नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������
महत्वाचे दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महत्वाचे दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

*जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन*

k̷ ̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷*आत्महत्येमुळे समस्या सुटत नाही....*

          आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच बाबतीत अग्रेसर असली तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आज पेपरमध्ये आपल्या वाचनात येत असते. अभ्यासाचा ताण, पेपर अवघड गेला, आई - वडील रागावले किंवा टी.व्ही. पाहू दिला नाही आणि अत्यंत शुल्लक कारणांनी 12-18 वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. शुल्लक कारणांवरुन आत्महत्या करुन आयुष्य संपवून टाकण्याचा या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे. जगभर 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. 

आपले मन हे एखाद्या हिमनगासारखे असते. आईसबर्ग किंवा हिमनग जेव्हा पाण्यावर दिसतो तेव्हा बर्फ वजनाने पाण्यापेक्षा हलका असल्या कारणाने पाण्यावर तरंगतो. आणि हिमनगाचा एक दशांश आपल्याला पाण्यावर दिसतो. उरलेला नऊ दशांश भाग पाण्याखाली दडलेला असतो. म्हणून तर टायटॅनिक सारखी मोठमोठी जहाजे हिमनगावर आपटून फुटतात व बुडून जातात. धोक्याचा इशारा मिळून देखील आपला वेग कमी करता येत नाही. धोक्याचा नक्की अंदाज येत नाही. पुरेसे अंतर ठेवले जात नाहीत. आपल्या मनाच्या बाबतीतही तसेच होते. आपले मन धोक्याचा इशारा देत असले तरी आत खोलवर किती राग, व्देष, उद्वेग उकळत असतो याचा अंदाज कधी आपल्याला येत नाही. हे थोरांच्या बाबतीत काय किंवा मुलांच्या बाबतीत काय? ज्वालामुखीचा उद्रेक झाला की लाव्हा रस चहुबांजुनी वाहू लागतो कधीकधी आपल्या मुलांमध्ये आपल्याला अशी ज्वालामुखीसारखी चिन्हे दिसतात. वरवर शांत वाटणारे मुल एकदम चिडून बेभान होते. काहीतरी बोलून जाते, करुन बसते.

नवीन पिढीची सहनशिलता कमी झालेली आहे. टी.व्ही. वरील आततायी खेळ, व्हीडिओ गेम आदी आभासी विश्वातील हिंसा, क्रौय यांच्या अनुकरणामुळे मुले आत्महत्या करीत आहेत. आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना माहिती नसते. वैद्यकीय भाषेत त्याला पुअर इम्पल्स कंट्रोल अथवा बिहेव्हिअर मॉडिफिकेशन, असे म्हणतात मुलांच्या वागण्यात आत्मविनाशाची चिन्हे दिसल्यास पालकांनी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. योग्य उपचार समुपदेशाने त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकेल. 100 पैकी 5 ते 10 टक्केच मुले दुराग्रही असतात. त्यांची काळजी घ्यायला हवी.

वारंवार प्रयत्न आलेल्या अपयशाचे काय? इथे वारंवार या शब्दाचा अर्थ आपण कसा घेणार यावर आपले पुढले वागणे अवलंबून असेल वारंवार याचा अर्थ आत्तापर्यंत असा घेतला तर व्यक्ती प्रयत्नवादी राहू शकेल. आतापर्यंत आलेल्या अपयशाचे पृथकरण करुन पुढील वाट काढू शकेल वारंवार या शब्दाचा अर्थ कायमचा असा घेतला तर मात्र आपण नशिबावर लेबल लावू. स्वत:वरही लेबल लावू आणि निराशेच्या दु:खाच्या गर्तेत प्रवेश करु, दैनिक जीवन संघर्षाचे Learned Helpessness हा Experiential (अनुभवसिध्द) नसून Precived (संवेदनाधिष्ठित) असतो. अपयशाच्या एका किंवा अनुभवानंतर जर व्यक्तीने स्वत:वर कमनशीबी व अपयशी म्हणून शिक्का मारला तर त्यातून डिप्रेशनची निर्मिती होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढाव उतार येत असतात. परंतु डिप्रेशनच्या जाळ्यात अडकून आत्महत्येच्या निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याकडे येऊन आपले मन मोकळे करन पहा तसेच तुमच्या आजूबाजुच्या लोकांच्या मनातील आत्महत्येच्या निर्णयाबाबत लक्ष ठेवण्यासाठी ही काही लक्षणे जी तुम्हाला नक्कीच मदत करतील.

अनेक दिवसांपासून निस्तेज आणि निरुत्साही राहणे हे एक प्रमुख लक्षण आहे. विनाकरण भूक मंदावणे किंवा जेवण निरस वाटणे हे धोकादायक आहे. दूर रहाणे - अचानक एखादी व्यक्ती एकलकोडी होणे किंवा त्यांच्या प्रियजनांपासून दूर दूर राहणे त्यांना प्रतिसाद न देणे. निराश रहाणे - अचानक ती व्यक्ती आपल्या अपयशाबद्दल किंवा स्वत: निरुपयोगी असल्याचे म्हणत असल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याच कामात सहभाग न घेणे - अचानक आवडत्या कामातून आणि धंदातून मन काढून घेणे. झोप न लागणे - आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेणे रात्री झोप न आल्याने अस्वस्थ राहणे. जीवन संपवण्याबद्दल बोलणे - काही वेळेस मस्करीत किंवा काही वेळेस गांर्भीयाने पण आत्महत्येचा विचार मनात येणे ही आत्महत्येच्या कृतीची पहिली पायरी आहे. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. प्रत्येकाचे आत्महत्येचा पर्याय निवडण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. परंतु त्यावर बोलून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांअंतर्गत औषधोपचार समुपदेश केले जाते.

आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत, पण आपणच आयुष्यातून कायमचे सुटतो. आयुष्य हे खूप सूंदर आहे. यात अडथळ्यांचे काटे आहेत हे बरोबर पण ते दूर केल्यावरच आयुष खऱ्या अर्थाने जगलो, असे म्हणता येईल त्यामुळे समस्येतून मार्ग काढण्यासाठी आत्महत्या करण म्हणजे मौल्यवान आयुष्य भरभरुन जगण अर्धावर सोडून देणेच होय.

***संकलित माहिती

बुधवार, २९ जुलै, २०२०

जागतिक व्याघ्र दिन



२९ जुलै
🐅 जागतिक व्याघ्र दिन 🐅
२९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
29 जुलै हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिवस' म्हणून साजरा करताना वाघोबांचे जंगली अस्तित्व सुरक्षित राहते आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा चालू केली जाते.

वाघ हे नाव उच्चारताच जंगलांत निर्धास्त चळवळ, काळजाचा थरकाप उडविणारे डरकाल अशा अनेक असंख्य गुणधर्म समोर येतात. पण खेळ, मनोरंजन, स्वातंत्र्यंतर वाढत लोकसंख्यामुळे वाघांच्या प्रवासावर आक्रमण होते. म्हणूनच हा डरका लुप्त होणार आहे. 29 जुलै हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिवस' म्हणून साजरा करताना वाघोबांचे जंगली अस्तित्व सुरक्षित राहते आणि ती गगनभेदी डरका पुन्हा एकदा चालू केली जाते.
पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये व्हायगणनेला सुरुवात होईल. ही गणना पूर्ण झाली आहे 2018 च्या डिसेंबर मध्ये आकडेवारीत येण्याची शक्यता आहे. या गणनेत वाघांची संख्या दोन हजार 500 पर्यंत जाण्याचा अंदाज संशोधक व वाइल्डलाईफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे अध्यक्ष अनिश अंधेरिया यांनी वर्तविले.
2010 मध्ये वाघांची संख्या एक हजार 700 होती. हा आकडा 2014 च्या आकडेवारीनुसार दोन हजार 226 पर्यंत पोहोचला. हा वाढ आनंददायी असली तरी जंगलाची गुणवत्ता कमी होत आहे. मध्येमध्ये.
महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू या राज्यांमध्ये वाघांची वाढ झाली आहे. ज्या राज्यांमध्ये वाघांची संख्या वाढत आहे तेथे संस्था, सरकार, स्थानिक यांचे संयुक्त प्रयत्न यशस्वी झाले आहेत. यामध्ये वन्यप्राणींची सुरक्षा अधिक आहे आणि कायद्याची भीती असणे आवश्यक आहे.
बोर अभयारण्य ऑगस्ट 2014 मध्ये टिगार प्रकल्पाची गुणवत्ता दिली गेली. भारतातील एक नवीन आणि सर्वात लहान पण जैवविविधतेने नटलेला असा वाघ प्रकल्प आहे. 2010 मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य तहगार प्रकल्पाची (सह्याद्री टिगर प्रकल्प) दर्जा देण्यात आला. एकूण क्षेत्र 1165.56 चौ. किमी येथे आहे 5-7 वाघ आढळतात.
भारत हा जगातील सर्वाधिक वाघ देश आहे. त्यातही एकट्या महाराष्ट्रात 69 वाघांची वाढ झाली. वाघांची वाढ म्हणजे वनवृद्धी प्रतीक आहे. नागपूर विभागात वाघ टप्प्याटप्प्याने खासकरून मोठ्या प्रमाणात वाघ वाढल्यामुळे नागपूर हे जागतिक टायगर कॅपिटल म्हणून उदयास येत आहे.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. फेलिडी या मार्जार कुळातील सर्वात मोठे प्राणी आहे. आज देशभरात 39 टिगर प्रकल्प आहेत. वाघांचे अधिवास घनदाट जंगलात असतकारणे हे ठिकाण जमिनीची धूप नाही. परिणामी पाण्याचे स्रोत कायम राहतात. या स्रोतामुळेच 39 व्याघ्र प्रकल्पातून छोटया-मोठ्या 350 पेक्षा अधिक नद्यांचा उगम होतो. भूगर्भात पाणी पातळी खूप चांगली राहण्यास मदत करते. त्यातून जैवविविधतेचे संवर्धन होते. यावरून आपण टायगर प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता येईल.

