नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन



संविधान दिवस यांवर आधारित चाचणी सोडवा आणि आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र मिळवा.👇👇👇👇

संविधान दिवस चाचणी 
👆👆👆👆
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.[१] भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर ला तयार झाली असली तरी ही घटना 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय जनतेला अर्पण का करण्यात आली?? त्याविषयी आपण थोडे जाणून घेऊ या - लाहोर येथे झालेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी पहिल्यांदा करण्यात आली आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला जाईल असा ठराव झाला होता. पण आपल्याला प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट ला, त्यामुळे इतिहासातील या दिवसाचे महत्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने 26 नोव्हेंबर ला घटना तयार होऊन ही ती 26 जानेवारी ला जनतेस अर्पण करण्यात आली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.
इतिहास
१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.
ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१].नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.
स्वरूप
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ३९५ (डिसेंम्बर २०१८) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.

प्रास्ताविक वाचनामागील भूमिका
o २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान अंगिकृत व अधिनियमित होऊन स्वत: प्रत अर्पित झाले.
o २६ नोव्हेंबंर १९५० ला देश प्रजासत्ताक झाला.
o संविधानाचा खऱ्या  अर्थी अंमल सुरू झाला
o राष्ट्राची एकात्मता व बंधुता प्रवर्धित होणेसाठी संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक
o संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्टÑग्रंथ आहे.
o हक्क व संरक्षणासोबतच नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची
o संपूर्ण नागरिकांना संविधानाची ओळख होणे आवश्यक

संविधानाचे वाचन कशासाठी?
o शालेय जीवनापासून- बालवयापासूनच मुला-मुलींना सविधांनाची माहिती होईल
o शाळा, महाविद्यालयातून संविधान वाचनामुळे मुला-मुलींची मने सुसंस्कारित होतील.
o दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकाचे पाठांतर होईल
o प्रास्ताविकामधील शब्दांचा अर्थ हळूहळू समजू शकेल
o मुला-मुलींच्या माध्यमातून संविधानाबाबत माहिती होईल
o देशाचा-राज्याच्या संपूर्ण कारभार संविधानाच्या अंतर्गत चालतो
o संविधान सन्मान म्हणजेच देश सन्मान-राष्ट्रभक्ती आहे.

प्रास्ताविकेचे दररोज वाचन असे करावे
o शाळा, महाविद्यालयांच्या भिंतीवर दर्शनी भागावर प्रास्ताविक लिहावे
o प्रार्थना, परिपाठाचे वेळेस दररोज सर्वांनी वाचन करावे
o प्रास्ताविक वाचनास अंदाजे दोन मिनिट लागतात
o भिंतीवर लिहीण्याच्या अल्पशा खर्चात राष्ट्रीय बंधूभाव निर्मिती
o कोणत्याही स्वतंत्र योजनेची व निधीची आवश्यकता नाही

संविधानाचे प्रास्ताविक काय सांगते
o सार्वभौम भारत, समाजवादी भारत, धर्मनिरपेक्ष भारत
o भारतातील लोकशाही गणराज्य
o सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय,
o विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातत्र्य,
o दर्जाची व संधीची समानता
o सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
o एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार

संविधानातील प्रमुख अंगे
o संसदीय लोकशाही
o संघराज्यीय पद्धत
o मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा)
o मार्गदर्शक तत्त्वे
o केंद्र राज्य संबंध
o घटना दुरुस्ती

संविधानातील महत्त्चाचा तपशील
o भारतीय संविधानात ३९५ अनुच्छेद आहेत.
o मुळात आठ परिशिष्टे, आज स्थितीत बारा परिशिष्टे
o ब्रिटीश राजवटीतील हितसंबंधी गटांना संरक्षणाचे आश्वासन घ्यावे लागल्यामुळे संविधान तपशीलयुक्त लिहिले गेले.
o आयसीएस अधिकारी, अ‍ॅग्लोइंडियन संस्थानिक, सरकारी सनदी नोकर या सर्वाबाबतबच्या तरतुदींचा समावेश,
o अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमाती बाबत तरतुदी समाविष्ट

नागरिकांनाही संविधानाची माहिती द्यावी
शाळांमध्ये संविधानातील अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, व  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, शाळांमध्ये आणि गावांमध्ये संविधान सभा भरवून विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाबाबत माहिती होईल असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संविधानाने दिलेले अधिकार
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देणारे भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंगिकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण करण्यात आले होते. या दिवसाची आणि एकुणच संविधानाने दिलेल्या अधिकार, कर्तव्ये, संवैधानिक हक्क आदीची माहिती व्हावी.
माहितीपर संकलित  ब्लॉग.... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले