नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

राजा रामण्णा भारतीय भौतिकशास्त्रज्ञ


राजा रामण्णा

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

जन्मदिन - २८ जानेवारी इ.स. १९२५

रामण्णा, राजा : (२८ जानेवारी १९२५–). भारतीय शास्त्रज्ञ. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. भारतामध्ये अणुकेंद्रीय तंत्रविद्येचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य.

रामण्णा यांचा जन्म म्हैसूर येथे आणि प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाले.त्यांनी मद्रास विद्यापीठाची बी. एस्सी. व लंडन विद्यापीठाची पीएच्.डी या पदव्या मिळविल्या. १९४९ साली ते टाटा इन्स्टिटयूट ऑफ राजा रामण्णाफंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रुजू झाले. १९५३ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र (पूर्वीचे अणुऊर्जा आस्थापना) येथे अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून १९७२ पासून जून १९७८ पर्यंत ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य होते. जुलै १९७८ मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले. जानेवारी १९८१ मध्ये ते पुन्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले.सप्टेंबर १९८३ – फेब्रुवारी १९८७ या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते.

रामण्णा यांचे संशोधन कार्य अणुकेंद्रीय विक्रिया व न्यूट्रॉन ऊष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास या विषयांत आहे. त्यांनी अणुकेंद्रीय भंजन (अणुकेंद्राचे तुकडे होण्याविषयीच्या) भौतिकीचा विविध दृष्टिकोनांतून अभ्यास केला आणि एका नवीन भंजन सिद्धांताचे प्रतिपादन केले.अप्सरा, सायरस व पूर्णिमा या संशोधन विक्रियकांचा, कलकत्ता येथील चल ऊर्जा सायस्लोट्रॉन या ⇨ कणवेगवर्धकाचा तसेच कल्पकम येथील शीघ्र प्रजनक चाचणी विक्रियकाचा [ ⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतींत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. १९७४ साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते.

अणुऊर्जेचे शांततामय उपयोग या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले.१९६१ साली ते नॉर्वे देशाच्या ‘नोरा’ या नवीन अणुकेंद्रीय विक्रियाकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. १९८६ साली ते इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते.

रामण्णा इंडियन फिजिक्स अ‍ॅसोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे अध्यक्ष (१९७६) व इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री (१९६८), पद्मभूषण (१९७३) व पद्मविभूषण (१९७५) हे किताब तसेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६३),मध्यप्रदेश सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८३), इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे मेघनाद साहा पदक (१९८४), ओम प्रकाश भसीन पुरस्कार (१९८५), इंडियन फिजिक्स अ‍ॅसोसिएशनचा आर्. डी. बिर्ला पुरस्कार(१९८५) आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान मिळाले.

संकलित माहिती

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

नेताजी सुभाषचंद्र बोस





नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म : २३ जानेवारी, १८९७ (कटक, ओडिशा, भारत)
अपघाती निधन : १८ ऑगस्ट १९४५ (वय ४८) ( तैहोको, तैवान)
टोपणनाव : नेताजी
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अखिल भारतीय काँग्रेस
फॉरवर्ड ब्लॉक
आझाद हिंद फौज
प्रमुख स्मारके : पोर्ट ब्लेर येथील स्मारक

धर्म : हिंदू
पत्नी : एमिली शेंकल
अपत्ये : अनिता बोस फफ
आवाहन : तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा !

हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.
नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.

👨‍👩‍👧 जन्म व कौटुंबिक जीवन
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.
जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.
प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.
प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.
आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.

🎓 शिक्षण व विद्यार्थी जीवन
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.
वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.
महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.
१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

🇮🇳 स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य
१९३९च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस. छायाचित्र:टोनी मित्रा
कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दास बाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.

🏛 कारावास

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

🗽 युरोपातील वास्तव्य

१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.

युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.

सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

१९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.

📿 हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.

ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.

आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.

🥊 काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.

सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.

पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

१९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.

अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

🎓 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.

🏃🏽 नजरकैदेतून पलायन

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.

👬 नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.

शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.

💎 पूर्व आशियातील वास्तव्य

पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.

आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.

पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.

द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

⌛ बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी*

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.

🏅 भारतरत्‍न पुरस्कार

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्दे*

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.

सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.

सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

📕 चरित्रे

अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-

गरुडझेप (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

जयहिंद आझाद हिंद (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

नेताजी (वि.स. वाळिंबे)

नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)

नेताजींचे सीमोल्लंघन (एस.एम. जोशी)

नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)

No Secrets (अनुज धर)

महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)

📚 नेताजींवरील अन्य पुस्तके

नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)

नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷

स्त्रोतपर माहिती

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

पांडुरंग सदाशिव खानखोजे

पांडुरंग सदाशिव खानखोजे

क्रांतिकारक, कृषी शास्त्रज्ञ

स्मृतिदिन - जानेवारी १८, इ.स. १९६७

क्रांतिकारक की कृषी शास्त्रज्ञ, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले.

१९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.

कृषी शास्त्रज्ञ खानखोजे

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते.

मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत 'आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल' असे लिहिले आहे.

मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली.त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वत: शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या.



    जन्म : नोव्हेंबर ७, इ.स. १८८४  (वर्धा , महाराष्ट्र)

    मृत्यू : जानेवारी १८, इ.स. १९६७

    (वय 83)(नागपूर , महाराष्ट्र)

संघटना : गदर पार्टी, 

              बर्लिन समिती, भारतीय 

              कम्युनिस्ट पार्टी

हालचाल : हिंदू-जर्मन षड्यंत्र , भारतीय कम्युनिझम

गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा भन्नाट प्रवास करणाऱ्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. सात नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा धावता आढावा..

परकीय भूमीवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केलेल्या एका क्रांतिकारकाची ही कहाणी आहे. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यांचे नाव. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा अक्षरश: होम केला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने त्यांनी जगभर वणवण केली. इंडो-चायना, जपान, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानची सीमा, फ्रान्स, जर्मनी, रशिया, मेक्सिको अशी ही भ्रमंती १८ जानेवारी १९६७ ला शांत झाली.

७ नोव्हेंबर १८८६ रोजी वर्धा जन्मलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राचा आयुष्यपट चक्रावून टाकणारा आहे. वयाच्या २० व्या वर्षी मातृभूमीला पारखे झालेल्या या वीराची स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य आकांक्षा, परकीय ब्रिटिश सत्तेला शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानेच देशाबाहेर घालवता येईल, ही पक्की मनोधारणा त्यांच्या जीवनप्रवासात जागोजागी दृष्टोत्पत्तीस येते. गदर चळवळींच्या प्रणेत्या खानखोजेंकडे प्रयोगशीलता होती. गदर चळवळीत, मेक्सिकोत शेती संशोधनांतही ती कामी आली; पण या प्रयोगशीलतेचा योग्य उपयोग आमचे शासनकर्ते करून घेऊ शकले नाहीत.

               लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली खानखोजेंनी मायदेश सोडला. अमेरिकेत कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावणीच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशिराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त आदी क्रांतिकारक त्यांच्याबरोबर होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी अर्धे जग पालथे घातले, पृथ्वीप्रदक्षिणा केली, अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन्यत सेन, जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर हे त्यांचे आदर्श होते. दोघेही शेती क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच मेक्सिकोत त्यांनी कृषिक्रांती घडवून आणली. हे सगळे करीत असताना मायभूमीच्या ओढीने ते तीन वेळा भारतात आले. पैकी एकदा इराणी नाव, इराणी पासपोर्ट आणि इराणी वेश धारण करून १० जून १९१९ ला मुंबईत आले. लोकमान्य टिळकांना गुप्तपणे भेटले. त्यांनी भारतात न राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे परत पॅरिस, बर्लिन, मॉस्को असा प्रवास करून मेक्सिकोत स्थायिक झाले. मॉस्कोत लेनिनशी दोनदा भेट झाली. त्याअगोदर सन्यत सेनशी भेट झाली होती. १९२४ ते १९४९ असे २५ वर्षे भारताबाहेर मेक्सिकोत राहून ते कृषी सल्लागार म्हणून भारतात आले; पण पाच महिन्यांनंतर परत गेले. त्यानंतर फेब्रुवारी १९५० ते ऑगस्ट १९५१ असे दीड वर्षे ते भारतात राहिले; पण इथल्या शासनकर्त्यांनी त्यांना स्वीकारले नाही. अखेर नोव्हेंबर १९५५ मध्ये नागपूरला कायमच्या वास्तव्यासाठी आले ते केवळ मायभूमीत अखेरचा श्वास घ्यायचा म्हणून.

               खानखोजे हे कधी काळी तेलंगणातून आलेले कुटुंब असावे. त्यांच्या एका पूर्वजाने पुंडावा करणाऱ्या एका खानाला शोधून काढले होते. म्हणून त्यांचे नाव खानखोजे असे पडले. त्यांचे मातुल घराण्याचे आडनाव फत्तेखानी. एका पुंडावा करणाऱ्या खानाला त्यांनी पकडले म्हणून ते फत्तेखानी झाले. त्यांचे आजोबा व्यंकटेश हे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झाले होते. त्यांची भेट तंटय़ा भिल्लाशी झाली होती. त्याने त्यांना ब्रिटिशांशी लढा देण्यास सांगितले होते.

                    डॉ. खानखोजे माध्यमिक शिक्षणासाठी नागपूर येथे आले. नील सिटी हायस्कूलचे ते विद्यार्थी. वयाच्या अठराव्या वर्षी या मुलाचे लग्न केले तर तो मार्गावर येईल या धारणेने त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न ठरवले, पण त्याने लग्नाच्या मांडवातून पलायन केले. बंगाली क्रांतिकारकांशी त्यांचा या सुमारास संपर्क आला. सखाराम देऊस्कर, ब्रह्मबांधव बंडोपाध्याय यांच्याशी भेट झाली. एक वेगळा प्रयोग म्हणून सर्कस चालू केली, पण हा प्रयोग फसला. सर्कस वादळात सापडली आणि अक्षरश: कोलमडली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. ते पुण्यास टिळकांना भेटले. (१९०५) टिळकांनी त्यांना जपानला जाण्याचे सुचवले. १६ ऑक्टोबर १९०५ला लॉर्ड कर्झन यांनी वंगभंगाचा आदेश काढला आणि संपूर्ण बंगाल पेटून उठला. ब्रिटिशांची दडपशाही वाढत होती. अशा वातावरणात हा सल्ला टिळकांनी त्यांना दिला होता.

