नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील:तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षीं
जन्म सप्टेंबर २२, इ.स. १८८७; , महाराष्ट्र 
मृत्यू मे ९, इ.स. १९५९
पुर्ण नाव : भाऊराव पायगौडा पाटील
पेशा : समाजसुधारणा, शिक्षणप्रसार
प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था
पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)
हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.
"रयत" हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. पण हा मूळ अरबी भाषेतील शब्द आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी राजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.
छत्रपती शिवाजीराजांनी समतेचा पाया राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी घातला.
कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील छत्रपती आहेत. कर्मवीरांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी होते. रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी होते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते, म्हणूनच हे मानवतावादी होते.
शिक्षण संस्था उभारून कर्मवीरांनी पैसा कमावला नाही, परंतु स्वतःच्या कमाईचा सर्व पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च केला, म्हणूनच त्यांना शिक्षणमहर्षी म्हटले जाते.
आणा हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते,त्यांचा जन्म कुंभोज या आजोळी गावी झाला.त्यांचे गाव वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक होय.वडील सरकारी सेवेत होते पण त्यांच्या बाणेदारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली.अण्णांचे शिक्षण कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमध्ये झाले.बोर्डिंगचे नियम मोडल्यामुळे त्यांना अधीक्षकांनी काढून टाकले तेंव्हा शाहू महाराजानी त्यांना राजवाड्यावर ठेवून घेतले.
आण्णा बालवयापासूनच बंडखोर होते,अस्पृश्याना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिले नाही म्हणून त्यांनी रहाटच मोडून टाकला.ज्ञानदेव घोलप या मुलाला घेऊन त्यांनी परिवर्तनाचा लढा सुरू केला.सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव होता.
आणा सहावीत नापास झाले,पण डगमगले नाहीत,निराश झाले नाहीत,ते हिम्मतवान होते.त्यांना गरीबाप्रति खूप तळमळ होती.गरिबांना शिकविण्यासाठी त्यांनी पत्नी लक्ष्मीबाईचे दागिने मोडले,पण बहुजन मुलांना उपाशी राहू दिले नाही किंवा त्यांचे शिक्षण बंद पडू दिले नाही.गावोगावी जाऊन त्यांनी मुलं आणून त्यांना मोफत शिक्षण दिले.आणा महाराष्ट्राची मायमाऊली आहे.
आणांनी विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही,ते शेकापशी एकनिष्ठ होते.बाळासाहेब खेर यांनी ग्रँड बंद केली म्हणून त्यांनी पक्षांतर केले नाही किंवा ते साधे भेटायलाही गेले नाहीत,त्याच्याविरुद्ध लढत राहिले,इतके ते स्वाभिमानी होते,ते अडचणीत असताना एक व्यापारी अण्णांना म्हणाला "मी तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव बदला आणि माझे नाव द्या" तेंव्हा आण्णा म्हणाले "एक वेळेस जन्मदात्या बापाचे नाव बदलेण पण एकदा दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीही बदलणार नाही" आणणा हे महान शिवप्रेमी होते पण त्यांनी शिवाजीराजांचे नाव घेऊन तरुणांच्या हातात दगड धोंडे आणि तलवारी दिल्या नाहीत तर त्यांच्या हातात पाटी-पुस्तक दिले.
त्यांनी सत्यशोधकी विचारांसाठी मरण पत्करले, परंतु सनातनी विचारधारेला ते कधीही शरण गेले नाहीत, बाळासाहेब खेर या सनातनी मुख्यमंत्र्यांनी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली, तरी अण्णा त्या सनातनी विचारधारेला शरण गेले नाहीत. शेवटपर्यंत पुरोगामीवृत्ती आणि तत्त्वनिष्ठा त्यांनी सोडली नाही. अशा नीतिमान, निस्वार्थी, निष्कलंक, निर्भय, निर्व्यसनी, निपक्षपाती, शिक्षणमहर्षीना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

रयतगीत
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ...
गीतकार - विठ्ठल वाघ

कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले .कोल्हापूर जिल्यात हातकनंगले नावाचा तालुका आहे .या तालुक्यात बाहुबली चा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्व्नाथाचे सुंदरभव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी (आश्विन शुद्ध पंचमी ,ललिता पंचमी ) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात , खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.

🏢 *शिक्षण संस्था*
    पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.

दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -

*शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.*

*मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.*

*निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे*

*अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.*

*संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.*

*सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.*

*बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.*

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.

त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक ,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.

ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.

📚 *पाटीलांची चरित्रे*
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)
कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)
कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)
कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)
कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)
कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)
कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले) इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)
ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)
थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)
समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)
माणसातील देव, अजित पाटील

🎖 *सन्मान*
                सन १९५९ : पद्मभूषण
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
💐💐💐
कर्मवीर भाऊराव पाटील
समाजातील तळागाळा पर्यँत शिक्षणाची गंगा पोहोच करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!!💐💐🙏

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

स्वामीभक्त स्वराज्यसेवक - खंडो बल्लाळ चिटणीस


*स्वामीभक्त स्वराज्यसेवक  - खंडो बल्लाळ चिटणीस*
           *मृत्यू : 1712*
खंडेराव बल्लाळ एक मुत्सद्दी होते. ते छत्रपती संभाजी , राजाराम आणि शाहू यांचे वैयक्तिक सहाय्यक देखील होते. निष्ठा, मुत्सद्देगिरी आणि अपवादात्मक बलिदानाने मराठा साम्राज्य मजबूत करण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आठवले जाते .
💁‍♂ *जीवन*
खंडो बल्लाळ यांचा जन्म 1660 च्या सुमारास झाला. त्यांचे वडील बल्लाळ आवजी चिटणीस, जे बाळाजी आवजी म्हणून प्रसिद्ध आहेत , ते 1658 ते 1680 या काळात छत्रपती शिवाजीचे चिटणीस (सेक्रेटरी) होते . बाळाजी आवाजी यांचे मूळ आडनाव चित्रे होते. तथापि, छत्रपती शिवाजी यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्त झाल्यानंतर कुटुंबाने चिटणीसच आडनाव म्हणून वापर करण्यास सुरवात केली. बाळाजी आवजी यांच्यानंतर, राणी येसूबाईंच्या सल्ल्यानुसार खंडो बल्लाळ यांना 1681 मध्ये वडिलांचे रिक्त पद स्वीकारण्यासाठी नेमण्यात आले.
🤺 *सहयोग*
खंडो बल्लाळ यांनी संभाजी महाराजांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून 1689 पर्यंत सुमारे 8 वर्षे संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारेपर्यंत काम केले.
🤝 *होते खंडो म्हणून वाचला शंभो*
( हि म्हण ज्याच्यामुळे समाजात रूढ झाली ते स्वामी भक्त खंडो बल्लाळ चिटणीस )
दि.२४-११-१६८३ रोजी सुमारे रात्री ८ वा. मराठा सैन्यांनी जुवे बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला. विजरईचे तर धाबेच दणाणले. जुवे बेट मराठ्यांनी घेतल्याची नोंद जेधे शकवालीत मिळते – ” मार्गशीर्ष मासी फिरंगी याचे कुंभारजुवे घेतले, साष्टी व बारदेश मारिला “
मनुची लिहितो – ” संभाजीने ओहटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सँटो एस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीचे सैन्य किल्ल्यात घुसले आणी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. संभाजीच्या सैन्याची मुळीच हानी झाली नाही. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून संभाजीच्या सैनिकांनी अनेक (तोफेचे) गोळे (गोव्याच्या दिशेने) सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दि.२५-११-१६८३ या दिवशी सकाळी ७ वा. सुमारास विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्याने माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीजांचे शिपाई जीव वाचवण्यासाठी विजरईस एकटे सोडून डोंगरावरून खाली नदीच्या तीराकडे पळत गेले. या लढाई मधे विजरई घायाळ झाला. केवळ सुदैवाने तो बचावला. जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले.  त्यांच्या सोबत आता विजरई कोंदि द आल्व्होर हा देखील पळत सुटला. तिथे झालेल्या झटापटीत त्याच्या दंडाला गोळी लागली. कसाबसा जिव वाचवत तो मांडवी नदीच्या तीरावर आला. आता विजरई कोंदि द आल्व्होर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कात्रीत सापडला होता.बांध फोडून स्वताच्याच हाताने नुकसान करून घेतले असे त्याला वाटू लागले कारण पोर्तुगीजांना आता पलीकडे काही जाता येत नव्हते आणि पाठीमागून त्याचा पाठलाग खुद्द संभाजी महाराज ससैन्य करत होते. आपण संभाजी महाराजांच्या तावडीत सापडलो तर अंत निश्चित हे त्यास चांगलेच उमगले होते. संभाजी राजे किती इरेला पेटले होते हे यावरून दिसते. विजरई कोंदि द आल्व्होर तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला. संभाजी महाराज देखील तीरावर पोहचले विजरई कोंदि द आल्व्होर याला मचव्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला ! आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी महाराजांनी केली नाही. नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा पोहणीला लागला यावेळी खंडो बल्लाळ तिथे शंभूराजांसोबत सोबत होते. घोडा पोहणीला लागलेला पाहताच, त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जावून संभाजी राजांचे प्राण वाचवले. दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.  वर्षभरापूर्वीच संभाजी राजांनी खंडो बल्लाळ यांच्या वडिलांना (बाळाजी आवजी चिटणीस) देहदंड दिला होता. मनात कुठल्याही प्रकारची द्वेष न ठेवता स्वराज्याच्या छत्रपती साठी ही स्वामीनिष्ठा आणखी कुठे पहावयास मिळणार ? हे मराठी मातीचे गुण आणि सळसळत्या मराठी रक्ताचे ऋण आहे ! खंडो बल्लाळ यांनी केलेल्या कामगिरी बद्दल संभाजी महाराजांनी त्यांचा सत्कार केला. त्याचा उल्लेख असा मिळतो – ” महाराजांनी खासा घोडीयावरून जिनास पाणी लागे तो घोडा घातला. त्याजबरोबर खंडो बल्लाळ यांनी घोडा घालून तरवार मारिली, शिपाई गिरी केली. पाणी चढले तेव्हा घोडा पोहणीला लागला, खंडो बल्लाळ यांनी उडी टाकून महाराजांचा घोडा धरून पोहून बाहेर निघाले. ते समयी संभाजी महाराजांनी बहुत संतोष होऊन पोटाशी धरिले, घोडा बक्षिस दिला, खासा उतारपोशाख दिला. मोत्याची कंठी व तुरा दिल्या. सोबत पालखीचा मान दिला. ”
🛐 *राजारामांच्या सुटकेसाठी कट*
 1698 च्या सुरूवातीच्या काळात, जेव्हा मोगल सैन्याने जिंजी किल्ला घेरला होता आणि शेवटच्या घटनेसाठी तयार झाला होता, तेव्हा खंडो बल्लाळने राजारामच्या सुटकेसाठी कथानक आखले होते. ते गुप्तपणे देखील  मुघल छावणीत गणोजी शिर्के, मराठा सरदारांना भेटले. आणि मुघल नाकेबंदी पासून राजाराम च्या सुटकेला मदत करण्यासाठी  त्याला विचारले. गणोजींनी काही अटी ठरविल्या ज्या वाटाघाटी व लेखी मान्य केल्या गेल्या. त्यानंतर, गणोजीने दाभोळच्या वतनाची मोठी मागणी केली आणि ती स्वत: खंडो बल्लाळ यांच्या मालकीची होती. त्यानंतर, काही वेळातच खंडो बल्लाळ यांनी कागदाचा तुकडा ओढला आणि वतनाचे गिफ्ट डीड लिहिले. गणोजीच्या बाजूने व स्वाक्षरी व शिक्कामोर्तब केले. या महान त्यागाच्या ठिकाणी गणोजी प्रभावित झाले आणि त्यांना लाज वाटली परंतु त्यांचा लोभ त्यांना नियंत्रित करू शकला नाही. तथापि, त्याने आपला शब्द पाळला आणि खंडो बल्लाळ यांना राजारामांना नाकाबंदीपासून वाचविण्यात आणि मराठा जनरल धनाजी जाधव यांच्या ताब्यात सैन्याच्या स्वाधीन करण्यास मदत केली .
⏳ *नंतरचे जीवन आणि मृत्यू*
1700 मध्ये छत्रपती राजारामांच्या मृत्यूपर्यंत खंडो बल्लाळ यांनी त्यांचा वैयक्तिक सहाय्यक म्हणूनच नव्हे तर विश्वासू सल्लागार म्हणून काम केले. राजारामच्या मृत्यूनंतर खंडो बल्लाळ यांना 1707 पर्यंत राणी ताराबाईंनी त्यांच्या पदावर कायम ठेवले. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूच्या सुटकेनंतर खंडो बल्लाळला शाहूने त्यांच्या हाताशी बोलण्यास बोलावले. मृत्यूपर्यंत त्यांनी वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम केले आणि शाहूच्या सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि त्यांना मोठा आदर आणि सन्मान मिळाला. परशुराम पंत प्रतिनिधी या मराठा साम्राज्यातील एक महान मुत्सद्दी व योद्धा यांच्या कथित विश्वासघातावर जेव्हा शाहू  रुष्ट झाला , तेव्हा त्याने त्याला ताबडतोब अटक करण्याचा आणि डोळ्यावर चोपडण्याचा आदेश दिला. हे कळताच खंडो बल्लाळ यांनी शाहूच्या दरबारात धाव घेतली आणि हा मूर्खपणा थांबवण्याची विनंती केली.  शाहूंना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी लगेच परशुराम पंतला सोडले, त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांचा सन्मान परत दिला. या प्रसंगाच्या नंतर लवकरच खंडो बल्लाळ यांचा मृत्यू 1712 मध्ये झाला.
💎 *वारसा*
खंडो बल्लाळ यांचा मुलगा गोविंद खंडेराव चिटणीस शाहूंचा वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होता. शाहूंचा 1749 मध्ये मृत्यू झाल्यानंतर गोविंद खंडेराव यांनी नानासाहेब पेशव्यासोबत सोबत नेहमीच अग्रगण्य भुमीकेत राहीले. मराठ्यांचा इतिहास लिहिणारे पहिले भारतीय मल्हार रामराव चिटणीस गोविंद खंडेराव यांचे नातू आणि खंडो बल्लाळ यांचे पडनातू होते. मल्हार रामराव यांचा मुलगा बलवंतराव चिटणीस हे 1818 पासून छत्रपती प्रतापसिंह यांच्या दरबारात मंत्री होते. ते ब्रिटिश सरकारच्या तुरूंगात मरेपर्यंत प्रतापसिंहांशी एकनिष्ठ राहिले.
🙏 *स्वराज्यासाठी आयुष्य वेचलेल्या खंडोजी बल्लाळ यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन* 🙏
स्त्रोत ~ विकिपीडिया
संकलन 

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - १६ सप्टेंबर_


*_आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - १६ सप्टेंबर_*

*CONTENTS*

फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते !

*मूळ संकल्पना व सुरुवात*

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो. १९७८ साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.

*अधिक माहिती*

खरेतर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण होय. विकसनशील देशांनी वस्तू वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा. तसेच हरितगृह- वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे. सध्या ऐवजी हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन आणि हायड्रोफ्लुरोकार्बन चा वापर सुरु झाला आहे. परंतु यावरही २०३० पूर्वी नियंत्रण आणायचे आहे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६.
═════════════════

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया- अभियंता दिवस


मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
भारतीय अभियंता
जन्म - १५ सप्टेंबर , १८६०
(अभियंता दिवस, Engineers Day)

प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे.  त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.
विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.
स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.
खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. १९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना, मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली. १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग,कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. उदा., म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली. म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. आपल्या प्रयत्‍नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. सेवाभरती शर्ती, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्ये त्यांनी केली. १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जय चामराजेंद्र ऑक्युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला. मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला.
विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. म्हैसूरपासून १८ किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सु. ४० मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. १२.५ कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली. यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष (१९२१-२२), भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष (१९२५), मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बॅक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमन; अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था (१९४१); संचालक, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई, कराची, बडोदा, सांगली, मोरवी, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले.
विश्वेश्वरय्या यांनी पाच वेळा अमेरिकेचे दौरे केले. खेरीज जपान, इटली, इंग्‍लंड, स्वीडन, रशिया, कॅनडा, सिलोन (श्रीलंका), जर्मनी व फ्रान्स या देशांना विविध निमित्तांनी भेटी दिल्या.
शिस्त हा त्यांच्या परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके व स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे.
भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणांतून व लेखनांतून ते तळमळीने विचार मांडीत. भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय कार्यक्षमता या विषयांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक होतील. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान अत्यंत अचूक होते. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी १.५ किमी. वरील रेल्वे रूळ उखडले आहेत असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.
रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्‍लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्वॉयर्स ऑफ माय वर्किंग लाइफ (१९६०) ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
नवभारताचे एक निर्माते म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या विविधोपयोगी कार्याचा व त्यांच्या ज्ञानाचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी व शासनांनी गौरव केला. लोकांमध्ये ते एम्. व्ही. या नावाने परिचित होते.
ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्‍न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.
विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून १९७१ मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तुसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भारतरत्‍न गौरवपदक ठेवण्यात आले आहे. गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले.


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

हिंदी दिवस

 14 सप्टेंबर रोजी, 1949 घटना सभेत एक मत आहे की, निर्णय घेण्यात आला हिंदी म्हणून भारत 'चे अधिकृत भाषा असेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि प्रत्येक भागामध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी , राजभाषा प्रचार समिती, वर्धा यांच्या 1953 च्या  विनंतीनुसार  भारतात दरवर्षी हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949. हा हिंदीचा प्रणेते राजेंद्र सिन्हा यांचा वाढदिवस होता, ज्याने हिंदीला राष्ट्रभाषा व्हावी म्हणून बराच काळ संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी काका कालेलकर , मैथिली शरण गुप्ता,  हजारी प्रसाद द्विवेदी , महादेवी वर्मा,  राजेंद्र सिन्हा लेखक सोबत अथक काम केले आहे. यामुळे त्यांनी दक्षिण भारतात अनेक सहली केल्या आणि लोकांचा आनंद साजरा केला.त्याच दिवशी हिंदी साहित्यिक व्यौर राजेंद्र सिन्हा यांचा 50 वा वाढदिवस होता, म्हणूनच हा दिवस हिंदी दिवसासाठी सर्वोत्कृष्ट मानला जात होता.
राष्ट्रीय भाषा आठवडा
राष्ट्रभाषा सप्ताह किंवा हिंदी सप्ताह हा हिंदी दिनापासून एका आठवड्यासाठी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या आठवड्यात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा कार्यक्रम शाळा आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. हिंदी भाषेचा विकास केवळ लोकांमध्ये मर्यादित न ठेवता विकासाची भावना वाढविणे हे त्याचे मूळ उद्दीष्ट आहे. या सात दिवसांत हिंदी भाषेच्या विकासाबद्दल आणि निबंध लेखनाद्वारे त्याचा उपयोग न करण्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बद्दल लोकांना स्पष्ट केले आहे.
हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी हिंदी भाषेत कविता, निबंध लेखन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या मातृभाषाबद्दल जागरूक करणे होय.
हिंदी दिवस इतिहास
हिंदी दिवसाचा इतिहास खूप जुना आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या दिवशी हिंदी भाषेला राजभाषा बनविण्यात आले. परंतु बर्‍याच प्रकारच्या विरोधामुळे इंग्रजी ही एक भारतीय नसलेली भाषेला सुद्धा भारताची राजभाषा चं स्थान द्यावे लागले होते. याच कारणास्तव हिंदी भाषा विकसित करण्यासाठी आणि संपूर्ण देशातून इंग्रजी भाषा काढून टाकण्यासाठी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 सप्टेंबर रोजी हिंदी भाषेत अनेक निर्णय घेतल्यामुळे हा दिवस सर्वात चांगला दिवस मानला जात असे.
कारण
हिंदी दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना हिंदी भाषेबद्दल जागरूक करणे. कोणताही देश आपली मातृभाषा सोडून आपला विकास करु शकत नाही आणि अशा विकासाचे कोणतेही महत्त्व नाही. हिंदी दिवसाच्या माध्यमातून मुलांना शाळेत त्यांच्या मातृभाषाविषयी जागरूक होण्यासाठी आणि त्यांच्या भाषेचा प्रसार करण्यास शिकवले जाते.
मुख्य कारण
हिंदी भाषेचा विकास मुघल शासन काळातच होऊ शकला. यानंतर, जेव्हा इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली देशाला गुलाम केले, त्यानंतर त्या सर्व लोकांनी केवळ इंग्रजी भाषेचा विकास आणि हिंदी भाषेला हानी पोचवायला सुरुवात केली. यामुळे इंग्रजी भाषा आपल्या मातृभाषेत मिसळायला लागली. या कारणास्तव, देश ब्रिटीशांपासून स्वतंत्र होईपर्यंत हिंदी भाषेची अत्यंत वाईट परिस्थिती झाली होती. जगातील मातृभाषेच्या रुपात सर्वात जास्त बोलल्या जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा असूनही फारच कमी लोकांना हिंदी चांगल्या प्रकारे बोलता येते.
स्वातंत्र्यानंतर जेव्हा हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याची वेळ आली तेव्हा जाती-भाषेच्या राजकारणासाठी बर्‍याच लोकांनी त्याचा विरोध केला. यामुळे इंग्रजी (एक भारतीय नसलेली भाषा) भाषेला हिंदी भाषेसारखेच अधिकार देण्यात आले आणि तेही भारताची अधिकृत भाषा बनली. या भाषेचा प्रभाव टाळण्यासाठी हिंदी दिवस साजरा करणे सुरू केले. मातृभाषा हिंदीचे रक्षण आणि विकास करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