🐯वाघाच्या प्रजाती🐅
🐾बंगाल टायगर: भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि दक्षिण तिबेटमध्ये ही प्रजाती आढळते.
🐾इंडोचायनीज टायगर: कंबोडिया, चीन, म्यानमार, थायलँड आणि व्हिएतनामच्या डोंगराळ भागांमध्ये हा वाघ सापडतो.
🐾मलयन टायगर: मलय बेटावर वाघाची ही प्रजाती सापडते.
🐾सायबेरियन टायगर: सायबेरियामध्ये वाघाची ही प्रजाती आढळते.
🐾साउथ चीन टायगर: वाघाची ही प्रजाती चीनच्या दक्षिण भागात आढळते.
🐾सुमात्रन टायगर: ही प्रजाती सुमात्रा बेटावर आढळते.

शुक्रवार, २६ जून, २०२०

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’
              युनो जनरल असेंब्लीने २६ जून हा दिवस ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ पाळायचा’ आणि जगभरात चालू असलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण आणायचे आणि जागतिक सोसायटीचे उद्दिष्ट – संपूर्ण सोसायटी अमली पदार्थमुक्त करण्याचे – पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न करायचा. सर्वप्रथम हा निर्णय १९८७ मध्ये युएनच्या समोर मांडला गेला जेणे करून बेकायदेशीर अमली पदार्थांचा वापर जी जगासमोरील सर्वांत मोठी समस्या होती त्याला वाचा फुटली.
२०१८ वर्षाचा विषय (थीम) होती…
‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’
अमली पदार्थांचा वापर टाळण्यास मदत करण्याचे हे पहिले पाऊल असून ते विज्ञानावर आधारित आहे व त्यामुळे मुले व तरुणांचे आयुष्य बनविण्यास उपयोगी ठरणार आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा समाज हा आज सर्वांत गंभीर परिणामांचा सामना करतो आहे. तरुणांच्या आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत- जसे आर्थिक नुकसान, समाजविघातक वागणूक म्हणजे चोरी, हिंसा आणि गुन्हेगारी जो समाजाला लागलेला एक कलंक आहे. भारत सरकारने १९८८ मध्ये कायदा केला. मोठ्या शहरांमध्ये दारूच्या वापरासोबतच या अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बदलत चाललेली कौटुंबिक रचना आणि मित्रांचा वाढता दबाव ही काही कारणे याच्यामागे असावीत.
अमली पदार्थांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींमध्ये काही गोष्टी दिसून येतात..
१) शारीरिक आरोग्य – अंमली पदार्थं सोडल्यानंतर दिसून येणारी लक्षणे, वाढती झोप किंवा सुस्ती, कोकेनमुळे वाढणारी हृदयाच्या ठोक्यांची गती आणि अल्कोहोलमुळे हातांमध्ये आलेला कंप.
२) मानससास्त्रीय आणि मानसिक आरोग्य – नैराश्य, चिंता
– बदलणारे मूड (मनःस्थिती), झोपण्यातील अडथळे
– रोजच्या कामातील आवड कमी होणे
– गोंधळ/भ्रम/नशा सोडल्यामुळे होणारा त्रास
– कुठलीही औषधे जास्त दिवस घेतल्यामुळे पुढे त्यांची मात्रा वाढवावी लागते
– धोकादायक मनःस्थितीत राहण्याची इच्छा.
३) सामाजिक विषय – चोरी, गुन्हा, हिंसा, आतंकवाद, समाज विघातक वागणूक, पैशांची गैरवाजवी मागणी.
रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणारी बरीच मुले ज्यांना भीक मागून किंवा लहान मुलांनासुद्धा मजुरी करून रहावे लागते त्यांना अमली पदार्थांच्या मार्गाने गेल्यास आपले कष्ट कमी होतील किंवा दुष्टांच्या तावडीतून आपली सुटका होईल, असे वाटते. दिल्ली कमिशनकडे आलेल्या लहान मुलांच्या दयाअर्जाच्या केसेसमध्ये असे आढळून आले की जास्तीत जास्त केसेस या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या. फुटपाथवर राहणारी मुले बरेच वेळा स्वस्त अमली पदार्थ वापरतात जसे रबर ग्लू. याच्यामुळे त्यांना रोजच्या त्रासातून जसे लैंगिक, शारीरिक किंवा मानसिक छळातून मुक्ती मिळते.

मित्रमैत्रिणींचा दबाव, अभ्यासाचा ताण, दारूचे व्यसन किंवा आईवडलांना असलेली अमली पदार्थांची सवय, एकच पालक असणे, आई-वडलांचे संबंध तणावपूर्ण असणे, पालक-पाल्यामध्ये सुदृढ संबंध नसणे इत्यादी कारणांमुळे मुलं अमली पदार्थांच्या आहारी जातात आणि त्यातच बुडून राहतात.

रस्त्यावर मिळणारे नशीली पदार्थ हे सहज उपलब्ध असतात. तंबाखू आणि दारू हे शाळकरी मुलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात जसे ४० ते ८०% वापरले जातात. तरुणांवर मित्रांचा दबाव असतो, किंवा त्यांना प्रयोग करून बघायचा असतो आणि त्यांना त्यांच्या मित्रांनी स्वीकारावं असं त्यांना वाटत असतं.

नवयुवक आणि अंमली पदार्थांचा नशा –
किशोरवयीन काळ या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकण्याचा व त्यांचा बेकायदेशीर व्यापार करण्याचा काळ आहे. प्रोत्साहक वागणूकच त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करते. शिवाय खालील काही कारणे आहेत… १. आत्मविश्‍वासाची कमी, २. मानसशास्त्रीय अडथळे, ३. प्रवृत्त करणारे घटक, ४. मित्रमैत्रिणींना नाही म्हणण्याचे किंवा विरोध करण्याचे कौशल्य नसणे, ५. अकाली लैंगिक सक्रीयता, ६. किशोरावस्थेत गर्भधारणा, ७. समाजविघातक वागणूक, ८. शिक्षणात अपयश, ९. सकारात्मक निरोगी वागणुकीबद्दलचे अज्ञान असणे, १०. दारु किंवा अमली पदार्थ वापरणे म्हणजे ‘शान’ची गोष्ट आहे. ११. एखाद्या गँग किंवा गटामध्ये सामील असणे.

बर्‍याच वेळा यामध्ये कुटुंबसुद्धा जबाबदार असते- जसे पालकांना दारु किंवा नशेची सवय असणे, नात्यातील दुरावा, मुलांबरोबर चांगला वेळ घालवण्याची सवय नसणे, दारू किंवा अमली पदार्थांच्या सेवनाबाबत नियम व त्यांच्या परिणामांबद्दल स्पष्ट कल्पना नसणे, कुटुंबातील भांडणाचा परिणाम, घरगुती हिंसा, नोकरी किंवा कामधंदा नसणे.

किशोरवयीन मुले या सवयीमध्ये अटकण्यास कारणीभूत शाळा आणि समाजही मुख्य भूमिका निभावताना दिसतात. शिक्षणात अपयश, शिक्षकांकडून चुकीचा सल्ला, चुकीचे उत्तेजन, शाळेशी असलेल्या जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे नवतरुण वाहवत जाऊन ड्रग रॅकेटमध्ये अडकला जाऊ शकतो.
म्हणूनच घर, शाळा आणि समाजातर्फे दीर्घकालीन प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेत.
* कुटुंबातर्फे करता येण्यासारखे बचावात्मक उपाय किंवा घटक….
१) घट्ट कौटुंबिक संबंध किंवा नाते प्रस्थापित करणे.
२) पालकांमध्ये असलेलं सामंजस्य
३) शिक्षणासाठी प्रेरणा देणे
४) विद्यार्थ्यांना ताणाशी सामना करण्याचे शिक्षण देणे
५) दारू आणि अमली पदार्थांच्या संयत वापराबद्दलचे ज्ञान तसेच अपेक्षांबद्दल पालकांनी स्पष्ट जाणीव मुलांना करून द्यायला हवी.
६) कौटुंबिक निर्णयात पाल्यांना सामील करा आणि त्यांच्यासोबत एखादी जबाबदारी वाटून घ्या.
७) कुटुंबातील सदस्य हे पोषक आणि सहकार्य करणारे असले पाहिजेत.
शाळासुद्धा तरुणांना गुंतवून ठेवून शाळेबद्दल त्यांच्या मनात एक घट्ट आणि सकारात्मक नाते निर्माण करू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याबद्दल प्रोत्साहित केले पाहिजे, त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, शैक्षणिक ध्येय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांच्यात नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता वाढीस लागेल यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, त्यांना शाळेच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करावयास हवे व शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

समाजसुद्धा या अंमली पदार्थ विरोधी चळवळीचा एक भाग होऊ शकतो…. कसे? – तरुणांना सामाजिक कार्यामंध्ये गुंतवून किंवा सामावून घेतले पाहिजे, कायद्याची अमलबजावणी समजावून दिली पाहिजे, सगळे नियम-कायदे त्यांना समजावून सांगून ते त्यांचे पालन काटेकोरपणे करतात की नाही याकडे लक्ष द्यायला हवे, समाजातील अमली पदार्थांचे धोकादायक परिणाम मुलांना व पालकांना समजावण्यासाठी कार्यक्रम घ्यावेत आणि त्यांच्याविषयीचे धोके मुलांना व पालकांना समजावून सांगावे.
गोवा हे सुंदर राज्य आहे व पृथ्वीवरील स्वर्ग आहे. गोव्यातील किनारी भागांमध्ये अमली पदार्थांचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत असून पर्यटनामुळे याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थ उपलब्ध करून देणार्‍यांवर कायद्याचा बडगा उगारायला हवा. त्यांचा उपयोग करणार्‍यांनाच नेहमी पकडलं जातं व शिक्षा केली जाते आणि हे उपलब्ध करून देणारे दुसर्‍या गिर्‍हाईकांना पकडतात जे त्यांच्या उत्पादकांची विक्री बाजारात करीत राहतात
संकलित माहिती 