खानखोजेंना भाऊ म्हटले जात असे. भाऊ प्रथम बनारसला जाऊन स्वामी रामतीर्थाना भेटले. रामतीर्थानी त्यांना एक पत्र दिले. भाऊंना मोबासा येथे टाइमकीपरची नोकरी मिळाली, पण जायला मिळाले नाही. अमेरिकन वकिलातीने मदत केली, पण अमेरिकन जहाजाच्या ब्रिटिश कप्तानाने त्यांना प्रवेश नाकारला. नंतर मेसेंजर मेरिटाइम या जहाज कंपनीचे येरा हे जहाज कोलंबोपर्यंत जाणार होते, त्यावर ते हरकाम्या म्हणून नोकरीस लागले. पोलिसांनी कोलंबो येथे चौकशी केली, पण त्यातून ते सुटले. सायगाव येथे उतरल्यावर रिक्षावाल्याने त्यांना हिंदू देवळांत नेले. तेथील पुजारी तेलगू भाषिक. त्याच्याकडून बरीच माहिती मिळवली. पुढील प्रवासात हाँगकाँग, शांघाय येथे उतरू न दिल्याने योकोहामा येथे उतरले. कॅप्टनने त्यांच्यासाठी रदबदली केली. ते जपानी भाषेचे विद्यार्थी झाले. इथे त्यांना गोविंदराव पोतदारांची खूप मदत झाली. इंग्लिशचे वर्ग चालवले. जेवणखाण्याचे हाल होते. इथे त्यांनी इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. जहाजावर मित्र झालेल्या चिनी मित्रांच्या ओळखीने त्यांची सन्यत् सेनशी भेट झाली. भारतीय स्वातंत्र्य, भारतीय शेती यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

खानखोजे यांनी या काळात स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. २ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांनी कोबे चेंबर ऑफ कॉमर्सपुढे भाषण दिले. याच काळात त्यांनी हिंदी विद्यार्थ्यांची क्रांती सेना स्थापन केली. १९०६ला सॅनफ्रान्सिस्को येथे भीषण भूकंप झाला होता. पुनर्वसनाच्या कामासाठी मजुरांची आवश्यकता होती. खानखोजे मजूर म्हणून खालच्या डेकचे स्वस्त तिकीट घेऊन सॅनफ्रान्सिस्को येथे गेले. सॅनफ्रान्सिस्को बंदरात त्यांना अडवण्यात आले. तू काय करणार आहेस? खानखोजे उत्तरले. ‘विद्यार्जन’. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला. बर्कलेला त्यांचे मित्र (सर्व बंगाली) भेटले. एका हॉटेलात भांडी विसळण्याचे काम मिळाले, पण ते नीट होईना म्हणून मालकाने त्यांना काढून टाकले. नंतर एका रुग्णालयात बशा धुण्याचे काम मिळाले. पगार नव्हता, पण राहायला जागा आणि तीन वेळ खाना होता. त्यांनी ‘इंडिया इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली. बर्कले विद्यापीठात त्यांनी शेतीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आठवडाअखेर रेल्वेरुळांवर खडी वाहून नेण्याचे हे काम केले. हॉम नावाची सुगंधी फुले वेचली. ही हिरव्या रंगाची फुले बीअरमध्ये वापरत असत.

तिथून ते सॅक्रोमेंटोला पोहोचले. त्यांनी शेतात काम केले. त्यांचा अनेक पंजाब्यांशी परिचय झाला. मेक्सिकन क्रातिकारकांशी घनिष्ठ परिचय झाला. तो पुढे उपयोगी पडला. पोर्टलंड येथे अशिक्षितपणाचे सोंग आणून लाकूड फॅक्टरीत काम मिळवले. १९१०मध्ये त्यांनी शेतीशास्त्राची कॉर्नवालिसची पदवी मिळाली. राफेल येथील मिलिटरी अ‍ॅकॅडमीत वेटरचे काम मिळाले. तेथे सैनिक प्रशिक्षणही घेतले. इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. पीरखान या नावाने सीएटल, सॅक्रोमेंटो, सॅनफ्रान्सिस्को येथे शाखा काढल्या. वॉशिंग्टन स्टार विद्यापीठात जेनेटिक्सचा अभ्यास केला. स्पोकेन येथे स्ट्रॉबेरीच्या मळ्यांत काम केले. पिंगळे, हरदयाळ यांच्या संपर्कात आले. आझाद हिंद पक्षाचे गदर पार्टी असे नामकरण झाले. त्यांना स्वत:ला गदर हे नाव पसंत नव्हते. (१९१३) युगांतर आश्रमाची स्थापना झाली. जर्मनीने उघड पाठिंबा दिला.

