तीमुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. फासावर चढविण्याअगोदर काही वेळापूर्वी सुखदेव यांनी म. गांधीजींना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी क्रांतीकारकांबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन प्रमुख विचारधारांवर प्रकाश टाकला आहे. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली; मात्र त्यांनी ती बाणेदारपणे अव्हेरली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो.
क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ. स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.

भगतसिंग


(२८ सप्टेंबर १९०७-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. . पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी व्ही पुढे नॅशनल कॉलेजमधून बी झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी..व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता; परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगनी १९२३ पासून १९३१ मध्ये फाशी देईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपल्बिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लौकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संघटित रीत्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या : काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ संन्याल, जोगेश्वर चतर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घमुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यांतील रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरंगातून सुटका करणे, सायमन आयोग त्याच्या शिफारशी यांविरुद्ध तीव्र निपेध नोंदविणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रांत बाँब कारखाने चालू करणे, लाला लजपतराय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला करणे (या हल्ल्यामुळे लालाजी आजारी पडून पुढे मरण पावले) त्या जे..स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारुन त्याचा सूड घेणे . कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. याप्रमाणे कुंदनलाल चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरंगातून संन्याल जागेश्वर चतर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला; पण तत्पूर्वीच १९२६ च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतांत क्रांतिसंघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक १९२८ च्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोझशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगाकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रुपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून एकसूत्रता आणायचे कार्य भगतसिंगांवर सोपविण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले ( फेब्रुवारी १९२८). आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बाँब्मस्फोट करण्यात आले; तथापि आयोग लाहोरला सुखरुप पोहोचला. तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले (१७ नोव्हेंबर १९२८ रोजी). या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद शिवराम राजगुरु यांनी केला; परंतु ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे.पी.साँडर्स हा स्कॉट समजून मारला गेला (१७ डिसेंबर १९२८). तेव्हा भगतसिंगांच्या हस्ताक्षरांतील 'साँडर्स मरण पावला', लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला', अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना आणवून आग्रा लाहोर येथे बाँब कारखाने सुरु केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जांतून बटुकेश्वर दत्त भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बाँब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही 'इन्किलाब जिंदाबाद' अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात "जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी 'हा मोठा आवाज केला आहे' आणि 'मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल' अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे", असे नमूद केले होते. हा इतर अनेक आरोप लादून त्यांना त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. भगतसिंगाना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०); पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली ( आँक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी .गांधी काँग्रेस यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांस यश आले नाही. भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करावयाचा होता, असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाड्मय विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) . नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली कीर्ति या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले; पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती, हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक एकूण कार्यावरुन स्पष्ट होते. भारत - पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

आगामी झालेले