201) 🎤📜*बोधकथा - अतृप्त गाढव*
थंडीच्या दिवसात एका गाढवाला वाटले की उघडी हवा व
वाळलेला कडबा यांच्याऐवजी थोडीशी उष्णता व घासभर ताजे गवत आपल्याला मिळाले तर फार
बरे होईल. ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली. पण त्याबरोबर कामही वाढले व त्यामुळे
उन्हाळ्याप्रमाणेच थंडीचाही कंटाळा आला व पावसाळा आला तर बरे असे वाटू लागले.
लवकरच पावसाळा आला व पुढे येणार्या हिवाळ्याचे सामान वाहून नेण्याचे त्याला श्रम
पडू लागले. शेवटी आता हिवाळा येईल तर बरे असे त्याला वाटू लागले.
*तात्पर्य :अतृप्त माणसाचे
समाधान क्वचितच होते.*
202) 🎤📜 * बोधकथा - बढाईखोर माणूस*
एक माणूस फार
वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे
त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक
थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील
लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता
माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी
वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन
लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला
घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून
दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
*तात्पर्य – आपण प्रवासात
पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन
त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.*
203) 🎤📜 * बोधकथा - सागवान वृक्ष आणि काटेझाड*
एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच
आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या
लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या
झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो
म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ
शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात
व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो
तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही
बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव.
जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या
स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.'
*तात्पर्य:- मोठेपणाच्या मागे
अनेक दुःखे असतात, ती लहानपणामागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*
204) 🎤📜* बोधकथा - निवड*
दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला
त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही
व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला
पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती
तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू
शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण
येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक
"वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता
तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते.
ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर
येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात
येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी
घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते
झाले, पण तू वैभव किंवाप्रेम यांना जर
पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे
यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.
*तात्पर्य -जगात प्रेमापाठोपाठ
यश आणि वैभव हि आयुष्यात,घरात येते.*
205) 🎤📜 * बोधकथा - सुयांचे झाड*
दोन भाऊ
जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने
वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या
वस्तू, कपडे घेत असे.एकदा मोठा भाऊ
जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत
असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला.झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन"मोठा भाऊ
तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून
निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून
टाकीन.”झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला.
मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी
वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात
निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया
भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने
प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल
त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या
भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली.
*तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू
असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.*
206) 🎤📜* बोधकथा - जगण्याचे भान*
एक तरुण माणूस फार छन्दिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक ऊन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक ऊन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.
*तात्पर्य- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचे भान रहात नाही.*
207) 🎤📜*बोधकथा - गवळण आणि तिच्या घागरी*
राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरींमध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांची विचार ती करू लागली. 'जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबडया विकत घेईन.' तिने विचार केला, 'कोंबडया अंडी घालतील आणि मला अजून कोंबडया मिळतील. त्या सगळ्या कोंबडया अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन. गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील. ते मला विचारतील, 'तुला पोल्ट्री फार्म विकायचा आहे का?' पण मी डोकं असं हलवून नकार देईन, असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली.
*तात्पर्य : पेरल्याशिवाय उगवणार नाही.*
208)🎤📜 *बोधकथा - गर्विष्ठ गुलाब*
एक गुलाबाचे फूल होते. त्याला त्याच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की, तो काटेरी निवडुंगाशेजारी (कॅक्टस) वाढत होता. दररोज गुलाब त्या 'कॅक्टस' चा दिसण्यावरून अपमान करीत असे. पण निवडुंग शांत असे. बागेतल्या इतर रोपटयांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाडे कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी निवडुंगामध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने निवडुंगला विचारले,'मला पण पाणी मिळेल का?' दयाळू निवडुंग लगेच 'हो' म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्यात तोंड दिले.
*तात्पर्य : कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून तुमचे मत बनवू नका.*
209) 🎤📜*बोधकथा - समता*
जगात ज्ञान घेताना, जगताना आपण कुठेतरी कमी आहोत याची जाणीव सतत ठेवावी. आपण बाजारात पुस्तके घेतो, शाळेत शिक्षण घेतो याचा अर्थ आपले अज्ञान मान्य करतो. इतकेच काय, आपण श्वास घेतो तेव्हा आपणाकडे अगोदरच तो नाही, हे आपण कुबुल करत असतो. मात्र आपण ' तसे ' कमी नसतो. लोकांच्या उपयोगी पडायचे असेल तर आपण ' जास्तच ' असायला हवे. तरच आपण ज्यांना काही कमी आहे, त्यांना देऊ शकू. ह्याचा अर्थ आपण खूप शहाणे आहोत, असे मानल तर समस्या निर्माण होतात. समता राहत नाही. मी मोठा असतो, त्याच क्षणी मी कोणापेक्षा तरी लहानही असतो. पांडुरंग एकदा पोलिस स्टेशनवर जाऊन डांगे इन्स्पेक्टराना म्हणाला, " साहेब! एक चोर येथून आताच पळाला. त्याला पळताना मी पाहिलं. म्हणून तुम्हाला सांगायला धावत आलो." डांगे साहेबांनी विचारले, " तो कसा होता? बुटका होता की उंच होता?" त्यावर पांडुरंग म्हणाला," सांगता येत नाही साहेब. माझ्या मानानं तो उंच होता. तुमच्या मानाने तो बुटका होता." अशा प्रकारचे हे तौलनिक हे जग आहे. समतेला तुलना नसते. पण माणूस आपल्याकडे कमीपणा घ्यायला तयार नसतो.
*तात्पर्य : मोठ्यांना आदर द्या. लहानांना आधार द्या. समता ही फक्त बोलायची गोष्ट नाही.*
210)🎤📜 *बोधकथा - वृत्ती*
राजा सहदेवाकडे राणीने हट्ट धरला. ' माझ्या एकुलत्या एका भावाला मंत्रिपद द्या. प्रधान करा.' आपल्या या मेहुण्याच्या स्वभाव राजाला ठाऊक होता. मात्र प्रिय राणीचा हट्ट कसा मोडणार? राजाने मेहुण्याला कोषाध्यक्ष केले. त्या बहाद्दराने एका वर्षात सारा खजिना खाली केला. मग राजाने त्याला व्यापार खाते दिले तर लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. राजाने मेहुण्याला अनेक खाती देऊ पहिली. पण जनकल्याण होण्याऐवजी नुकसानच होऊ लागले. अखेर वैतागून राजाने त्याला बंदरावर अधिकारी नेमले. काम एकच समुद्राच्या लाटा मोजण्याचे. सुरवातीला मेहुणा खुष नव्हता. पण काही दिवसांनी राजाच्या हेरांनी सांगितले की, मेहवण्याने गडगंज संपती मिळवली होती. या मागची चौकशी करता समजले की, मेव्हणा बंदरात मुक्काम ठोकून होता. गलबतांना बंदरात लागण्यास मज्जाव करत होता. कारण काय तर लाटा मोजण्यास अडथळा येतो. सरकारी कामात व्यत्यय म्हणून तो दंड आकारण्याच्या निमित्ताने गलबतांच्या मालकांकडून तो खंडणी वसूल करत असे. अशा रीतीने त्याने महिनाभरात गडगंज संपती जमा केली.
*तात्पर्य : भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदलीने समस्या सुटत नाहीत. कारण समस्या पदाच्या नव्हे तर व्यक्तीच्या असतात. म्हणूनच वृत्ती बदलण्याची सेवा हीच सर्व श्रेष्ठ सेवा.*
211) 🎤📜 *बोधकथा - अंतरात्म्याचा आनंद*
रुजलेल्या बीमधून अंकुर वर आला. त्याने दोन्ही हाताची ओंजळ करत सूर्यदेवाला प्रकाशाचे दान मागितले. ते रोपटे हिरवेपणाने तराराले. त्याला धुमारे फुटू लागले. बीचे बाळ बाळसे धरू लागले. आभाळाने त्याला पाऊसपाणी पाजले. मातीने खाद्य दिले. वाऱ्याने गोंजारले. पाखराने अंगाईगीत म्हटली आणि त्या रोपांना कळी आली. हळूहळू तिचे फुलामध्ये रूपांतर होत होते. पण, ते फूल सर्वांच्या उपकाराच्या ओझ्याने वाकून गेले. त्याच्यावर असणाऱ्या पहाटेच्या दवबिंदूंना पाहून वाऱ्याने म्हटले," का रडतोस?" फूल म्हणाले. " अरे दादा, सर्वांनी वाढवलं. पण मी कुणाला काहीच दिले नाही. याच दुःख होतंय."
वारा म्हणाला," वेड रे वेड! अरे, कशाला रडतोस? देण्याचं ज्याला वेड लागलंय, त्यानं रडायचं नसतं. तुझा सुवास जगभर उधळून टाक. तुझ्याजवळचे मधाचे बुधले भुंग्याना दे. तू पक्व झाल्यावर खाऊन सर्व जग तृप्त होईल. तुझ्याजवळ देण्यासारखे खूप आहे. तू फक्त संकल्प कर. देणं हेच आत्म्याच लेणं."
*तात्पर्य: स्वतःचे सर्वस्व देण्यातच अंतरात्म्याचा आनंद आहे.*
212) 🎤📜*बोधकथा - अत्याचार !*
पांडुरंग जरा वेगळाच होतो. समाजात जरा कुठे बिघडले, की तो अस्वस्थ व्हायचा. संबंधित व्यक्तींना, शासकीय अधिकाऱ्यांना तक्रारपत्र पाठवायचा. आता सर्वच ठिकाणी त्याचे कोण ऐकून घेणार ? मग तो चिडायचा. अस्वस्थ व्हायचा. त्याचा रक्तदाब वाढायचा. मग तो पत्नीवर चिडायचा, म्हणायचा, "तुम्ही सारेजण हा अन्याय कसा सहन करता ?" यावर त्याची पत्नी म्हणे, "मी म्हणते, लोकांच्या चुकांचा तुम्ही का एवढा त्रास करून घेता ? शांत का बसून राहत नाही ?" पण पांडुरंग कसला ऐकून घेतो ? 'मी बरोबर आहे, मग मी का स्वस्थ बसू' हा अहंकार त्याला गप्प बसू देत नसे. अशी काही वर्षे गेली. पांडुरंगाला रक्तदाबाचा त्रास होताच. हृदयविकाराची चाहुलही लागली. डॉक्टरांचे 'येणे' आणि 'देणे' वाढले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पांडुरंगाने सक्तीची विश्रांती घेतली. जीवाच्या भीतीने का होईना, पांडुरंग आता शांत झाला होता. पत्नी म्हणाली, 'मी म्हणते, एवढा मोठा आजार झाला कशामुळे याचा विचार करावा. जगात अत्याचार नसावेत म्हणून रागवताना आपणच आपल्या शरीरावर अत्याचार करतो, हे तुम्ही का समजून घेत नाही ?" पांडुरंग म्हणाला, "बरोबर आहे, 'मी' च चुकत होतो, आता मी बदलेन ."
**तात्पर्य : विनाकारण* *मनस्ताप करून घेणे हे शरीर त्रासाचे मूळ कारण आहे.*
213)🎤📜 *बोधकथा - वेळेचे महत्व*
एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकूमप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.
*तात्पर्य : जेव्हाचे काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.*
214) 🎤📜*बोधकथा - संकल्प*
एक ऋषी अनेक वर्षांपासून यज्ञ करायचा प्रयत्न होते. परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमाजवळून एकदा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची ही उदासीनता पहिली आणि म्हणाले. ' ऋषिवर ! तुम्ही असे उदास का? राज्यात कोणी निराश आणि उदास राहिलेलं मला योग्य वाटत नाही.' त्यावर ऋषी म्हणाले, महाराज! मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण अपेक्षित अग्नी माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही.' त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले, ' एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो की, आज संध्याकळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन.' यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्नीदेव प्रकट झाले. अग्नीदेव राजांना म्हणाले, ' मी तुझ्यावर प्रसन्न आहे! वर माग!' त्यावर राजा म्हणाले, ' या ऋषींची ईच्छा पुर्ण करा! यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!' यावर ऋषी म्हणाले, ' राजा! मी अनेक प्रयत्न केले. पण मला शक्य झाले नाही. तुम्ही अग्निला प्रकट कसे केले?' यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उतरले, ' ऋषीवर! राजाने जे काही केलं त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो.'
*तात्पर्य : संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दीष्ट साध्य करते.*
215) 🎤📜*बोधकथा - मुंगी आणि टोळ*
एकदा एका जंगलात मुंगी आणि टोळ रहात होते.टोळ दिवसभर आरामात पडून राहत असे तसेच त्याला गिटार वाजवायला आवडत असे.पण मुंगी दिवसभर कष्ट करायची.ती बगीच्याच्या कानाकोपऱ्यातून अन्नाचे कण गोळा करून आणायची,तेव्हा टोळ मस्त आराम करत असायचा, गिटार वाजवत असायचा किंवा झोपलेला असायचा.टोळ दररोज मुंगीला विश्रांती घेण्यास सांगायचा पण मुंगी नकार देऊन कामाला लागत असे.लवकरच हिवाळा आला,दिवसरात्र थंडी पडू लागली .थंडीमुळे खूप तुरळक प्राणी बाहेर पडत असत.दरम्यान टोळ अन्न शोधत राहिला.परिणामी पूर्णवेळ भुकेला राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.पण मुंगीकडे मात्र हिवाळा संपेपर्यंत पुरेल इतका अन्नसाठा होता.
*तात्पर्य:तारुण्यात कष्ट करा म्हणजे म्हातारपणात पश्र्चातापाची वेळ येणार नाही.*
216) 🎤📜*बोधकथा - श्रद्धा महत्वाची*
सहदेव स्टँडवर हमाली करायचा. बऱ्यापैकी पैसे मिळायचे. संसार नीट चालायचा. एकदा एका प्रवाशाने सामानाने भरलेली ट्रंक त्याच्या खांद्यावर दिली. सहदेव त्याच्यासोबत घरापर्यंत गेला, ट्रंक पोहचवली व हमाली मागितली. मागितल्यापेक्षा कमी हमाली मिळाल्याने सहदेव म्हणाला, "साहेब, किती ओझं होत. खांदा निकामी झाला. अजुन चार रुपये द्या." त्या प्रवाशाने थोड्या रागाने चार रुपये दिले. त्याच प्रवाशाने पाहिलं की, सहदेव खूप मोठे ओझे घेऊन डोंगर चढत आहे. त्याच्या पाठीवर काय होते, हे लांबून दिसत नव्हते. पण खूप ओझे असावे, कारण सहदेव खूपच वाकला होता.थोड्या वेळाने ओझे पोहचवून सहदेव परतला. तसे याने विचारले, "खूप त्रास झाला असेल नाही? ओझं खूप होत वाटतं?" सहदेव म्हणाला, " त्रास? छे! छे! अहो, ओझंही खूप नव्हत. माझ्या मामाची ट्रंक होती ती. डोंगरावरल्या बंगल्यात पोहचवून आलो." ज्या सहदेव ला प्रवाशाच्या ट्रंकचे खूप ओझे वाटले होते, त्याला मामाची ट्रंक जड वाटली नव्हती. कारण मामामध्ये त्याच्या भावना गुंतल्या होत्या.
*तात्पर्य: कोणतेही काम श्रद्धापूर्वक भावनेने केलं,तर त्याचे कष्ट जाणवत नाहीत.*
217)🎤📜 *बोधकथा - विस्टन चर्चिल*
महाराज नेहमी सांगत, "तुम्हाला लोकप्रिय व्हायचं आहे, तर मग ऐकण्याची कला शिका." राजकारणातलेच एक उदाहरण पाहा. विस्टन चर्चिल म्हणजे हजरजबाबीपणा उत्तम नमुना. त्यांच्या कारकिंदीच्या अखेरच्या वर्षी ते एका समारंभात गेले होते.
मागे काही अंतरावर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. त्यांचे बोलणे चर्चिल यांच्या कानावर पडत होते. एक दुसऱ्याला म्हणत होता, "ते पाहा, विस्टन चर्चिल. लोक म्हणतात, हल्ली वृद्धत्वामुळे ते जरा बुद्धीने कमकुवत झाले आहे. त्यांनी आता राजकारणातून बाजूला व्हावे, दुसऱ्या कोणा अधिक कार्यक्षम तरुण माणसाला त्यांनी आपली जागा द्यायला हवी.." समारंभ संपताच विस्टन चर्चिल त्या दोघांजवळ गेले आणि म्हणाले, "सभ्य गृहस्थांनो, लोक असेही म्हणतात की, चर्चिल बहिरा, आहे." थोडक्यात लोकांच्या फालतू टीका त्याला ऐकू येत नाहीत.
*तात्पर्य: काय बोलावे, केव्हा आणि कुठे बोलावे? याप्रमाणेच काय आणि कोणाचे ऐकावे? हेही तितकेच महत्त्वाचे असते.*
218)🎤📜 *बोधकथा- एक सुंदर विचार*
एका गावामधे चित्रकार होता. त्यानं एक मोठं चित्र काढलं. मोठं पोस्टरच होतं ते. ते गावातल्या एका प्रमुख चौकात ठेवलं. तिथं एक सूचना लिहिली, या चित्रात बघणाऱ्याला काही चूक आढळल्यास सोबतच्या वहीत ती लिहावी. पुष्कळ लोक आले. चित्र बघून त्यांनी हवी ती सूचना लिहिली. वही अगदी भरून गेली. एका चित्रात इतक्या चुका, कसं शक्य आहे ते? तो पुरता गोंधळून गेला. आपली शंका दूर करण्यासाठी तो आपल्या गुरुकडे गेला. झालेला प्रकार त्याने आपल्या गुरुच्या कानी घातला.
त्यावर गुरुने सांगितले,
आता असे कर, ते चित्र पुुन्हा चौकात ठेव. त्याच्या शेजारी रंग व ब्रश ठेव आणि सूचना लिही की, "ज्याला कोणाला या चित्रात चूक दिसेल, दोष दिसेल त्याने तो ब्रशने दुरुस्त करावा.' चित्र सुधारण्यासाठी एकही माणूस पुढे आला नाही. ते चित्र आहे तसेच राहिले. आमच्या समाजाला दुसऱ्याच्या चुका तेवढ्या दिसतात. दोष दिसतात पण त्या सुधारण्यासाठी कोणी पुढे येत नाही ही आपल्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती बदलली पाहिजे.
*तात्पर्य : चुका काढणे जितके महत्वाचे तितकेच त्या सुधारणे महत्वाचे असते.
219)🎤📜* बोधकथा - जगण्याचे भान*
एक तरुण माणूस फार छन्दिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक ऊन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक ऊन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.
*तात्पर्य- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचे भान रहात नाही.
220) 🎤📜बोधकथा - गवळण आणि तिच्या घागरी*
राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरींमध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांची विचार ती करू लागली. 'जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबडया विकत घेईन.' तिने विचार केला, 'कोंबडया अंडी घालतील आणि मला अजून कोंबडया मिळतील. त्या सगळ्या कोंबडया अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन. गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील. ते मला विचारतील, 'तुला पोल्ट्री फार्म विकायचा आहे का?' पण मी डोकं असं हलवून नकार देईन, असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली.
*तात्पर्य : पेरल्याशिवाय उगवणार नाही.*
221)🎤📜*बोधकथा - गर्विष्ठ गुलाब*
एक गुलाबाचे फूल होते. त्याला त्याच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की, तो काटेरी निवडुंगाशेजारी (कॅक्टस) वाढत होता. दररोज गुलाब त्या 'कॅक्टस' चा दिसण्यावरून अपमान करीत असे. पण निवडुंग शांत असे. बागेतल्या इतर रोपटयांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाडे कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी निवडुंगामध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने निवडुंगला विचारले,'मला पण पाणी मिळेल का?' दयाळू निवडुंग लगेच 'हो' म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्यात तोंड दिले.
*तात्पर्य : कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून तुमचे मत बनवू नका.*
222)🎤📜*बोधकथा - समता*
जगात ज्ञान घेताना, जगताना आपण कुठेतरी कमी आहोत याची जाणीव सतत ठेवावी. आपण बाजारात पुस्तके घेतो, शाळेत शिक्षण घेतो याचा अर्थ आपले अज्ञान मान्य करतो. इतकेच काय, आपण श्वास घेतो तेव्हा आपणाकडे अगोदरच तो नाही, हे आपण कुबुल करत असतो. मात्र आपण ' तसे ' कमी नसतो. लोकांच्या उपयोगी पडायचे असेल तर आपण ' जास्तच ' असायला हवे. तरच आपण ज्यांना काही कमी आहे, त्यांना देऊ शकू. ह्याचा अर्थ आपण खूप शहाणे आहोत, असे मानल तर समस्या निर्माण होतात. समता राहत नाही. मी मोठा असतो, त्याच क्षणी मी कोणापेक्षा तरी लहानही असतो. पांडुरंग एकदा पोलिस स्टेशनवर जाऊन डांगे इन्स्पेक्टराना म्हणाला, " साहेब! एक चोर येथून आताच पळाला. त्याला पळताना मी पाहिलं. म्हणून तुम्हाला सांगायला धावत आलो." डांगे साहेबांनी विचारले, " तो कसा होता? बुटका होता की उंच होता?" त्यावर पांडुरंग म्हणाला," सांगता येत नाही साहेब. माझ्या मानानं तो उंच होता. तुमच्या मानाने तो बुटका होता." अशा प्रकारचे हे तौलनिक हे जग आहे. समतेला तुलना नसते. पण माणूस आपल्याकडे कमीपणा घ्यायला तयार नसतो.