याच काळात सम फॅक्टर्स विच इनफ्लुएन्स द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लान्टस् हा प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला. (दुर्जल कृषीशास्त्र) एम.एस. पदवी मिळवली. पुलमन येथे सॉइल फिजिक्स प्रयोगशाळेत काम केले. अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशनची लाइफ मेंबरशिप मिळवली. भारतावर सिनेस्लाइड्सच्या साहाय्याने व्याख्याने देणे चालू केले. हिंदू असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या संस्थेची स्थापना केली. गनिमी युद्धाची तयारी सुरू झाली. जुलै १३मध्ये कॉव्‍‌र्हरची भेट झाली. मिनेसोटा विद्यापीठांत पीएच.डी.साठी त्यांनी नाव नोंदवले. पण पहिले महायुद्ध चालू झाले. खानखोजे आणि त्यांचे सहकारी सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करू लागले. पीएच.डी. मागे पडली. याच वेळेला कोमागाटा मारू प्रकरण झाले.

कोमागोटा मारूचा गदर चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, पण खानखोजे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. चळवळीच्या प्रहारक विभागाचे खानखोजे प्रमुख होते. दहा हजार स्वयंसेवक लढण्यासाठी तयार होते. त्यांच्या वेगवेगळय़ा तुकडय़ा करून भारतात शिरण्याची योजना होती. जर्मनीचा उघड पाठिंबा होता. भारतीय जनतेस जागे करण्यासाठी एम्डेनने पूर्व किनाऱ्यावर हल्ला केला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. खानखोजे पीएच.डी. अर्धवट टाकून निघाले. न्यूयॉर्कला भारतीय पासपोर्ट मिळाला नाही तेव्हा तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानमार्गे शिरण्याची योजना झाली. सप्टेंबर १९१४ मध्ये तिघे जण निघाले. आगाशे (मिर्झा महमद अली), खानखोजे (महमदखान), कोचर (दाऊदखान) यापैकी आगाशे यांच्याकडे इराणीयन पासपोर्ट होता. इराणी जेन्डार्मीत ते मोठय़ा हुद्दय़ावर होते. न्यूयॉर्क, अथेन्स, पिरओस- वेगवेगळ्या जहाजांनी, स्मर्नास रेल्वेने आले. कोचर यास प्रचार साहित्यासह जहाजाने मुंबईत पाठवले. पण त्यास पंजाबात पकडण्यात आले. खानखोजे यांचा पुढचा प्रवास इस्तंबुल (सप्टेंबर १९१४), बगदाद (डिसेंबर १९१४), पुस्तइकुत (फेब्रवारी १९१५), बुशायर (मार्च १९१५) असा झाला. इस्कोनडेरेन येथे रेल्वेवर ब्रिटिश विमानांनी हल्ला केला. ते थोडक्यात बचावले. पर्शियात त्यांनी महमदखान हे नाव घेतले होते. पर्शियन सीमेपर्यंत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी होडीतून २०० मैल जावे लागले. पर्शिया जर्मनीच्या बाजूने होता. देशफुल येथे ब्रिटिश हल्ल्यामुळे रातोरात पळावे लागले. बुशायर येथे जनानखान्यात लपावे लागले. नंतर जनान्याबरोबरच ते शहराच्या बाहेर पडले. शिराजला एप्रिल १९१५, निरीज ऑगस्ट १९१५, केरमान नोव्हेंबर १९१५, ३५० मैल वाळवंटी प्रवास करून बलुचिस्तान सीमेपर्यंत आले. गदरचे हंगामी सरकार १ डिसेंबर १९१५ ला स्थापन केले. जर्मनी, तुर्की, हंगेरी या सरकारांनी मान्यता दिली, पण फासे उलटे पडू लागले होते. स्थानिक सुलतान दगाबाज निघाला. खानखोजे यांना उंटावरून पळ काढावा लागला. काही गदर सैनिक मेले. बाफ्त येथे बर्फाच्छादित पर्वतराजींतून प्रवास झाला. इथे ते इंग्रजांचे कैदी झाले. पण ते बहाई सुन्नी शिपायांत स्वातंत्र्याचा प्रचार करीत राहिले. त्यांनी खानखोजेंची साखळदंडांतून मुक्तता केली. रात्री त्यांनी छावणीतून पलायन केले. एका गुहेत राहिले. पोट बिघडले होते. उपाशी, खोकला, ताप होता असताना बर्फाळ उतारावरून स्वत:ला खाली झोकून दिले. दोन टोळीवाल्यांनी त्यांना पकडले. त्यांच्या प्रमुखाने त्यांना आश्रय दिला, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी दरवेशाचा वेश घातला आणि पळाले. नाही तर युद्धकैदी झाले असते. बलुची टोळीत वर्षभर राहिले. याच काळात त्यांना व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. पर्शियन युद्ध थांबले होते. ब्रिटिशांनी पर्शियन सरदाराने खानखोजे यांना स्वाधीन करावे असे सांगितले होते. खानखोजे काशघईच्या वेषांत पळाले म्हणून वाचले. उरुजान येथे प्रयाण केले. काशगई प्रमुख सहामे याचे ते स्वीय सहायक बनले. १ डिसेंबर १९१५ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात स्वतंत्र हिंदुस्थानाचे सरकार अस्तित्वात होते. इराणी बलुचिस्तानच्या भागात ते होते. उरुजान येथे ते इंग्लिश आणि शेतीशास्त्र शिकवू लागले. याच सुमारास सुलतान आजारी झाला आणि उपचारासाठी त्याला मुंबईमार्गे युरोपला जायचे होते. खानखोजे त्याच्याबरोबरच मुंबईत आले. गिरगावात पोतदार यांच्यामार्फत टिळकांना भेटले.

