नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 15th August Independence Day




१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
15th August Independence Day
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !!

स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता.

प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात.

या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.
🇮🇳 *भारत माता की ......जय !!*🇮🇳
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*

स्त्रोतपर माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले