जागतिक रेडिओ दिन हा १३ फेब्रुवारी ला दरवर्षी साजरा करण्यात येतो. जगभरातील लोक रेडिओ आणि त्यानुसार आपले जीवन कशे साकारू आणि विकसित करु शकतात. तसेच जग बदलण्यासाठी सकारात्मक संवाद साधण्यासाठी रेडिओ जगभरातील लोकांना एकत्र आणू शकतो ह्याच उद्देशाने साजरा करण्यात येतो.
रेडिओ हे जगातील जास्तीत जास्त जनतेच पोचणारे मोठे माध्यम आहे. हे एक शक्तिशाली संपर्क साधन आणि कमी खर्चाचे माध्यम म्हणून देखील ओळखले जाते. ह्या माध्यमातून दूर रहिवासीत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सोयीचे आहे. रेडिओ विशेषतः अशिक्षित, अपंग, महिला, युवक आणि गरीब अश्या लोकांपर्यंत पोहोचणयासाठी अनुकूल आहे. तसेच सार्वजनिक वादविवाद मध्ये भाग घेण्यासाठी हा एक मंच म्हणून उपयोगी पडतो कारण ह्यामध्ये लोकांच्या शैक्षणिक स्तरावरीळ भिन्नतेच फरक पडत नाही. याशिवाय, अपात्कालीन आणि नैसर्गिक संकट काळात संपर्क करण्यासाठी रेडिओची एक मजबूत आणि विशिष्ट भूमिका असते.
सध्याच्या ब्रॉडबँड, मोबाईल आणि टॅब्लेटसारख्या नवीन गोष्टींच्या जमान्यात रेडिओ सेवांमध्ये घडणारे बदल देखील खूप महत्वाचे आहेत. तरीसुद्धा, असे म्हटले जाते की आजपर्यंत एक अब्ज लोकांपर्यंत अद्याप रेडियो पसरमाध्यम पोहोचले नाही.
जनतेमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओ ह्या महत्त्वपूर्ण प्रसारमाध्यमाचा पसार करणे. रेडिओमार्फत माहिती मिळवण्याची आणि प्रदान करण्यासाठी निर्मात्यांना प्रोत्साहित करणे. तसेच रेडिओ प्रसारमाध्यम करणाऱ्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, हेच जागतिक रेडिओ दिनाचे महत्व आहे.
भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले.बी बी सी च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन स्थापन करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई कॆेंद्र निर्माण केले. मात्र प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागाअंतर्गत ’भारतीय राज्य प्रसारण मंडळ’ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे ’ऑल इंडिया रेडिओ’ असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.[१]
जरी १९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी ’आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे.
2022 ची रेडिओ दिवसाची थीम आहे Radio And Trust! 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रेडिओ दिनाची थीम " रेडिओ: एक शतक माहिती देणारी, मनोरंजन करणारी आणि शिक्षण देणारी " आहे. युनायटेड नेशन्स म्हणते, “2024 पाळणे रेडिओचा इतिहास आणि बातम्या, नाटक, संगीत आणि खेळांवर त्याचा प्रभावशाली प्रभाव हायलाइट करते.