💧 २२ मार्च हा "जागतिक जलदिन" 💧
💧 जल प्रतिज्ञा 💧
मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असून, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन.
मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही. नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.
पाण्याविषयी चे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन.
जय हिंद! जय महाराष्ट्र ! !
💧 "पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिर्ती" 💧
💧💧💧💧💧💧💧💧💧
पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.
प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.
पाण्याशी निगडीत खरे प्रश्न कोणते ?
एखादी गोष्ट अति परिचित असली तर त्या गोष्टीबद्दल जास्त अज्ञान असते. पाण्याबाबत नेमकी हीच परिस्थिती आहे. याचा वापर करावयाची आपल्याला इतकी सवय लागून गेली आहे की त्याच्याशी निगडीत प्रश्न सतत दुर्लक्षिले जातात. पाण्याशी संबंधित प्रश्न नेमके कोणते आहेत त्यांची आपण यादी करू या.
१. पाण्याकडे पहाण्याची मानसिकता कशी बदलता येईल ?
२. पावसाच्या पध्दतीत होणार्या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल ?
३. भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल ?
४. नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल ?
५. तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल ?
६. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ?
७. पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?
८. पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल ?
९. पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल ?
१०. पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल ?
मानसिकतेत बदल :
पूर्वीचे काळी लोकसंख्या खूप कमी होती. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त होती. आता लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उपलब्धता घसरली आहे. पण माणसाने पाण्याच्या वापरात मात्र काहीच बदल केले नाहीत. या उलट पाणी वापराचे नवनवीन मार्ग मात्र तो शोधित असतो. त्यामुळे पाणी प्रश्नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.
पावसाचे पध्दतीत बदल :
हवामानात होत चाललेल्या बदलामुळे पावसाच्या पध्दतीत झपाट्याने बदल होत आहेत. पावसातील नियमितपणा कमी होवून तो बेभरवशाचा होत आहे. पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. त्या बरोबर पावसाचा वेगही वाढत चालला आहे. वेगाने पडणारा पाऊस वेगाने वाहून जातो व आपले भांडे मात्र रिकामेच राहते. त्यामुळे पावसातील बदलांची नोंद घेवून आपल्याला त्याचा संग्रह कसा करता येईल याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.
भूजलाची घसरती पातळी :
पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी आपण भूजलाचा उपसा भरमसाठ वाढविला आहे. कोणत्याही प्रकारचे जल पुनर्भरण न करता निव्वळ उपसा वाढविल्यामुळे भूजल पातळी वेगाने घसरत आहे. भूजल साठे खरे पाहिल्यास राखीव स्वरूपाचे साठे आहेत. ते हात राखूनच वापरले जावेत. पण आपण मात्र आपल्या ऐहिक सुखासाठी वेगाने उपसा केल्यामुळे आज भूजलावर संकट आले आहे. हे असेच चालू राहिले तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. कृत्रिम पध्दतीने जलसाठे कसे वाढविता येतील याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.
नद्यांचे बारमाहीकरण :
वेगाने नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळे पावसाळा संपताच नद्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नद्या पूर्वीसारख्या बारमाही कशा वाहू शकतील याचा विचार करावा लागणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात या बाबत यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. त्या प्रयोगांचे यशापयश तपासून तशी योजना देशभर राबविता येणार नाही काय याचा विचार गंभीरपणे केला जावा.
तलावांचे पुनरूज्जीवन :
ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि सिंचन या साठी तलावांचे पुनरूज्जीवन अत्यंत निकडीचे आहे. पूर्वी भारत हा तलावांचा देश म्हणून प्रसिध्द होता. आज तलावांवरील अतिक्रमाणांमुळे कित्येक तलाव बुजवण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढत्या नागरी वस्तींची गरज भागविण्यासाठी तलावांचे आकार घटत आहेत. यामुळे ग्रामीण पाणी प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी सरोवर संवर्धिनीसारखी चळवळ उभारावी लागणार आहे.
पाण्याचा पुनर्वापर :
लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तेच ते पाणी पुन्ह: पुन्हा वापरावे लागणार आहे. आज तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे जल शुध्दीकरणाचे नवनवीन मार्ग सापडत आहेत. या मार्गांचा वापर करून पाण्याचा पुरवठा वाढविणे शक्य झाले आहे. सिंगापूर सारख्या देशात या मार्गाचा फार झपाट्याने वापर सुरू झाला आहे. अरब देश समुद्राचे पाणी शुध्द करून पिण्यासाठी सुध्दा वापरत आहेत. आज जरी नाही तरी उद्या आपल्याला सुध्दा याच मार्गाने जावे लागणार आहे.
पाण्याचे वाढते प्रदूषण :
पाण्याचा सर्वात महत्वाचा दुर्गूण म्हणजे ते कोणाशीही तात्काळ मैत्री करते. प्रदूषकांचा पाण्याशी संबंध आल्यास ते अगदी सहजपणे त्याच्या विळख्यात सापडते व चांगले शुध्द पाणी प्रदूषित होवून जाते. माणसाला होणार्या विकारांपैकी ९० प्रतिशत विकार प्रदूषित पाण्यामुळे होतात असे वैद्यक शास्त्र म्हणते. जिवाणू आणि विषाणू पाण्याच्या संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. सध्या यामुळे नद्यांतील, तलावांतील एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाणी सुध्दा प्रदूषित झाले आहे. यावर ताबडतोब उपचार न झाल्यास सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
पाण्याचा उत्पादक कारणासाठी वापर :
आज जगात मोअर क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर चे नारे लावले जात आहेत. या मानाने आपण फारच मागासलेले आहोत. कारण पाण्याचा उत्पादकतेने वापर करण्यात आपण फारच मागे पडलो आहोत. आपल्याला देशात शेतीसाठी जी सिंचम व्यवस्था वापरली जाते तिला प्रवाही पध्दती म्हणतात. या पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुर्वापर होतो व पाण्यासारखे दुर्मिळ संसाधन आपण वाया घालवितो. देशाची प्रगती करावयाची असेल तर पाणी अधिक उत्पादक पध्दतीने वापरावे लागेल.
पाण्याचे वितरण असमाधानकारक :
पाण्याच्या वापरात आज आपल्या देशात झुंडशाही आढळते. बळी तो कानपिळी याचा प्रत्यय आपल्याला या क्षेत्रात येतो. आपल्या देशात काही लोक अति खाऊन मरतात तर काही खायला न मिळाल्यामुळे मरतात. तीच परिस्थिती पाण्याचे बाबतीत आढळून येते. काही जमिनी अति सिंचनामुळे नापिक व्हावयास लागल्या आहेत तर काही पाणी न मिळाल्यामुळे नापिक आहेत. पाणी वितरण संस्था स्थापून त्यांचे हाती हा कारभार सोपवून आपल्याला पाण्याचे समान वितरण साधावायाचे आहे.
पाण्याचे सरकारीकरण धोक्याचे :
जी गोष्ट नीट सांभाळू शकतो तीच आपल्या हातात ठेवावी हे शहाणपण आपले सरकार कधी शिकणार नकळे. आज संपूर्ण पाणी प्रश्न सरकारमय झाला आहे. सरकारने मोठी धरणे बांधून ठेवली पण त्याची योग्य वितरण व्यवस्था न उभारल्यामुळे त्या पाण्याचा योग्य वापरच होत नाही. नागरी पाण्याचे वितरणही समाधानकारक नाही. जल वितरणात लोकांचा सहभाग नाही व त्यामुळे पाणी प्रश्न सरकार निर्मित तर नाहीना असे वाटावयास लागले आहे. जागतिक बँक आपल्याला पाणी व्यवस्था सुधारा असे वारंवार सांगत आहे. पण या क्षेत्रात केली जाणारी प्रगती अत्यंत धीम्या गतीने चालू आहे.
या सर्व प्रश्नांवर जलजागरण होणे आवश्यक आहे. जलदिनाच्या निमित्ताने यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकांना प्रश्न समजला तरच त्याची उत्तरे शोधली जावू शकतील. म्हणून आपण सर्वांनी मिळून जागतिक जल दिन साजरा करू या व या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू या.
राष्ट्रीय भवन निर्माण संहितेनुसार, दररोज दरडोई १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. यामध्ये पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी प्रत्येकी पाच लिटर, कपडे धुण्यासाठी २० लिटर, भांडी घासण्यासाठी आठ लिटर, घराची स्वच्छता सात लिटर, अंघोळ आणि शौचालयासाठी प्रत्येकी ४५ लिटर, अशी विभागणी आहे. या व्यतिरिक्त दुचाकी/ चारचाकी धुणे, घराभोवतालची स्वच्छता, बागकाम यांसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होत असतो. अशा ठिकाणी पाणी गळतीचे प्रमाण अंदाजे १० टक्के असते. बाथरूम आणि स्वच्छतागृहात सर्वाधिक पाण्याचा वापर होत असतो. अशा ठिकाणी पारंपरिक उपकरणांऐवजी पाणी बचत करणाऱ्या उपकरणांचा पर्याय निवडला, तर अंदाजे २० टक्के बचत होऊ शकते. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, पोर्तुगाल अशा देशांत पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांची निर्मिती आणि वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
🎤🎤पाणी घोषवाक्य (Water Slogans)
पाण्याविषयी माहिती देण्यासाठी किंवा
पाणीबचत व वापर यांविषयी जाणीव
जागृती करण्यासाठी घोषवाक्य यांचा चांगला
वापर करता येतो.
1. स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र,
ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.
2. पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी.
3. पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
4. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर,
जीवन होईल, निरोगी निरंतर.
5. पिण्यासाठी हवे स्वच्छ पाणी
नाहीतर होईल आरोग्य हानी.
6. पाणी शुद्धीकरण नियमित करू
सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.
7. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ
सर्व रोगराईंना दूर पळवू.
8. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.
9. पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी, एकच मंत्र ठेवा ध्यानी.
10. पाण्याची राखा शुद्धता,
जीवनाला मिळेल आरोग्यता.
11. पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन.
12. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा.
13. थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
14. पाणी अडवा पाणी जिरवा ,
मोलाचे मानवी जीवन वाचवा.
15. ठिबक सिंचनाची किमया न्यारी,
कमी पाण्यात उत्पन्न भारी.
16. थोडे सहकार्य ,थोडे नियोजन
पाणी फुलवी आपले जीवन.
17. अापल्या पाण्याचा हक्क सोडू नका,
पण कुणाचे पाणी तोडू नका.
18. वाचविल्यास जलसंपदा, सिंचनास होईल फायदा.
19. बचत पाण्याची, गरज काळाची.
20. वाचवू मिळून सारे थेंब थेंब पाण्याचा,
हाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचा.
21. पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती.
22. दुष्काळाची संपविण्या आपत्ती,
काळजीने वापरावी जलसंपत्ती.
23. आता राबवू जलनीती,
नको दुष्काळाची भीती.
24. नवीन पिढीचा नवा मंत्र,
कमी पाण्यात जादा सिंचन क्षेत्र.
25. पाणी व्यवस्थापनाची धरूनी कास,
शेतकऱ्यांनी साधला विकास.
पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.पृथ्वीवरील एकूण पाणीसाठय़ापैकी २.५-२.८ टक्के जलस्रोत हे खारे नसलेल्या पाण्याचे, बहुतांश पेयजल म्हणता येईल असे आहेत. यातील २.२-२.५ टक्के पाणी हे विषम पाणीवाटप, जलप्रदूषण अशा कारणांमुळे अनुपलब्ध असते; यामुळे केवळ ०.३ टक्के पाणी हे सजीव सृष्टीसाठी पेयजल म्हणून वापरात येते. त्यात, स्वत:ची गरज ओळखून आणि विवेकी वापराऐवजी अविचारी, अयोग्य पाणीवापर वाढत गेला. परिणामी जागतिक जल दिनाच्या माध्यमातून पाण्याच्या विवेकी वापराविषयी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले.
संयुक्त राष्ट्रांच्या जलविकास आराखडय़ाशी सुसंगत असे दर वर्षी हा दिन साजरा करण्याचे संकल्पनासूत्र ठरते. यंदाच्या जल दिनाचे संकल्पनासूत्र आहे- ‘पाणी आणि हवामानबदल’! या दोन्ही गोष्टींची असलेली अविभाज्य, घट्ट वीण कालातीत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे जलस्रोतांवर विपरीत परिणाम होतो आहे, हे वास्तव आहे. जलप्रदूषण आणि पावसाची अनियमितता यांमुळे पाणीप्रश्न अधिक जटिल होत चालला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हे आपण अधिक तीव्रतेने अनुभवत आहोत. शिवाय जागतिक लोकसंख्येत होत असलेली वाढ पाहता, पाण्याची मागणी वाढतीच राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा जपून आणि गरजेपुरताच वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. मुख्य म्हणजे, पाण्याच्या सुयोग्य आणि आवश्यक तितक्याच वापरामुळे हरितगृह वायूंच्या निरंतर वाढीलाही काही प्रमाणात अटकाव होईल.
💠अधिक माहिती
तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-
पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.
पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.
👉साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती
स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल! ताजे पाणी.......... 🤓 .... शिळे पाणी..........😳 मित्रहो !! ....... जेव्हा पालिकेचे पाणी येते,
तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे साठवलेले पाणी शिल्लक असते.
मग ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते. 🤥
प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून हजारो लिटर पाणी वाया जाते. 🙄
केवळ एका चुकीच्या समजूतीने,
’ ताजे पाणी
वस्तुत: ज्या ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा होतो, तो मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो. त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो.
म्हणजे, जे पाणी आपण ’ताजे’ म्हणून कौतुकाने पितो,
ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते.
आपण शहरातील सोसायटीच्या लोकांनी खालील गोष्टींचे पालन केले,
तर ’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी सहज टाळू शकतो.
१. जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवावे. म्हणजे अतिरिक्त न वापरलेले पाणी ओतून टाकण्याचा प्रश्नच येणार नाही
२. ताजे पाणी आणि शिळे पाणी ह्या कल्पनांना तिलांजली द्यावी.
३. वरील मुद्दे चटकन अंगवळणी पडत नसतील, तर तोवर हे राहिलेले पाणी ओतून न देता,
इतर घरगुती गरजांसाठी वापरावे.
’जल है, तो कल है’ 😳
🙏🙏 नक्की विचार करा 🙏🙏
🌹 संदेश ग्रीष्म ऋतुचा 🌹
स्रोतपर माहिती