नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २८ जुलै, २०२१

जागतिक निसर्ग संवर्धन दिन World Nature Conservation Day


जागतिक निसर्ग संवर्धन दिन
World Nature Conservation Day
शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो.
निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो.
जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणापासून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राणी व झाडांचे यांचे संवर्धन करणे आहे.

मूळ संकल्पना व सुरुवात
विकास (डेव्हलपमेंट) म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्याच्या आड येणारे सर्व काही नष्ट करायचे अशी चुकीची संकल्पना. आधुनिक व सुखासीन जीवनशैलीमधून, रुजू लागल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागल्याने निसर्ग संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव सर्वांच्या मनात ठसविणे गरजेचे बनले. वस्तू आणि संसाधनांचा पुनर्वापर केल्यानेही खूप चांगला फरक पडतो असेही दिसून आले आहे.

अधिक माहिती
सध्या आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्यासारखी स्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने... सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम थोड्याच वर्षात वापरकर्त्याला म्हणजे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. जीवनशैलवर नियंत्रण ठेवणे आणि वस्तूंचा पुनर्वापर (३ आर म्हणजे रिड्यूस, रीयुज, रिसायकल) हा उपाय सर्व पातळ्यांवर केल्यासच आशेचा किरण आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तरच हा दिवस सार्थकी ठरू शकतो.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा निरोगी वातावरण हा स्थिर आणि निरोगी मानवी समाजाचा पाया आहे हे दाखवून देण्यासाठी साजरा केला जातो. आजची जागतिक स्तिथी बघता तरी मानव जातीने नैसर्गिक संसाधने जपून वापरायलाच हवीत.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन आज जगभरात पाळण्यात येत आहे. पृथ्वीवरुन नष्ट होत असलेल्या वन संपदेचं जतन आणि संवर्धन करण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करण्यासाठी या दिनाचं औचित्य आहे.
पृथ्वी जिला आपण आईचा दर्जा देतो. तिच्या संरक्षणासाठी संसाधनांचे संवर्धन करणे ही आपली महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाणी, हवा, माती, ऊर्जा, वनस्पती, खनिजे, जीवजंतू इ. निसर्गाचे विविध घटक जपून पृथ्वीच्या नैसर्गिक सौंदर्यात संतुलन राखता येते. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाची ओळख ही निरोगी वातावरण ही आहे. हे वातावरण स्थिर आणि उत्पादक समाजाचा पाया आहे. वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी भाग घेतला पाहिजे.
१) झाडावर प्रेम करा.
पण झाडाखाली नको.
२८ जुलै जागतिक निसर्ग संरक्षण दिवस,
संकल्प करूया… निसर्ग वाचवूया…
२)“संवर्धन ही एक मोठी नैतिक समस्या आहे,
कारण त्यामध्ये राष्ट्राची सुरक्षा आणि सातत्य
सुनिश्चित करण्याचे देशभक्तीचे कर्तव्य आहे.”
३) जीवनात वेळ आणि निसर्ग
सर्वात कडक शिक्षक आहेत
ते आधी परीक्षा घेतात
व नंतर धडा शिकवतात.
४) पर्यावरण ही देवाची देणगी आहे,
त्याची काळजी घेणे ही परतीची भेट आहे.
५) “झाडाची काळजी घेणे
म्हणजे आपल्या आत्म्याचे काळजी घेणे होय.”
६) उन्हाळ्यात गाडी लावायला झाडं शोधली.,
आता पावसाळ्यात
झाडं लावायला जागा शोधूया..
७) पृथ्वीवर प्रेम आणि काळजी घ्या
आणि ती तुमची अधिक काळजी घेईल.
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
८) “जे निसर्गाचे जतन आणि संवर्धन करतात
ते निसर्गाचा भाग होण्यासाठी पात्र आहेत.”
९) जागतिक निसर्ग संवर्धन दिन
निसर्गाची रक्षा, जीवनाची सुरक्षा.
१०) काम करा लाख मोलाचे
निसर्ग संरक्षणाचे ..
११)आपण सर्व मिळून
पृथ्वीवरील प्राकृतिक सौंदर्याला जपूया
झाडे लाऊया..!

