नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त




विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त

जन्म: १८ नोव्हेंबर, १९१०( ओरी, पूर्व बर्दमान जिल्हा, बंगाल,भारत )

मृत्यू: २० जुलै, १९६५ ( नवी दिल्ली, भारत )

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: हिंदुस्थान सोशालिस्ट

रिपब्लिकन असोसिएशन,

नौजवान भारत सभा

धर्म: हिंदू

वडील: गोठा बिहारी दत्त

पत्नी : अंजली दत्त

नागरिकता : भारतीय

विशेष माहीती : ८ एप्रिल १९२९ ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रेक्षक दिर्घिकेमधून केंद्रिय असेंब्लीमध्ये मोकळ्या जागी बाँम्ब फेकला.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताने अगणित बलिदानं, अगणित वार झेलत स्वातंत्र्य मिळवलं. या स्वातंत्र्याच्या संग्रामात न जाणो कित्येक तरुणांच्या, कित्येक क्रांतिकारकांच्या, कित्येक देशभक्तांच्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या गेल्या आणि जे वाचलेले त्यांचं संपूर्ण आयुष्यही दिलं गेलं होतं.

पण १९४७ नंतर या सगळ्या स्वातंत्र्यसमरात सहभागी झालेले आणि हयात असलेले क्रांतिकारी जे जहाल गटातले होते त्यांचं पुढे काय झालं हे फारसे लोकांना माहिती नाही.

स्वतंत्र भारतासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या अशा कितीतरी क्रांतिकारकांनी अक्षरशः वैमनस्य आणि अत्यंत हलाखीच्या गरिबीत दिवस काढले. बरेच जण या गरीबीतच वारले.

अशाच एका सरकारी उदासीन वागणुकीचा बळी पडलेल्या शहीद-ए- आझम असणाऱ्या भगतसिंगांचा सगळ्यात जवळचा मित्र बटुकेश्वर दत्त.

८ एप्रिल १९२९ ही घटना सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही ब-याचशा पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते की भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतल्या असेंब्लीमध्ये खाली जागेत दोन बॉम्ब टाकले. ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे दिले.

सगळ्या गदारोळात तिथून पळून जाणं शक्य असतानाही दोघांनी आत्मसमर्पण केलं. कारण होतं निदान खटल्याच्या निमित्ताने का होईना संपूर्ण देशासमोर आपले विचार ठेवता येतील. पुढे काळानुसार (साण्डर्स वधाचा खटला) राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली मात्र दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

१९२९- १९४२ इतकी वर्षे त्यांनी अंदमानात अत्यंत हलाखीच्या दिवसात काढली. १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर सुद्धा शांत न बसता ‘छोडो भारत’ अभियानात सुद्धा ते सहभागी झाले आणि त्यांना पुन्हा अटक झाली. या अटकेतुन ते सुटले, मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर.

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले.

१९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.

ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

१९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

१९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारक स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत.

🌞 *क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!*

बटुकेश्वर दत्त सारख्या क्रांतिकारकांना सरकारच्या कार्यालयांमध्ये जगण्याला पुरतील एवढे पैसे मिळवणारी नोकरी मिळावी म्हणून कित्येक वर्षे हेलपाटे घालावे लागले. अर्थात तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार ती काही त्यांना मिळाली नाही हे उघड आहे.

अशातच त्यांनी लग्न केलं आणि अनेक व्यवसाय करून बघण्याचे अपयशी प्रयत्न केले. सतत चरितार्थादाखल होणारी उपासमार आणि हाल अपेष्टा यातून त्यांना बरेच आजार झाले. या आजारातूनच त्यांनी एक १९६५ ला दिल्लीच्या ए आय आय एम एस हॉस्पिटल मध्ये प्राण सोडला.

त्यांचे दहन त्याच ठिकाणी करण्यात आलं ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांचे सहकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे करण्यात आलं होतं.

१९२९ मधला बॉम्ब फेकण्याचा प्रसंग आणि भारताचं मिळालेले स्वातंत्र्य या सगळ्या गडबडीत कुठेतरी अनेक क्रांतिकारकांच्या, अनेक देशभक्तांच्या कथा लुप्त झाल्या, हरवल्या.

दत्ताचं आयुष्य असंच कुठेतरी गायब झालं. दुर्लक्ष केलं केलं.

बॉम्बफेकीच्या प्रकरणानंतर बटुकेश्वर दत्तांच्या वकील असलेल्या असफ अली यांनी सांगितलं होतं की मुळात बटूकेश्वर दत्तांनी बॉम्ब फेकला नव्हता. बॉम्ब फेकला तर फक्त भगतसिंग यांनी पण अटक होत असताना बटुकेश्वर दत्त खोटं म्हणाले की, होय मी बॉम्ब फेकला आहे आणि त्यांना अटक झाली.