*तात्पर्य : मोठ्यांना आदर द्या. लहानांना आधार द्या. समता ही फक्त बोलायची गोष्ट नाही.*
223)🎤📜*बोधकथा - वृत्ती*
राजा सहदेवाकडे राणीने हट्ट धरला. ' माझ्या एकुलत्या एका भावाला मंत्रिपद द्या. प्रधान करा.' आपल्या या मेहुण्याच्या स्वभाव राजाला ठाऊक होता. मात्र प्रिय राणीचा हट्ट कसा मोडणार? राजाने मेहुण्याला कोषाध्यक्ष केले. त्या बहाद्दराने एका वर्षात सारा खजिना खाली केला. मग राजाने त्याला व्यापार खाते दिले तर लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. राजाने मेहुण्याला अनेक खाती देऊ पहिली. पण जनकल्याण होण्याऐवजी नुकसानच होऊ लागले. अखेर वैतागून राजाने त्याला बंदरावर अधिकारी नेमले. काम एकच समुद्राच्या लाटा मोजण्याचे. सुरवातीला मेहुणा खुष नव्हता. पण काही दिवसांनी राजाच्या हेरांनी सांगितले की, मेहवण्याने गडगंज संपती मिळवली होती. या मागची चौकशी करता समजले की, मेव्हणा बंदरात मुक्काम ठोकून होता. गलबतांना बंदरात लागण्यास मज्जाव करत होता. कारण काय तर लाटा मोजण्यास अडथळा येतो. सरकारी कामात व्यत्यय म्हणून तो दंड आकारण्याच्या निमित्ताने गलबतांच्या मालकांकडून तो खंडणी वसूल करत असे. अशा रीतीने त्याने महिनाभरात गडगंज संपती जमा केली.
*तात्पर्य : भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदलीने समस्या सुटत नाहीत. कारण समस्या पदाच्या नव्हे तर व्यक्तीच्या असतात. म्हणूनच वृत्ती बदलण्याची सेवा हीच सर्व श्रेष्ठ सेवा.*
224)🎤📜*बोधकथा - अंतरात्म्याचा आनंद*
रुजलेल्या बीमधून अंकुर वर आला. त्याने दोन्ही हाताची ओंजळ करत सूर्यदेवाला प्रकाशाचे दान मागितले. ते रोपटे हिरवेपणाने तराराले. त्याला धुमारे फुटू लागले. बीचे बाळ बाळसे धरू लागले. आभाळाने त्याला पाऊसपाणी पाजले. मातीने खाद्य दिले. वाऱ्याने गोंजारले. पाखराने अंगाईगीत म्हटली आणि त्या रोपांना कळी आली. हळूहळू तिचे फुलामध्ये रूपांतर होत होते. पण, ते फूल सर्वांच्या उपकाराच्या ओझ्याने वाकून गेले. त्याच्यावर असणाऱ्या पहाटेच्या दवबिंदूंना पाहून वाऱ्याने म्हटले," का रडतोस?" फूल म्हणाले. " अरे दादा, सर्वांनी वाढवलं. पण मी कुणाला काहीच दिले नाही. याच दुःख होतंय."
वारा म्हणाला," वेड रे वेड! अरे, कशाला रडतोस? देण्याचं ज्याला वेड लागलंय, त्यानं रडायचं नसतं. तुझा सुवास जगभर उधळून टाक. तुझ्याजवळचे मधाचे बुधले भुंग्याना दे. तू पक्व झाल्यावर खाऊन सर्व जग तृप्त होईल. तुझ्याजवळ देण्यासारखे खूप आहे. तू फक्त संकल्प कर. देणं हेच आत्म्याच लेणं."
*तात्पर्य: स्वतःचे सर्वस्व देण्यातच अंतरात्म्याचा आनंद आहे.*
225)🎤📜*बोधकथा - अत्याचार !*
पांडुरंग जरा वेगळाच होतो. समाजात जरा कुठे बिघडले, की तो अस्वस्थ व्हायचा. संबंधित व्यक्तींना, शासकीय अधिकाऱ्यांना तक्रारपत्र पाठवायचा. आता सर्वच ठिकाणी त्याचे कोण ऐकून घेणार ? मग तो चिडायचा. अस्वस्थ व्हायचा. त्याचा रक्तदाब वाढायचा. मग तो पत्नीवर चिडायचा, म्हणायचा, "तुम्ही सारेजण हा अन्याय कसा सहन करता ?" यावर त्याची पत्नी म्हणे, "मी म्हणते, लोकांच्या चुकांचा तुम्ही का एवढा त्रास करून घेता ? शांत का बसून राहत नाही ?" पण पांडुरंग कसला ऐकून घेतो ? 'मी बरोबर आहे, मग मी का स्वस्थ बसू' हा अहंकार त्याला गप्प बसू देत नसे. अशी काही वर्षे गेली. पांडुरंगाला रक्तदाबाचा त्रास होताच. हृदयविकाराची चाहुलही लागली. डॉक्टरांचे 'येणे' आणि 'देणे' वाढले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पांडुरंगाने सक्तीची विश्रांती घेतली. जीवाच्या भीतीने का होईना, पांडुरंग आता शांत झाला होता. पत्नी म्हणाली, 'मी म्हणते, एवढा मोठा आजार झाला कशामुळे याचा विचार करावा. जगात अत्याचार नसावेत म्हणून रागवताना आपणच आपल्या शरीरावर अत्याचार करतो, हे तुम्ही का समजून घेत नाही ?" पांडुरंग म्हणाला, "बरोबर आहे, 'मी' च चुकत होतो, आता मी बदलेन ."
**तात्पर्य : विनाकारण* *मनस्ताप करून घेणे हे शरीर त्रासाचे मूळ कारण आहे.*
226)🎤📜 *बोधकथा - वेळेचे महत्व*
एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकूमप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.
*तात्पर्य : जेव्हाचे काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.*
227)🎤📜*बोधकथा - संकल्प*
एक ऋषी अनेक वर्षांपासून यज्ञ करायचा प्रयत्न होते. परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमाजवळून एकदा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची ही उदासीनता पहिली आणि म्हणाले. ' ऋषिवर ! तुम्ही असे उदास का? राज्यात कोणी निराश आणि उदास राहिलेलं मला योग्य वाटत नाही.' त्यावर ऋषी म्हणाले, महाराज! मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण अपेक्षित अग्नी माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही.' त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले, ' एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो की, आज संध्याकळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन.' यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्नीदेव प्रकट झाले. अग्नीदेव राजांना म्हणाले, ' मी तुझ्यावर प्रसन्न आहे! वर माग!' त्यावर राजा म्हणाले, ' या ऋषींची ईच्छा पुर्ण करा! यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!' यावर ऋषी म्हणाले, ' राजा! मी अनेक प्रयत्न केले. पण मला शक्य झाले नाही. तुम्ही अग्निला प्रकट कसे केले?' यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उतरले, ' ऋषीवर! राजाने जे काही केलं त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो.'
*तात्पर्य : संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दीष्ट साध्य करते.*
228)🎤📜*बोधकथा - मुंगी आणि टोळ*
एकदा एका जंगलात मुंगी आणि टोळ रहात होते.टोळ दिवसभर आरामात पडून राहत असे तसेच त्याला गिटार वाजवायला आवडत असे.पण मुंगी दिवसभर कष्ट करायची.ती बगीच्याच्या कानाकोपऱ्यातून अन्नाचे कण गोळा करून आणायची,तेव्हा टोळ मस्त आराम करत असायचा, गिटार वाजवत असायचा किंवा झोपलेला असायचा.टोळ दररोज मुंगीला विश्रांती घेण्यास सांगायचा पण मुंगी नकार देऊन कामाला लागत असे.लवकरच हिवाळा आला,दिवसरात्र थंडी पडू लागली .थंडीमुळे खूप तुरळक प्राणी बाहेर पडत असत.दरम्यान टोळ अन्न शोधत राहिला.परिणामी पूर्णवेळ भुकेला राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.पण मुंगीकडे मात्र हिवाळा संपेपर्यंत पुरेल इतका अन्नसाठा होता.
*तात्पर्य:तारुण्यात कष्ट करा म्हणजे म्हातारपणात पश्र्चातापाची वेळ येणार नाही.*
229)🎤📜*बोधकथा - श्रद्धा महत्वाची*
सहदेव स्टँडवर हमाली करायचा. बऱ्यापैकी पैसे मिळायचे. संसार नीट चालायचा. एकदा एका प्रवाशाने सामानाने भरलेली ट्रंक त्याच्या खांद्यावर दिली. सहदेव त्याच्यासोबत घरापर्यंत गेला, ट्रंक पोहचवली व हमाली मागितली. मागितल्यापेक्षा कमी हमाली मिळाल्याने सहदेव म्हणाला, "साहेब, किती ओझं होत. खांदा निकामी झाला. अजुन चार रुपये द्या." त्या प्रवाशाने थोड्या रागाने चार रुपये दिले. त्याच प्रवाशाने पाहिलं की, सहदेव खूप मोठे ओझे घेऊन डोंगर चढत आहे. त्याच्या पाठीवर काय होते, हे लांबून दिसत नव्हते. पण खूप ओझे असावे, कारण सहदेव खूपच वाकला होता.थोड्या वेळाने ओझे पोहचवून सहदेव परतला. तसे याने विचारले, "खूप त्रास झाला असेल नाही? ओझं खूप होत वाटतं?" सहदेव म्हणाला, " त्रास? छे! छे! अहो, ओझंही खूप नव्हत. माझ्या मामाची ट्रंक होती ती. डोंगरावरल्या बंगल्यात पोहचवून आलो." ज्या सहदेव ला प्रवाशाच्या ट्रंकचे खूप ओझे वाटले होते, त्याला मामाची ट्रंक जड वाटली नव्हती. कारण मामामध्ये त्याच्या भावना गुंतल्या होत्या.
*तात्पर्य: कोणतेही काम श्रद्धापूर्वक भावनेने केलं,तर त्याचे कष्ट जाणवत नाहीत.*
230)🎤📜*बोधकथा - विस्टन चर्चिल*
महाराज नेहमी सांगत, "तुम्हाला लोकप्रिय व्हायचं आहे, तर मग ऐकण्याची कला शिका." राजकारणातलेच एक उदाहरण पाहा. विस्टन चर्चिल म्हणजे हजरजबाबीपणा उत्तम नमुना. त्यांच्या कारकिंदीच्या अखेरच्या वर्षी ते एका समारंभात गेले होते.
मागे काही अंतरावर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. त्यांचे बोलणे चर्चिल यांच्या कानावर पडत होते. एक दुसऱ्याला म्हणत होता, "ते पाहा, विस्टन चर्चिल. लोक म्हणतात, हल्ली वृद्धत्वामुळे ते जरा बुद्धीने कमकुवत झाले आहे. त्यांनी आता राजकारणातून बाजूला व्हावे, दुसऱ्या कोणा अधिक कार्यक्षम तरुण माणसाला त्यांनी आपली जागा द्यायला हवी.." समारंभ संपताच विस्टन चर्चिल त्या दोघांजवळ गेले आणि म्हणाले, "सभ्य गृहस्थांनो, लोक असेही म्हणतात की, चर्चिल बहिरा, आहे." थोडक्यात लोकांच्या फालतू टीका त्याला ऐकू येत नाहीत.