सोमवार, २६ जुलै, २०२१

कारगिल विजय दिवस Kargil Vijay Diwas


कारगिल विजय दिवस
Kargil Vijay Diwas
२६ जुलै १९९९ या दिवशी भारताने कारगिल युद्धात विजय मिळविला. त्याची आठवण म्हणून २६ जुलै हा 'कारगिल दिन' म्हणून साजरा होतो. इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे.
▪️'कारगिल विजय दिवस' हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे
▪️देशासाठी हुतात्मा झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी तसेच भारतीय सैन्याचे उल्लेखनीय देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, वीरवृत्ती याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे ही भावना प्रत्येक भारतीयांमध्ये जागृत करण्यासाठी 'कारगिल विजय दिवस' साजरा करणे आवश्यक आहे.
▪️यादिवशी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
▪️भारतीय सुरक्षादलातील एकूण ९७ जणांना कारगिल युद्धातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. त्यातील काही नावे खाली देत आहोत.
🌹१८ ग्रेनेडीयर बाटलियनचे सैनिक ग्रेनेडीयर (हातबॉम्ब फेकणारा सैनिक) योगेंद्र सिंग यादव यांना परमवीर चक्र पुरस्कार.
🌹 १/११ गोरखा रायफल्स बाटलियनमधील लेफ्टनंट मनोज कुमार पांड्ये यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
🌹१३ जेएके रायफल्स बाटलियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
🌹१३ जेएके रायफल्सचे रायफलमॅन संजय कुमार यांना परमवीर चक्र पुरस्कार
आणि इतर अनेक शूर भारतीय सैनिकांना महावीरचक्र व वीरचक्र देऊन गौरविले गेले.
जय हिंद!

कारगिल युध्द हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

🌐 *स्थळ*
कारगिल हे असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते.

राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्ये कडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

वर नमूद केल्याप्रमाणे कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.

💣 *कारणे* 🔫
कारगिल शहर ह दृष्ट्या महत्त्वाचे आहे
इ.स. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाही. तरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत. सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात. इ.स. १९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच इ.स. १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायम स्वरूपी सैन्य तैनात केले. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असे. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागले. पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगिलच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. इ.स. १९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. परंतु बाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वत: लाहोरला जाऊन आले होते.

इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले गेले होते.) नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.
⌛ *घटनाक्रम* ⏳

⛺ *पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा*
घुसखोरी व व्यूहरचना
कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जबाबदारी घेत असे.

फेब्रुवारी, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यांतच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणार्‍या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले.

🚨 *भारतीयांना उशीराने मिळालेली खबर*
सुरुवातीला, अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटले. परंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. घुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले. अशा रितीने कारगिल येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता. तर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.

भारतीय सरकारने *'ऑपरेशन विजय'* या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती. यांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.

भारतीय वायुसेनेकडूनही 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती.

भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरून लक्ष्य करण्यात आले. या कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेली. काही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरू झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.
🗻 *भारतीय प्रत्युत्तर* 🏔

कारगिलचे युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नक्की झाले. भारताने सैन्य जमवाजमवीचे प्रयत्‍न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्त्व देण्यात आले. असे केले की हा महामार्ग सुकर होणार होता.

घुसखोरांनी, आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच, चौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी संरक्षित केला होता. यातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले. या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होती. वर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगीलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आला. या चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व महामार्गही सुरक्षित होत गेला. जसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रितीने होत गेले.

महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. पॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली. जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत, तोफखान्याचा भडिमार चालूच होता.

पाकिस्तानी सैन्याने पाडलेल्या भारतीय विमानाचे अवशेष भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.

या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.

भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या.
🔮 *भारतीयांचे गमावलेल्या प्रदेशावर नियंत्रण*

मे २६, इ.स. १९९९ - भारताचे घुसखोरांवर हवाई हल्ले.
जुलै १२, इ.स. १९९९ - पाकिस्तानचे शांततेचे आवाहन.

🔎 *कारगील युद्धाची परिणती*
🇮🇳 *भारत*
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कारगील युद्धामधील त्यांच्या नेतृत्वामुळे १९९९ च्या निवडणुकात भा.ज.प. ला यश मिळाले.

कारगिलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगिल युद्धाच्या निमित्ताने दिसली. मात्र, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाला विजयाचे श्रेय घेणे लाभदायक ठरणार होते, म्हणून सैनिक कारवाई सुरू करण्यास विलंब लावला, असा आरोप युद्ध पार पडल्यावर विरोधी पक्षाने केला. या आरोपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळवले. निवडणूकपूर्व आघाडीने संपूर्ण बहुमत मिळवले असे हे इ.स. १९८४ नंतर प्रथमच घडले.
कारगीलचे युद्ध भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांची युद्धक्षेत्रात जाउन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय नागरिकांना प्रथमच भारतातील युद्धाची क्षणचित्रे टीव्हीवर पहायला मिळाली. यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युद्धानंतर भरलेल्या कित्येक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात अफाट प्रतिसाद मिळाला.
या युद्धात भारतीय गुप्तहेर खात्याचे कच्चे दुवे स्पष्ट झाले, संपूर्ण जगातून गुप्तहेर खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे युद्ध झाल्याचे मत प्रदर्शित झाले होते. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याकडे अतिउंचीवर लढण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे युद्धानंतर भारताने सैन्यखर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली.