रविवार, २१ जून, २०२०

फादर्स डे (पितृदिन ) Father's day

Father's day 


दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अनेक देशात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. फादर्स डे सर्वप्रथम १९ जून १९१० रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. सोनेरा डोड यांनी आपला सांभाळ करणाऱ्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती, पुढे भारतातही हा दिवस स्वीकारून साजरा केला जाऊ लागला.
खरं तर आई-वडीलांविषयी व्यक्त होण्यासाठी कोणत्या खास दिनाची गरजच नाही. कारण प्रत्येक दिवस हा त्यांचाच असतो. पण कधी कधी आदरयुक्त दरारा असल्यामुळे आपण त्यांच्याजवळ व्यक्त होणं टाळतो. आपल्याला जन्म देण्यापासून ते ओळख देण्यापर्यंत आणि ती ओळख कशी जपावी याचे धडे देणाऱ्या वडिलांना थँक्यू म्हणण्याचा हा दिवस आहे. याच खास दिनी व्यक्त होण्यासाठी या टिप्स तुमच्या कमी येऊ शकतात.आज पितृदिन अर्थात फादर्स डे! आपण नेहमीच असं ऐकत आलो आहोत की मूलं आईपेक्षा वडिलांना जास्त घाबरतात. त्यामुळे कधी आपलं प्रेम वडिलांकडे ते व्यक्त करत नाहीत. अर्थात याला आताची आधुनिक मूलं अपवाद आहेत. पण अगदी १०-२० वर्षांपूर्वीही सामान्यत: वडिलांचा घरात खूप धाक असायचा. काहीही झालं की प्रत्येक मुल हे आईवर विसंबून असायचं कारण वडील रागावतील. ओरडतील अशी त्यांना भीती असे. पण जस जसं वय वाढत जातं, मुलं मोठी होतात तस तसे वडील मुलांना रागावणे ओरडणे बंद करतात आणि खूप शांत होतात. पण शेवटी वडिलांचा धाक हा मनात असतोच. तुम्ही सुद्धा आजवर कधीच वडिलांपुढे व्यक्त झाला नसाल किंवा कधीतरी त्यांच्या पुढे व्यक्त व्हावं असं वाटत असले तर पितृदिनापेक्षा खास दिन दुसरा कोणता नाही. त्यामुळे या पितृदिनाचे औचित्य साधून विसरा मनातील सगळी भीती आणि द्या आपल्या वडिलांना शूभेच्छा त्या सुद्धा आपल्या मातृभाषेतून अर्थात मराठीमधून!
१) प्रिय बाबा, आजवर कधी बोललो नाही पण खरंच तुमच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. लहानपणापासून तुमच्याकडे पाहत मी मोठा झालोय आणि मी नेहमी देवाचे आभार मानतो कि मी तुमचा मुलगा म्हणून जन्म घेतला. बाबा नेहमी तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू दे हीच इच्छा! तुम्हाला पितृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
२) बाबा म्हणजे झरा मायेचा, बाबा म्हणजे आधार आयुष्याचा, बाबा म्हणजे धडा मुल्यांचा, बाबा म्हणजे अवतार देवाचा, बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"बाप बाप असतो...
तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो...
मुलासाठी राब-राब राबतो...
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.


अमेरिकेत या दिवसाची सुरूवात झाली. या दिवसाबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला सगळ्यात लोकप्रिय कहाणी सांगणार आहोत. फादर्स डे ची सुरूवात अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये सोनोरा लुईस स्मार्ट नावाच्या या महिलेनं केली. लहान वयातच सोनोराचं आपल्या आईला गमावलं होतं. त्यानंतर सोनोराच्या वडीलांनी संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. वडीलांसह आईचेही प्रेम दिले.
१९१० ला पहिल्यांदा साजरा केला होता फादर्स डे
१९०९ मध्ये सोनोरानं एक सभेत मातृ दिनाबद्दल ऐकले तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला की, आईची माया, ममता यासाठी एक दिवस समपर्ण केला जाऊ शकतो कर पित्याच्या योगदानासाठी का नाही? त्यानंतर फादर्स डे साजरा करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला, लोकांशी बोलावं लागलं. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला. त्यानंतर १९ जून १९१० ला फादर्स डे साजरा केला गेला.
वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो फादर्स डे
जगभरातील सगळ्या देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जात नाही. भारत, अमेरिकेसह अन्य काही देशात तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह अन्य काही देशात १९ मार्च ला पितृ दिन साजरा केला जातो. तर न्यूजीलँड, फिजी आणि पापुआ, न्यू गिनीमध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो.
बापाला प्रेम करणारे सुज्ञ पोरं लाभण ही त्याची फार मोठी उपलब्ध मानली जाते. संपत्ती कितीही असूनही अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरते. ज्यांना चांगले अपत्य लाभतात खरंच ती माणसं भाग्यवान. कारण अनेकांना मुलांचं प्रेम मिळत नाही, सन्मान मिळत नाही. मुलांच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बापाच्या हृदयाच्या ठिकऱ्या होतात, हे किती जणांच्या लक्षात येत असेल. बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डॉक्टर उपचार करु शकत नाही. यावर मुलांचं प्रेम हेच एकमेव औषध रामबाण औषधी ठरते. मुलाची अधोगती पाहून' माझं कसं होईल याची चिंता बाप करत नाही लेकराचं कसं होईल म्हणून तो तळमळतो, हे समजायला बापच व्हावे लागते.
आईच्या तुलनेत बापाला फारच कमी मिळते महत्व दिले गेले आहे. आई जितकी महत्त्वाची तितकाच बापही महत्वाचा असतो. परंतु साहित्यिकांनी, लोकवाड्मय निर्मात्यांनी आईची सर्वाधिक महती गायली. बापाकडे दुर्लक्ष झाले. आई प्रेम व्यक्त करते. आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलांना ऐकायला आणि वाचायला मिळत असते. खरं तर आई म्हणजे व्यक्त प्रेम आणि बाप म्हणजे काही राग नसतो. बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते, याची जाणीव मुलांना करुन देणे गरजेचे आहे. सतत आई कृती आणि उक्तीतून व्यक्त होत राहते.
आपल्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाच्या वरुन प्रगती साधत पुढे जाणे ही बाब बापासाठी सर्वांत मोठी भेट ठरेल, असा संकल्प करणे, बापाला समजून घेणे, प्रेम देणे, सन्मान देणे असे घडले तर फादर्स डे अर्थपूर्ण ठरेल.

आंतरराष्ट्रीय योग दिन

 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन


       योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.

योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात.

सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात. हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.

योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते.

योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. योगाभ्यासाचे हे फायदे लक्षात घेऊन २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

याआधी डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान आणि योग गुरू श्री श्री रविशंकर आणि इतर योग गुरूंनी पुर्तगाली योग परिसंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन केले आणि संपूर्ण दुनियेत २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर ‘योग: विश्व शांतीसाठी एक विज्ञान’ नावाचे संमेलन ४-५ डिसेंबर २०११ मध्ये भरविण्यात आले.

जगत गुरु अमृत सूर्यानंद यांच्या म्हणण्यानुसार, विश्व योग दिनाचा विचार त्यापूर्वी दहा वर्षांपासून डोक्यात होता. पण संपूर्ण भारतातून इतक्या मोठ्या संख्येने या विचाराचे समर्थन करणे हे प्रथमच होत होते.

त्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व योग दिवस २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र आणि यूनेस्कोद्वारा घोषित करण्यासाठी स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कित्येक मोठमोठे योगविद्येत पारंगत असलेले योगी याला उपस्थित होते.

या उपक्रमाचे सूतोवाच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते,

“योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.

योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो. चला तर, एक आंतरराष्ट्रीय योग दिवस दत्तक घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करूयात.”

यानंतर २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली.

प्रधानमंत्री मोदी यांचा हा प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला. लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती’ अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले. सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. “आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती. ११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली.

भारतात २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर झाला ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजपथावर जवळजवळ ३६००० लोकांबरोबर योगासने केली.

*२१ जून हाच योग दिवस का ?*

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.

याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.

योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला.

 *आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.*

तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.

*विश्व योग दिवसाची उद्दिष्टे:*

◆ योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
◆ योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
◆ योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
◆आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
◆ संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
◆ लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
◆ योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
◆ लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
◆ मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
◆ योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे.

