नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

मकरसंक्रांत Makar sankranti

भोगी, मकर संक्रात, किंक्रात यावर आधारित चाचणी नक्कीच सोडवा.
🏅👇👇👇🏅
https://forms.gle/yxsLY4WsUJAotPMr9



मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
👉धार्मिक कारण:
धर्म शास्त्राप्रमाणे तीळ दान केल्याने शनीचा दुष्प्रभाव कमी होतो. तिळाचे सेवन आणि तीळ मिश्रित पाण्याने स्नान केल्याने पाप नष्ट होतात, निराश मिटते. श्राद्ध आणि तर्पणमध्ये तिळाचा प्रयोग दुष्ट आत्मा, दैत्य, राक्षस यांपासून बाधा होण्याची भीती दूर होते. तसेच माघ मासमध्ये रोज तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करणार्‍यांचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. याने राहू आणि शनीचा दोषदेखील नष्ट होतात.

👉तिळगुळाचे महत्त्व
मकर संक्रांती सणात तीळ आणि गूळ याचे सेवन करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे की याने शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यात शरीराच्या सुरक्षेसाठी याची फार गरज असते. या दिवसात शरीराचे तापमान आणि बाह्य तापमानामध्ये संतुलन करायचं असतं.

🤔 जाणून घ्या भोगी म्हणजे काय?
आज 'भोगी'. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. 'भोगी' हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. तसेच सासरच्या मुली 'भोगी'चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

'भोगी' हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी 'भोगी'ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.
'भोगी'ची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.
तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच 'भोगी' देणे म्हणतात.

⚜️मकरसंक्रांत पौराणिक कथा⚜️
श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.
यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानले जाते ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल-अपेष्टा सहन करावी लागली. यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी ला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्य देवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की, शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धन-धान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की, मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत.





🔆मकरसंक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण🔆
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.
💢वैज्ञानिक कारण:
नदीत अंघोळीचे महत्त्व या दिवसात नद्यांमध्ये बाष्प क्रिया होते ज्याने सर्व प्रकाराचे आजार बरे होऊ शकतात. म्हणून या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्याचं महत्त्व आहे.

🌾मकरसंक्रांत🌾
हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृतीआहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.

आगामी झालेले