व्हर्गीज कुरियन- मृत्यूदिन

व्हर्गीज कुरियन
त्‍यांना दूध पिण्‍यास आवडत नव्‍हते मात्र त्‍यांनीच दूध क्षेत्रात क्रांती घडवून आणली. भारतातील ‘श्‍वेत क्रांती’, ‘धवल क्रांती’ म्हणजेच दूग्धक्रांतीचे जनक वर्गीज कुरियन यांचा आज जन्‍मदिन आहे. त्‍यानिमित्त जाणून घेवूया त्‍यांच्‍याविषयी काही खास गोष्‍टी.‘दुधाची टंचाई असलेला देश’ ही भारताची ओळख पुसून या देशात ‘दुधाचा महापूर’ आणणारे
डॉ. वर्गीज कुरियन (लेखनभेद : व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस); रोमन लिपी: Verghese Kurien) जन्म -(नोव्हेंबर २६, इ.स. १९२१; कोळ्हिकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत, मृत्यू - सप्टेंबर ९, इ.स. २०१२; नडियाद, गुजरात, भारत) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते.राष्ट्रीयत्व, नागरिकत्व - भारतीय
शिक्षण- बी.इ. (यंत्र अभियांत्रिकी), एम.एस्सी. (यंत्र अभियांत्रिकी)
प्रशिक्षणसंस्था - लायोला कॉलेज, चेन्नई,
मिशिगन राज्य विद्यापीठ
पेशा- अभियांत्रिकी, उद्योग (दुग्धप्रक्रिया)
पदवी हुद्दा - संस्थापक चेअरमन (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, आनंद)
धर्म - ख्रिस्ती
जोडीदार- मॉली
अपत्ये - निर्मला
 भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. ' ऑपरेशन फ्लड' सुरू करणार्‍या कुरियन यांनी अमूल डेरी उत्पादन घराघरात पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.आणि अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला.
शाम बेनेगल यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने मंथन हा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव केला.विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा बेनेगल यांच्यासह कुरियन यांनीही लिहिली होती, तर ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांची पटकथा होती. कुरियन यांच्या ‘आय टू हॅड अ ड्रीम’ या आत्मचरित्राचा सुजाता देशमुख यांनी ‘माझंही एक स्वप्न होतं’ या नावाने अनुवाद केला आहे.
जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये दुधाचा प्रमुख स्त्रोत हा गायीपासून येतो. भारतात मात्र परिस्थिती भिन्न आहे. आपल्याकडे म्हशीचे प्रमाण खूप आहे. यामुळे शिल्लक दुधापासून भुकटी तयार करणे शक्य होते. मात्र यासाठी लाभणारे तंत्र विकसित झाले नव्हते. इकडे न्यूझिलंड, हॉलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दुग्ध उत्पादनातील अग्रेसर देशांमधील शास्त्रज्ञांनीही म्हशीच्या दुधापासून भुकटी बनविणे अशक्य असल्याचे जाहीर केले होते. मात्र डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करून जगाला चकीत केले.
नियतीने एखाद्याच्या आयुष्यात घडवलेले चमत्कार हे एखाद्या राष्ट्राच्या भाग्याशी कसे निगडीत असतात हे डॉ. कुरियन यांच्या आयुष्यातील एका घटनेवरून दिसून येते. अत्यंत कुशाग्र बुध्दीच्या कुरियन यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते तेव्हा त्यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. याप्रसंगी झालेल्या मुलाखतीत एका परिक्षकाने त्यांना ‘पाश्‍चरीकरण म्हणजे काय?’ हा प्रश्‍नविचारला. यावर त्यांनी ‘ही प्रक्रिया म्हणजे दुधाचे निर्जंतुकीकरण करून त्याला दीर्घ काळापर्यंत टिकवणे’ असे अचूक उत्तर दिले. यामुळे कुरियन यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. मात्र त्यांना एक अट टाकण्यात आली. या अंतर्गत त्यांना मिशिगन विद्यापीठात दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनाचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत रूजू व्हावे लागेल. त्यांनी भारतात परतल्यावर शासकीय सेवा न केल्यास दंड म्हणून ३० हजार रूपयांची परतफेड करण्याची अटही शिष्यवृत्तीच्या करारनाम्यात टाकण्यात आली होती. अर्थात त्या काळात ही रक्कम खूप मोठी असल्याने अमेरिकेतून पदवी मिळाल्यानंतर २८ वर्षांचा हा युवक गुजरातमधील आणंद येथे येऊन पोहचला.
कुरियन येथे येण्याआधी दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात खूप काही घडामोडी घडल्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात दुग्ध व्यवसाय हा मुख्यत्वे व्यापारी आणि दलाल यांच्या हातात एकवटला होता. मुंबईसारख्या शहराच्या दुधाची गरज गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील दुध उत्पादक पुरवत होते. यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र या व्यवहारातील सर्व नफा हा ‘पोल्सन’ या खासगी कंपनीच्या घशात जात होता. पेस्टनजी एडुलजी हा पारशी व्यापारी यातून गबर झाला असला तरी गरीब दुध उत्पादकांच्या पदरात फार काही पडत नव्हते. यामुळे सरदार पटेल आणि मोरारजी देसाई यांच्या प्रेरणेने त्रिभुवनदास पटेल यांनी १९४६ साली आणंद येथे देशातील प्रथम सहकारी दुग्ध उत्पादन संस्था सुरू केली. तत्कालीन ब्रिटीश शासनाकडून या चळवळीला सहकार्य मिळाले नाही. इकडे पोल्सन कंपनीनेही आडमुठी भूमिका घेतली. यामुळे या कंपनीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी खेडा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी १५ दिवस आंदोलन करून अखेर ‘पोल्सन’ला नमती भूमिका घ्यावी लागली. शेतसारा प्रकरणी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या प्रकरणी आपल्यातील लढावू प्रवृत्ती दाखवून दिली. दरम्यान, स्वातंत्र्य मिळाले अन् याच कालखंडात डॉ. कुरियन हे आणंद येथे पोहचले. त्यांच्यातील चमक त्रिभुवनदास पटेल यांची तात्काळ जोखली. यामुळे सहकारी चळवळीचे नेतृत्व पटेल यांचे तर प्रशासकीय व्यवस्थापक कुरियन अशी अफलातून जोडी जमली. या जोडगोळीने खेडा जिल्हाच नव्हे तर देशाच्या दुग्ध उत्पादनाला एक नवीन दिशा दिली.
देशात श्वेतक्रांतीची सुरुवात
लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (NDDB) स्थापना केली व डॉ. कुरियन यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. देशाच्या कानाकोपर्‍यात हा कार्यक्रम राबवला गेला आणि श्वेतक्रांती झाली. या कार्यक्रमांतर्गत स्किम मिल्क, कंडेस्ड मिल्क गायीच्या दूधाऐवजी म्हैशीच्या दूधापासून बनवायला सुरूवात केली आणि दोन दशकातच डॉ. कुरियन आणि त्यांच्या टीमने भारताला दूध आयात करण्याच्या देशाच्या रांगेतून काढून दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची निर्यात करणार्‍या देशांच्या पंक्तीत नेवून ठेवले.
मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३),
पद्मश्री (इ.स. १९६५),
पद्मभूषण (इ.स. १९६६),
पद्मविभूषण (इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक



आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक 🤺

 जन्म : 7सप्टेंबर 1791 (भिवडी, पुरंदर, पुणे)
 फाशी : 3 फेब्रुवारी 1832 (पुणे)

            सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.
           सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.
          सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.
           ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
          सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.
            त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.
             रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.
             शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला.
           1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे.
          उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे, अशी त्याची इच्छा होती."
          आम्हाला मात्र त्याने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रज सरकारशी दिलेल्या दीर्घकालीन लढ्याची जाणीव नाही हे आपल्या देशाचे दुर्देव होय.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*🙏
स्त्रोत ~ 1857 आणि त्यापूर्वीचे
             महाराष्ट्रातील उठाव 
संकलनपर माहिती 

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

डॉ. जे. पी. नाईक जन्मदिवस


जयंत पांडुरंग नाईक (मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे) (सप्टेंबर ५, १९०७ - ऑगस्ट ३०, १९८१) हे भारतातील ग्रामीण शिक्षणप्रसारामधील मोलाच्या कामगिरीकरता नावाजले गेलेले शिक्षणतज्ज्ञ होते.कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी हे नाईकांचे मूळ गाव. विठ्ठल हरी घोटगे या मूळ नावानेच त्यांनी बी. ए. पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. पोलिसांकडून पकडले गेल्यानंतर आपल्या देशभक्तीचा कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नाव बदलले व `विठ्ठल हरी घोटगे' चे ते `जयंत पांडुरंग नाईक' झाले. पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.स्वातंत्र्यसैनिक म्हणून बेल्लारीच्या तुरुंगात सजा भोगत असताना जे.पी. नाईकांनी गंधकाची भुकटी व गोडेतेल यांच्या मिश्रणातून त्वचारोगावर परिणामकारक असा मलम तयार केला. तुरुंगातील कैद्यांच्या त्वचारोगावर हा मलम वापरला जाऊ लागला. परिणामी कैद्यांच्या त्वचारोगावरील उपायासाठी वापरल्या जाणार्या व्हॅसलिनपेक्षा हा मलम स्वस्त आणि उपायकारक ठरला. यामुळे व्हॅसलिनवरचा खर्च कमी करण्यात नाईक यशस्वी झाले. याचे बक्षीस म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेत सूट देऊ केली. पण शिक्षेत सूट देण्यापेक्षा बक्षीस म्हणून वाचायला वैद्यकशास्त्राची पुस्तके द्यावीत अशी मागणी नाईकांनी केली आणि त्यांची ही मागणी इंग्रज सरकारने पुरी केली.
जे.पी. नाईक यांनी तुरुंगातून सुटल्यावर धारवाड जिल्ह्यातील उप्पीनबेट्टीगेरी या छोट्याशा खेडेगावात आपले समाजकार्य सुरु केले. सुरुवातीला संपूर्ण गाव रोगमुक्त केल्यावर त्याच गावातील शिक्षित तरूणांच्या मदतीने त्यांनी गावात साक्षरता मोहीम राबविली. गावातील समूहशक्तीच्या श्रमदानातून गावाजवळची टेकडी फोडून गावासाठी सडक तयार केली. नाईकांमुळे मुंबईच्या गव्हर्नरांनी उत्कृष्ट गावासाठी पारितोषिक म्हणून ठेवलेली `ग्रामीण सुधारणा ढाल' उप्पीनबेट्टीगेरीसारख्या छोट्या गावाला मिळाली.नाईक यांनी महात्मा फुलेंची परंपरा पुढे चालवून वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी आयुष्य खर्च केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, मौनी विद्यापीठाचा ग्रामीण शिक्षणाचा प्रयोग, शिक्षण प्रशासन, अनौपचारिक शिक्षण, शैक्षणिक अर्थशास्त्र, शिक्षण संशोधन, आयसीएसएसआर, सामाजिक शास्त्रांचे संशोधन, अप्रगत व प्रगतीशील नवस्वतंत्र देशांच्या शैक्षणिक समस्या, आरोग्य, नगररचना इ. विविध समस्यांचे नाईक साहेबांनी चिंतन व लेखन केले. अनेक सरकारी अहवालांचे त्यांनी लिखाण केले. महात्मा फुले- महात्मा गांधी व मार्क्स यांच्या विचारांचा एकत्रित प्रभाव त्यांच्या शैक्षणिक चिंतनावर झालेला दिसून येतो. त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार 'भारतीय जनतेचे शिक्षण' (१९७८) व 'शिक्षण आयोग आणि तद्नंतर' (१९७९) या दोन पुस्तकांत प्रतिबिंबित झाले आहे.
१९७५-७७ या आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ४० शिक्षणतज्ज्ञांचा अभ्यासगट नेमला होता. जे. पी. नाईक यांनी 'भारतीय जनतेचे शिक्षण' हा ७५ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याला 'जेपीं'नी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. 'शिक्षण आयोग व तद्नंतर' हे नाईकसाहेबांचे मृत्युपूर्वीचे शेवटचे पुस्तक! या पुस्तकातील 'भविष्यासाठी धडे' हे प्रकरण नाईकसाहेबांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.जे. पी. नाईक यांना भारत सरकारने 1974 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
कार्याचा गौरव
डॉ. जे. पी. नाईक यांचे हे स्मारक विद्यार्थी, शिक्षक यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. डॉ. नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र शासनाने यापूर्वी टपाल तिकीट काढले होते. आता त्यांचे स्मारक उभारून शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

पितामह दादाभाई नौरोजी - जन्मदिवस

*भारतीय राजकारणातील*
             *भीष्माचार्य*
 *पितामह दादाभाई नौरोजी*      
                   *दोर्डी*

    *जन्म : ४ सप्टेंबर १८२५*
  (वर्सोवा, मुंबई, महाराष्ट्र, भारत)

       *मृत्यू : ३० जून १९१७*
        (महालक्ष्मी,मुंबई, भारत)

दादाभाई नौरोजी : ब्रिटनमधील
                           खासदार
कार्यकाळ : १८९२ – १८९५
मागील : फ्रेडरिक थॉमस पेंटोन
पुढील : विल्यम फ्रेडरिक बार्टन
             मस्से-मेंवरिंग

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय
                      काँग्रेस
आई : माणकबाई नौरोजी दोर्डी
वडील : नौरोजी पालनजी दोर्डी
पत्नी : गुलबाई
निवास : लंडन युनायटेड किंग्डम
व्यवसाय : बॅरिस्टर
धर्म : पारशी

हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.

दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.

मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.

➡ *रस्ता*

मुंबईच्या गिरगांव भागात जेथे दादाभाई रहात होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. याच रस्त्यावर स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीची कमळाबाईंची शाळा आहे.

💁‍♂ *जीवन प्रवास*

१८४५ - स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग. १८८५ - भारतीय राष्ट्रीय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य. १८८६, १८९३व १९०६ - भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद. ज्ञान प्रसारक मंडळींची स्थापना,बॉम्बे असोसिएशन ची स्थापना, लंडन इंडियन असोशिएशन , आणि ईस्ट इंडिया असोशिएशन ची स्थापना.

💎 *बाह्य दुवे*

"डॉ. दादाभाई नौरोजी, 'द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया', वोहुमन.ऑर्ग - दादाभाई नौरोजींचा समग्र जीवनपट" (इंग्रजी मजकूर).