*तात्पर्य: काय बोलावे, केव्हा आणि कुठे बोलावे? याप्रमाणेच काय आणि कोणाचे ऐकावे? हेही तितकेच महत्त्वाचे असते.*
231) 🎤📜 *बोधकथा - नेताजी सुभाषचंद्र बोस*
*नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभाषबाबू इंग्लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्रसेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. याचे त्यांच्या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्यू यांच्याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्युक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय. मी त्याची ही अट मान्य करण्यासाठी त्याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’ विल्यम ड्युक अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्यांच्या वडिलांनी पत्र लिहीले, त्यात ते म्हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्हता.’’*
*तात्पर्य- राष्ट्रसेवेची आवड असणारे प्रत्येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्ट्रसेवा करण्यासाठी उपयुक्त ठरते.*
232) 🎤📜 *बोधकथा- *भोजन आणि मौन*
*कथा सिद्धार्थाच्या जीवनाशी निगडीत आहे. तेंव्हा ते बुद्धत्वाला गेले नव्हते आणि ते निरंजना नदीच्या काठी जंगलात वृक्षाखाली ध्यान करीत असत. सिद्धार्थ ध्यान केल्यानंतर जवळच्या गावात जावून भिक्षा मागून आणत असत. काही दिवसानंतर त्यांनी भिक्षा मागायला जाणे बंद केले. कारण एका गावात गावप्रधानाची छोटी मुलगी सुजाता त्यांना भोजन आणत असे. सिद्धार्थाना ती मोठ्या प्रेमाने भोजन देत असे. काही दिवसानंतर त्याच गावातला एक गुराखीही प्रभावित होवून सिद्धार्थांकडे येवू लागला. त्याचे नाव स्वस्ति होते. एके दिवशी सिद्धार्थ स्वस्तिबरोबर चर्चा करीत होते. तेवढ्यात सुजाता भोजन घेवून आली. भोजन सुरु करताच त्यांनी चर्चा बंद केली. भोजन संपेपर्यंत ते गप्पच होते. तेथे शांतता पसरली. स्वस्ति या सिद्धार्थांच्या वागण्याने हैराण झाला. त्याने सिद्धार्थांचे भोजन आटोपल्यावर विचारले,"गुरुदेव ! मी आल्यानंतर आपण भरपूर चर्चा केली पण भोजनाच्या वेळी आपण एकही शब्द बोलला नाहीत, याचे कारण काय?" सिद्धार्थ म्हणाले,"भोजन निर्मिती मोठ्या कष्टाने होते. शेतकरी जमिनीची मशागत, नांगरणी करतो, बी पेरतो, रोपांची देखरेख करतो, धान्य तयार होते. त्या धान्यासाठी आपण धन खर्चतो, धान्य घरी आल्यावर ते निवडून टिपून त्याचे सुंदर असे अन्न तयार होते. घरातील महिला सुग्रास असे भोजन तयार करते. इतक्या कष्टाने तयार झालेल्या अन्नाचा आनंद आपण शांततेने तेंव्हाच घेवू शकू जेंव्हा आपले मन शांत असेल. त्यामुळे माझे मन शांत राहण्यासाठी मी भोजन करताना शांत राहतो आणि त्यामुळे माझे मन शांत राहते आणि अन्नाचा अपमान न होता मी त्या कष्टाने मिळवलेल्या सुग्रास अन्नाचा आनंद घेवू शकतो."*
*तात्पर्य - शांततेत केलेले भोजन हे न केवळ भूक मिटविते तर मानसिक आनंद आणि सात्विक ऊर्जाही देते.*
233) 🎤📜*बोधकथा -* कर्तव्याचे पालन करा*
*एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एकेदिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?" हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप देताल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला.*
*तात्पर्य- प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे.*
234) 🎤📜 *बोधकथा- *खरी आई कि खोटी आई*
*एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्वत:च्या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला? गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे.''*
*तात्पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.*
235) 🎤📜 *बोधकथा - *मन माणसाचे अन डोके........?*
*एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले.*
*तात्पर्य : माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल. त्यामुळेच म्हटले जाते की, रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असतो.*
236) 🎤📜*बोधकथा - *स्वतःचे काम*
*मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता. त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती. मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता. एके दिवशी शेतकरी शेतात आला. तो कुणाशी तरी बोलताना म्हणाला की, ‘उद्या मी माझ्या नातेवाइकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे.’ शेतकर्यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनी ऐकले. पिले म्हणाली, ‘आई, लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल.’ आई म्हणाली, ‘काळजी करू नका. काहीही होणार नाही.’ दुसर्या दिवशी कुणीही मदतीला आले नाही, तेव्हा शेतकरी म्हणाला की, आता मी माझ्या शेजार्यांना बोलावीन. तिसर्या दिवशीही कुणी आले नाही. चौथ्या दिवशीही असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही. उद्या मी स्वत:च पिकाची कापणी करतो.’ हे ऐकून पक्षिणीने पिलांना सांगितले, ‘उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल. कारण शेतकर्याला स्वत:चे काम स्वत:च करावे लागते, याची जाणीव झाली आहे.’*
*तात्पर्य- आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल हि अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे.*
237) 🎤📜 *बोधकथा - *भेट*
*एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि-याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि-याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वत:ची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला.*
*तात्पर्य- आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.*
238) 🎤📜 *बोधकथा - मनावरचे डाग*
*एकदा एका गुरुमाउलींकडे एक व्यक्ती आली. त्याच्या अंगावरील कपडे चिखलाने माखले होते. तो खूप थकलाभागला होता. गुरूंनी विचारले, ‘काय रे, फार थकला आहेस, काय झाले थकायला?’ तो म्हणाला, ‘काय सांगू? माझ्या मनावर व डोक्यावर खूप तणाव आहे. आणि माझी अडचण समजण्याऐवजी सगळे माझ्या अवस्थेकडे पाहून माझी टिंगल करत आहेत. त्याचा मला अतिशय त्रास होतोय.’ गुरूंनी कारण विचारल्यावर त्याने सांगितले, ‘सकाळी कामावर जात असताना घाईगडबडीत चिखलामध्ये पडलो, तेव्हापासून ज्याला मी हे सांगत आलो, तो प्रत्येकजण मला हसला. पडण्याच्या त्रासाबद्दल कुणी विचारलेसुद्धा नाही.’*
*तेव्हा गुरू त्याला समजावत म्हणाले, ‘मित्रा, या एवढय़ाशा गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. चिखलाचा शरीरावर पडलेला डाग पाण्याने स्वच्छ धुवून जाईल, पण मनावरचे अपमानाचे डाग, त्यामुळे होणारा त्रास याचे काय? लोक माझा सारखा अपमान करतात, असा संभ्रम एकसारखा मनात राहिला तर तो उत्तरोत्तर वाढत राहील. त्यापेक्षा जर तू सुरुवातीच्या व्यक्तीसोबतच तुझ्या स्थितीवर हसला असतास तर तुझ्या मनावर असे दडपण आले नसते आणि शरीराचा त्रासही जाणवला नसता. आले लक्षात?*
239)🎤📜 *बोधकथा - सकारात्मक विचार करा*
एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं*.
पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील"
तर दुस-या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव"
खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरेन घसरून खाली पडला.मात्र दुस-या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला*.
*काय बरं असेल यामागचं कारण* ?
*पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला*.
*या उलट दुस-या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला*.
*"वास्तु करी तथास्तु" वास्तुशास्त्र देखील हेच सांगतय की आपल्या वास्तुत नेहमी सकारात्मक भाषा* *वापरा,सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा,मग वास्तुच तुम्हाला तथास्तु म्हणुन सकारात्मक बदल देईल ;म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा*.
240)🎤📜 *बोधकथा - तर मी तुझा मुलगा उठवीन*
लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले . त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुलं मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, 'भगवन ! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय ? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे.'*
*चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, 'माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन.' बुध्ददेवांचे हे आश्वासन ऎकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रतेक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !*
*एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, 'दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुसर्या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली !' कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.*
*या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, 'भगवन ! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही.' बुध्ददेव म्हणाले, 'माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्याऎवजी आज मृत्यू आला, म्हणून असं दु:ख करीत बसणं योग्य आहे का ? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दु:ख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.' भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दु:खी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.*
241)🎤📜 *बोधकथा - तुला हवं, ते त्याला दे*
*एका श्रीमंत माणसाने मरण्यापूर्वी मृत्युपत्र केले. त्यात त्याने, आपला एकुलता एक मुलगा अजून 'सज्ञान' झाला नसल्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्थलावर व जंगम मालमत्तेची देखरेख आपला परम मित्र गोपाल याने करावी, आणि आपला मुलगा सज्ञान होताच, आपल्या गोपलने एकूण मालमत्तेतील त्याला हवा तो भाग माझ्या मुलाला दयावा व उरलेला भाग त्याने स्वत:ला घ्यावा, असे लिहिले. हे मृत्युपत्र करुन झाल्यावर तो गृहस्थ मरण पावला.*
*चार वर्षांनी त्या मृत मनुष्याचा मुलगा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान म्हणजे अठरा वर्षांचा झाल्यावर, त्याने त्या गोपाल कडे आपल्या वडिलांच्या मालमत्तेवरील ताबा मागितला. तेव्हा त्या अधाशी गोपालने मृत मित्राच्या चाळीस शेतांपैकी फक्त एक शेत, चार घरापैंकी फक्त एक घर आणि बॅंकेतील एक लाख रुपयांपैकी केवळ पाच हजार रुपये त्याच्या मुलाला देऊ केले. या दगलबाजीमुळे भडकून गेलेल्या त्या मुलाला गोपाल म्हणाला, 'तुझ्या वडिलांनी मृत्युपत्रात 'मला हवं ते मी तुला द्यावं व उरलेलं मी घ्यावं,' असं स्पष्ट लिहिलं असल्यामुळे, माझ्या मर्जीनुसार मी जे तुला देतो आहे, ते तू निमुटपणे घे; नाहीतर मी तेही तुला देणार नाही.'*
*आपल्या वडिलांच्या मित्राने केलेल्या फसवणुकीबद्दल त्या मुलाने त्याच्याविरुध्द न्यायालयात दावा केला. दाव्याची सुनावणी सुरु होताच न्यायमुर्तींनी त्या लुच्च्या गृहस्थाला विचारलं, 'गोपाल ! तुझ्या मित्रान मृत्युपुर्वी जे मृत्युपत्र केलं, त्यात काय लिहिलं आहे ?' गोपाल म्हणाला, 'हे पहा ते मृत्यूपत्र. यात स्पष्ट लिहिलं आहे, की माझ्या मित्राला हवं ते त्याने माझ्या मुलाला द्यावे व बाकीचे त्याने घ्यावे.'*
*न्यायमुर्तींनी पुन्हा विचारलं, ' मग आधाशे ! तुझ्या तुझ्या मित्राच्या स्थावर-जंगम मालमत्तेपैकी तुला काय काय हवे ?' गोपाल म्हणाला, ' माझ्या दिवंगत मित्राच्या चाळीस शेतांपैकी ३५ शेते, चार घरांपैकी तीन घरे, आणि बँकेतील त्याच्या खाती असलेल्या एक लाख रुपयांपैकी पंच्याण्णव हजार एवढे मला हवे.' यावर न्यायमुर्ती म्हणाले, 'तुझ्या मित्राने मृत्युपुर्वी केलेल्या मृत्युपत्रात ज्या अर्थी 'तुला हवे ते तू त्याच्या मुलाला द्यावे' असे लिहिले आहे, आणि ज्याअर्थी तुला हवे असलेले तुझ्या मित्राच्या मुलाला दे व उरलेले तुझ्याकडे ठेव. न्यायमूर्तिच्या या मृत्यूपात्रातील शाब्दिक चतुर्यामुळे त्या व्यक्तीला चांगलाच धडा मिळाला.