म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.  आपणही या अभियानात सामील होऊयात…
संकलित माहिती 

रविवार, १४ जून, २०२०

जागतिक रक्तदाता दिन



जागतिक रक्तदाता दिन🩸🩸14 जून
द्रव्यदानं परम दानम्   
अन्नदानं ततोधिकम्  
ततः श्रेष्ठ रक्तदानम् 
रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते.
जागतिक रक्त संक्रमणामध्ये सिकलसेल, एडस या रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे व अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ऐच्छिक रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे.
सध्या कोविड-19(कोरोना) महामारीवर उपचार करण्यासाठी रक्ताची गरज भासत आहे.14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही, हे सांगणेही आवश्यक आहे.
हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ सेंटर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल रेडक्रॉस व रेडक्रिेसंट सोसायटी कार्यरत आहेत. सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी ऐच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते. मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्यांची संख्या वाढविणे, नियमित रक्तदाते तयार होण्यासाठी काय करावे याचा अभ्यास या दिवशी करून मोबदल्याची अपेक्षा न करता रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे हे मोलाचे कार्य आहे. एकविसाव्या शतकात मानवाचे सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात. परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानव रक्तावर प्रकिया करतो, त्याचे विघटन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. म्हणून रक्तदान करून ही गरज भागवावी लागते. त्याची रक्तगटानुसार नोंद ठेवावी लागते.
रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त, रोग न झालेला माणूस रक्तदान करू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम  करू शकतो. रक्तदातचे वजन 45 किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
आज धकाधकीच्या बर्याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे ओणि तो आपणासारखा सूज्ञ नागरिकच करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प युवकांनी करावा.
*जागतिक रक्त दातांचा दिन कसा साजरा केला जातो?*
जगभरात रक्तदानाच्या महत्वाविषयी, तसेच सुरक्षित रक्तसंक्रमणाची गरज याबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाते दिन साजरा केला जातो. हे साजरी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.
जसे आरोग्य सेवा संस्था "जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस इंटरनॅशनल फेडरेशन आणि लाल क्रेसेंट संस्था (IFRC), रक्तदाता संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सोसायटी (Aifbeedio) आणि रक्त संक्रमण (ISBT)" जागतिक स्तरावर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एकत्र काम करतात.

युरोप परिषद अनेक वर्षे मोहिम साजरा करण्यासाठी तयार केले आहे. जगभरात सुमारे 9 2 कोटी लोकांना रक्तदान केल्यानेही दिवसेंदिवस सुरक्षित रक्तसंक्रमणाची गरज वाढत आहे. सार्वजनिक मोकळी जागा, शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था, कार्यक्रम, सभा, चर्चा, वादविवाद, प्रश्न-उत्तर स्पर्धा, वर्तमानपत्र जगभरातील संबंधित लेख आणि प्रकाशन कथा, वैज्ञानिक परिषद, लेख उपक्रम आणि विद्यापीठातील खंडणी आयोजन प्रकाशन, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल, क्रिडा क्रियाकलाप आणि इतर जाहिरात-संबंधित क्रियाकलाप ते आहेत जागतिक रक्त दाता दिन थीम
👉👉 जागतिक रक्त दाता दिन थीम👈👈
जागतिक रक्त दाता दिन 2020 थीम आहे ‘सुरक्षित रक्त, जीव वाचवते’ अशी या वर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम असून ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ हे यावर्षीचं घोषवाक्य आहे.
जागतिक रक्त दाता दिन 2019  थीम ही ‘सेफ ब्लड फॉर ऑल’ सुरक्षित रक्त सर्वांना ही आहे. 
रक्तदान दिवस 2018 का थीम- “बी देयर फॉर समवन एल्स. गिभ ब्लड. शेयर लाइफ.” (Be there for someone else. Give blood. Share life).
जागतिक रक्त दाता दिन 2017 थीम आहे ‘‘जास्त रक्त, जास्त जीवन’’ 
जागतिक रक्त दाता दिन 2016 थीम आहे  ‘जगाला लाल रंगाने रंगवा’.
जागतिक रक्त दाता दिन 2015 थीम आहे "माझे जीवन जतन केल्याबद्दल धन्यवाद."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2014 थीम होती "माता जतन करण्यासाठी रक्त जतन करा."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2013 थीम होता "जीवन द्या: रक्त दान"
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2012 थीम "प्रत्येक लोभी व्यक्ती एक नायक आहे."
जागतिक रक्त दाता दिन 2011 थीम "अधिक रक्त, अधिक जीवन होते."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2010 विषय "न्यू ब्लड फॉर द वर्ल्ड" होता.
वर्ल्ड ब्लड डोनर डे 200 9 ची थीम "रक्त आणि रक्त भागांचे 100% गैर-बळी अर्पण करणे" होते.
जागतिक रक्त दाता दिन 2008 थीम "नियमित रक्त द्या."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2007 थीम "सुरक्षित मातृत्वासाठी सुरक्षित रक्त" होता.
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2006 थीम "सुरक्षीत रक्ताची सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धता" होती.
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2005 थीम "आपल्या रक्तवाहिनीचे साजरे करा."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2004 ची थीम "रक्तजीवन वाचवते. माझ्याबरोबर रक्त वाचवणे प्रारंभ करा. "
जागतिक रक्त दातांचा दिवस
"मी 1 9 80 पासून रक्तदान करण्यामध्ये गुंतलो आहे कारण ही एक नाजूक गरज आहे." - डोना रीड
"रक्तदानकर्त्यांसाठी माझे जीवन आभारी आहे. ज्याने मला रक्त दिले त्याचे मी आभारी आहे. "- निकी टेलर
"माझे लक्ष्य आहे रक्तदात्यांसाठी अधिक गरज असलेल्या शब्दाचा प्रसार करणे." - निकी टेलर
👉👉 रक्तदान का करावे
दान केल्याचे समाधान मिळते.
शरीरात रक्तनिर्मितीस चालना मिळते.
रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
कर्करोग किंवा ह्रदयरोगासारख्या आजारांच्या धोक्याचे प्रमाण कमी होते.
👉👉 रक्तदान कोण करू शकते, काय आहेत आवश्यक अटी?
कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकतो.
वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. 
रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. 
रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन 45 किलो हुन अधिक असावे. 
रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. 
रक्तदाताच्या नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
👉👉 रक्तदान कोण करू शकत नाही? 
- आजारी आणि अशक्त व्यक्ती 
- एचआयव्हीबाधित अथवा रक्ताची कावीळ झालेली व्यक्ती. 
- गरोदर स्त्रिया. 
- मलेरिया, टीबी यांसारख्या संसर्गजन्य आजाराने बाधित व्यक्ती. 
- मधुमेह, रक्तदाब यांसारखे विकार जडलेल्या व्यक्ती 
गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.
👉👉 मानवी रक्ताबद्दल काही रंजक गोष्टी
नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त एक कप (जवळपास 250 ML) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास पाच लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या सात टक्के रक्त असते.
प्लाझ्मा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते तर प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.
1 ML रक्तामध्ये 10,000 पांढऱ्या रक्तपेशी आणि 2,50,000  प्लेटलेट्स असतात.
लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड (CO2) संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात त्यांना सैनिक पेशी सुद्धा म्हणतात.
आपल्या नसांमध्ये 400 किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त 30 मीटरपर्यंत उडू शकते.
दानात दान..! रक्तदान..!
रक्तदान..! एक श्रेष्ठ दान..!
==== संकलित माहिती 

शुक्रवार, १२ जून, २०२०

बालकामगार विरोधी दिन

बालकामगार विरोधी दिन
हातावर रेषा माझ्याही होत्या...
पण नकळत्या वयातच,
हातात पेन-पेन्सिल नाही
तर छिन्नी हतोडा आला...
कष्टाला ना नाही
पण कष्टाचेही वय असते
इथे वयाआधीच माझे
वय संपून गेले

बालकामगारांची ही व्यथा.

Child Labour Slogans (बाल कामगार घोषवाक्य)

1) वय आमचे शिकायचे कामाची नाही सवयी,
आमच्यानी होत नाही कसरत आणि कमाई.
2) नाही हातात ताकद, तरी गाळतोय घाम !
मुखी जाण्या दोन घास, करी चिमुकले हात काम !
3) बाळ मजूरी हटवूया, बाळ मजूरी मिटवुया.
4) बाल मजूरी टाळण्यासाठी, सर्वजण राहू बालकांच्या पाठी .
5) त्यांचे पालकच शत्रू होतात,
जेव्हा छोट्या हातानी काम करवतात.


बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते... कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार... 12 जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं.
14 वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप... समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार...? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे.
12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात 2004 पासून जिल्हधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
कायदा काय सांगतो?
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 : "बाल' किंवा "मूल' याचा अर्थ ज्यास वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, अशी व्यक्ती.
बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 : वय वर्ष 14 खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, असे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे. नियमभंग करणाऱ्यांना 3 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत 10 ते 20 हजार दंड होऊ शकतो.
बालमजूरीमागील कारणे...
अंतराष्ट्रीय संस्था युनिसेफ (UNICEF) च्या मते, लहान मुलांचे शोषण करणे सोपे असते म्‍हणून त्‍यांना कामावर ठेवण्‍यात येते. लहान मुले त्यांच्या वयाला अयोग्य अशा ठिकाणी व अशा प्रकारची कामे का करत असतात. यासाठी सामान्यतः त्यांची गरीबी हे पहिले कारण दिले जाते. परंतु यामागे लोकसंख्येचा भडका, स्वस्त मजूर, उपलब्‍ध असणार्‍या कायद्यांची अंमलबजावणी न होणे, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणे व मीण क्षेत्रांतील प्रचंड गरीबी अशी काही कारणे आहेत.
लहान वयोगटातील बालकांचे कामगार म्हणून मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यांना काही समजत नसते, ना मानसिक ताकद असते ना शारीरिक ताकद. त्यामुळे या बालकांचे शोषण करणे, त्यांना फसवून त्यांच्या कष्टावर एैश करणे समाजातील काही विकृतांना सोपे जाते. पण हे इतकेच नसते, तर मानवतेला काळीमा फासत बालकांना वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी यामध्येही अत्यंत भयानक पद्धतीने वापरले जाते. दहशतवादी, अतिरेकीही बालकांना आपले हस्तक बनवू पाहत आहेत. त्यांनी बालकांनाच दहशतवादी प्रशिक्षण कारवायांमध्ये वापरायला सुरुवात केली. हे खूप भयंकर आहे. वैचारिक बालमजुरी. दुसरीकडे बालकांचा टीव्ही, सिनेमा आणि इतर रिअ‍ॅलिटी शोमध्येही श्रमिक म्हणूनच वापर केला जातो. पण, त्यांच्या श्रमांना ‘श्रम’ न म्हणता प्रसिद्धीची चमक असते. आज जगभरात आफ्रिका खंडातील देश हे बालमजुरीच्या क्षेत्रात कुख्यात आहेत. ऑस्कर वाईल्ड या लेखकाने म्हटले आहे की, “मुलांसाठी काही चांगले करायचे असेल तर त्यांना आनंद द्या.” ऑस्कर यांनी जे सांगितले, त्याही पुढे जाऊन आपण म्हणू शकतो की, तो आनंद बालसुलभ निर्मळ निर्व्याज आणि त्यांच्या भवितव्यातील प्रगतीसाठी पूरक असावा. आज ‘आंतरराष्ट्रीय बालश्रम कामगार निषेध’ दिनी एक आशा बाळगू की, कुणाही बालकाचे बालपण अकालीच संपणार नाही, त्या बालकाला त्याचे सगळे हक्क मिळतील. देशाचा नागरिक म्हणून त्याला व्यवस्थित संस्कार आणि माणूसपणाचे जगणे मिळो!

