नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

विद्यार्थी दिवस महाराष्ट्र राज्य Students Day in Maharashtra


विद्यार्थी दिवस Students Day in Maharashtra हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.
अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

एक विद्यार्थी बनून जीवनभर शिक्षण क्षेत्रात प्रवास केला. जगाला धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समानता ही मूल्ये शिकविली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. शिक्षणावर व पुस्तकावर खूप प्रेम केले. अत्यंत गरिबी हालाखीची परिस्थिती. सामाजिक ढवळाढवळीचे दिवस, अशा या संघर्षातून शिक्षण हा केंद्रबिंदू मानून, शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही असे जाणून त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रथम शाळेत घातले व हळूहळू शाळेचे गोडी निर्माण झाली. वाचनाचे वेड लागले, वाचनाने खरा माणूस घडतो ही शिकवण त्यांच्या अंगी बानलि व वाचनातूनच ते स्वतः घडले. महान चरित्रांचा अभ्यास केला महान व्यक्तीच्या कार्याचा अभ्यास केला जगातील विद्वान लोकांचे चरित्र वाचले त्यांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष वाचला. समाजाला घडवले व देशाला घडवण्याचे मूल्यवान कार्य केले म्हणून आजचा हा दिवस अत्यंत प्रेरणादायी, शिक्षण प्रेमींसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोलाचा ठरेल. त्या काळात त्यांनी घेतलेले शिक्षण हे आश्चर्यकारक मानावेच लागेल. 

आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या परिस्थितीला तोंड देत त्यांचा मुकाबला करत त्यांनी विजय प्राप्त केला व यशाचे शिखर गाठले.
त्यांचा धाडसीपणा, त्यांचे चातुर्य त्यांचे, ज्ञान कौशल्य व त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा या गुणामुळेच ते भारतरत्न ठरले!! हा आज आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळते. जीवन जगण्याची व संघर्षाला तोंड देण्याची कला व धाडस प्राप्त होते म्हणून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे. आजचा विद्यार्थी उद्या देश घडविणारा आहे. आजचा विद्यार्थी उद्या देशाचे संरक्षण करणारा आहे. आजचा विद्यार्थी हा उद्या देशावर राज्य करणारा आहे. म्हणून तो प्रामाणिक, चरित्रवान कार्य कुशल, कर्तव्यदक्ष देश प्रेमी, समाज हिताचा विचार करणारा घडला पाहिजे, बनला पाहिजे. वाचाल तर वाचाल असेच म्हणावे लागेल. आजच्या मोबाईल व इंटरनेट युगात पुस्तकांना दुर्लक्षित केले जात आहे. परंतु पुस्तका एवढा चांगला मित्र, पुस्तका एवढा प्रामाणिकपणा, पुस्तकाएवढे खरे ज्ञान इतर कोठूनही मिळणार नाही! म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाशी मैत्री केली पाहिजे. विद्यालयीन व महाविद्यालयीन युवकांनी मोबाईलचे वेड कमी करून पुस्तकांचे वेड लागले पाहिजे. आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त या महामानवाला व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन!

आगामी झालेले