242)🎤📜 *बोधकथा - निर्णय क्षमता -*
एक बुर्बेन्स नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी एक गाढव पाळले होते.
त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते. वावराच्या मधोमध सरळ एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत होते. गाढव दररोज तेच हिरवेगार गवत खात असे...!
दोघेही अगदी आनंदाने जगत होते.
एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने पूर्ण एक महिन्यासाठी दुसऱ्या गावी जायचे होते...गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी विचार केला की...गाढवासाठी खाण्याची व्यवस्था करण्याची काही गरज नाही आहे...
कारण जरी नौकाराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील दोन्ही बाजूचा हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो.
गृहस्थ गावी गेले... आणि आपले काम पूर्ण करून एक महिन्यानंतर परत आले...
बघतात तर... गाढव मृत्यू होऊन पडलेला आहे....! हे असे कसे घडले...?
गृहस्थ विचार करायला लागले... रस्त्याकडेला दोन्ही बाजूला भरपूर हिरवागार गवत आहे... आयुष्यभर ही खाल्ले असते तरीही ते संपले नसते... एवढे असूनही गाढव उपासी राहून का मेला असावा...? गृहस्थांना काही कळत नव्हते...!*
नेमके झाले असे होते की... त्या गाढवाचा निश्चयच होत नव्हता की....*
*पहिल्यांदा रस्त्याच्या कोणत्या बाजूचे गवत खायला पाहिजे...? या बाजूचे खायचे...? की त्या बाजूचे खायचे....?*
*पूर्ण महिनाभर असे करता करताच गाढवाने कोणत्याही बाजूचे गवत खाल्लेच नाही आणि त्याचा भुकेने मृत्यू झाला...!*
*तात्पर्य : निर्णय करण्याची क्षमता नसली तर मोठे नुकसान ठरलेलेच असते.*
239)🎤📜 *बोधकथा - भिक्षापात्र*
राजमहालाच्या दारात खुप मोठी गर्दी जमलेली होती.जवळपास पुर्ण गावच तिथे जमा झालेला होता.
राजमहालाच्या दारात घटनाच तसी घडली होती...! त्या दिवशी खुप सकाळी एक साधू राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आले होते.राजा म्हणाला, नमस्कार, आपण पहिले साधू आहात... आजच्या दिवसातले आपल्याला काय पाहिजे ते सांगा...! आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळेलच.
साधू म्हणाले, महाराज माझ्याजवडील भिक्षापात्र खुपच लहान आहे.या पात्रात येईल एवढीच भिक्षा माझ्यासाठी पुरेशी आहे.पण महाराज... आपण वचन देण्याआधीच विचार करा... आपल्याला हे जमेल का...?
साधूच्या हातातील अतिशय लहान भिक्षापात्र पाहून राजा जोरात हसून म्हणाला.हे साधू महाराज... माझ्याकडील संपत्तीची गिनती नाही... तसेच माझ्या राज्याला सीमा नाही.एवढे असुनही हे तुमच्याकडील लहानसे भिक्षापात्र भरण्यात मला काय अडचण.येणार...?
राजाने महालातील नोकरांना आदेश दिला कि... आपल्या खजिन्यातले अतिउत्तम दागदागिने मागविले, आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितले...
संध्याकाळ होत आली तरी पण ते भिक्षापात्र भरणे सुरूच होते...! राजाचा सगळा खजिना रिकामा झाला होता...!
आपल्या लाडक्या राजावर लाजिरवाणी होण्याची पाळी यायला नको म्हणून तिथल्या प्रजानेही आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्या भिक्षापात्र टाकताच गायब झाली होती.
रात्र झाली तसाच राजा साधूंच्या पायावर कोसळला आणि म्हणाला.महाराज... माझ्याकडे हे पात्र भरण्याइतके धन नाही आहे.साधू महाराज म्हणाले... राजन आपण उगाच माझा दिवस वाया घालवलात.सकाळीच जर का हे सांगितले असते तर मी पुढे गेलो असतो.
साधू ने आपले भिक्षापात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून ते पुढे निघाले.तसाच राजा धावत धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून विचारायला लागला...
हे भगवंत मला फक्त एक सांगा. या छोट्याश्या भिक्षापात्रात... माझ्या राज्याचा पूर्ण खजिना रिकामा झाला... तरी पण हे भरले नाही...? या भिक्षापात्राचे असे काय वैशिष्ट्य आहे महाराज...?
साधू महाराज म्हणाले... ते तर मलाही माहित नाही...! पण हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केले आहे.या कवटीतच माणसाचे मन असते असे म्हणतात.आणि मन कशानेही भरत नाही...!*
239)🎤📜 *बोधकथा - भीती*
अहमदाबादच्या महात्मा गांधी सायन्स लॅब्रोरेटरीमध्ये काही विद्यार्थी प्रयोग करत होते.प्रयोगशाळा त्या दिवसांत प्रख्यात वैज्ञानिक साराभाई यांनी नुकतीच सुरू केली होती.प्रयोगादरम्यान दोन मुलांकडून मोठी चूक झाली. ते दोघे खूपच घाबरले. आपल्याल आता मोठी शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांना वाटू लागले. ते भीत-भीतच साराभाईंकडे गेले. साराभाईंनी त्यांना घाबरलेले पाहून विचारले,‘का रे, काय झाले? इतके घाबरलात का?’ एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, इलेक्ट्रॉनिक मोटर जळाली. त्यात जरा जास्तच वीज गेली.’ हे ऐकून साराभाई भंकर संतापले. पण नंतर त्यांनी स्वत:ला सावरले आणि म्हणाले, ‘इतकंच! एवढय़ासाठी घाबरलात? प्रयोग करताना चुका ह्या होणारच.
चुकल्याशिवाय कळणार कसं? पण पुढच्यावेळी प्रयोग करताना अधिक दक्षता घ्या. त्यामुळे नुकसान टळू शकतं.’ हे ऐकून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विद्यार्थी भारावून गेले. ते साराभाईंपुढे नतमस्तक झाले.*
*वास्तविक, जी मोटार अशीच विद्यार्थ्यांच्या चुकींमुळे जळाली होती, ती खूपच महागडी होती. त्या दिवसांत बाजारात उपलब्ध देखील नव्हती. तरीही साराभाई विद्यार्थ्यांवर ओरडले नाहीत की बोल लावले नाहीत. उलट त्यांची भीती दूर केली. कारण भविष्यात प्रयोग करताना ते घाबरणार नाहीत. प्रयोग करताना त्यांनी प्रोत्साहित केलं.
*तात्पर्य : भीतीमुळे माणसे पुढे सरकत नाहीत, ती मागेच राहतात.*
239)🎤📜 *बोधकथा - हुशार कोंबडी*
*एकदा एक भुकेला कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना.*
*मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येत नव्हती. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ आणि तुला योग्य औषध उपचार देईल.याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असतो जेणेकरून कोंबडी खाली येईल आणि तिला खाता येईल.*
*कोल्हयाचा डाव ओळखून कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण माझ्या वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली उतरवणार नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली आले तर माझे प्राणच जातील.’त्यामुळे तू लांबूनच माझी तपासणी करून सांग मी त्या प्रकारे काळजी घेईल.हे ऐकून कोल्हा समजून चुकला की कोंबडी हुशार आहे.आणि तो त्या खोपटातून उदास होऊन बाहेर आला.आणि अश्या प्रकारे कोल्ह्याला उपाशीच जंगलात जावे लागले. कोल्ह्याची झालेली फजिती पाहून कोंबडी मनातल्या मनात हसू लागली.*
*तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.*
239)🎤📜 *बोधकथा - भाकरीचे कर्ज*
*आपल्या रूम मध्ये नवरा – बायकोचा विवाद सुरु होता...*
*नवरा तिला शांत राहायला सांगीत होता... पण बायको नवऱ्याचे काहीही न ऐकता एकसारखी आपल्या सासूवर दोषारोपण करीत होती..आणि नवरा एकसारखा आपल्या बायकोला समजविण्याचा प्रयत्न करीत होता... आणि तू सून आहेस आपली मर्यादा नको ओलांडू असा बोलत जायचा...*
*परंतु बायको काहीही ऐकण्यास तैयार नव्हती... आणि ती अधिक जोरात बोलत असे...*
*ती सतत मोठ्याने ओरडून सांगत असे कि माझी सोन्याची अंगठी या टेबलावरच ठेवली होती...आणि आई व्यतिरिक्त या रूम मध्ये कुणीही येत नाही...!*
*माझी सोन्याची अंगठी हो न हो आईनेच उचललेली आहे.आता नवऱ्याच्या धैर्यानेही उत्तर दिले.आणि नवऱ्याने जोरात एक झापड बायकोला मारली.*
*दोघांच्या लग्नाला इकडून – तिकडून चार महिने झालेले होते...*
*बायकोला नवऱ्याचे हाथ उचलणे सहन झाले नाही... आणि तिने माहेरी जायचा निर्णय घेतला आणि आपले कपडे घेऊन घर सोडून निघाली...*
*बायकोने निघता निघता आपल्या नवऱ्याला विचारले कि.तुमच्या आईवर तुमचा एवढा विश्वास का म्हणून आहे...?तेव्हा नवऱ्याने जे उत्तर दिले.... त्या उत्तराला ऐकून दरवाज्याच्या मागे उभी असलेल्या आई चे डोळे भरून आले...*
*नवरा बायकोला सांगायला लागला...*
*माझ्या लहानपणीच माझे वडील देवाघरी गेले...*
*आई दुसऱ्यांच्या घरचे भांडीकुंडी करून जे मिळत असे त्यात एकवेळचेच भागायचे...!*
*माझी आई मला माझ्या ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकुन ठेवत असे.आणि म्हणत असे की मुला मला सध्या भूक नाही आहे.मी माझ्यासाठी भाकरी या डब्यात ठेवल्या आहेत.तू पोटभर जेवण कर मी नंतर जेवतो.*
*परंतु मी नेहमीच अर्धी भाकर खात असे आणि म्हणत असे कि....*
*आई माझे पोट भरले... आता मी नाही खाऊ शकणार...*
*माझ्या आईने माझी उरलेली अर्धी भाकर खाऊन मला लहानाचे मोठे केले आहे.*
*आता मी कसा बसा दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो आहे..*
*परंतु हे कसे विसरु जाऊ की आईने त्या वेळी आपल्या भुकेला मारले...*
*तीच आई या वेळी तुझ्या सोन्याच्या अंगठी ची भुकेली असेल.हा विचार मी स्वप्नात हि करू शकत नाही...!*
*तू तर फक्त चारच महिन्यापासूनच माझ्या सोबत आहेस.मी तर आईच्या तपश्चऱ्येला मागील २० वर्षापासून बघत आहे...!*
*हे सगळे ऐकून तर आईच्या डोळ्यात अश्रुची धारच लागली.आईला समजूच येत नव्हते कि... तिचा मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे की... ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे...!*
239)🎤📜 *बोधकथा - अतिथी धर्म*
*कमलाकर एका चोराचा पाठलाग करीत होता. तो चोर गावातील लहान लहान गल्लीतून पळत होता आणि शेवटी पळता – पळता कमलाकर ची नजर चुकवून तो त्या गावातील एका घरात घुसला...!त्या गावात अतिथी धर्म पाळण्याची सुंदर प्रथा होती...! तो चोर ज्या घरात घुसला*
*त्या घरातील व्यक्ती ने त्या गावाच्या प्रथेप्रमाणे आपला अतिथी धर्म पाळला.त्याच्या घरात घुसलेल्या चोराला आतील खोलीत लपविले...! इतक्यातच कमलाकर ही पाठलाग करता करता त्याच घरी आला...*
*कमलाकरने त्या व्यक्तीला चोराबद्दल सांगितले आणि विचारले की...असा कुणी व्यक्ती इकडे आला होता का....? तुम्ही त्याला इकडे पहिले का...? असे विचारले...*
*त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो व्यक्ती खोटे बोलला आणि अश्या व्यक्तीला मी पाहिला नसल्याचे कमलाकर ला सांगितले.परंतु... त्या व्यक्तीच्या मुलाने मात्र कमलाकरकडे बघून आतल्या खोलीकडे बोट दाखविले... कमलाकर काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत जाऊन त्या चोराला पकडले आणि तो त्या चोराला घेऊन गेला.*
*त्या कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलाचा खूप राग आला. कारण....त्याच्या मुलाने त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता.त्या कथेपुरते त्या मुलाचे अगदी बरोबर होते.*
*तात्पर्य :- परिस्थितीनुसार सत्याचा अर्थ आणि महत्व बदलत राहते...!*
*कालिदासांना* ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक *वृद्ध स्त्री* विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.
कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.
वृद्ध स्त्री म्हणाली *प्रवासी तर फक्त दोनच आहेत* एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात.
कालिदास म्हणाले मी *अतिथी* आहे. पाणी मिळेल ?
वृद्ध स्त्री म्हणाली अरे *अतिथी तर फक्त दोनच* आहेत एक *धन* आणि दुसर *तारुण्य* ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?
कालिदास म्हणाले मी *सहनशील* आहे. आता तरी पाणी मिळेल ?
वृद्ध स्त्री म्हणाली, 'अरे सहनशील तर तर *फक्त दोनच* आहेत ! एक *धरती* 🌍आणि दुसरं *झाडं* 🌵धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील *ओझं* घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती *मधुर फळच* देतात.
*कालिदास आता हतबल झाले,*
कालिदास म्हणाले *मी हट्टी आहे.*
वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, *हट्टी तर फक्त दोनच* आहेत *एक नख*💅🏻ं आणि *दुसरे केस*, कितीही *कापले* तरी परत वाढतातच.
कालिदास आता कंटाळले आणि
*कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे*.
वृद्ध स्त्री म्हणाली *मूर्ख तर फक्त दोनच* आहेत एक *राजा* ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.
कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले.
वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या *स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी* उभी होती, कालिदास आता *नतमस्तक झाले.
सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, *शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.* शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.
*तात्पर्य:* विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. वाचनात आलेला हा एक सुंदर लेख !
*⚜️बोधकथा - *चांगले आचरण*
*दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढय़ाच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढय़ाला असणार्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही.*
*त्या साधूने दुसर्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा! बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वज्र्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला, मित्रा, ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो.*
*तात्पर्य- माणसाच्या मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनत नाही.*
*बोधकथा- *स्वावलंबन*
*सहदेव महाराज व त्यांचे दोन शिष्य पांडुरंग व प्रताप हे दोघेजण वासोट्याच्या जंगलात फिरत होते. नागेश्वरीकडे जाण्याची वाट त्या जंगलात न सापडल्याने फिरून फिरून ते सारेजण दमले होते. अंधारूनही आले होते. काय करावे याचा विचार सुरू असतानाच अचानक त्यांना डरकाळी ऐकू आली. वाघाच्या त्या नुसत्या डरकाळीनेच सारेजण गर्भगळित झाले.*
*पांडुरंग महाराजांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करू लागला. तर प्रताप झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून सहदेव महाराजांनी प्रतापचा हात धरला. ते त्याला म्हणाले, ‘अरे, पळतोस कुठे? थांब, आपण तिघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करूया. तो प्रसन्न होईल आणि मग या संकटापासून आपले रक्षण करील.’*
*हे ऐकून आपला हात सोडवून घेत प्रताप म्हणाला, ‘महाराज, आपणच आम्हाला स्वावलंबनाचे धडे दिलेत ना? मग जे काम आम्ही स्वत: करू शकतो त्याला परमेश्वराची, तो येण्याची आणि प्रसन्न होण्याची गरजच काय?’*
*तात्पर्य : प्रयत्नांच्या अभावी केवळ प्रार्थना केली तर परिणाम शून्य.*
बोधकथा- *थोडं-फार येतं*
*आधी न कळवता आजारी बिरबलाला पाहण्यासाठी अचानक बादशहा त्याच्या घरी गेला. घरापुढील अंगणात प्रवेश करता-करता, बिरबलच्या तिथेच खेळत असलेल्या दहा-बारा वर्षांच्या मुलीस बादशहाने उर्दूत विचारले, ''बेटी, तुझे वडील घरात आहेत का?''*
*बादशहाच्या याच नाही, तर आणखी दोन-तीन उर्दूत विचारलेल्या प्रश्नांना बिरबलच्या त्या चुणचुणीत मुलीने अगदी योग्य अशी समर्पक उत्तरे उर्दूतूनच दिली. ती उत्तरं ऐकून त्याने तिला विचारले,''बेटी, तुला उर्दू बोलता येतं वाटतं?''त्यावर बिरबलकन्या म्हणाली, ''थोडं-फार येतं.''तेव्हा बादशहानं विचारलं, ''थोडं-फार म्हणजे किती?''*
*यावर बिरबलाची मुलगी म्हणाली, ''महाराज, ज्यांना उर्दू फार येतं, त्यांच्याशी तुलना केली तर मला 'थोडं, येतं आणि ज्या लोकांना ते अगदीच 'थोडं' येतं, त्यांच्याशी तुलना केली तर, मला ते फार येतं.'' बापाचे चातुर्य बेटीतही सहीसही उतरलेले पाहून बादशहाने कौतुकाने तिची पाठ थोपटली.*
*बोधकथा - *हे तुझेच डोके ना ?*
*कासम नावाचा नोकर नवीनच नोकरीवर लागला होता म्हणून त्याच्या बुद्धीची परीक्षा घ्यावी, ह्या उद्देशाने झोपेतून उठताच बादशहा त्याच्याकडे पाहून ओरडला, ''जल्दी बुलाव!''*
*आता जल्दी बुलाव, म्हणजे ताबडतोब बोलावून आण, एवढे त्या कासमला समजले,पण कोणाला बोलावयाचे? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. पण हा प्रश्न बादशहाला विचारता येत नव्हता, म्हणून कासम धावत-पळत प्रथम बिरबलाकडे गेला व त्याला बादशहाच्या आज्ञेचा आशय विचारला.*
*त्यावर बिरबल कासमला म्हणाला, ''काय रे,तुला जल्दी बुलाव, असे जेव्हा खाविंदांनी सांगितले, तेव्हा ते उभे होते का बसले होते? आणि त्यांच्या हाताची हालचाल कशी होती?''*
*कासम म्हणाला, ''जेव्हा ती आज्ञा त्यांनी मला दिली, तेव्हा ते बसले होते आणि आपला उजवा हात ते आपल्या वाढलेल्या दाढी-मिशांवरून फिरवीत होते.''*
*यावर बिरबल म्हणाला, ''असे ना? मग तू खुशाल केस कापणाराला त्यांच्याकडे पाठव. दाढी करून आणि मिशा कोरून ते कुठे तरी तातडीने बाहेर जाणार असतील.''*
*कासमने अशा प्रकारे केस कापणार्याला बादशहाकडे पाठवून तोही त्याच्या मागून बादशहाकडे गेला, बादशहा त्याला म्हणाला, ''कासम, मी तुला फक्त जल्दी बुलाव, असेच सांगितले, तरी तू नेमका याला घेऊन कसा काय आलास? हे तुझेच डोके ना?''*
*त्यावर कासम म्हणाला, ''हजूर, खरं बोलायचं तर, डोके माझेच, पण त्याला अकलेचा पुरवठा बिरबलजींच्या मेंदूने केला.''*
*बोधकथा *राणीची बाग*
*वाघापूर नावाचे एक छोटेशे गाव डोंगरदऱ्यात वसलेले होते. ते गाव शहरापासून खूप दूर होते . तेथील मुलांना रानातील रंगेबीरंगी फुले , झाडावरील पक्षी, नदीचे खळ-खळणारे पाणी, डोंगरदऱ्या या गोष्टी नवीन नव्हत्या . त्यांना आकर्षण होतं ते शहरातील नव-नवीन गोष्टी पाहण्याचं. आज शाळेत वाघ गुरुजीनी तशी संधी उपलब्ध करून दिली.*
मुंबई येथील प्रसिद्ध राणीचा बाग येथे आपली सहल उद्या जाणार आहे , असे गुरुजीनी वर्गात मुलांना सांगितले .सहलीचे नाव घेताच मुले वर्गात आनंदाने नाचू लागले . गुरुजींनी सहली संबधी सर्वसूचना मुलांना दिल्या.*
*दुसऱ्या दिवशी सकाळीच बसगाडीत बसून मुले शहराकडे निघाली . गाडीच्या खिडकीतून बाहेर झाडे, डोंगर पळताना दिसत होते. हा अनुभव मुलांसाठी नवीनच होता .गाणी -गोष्टी म्हणत ' राणीच्या बागेत ' कधी पोहचलो हे मुलांना? समजले देखील नाही. बागेतील वेगवेगळ्या फळांची झाडे, रंगेबीरंगी फुले, त्यावर उडणारे फुलपाखरे, नक्षीदार कापलेले झाडे पाहून मुले थक्क झाले. बाजूलाच तऱ्हेतऱ्हेची खेळणी होती...*
*रामने फुलपाखरू पकडले. त्याला दोरा बांधला. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, " रामू फुलपाखरू पकडू नको त्याचे पंख तुटतील त्याला उडता येणार नाही. तिकडे मीना गुलाबाचे फुले तोडत होती तेवढयात गुरुजींनी ते पाहिले. गुरुजी म्हणाले , " अगं मिना फुले ही झाडावरच छान दिसतात! ती अशी तोडू नये. काही मूलं पिंजऱ्यातील माकडाला दगडं मारत होती. ते गुरुजींनी बघीतलं व त्या म्हणाल्या , " मुक्या प्राण्यांचा असा छळ करू नये. " काही मूलं आपल्या सोबत आणलेला खाऊ खाऊन त्याची कागदं बागेत इकडे -तिकडे फेकत होती. शाम व राम झोका खेळण्यात दंग झाले होते.सीता व गिता घसरगुंडी खेळत होत्या. शाम बागेतील सर्व मुलांचे गुरूजींच्या मोबाईल वर फोटो काढत होता.*
*या सर्वांमध्ये गुरुजींचा आवडता विद्यार्थी सदू गुरुजींना कोठेच दिसत नव्हता. गुरुजी सदूला इकडे -तिकडे शोधू लागल्या. तेवढयात गुरुजींना सदू समोरून येतांना दिसाला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यामध्ये तो मुलांनी बागेत फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, कागद, फुले, झाडाची पाने गोळा करत होता. आणि तो कचरा कचराकुंडीत टाकत होता. त्याची ही कृती बघून गुरुजींना सदूचा अभिमान वाटला . त्यांनी सर्व मुलांना एकत्र बोलावून सदूच्या कामाचे कौतुक केले. ज्या मुलांनी बागेत कचरा टाकला हाता, त्या मुलांनी गुरुजींची माफी मागीतली व यापुढे आम्ही उघडयावर कोठेही कचरा टाकणार नाही असा संकल्प केला.*
*तात्पर्य - प्राणीमात्रावर दया करा. व स्वच्छता अंगी बाळगा.*
बोधकथा *श्रीमंत*
*मोहन हा चौथीच्या वर्गातील एक विद्यार्थी. घरची परिस्थिती अतिशय नाजूक.शाळा शिकून तो रिकाम्या वेळेत एका हॉटेल मध्ये कपबश्या धुवायची कामे करायचा. लोकांची जुनी कपडे वापरायचा.शाळेचे कपडे तर चार ठिकाणी ठिगळं लावलेली.पण एकदम स्वच्छ.*
*एके दिवशी वर्गशिक्षक वर्गात आले आणि विचारलं की "मुलांनो,यावर्षी स्नेहसंमेलनात,आपल्या शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदत दिली जाणार आहे. मला एक नाव सांगा बर.""सर मोहन ."वर्गातून सर्व मुलांचा सूर ऐकू आला.सरानी नाव लिहिले.पण मोहनच्या स्वाभिमानाला ठेच पोहचली. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला"सर,मी गरीब आहे हे तुम्ही कशावरून ठरवल?फाटके कपडे पाहून?माझा अभ्यास पहा.अक्षर पहा. अंकगणित पहा.पाठांतर सर्व अभ्यास पहा.मैदानी खेळातील माझं कौशल्य पहा.मग ठरवा की मी गरीब कसा?"मोहनच्या बोलण्यावर सर्व वर्ग शांत झाला. सर्वाना आपल्या बोलण्यातील चूक लक्षात आली.सर पण शांत पणे मोहन कडे पाहू लागले. कागदावर लिहिलेले त्याचे नाव नकळत त्यांनी खोडले.चार दिवसावर स्नेहसंमेलन होते आणि तो दिवस उगवला. बक्षीस वितरण सुरू झाले.चित्रकला,वक्तृत्व,लेखन निबंध ,मैदानी खेळ,सर्व स्पर्धाचा प्रथम क्रमांकाने विजेता होता तो मोहन . सरानी मोहन चे नाव मोठ्या अभिमानाने उच्चारले.खूप खुशीत मोहन बक्षीस घेण्यासाठी आला.नम्रपणे नतमस्तक झाला. सरानी सांगितले,की "हाच तो मोहन ,सर्व शाळेतील सर्वात गुणी,नम्र आणि ज्ञानश्रीमंत."*
*तात्पर्य - कोणाचीही पारख त्याच्या गुणांवरून करावी*.
*⚜️बोधकथा⚜️*
*"रक्ताशिवाय एक शेर मांस"*
*हरिदास नावाचा एक सज्जन व्यापारी दिल्ली शहरात प्रसिध्द होता.अनेक गरजू लोकांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव होता. पण त्याची ही लोकप्रियता त्याच्या शेजाऱ्याला पाहवत नसे.त्याच्या शेजाऱ्याचे नाव होते उग्रदास.*
*एकदा हरिदासाला अचानक आलेल्या हुंड्या सोडविण्यासाठी चार लाख रुपये कमी पडत होते.काहीही करून हुंड्या सोडवणे जरुरीचे होते. अगदी नाईलाजाने त्याने उग्रदासाचे दार ठोठावले. हरिदास आपल्या दरवाजात आलेला पाहून उग्रदासाला मनातून फार आनंद झाला. एका आठवड्याच्या मुदतीसाठी चार लाख रुपये देण्यास उग्रदास एका पायावर तयार झाला. हरिदासाला मात्र आनंद होण्याऐवजी काही दुसराच डाव असल्याचा संशय आला. उग्रदास म्हणाला, तुम्ही माझे शेजारी आहात, तुम्हाला मी चार लाख देतो व मला तुमचे व्याज सुध्दा नको पण माझी एक अट आहे.'हरिदासाला एवढी अडचण होती की तो बोलून गेला, 'तुम्ही अट सांगा'.*
*उग्रदास म्हणाला, 'एक आठवडा माझे पैसे तुम्ही खुशाल बिनव्याजी वापरा परंतु त्यानंतर एक दिवस जरी उशिर झाला तर मी तुमच्या शरीरातले एक शेर मास काढून घेईन.'*
*हरिदासाला खात्री होती की आपण एका आठवड्याच्या आत जरुर पैसे परत करू शकू. हरिदासाने उग्रदासची अट कबूल केली..*
*दोन चार दिवसातच हरिदासाजवळ चार लाख आले. पण तेवढयात त्याला परगावी जावे लागले म्हणून त्याने आपल्या मुनिमाजवळ पैसे देउन ते उग्रदासकडे नेऊन देण्यास सांगितले. पण उग्रदासाने मुनीमाजवळून पैसे घेण्यास नकार दिला. काही दिवसांनी हरिदास बाहेरगावाहून दिल्लीत परत आल्यावर उग्रदासने पैसे एका आठवड्यात परत मिळाले नाही म्हणून तक्रार केली. हरिदास म्हणाला, 'मी मुनिमाजवळ दिलेले पैसे तुम्हीच घेतले नाही. चूक माझी नाही. तरीही तुम्ही म्हणाल त्या दराने मी व्याज देण्यास तयार आहे.'*
*उग्रदासने पैसे घेण्यास नकार दिला. 'मला व्याज नको' उग्रदासने उत्तर दिले, 'ठरल्याप्रमाणे मला तुमच्या शरीरातले एक शेर मांस कापून दिले पाहिजे.'*
*इतर व्यापारी आले व त्यांनी उग्रदासाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण उग्रदास ऐकतच नव्हता. तो सारखा हरिदासच्या मागे लागला व एक शेर मांस मागू लागला.*
*बिचारा हरिदास घाबरला व त्याने अकबर बादशहाचे दरबारात येउन न्याय मागितला.अकबर बादशहाला उत्तर सुचेना. शेवटी त्याने हे प्रकरण बिरबलाकडे सोपविले व न्याय देण्यास सांगितले.*
*बिरबलाने उग्रदासाला बोलवून घेतले. उग्रदास म्हणाला, एका आठवड्यात मला पैसे परत केले नाही तेव्हा त्यानेच मान्य केलेल्या अटीनुसार मला त्याचे एक शेर मांस मिळालेच पाहिजे.'*
*बिरबल म्हणाला, 'ठीक आहे. तू तुझ्या अटीनुसार एक शेर मांस हरिदासाच्या शरीरातून कापून घे पण जर तू मांस कापताना एक थेंब जरी रक्ताचा सांडला तर तुला व तुझ्या बायका-मुलांना फाशी दिले जाईल. कारण अटी मधे फक्त मासच आहे, रक्त ठरलेले नाही. रक्त काढण्याचा तुला अधिकार नाही.' हे एकताच उग्रसेन नरमला व म्हणाला ,'नको, नको मला मांस नको मला पैसे परत द्या.'*
*बिरबल म्हणाला ते काही नाही. जी अट आहे, त्यानुसार तुला मासच मिळेल चल लवकर चाकू घे व काप मांस रक्त निघाले तर मात्र तुला फाशी आहेच.*
*उग्रसेनचा सर्व धीर संपला व तो बिरबलाच्या पायावर लोळण घेत म्हणाला 'मला मांस नको व पैसेही नको मला फक्त माफ करा.'*
*आता बिरबल चांगलाच रागावला. तो म्हणाला, 'कपट-कारस्थान करून दुसऱ्याच्या जीवावर उठतोस काय? ह्या दुष्टपणाची तुला शिक्षा भोगावीच लागेल.' बिरबलाने उग्रसेनला पाचवर्षे सक्तमजूरीची शिक्षा देऊन तुरुंगात रवाना केले.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*⚜️बोधकथा⚜️*
*"योगीराज पोपट"*
*परराज्याच्या मोहिमेवरून परत येत असताना अकबर बादशहाला अचानकपणे वाटेवर एक पोपट गवसला. बादशहाने एक पिंजरा आणून त्यात पोपट ठेवला व दररोज तो स्वत:चे देखरेखीखाली पोपटाला स्वादिष्ट अन्न व फळे खाऊ घाली.*
*दिल्ली शहरात परत आल्यावर एक स्वतंत्र नोकर नेमून बादशहाने त्याच्यावर पोपटाची जबाबदारी सोपवली. बादशहाने नोकराला ताकीद देताना सांगितले, 'हे बघ, या पोपटाची नीट काळजी घे. दक्षतापूर्वक त्याला खाऊ-पिऊ घाल. जर का तो आजारी पडला किंवा मेला असे माझ्याकडे सांगायला आलास तर तुझेच डोके उडवले जाईल.'*
*नोकराने बादशहाच्या सांगण्याचा धसकाच घेतला व सारखी काळजी करत पोपटाला खाऊपिऊ घालण्याकडे लक्ष देऊ लागला. नोकराच्या सततच्या खाऊपिऊ घालण्यामुळे पोपटही आयताच सोकावला व तो दिवसभर चरू लागला. पोपट उपाशी राहू नये म्हणून नोकर त्याला जास्तीत जास्त अन्न देत असे. या सततच्या जास्ती खाण्यामुळेच पोपट आजारी पडला. तरीही नोकराने त्याला भरपूर अन्न देणे चालूच ठेवले. सवयीमुळे पोपट आजारी असुनही खात राही. यामुळे एके दिवशी पोपटाची तडफड सुरू झाली व शेवटी आजारी स्थितीत त्याने प्राण सोडले. पोपट मेला म्हणजेच आता आपलेच मरण ओढावले या विचाराने नोकराला घाम फुटला.आता बादशहाला सांगण्याची तर त्याची हिंमतच नव्हती. यावर उपाय म्हणून तो बिरबलाकडे गेला.*
*बिरबलाला सर्व हकिकत सांगून त्याने बिरबलाचे पाय धरून प्राण वाचविण्याची विनंती केली. बिरबल म्हणाला, 'तू आता पिंजऱ्यातच पोपटाची चोच आकाशाच्या दिशेला वळवून ठेव व पिंजऱ्यापासन दूर निघून जा. त्यापुढे काय करायचे ते मी करेन.'*
*बिरबल बादशहाकडे गेला व म्हणाला, महाराज आपला लाडका पोपट यापुढे बिरबल काही सांगेना... बादशहा म्हणाला 'अरे. असे अर्धवट काय बोलतोस? माझ्या लाडक्या पोपटाला काही झाले का?'"छे! छे! सरकार, आपल्या पोपटाला काही झाले नसून तो आता एक फार मोठा योगी झाला आहे.'*
*बादशहाने हे बिरबलाचे उद्गार ऐकल्यावर त्याला हसू आले. तो म्हणाला. 'बिरबल पक्षी कधी योगी होतात का? नेमके काय झाले सांग पाहू !' बिरबलाने सांगितले, 'सरकार, मी खरे तेच सांगतोय. आकाशाकडे चोच करुन. डोळे मिटून तो शांतपणे ध्यान करतोय.'*
*बादशहा दचकला, 'अरे तो मेला तर नाही?' बिरबलने तत्परतेने सांगितले, 'नाही, नाही. तो तर तप करतोय.' बादशहाचा काही बिरबलवर विश्वास बसला नाही. बिरबलाला सोबत घेऊन बादशहा लगबगीने पोपटाच्या पिंजऱ्याकडे निघाला.*
*पिंजऱ्याजवळ येताच बादशहाने ओळखले की पोपट मरण पावला आहे. बादशहा बिरबलाला म्हणाला, 'बिरबल, तू एवढा बुद्धिमान असूनही तुला एक पक्षी मरण पावला एवढेसुध्दा ओळखता येऊ नये? अरे हा पोपट मेला आहे.'*
*बिरबलाच्या चेहेऱ्यावर मिस्किल हास्य पाहून बादशहा बोलायचे थांबला. त्याने विचारले, 'ह्यात काही तरी पाणी मुरतय? पोपट मेला असे न सांगता, तो तप करतोय, योगी झाला आहे, असे सांगण्यामागे तुझा हेतू तरी काय?*
*बिरबल म्हणाला, 'मी सरळ सरळ पोपट मेल्याची बातमी कशी काय सांगू? तसे सांगितले तर डोके उडवायची ताकीद तुम्हीच नोकराला दिली होती. '*
*ते ऐकताच बादशहा खो-खो करीत हसत सुटला. तो बिरबलाला म्हणाला, 'तू एक विद्वानच आहेस, बिरबल, अरे मी अनेकदा चुकीचे बोलून जातो हे खरे पण तू मात्र फार गमती करून माझी चूक मला दाखवून देतोस.'*
*बिरबलाने नोकराला बोलवून आणले व त्याला बादशहाचे पाया पडून माफी मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने माफी मागितल्यावर बादशहाने त्याला हसत हसत माफ केले, हे पाहून तो नोकरही आश्चर्यचकित झाला. त्या दिवसापासून राजवाडयातील सर्व नोकरांनी आपली निष्ठा बिरबलाच्या चरणावर अर्पण केली.*
