नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

जन्मखुण बर्थमार्क Birth Mark

एखादा मूल जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरावर एक चिन्ह असते ज्यांना जन्मखून म्हणतात. ( उदाहरणार्थ- व्यक्तीच्या शरीरावर तीळ , लास्ह, कधीच न जाणारा डाग, खांद्यावर, छातीखाली, पायावर, चेहऱ्यावर, हातांवर, पापणी जवळ, कपाळावर आणि पोटावर )
मित्रमंडळी आणि स्वभाव


शरीरावरील जन्मखूण ही पूर्वजन्माचे काही सूचक असते, असे मानले जाते. समुद्रशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या पोटावर जन्मखूण असल्यास अशा व्यक्ती लालची असतात. केवळ स्वतःबद्दल विचार करतात. पोटावर जन्मखूण असलेल्या व्यक्तींचा मित्रमंडळींचा गोतावळाही अत्यंत कमी असतो. त्या स्वतःमध्ये जास्त मग्न असतात, असे सांगितले जाते. वैज्ञानिक तथ्यानुसार मूल आईच्या गर्भात असतानाच जन्मखूण तयार होते, असे सांगितले जाते. शरीरावरील जन्मखूण एखाद्या व्यक्तीची ओळखही बनत जाते.

​संवेदनशील आणि मेहनत


शरीरावरील जन्मखुणेमुळे एखाद्या व्यक्तीची ओळख पटवली जाऊ शकते. सरकारी ओळखपत्र बनवातानाही जन्मखुणेबाबत विचारले जाते. समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या उजव्या गालावर जन्मखूण असते, त्या व्यक्ती मेहनती आणि कामाबाबत जिद्दी असतात. अशी जन्मखूण शुभ मानली जाते. या व्यक्तींचे दाम्पत्य जीवनही आनंदी, समाधानी असते. तर डाव्या गालावर जन्मखूण असलेल्या व्यक्तींना जीवनात अनेक समस्या, अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या व्यक्ती संवेदनशील असतात, असे सांगितले जाते.

​बुद्धिमान आणि प्रेमळ


जन्मखूणेवरून समुद्रशास्त्रातून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अनेक जणांचा यावर विश्वास नसतो. मात्र, याविषयीच्या धार्मिक मान्यता आजही टिकून असल्याचे पाहायला मिळते. समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या ललाटाच्या मध्यभागी जन्मखूण असते, अशा व्यक्ती प्रेमळ, मनमिळाऊ आणि अत्यंत बुद्धिमान असतात. या व्यक्तींची तर्कशक्ती उत्तम असते. ललाटाच्या डाव्या बाजूला जन्मखूण असलेल्या व्यक्तींकडे पैसा टिकत नाही. अशा व्यक्ती मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत असतात, असे सांगितले जाते.
​स्वतंत्र विचार आणि स्वावलंबी


समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या बोटांवर जन्मखूण असते, त्या व्यक्ती स्वतंत्र विचार करणाऱ्या आणि स्वावलंबी असतात. ज्या व्यक्तींच्या नाकावर जन्मखूण असते, त्या व्यक्ती सृजनशील, सर्जनशील असतात. अशा व्यक्तींचे विचार एकदम हटके असतात. ज्या व्यक्तींच्या पाठीवर जन्मखूण असते, अशा व्यक्ती अत्यंत प्रामाणिक आणि खुल्या विचाराच्या असतात. हाती घेतलेले काम त्या मेहनतीने पूर्ण करतात, असे सांगितले जाते. ज्या व्यक्तींच्या डाव्या खांद्यावर जन्मखूण असते, त्या व्यक्तींना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर उजव्या खांद्यावर जन्मखूण असलेल्यांचे नशीब एकदम जोरावर असते, असे सांगितले जाते.
​अन्य मान्यता


समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या मांडीवर किंवा पायावर जन्मखूण असते, अशा व्यक्ती भाग्यवान असल्याचे मानले जाते. अशा व्यक्ती कामाप्रति अत्यंत प्रामाणिक असतात. त्यांना भरपूर यश मिळते. जीवनात त्या मोठी प्रगती करतात, असे सांगितले जाते. ज्या व्यक्तींच्या तळ पायावर जन्मखूण असते, त्या व्यक्तींना परदेशी जाण्याचा योग असतो, अशी मान्यता आहे. पायाच्या बोटांवर जन्मखूण असलेल्या व्यक्तींना फिरण्याचा छंद असतो. अशा व्यक्तींमध्ये कायम ऊर्जेचा संचार असतो.