शुक्रवार, ५ जून, २०२०

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन माहिती व पर्यावरण प्रतिज्ञा 
पर्यावरण माहिती वर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवा आणि आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र त्वरित अचूक ई-मेल आयडी वर मिळवा.
👇👇👇👇
👆👆👆👆

🎯 *जागतिक पर्यावरण दिन*
मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने निसर्गाने योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. परंतु या संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये आणि वापरामध्ये होणाऱ्या आपल्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे आणि कृतींमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या विविधतेची कधीही भरून न येणारी हानी होते आहे. जैवविविधतेचा ऱ्हास हा पर्यावरणासाठी आणि एकंदरीत मानवी आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची संख्या, त्यांचा भौगोलिक प्रसार कमी होतो आहे. या पार्श्वभूमीवर आज, ५ जून रोजी संयुक्त राष्ट्रांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाचे संकल्पसूत्र *‘जैवविविधता’* हेच ठरवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांकडून यंदाचे पर्यावरण दिनाचे यजमानपद भूषविण्याचा मान अतिशय विपुल आणि समृद्ध जैवविविधता असलेल्या कोलंबिया (दक्षिण अमेरिकेतील एक राष्ट्र) आणि जर्मनी या देशांना मिळाला आहे. पृथ्वीवरील एकूण जैवविविधतेच्या तब्बल दहा टक्के जैवविविधता कोलंबिया देशात आढळते. पक्ष्यांची आणि ऑर्किड या पुष्पवनस्पती प्रजातींतील विविधता या देशात सर्वाधिक आहे. तसेच इतर वनस्पती, फुलपाखरे, गोडय़ा पाण्यातील मासे, उभयचर प्राणी यांचीही विविधता येथे विपुल आहे.
जगात साधारणपणे १९६०-७० च्या दशकांत ढासळत्या जैविक संसाधनांबद्दल जनमानसात संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झाली. १९७२ साली संयुक्त राष्ट्रांच्या वतीने स्वीडनमधील स्टॉकहोम शहरात मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधांचा आढावा घेण्यासाठी ५ ते १६ जून या काळात एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गातील सर्व घटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने सर्व राष्ट्रांच्या सहभागाने एक ठोस कृती आराखडा आखण्यासाठी आयोजित केलेली ही पहिलीच परिषद होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण राहावे म्हणून दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून पाळण्यात यावा, असा ठराव या परिषदेत करण्यात आला. आता जगभरातील १५० हून अधिक देश हा दिवस साजरा करतात.
गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय आव्हानांनी अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. तापमानवाढ, हवामान बदल यांसारख्या समस्या तर सर्वस्पर्शी झाल्या आहेत. या समस्यांची तीव्रता कमी करायची, तर जैवविविधतेच्या संवर्धनाशिवाय पर्याय नाही, याविषयी जगभरात एकमत झाले आहे. याबद्दल धोरणात्मक पावले उचलली जातीलच/ जायला हवीत; त्यासाठी आपणही जागरूक राहिले पाहिजेच; पण या दृष्टीने वैयक्तिक पातळीवर काय करता येईल? तर, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, परिसरातील जैवविविधतेची, झाडाझुडपांची काळजी घेणे, तसेच प्लास्टिकचा कचरा होणार नाही याची दक्षता घेणे हे आपणास सहज करता येईल.
👉👉पर्यावरण प्रतिज्ञा👈👈
🌴पर्यावरण प्रतिज्ञा🌴
भारत माझा देश आहे.ही भारतभूमी वैविध्यपूर्ण वनसंपदेने समृद्ध आहे.या भारतभूमीत वसलेले हिमालय,जंगले,पर्वत,नद्या तळी,सरोवरे,धरणे,ही आधुनिक भारताची तीर्थस्थाने आहेत.या भारतभूमीतील समृद्ध आणि सुंदर निसर्गाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.त्यासाठी मी प्रयत्न करीन.मी एकही झाड तोडणार नाही,या उलट मी माझ्या वाढदिवसाला नवीन झाड लावीन.मी माझ्या घरात छपरावर पडणाऱ्या प्रत्येक थेंब माझ्या अंगणातच जिरवीन.पाणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.मी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करीन. वीजबचतीसाठी मी कटिबद्ध आहे.आवश्यक नसतांना मी पंखे,लाईट लावणार नाही.मी घरातला कचरा कचराकुंडीतच टाकेन.मी प्लॅस्टिक ची पिशवी न वापरता कागदी किंवा कापडी पिशवी वापरेण.मी माझ्या घरातील टी.व्ही.चा आवाज कमी ठेवीन.मी तंबाखू, गुटखा,जर्दा,धूम्रपान आदी व्यसन करणार नाही,व दुसऱ्याला देखील व्यसन करू देणार नाही.मी माझ्या वागणुकीने जल,वायू,ध्वनी,प्रदूषण होऊ देणार नाही.मी भारताचा जबाबदार नागरिक असल्याने कोरोना या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन मास्क,विशिष्ट अंतर ठेवीन.तसेच दररोज योगा,व्यायाम करून मी माझे आरोग्य चांगले ठेवीन.आणि दुसऱ्यांना चांगल्या आरोग्याच्या सवयी विषयी जनजागृती करेन.मी माझ्या पर्यावरणाचे सदैव रक्षण करीन.
जय हिंद,जय भारत.

*जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा*
५ जून आज जागतिक पर्यावरण दिन.....
सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प सर्वांनी एकत्र येऊन करूया.
निसर्गासारखा नाही सोयरा, गुरु, सखा, माय बाप.....
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटतो क्षणात आपोआप.....
*जागतिक पर्यावरण दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.....!*

आंतरराष्ट्रीय संस्था
पर्यावरण पूरक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी जागतिक समुदायामध्ये सहकार्य निर्माण करण्यसाठी राष्ट्रीय कृती योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणे. तंत्रज्ञान विकासामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे हा या संस्थाचा एक उद्देश असतो. काही महत्त्वाच्या संस्थाचा आढावा घेऊ. •निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धनसंस्था (IUCN)
मुख्यालय - ग्लँड (स्विर्त्झलंड)


स्थापना - १९४८ मध्ये फाऊंटेनब्लू (फ्रान्स ) बैठकमध्ये या संस्थेची स्थापना झाली.
उद्देश - संकटग्रस्त प्रजातींची ‘रेड लिस्ट’ प्रसिद्ध केली जाते. IUCN ही शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांची निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणारी एक संघटना आहे. या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंस्थेत निरीक्षण दर्जा प्राप्त आहे. भारताने दोनदा या अध्यक्षपद भूषवले आहे. १९८४-९० या काळात एम. एस. स्वामीनाथन तर २००८-१२ या काळात अशोक खोसला अध्यक्ष होते.•इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)
मुख्यालय - जिनिव्हा


स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे.
उद्देश - हवामानबदल आणि त्यांचे विविध परिणाम या विषायावर संपूर्ण जगाला स्पष्ट आणि शास्त्रीय दृष्टिकोन व माहिती देणारी ही आंतराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था स्वतः संशोधन करत नाही. हीने २००७ सालचे शांततेचे नोबेलही मिळवले आहे. •संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
मुख्यालय - नैरोबी (केनिया)


स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली.
उद्देश - जागतिक आणि प्रादेशिक पातळीवरील पर्यावरणीय विषयासंदर्भात यूनोची ही अधिकृत संस्था आहे. जागतिक पर्यावरण सुविधांच्या अंमलबजावणी संस्थांपैकी ही एक संस्था आहे. यांनी भारतात सौर ऊर्जा प्रकल्पाना मदत पुरवली आहे. •वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF)
मुख्यालय - न्यूयॉर्क


स्थापना - १९६१मध्ये या संस्थेची स्थापना झाली जायंट पांडा हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.
उद्देश - जगभरातील विविध पर्यावरण संवर्धन कार्यक्रम ही संस्था पाठबळ देते. पर्यावरणाच्या संवर्धन, संशोधनावर कार्य करणारी ही आंतराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे.•बर्ड लाइफ इंटरनॅशनल
मुख्यालय - केंब्रिज


स्थापना - १९२२मध्ये या संस्थेची स्थापना झाली.
उद्देश - जगातील निसर्ग संवर्धनासाठी असणारी सर्वांत मोठी भागीदारी असणारी ही संस्था आहे. पक्षी संवर्धनात अग्रेसर असणारी संस्था आहे. प्रजातीचा बचाव आणि अधिवास व प्रदेशांचे संवर्धन यासारखी कामे ही संस्था करते.•हरित हवामान निधी
मुख्यालय - सोंग्डो (दक्षिण कोरिया)


स्थापना - २००९ मध्ये या कोपेन हेगेन येथे झालेल्या कोप-१५ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या कोपेनहेगेन करारात कोपेनहेगेन हरित हवामान निधीचा उल्लेख सर्वप्रथम करण्यात आला. २०१०मध्ये कॅन्कुन येथील कोप - १६ मध्ये निधीची स्थापना करण्यात आली.

उद्देश - हवामान बदलाशी अनुकूलन आणि उपशमन घडवून आणण्यासाठी विकसनशील राष्ट्रांना मदत व्हावी या हेतूने UNFCCC अंतर्गत या निधीची स्थापना केली. हा निधी विकसनशील सदस्य राष्ट्रांमधील विविध प्रकल्प, कार्यक्रम, धोरणे व इतर कृतींना आर्थिक सहाय्य करतो. जागतिक बँक ही या निधीची तात्पुरती विश्वस्थ म्हणून कार्य करते आहे.



संकलित माहिती

रविवार, ३१ मे, २०२०

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन World No-Tobacco Day

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन 
World No-Tobacco Day

31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी १९८७ मध्ये हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी, तंबाखू वापरण्याचे धोके, तंबाखू उत्पादकांच्या व्यवसाय पद्धती आणि तंबाखूच्या साथीचा सामना करण्यासाठी डब्लूएचओने उचललेल्या पावलांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

आपली जबाबदारी
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

🙏व्यसनमुक्तीची विशाल वाट🚭🌴
तंबाखू,धूम्रपान व्यसनाला सर्वजण दूर सारू
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||धृ||

तंबाखू,धूम्रपानामध्ये रसायन घटक आहे
दर सहा सेकंदाला माणूस मरतो आहे
फसव्या या मृगजळाला तूच बाहेर काढ ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||१||

तंबाखु,धूम्रपान व्यसनाने कर्करोग होतो
आपल्याच हातांनी आपण जीवन संपवितो
नुसत्या या चैनीपायी आयुष्य नका संपवू
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||२||

तंबाखू,धूम्रपान व्यसनाने मानव निस्तेज होतो
कुविचारांचे जाळे मनी आपण सतत गुंफतो
स्मर आईवडिलांना तू घडवी तुझ्या जीवना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||३||

तंबाखू,धूम्रपान हे शरीराला घातक आहे
आपल्याला सर्वांना हे जिद्दीने सोडायचे आहे
घरा-घरातुनी,मानवाला हा विचार सांग ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||४||

तंबाखू,धूम्रपानाला आळा आता बसत आहे
सलाम मुंबई फौंडेशनच्या मार्गाने जात आहे
अजय पिंळणकर दादांचे विचार तुम्ही जाण ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||५||

तंबाखू,धूम्रपान सोडून निरोगी जीवन जगू
आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत राहू
व्यसनमुक्तीची विशाल हाक तुम्ही ऐका ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||६|| 

२०२१ सालची थीम Commit to quit.&quot
जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम आहे 
“तंबाखू पर्यावरणासाठी धोकादायक आहे."
संकलित पोस्ट

शुक्रवार, २२ मे, २०२०

जागतिक जैवविविधता दिन


जागतिक जैवविविधता दिन
दरवर्षी जगभरात २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाकडून २००१ पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
जैवविविधता म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.
झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर सगळीकड कोन्क्रीतीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेग्वेगली शो ची झाड लावली जातात अस जर होत राहील तर त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?
*जैवविविधता विकास (उत्क्रांति)*
आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कँब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कँब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कँब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते.
जैवविविधता करार (Convention on Biological Diversity – CBD)
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने १९८८ मध्ये जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय कराराच्या आवश्यकतेविषयी एक कार्यगट नेमला. १९९२ मध्ये नैरोबी परिषदेमध्ये जैवविविधता कराराचा मसुदा स्वीकारण्यात आला.
५ जून १९९२ रोजी रियो दि जानेरो या शहरात आयोजित यूएन आयोजित पर्यावरण व विकास या वसुंधरा परिषदेत हा करार हस्ताक्षरासाठी आला. जून १९९३ पर्यंत १६८ देशांनी यावर सह्या केल्या.
२९ डिसेंबर १९९३ रोजी हा करार अंमलात आला.
या कराराची तीन मुख्य ध्येये आहे
१. जैवविविधता संवर्धन
२. जैवविविधतेतील घटकांचा शाश्वत वापर
३. जैविक संसाधन संपत्तीच्या वापरातून होणार्‍या फायद्यांचे समान वाटप 
We're part of the solution ही या दिनासाठीची २०२१ सालासाठीची संकल्पना होती.
 जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात.
त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात. ‘जैवविविधता मंडळे’ स्थापन करून कामे वाटून घेतली जातात. स्थानिक पातळी वरील जैवविविधता मंडळे आपल्या परिसरातील वृक्ष, फुले, फळे, वेली, झुडपे, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी तसेच एकूण वृक्षाच्छादित प्रदेश यांची माहिती असणारी नोंदवही ठेवतात. परिसरात आढळणारे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचे प्रमाण, पिके, स्थानिक वाण, चवी, औषधी वनस्पती यांचीही माहिती संकलित केली जाते. जैवविविधतेला क्षती पोहोचवणाऱ्या बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. अधिवास जपणे, प्रदूषण कमी करणे, शाश्वत शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती अवलंबणे, हरित क्षेत्राची वाढ करणे, पशु पक्षांच्या प्रजाती जपणे इत्यादी पाऊले उचलून आपण जैवविविधता सांभाळू शकतो.
पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. आपण संकल्प करुया की तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी न जाता अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगू आणि पृथ्वीवरील जैवविविधता जपू. जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
संकलित माहिती

रविवार, १० मे, २०२०

जलसंधारण दिन


🌌10 मे 💥💦जलसंधारण दिन💥
भारतात येऊन गेलेल्या विदेशी पर्यटकांनी आपल्या देशाचे वर्णन “तळ्यांचा देश” असे केले आहे. यावरुन आपल्या पुर्वजांनी जलसंधारणाचे महत्त्व त्या काळातच जाणले होते, याचा प्रत्यय येतो. पण, एकेकाळी “सुजलाम् सुफलाम्” असणाऱ्या आपल्या देशाला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. दुष्काळाच्या खुणा पावलोपावली दिसत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी जालीम उपायांपैकी एक असलेला उपाय म्हणजे *“जलसंधारण”*
जलसंधारण व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भाग आहेत.
पहिला भाग म्हणजे पाण्याची भूपृष्ठावर साठवण करणे, यासाठी लहान मोठी धरणे बांधली जातात. दुसरा भाग अर्थात पाण्याची भूगर्भात साठवण करणे, यासाठी पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणाची कामे केली जातात. तिसरा भाग म्हणजे पावसाच्या पाण्याने शेत जमिनीवरील कसदार सुपीक मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून मृद संधारणाची कामे केली जातात. पावसाद्वारे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवून भूजल साठे निर्माण करून भूजल पातळी योग्य प्रमाणात राखणे हे जल संधारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे चांगले भूजल साठे राज्याच्या सर्वदूर क्षेत्रात निर्माण झाले तर विहिरीद्वारे त्या पाण्याचा उपयोग सिंचन व इतर कामासाठी केला जाऊ शकतो. ही कामे सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्राबाहेरील जमिनीसाठी अत्यावश्यक आहेत. जे राज्याच्या एकूण लागवड योग्य क्षेत्राच्या अंदाजे सत्तर टक्के आहे. यावरून पाणलोट क्षेत्र विकास आणि जल संधारणाच्या कामाचे महत्व लक्षात येईल. आज महाराष्ट्र शासनाचा भर या जलसंधाणाच्या कामांना गती देण्याचा आहे. म्हणजे अजून यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होणार आणि मूल्यमापन यंत्रणा नसल्यामुळे त्यातून काय लाभ होणार हे कळण्याची सोय नाही. पुढील काळात पाणलोट क्षेत्र विकासाच्या व भूजलच्या कामांसाठी केळकर समितीने ३०६५९ कोटीची तरतुद सुचविली आहे. असे म्हटले जाते की, राज्यात १२६ लाख हेक्टर्स क्षेत्रावर कामे झाली आहेत. त्यापासून ३१ लाख हेक्टर सिंचन समता निर्माण होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. ही कामे योग्य पद्धतीने झाली नाहीत, असे समितीने नमुद केले आहे. जलसंधारणाची कामे पाणलोट क्षेत्र निहाय नियोजन पूर्वक तंत्रशुद्ध पद्धतीने होऊन त्या कामांची योग्य ती देखभाल आणि सातत्याने मूल्यमापन होत राहणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असणे आवश्यक वाटते.
महाराष्ट्रात मा.नाना पाटेकर व मा.मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच अभिनेता आमीर खान याने स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजीत केली जाते. या दोन्हीला भरघोस प्रतीसाद मिळतो.
आपण घरच्या घरी सुध्दा जलसंधारण करु शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातुन.
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी जमा करणे. ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बुंदेला चौक, कुंडी, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अशी अनेक नावे आहेत. जमिनीवर आणि इमारतींच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी अशा दोन ठिकाणांहून शहरात पाणी मिळू शकते.
कसे करावे रेनवॉटर हार्वेस्टिंग
शहरी भागात पावसाचे पाणी दोन ठिकाणांहून मिळू शकते.
जमिनीवर पडलेले पाणी जमिनीवर पडलेला पाऊस आपल्याला शंभर टक्के गोळा करता येत नाही. त्यातील थोडाफार जमिनीत मुरतो. काहीचे बाष्पीभवन होते, तर काही वाहून जाते. त्यामुळे आपल्याला अंदाजे ५० टक्के पाऊस जमा करता येतो. आपण अंदाजे ०.८५ इतका जास्तीत जास्त पाऊस गोळा करू शकतो.
इमारतींच्या छपरावर पडणारे पाणी जर आपल्याकडे ५०० चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यावर १०० चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्यावर पडणारे पाणी किती असेल व ते आपल्याला किती मिळेल, याचा विचार करावा. छतावर पडणारे पाणी तुलनेने खूपच स्वच्छ, शुद्ध असते. पहिल्या पावसाचे पाणी सोडून देऊन पुढील पाऊस अडवून आपण ते एखाद्या हौदात साठवू शकतो. एवढे पाणी साठविणे हे खर्चाचे असल्याने आपल्याला लागेल तेवढेच पाणी साठवून उरलेले पाणी बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरता येईल. पाणी साठविण्यासाठी कॉंक्रीट, वीट, सिंटेक्सर किंवा फेराक्रिट या कोणत्याही प्रकारात हौद बांधता येतो. हे पाणी कुंड्यांना, बागेला, गाड्या धुण्यासाठी व इतर सफाईसाठी वापरता येते. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, तिथे त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरता येते. पाणी शुद्ध राहण्यासाठी हौदाला झाकण हवे व तेथे सूर्यप्रकाश आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोअरवेल किंवा विहीर नसल्यास आपल्या परिसरातील एखाद्या बोअरवेलमध्ये सामूहिक पद्धतीने पुनर्भरण करता येईल अथवा झिरप खड्डा तयार करून, जमिनीत चर खणून, झाडे लावूनही पाणी मुरविता येते.
कूपनलिका
पुनर्भरण कसे करावे?
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. (ओढ्याचे पाणी क्षार व रसायनविरहित हवे) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी विशिष्ट व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी. खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात बारीक वाळू भरावी. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
विहीर पुनर्भरण कसे करावे
पाणलोट विहिरी, विंधन विहिरी, भूजल स्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने विहिरीजवळ गाळप उपचार करावेत. प्रारंभीच्या गाळप उपचाराचा विसर्ग, जाड वाळूच्या दुसऱ्या गाळप उपचाराद्वारा विहिरीत सोडण्यात यावा. गाळप उपचारांचे नियोजन विहिरीलगतच्या भूपृष्ठाच्या पातळीपेक्षा खालच्या स्तरात करण्यात यावे. विहिरी क्षेत्राच्या उंच भागात असल्यास क्षेत्राच्या नैसर्गिक खोल भागात गाळप उपचार घेण्यात येऊन सिमेंट वा प्लॅस्टिक पाइप (सहा इंच व्यास) अथवा बंद चराद्वारा विहिरीत योग्य खोलीवर जोडण्यात यावेत.
आज “जलसंधारण दिना निमीत्त आपणही संकल्प करुया पावसाचा थेंब न थेंब वाचवायचा….
======================
स्रोतपर संकलित माहिती