*⚜️बोधकथा⚜️*
*"गाढवाची हजामत"*
*दिल्ली शहरात एक न्हावी आपल्या बोलण्यात लोकांना अडकवून फसवत असे. त्याच्या या चहाटळ व लबाड स्वभावामुळे सर्वजण त्याचेपासून दूर राहात. एकदा एक लाकूडतोडया डोक्यावर मोळी व मोळीवर कु-हाड ठेवून रस्त्याने जात होता. न्हाव्याने त्याला हाक मारली व विचारले, 'ए मोळीवाल्या, तुझ्या डोक्यावरच्या सर्व लाकडाची काय किंमत आहे?'*
*लाकडतोडया म्हणाला, 'मी आठ आणे घेईन.' न्हावी कुचेष्टेने हसून म्हणाला, 'अरे काय तुझ्यासकट किंमत सांगतोयस काय? ला फक्त तुझ्या डोक्यावरच्या लाकडांची किंमत सांग.' लाकूडतोड्या न रागावता म्हणाला, 'सहा आणे द्या' न्हाव्याने बरीच धासाधीस करुन चारच आणे द्यायचे कबूल केले. लाकूडतोड्याने मोळी न्हाव्याच्या अंगणात टाकून चार आणे मागितले.*
*न्हावी म्हणाला, 'हे काय, तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो?' लाकूडतोडयाने गयावया करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. न्हावी म्हणाला, 'तुझ्या या कु-हाडीचा दांडासुध्दा लाकडाचाच आहे व तोसुध्दा द्यायला हवास.'*
*लाकूडतोड्या म्हणाला, 'मालक, तुम्हाला कु-हाडीचा दांडा दिला तर मी लाकडे कशी काय तोडू? उद्या माझे पोट कसे भरणार?'*
*न्हाव्याने बळजबरीने कु-हाडीचा दांडा काढून घेतला व चार आणे देऊन अशीच बोली ठरली होती म्हणून ओरडून सांगितले.*
*बिचारा गरीब लाकुडतोडया हतबुद्ध झाला. त्याने बिरबलाकडे जाऊन तक्रार केली. बिरबल हसला. लाकूडतोडयाला तो म्हणाला, 'काही चिंता करू नको. तुझा कु-हाडीचा दांडाही तो परत करेल व जन्मभर खजिल होईल अशी त्याची फजितीही करतो. बिरबलने न्हाव्याला एक युक्ति सांगितली व परत पाठवले. दोन चार दिवसांनी लाकूडतोड्या सकाळीच न्हाव्याच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला. तो न्हाव्याला म्हणाला, आज संध्याकाळीच माझे लग्न आहे. तेव्हा माझी व माझ्या मित्राची गुळगुळीत दाढी व हजामत करून द्या. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी जरुर देईन.'न्हाव्याला वाटले, बरे झाले. चांगला अडकला बोलण्यात, मी म्हणेन तेवढे पैसे द्यायला कबूल झाला आहे. हजामती झाल्या की चांगली मोठी रक्कम वसूल करतो तो लाकूडतोड्याला म्हणाला, 'ठीक आहे. मी तुझी व तुझ्या मित्राची हजामत करतो पण तू मी मागेन तेवढे पैसे द्यायचे कबूल केले आहेस हे मात्र विसरू नको.' न्हाव्याने लाकूडतोडयाला समोर बसवले. त्याची दाढी व हजामत केली. नंतर म्हणाला, 'कुठे आहे तुझा मित्र? लवकर बोलाव.' लाकूडतोडयाने बाहेर जाऊन कान धरुन आपले गाढव आणले व म्हणाला, 'हाच माझा मित्र, कर याची हजामत' न्हावी संतापला. दोघांचे भांडण झाल्यावर ते दोघे बिरबलाकडे आले. बिरबल म्हणाला, 'जर बोली ठरल्याप्रमाणे तू कुन्हाडीचा दांडासुध्दा घेतो तर बोली टाकतो.' ठरल्याप्रमाणे तुला आता गाढवाची हजामत करायला हवी. नाहीतर मी तुला तुरुंगात टाकतो. न्हाव्याचा नाईलाज झाला व शेवटी त्याने मान खाली घालून गाढवाची हजामत केली. ते पहायला प्रचंड गर्दी गोळा झाली व सर्वजण पोट धरून हसू लागले. हजामत आटोपल्यावर लाकूडतोडयाने त्याला म्हटले, 'आता बोलीप्रमाणे तू खुशाल हवे तेवढे पैसे माग.'*
*समोर बिरबल आणि खूप लोक हसत उभे होतेच. ते पाहून न्हावी म्हणाला, 'नको, माझी चूक झाली. त्याची मला शिक्षा झाली. मला तुझ्याकडून पैसे नको' असे म्हणून आपली घोपटी उचलून तो घाईघाईने तेथून पसार झाला.*
*⚜️बोधकथा⚜️*
*क्रोध*
*एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’ तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.
⚜️बोधकथा - "अप्सरा व हडळ"
बिरबलाची परीक्षा घेण्यासाठी बादशहाने त्याला विचारले, 'बिरबल, तू कधी अप्सरा पाहिली आहेस काय?' बिरबल म्हणाला, 'महाराज, मी तर दररोज एका अप्सरेला पाहतो, बादशहा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले. 'काय रे,तू हडळ पाहिली आहेस का?
बिरबल पुन्हा म्हणाला, 'होय महाराज, मी हडळ सुद्धा आपल्याच राजधानीत पाहिली आहे.'
बादशहाने विचार केला, हा बिरबल आपल्याला खोटी उत्तरे देऊन केवळ मनोरंजन करीत आहे. अप्सरा व हडळ या काही मनुष्ययोनीत नसतात. त्या ह्याने कशा काय पाहिल्या. बिरबलला उद्देशून बादशहा मोठयाने म्हणाला, 'जर तू माझा वजीर व दरबारी सरदार असून अप्सरा व हडळ पाहिली आहेस तर या राज्याचा मी मालक असल्याने मलासुद्धा अप्सरा व हडळ दाखविणे तुझे कर्तव्य आहे.' बिरबल म्हणाला, 'महाराज, आपले म्हणणे योग्यच आहे. मी आज संध्याकाळी अप्सरा व हडळ यांचेसह आपल्या महाली येईन.
बादशहा मोठया उत्सुकतेने संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला. संभ झाल्यावर बिरबल दोन स्त्रियांसह बादशहाच्या महालात दाखल झाला. बादशहासमोर येताच त्याने त्यातल्या अशक्त व काळ्या रंगाच्या धर्मपत्नीला पुढे बोलावून सांगितले, 'महाराज ही माझी पत्नी अप्सरा आहे.
बादशहा म्हणाला, 'तुझी पत्नी तर खूपच काळी व अशक्तसुद्धा आहे. अप्सरा तर फार सुंदर असतात.'बिरबल म्हणाला 'महाराज या माझ्या धर्मपत्नीत अनेक गुण आहेत. तिला माझी कोणतीही गोष्ट चुकीची वाटत नसल्याने माझ्या सर्व चुकांना ती माफ करुन माझी रात्रंदिवस सेवा करते. अप्सरापण किंवा देखणेपण काही रूपावर अवलंबून नसते. जी सर्वात जास्त गुणवान तिच अप्सरा व हयाच अप्सरेला मी दररोज पाहतो.'
बिरबल नंतर खूण करुन दुसऱ्या स्त्रीला समोर बोलावले व म्हटले, 'महाराज ही हडळ आहे.' बादशहा या स्त्रीच्या रुपसौंदर्याकडे पाहतच राहिला. तो म्हणाला. अरे ही तर खूपच सुंदर स्त्री आहे.
बिरबल म्हणाला, 'महाराज, ही तर वेश्या आहे. हडळ ज्याला लागते त्याचे सर्वस्व ती हरण करते. वेश्यासुद्धा प्रेमाचे खोटे नाटक करुन सर्व लुटून घेतात.' बिरबलाच्या स्पष्टीकरणाने अवाक् झालेल्या बादशहाने न बोलताच मान हलवून आपली संमती व्यक्त केली.
⚜️ बोधकथा- चतुर राजा
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा बनारसचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून त्याचे राज्यही कबजा करतो . युद्धातून आणलेली सर्व संपत्ती तो पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या आपल्या बागेत पुरून टाकतो. या युद्धाच्या धामधुमीत पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून घेतो आणि तो तेथून पळून जातो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते.*
*राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात. बनारसचा राजा त्याचे तेज:पुंज रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो त्याला राजेशाही वागणूक देतो.*
*तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. तो त्याला राजवाड्याच्या आवारातील बागेत सापडतो, लवकरच ते सारे धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते. त्याला खूप दु:ख होते.*
*तेव्हा त्याचा प्रधान त्याला म्हणतो महाराज आपण का दु:खी होता, जी संपत्ती तुमची कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात? बनारसच्या राजाला सत्य उमगते. राजा दुखातून बाहेर पडतो.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा