नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, १६ मार्च, २०२०

अप्रगत विद्यार्थी उपक्रम

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम शैक्षणिक उपक्रम मराठी
 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्र वाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन 
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

मराठी कृतीपुस्तिका 

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम =
गणित
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
१७)वस्तु निवडणे
१८)पाणी पाटी
१९)अक्षर देवून शब्द तयार करणे
२०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे
२१)शब्दकोडे सोडवणे
२२)अक्षरगाडी उदा.
कप ,पर ,रवा ,वात ई.
२३)श्रुत लेखन सराव
२४) अंकाच्यागाड्या
२५)सम ,विषम संख्याच्या गाड्या
२६)सुलभबालवाचन सराव
२७)स्मरणावर आधारीत खेळ
२८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे
🎋 ज्ञानरचनावाद प्रक्रीया उपक्रम🎋 
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
🌻🌻🌻प्रश्न तुझा उत्तर माझ🌻🌻🌻🌻

मुलाना नेहमी अनेक प्रश्न पडत असतात त्या प्रश्नाना उत्तरे मिलावित असेमुलाना वाटत राहते यासाठी मुलाना पडणारे वेगवेगले प्रश्न मुलानी कागदावर लिहुन वर्गातील पेटीत टाकावे आणि दर शनिवारी दुसर्या तासाला प्रश्न तुमचे उत्तर माझे या उपक्रमात कुतुहल पेटी तील प्रश्नाची उत्तरे देता येतील काही प्रश्नाची उत्तरे गुगल च्या माध्यमातुनही देता येतील आणि मुलाची जिज्ञासा वाढीस लागेल.
 🌻🌻🌻 वाचणकट्टा🌻🌻🌻🌻
झाडाखाली,मैदानार, एका ओट्यावर ग्रंथालयातील काही पुस्तके दररोज लांब बाकांवर मांडली जातात. मधल्या सुट्टीत किंवा लहान सुट्टीच्या वेळेत विद्यार्थी इतरत्र न भटकता किंवा दंगामस्ती न करता वाचनकट्ट्यावर त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन होते आणि वेळेचा, जागेचा सदुपयोग होतो. वाचनकट्ट्यावर मांडलेली पुस्तके पाहून रस्त्यावरुन येणारे जाणारे ग्रामस्थही थबकतात आणि काही वेळ ती पुस्तके चाळतात. दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवली जाते. त्यादिवशी तासिकेप्रमाणे प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास दिली जातात. वाचलेल्या पुस्तकातील मजकुरावरुन विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करण्यास सांगितले जाते. एका दिवशी एकच प्रश्नवाचक शब्द दिला जातो. उदा. का, कधी, कसे, काय, कोण, कोठे इ... त्या एकाच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार करायचे. तयार केलेल्या प्रश्नांचे संकलन करुन प्रश्नपेढी तयार केली जाते. पुढील आठवड्यासाठी तोच प्रश्नवाचक शब्द देऊन आणखी प्रश्नांची भर घातली जाते.
🌻🌻 स्मरण खेळ 😇😇
विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो.
हा खेळ घेताना टेबलावर ३५४० लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा.रूमाल,कंगवा ,खडू मोबाईल , पेन , रबर, पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात.
मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.
नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात.
नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या.
त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
🌻🌻ओंजळीने ग्लास भरणे 🌻🌻
मुलांना या खेळात फार आनंद मिळतो.
प्रथम आपण ६ ८ मुलांचे गट करावेत.
नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे.
त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.
मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल.
ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल.
या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.
यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल.
🌻🌻ठराविक वेळेत गणिते सोडवणे 🌻🌻
मुलांना आपण १५२० बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची १५-२०लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ६७मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो.
 त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे.
सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे.
 अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.
या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
🌻🌻एकमेकांना हसवणे 😝🌻🌻
मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा.
काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा.
मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही.
वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे.
जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.
🌻🌻आवाज ओळखणे 🌻🌻
एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे.
त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे .
जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा .
असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा .
ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
🌻🌻मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा.
मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल
🌻वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस
🌻 परिचयाच्या चित्रांचा वापर करु खेळ घेणे.🌻
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा.चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.
🌻दहा शब्द झाले की वाक्यवाचन सुरु करावे.हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे.नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
🌻अक्षरपरिचय 'क' घ्यावा  🌻
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा "क" शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा.आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा.आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
    अक्षरदृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेण
काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कालमापन हा घटक शिकवला.उपक्रम म्हणून विद्यार्थांना घड्याळाची प्रतिकृति बनवून आणायला सांगितली होती.बऱ्याच मुलांनी बनवून ही आणली.वर्गातील घडयाळाच्या मदतीने किती वाजले? याचा सराव घेतला .त्यानंतर काही कामानिमित्त ऑफिस मधे गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर काय प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घड्याळातील काटे फिरवुन किती वाजले ? याचा सराव करत होती.ज्ञानरचनावादानुसार करत असलेल्या अध्ययनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.काही वेळा काटे तूटायचे कागदाचे नवीन काटे बनवून त्यांचा सराव (सराव म्हणण्यापेक्षा खेळच )बराच वेळ चालू होता.त्यादिवसापासून मात्र दररोज विद्यार्थी विचारायला लागली की सर घड्याळ घड्याळ खेळावं का.
🏈🏈स्वरचिन्हपरिचय🏈🏈
पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षरपरिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
  ⚽⚽वाक्यवाचन⚽⚽
मुले शब्द तयार करु लागली की छैट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत.प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत.मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.
♻♻जोडाक्षराचे वाचन♻♻
एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.
र चे चार प्रकार शिकवणे.
परिच्छेद आकलन
दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
📝📝प्रकटवाचन📝📝
योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा.शिक्षकांमागोमाग एकएक वाक्य विद्यार्थी वाचतील.पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.
परिच्छेदवाचन शब्दडोंगर वाचन घेणे.अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.
  रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवत आहेत
               मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे.