शनिवार, ९ मे, २०२०

जागतिक स्थलांतरित पक्षी दिन World Migratory Bird Day

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती.......
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 
World Migratory Bird Day
दरवर्षी हा दिवस १४ मे किंवा दुस-या आठवड्यातील शेवटच्या दिवशी साजरा करतात.
पृथ्वीच्या कलण्यामुळे ऋतू बदलतात आणि उत्तरेकडील गोठवणा-या थंडीपासून सुटण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून, आपल्याकडे म्हणजे कटिबंधीय उष्ण प्रदेशात साधारण २ महिन्यांसाठी येतात. जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  स्थलांतरित पक्ष्यांविषयी जागरूकता आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व या दिवसाचे उद्दीष्ट आहे. जगातील सर्व पक्षी एकाच दिवशी अर्थातच स्थलांतर करीत नाहीत. हा दिवस, २००६ सालापासून, मे महिन्याच्या दुस-या आठवड्याच्या शेवटचा दिवशी साजरा केला जात असतो. स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव होणे ही बाब येथे महत्त्वाची ठरते. पक्ष्यांच्या स्थलांतराचे कुतूहल साऱ्यांनाच असते. पक्ष्यांचा स्थलांतर करण्याचा मार्ग, दिशा कशी ठरत असेल? सकाळी सूर्य, तर रात्री चंद्र-तारे, तसेच नद्या, जंगल असे भौगोलिक घटक या पक्ष्यांना मार्ग आणि दिशा दाखवत असतात. काही पक्ष्यांना आनुवंशिकतेमुळे स्थलांतराचे मार्ग माहिती होतात.
हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशातील दिवस लहान असल्यामुळे पक्ष्यांना अन्न शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती आणि कीटक बर्फाखाली जातात. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित प्रदेशाकडे स्थलांतर करतात. वातावरणीय बदल आणि अन्नाची उणीव या मुख्य कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात. आपल्याकडे थंडी असली तरी ध्रुवीय प्रदेशांपेक्षा कमी असते आणि अन्नाची मुबलकता यामुळे हे पक्षी हजारो मैल अंतर कापून इथे येतात, काही काळ थांबून परत आपापल्या प्रदेशात जातात.
भारतातील अन्य प्रदेशांप्रमाणे जंगल, गवताळ प्रदेश, किनारपट्टी, समुद्र, मिठागरे, धरणे, नद्या, खाडी, भात खाचरे, ओहोटीचे प्रदेश, उथळ दलदलीच्या जागा अशा अनेकविध अधिवासांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातदेखील अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. बहुतेक पक्षी स्थलांतरासाठी प्रजनन-स्थानाशी जवळीक साधणारे भौगोलिक स्थान, हवामान आणि पर्जन्यमान यांवर आधारित भूप्रदेशाची निवड करतात. बर्ड रिंगिंग आणि जीपीएस ट्रान्समीटरच्या विंग टॅगिंग अशा नवीन तंत्रज्ञानामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.
गेल्या काही दशकांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासांवर होत असलेले अतिक्रमण, प्रदूषण आणि जंगलतोड अशा मानवी कृतींमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. शेतीतील कीटकनाशकांचा असुरक्षित वापर, मानवनिर्मित वस्तूंशी होणारी टक्कर आणि हवामान बदल यांसारख्या इतर धोक्यांचा स्थलांतरित पक्ष्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ साजरा करण्यात येतो. या वर्षी हा दिवस उद्या, ९ मे रोजी साजरा होत आहे. ‘द कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीज्’, ‘द आफ्रिकन-युरेशियन वॉटरबर्ड अ‍ॅग्रीमेंट’ आणि ‘इन्व्हायर्न्मेंट फॉर द अमेरिकाज्’ या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून यंदा हा दिवस साजरा करण्याचे संकल्प-सूत्र आहे- ‘बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड’! पक्ष्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया अविरत आणि अखंड चालू राहण्यासाठी त्यांचे स्थलांतरित होण्याचे अधिवास सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यासाठी त्या त्या देशाच्या पर्यावरण धोरणात याचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. मुख्य म्हणजे, एक प्रकारे देशांना जोडण्याचे काम करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने पावले टाकणे गरजेचे झाले आहे.
संकलित माहिती 

शुक्रवार, ८ मे, २०२०

वर्ल्ड रेडक्रॉस डे World Redcross Day

मानवतावादी कार्य करणारी रेडक्रॉस संस्था !
‘रक्ताला कधीच माहिती नसतात जाती-धर्माच्या भिंती, रक्तदानाने निर्माण होतात फक्त माणुसकीची नाती!’