टिळकांनी खानखोजे यांना पर्शियात परत जायला सांगितले. गदर चळवळ संपली होती. त्याची अनेक कारणे होती. १) भारतीय जनतेचा अनुत्साह. २) एम्डेन प्रकरणांनंतर जर्मनीचा भारतीय स्वातंत्र्य लढय़ांतील उत्साह कमी झाला होता. ब्रिटिश सरकारने ४३ फरारी क्रांतिकारकांची नावे घोषित केली. त्यांच्यावर मृत्यूचा हुकूमनामा होता. खानखोजे यांचे नाव त्यात होते. काळ्या यादीतले नाव स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काढले गेले नव्हते. ३) महायुद्धात हरल्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी याचा पाठिंबा गेला. ४) खुद्द पंजाबमध्ये या चळवळीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. ५) कोमागाटा मारूच्या प्रकरणातील एकही जण पंजाबपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे जनजागृती झाली नाही. ६) गदर चळवळीला खालसा दिवाणचा पाठिंबा नव्हता. ७) किरपालसिंग फितूर झाला. ४२ जण फांशी गेले, ११४ ना काळेपाणी, ९३ सश्रम कारावास, कर्तारसिंग, पिंगळे हे फाशी गेले.

नोव्हेंबर १९२१ मध्ये सुलतानचे प्रमाणपत्र घेऊन खानखोजे जर्मनीत गेले. रशियास भेट दिली. गदर चळवळीत तीन गट झाले होते. एम्. एन्. रॉय उघडपणे लेनिनवादी होते. कम्युनिझम प्रथम, स्वातंत्र्य नंतर, अशी त्यांची भूमिका होती. खानखोजे आधी स्वातंत्र्य, मग साम्यवाद अशी भूमिका मांडत होते. लेनिनशी त्यांची दोनदा भेट झाली होती. रॉय गट गदर क्रांतिकारकांविरुद्ध जात होता, अशी शंका होती. त्यामुळे रशिया वा जर्मनीत वावरणे धोक्याचे झाले होते. काही गदर कार्यकर्त्यांचा रहस्यमय शेवट झाला होता. बर्लिनमध्येही राहणे धोक्याचे होते. अमेरिका ब्रिटनच्या बाजूने उतरली होती. अमेरिकेतील सर्व गदर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

खानखोजे यांनी सर्व विचारांती मेक्सिकोत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या मेक्सिकन क्रांतिकारकांबरोबर मोलमजुरी केली होती, त्यापैकी काही आता स्वतंत्र मेक्सिकोत मोठय़ा पदावर होते. रोमन नेग्री हे शेतीमंत्री झाले होते. जानेवारी १९२४ मध्ये खानखोजा मेक्सिकोत दाखल झाले. स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. त्यांना आठ भाषा येत होत्या. पण स्पॅनिश येत नव्हती. प्रस्तुत लेखकाला १९५६-५७ मध्ये नागपूरला नोकरीनिमित्ताने मादाम जान खानखोजेंकडून फ्रेंच शिकण्याची संधी मिळाली.