विठ्ठल सखाराम पागे

 
 विठ्ठल सखाराम पागे
(स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक) जन्म : २१ जुलै १९१० (वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
मृत्यू : १६ मार्च १९९०
शिक्षण : बी ए, एल एल बी
त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथे झाले. ते सातव्या इयत्तेत पहिले आले होते. त्यानंतर ते संस्कृत विषय घेऊन बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी एलएलबी ही कायद्याची पदवी घेतली. लहानपणापासूनच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता.वाळवा हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. १९३० ची 'कायदेभंगाची चळवळ' तसेच १९४२ चे 'भारत छोडो' आंदोलन यामध्ये त्यांनी भाग घेतला होता .त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५२ ते १९६० या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर वर्ष १९६० ते १९७८ सुमारे १८ वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी विधान परिषदेचे अध्यक्ष होते.
अत्यंत संयमी, शांत असे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व होते.
ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा १६ मार्च हा स्मृतिदिन. श्री. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.
पागेसाहेब सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये राहतं होते. एकदा घरी ते झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले, ‘प्रभा, घरात पैसे किती आहेत?’ प्रभाताईंनी सांगितले की, ‘सातशे रुपये आहेत..’ त्यावर पागेसाहेबांनी विचारणा केली, ‘सातशे रुपयांत शेतावर किती गडी राबू शकतील?’ घरातून सांगण्यात आले की, ‘वीस दिवस चौदा-पंधरा गडी सहज लावता येतील.’ ही गोष्ट १९६५ सालची आहे.
पागेसाहेब सांगतात,

‘शेतमजूर लावून घ्या. मुंबईला गेल्यावर पैसे पाठवीन.’पागेसाहेब मुंबईत आले नि त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री ना. वसंतराव नाईक यांना पत्र लिहिले :


माननीय मुख्यमंत्री वसंतरावजी,
माझ्या शेतावर सातशे रुपयांत चौदा-पंधरा दिवस वीस गडी मजुरीला लावता आले. शंभर कोटी रुपये बाजूला काढलेत, तर किती मजुरांना काम देता येईल?

रोजगार हमी योजनेचा जन्म या चार ओळींमध्ये झालेला आहे. वसंतराव नाईक यांना हे चार ओळींचे पत्र मिळाले.
वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्याशिवाय संत वाङ्मयाचा आणि संस्कृताचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच वैशिष्टय़ होते. अठरा वर्षे विधान परिषदेचे सभापतिपद सांभाळणे आणि तेही कोणत्याही अपवादाचा किंवा प्रवादाचा विषय न होता सांभाळणे ही कामगिरी फार थोडय़ा लोकांना जमू शकते. विशेषत: वै. पागे यांच्या कारकीर्दीत अनेक मातब्बर नेते सभागृहाचे सदस्य होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून सरकारला कचाट्यात पकडणारे जागरूक नेते विरोधी पक्षांमध्ये होते. अशावेळी कै. पागे अतिशय शांतपणे, कायदे आणि नियमांचा अर्थ लावून सुस्पष्ट निर्णय देत, की तो आपोआपच सर्वाना मान्य ठरत असे. परंतु त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीपेक्षाही त्यांची आठवण महाराष्ट्राला व देशाला राहील ती ‘रोजगार हमी योजने’चे जनक म्हणूनच.
‘रोजगार हमी योजनेचा’ कायदा तयार करून सरकारला सादर करून त्यांची अंमलबजावणी करायला लावणे. तिच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि कालानुरूप तिच्यात बदल सुचविणे ही सारी कामे कै. पागे यांनी केली. एखाद्या राज्याच्या विकास कार्यात इतक्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एखाद्या नेत्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कार्य केल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच असेल. अकुशल ग्रामीण बेरोजगारांना स्वत:च्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोटय़वधी बेरोजगारांना अक्षरश: वरदानच ठरली आहे. या योजनेमुळे शहरांकडे जाणाऱ्या लोंढय़ांचे स्थलांतराचे प्रमाण नि:संशयपणे कमी झाले आहे. १९६९ साली कै. श्री. पागे यांच्या सांगली जिल्ह्य़ातील विसापूर गावी सदर योजना प्रथम सुरू झाली व नंतर व्यापक प्रमाणावर राबविण्यात आली.
सदर योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आला आहे. काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांची उपयुक्तता पटली व सदर योजनेबाबत कायदा संसदेमध्ये संमत करून त्यांची देशभर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये ग्रामीण बेरोजगारी हटविण्याची क्षमता असल्याने दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखविणारे कै. श्री. पागे हे अभ्यासू चिंतक होते. विधिमंडळाबद्दल त्यांनी काही विचार व्यक्त केले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, समाजकल्याण विषयक बाबी संबंधीची विधेयके विधान परिषदेत मांडून विधानसभेच्या कामाचा व्याप कमी करता येईल असे त्यांनी सुचविले होते.
अध्यात्म, संतवाङमय आणि संसदी परंपरा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावर बोलताना वि. स. पागे रंगून जात असत. त्यांच्या निवेदनात रसाळपण तर असेच पण या विषयांचा गाढ अभ्यासही जाणवत असे. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून सतत जाणवत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांच्या भाषेलाही संस्कृतच्या सहवासामुळे एक अभिजात भारदस्तपणा प्राप्त झालेला होता.
कै. वि. स. पागे हे उत्तम दर्जाचे कवी. नाटककार होते. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी ‘वीर मोहन’ नावाचे नाटक लिहिले होते. ‘निवडणुकीचा नारळ’ नावाची नाटिका लिहिली होती. त्याचप्रमाणे ‘पहाटेची नौबत’ आणि ‘अमरपक्षी’ या नावाचे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे त्यांनी लिहिलेले सुंदर संगीत नाटक, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक कै. श्री. दाजी भाटवडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. तसेच संत तुकारामांची प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली होती. सामान्यातून साधुत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास सदर नाटकामध्ये सादर केला आहे.
खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम जीवनात असलेल्या कै. वि. स. पागे यांची स्मृती जतन करण्यासाठी, त्यांच्या व्यापक व व्यासंगी विचारांचा अभ्यास होण्यासाठी शासनाकडून समाजातील विचारवंतांच्या, अभ्यासकांचा सहकार्यातून योग्य ते स्मारक व्हावे ही अपेक्षा.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*🙏
स्त्रोतपर माहिती

आगामी झालेले