एक सच्चा मित्र जो मित्राच्या शब्दाखातर त्याच्या बरोबर एका आत्मघातकी कटात सहभागी झाला, खोटे बोलून त्याच्या बरोबर आयुष्यभर पुरतील एवढ्या यातना सहन केल्या, अखंड भारत स्वतंत्र व्हावा हे स्वप्न बघितलं, त्याला काय मिळालं तर दुर्लक्षित दुर्दैवी आणि दारिद्र्य भरलेलं आयुष्य.

आज आपण अशा अनेक क्रांतिवीरांच्या आठवणी काढल्या काय व त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम पुरस्कार दिले गेले काय पण त्यांनी जगलेला आयुष्य आणि त्यांना स्वतंत्र भारतात मिळालेली वागणूक बदलू शकत नाही.

*...ते अमर हुतात्मे झाले....!!*

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *विनम्र अभिवादन*🙏

स्त्रोतपर माहिती

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे


  क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

 *जन्म : 2 जानेवारी 1888*(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)

  *फाशी : 16 नोव्हेंबर 1915* (लाहोर कारागृह, पाकीस्तान)

स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे ! 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले.  शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.

सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या  भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती  योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षिससिंग, सरदार जगनसिंग, सरदार सुरायणसिंग, सरदार ईश्वरसिंग आणि सरदार हरनामसिंग. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who’s who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, “हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर”. विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच  क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

           संकलित माहिती

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

पाडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट

 पाडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट 

(भारतीय क्रांतिकारक)
 संपूर्ण भारतीय बनावटीचा बाॅम्ब बनवण्यापासून स्वत:च्या मुलाच्या बारशात हरिजनांसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यापर्यंत सेवा कार्य करणारे सेनापती बापट यांचा आज जयंती! 

जन्म: १२ नोव्हेंबर १८८० (पारनेर)

मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७  (बाम्बे)

टोपणनाव : सेनापती बापट

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

वडील : महादेव

आई : गंगाबाई

शिक्षण : डेक्कन कालेज पुणे

                  पांडुरंग महादेव बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सेनापती असे संबोधण्यात येऊ लागले. 

📚 *जन्म व शिक्षण*

महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत. या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.

*निधन* १९६७ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. दादरच्या स्मशानातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

💁‍♂ *कार्य*

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. असे असले तरी "माझ्या बाँबमुळे एकही बळी गेला नाही. ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बाँब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.

इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

नोव्हेंबर १९१४ मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या 'चित्रमयजगत' या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या 'संदेश' नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त हे भयंकर यातना सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’राजबंदी मुक्ती मंडळ' स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले.

🏵 *गौरव*

पुण्यातील १५ ऑगस्ट, इ. स. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील एका सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

🎞 *लघुपट*

सेनापती बापट यांच्या कार्यावर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान (NCERT) यांनी एका लघु माहितीपटाची निर्मिती केलेली आहे.

      🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

         संकलित माहिती

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे


 सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे (भारतीय क्रांतिकारक)

जन्म : ८ नोव्हेंबर १८०५  देवगाव, अकोले

फाशी : २ मे १८४८ ठाणे सेंट्रल जेल

राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. 

💁‍♂ *जीवन*

राघोजींचा जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणार्‍या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरिब सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्‍या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ठाणे गॅझेटियराच्या जुन्या आवृत्तीत सांगितल्याप्रमाणे "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजीच्या आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गॅझेटियरमध्ये सापडतो.

सातार्‍याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्‍न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणार्‍या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने  राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरू झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य, प्रमाणिकपणा व नीतिमत्ता याला त्याने धार्मिकपणाची जोड दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रंबकेश्वर, नाशिक, येथे राघोजीची भारी दहशत होती. जुन्नर येथील लढाईत मात खाल्यानंतर राघोजी कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणार्‍या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता. त्यांला इंग्रजी अधिकार्‍यांनी वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतःच बाजू मांडली.

🔗 *फाशी*

देवजी हा त्याचा प्रमुख सल्लागार आणि अध्यात्मिक गुरुदेखील होता. मे १८४५ मध्ये गोळी लागून देवाजी ठार झाला. त्यामुळे मात्र राघोजी खचला असावा. त्याने आपला रस्ता बदलला. नंतरच्या काळात तर गोसाव्याच्या वेशात तो तीर्थयात्रा करू लागला. विठ्ठलाच्या दर्शनाला त्याने दिंडीतून जायचे ठरविले. ईश्वरी शक्तीची तलवार, चांदीचे ताईत आणि लांब केस याची साथ त्याने आयुष्यभर कधीही सोडली. २ जानेवारी १८४८ या दिवशी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. राघोजी खरा वीर पुरुष होता. बंडाच्या तीन पिढ्यांचा त्याला इतिहास होता. अभिजनवादी इतिहासकारांचे या क्रांतीकारकाच्या लढ्याकडे काहीसे दुर्लक्षच झाले. ‘ फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या,’ असे त्याने न्यायाधीशांना सांगितले. ते न ऐकता सरकारने बंडाचा झेंडा फडकवणा-या या शूर वीराला २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फासावर चढविण्यात आले. अकोले जि.अहमदनगर तालुक्याच्या या भूमिपुत्राच्या बंडाने पुढच्या काळातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच अकोले तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.   

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏



शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

विद्यार्थी दिवस महाराष्ट्र राज्य

 विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

जागतिक शाई पेन (फाउंटन पेन)दिवस

जागतिक शाई पेन (फाउंटन पेन)दिवस

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुकवारी जागतिक शाई पेन (फाउंटन पेन) दिवस साजरा केला जातो.  

*फाउंटन पेनचा इतिहास.* 

बोरू/पीस हे टोकदार करून शाईत बुडवून मानव लिहिता झाला. दौतीत बोरू/पीस बुडवून लेखन करताना शाईचा प्रवाह कधी अपुरा तर कधी प्रमाणाबाहेर होत असे, तसेच शाई संपल्यावर लेखणी परत दौतीत बुडवावी लागे. पर्यायाने लेखनात खंड पडे. त्याकरिता कायम शाई बरोबर ठेवावी लागे. ती द्रवरूप असल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना सांडण्याची शक्यता वाढत असे व हे गैरसोयीचे ठरू लागले. मग प्रयत्न सुरू झाले की शाईची बाटली बरोबर बाळगण्याऐवजी पेनमध्येच साठवून ठेवता आली तर? १८५० पासून असे पेन बाजारात आले. अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते. या निबमध्ये मधोमध एक भेग असते व त्याच्या मुळाशी एक भोक असते. शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते. कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते. पण हा शाईचा प्रवाह नियंत्रित नसल्याने कागदावर शाई जास्त प्रमाणात उतरत असे. शाईचा प्रवाह नियंत्रित व्हावा त्यासाठी निबकडून शाईच्या नळीकडे तीन अतिशय बारीक केशिका ((Feeder) असतात. त्या नळीत व बाहेर हवेचा दाब (वातावरणीय) समान असल्यामुळे हवा आत गेल्याशिवाय शाई बाहेर येणे शक्य नाही. त्याकरिता निबवर असलेल्या भोकाकडून एक केशिका हवा टाकीपर्यंत घेऊन जाते व हवा विरुद्ध दिशेने शाईला तीन केशिकामधून निबकडे ढकलते. तरी शाई अतिरिक्त येऊन लिखाण खराब होऊ शकते. अशा वेळी अतिरिक्त शाई रोखून धरण्याकरिता निबच्या खाली प्लास्टिकचे कलेक्टर असते. केशिकांमधून शाई येऊन कागदावर उतरण्यामागे केशाकर्षण (Capillary Action) हा सिद्धांत आहे. केशाकर्षणामुळे एखाद्या बारीक व्यासाच्या नलिकेतून द्रव गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेस म्हणजे वर चढते. एकदा शाई कागदापर्यंत आली की संसंजनशील बल (Cohesive Force) मुळे ती शाईच्या इतर रेणूंना आकर्षून घेते व हा शाईचा प्रवाह अविरत चालू राहतो. असे शाईचे पेन अतिशय लोकप्रिय झाले. ही शाई प्लास्टिक कलेक्टर असूनदेखील गळत असे. ती टिपून घेण्याकरिता पुनश्च केशाकर्षण सिद्धांताचा वापर करीत टीप कागद बाजारात आले. मात्र, शाईचा द्रावक पाणी असल्याने ती वाळायला थोडा वेळ लागे. शाईचा अखंड पुरवठा कसा करता येईल यासंबंधी प्रयत्न झाले व त्यातूनच फाउंटन पेनाचा शोध लागला. शाईचा पुरवठा सतत होणारी लेखणी तयार करावयाचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू होते. मध्ये बार्थोलोम्यू फॉश यांनी शाईचा साठा असणारी पण गुंतागुंतीची रचना असणारी एक लेखणी तयार केली. यापेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना असलेली लेखणी मध्ये जॉन शेफर यांनी तयार केली. त्याचवर्षी जे. एच्‌. ल्यूईस यांनी शाईचा साठा असणारी क्किल लेखणी तयार केली. या लेखणीलाच पहिले फाउंटन पेन असे म्हटले जाते. आधुनिक पेनाचे हे पूर्वरूप होय. 

*संकलित माहिती........

आगामी झालेले