खानखोजे यांनी जेनेटिक्समध्ये संशोधन केले. गव्हाची अनेक नवीन वाणे तयार केली. मक्याच्या जनुकांत मूलभूत फेरफार करून मक्याच्या एका कणसाचे उत्पन्न पाचपट केले. खानखोजे शेतकऱ्यांचे देव बनले. ख्रिस्ताच्या बरोबरीने त्यांची छायाचित्रे घराघरांतून लागली. मक्याच्या एकेका ताटावर तीस-तीस कणसे. मक्याची निर्यात वाढली. शेतकऱ्याकडे पैसा आला. खानखोजे यांना चापिंगोचा जादूगार असे नांव मिळाले. चापिंगो त्यांचे राहण्याचे गाव. तूर, चवळी, जंगली वाल, सोया डाळ, शेवगा यावर त्यांनी संशोधन केले. अगदी निवडुंगावरसुद्धा. मेक्सिकन रेल्वेने त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली. त्यांनी ‘जेनेटिक्स’ हा विषय शिकवला. १९३१-३२ मध्ये मेक्सिकन सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते पॅरिस, बेल्जियम, जर्मनी येथे गेले. परत आल्यावर त्यांनी व्हेराक्रूझ येथे डाळिंबाची नवी जात विकसित केली. १९३६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी २७ वर्षांनी तरुण असलेल्या जान सिंड्रिक तरुणीशी विवाहबद्ध झाले. जानची जानकी झाली. मेक्सिकोतील बेल्जियम कॉन्सलरची ती मेव्हणी होती. तिने त्यांना मागणी घातली. खानखोजे रेल्वेचे शेतीखातेप्रमुख झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रबरावर संशोधन करून त्याचे उत्पन्न वाढवले. १९२७ मध्ये खानखोजे यांच्यावरील बंदी उठवावी, असा प्रयत्न माधव अणे यांनी केला, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, मेक्सिकोतील खाणधंद्यात गुंतलेली त्यांची सगळी रक्कम बुडाली. १९१९ च्या गुप्त भेटीनंतर एप्रिल १९४९ मध्ये मध्य प्रदेश सरकारचे पाहुणे म्हणून आले. पण विमानतळावर त्यांना १२ तास थांबावे लागले. कारण त्यांचे नाव काळ्या यादीत होते. सप्टेंबर १९४९ मध्ये ते परत गेले. मार्च १९५० ला परत आले. जून १९५१ ला परत गेले. ३० नोव्हेंबर १९५५ ला वयाच्या ७० व्या वर्षी ते भारतात कायमसाठी आले.

ते नागपूर वसतिगृहात सुपिरटेंडेंट होते. लक्ष्मी नारायण इन्टिटय़ूटमध्ये ते जर्मन शिकवीत, नागपूर रेडिओवर व्याख्याने देत. भारत सरकारने १९६३ पासून त्यांना २५० रुपये पेन्शन म्हणून चालू केले. त्यांचा मृत्यू २२ जानेवारी १९६७ ला झाला. १९६१ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांच्या पत्नीने फ्रेंच ट्रान्सलेटर म्हणून काम केले. फ्रेंच भाषेचे वर्ग चालवले. त्यांना १९८१ मध्ये नागरिकत्व मिळाले. त्यांचा मृत्यू जुलै १९९१ ला दिल्ली येथे झाला. त्यांची मोठी मुलगी सावित्री भारतात स्थायिक झाली. धाकटी कॅनडात स्थायिक झाली.

(संदर्भ -खानखोजे यांच्या कार्याचा उल्लेख अनेक पुस्तकांतून आलेला आहे. ‘रणझुंजार डॉ. पां. स. खानखोजे यांचे चरित्र’ (ग. वि. केतकर), ‘कथा एका क्रांतिकारकाची’ (म. ना. काळे) ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. क्रांतिकार्यविषयक अनेक पुस्तकांतून त्यांच्या कार्याचा उल्लेख झाला आहे. 

📚 *अलीकडील तीन पुस्तके आहेत.*

१. नाही चिरा- वीणा गवाणकर १९९७ राजहंस

२. आय शाॕल नॉट आस्क फॉर पार्डन – सावित्री साहनी २०११ (पेंग्विन)

३. क्रांती आणि हरित क्रांती- उपरोक्तचा मराठी अनुवाद.

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹💐

संकलित माहिती

सोमवार, ११ जानेवारी, २०२१

तिरुपूर कुमारन




कुमारन हे तिरुपूर कुमारन किंवा कोडी कथा कुमारन म्हणून ओळखले जातात. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या भारतीय क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी होते.

जन्मतारीख: ४ ऑक्टोबर, १९०४

जन्मस्थळ: चेन्निमालाई

मृत्यूची तारीख: ११ जानेवारी, १९३२

मृत्यूस्थळ: तीरुप्पूर

पूर्ण नाव: Kumaran

मृत्यूचे कारण: सत्यापनाची वेळ पोलिसांच्या क्रूरता

राष्ट्रीयता: भारतीय

कुमारन तिरुपुर कुमारनही म्हणाले! एक भारतीय क्रांतिकार्य प्रथम भारतीय स्वतंत्र आंदोलन मध्ये भाग घेतला होता.भारत देशांमधून स्वतंत्रपणे जंगलात प्रवास करणे महत्त्वाचे ठरले आहे. कोणी का लहू बहा तर काही वर्षांच्या तुरूंगात बंद इंग्रजांचे नमस्कार योग्य आहेत, परंतु देशातील वीर जांबाजच्या मागे नाहीत आणि आपल्या अंतिम श्वासापर्यंत  देशाबद्दल अजादीसाठी लढत आहेत.

या नावांपैकी एक नाव आहे तिरुपूर कुमारन, ते नाव ब्रिटीश राजवटीच्या लाठीसमोर न मोडता सीना फखारपासून विस्तीर्ण झाले आणि आपला देश मोकळा करण्यासाठी लढ्यात उडी घेतली.

कुमारन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत मुक्त करण्यासाठी समर्पित केले, तरीही भारताच्या या महान स्वातंत्र्यसैनिकांचे नाव इतिहासाच्या पानांत कुठेतरी हरवले.

ऑक्टोबर २००४ मध्ये, भारताच्या १०० व्या जयंतीनिमित्त एक स्मारक टपाल तिकिट जारी केले गेले. त्यांच्या सन्मानार्थ तिरुपुरात एक पुतळा उभारला गेला आहे जो बहुतेक वेळा सार्वजनिक कामगिरीसाठी केंद्रबिंदू म्हणून वापरला जातो.

रविवार, १० जानेवारी, २०२१

रणमर्द दत्ताजी शिंदे


रणमर्द दत्ताजी शिंदे

(बचेंगे तो और भी लडेंगे)

 जन्म : 1723

विरगती : 10 जानेवारी 1760

दत्ताजी शिंदे हा राणोजी शिंद्याचा दुसरा मुलगा, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र भाऊ. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. ...या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांत मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर असामींनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करून त्याची डोलाची अंबारी खालीं पाडली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता (१७५१). त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापती करुन व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून त्याचा पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला (१७५७). जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेत खून झाला, त्या मोहिमेतही दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेवून बिजेसिंगाचा मोड केला व (जून १७५५). पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली (१७५६). नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले (१७५६). पुढील सालीं दादासाहेब (?) अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत.

यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले (१७५८). त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबाने (?) सांगितलेल्या नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावानें "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील" असे उद्‍गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला.

उज्जैनहून निघून चुलतेपुतणे दिल्लीस आले. पेशव्यानें(?) त्याला नजीबाचें पारिपत्य, बंगाल काबीज करणे, लाहोर सोडविणे, काशी प्रयाग घेणे व पुष्कळ पैसा घेऊन दादासाहेबाने (?) केलेंले स्वारी कर्ज फेडणें वगैरे कामें सांगितली होती. पेशव्यांचा 'दत्ताजी चित्तावर धरील ते करील' असा भरंवसा होता, मध्यंतरी तोफांच्या प्रकरणावरून दत्ताजीचें व गाजीउद्दीनाचें भांडण झालें होते. नंतर त्याने अबदालीच्या सुभेदारापासून लाहोर घेतलें (एप्रिल १७५८) व परत यमुनाकाठी रामघाटास दाखल झाला (मे). यावेळीं सरकारी कर्जाची ५० लाखांची वर्गत त्याच्यावर आली होती.

यावेळी दिल्ली मराठ्यांच्या ताब्यांत कायमची गेल्यासारखी झाल्याने नजीबाने व बादशहाने गुप्‍तपणें पत्रे लिहून अबदालीस ताबडतोब बोलाविलें व दत्ताजीस भागीरथीवर पूल बांधून देण्याच्या गुळचट थापा देऊन स्वस्थ बसविलें. याप्रमाणें नजीबाने सहा महिने (एप्रिल ते आक्टोबर) पुलाच्या थापेवर त्याला झुलविलें व त्याच्या विरुद्ध आपली सर्व तयारी चालविली आणि आंतून सर्व मुसुलमानांशी कारस्थानें करुन नोव्हेंबरांत अबदालीस दत्ताजीवर आणवून त्यास कैचीत पकडले.

आतां दत्ताजीस नजीबाचे कपट उमगले; परंतु आतां त्याचा कांही उपयोग नव्हता. गंगेचा पूल नजीबाच्या ताब्यांत होता आणि तो तर अबदालीला उघड मदत करीत होता. अशा वेळींहि दत्ताजीने एकाएकीं नजीबावर स्वारी करुन त्याला शुक्रतालाहून हांकलून गंगेपलीकडे रेटलें. ही लढाई मातब्बर होऊन तींत जनकोजी व दत्ताजी दोघेहि जखमी परंतु विजयी झाले (आक्टोबर). यावेळीं नजीबानें त्याच्याशी तात्पुरता तह केला; सुजाने हरिद्वाराच्या गंगेचे नाकें दाबून धरल्याने व अबदाली कुरुक्षेत्रास आल्याने, दत्ताजीनें गंगापार जाण्याचें रहित करुन कुरुक्षेत्री अबदालीची गांठ घेतली (२२ डिसेंबर). याप्रमाणें दत्ताजी हा घेरला गेला व हें सर्व कृत्य नजीबाने केले. त्याचप्रमाणें सुजानेहि एक कोट रु. खंडणी देण्याची थाप देऊन दत्ताजीस शुक्रतालास अबदाली येईपर्यंत अडकवून ठेविलें.