🇵🇰 *पाकिस्तान*
कारगिलच्या युद्धानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमधील कच्चे दुवे बाहेर आले. पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे लोकशाही सरकार व लष्कर यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता हे सिद्ध झाले. सूत्रांनुसार नवाज शरीफ यांना या युद्धाबद्दल फारशी माहिती नव्हती असे कळते. तसेच युद्धादरम्यानही पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांना अद्यतने दिली नाहीत. त्यामुळे नवाज शरीफ यांना आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धासाठी मान्यता मिळवणे अवघड गेले. अगदी युद्धाच्या काळात नवाज शरीफ यांना, त्यांच्या अगदी जुना लष्करी मित्र असलेल्या अमेरिकेनेही सैन्य माघारीचा सल्ला दिला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच हे सैनिक आमचे नाहीत हा पवित्रा घेतल्याने शहीद सैनिकांचा स्वीकार करण्यास नकार दिला. ज्या सैनिकांना मानाने अंत्यसंस्कार मिळायला पाहिजे होते, त्यांचे संस्कार भारतीय सैन्याने केले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मध्येही सरकार विरुद्ध जनमताची लाट उसळली.
आजपाकिस्तान सरकार व पाक लष्कर यांच्यातील दरी वाढत गेली. असे कळते की मु्शर्रफ यांच्यावर कारवाईची तयारी शरीफ यांनी केली होती परंतु मु्शर्रफ यांनी शरीफ यांचे प्रयत्‍न फोल पाडले. यादरम्यान एका घटनेत मु्शर्रफ यांचे विमान इस्लामाबाद येथे उतरून देण्यास नकार दिला, परंतु त्यांचे विमान त्यांच्या निष्ठावंतानी दुसऱ्या विमानतळावर उतरवून मु्शर्रफ यांचा जीव वाचवला. मु्शर्रफ यांनी हत्येचा प्रयत्‍न या आरोपाखाली शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून लावले व पाकिस्तानात आणीबाणी लागू केली. त्यानंतर काही दिवसातच पाकिस्तानच्या भल्यासाठी आपले सत्तेत राहणे गरजेचे आहे, असे दूरचित्रवाणीवर सांगत लष्करी राजवट लागू केली.

📺 *माध्यमांचा प्रभावी वापर*
कारगीलचे युद्ध हे भारतीय माध्यमांसाठी एक मैलाचा दगड ठरले. कारगीलच्या युद्धाच्या वेळेस भारतीय माध्यमांनी जागतिकीकरणात उडी घेतली होती व बी.बी.सी , सी.एन,एन्. या आंतराष्ट्रीय दर्जाच्या वाहिन्यांचा दर्जा गाठण्यास सुरुवात केली होती. कारगील युद्धाच्या निमित्ताने या वाहिन्यांनी युद्धाच्या जास्तीत जास्त बातम्या सादर करण्यात पुढाकार घेतला. भारतीय सैन्यानेही यात मागे न रहाता, माध्यमांचा वापर काळजीपूर्वक आपल्या सोयींकरता करून घेतला. त्यामुळे युद्धाबाबत भारतीय सैन्याला सहानूभूती मिळवणे सोपे गेले. तसेच युद्धदृश्ये व त्यांच्या यथायोग्य विश्लेषणामुळे भारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढीस लागली.
जसजसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसे माध्यमांनी प्रक्षेपण अजून वाढवले. प्रक्षेपणाची व्याप्ती भारतात पाकिस्तानपेक्षा खूप जास्ती होती. काही वाहिन्यांनी सरळसरळ युद्धक्षेत्रात जाउन युद्धाचे थेट प्रक्षेपण केले. भारतीय सैन्यांच्या तोफांचा मारा काही खास करून दाखवला गेला. यामुळे बोफोर्स तोफांबद्दलचा भारतीय जनमानसातील राग कमी झाला. सीएन्‌एन्‌ने आखाती युद्धाचे जसे प्रक्षेपण दाखवले तसेच काहीसे भारतीय माध्यमांनी दाखवले. भारतीय माध्यमांचे यश पाकिस्तानी माध्यमानीही कबूल केले, कराची येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी पत्रकारांनी नमूद केले की भारतीय सरकारने माध्यमांना व जनतेला विश्वासात घेतले तर पाकिस्तानने एकदम विरुद्ध अशी भूमिका घेतली.
भारतातील व जगभरातील वृत्तपत्रेही भारताच्या बाजूने सहानूभूतिमय होती. पाश्चिमात्य देशांनी सरळसरळ सहानूभूती प्रदर्शित न करता हे युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. काही तज्‍ज्ञांच्या मते भारतातील माध्यमांनी या युद्धासाठी लागणार्‍या बाह्य शक्तींचे काम केले व भारतीय सैन्याचा उत्साह दुणावणारी कामगिरी केली. जसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसा पाकिस्तान या पातळीवर मागे पडू लागला व भारताने महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडी मिळवली.

📽 *चित्रपट*

कारगिलच्या युद्धावर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट निघाले.

*एल.ओ.सी कारगील* हा जे.पी.दत्ता यांचा चित्रपट कारगिल युद्धात मरण पावलेल्या हुतात्‍म्यांच्या जीवनावर आधारित आहे. चार तासांपेक्षाही अधिक लांबीच्या ह्या चित्रपटात सैनिकांनी लढाया कशा पार पाडल्या याचे चित्रण आहे. अति वास्तवपूर्ण करणाच्या प्रयत्‍नामध्ये या चित्रपटाने काही मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे चित्रपटावर बरीच टीका झाली. चित्रपटाऐवजी माहितीपट काढला असता तर जास्त शोभला असता, अशी चर्चा होती.

*लक्ष्य* हा चित्रपट इ.स. २००४ मध्ये प्रदर्शित झाला. हा कारगिल युद्धातील एक काल्पनिक कथेवर आधारित आहे. कारगिल युद्धात बहुतांशी अधिकारी हे खूपच नवीन अधिकारी होते. त्यापैकी एक कारगिलचे एक शिखर आपल्या आयुष्याचे लक्ष्य बनवतो व त्यात यशस्वी होतो अशी कथा आहे.

*सैनिक* (इ.स. २००२), हा कन्नड भाषेतील चित्रपट कारगील युद्धात सहभागी झालेल्या एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित होता. महेश सुखदर ह्याने हा काढला होता.

*धूप* (इ.स. २००३) हा चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. याचे दिग्दर्शन आश्विन चौधरी यांनी केले होते. महावीर चक्र मिळवलेल्या अनुज नय्यर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओम पुरी यांनी अनुज नय्यर यांच्या वडिलांची भूमिका केली आहे

*मिशन फतेह - रियल स्टोरी ऑफ कारगील हीरोज* ही मालिका दूर्चित्रवाणीच्या सहारा वाहिनीवर प्रदर्शित झाली होती. यातील प्रत्येक भागात कारगिल युद्धात कामी आलेल्या एका सैनिकाची कहाणी होती.

फिफ्टी डे वॉर

*कुरुक्षेत्र* (मल्याळी चित्रपट) हा इ.स. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळी चित्रपट आहे. कारगिल युद्धातील अनुभवांवर हे युद्ध अनुभवलेले मेजर रवी यांनी हा चित्रपट काढला.

*टँगो चार्ली* हादेखील चित्रपट कारगील युद्धाची प्रेरणा घेऊनच काढला गेला होता.

🙏🌹 *कारगिल युध्दात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन* 🙏🌷



सोमवार, १९ जुलै, २०२१

जयंत विष्णु नारळीकर Jayant Vishnu Narlikar


जयंत विष्णु नारळीकर ( १९ जुलै १९३८ )
Jayant Vishnu Narlikar

जयंत विष्णु नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णु वासुदेव नारळीकर हे गणिती होते तर मातोश्री सुमती या संस्कृत शिकलेल्या होत्या. सुप्रसिद्ध गणिती मो. शं. हुजूरबाजार आणि विद्युत अभियंता गो. शं. हुजूरबाजार हे त्यांचे मामा. म्हणजे वडील आणि आई अशा दोघांकडून त्यांना विद्वत्तेचा वारसा लाभला होता. पुढे विष्णुपंत नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभाग प्रमुख झाले तेव्हा हे कुटुंब बनारसला आले. त्यामुळे जयंतरावांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण तेथे झाले.

डॉ जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्या सोबत कान्फोर्माल ग्रॅविटी थियरी मांडली.
जीवनप्रवास-
नारळीकरांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांचे शालेय शिक्षण बनारस येथेच झाले. त्यांनी इ.स.१९५७ साली विज्ञानात पदवी संपादन केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटन मधील केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी बीए, एमए, पीएचडी च्या पदव्या संपादन केल्या. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम करून रँगलर ही पदवी संपादन केली. त्यांनी अत्यंत मानाचे असणारे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार व बक्षिसे पटकावली.
त्यांचा विवाह १९६६ साली मंगला राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत. गीता, गिरीजा व लीलावती. ते १९७२ साली पुन्हा भारतात परतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा संशोधन संस्थेच्या खगोलशास्र या विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. त्यानंतर पुणे येथील १९८८ साली आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
डॉ. नारळीकरांनी स्थिर स्थिती सिद्धांत मांडला. तसेच चार दशकाहून अधिक काळापासून त्यांनी खगोलीय क्षेत्रात संशोधन सुरु आहे. माणसाला खगोलशास्र समजण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तक लिहिली आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी नभात हासते तारे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. तसेच चार नगरांतील माझे विश्व हे डॉ नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे.
त्यासोबतच त्यांना १९६५ व २००४ साली पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर २०१० मध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
उच्च शिक्षणासाठी जयंतराव केंब्रिज विद्यापीठात गेले. या विद्यापीठातून त्यांनी बी. ए., पीएच्. डी., एम. ए. आणि एस्सी. डी. या पदव्या संपादन केल्या. पीएच्. डी.साठी त्यांचे मार्गदर्शक होते शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल. गणितातील ट्रायपोस ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. खगोलशास्त्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठा लाभलेले टायसन पदक आणि स्मिथ पारितोषिक बहाल करण्यात आले.
सहा वर्षे ते केंब्रिज विद्यापीठात अध्यापन करीत होते. १९७२ मध्ये ते भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढच्या काळात नारळीकर तेथे ज्येष्ठ प्राध्यापक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख बनले. साधारण १९८५ च्या सुमारास विद्यापीठ अनुदान मंडळात, खगोलशास्त्राला वाहिलेले एक आंतरविद्यापीठीय केंद्र उभारण्याच्या दिशेने विचार सुरू झाला होता. त्या वेळेस या मंडळाचे अध्यक्ष असलेले प्रा. यशपाल यांनी हे केंद्र उभारण्याची जबाबदारी नारळीकरांकडे सोपविली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि १९८८ मध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकी केंद्र – आयुका – स्थापन करण्यात आले. नारळीकरांची या केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कारकीर्दीत या संस्थेने इतकी प्रगती केली आहे की आज हे केंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहे. हे केंद्र उभारून आणि नंतर त्याला त्यांनी उत्तम नेतृत्व दिले आहे. त्यांनी आयुकाची धुरा १५ वर्षे सांभाळली आणि २००३ मध्ये ते संचालक पदावरुन निवृत्त झाले. सध्या ते आयुकात सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor) हे पद भूषवित आहेत.
नारळीकरांचे संशोधन मुख्यत: विश्वरचनाशास्त्राशी निगडित आहे. या विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे मानले जाते आणि हा सिद्धांत बहुसंख्य शास्त्रज्ञ मान्य करतात. परंतु हॉयल आणि नारळीकर यांनी १९६४ मध्ये एक वेगळाच सिद्धांत मांडून या कल्पनेला हादरा दिला. त्यामुळे नारळीकर एकदम प्रकाशझोतात आले. त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. नारळीकरांच्या संशोधनाची इतर काही क्षेत्रे म्हणजे क़्वासार, कृष्णविवरे, गुरुत्वाकर्षण, माख तत्त्व (Mach’s Principle), पुंज विश्वरचनाशास्त्र (quantum cosmology) आणि Action at a distance physics. १९९९ सालापासून नारळीकर संशोधकांच्या एका गटाचे नेतृत्व करीत आहेत. हा गट पृथ्वीच्या वातावरणातील ४१ कि.मी. उंचीपर्यंतच्या हवेचे नमुने घेऊन त्यात सूक्ष्मजीव सापडतात का याचा शोध घेत आहे. २००१ आणि २००५ मध्ये या बाबत जो अभ्यास झाला त्यानुसार असे जीवाणू सापडले आहेत. आपल्या पृथ्वीवर पृथ्वीबाहेरून आलेल्या जीवाणूमुळे सजीवांची निर्मिती झाली असा एक सिद्धांत मांडण्यात आला आहे. या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
नारळीकरांचे ३६७ शोधनिबंध विविध संशोधन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
सर्वसाधारणपणे असे दिसते की, शास्त्रज्ञ आपल्याच कोशात गुरफटलेले असतात आणि त्यामुळे ते जनसामान्यांपासून दूर असतात. परंतु नारळीकर याला सन्मान्य अपवाद आहेत. विज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. मुंबई दूरदर्शनवरून आकाशाशी जडले नाते ही त्यांची मालिका प्रसारित करण्यात आली. पुढे दूरदर्शनवरून ब्रह्मांड या नावाची हिंदी मालिका प्रसारित झाली. त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून विज्ञान-प्रसारासाठी विपुल लेखन केले आहे. अशा लेखांची संख्या ११३४ एवढी आहे. विशेष म्हणजे हे लेखन सोप्या भाषेत आहे. त्यांनी विज्ञान-कथा हा प्रकारही हाताळला आणि लोकप्रिय केला आहे. नारळीकरांची पुस्तके बंगाली, तेलगू, कन्नड, हिंदी, मल्याळम आणि गुजराथी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. इतकेच नाही तर ग्रीक, इटालियन, रशियन, पोलिश, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश आणि चिनी अशा परदेशी भाषांमध्येही त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. नारळीकरांनी स्वत: लिहिलेल्या, संपादित केलेल्या आणि अनुवाद झालेल्या पुस्तकांची संख्या १४२ आहे. याशिवाय त्यांनी तांत्रिक विषयांवर तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक भाषणेही दिली आहेत.
नारळीकरांचे काम इतके सर्वमान्य आहे त्यामुळे त्यांना विविध मानसन्मान मिळाले. त्यात भारत सरकारचे पद्मविभूषण, बरद्वान, बनारस हिंदू, रुरकी, कोलकता आणि कल्याणी विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेटस, साहित्य अकादमी पुरस्कार, एम. पी. बिर्ला पुरस्कार, भटनागर पुरस्कार, फ्रेंच खगोलीय संस्थेचा प्रिक्स जान्सेन (Prix Janssen) पुरस्कार, विज्ञान-प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंग पुरस्कार, कॉस्मोलॉजी कमिशन ऑफ द इंटर नॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन या प्रतिष्ठित संस्थेचे, लंडनच्या रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सहयोगी सदस्य, भारतातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य, थर्ड वर्ड ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य असे अनेक बहुमान आहेत.

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

धनराज पिल्ले Dhanraj Pille


भारताचे नाव जगात चमकविणारा महाराष्ट्राचा वाघ ...
ग्रेट हॉकी प्लेअर ...

माननीय श्री धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस...

धनराज पिल्ले (जन्म : १६ जुलै, इ.स. १९६८) हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत.
पिल्ले यांनी आपले तारुण्य ऑर्डनन्स फॅक्टरी स्टाफ कॉलनीमध्ये घालवले जेथे त्याचे वडील मैदानावर होते. तो कॉलनीतील भाऊ आणि मित्रांसमवेत तुटलेल्या लाठ्यांबरोबर खेळून हॉकी बॉल ओएफके मैदानाच्या मऊ आणि धुळीच्या पृष्ठभागावर फेकून त्याने आपले कौशल्य शिकले; थोर फॉरवर्ड खेळाडू आणि त्याची मूर्ती मोहम्मद शाहिद यांच्या शैलीचे अनुकरण करण्याचा त्याने प्रयत्न केला. आपल्या यशाचे सर्व श्रेय तो आपल्या आईला देतो, ज्यांनी अत्यंत गरीब असूनही आपल्या पाच मुलांना हॉकी खेळण्यास प्रोत्साहित केले.

ऐंशीच्या दशकाच्या मध्यात धनराज मुंबई लीगमध्ये आरसीएफकडून खेळलेला मोठा भाऊ रमेश याच्याकडे ऐंशीच्या दशकाच्या मध्यभागी मुंबईत गेला. रमेश यापूर्वीच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून खेळला होता आणि त्याच्या मार्गदर्शनाने धनराजला वेगवान वेगवान गोलंदाजीच्या रूपात विकसित केले. त्यानंतर त्यांनी महिंद्र आणि महिंद्रामध्ये प्रवेश केला जिथे त्याचे प्रशिक्षण तत्कालीन प्रशिक्षक जोकीम कारवालो यांनी केले होते.
धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले.. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.
१९८९ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या अ‍ॅल्विन आशिया चषक स्पर्धेत देशाच्या प्रतिनिधित्वामुळे धनराज पिल्ले यांची आंतरराष्ट्रीय हॉकीमधील पदार्पण सुरू झाले.

भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धांत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचा तो कर्णधार होता. ते सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.

धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर (मलेशिया), अभाहानी (बांगला देश), स्टुटगार्ट किकर्स, बॅंक सिंपानाम नॅशनल (मलेशिया), आर्थर ॲंडरसन (कुआलालंपूर) अशा वेगवेगळ्या जागतिक हॉकी क्लबांकडून खेळले आहेत.

"फोर्गिव मी अम्मा " (माफ कर आई ) हे चरित्र प्रकाशित झाले आहे. संदीप मिश्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे, ज्यात सुमारे तीन दशकांपर्यंतच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा एक पत्रकार संदीप मिश्रा यांनी लिहिले आहे.

पुरस्कार ......
अर्जुन पुरस्कार (१९९५)
के. के. बिर्ला पुरस्कार (१९९८-९९)
राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार (१९९९)
पद्मश्री (२०००)
क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार

धनराज पिल्ले यांची कारकीर्द डिसेंबर १९८९ ते ऑगस्ट २००४ पर्यंत टिकली, त्या दरम्यान त्यांनी ३३९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. भारतीय हॉकी असोसिएशनने केलेल्या गोलची कोणतीही अधिकृत आकडेवारी ठेवली जात नाही. म्हणूनच, धनराजने किती आंतरराष्ट्रीय गोल केले याची कोणतीही विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या मते ही संख्या १७० पेक्षा जास्त आहे, परंतु हॉकी आघाडीच्या आकडेवारीनुसार ती १२० च्या जवळ आहे.

चार ऑलिम्पिक खेळ (१९९२, १९९६,२००० आणि २००४), चार विश्वचषक (१९९०,१९९४,१९९८, आणि २००२), चार चॅम्पियन्स ट्रॉफी (१९९५, १९९६, २००२ आणि २००३) आणि चार आशियाई खेळ जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. (१९९०, १९९४, १९९८ आणि २००२). त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई खेळ (१९९८) आणि एशिया कप (२००३) जिंकला. त्याने बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक गोल केले आणि १९९४ च्या सिडनी येथे झालेल्या विश्वचषकात वर्ल्ड इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू होता.

शनिवार, ३ जुलै, २०२१

जागतिक प्लॅस्टिक पिशवी(बॅग) मुक्ती दिन

 जागतिक प्लॅस्टिक पिशवी(बॅग) मुक्ती दिन....



अनेक गुरे वासरे हे रस्त्यावरील प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडत आहेत. संपूर्ण जलसृष्टी या प्लास्टिक मुळे धोक्यात आली आहे. प्लास्टिक व त्यात असलेल्या विषारी रसायनांमुळे समुद्री जीव गुदमरून जात आहेत, आणि काही संशोधनामुळे हे पण सिद्ध झाले आहे की प्लास्टिकचे सुक्षम बारीक बारीक कण आपल्या पिण्याच्या पाण्यात व अन्न पदार्थात मिसळू लागले आहेत.

हे प्लास्टिकचे प्रदूषण रोखले नाही गेले तर मानवी जीवनातस खूप मोठा धोका आहे. आज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी ही काळाची गरज बनली आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे या सजीवसृष्टीचा त्रास होऊ लागला आहे.

प्लास्टिक

कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणार तेल प्रथम शुद्ध करून घ्याव लागत. त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते. 

प्लास्टिक प्रदूषण   

शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.  

समुद्री जीवनावर प्लास्टिकचा प्रभाव 


प्लास्टिक बॅग, अन्य प्लास्टिक कण तसेच पाण्याच्या बाटल्या हवा तथा पाणी द्वारे समुद्र आणि महासागरात पोहोचतात. पाण्यामध्ये हे कण मिसळल्याने समुद्रामधील पाणी दूषित होते आणि जर हे प्लास्टिक चे कण मासे, कासव आणि अन्य समृद्धी जीवांचा पोटात गेले तर त्यांच्या मृत्यू होतो. दरवर्षी कितीतरी समुद्री जीव प्लास्टिकमुळे मारले जातात. 

मनुष्य व प्राण्यांवर प्लास्टिकचा प्रभाव


समुद्रातील प्राण्यांप्रमाणेच प्लास्टिक प्रदूषण मनुष्य व धरतीवर राहणाऱ्या प्राण्यांनाही हानीकारक आहे. प्लास्टिक मध्ये असलेले कचरा अन्न समजून खाल्ल्याने दरवर्षी हजारो पशूंची मृत्यू होते. हे प्लास्टिक त्यांच्या आतड्यांमध्ये अडकून जाते. वेळेनुसार प्लास्टिक कचरा अधिक खराब होत जातो. त्यामुळे त्यात डास, माश्या आणि दुसऱ्या प्रकारचे किडे तयार व्हायला लागतात. या मुळे माणसामध्ये रोगराई पसरते.

प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या

प्रथम हे समजणे खूप महत्त्वाचे आहे की प्लास्टिक ही एक अत्यंत उपयुक्त सामग्री आहे. प्लास्टिकचे उत्पादन करणे सोपे आहे, ते स्वस्त आहे आणि खूप सारे उद्योग प्लास्टिकचा वापर कुठल्या ना कुठल्या रूपांमध्ये करतात. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात आणि उद्योगांमध्येही प्लास्टिकचा वापर केला जातो.