पोट -
पुरुष असो वा महिला, जन्मखूण पोटावर असल्यास असे लोक लोभी आणि स्वार्थी असतात.

उजव्या गालावर
पुरुषांच्या उजव्या गालावर बर्थमार्क असणे त्यांच्या जिद्दी स्वभावाचे सूचक आहे. याउलट महिलांच्या डाव्या गालावर असलेला बर्थमार्क सांगतो की, त्यांचे जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील.

तोंडाजवळ
पुरुषांच्या तोंडाजवळ बर्थमार्क (जन्मखूण) असणे आनंद आणि धनयोग दर्शवतो. याउलट महिलांच्या तोंडाजवळ बर्थमार्क असल्यास त्या खूप संवेदनशील असतात तसेच यांना जास्त गप्पा मारण्याची सवय असते.

डाव्या गालावर
एखाद्या पुरुषाच्या डाव्या गालावर बर्थमार्क असल्यास तो आयुष्यभर आर्थिक संकटात राहण्याची शक्यता असते. महिलांच्या डाव्या गालावर बर्थमार्क असल्यास अशा महिला नेहमी उदास राहतात.

डाव्या स्तनाखाली
एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या डाव्या स्तनाखाली बर्थमार्क असल्यास यांना सदैव यश प्राप्त होते आणि यांचा स्वभाव गमतीशीर राहतो.

उजव्या स्तनाखाली
उजव्या स्तनाखाली असलेली जन्मखूण तुमचे भाग्य खूप चांगले असल्याचे दर्शवते.

छातीच्या मधोमध
एखाद्या व्यक्तीच्या छातीवर मधोमध जन्मखूण असल्यास तो उत्तम भाग्याचा मालक असल्याचे समजावे.

हनुवटीवर
एखाद्या पुरुषाच्या हनुवटीवर बर्थमार्क असल्यास तो खूप सेक्सी आणि हॉट असतो. याउलट महिलांच्या हनुवटीवर बर्थमार्क असल्यास त्या घरातील सर्वांचे मन जिंकून घेणाऱ्या असतात.

कपाळावर मधोमध
पुरुष किंवा महिलांच्या कपाळावरील जन्मखूण त्यांना आकर्षक बनवते. अशा लोकांचे आयुष्यात बरेच अफेअर असतात.

दंड
पुरुषांच्या हातावर असलेली जन्मखूण त्यांचे घरावर असलेले प्रेम दर्शवते तसेच त्यांना घरात राहणे, जेवणे किती आवडते हे समजते. याउलट महिलांच्या दंडावर असलेली जन्मखूण त्या करिअरला प्राधान्य देणाऱ्या असल्याचे दर्शवते.

बोटांवर
कोणत्याही हाताच्या बोटांवर जन्मखूण असल्यास असे लोक स्वावलंबी राहणे पसंत करत नाहीत. हे नेहमी कोणावर तरी अवलंबून राहतात.

पायावर
कोणत्याही पायाच्या बोटांवर किंवा पायावर जन्मखूण असलेले लोक नेहमी सजग राहणारे तसेच प्रवास करणारे असतात.

खांद्यावर
एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर असलेली जन्मखूण तो नेहमी आर्थिक संकटात राहणार असल्याचे दर्शवते. परंतु जन्मखूण उजव्या खांद्यावर असल्यास हा उत्तम भाग्याचा संकेत आहे.

नाकावर
एखाद्या व्यक्तीच्या नाकावर बर्थमार्क असल्यास तो व्यक्ती खूप कल्पनाशील आणि सर्वांपेक्षा वेगळा विचार करणारा असतो.

मुलामध्ये जन्मखूण कोणत्या वयात दिसतात?

आत्तापर्यंत, काही मुलांमध्ये मोलच्या स्वरूपात काळे डाग जन्मानंतर लगेच का दिसतात या प्रश्नाचे कोणतेही अस्पष्ट उत्तर सापडले नाही, काहींमध्ये शरीरावर हेमॅन्गिओमा तयार होतात आणि तिसऱ्या नवजात मुलांमध्ये त्वचा पूर्णपणे स्वच्छ असते आणि केवळ तारुण्याच्या काळात. शरीरावर खुणा दिसू शकतात. शास्त्रज्ञांची मुख्य आवृत्ती जे सर्व बाळांना हेमांगीओमास आणि नेव्ही - आनुवंशिकता का नाही हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे बाह्य घटकांच्या प्रभावाखाली जन्मचिन्हे दिसण्याची पूर्वस्थिती देखील निर्धारित करते.

जर आपण वयाबद्दल बोललो तर पहिली नेव्ही कधी दिसेल याची अचूक वेळ स्थापित केलेली नाही. जेव्हा बहुतेक मुलांमध्ये त्यांचे स्वरूप लक्षात येते तेव्हा केवळ सूचक कालावधी असतात:
लहान मुलांमध्ये पहिले मोल दिसू लागल्यास सर्वात सामान्य लवकर वय म्हणजे 6 महिने ते 2 वर्षांचा कालावधी;
जन्मचिन्हांची दुसरी लाट 5 ते 6 वर्षांच्या कालावधीत दिसून येते;
वय 12 - 15 वर्षे - म्हणजे वयात आल्यावर त्वचेवर सर्वात जास्त पिग्मेंटेड नेव्ही दिसतात.
रंगद्रव्ययुक्त जन्मचिन्हे

पिग्मेंटेड निओप्लाझमला मुलांमध्ये त्या निओप्लाझम म्हणतात ज्यात मेलेनिन असते - एक रंग जो नेवसला रंग देतो. काही त्वचेच्या पेशींमध्ये मेलेनिनच्या निर्मितीमध्ये अडथळे आल्यामुळे ते उद्भवतात.

मुलांमध्ये शरीरावर बहुतेक नियोप्लाझम हार्मोनल बदलांच्या लाटेखाली यौवन दरम्यान दिसून येतात. रंगद्रव्य निओप्लाझम कोणत्या त्वचेच्या थरात स्थित आहेत यावर अवलंबून, ते, प्रौढांप्रमाणेच, खालील प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत:
बॉर्डरलाइन - पेशी एपिडर्मिसमध्ये केंद्रित असतात;
इंट्राडर्मल - त्वचेपासून दिसतात;
मिश्रित (जटिल) - सीमारेषा आणि इंट्राडर्मल फॉर्मेशनची वैशिष्ट्ये एकत्र करा.

मुलांमध्ये बहुतेक रंगद्रव्ययुक्त मोल सीमावर्ती असतात. ते हलके पिवळे किंवा तपकिरी अंडाकृती किंवा गोल डाग दिसतात. ते आरोग्यासाठी सुरक्षित आहेत. पौगंडावस्थेनंतर, ते तयार होण्यास सुरुवात करतात आणि 25-30 वर्षांपर्यंत तीव्रतेने बदलतात.

शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींना जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’ मानतात. परंतु बऱ्याचदा हे तीळ लहान वयात, पौगंडावस्थेत किंवा गरोदरपणात शरीरावर वाढू शकतात.

बहुधा वाढत्या वयाबरोबर ते दिसेनासे होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ वाढू शकतात. ते आकारमानाने लहान-मोठे असून चपट (सपाट) किंवा त्वचेच्या वर उंचवट्यासारखे असतात. दुसऱ्या प्रकारच्या तिळाला फुगीर तीळ म्हणतात. त्यांचा रंग फिकट तपकिरी ते निळसर-काळा असतो. बहुतेक तीळ लहान असतात आणि त्यांच्या दृश्यरूपात सहसा बदल होत नाहीत.

पण नेहमी चेहऱ्याची सुंदरता वाढवणारी ही तीळ कधी कधी धोक्याची घंटा वाजवणारी ही असू शकते. काही वेळा तिळावर लांब व गडद केस असतात. अशा केसयुक्त तिळामध्ये कर्करोग उद्भवण्याचा संभव अधिक असतो. म्हणूनही तीळ जर तुमच्या शरीरावर असेल तर लगेच सावध व्हा.

तीळचे तांत्रिक नाव नेव्हस (अनेकवचन: नेवी) आहे. हे जन्म चिन्हा साठी लॅटिन शब्दापासून येते. शरीरावर असलेल्या प्रत्येक तीळाचं काहीना काही रहस्य असतं. आपल्या शरीरावर हा तीळ का आहे हा प्रश्न अनेकांना कधीना कधी पडतोच. समुद्रशास्त्रात ( सामुद्रिक शास्त्र ) शरीरावरील तिळाबद्दल सविस्तर सांगण्यात आले आहे.

देवाने प्रत्येक मनुष्याचे शरीर वेगवेगळे बनवले आहे. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, शरीरयष्टी भिन्न असते. एवढेच नाही तर प्रत्येकाच्या त्वचेचा रंग वेगवेगळा असतो. मनुष्याच्या शारीरिक बनावटीवरून त्याचा स्वभाव व चारित्र्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे. या विद्येला ‘सामुद्रिक शास्त्र’ किंवा ‘शरीर लक्षण विज्ञान’ असे म्हणतात. सामुद्रिक शास्त्र ह्याचा उल्लेख गरुड पुराणात येतो.
शरीरावरील प्रत्येक भागाच्या तिळाचं वेगळं रहस्य असतं. काही तीळ हे विचारांमध्ये असलेली सुंदरता दर्शवतात. तर काही तीळ व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू समोर आणतात. अनेकांना आपल्या तीळाशी निगडीत रहस्य जाणून घ्यायचे असते. गालावरचा तीळ सौंदर्याचं प्रतिक मानलं जातं. आज आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया.

• जर कोणत्या व्यक्तीच्या नाकाच्या सुरुवातील म्हणजे समोर मध्यभागी तीळ असेल तर असे लोक कल्पनाशील असतात. कोणतंही काम हे लोक रचनात्मक पद्धतीनं करणं पसंत करतात.
• जर कुणाच्या नाकावर तीळ असेल तर ते व्यक्ती खूप प्रवास करणारे असतात. अशा व्यक्तींना प्रेमप्रकरणांमध्ये काही समस्या येऊ शकतात.
• जर कुणाच्या डाव्या डोळ्याच्या अगदी खाली तीळ असेल तर ती व्यक्ती कामुक असते. त्यांच्या जोडीदाराला त्यांचा हा स्वभाव जानवतो.
• ज्यांच्या डाव्या डोळ्याच्या कॉर्नरला तीळ असतो, ते आपल्या जोडीदारासोबत खूप भांडतात. आपल्या प्रियसी किंवा प्रियकराला मिळविण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात.
• डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असले तर समजून घ्या ते डोक्यानं खूप जलद असतील. असे लोक आपल्या धोरणांमुळे मोठ्या प्रयत्नांनी कामांमध्ये यश मिळवू शकतात.
• दोन्ही भुवयांच्यामध्ये जर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप हुशार असते. हे लोक आपल्या तल्लख बुद्धीनं कार्यात यश आणि पैसा प्राप्त करू शकतात.
• जर कोणत्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला डोळ्यांच्या कॉर्नरवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप भावूक असते. असे लोक दुसऱ्यांवर जळणारे पण असू शकतात.
• उजव्या गालावर तीळ असणारे व्यक्ती खूप कामुक असतात. पण वेळोवेळी त्यांचे जोडीदारासोबत मतभेद होत असतात.
• ज्यांच्या डाव्या बाजूला गालाच्या हाडावर आणि कानाच्या थोडं दूर तीळ असेल, त्यांची बौद्धिक क्षमता खूप चांगली असते. त्यांना एकसारखं जीवन जगणं आवडतं. काळासोबत आयुष्य बदलणं त्यांना आवडत नाही.
• उजव्या बाजूला नाकाच्या बरोबर खाली तीळ असेल तर ते व्यक्ती विचारांनी खूप श्रेष्ठ असतात. मात्र असे व्यक्ती खूप गूढ असतात. आपलं कोणतंही सिक्रेट ते इतरांना समजू देत नाहीत. त्यांचं भाग्य उत्तम असतं.
• जर नाकाच्या मध्ये खाली तीळ असेल तर अशा व्यक्तींना स्वतंत्रपणे जगणं आवडतं. त्यांना प्रवास खूप आवडतो.
• ज्या लोकांच्या ओठांच्यावर डाव्या बाजूला तीळ असतो ते लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारी असते. त्यांच्या उदारपणामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. हे लोक विश्वास करण्यासारखे असतात.
• जर कुणाच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असेल ते व्यक्ती खूप कलात्मक पद्धतीनं काम करतात. असे लोक अनेकदा आपल्या कामांनी दुसऱ्यांना धक्का पोहोचवतात. यांचे अनेक प्रेम प्रकरणं होऊ शकतात. मात्र लग्नानंतर हे व्यक्ती आपल्या जोडीदाराप्रतीच समर्पित असतात.
• ज्या लोकांच्या डाव्या बाजूला गालाच्या हाडावर आणि कानाच्या अगदी जवळ तीळ असेल, त्यांना समजून घेणं खूप कठीण असतं. असे लोक चांगले नियोजन करू शकतात.
• ज्यांच्या चीनवर म्हणजेच दाढीवर तीळ असतो, ते व्यक्ती परंपरावादी असतात. असे लोक कुटुंबियांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. इतर लोकांशी त्यांचे संबंध चांगले असतात. तसे तर हे लोक स्वभावानं खूप शांत असतात, मात्र कधी-कधी त्यांना राग येतोच. कोणतंही काम हे लोक प्रामाणिकपणे करतात.

आगामी झालेले