यावेळीं दत्ताजी मागें अहमदशहा अबदाली व पुढें रोहिले अशा कैचींत सांपडला होता. जर मागे सरून तो जयपूरकडे वळता तर प्रसंग टळता; परंतु मागे सरणे त्या शूर पुरुषास आवडेना. त्यानें जनकोजी व कबिले यांनी दिल्लीस पाठवून दिले शुक्रताल सोडून कुंजपुर्‍यास यमुना उतरून अहमदहहा अबदालीची गांठ घेतली, व त्या दिवशीं त्याचा पराभव केला (२४ डिसेंबर १७५९). परंतु लागलीच अबदाली कुंजपुर्‍यास यमुनापार होऊन नजीब, सुजा व अहंमद बंगश यांस मिळाला. याप्रमाणें एकंदर सर्व मुसुलमान एक झाले व दत्ताजी एकटा पडला. हें समजल्यावर मल्हाररावास त्याच्या मदतीस जाण्याबद्दल पेशव्यांनी अनेकदां हुकूम पाठविले, परंतु तो मुद्दामच जयपूरकडे रेंगाळत राहिला. तसेच पेशव्यांकडून मदत मिळेना परंतु माघार घ्यावयाचीच नाहीं या वाण्याने दत्ताजीनें लढायचे ठरवले . शेवटी दत्ताजी दिल्लीस येऊन (जाने. १७६०) जनकोजीस मिळाला. तेव्हांहि जनकोजीने व पदरच्या सर्व मंडळीने त्याला परत फिरण्याचा सल्ला दिला पण अपेश घेऊन श्रीमंतांस काय तोंड दाखविणे, असें म्हणून त्यानें तो नाकारला. नंतर युद्धाचा मुकाबला निश्चित करुन, पार होण्यासाठीं यमुनेचा ठाव पहातां तो लागेना व गिलच्यांचे लोक तर उलट नदी उतरून अलीकडे येऊन हल्ले करुं लागले हें पाहून दत्ताजी चिडला. शेवटी संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटून, तयारी करुन हत्ती यमुनेंत घालून व त्यांच्या पायांत अंदू घालून, तीन घटका दिवसास दत्ताजीने गिलच्यांशी युद्ध सुरू केलें (१० जानेवारी १७६०). गिलच्यानें आपल्या तोंडावर असलेल्या जानराव वाबळे, बयाजी शिंदे व गोविंदपंत बुंदेले या सर्वांनां मागे रेटून यमुना उतरून व पांच घटकांत पांचशें मराठे ठार मारुन थेट जरीपटक्यावरच चाल केली. तेव्हां सर्वत्र धुंद झाली. गिलच्यांच्या तोफांचा व बंदुकांचा मारा फार होऊ लागला. तेव्हां जिवाची तमा सोडून उभयतां पाटीलबावा निशाण बचावण्यासाठी झोंंबू लागले. जागा फार अडचणीची, नदीतीर, शेरणीची बेटे; त्यांत मराठे अडकले. हत्तीवरील आठवी घटका वाजली. तो जनकोजीच्या दंडास गोळी लागून तो बेशुद्ध झाला. तें पहातांच दत्ताजीने जोरानें गिलच्यांवर घोडे घातले. इतक्यांत यशवंत जगदळे पडला. त्याचें प्रेत काढण्यास दत्ताजी गेला, तों उजव्या बरगडींत गोळी लागून तो घोड्याखाली आला. त्यावेळीं अबदालीकडील शहानें त्याला विचारिलें कीं, 'पटेल, हमारे साथ लढेंगे?' त्यास त्या शूर पुरुषाने उत्तर दिलें कीं, " बचेंगे तो औरभी लढेंगे". परंतु याच वेळी त्याचा प्राण निघून गेला. ही बदाऊंघाटाची लढाई होय.

मराठ्यांच्या इतिहासांत जे हृदयद्रावक व शौर्याचे प्रसंग घडले, त्यांपैकीं दत्ताजीचा हा प्रसंग होय. शिंदे घराण्यांत दत्ताजी, जनकोजी, जयाप्पा, महादजींसारखे एक एक पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले.

    🚩 *हर हर महादेव...*🚩

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏


            स्त्रोतपर माहिती

शनिवार, २ जानेवारी, २०२१

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

 महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

 जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, कर्नाटक) 

 मृत्यू : २ जानेवारी १९४४ (पुणे, महाराष्ट्र )

 हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

💁‍♂️ *जीवन*

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

✍️ *लेखन*

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

⛲ *आत्मचरित्र*

'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.

🚢 *प्रवासवर्णने*

इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रांत झाला आहे, असे त्यांस वाटले.

ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. 'रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.

🌱 *शेतकरी चळवळ*

वि.रा. शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.

📚 *विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील पुस्तके*

एक उपेक्षित महात्मा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (प्रा.डॉ. एन.डी. पाटील)

एक उपेक्षित महामानव : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (बा.ग. पवार)

दलितांचे कैवारी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. लीला दीक्षित)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (संपादक - रा.ना. चव्हाण) (२ भाग)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : चिकित्सक लेखसंग्रह (प्रा.डाॅ. भिमाजी नामदेव दहातोंडे)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (गो.मा. पवार)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार (अशोक चौसाळकर)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी (तानाजी ठोंबरे)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना समजून घेताना (सुहास कुलकर्णी)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : व्यक्ती आणि विचार (प्रा डॉ. भिमाजी नामदेव दहातोंडे)

महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला संच : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (सुहास कुलकर्णी)

महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. नीला पांढरे) 

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳   

   🌹🙏 *विनम्र अभिवादन*🙏🌹

 स्त्रोतपर माहिती

वसंत गोवारीकर


वसंत गोवारीकर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ

स्मृतिदिन - २ जानेवारी २०१५

अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.

साभार:-विज्ञान व दिनविशेष

आगामी झालेले