काही उद्योगांमध्ये प्लास्टिक बंदी लगेचच लागू करता येणार नाही उदा. रिटेल, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स. परंतु लँडफिल, नद्यांमध्ये आणि महासागरांमध्ये प्लास्टिक जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकच्या मर्यादित वापर आणि प्लास्टिक बंदी उपयोगी पडू शकते. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक ज्याचा पुनर्वापर करता येत नाही अर्थात पीईटी बाटल्या, प्लास्टिक फोम कंटेनर, कॅरी बॅग इत्यादी. हे प्लास्टिक लँडफिल, नद्या आणि समुद्रांमध्ये जाते जे पर्यावरणाला प्रदूषित करते आणि शेवटी आपल्या अन्नात येते. 

भारत दररोज 25940 टन प्लास्टिक तयार करतो त्यातील दिवसाला 10300 टन संकलन होत नाही. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि कोलकाता ही शहरे सर्वाधिक प्लास्टिक कचरा उत्पादक आहेत. प्लास्टिक कचरा ही एक जागतिक समस्या आहे; जागतिक स्तरावर 6.3 अब्ज टन प्लास्टिक कचरा साचला जातो, त्यातील 79% प्लास्टिकचा आणि कचरा जमीन आणि नैसर्गिक वातावरणात जमतो. दरडोई सर्वाधिक म्हणजे 109 किलो प्लास्टिकचा वापर अमेरिकेत होतो. दुसऱ्या नंबरवर चीन आहे जे प्रति व्यक्ती 38 किलो प्लास्टिक वापरतात आणि तिसर्‍या स्थानावर आपण भारतीय दरडोई 11 किलो प्लास्टिक वापरतो. (संदर्भः इकॉनॉमिकटाइम्स.कॉम).

भारतात, सिक्कीम राज्य कचरा व्यवस्थापनात अग्रेसर आहे. 1998 पासून ते यावर काम करत आहेत. सिक्किम हे सेंद्रिय उत्पादनांमध्येही अव्वल राज्य आहे. सिक्कीम हे एक छोटेसे राज्य आहे, म्हणून तेथे कार्य केलेले धोरण उच्च औद्योगिक आणि भौगोलिकदृष्ट्या मोठ्या राज्यांमध्ये जसे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान करेलच असे नाही. पण पण बाकी राज्यांना सिक्किम कडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी नक्कीच आहेत.

देशोदेशी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

डेन्मार्कमध्ये २००३ पासून प्लास्टिक पिशव्यांवर रिटेलर्ससाठी कर

वेल्समध्ये २०११ ऑक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवर शुल्क

इटलीमध्ये २०११पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

जर्मनीमध्ये दुकानदारांसाठी प्लास्टिक पिशव्यांवर पुनíनमाणासाठी शुल्क

इंग्लडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शुल्क

अमेरिकेत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

आर्यलडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर

मेक्सिकोत २०१० पासून दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दंड

ऑस्ट्रेलियात काही ठिकाणी अति पातळ पिशव्या वापरण्यास बंदी

द.आफ्रिकेत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी व शुल्क

चीनमध्ये २००८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

बांगलादेशमध्ये २००२ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

फ्रान्समध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दुकानदारांकडून शुल्क

बेल्जियममध्ये २००७ पासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर

कविता-

अगं माये अरे भाऊ नका प्लास्टिक वापरू

नका नका प्लास्टिक वापरू , अगं माये अरे भा

पिशवीमंदी कचरा भरून नको फेकून तू देवू

गुरंढोरं कचरा खाती, प्लास्टिक पोटा मंदी 

चारा नाही त्यांच्या पोटी, प्लास्टिकचा गोळा हो

प्लास्टिक होत जिथं गोळा पाण्या नाही देत वा

धरित्री ना घेई पोटी, खत नाही पीक भे

समिंदरा प्लास्टिक जाता तरास होतो जल

मासे, प्राणी मुकं जीव त्यांचा विचार करा जरा

प्लास्टिकला तू दूर कर, मनापासनं दे न

तुझ्याकडे शहाणपण ठेवू नको तू गहा

वापर तू कागद कापड आपलसं त्यास 

देवा दिले तुले मग तेचा कर तू सन्मा

मुंबई नगरी आपली माय तिला ठेवू सांभा

प्रत्येकानं ठरवू मनी प्लास्टिकला नाही 

संकलित माहिती


आगामी झालेले