08 मे रोजी जगभरात वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा केला जातो. उल्लेखनीय आहे की रेडक्रॉस एक संस्था आहे, जी युद्ध दरम्यान जखमी आणि आकस्मिक अपघात आणि आपत्काल स्थितीत मदत करते. तसेच लोकांना आरोग्याप्रती जागरूक करते.
रेड क्रॉसची स्थापना जीन हेनरी डयूनेन्ट यांनी 1863 साली केली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो. याचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. जीन हेनरी डयूनेन्ट यांना मानव सेवेसाठी 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्‍कार (Nobel Prize) देण्यात आला होता.
💁♂ 8 मे हा दिवस दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक हेन्री ड्युनान्ट यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.रेडक्रॉस ही एक संस्था असून मानवतावादाची पुरस्कर्ती संघटना म्हणून ती ओळखली जाते. तसेच ही संस्था राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही._
🧐 *का साजरा केला जातो?*
1859 साली इटली आणि फ्रान्सने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले होते. या युद्धात अनेक जण जखमी झाले होते. हि परिस्थिती पाहून ड्युनान्ट यांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन जखमींवर उपचार केले. त्यांनतर 1863 साली सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली. या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली.
🎯 *संस्थेची उद्दीष्टे?* :  रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था खालील तत्त्वानुसार काम करते-
मानवता- आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय क्षेत्रात रेडक्रॉस संघटना मानवी दु:खांना आळा घालण्यात आणि शक्य असेल तेवढा परिहार करण्यात प्रयत्नशील असते.
निष्पक्षपातीपणा- राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही.
तटस्थपणा- युध्द काळात रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही.
स्वतंत्र- रेडक्रॉस एक स्वतंत्र संघटना आहे.
ऐच्छिक सेवा- रेडक्रॉस एक ऐच्छिक दु:ख परिहार करणारी संघटना आहे.
एकता- प्रत्येक देशात एकच रेडक्रॉस संघटना असली पाहिजे या संघटनेत सर्वाना प्रवेश असला पाहिजे.
विश्वात्मकता - रेडक्रॉस ही जागतिक संघटना आहे. तिच्यामध्ये सर्व रेडक्रॉस संस्थांना समान मानले जाते आणि संघटनेची कर्तव्ये पार पाडण्याची त्यांच्यावर समान जबाबदारी आहे. 📙 *पुस्तक प्रकाशन* : युद्धामुळे सामान्य जनतेचे कसे हाल होतात? यावर पुस्तकाच्या लिखाणातून त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी ‘ सुव्हेनियर ऑफ सॉलफेरिनो ‘ हे पुस्तक फ्रेंच भाषेत लिहून काढले. हे पुस्तक युरोप खंडात प्रचंड गाजले.
👍 *विशेष*
▪ आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत.
▪ सन्मान म्हणून 1917 साली या आंतरराष्ट्रीय संस्थेला नोबेल पारितोषिक दिले गेले.
▪ संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.रेडक्रॉसचे बोधचिन्ह म्हणजे रेडक्रॉस चळवळ आणि सैनिकी, वैद्यकीय सेवा यामध्ये मुख्यत्वे सशस्त्र लढाया आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी मानवतावादी कार्य करण्याच्या लोकांचे प्रतीक हो. वैद्यकीय सेवा करणाऱ्या  लोकांचे ते बोधचिन्ह नाही.
💁‍♀ _*संघटनेचे कार्य काय ?*_
◼हेनरी ड्युनॉट हे रेडक्रॉसचे संस्थापक आहेत. 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मदिवस हा रेडक्रॉस दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
◼हेनरी यांचा 1910 मध्ये स्विर्त्झलँडमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य थांबले नाही तर मोठ्या गतीने आजपर्यंत चालू आहे.
◼जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये मानवतावाद जोपासण्यासाठी सेवाभावी कार्य करणारे कार्य करणारी स्वयंसेवी संघटना म्हणून रेडक्रॉस संघटना परिचित आहे.
◼रेडक्रॉस या संघटनेचा मुळ उद्देश हा युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची आणि परिसरातील नागरिकांची देखभाल आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले.
◼रेडक्रॉस या संघटनेचे उद्देश आता व्यापक झाले आहे. आता ते मानवी हाल-अपेष्टा, कष्ट, यातना टाळणे अथवा त्यांची तीव्रता कमी करण्याचे काम करते.
◼नैसर्गिक आणि मानवनिर्मीत आपत्तींमध्ये सापडलेल्या पीडितांना मदत करणे, त्यांची सेवा करणे असे कार्य ही संघटना करत असते.
◼1917 साली रेडक्रॉस संघटना या आंतरराष्ट्रीय संस्थेला नोबेल पारितोषिक दिले आहे.
◼जागतिक पातळीसह महाराष्ट्रातही रेडक्रॉस ही संघटना कार्यरत आहे.
+ रेडक्रॉस बोधचिन्हाचा गैरवापर व कायदा --
युद्धकाळात शत्रूपक्षाचा विश्वासघात करणकरिता केलेला बोधचिन्हाचा वापर हा चिन्हाचा गैरवापर ठरू शकतो. म्हणून 1949 च्या जिनिव्हा कराराप्रमाणे सर्व संलग्न राष्ट्रांना रेडक्रॉस चिन्हांचा आदर राहील अशी व्यवस्था करण्याचे अधिकार दिले आहेत. सध्या जगातील 189 राष्ट्रे जिनिव्हा कराराशी संलग्न आहेत. 16 ऑक्टोबर 1950 ला भारताने जिनिव्हा करारास स्वीकृती दिलेली आहे व जिनिव्हा कराराशी भारत देश संलग्न झाला आहे. बोधचिन्हाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने संमत केलेल्या कायद्यास ‘जिनिव्हा कन्व्हेक्शन्स कायदा’ असे नाव आहे. भारतीय संसदेने सदर कायदा 1960 साली संमत केला आहे. बोधचिन्हाच्या गैरवापराबद्दल 500 रुपये दंड आणि शिवाय ज्या मालावर व वाहनावर सदर बोधचिन्हाचा अनधिकृत वापर केला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔅 संकलनपर माहिती 

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

जागतिक पुस्तक/कॉपीराइट दिवस


जागतिक पुस्तक/कॉपीराइट दिवस
२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिन. याच दिवसाला पुस्तक दिन म्हटलं जातं.

२३ एप्रिलच का?
विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात. शेक्सपिअर यांचा जन्म व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख. जन्मगाव व मृत्यूगावही एकच. जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं गाव एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला. शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे. लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती (प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. 38 नाटकं व 154 कविता ही त्यांची लेखन संपदा. 38 नाटकांपैकी 10 नाटके ऐतिहासिक, 16 नाटके सुखात्मक व 12 नाटकं शोकात्मक. शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ठ्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.
कॉपीराइट म्हणजे काय?

कॉपीराइट कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

                     📕📓 *पुस्तकं*📔📒

पुस्तके  स्वप्नात येतात आणि विचारतात,
'तू आम्हास ओळखले कां?'
बोलता बोलता पुस्तके वितळतात
आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात
'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'
पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
आणि विचारात ,
'आमची फळे खाल्लीस कां
छायेत कधी विसावलास कां?'
पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात
नि विचारतात ,
'श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलेस कां?'
पुस्तके असेच काही विचारीत राहतात
एकामागून एक.
प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.
तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
नि म्हणतात ,
'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'
पुस्तके मूक होतात,
झुरत जातात,
स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
शेवटी आत्महत्या करतात ती-
घरातल्या घरात,
बंद कपाटाच्या कारागृहात...
*शंकर वैद्य*

वाचनाचं महत्त्व?
वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी.जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा केला जात आहे. युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1995मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणे.  वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी , म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.,
सहज होणारे वाचन आणि जाणीवपूर्व केले जाणारे वाचन, असे वाचनाचे दोन प्रमुख प्रकार मानले तर, सहज होणारे वाचन हे एकेकाळी केवळ वृत्तपत्र वाचनापुरते मर्यादित होते ते आता मोबाइल, इंटरनेटमुळे सोशल मीडियाकडे वळलेले आहे. जाणीवपूर्वक केले जाणारे वाचन, म्हणजे पुस्तकांचे, ग्रथांचे वाचन करणारांची संख्या तुलनेने कायमच कमी होती आणि आहे; तरीही मराठीतला ग्रंथ व्यवहार आज करोडो रुपयांचा आहे, शेकडो प्रकाशक आहेत आणि हजारो लेखक आहेत. सहज केल्या जाणाऱ्या वाचनाच्या स्वरूपात इंटरनेटमुळे जो क्रांतिकारी बदल गेल्या दशकभरात झालेला आहे, तसाच तो पुढील दशकात पुस्तक व्यवहारातही होऊ घातलेला आहे. म्हणूनच जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आजचा आणि आगामी काळातला पुस्तक व्यवहार, ई-बुक्स, भविष्यात पुस्तकांच्या बदलणार असलेल्या संकल्पना आहेत.
पु. ल. देशपांडे म्हणतात पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइस्क्रीम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली, तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या या पदार्थाचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यर्थ्यांच्या मनात पुस्तकासंबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पाठय़पुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही; नाही वाचलं तर नापास होऊ या भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे; तो म्हणजे ते पुस्तक ‘पाठय़पुस्तक आहे’ अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात की, आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का? साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा.
(‘रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका’मधून साभार)

📒📔 पुस्तक दिन
मीच ग्रंथ,मीच पोथी,
मीच पुस्तक शेवटी

झालो सखा मी 
मानवाचा
भूक त्याची गोमटी
तोच माझा जन्मदाता
तो पिता अन सोबती

पर्ण होते,ताल वृक्षा
रस फुलांचा काढुनी
रेखिले मजवरी जे,ते
 ठेविले जतन करुनी 

एक नव्हे बहुत ऐसे
एकमेका बांधुनी
निर्मितीचा आनंद घेई
पुस्तकाला साकारूनी

प्रिय झालो बहू जनांना
मग रक्षिले मज आदरे
अग्नी अन जला पासून
दूर तयांनी ठेविले

रूप माझे बदलले
झालो अधिक की गुणी
उपकार त्याचे फेडण्यास
करण्यास त्याला शतगुणी

साथ नाही सोडली 
 माझी तयाने आजही
दिव्य रूप देऊनी
ठेविले मज भ्रमणध्वनी

भेटतो तो क्षणोक्षणी
हाक मारी गुगल म्हणुनी
 हा भुकेला तृप्त होई
पुस्तके बहू वाचूनी

नाही आता प्रगट रूपे
सूक्ष्म रुपी राहिलो
परी सखा मी आजही ना
तुझ्या सोबती राहिलो

विसरलास नाहीच म्हणुनी
तुही झालास समृद्ध रे
सांग तुझ्या आज्यास आता
रूप माझे वेगळे

जन्मो जन्मीची मैत्री
कशी मोजावी नकळे
सांगतो मी तुम्हाला
प्रिय माझे रूप आगळे
(सौ.आरती आठवले)

📒📔 पुस्तकांशी मैत्री

रस्त्याच्या दुतर्फा जशी झाडे
सावली देतात वाटसरूंना
प्रवासात सोबत करतात सुखाची
जीवन होते समृद्ध पुस्तक वाचताना

जीवनाच्या अथांग सागरात पोहताना
पानोपानी पुस्तकांच्या सापडतो राजमार्ग 
संकटांशी दोन हात करताना
सुकर होतो जीवनाचा महामार्ग

वाचाल तर वाचाल
पुस्तक वाचनाकडे वळा
जीवनाच्या भूईवर
फुलवा ज्ञानाचा मळा

       प्रा.जाई म्हात्रे

आगामी झालेले