📚 *दादाभाई नौरोजींवरील पुस्तके*

दादाभाई नौरोजी (चरित्र, गंगाधर गाडगीळ)
दादाभाई नौरोजी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य (व्यक्तिचित्रण, निंबाजीराव पवार)
नवरोजी ते नेहरू (गोविंद तळवलकर)
भारताचा स्वातंत्र्य संघर्ष (बिपीनचंद्र)

              🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *स्वातंत्र्य बलिवेदीवर हौतात्म्य पत्करलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*🙏
 ♾♾♾
स्त्रोत ~ महान भारतीय क्रांतिकारक - सां. ब. झांबरे
संकलन 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

नानासाहेब पेशवे Nana saheb Peshva


नानासाहेब पेशवे 🏇
जन्म : १९ मे १८२४ (बिथूर)
मृत्यू : सप्टेंबर १८५९
वडील : नारायण भट्ट
माता : गंगाबाई
तिरोहित (गायब) : १८५७ (कावनपूर)
राष्ट्रीयत्व : भारतीय
शीर्षक : पेशवे
पूर्वज : बाजीराव दुसरा
धर्म : हिंदु
दत्तक : बाजीरावाने १८२७ मध्ये नाना साहिब यांना दत्तक घेतले.

सन १७५७ पासून १८५७ च्या शंभर वर्षाच्या कालावधीत ईस्ट इंडिया कंपनीने जवळजवळ सारा भारत पादाक्रांत केला होता. त्या १०० वर्षांच्या पूर्वीच्या काळात हिंदुस्थान सा-या जगात सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध होता. पण १७५७ पासून ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारापेक्षा या देशाचे निरनिराळे प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा उद्योग आरंभला आणि या देशातील राजे रजवाडे आपल्या अंकित करण्याचे प्रयत्न आपल्या कपटीतीने सुरु केले. राजे रजवाड्यांबरोबरच नवीन कायदे करुन गुंडगिरीने सा-या जनतेला पिळून काढून हा देश ' कंगाल भूमी ' बनवून टाकला. "हम करे सो कायदा" या न्यायाने या देशात आपली दहशत बसवली. कोटयावधी लोक गरीबीच्या खाईत पडले. दुष्काळामागून दुष्काळ या देशात पडू लागले. त्यात अन्नाअभावी सुमारे ५० लाख लोक मरण पावले. पण कंपनी सरकारला त्याचे शुभाशुभच नव्हते. जनता त्रस्त झाली होती. सर्वांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष खदखदत होता. लोक उघड उघड म्हणू लागले की “ आता कंपनी सरकारची शंभर वर्षे भरली."
१८४८ साली डलहौसी हा गव्ह. जनरल भारतात आला. त्याने तर नीतिअनीतीचा, न्यायाचा विचार सोडून देऊन या देशातील अनेक राज्ये कसलेही कारण दाखवून दादागिरीने घशात घातली. मराठ्यांचे शेवटचे राज्य दुसरा बाजीराव या नादान पेशव्याकडून त्यांनी आधीच ताब्यात घेतले होते व त्याला सन १८१८ पासून महाराष्ट्रातून घालवून देऊन उत्तरेत गंगातीरी दरवर्षी आठ लाख रुपये पेन्शन देऊन ब्रम्हावर्त ( विठूर ) येथे स्थानिक केले होते. तेथे तो चैनविलासात जगत होता. त्याला पुत्रंतान नव्हते . म्हणून त्याने दत्तक घ्यावयाचे ठरविले. तो जेव्हा ब्रम्हावर्ताला आला, तेव्हा त्याच्याबरोबर अनेक ब्राम्हण कुटुंबे त्याच्या आश्रयाला आली. त्यांमध्ये माथेरान जवळच्या वेणुगावचे माधवराव भट यांचेही कुटुंब होते. त्यांचे बंधूही त्यांच्याबरोबर तेथे आले होते. माधवरावाच्या पत्नीचे नाव वेणूबाई तिच्या पोटी एक सुंदर पुत्ररत्न निपजले. त्याचे नाव त्यांना 'धोंडू' असे ठेवले. तो तीन साडेतीन वर्षांचा असतांनाच दुस-या बाजीरावच्या मनात भरला आणि त्याने ७ जून १८२७ रोजी धोंडूला दत्तक घेऊन त्याचे नाव 'नानासाहेब' असे ठेवले. त्यानंतर धोंडूचे दादासाहेब व बाळासाहेब हे दोन्ही बंधूही बाजीरावाने दत्तक घेतले. तिन्ही मुलाचे लालन - पालन दुस-या बाजीरावाच्या विठूर येथील महालात सुरू आले.
बाजीरावाचा एक भाचा चिमाजी अप्पा हा काशी येथे वास्तव्यास होता. त्याचे आकालीच निधन झाल्याने धर्मखात्यात असलेले मोरोपंत तांबे यांचा आधार तुटला व तेही आपल्या कुटूंबासह विठूर येथे दुस-या बाजीरावाच्या आश्रयास आले. त्यांची एक सुंदर कन्या होती. तिचे नाव ' मनकर्णिका उर्फ मनू.' ती सुंदर , गोरीपान , चपळ व बोलण्यात चालण्यात चुणचुणीत ठसकेबाज होती. नानासाहेबांपेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तिचा वापर बाजीरावाच्या कड्यात कायमचा असे. बाजीराव तिला 'छबेली' म्हणायचा.
नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब यांचे शिक्षण सुरु झाले. तेव्हा मनूही त्यांच्याबरोबर शिकू लागली. ती आठ वर्षाची झाल्यावर तिचे लग्न बाजीरावाने झांशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी लावून दिले. तिचे सासरचे नाव 'लक्ष्मी'.
महमंदअली व अजीमुल्लाखाँ तुर्कस्थान , क्रिमिया, इराण, अफगाणिस्तान , रशिया इ. देशांना भेटी देऊन क्रिमियातील युद्धाचे निरीक्षण करुन भारतात परतले. रशियाने त्या युद्धात इंग्रजांची कशी दाणादाण करुन टाकली हे त्यांनी पाहिले होते. न १८५६ मध्ये ते विठूरला परत आले. अजीमुल्लाखाँच्या यांच्या प्रयत्नांना यश आले नाही , म्हणून नानासाहेब निराश झाले. पण त्याच्या सल्ल्याप्रमाणे उठाव करायचे त्यांनी ठरविले. नानासाहेब, तात्या टोपे, अजीमुल्लाखाँ, बाळासाहेब तीर्थयात्रेचे निमित्त करुन इलाहाबाद , अयोध्या , दिल्ली , लखनौच्या यात्रेला जाऊन आले. या यात्रेत अनेक राजेरजवाड्यांना त्यांनी उठावासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार नानासाहेबांनी अनेक राजांना , जहागीरदारांना उठावासाठी गुप्तपणे पत्रे पाठविली आणि ३१ मे रविवार रोजी देशातील सारे इंग्रज ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेस जातील तेव्हा त्या सर्व इंग्रजांना कापून काढायची योजना ठरविली. त्याचप्रमाणे नानासाहेब व अजीमुल्लाखाँ यांनी साधूच्या व फकिरांच्या वेषात अनेक गुप्तहेर देशभरातील इंग्रजांच्या छावण्यांमधील देशी पलटणींना उठावासाठी प्रवृत्त करण्यास पाठविले. ते देशी शिपाई इंग्रज सरकारवर असंतुष्ट होतेच. त्यामुळे इंग्रजांच्या अनेक पलटणी उठावास सिद्ध झाल्या. एखादे मोठे संकट वा लढाईचे सैन्य आपल्या भागात येणार आहे असे कळताच एका गावातून दुस-या गावात चपात्या पाठविण्याची गुप्त यंत्रणा देशात चालू होती. त्याप्रमाणे प्रत्येक गावात चपात्या जाऊ लागल्या व ३१ मे रोजी सर्वांनी दक्ष रहावे, अशा सूचना सर्व गावात गेल्या. साधू व फकीर कमळे येऊन असाच संदेश देशी पलटणीत पोचवीत होते. ही प्रचारयंत्रणा एवढी गुप्त होती की, एकाही इंग्रजाला त्याचा सुगावा लागू शकला नाही. फक्त संशयावरुन काही साधूंना व फकिरांना इंग्रज अधिका-यांनी फाशी दिली.
इंग्रजांच्या पलटणींना देण्यात आलेल्या नव्या एन्फिल्ड रायफलींच्या काडतूसांचा कारखाना कलकत्याजवळ डमडम येथे कंपनी सरकारने सुरु केला होता. त्या कारखान्यातील एका मोची जातीच्या कर्मचा-याकडून बराकपूर छावणीतील मगल पांडे या ब्राम्हण शिपायाला समजले की , "सर्व शिपायांना गायीची व डुकरांची लावलेली काडतुसे दिली जाणार आहेत." हे समजताच मगल पांडेची खात्री झाली की , ' इंग्रज सरकार सर्व हिंदू व मुसलमान शिपायांचा धर्म बुडवायला निघाले आहे. त्यामुळे संतप्त होऊन बराकपूर छावणीतल्या गोन्या अधिका-यांवर हल्ला करुन त्यांना २९ मार्च १८५७ रोजी जखमी केले. त्या गुन्हयाबद्दल त्याला ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आले. ही बातमी वा-यासारखी सबंध हिंदुस्थानातील पलटणीत पसरली. आधीच कंपनी सरकार वर असंतुष्ट असलेले सारे हिंदु - मुस्लिम शिपाई संतप्त झाले व इंग्रजाविरुद्ध उठावास उद्युक्त झाले.
९ मे १८५७ रोजी मेरठ छावणीतील ८५ देशी शिपायांनी ती काडतुसे घेण्यास नकार दिल्याने त्या छावणीतील अधिका - यांनी त्यांना १०-१० वर्षांच्या शिक्षा देऊन तुरुंगात डांबले.
दुस-या बाजीरावाने सत्तरी ओलांडली. तेव्हा त्याला आपले आठ लाखांचे पेन्शन आपल्या निधनानंतर आपला मोठा दत्तकपुत्र नानासाहेब यास चालू राहावे, याची काळजी पडली म्हणून त्याने गव्ह. जनरलकडे तसा अर्ज केला. गव्ह जनरलकडून त्याला उत्तर मिळाले , “ ऐन वेळी त्या संबंधात योग्य निर्णय घेतला जाईल." दुसरा बाजीराव २८ जानेवारी १८५१ रोजी मरण पावला. त्यानंतर नानासाहेबाने गव्ह. जनरल डलहौसी यांचेकडे आपल्या पित्याचे पेन्शन आपणास कायम चालू राहण्यासाठी पत्रव्यवहार केला पण डलहौसीने पेन्शन फक्त तहहयातच असते, ते घेणा-याच्या निधनानंतर बंद होते, असे नानासाहेबाला कळविले. नानासाहेब त्यामुळे व्यथित झाला व त्याने आपला विश्वास सल्लागार अजीमुल्लाखाँ याला आपला वकील म्हणून या प्रकरणी दाद लावून घेण्यासाठी महंमद अली याच्यासह लंडनला पाठविले.
दुस-या बाजीरावाकडून इंग्रजांनी मराठा राज्य हिसकून घेतले व त्याला महाराष्ट्रातून हद्दपार केले , तरी ब्रम्हावर्ताला त्याचे व कानपूरच्या बड्या इंग्रज अधिका-याचे संबंध चांगले होते. ते बडे इंग्रज अधिकारी आपल्या कुटुंबासह विठूरला बाजीरावाकडे विश्रांतीला व मौज मजा करण्यासाठी येत असत. बाजीराव त्यांची चांगली बडदास्त ठेवीत असे. त्यांच्यासाठी मेजवान्या, उंची दारु , नाचरंग वगैरेची उत्तम सोय करीत असे. तीच प्रथा नानासाहेबानेही पुढे चालू ठेवली होती. कानपूर छावणीचा प्रमुख व्हीलर , कलेक्टर हिलर्डसन हे तर त्याचे दोस्तच होते. पण पेन्शन मिळविण्यासाठी त्याचा काही उपयोग नानासाहेबाला झाला नाही.
अजीमुल्लाखाँ हा इंग्लिश व फ्रेंच भाषेत प्रवीण होता. त्याला उर्दू , हिंदी व संस्कृत भाषांचे ज्ञान ही प्राप्त झालेले होते. कानपूरच्या इंग्रजी शाळेत त्याने अध्यापनाचे कार्य केलेले होते. तो बहुश्रुत होता. गोरापान व राजबिंडा होता. त्याला व महमद अलीला भरपूर पैसा देऊन नाना साहेबांनी इंग्लंडला आपले वकील म्हणून पाठविले. लंडनला त्याने आपल्या व्यक्तिमत्वाची छाप कंपनीच्या डायरेक्टरांवर आणि पार्लमेंटच्या सदस्यांवर पाडली. त्याने नानासाहेब पेशव्यांना पेन्शन मिळावे म्हणून अथक प्रयत्न २-३ वर्षे केले. पण कंपनीच्या डायरेक्टरांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की, "गव्ह. जनरलचा निर्णय योग्यच आहे, आम्ही तो बदलू इच्छित नाही." ते ऐकल्यावर तो निराश होणे साहजिकच होते. पण त्याने आपले प्रयत्न सोडले नाही. लंडनला गेल्या चौदा वर्षांपासून रंगो बापूजी साता-याचे राजे प्रतापसिंह भोसले यांना त्यांचे राज्य परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता पण कंपनीच्या डायरेक्टरांनी त्यालाही असेच उत्तर दिले. त्याची गाठ लंडन येथे अजीमुल्लाखाँशी पडली. दोघांनी विचार - विनिमय करून भारतात गेल्यावर इंग्रजाविरुद्ध उठाव करण्याचे ठरविले. अजीमुल्लाखाँने नानासाहेबांच्या साह्याने उत्तर भारतात तसा प्रचार करायचा व रंगोबापूजीने दक्षिणेतील राजेरजवाड्यात तसा प्रचार करायचा , असे ठरल्यावर १८५४ साली रंगो बापूजी भारतात परतला. मेरठच्या सर्व शिपायांनी १० मे रोजी बंड पुकारले. तेथल्या अनेक इंग्रजांना ठार केले व तुरुंग फोडून त्या ८५ शिपायांना मुक्त केले. ते सारे शिपाई रातोरात दिल्लीला पोचले व त्यांनी बहादुरशाह जफर या शेवटच्या मोगल बादशहाला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून जाहीर केले. त्यांना दिल्लीमधील देशी पलटणीतले सारे शिपाई येऊन मिळाले व त्या सर्वांनी मिळून दिल्लीतील इंग्रजांना कापून काढून दिल्ली स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. उठाव निश्चित तारखे आधीच सुरु झाल्याने उठावासाठी तयार झालेले सगळेच राजे रजवाडे गोंधळात पडले. नानासाहेब पेशवे व अजीमुल्लाखाँ सुद्धा गोंधळले. पण त्यांनी कानपूर छावणीतील इंग्रज अधिका-यांशी पूर्वीसारखीच सलोख्याची वागणूक सुरु ठेवली.
मेरठ व दिल्ली येथल्या उठावाच्या बातम्या कानपूरचा सेनाप्रमुख व्हीलर आणि कलेक्टर हिलर्डसन यांना समजल्या. तेथल्या छावणीमधील शिपायांत असंतोष वाढू लागल्याची लक्षणे त्यांना दिसू लागली. कानपूर मध्ये फक्त २५० गोरे शिपाई होते आणि इतर पुरुष व बायकामुले ७५० होती. पलटणीत ३००० देशी शिपाई होते. त्यामुळे व्हीलर व हिलर्डसन यांना कानपूरच्या आपल्या मोठ्या खजिन्याची व शस्त्रागाराची चिंता पडली. त्यांनी आपला मित्र नानासाहेब याला त्याचे सैनिक व तोफा घेऊन कानपूरला बोलावले आणि कानपूर मधील नबाबगंज येथील आपल्या खजिन्याच्या व शस्त्रागाराच्या संरक्षणाचे काम नानासाहेबाकडे सोपविले. त्याच्या बरोबर अजीमुल्लाखाँ व तात्या टोपे हे सुध्दा कानपूर येथे आले होते.
कानपूर पलटणींचा सुभेदार टीकासिंह याने नानासाहेबांची भेट घेतली व उठावासंबधी चर्चा केली. एके दिवशी सायंकाळी नानासाहेब, अजीमुल्लाखाँ, टिकासिंह व शमसुद्दीन हे गंगेकाठी येऊन जलविहार करण्याच्या निमित्ताने नावेतून गंगेत गेले. तेथे त्यांनी उठावाची बोलणी केली. उठाव कसा करायचा हे ठरले आणि ते परतले.
ठरल्याप्रमाणे ५ जून १८५७ रोजी कानपूरच्या शिपायांनी टीकासिंह याच्या नेतृत्वाखाली उठाव केला. नाना साहेबांनीही आपल्या ३०० सैनिकांच्या मदतीने कानपूरचा खजिना व शस्त्रागार व दारुगोळ्याचे भांडार आपल्या ताब्यात घेतले आणि इंग्रजांविरुद्ध युध्द पुकारले. व्हीलरने अवघ्या २५० सैनिकांसह आपली बाजू १६-१७ दिवस लढविली. पण सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने त्यांचा अन्नपाण्याचा साठा संपला. या युद्धात अनेक इंग्रज स्त्री - पुरुष ठार झाले. कलेक्टर हिलर्डसन व त्याची बायको एका तोफगोळयाने ठार झाली. अखेर व्हीलरने शरणागतीचा पांढरा झेंडा फडकविला व यद्ध थांबले. डलहौसीच्या विचाराशी सहमत नसलेल्या सर्व इंग्रजांना नावांमधून इलाहाबाद येथे पाठवून देण्याचे आश्वासन नानासाहेबांनी व्हीलरला दिले. त्यांच्यासाठी सती चौरा घाटावर ५० नौका आणल्या.
२३ मे रोजी इलाहाबाद व बनारस येथील देशी पलटणींनी उठाव केला होता. तेथे हॕवलाॕक व नील या सेनाधिका-यांनी तो उठाव अत्यंत क्रुरतेने दडपून टाकला. एकट्या इलाहाबादमध्ये ६ हजार लोकांना त्यांनी मारून टाकले. इलाहाबादमधील प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीवर २-३ प्रेते लटकत होती. कानपूरच्या उठावाची बातमी ऐकताच ते सैन्यासह कानपूरकडे निघाले. त्या उठावातून सुटलेले सैनिक कानपुरकडे निघाले होते. तेथले हत्याकांड पाहून ते इंग्रजांवर भयंकर चिडलेले होते. तात्या टोपेने ४० नावांत सती चौरा घाटावर कानपूरच्या इंग्रज स्त्री पुरुषांना बसवून नावाड्याना नावा चालविण्याचा इशारा केला. त्याच वेळी इलाहाबादकडून ते इंग्रजांवर संतापलेले सनिक तेथे पोचले. त्यांनी नावांवर बंदुका रोखलेल्या पाहून त्या सर्व नावाड्यांनी नावांवरुन गंगेत उड्या मारल्या व ते काठावर येऊ लागले. त्या नांवातील इंग्रजांनी त्या नावाड्यांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. ते पाहताच त्या इलाहाबादच्या सैनिकांनी त्या नावावर आपल्या बंदुकांतून गोळ्यांचा भडिमार केला. कित्येक इंग्रज स्त्री - पुरुष व मुले मरण पावली. ही बातमी कळताच नानासाहेबांना 'स्त्रियांना व मुलांना मारु नका' असा निरोप घाटावर पाठविला तेव्हा ते हत्याकांड थांबले. त्या नावापैकी एका नावेतून ४ इंग्रज पुरुष पुढे निघून गेले. त्यांनाही गंगेकाठच्या गावातील लोकांनी आपल्या गावठी गोळ्या झाडून जखमी केले. अखेर दुर्विजयसिंह नावाच्या राजनिष्ठ जहागीरदाराने त्यांना आश्रय दिला व त्यांच्यावर उपचार केले. ते बरे झाल्यावर त्यांना अलाहाबादेस पाठवून दिले.
बाकीच्या नावांत १२५ इंग्रज बायका - मुले उरली होती, त्यांना उतरुन घेऊन नानासाहेबाने 'बिबिघर ' नावाच्या कानपूरच्या कोठीत ठेवले. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली. त्या स्त्रियांपैकी काहींना दररोज दळण्याचे काम थोडा वेळ दिले जाई. नानासाहेब व त्यांचे सहकारी विजयोत्सवात दंग झाले. कानपूरहून निघून विठूरला आले. तेथे नानासाहेबांचा राज्यभिषेक झाला. सर्वच आनंदीआनंदाचे वातावरण होते.
कानपूरच्या बिबिघर कोठीवर बेगम साहिबा ही एक ताकदवान व खंबीर पठाण स्त्री रखवालीसाठी नेमलेली होती. काही इंग्रजस्त्रियांनी एका भंगिणीला वश करुन घेऊन एक चिट्ठी इलाहाबादच्या इंग्रज
अधिका-यांकडे पाठविण्यासाठी तयार केली. ते बेगम साहिबा या रखवालदारीणीस समजले. तिने लगेच त्या भंगिणीस सुभेदार टीकासिंह यांच्यापुढे उभे केले व ती चिट्ठी भंगिणीकडून काढून घेतली. तीत लिहिले होते , ‘ शत्रूकडील लोक विजयोत्सव व नाचरंग यात दंग आहेत. तरी त्यांच्यावर चाल करुन येण्यास हीच वेळ योग्य आहे. तो मजकूर वाचून टीकासिंह भयंकर संतापला व त्याने 'बिबिघरातील सगळ्या बायकामुलांची कत्तल करुन टाका' असा हुकूम आपल्या शिपायांना दिला. ते शिपाई बिबिघराजवळ आले. पण त्यांना त्या इंग्रज मुलांना मारावे वाटेना. कारण ते भारतीय संस्कृतीत वाढलेले होते. ते शिपाई इंग्रज स्त्रियांना मारायला कचरत आहेत असे पाहून बेगमसाहिबाने गावातून पाच कसाई बोलावले व त्यांना त्या इंग्रज बायकामुलांची कत्तल करायला सांगितले. त्या कसायांनी सर्व बायकामुले मारुन टाकून त्यांची प्रेते जवळच्या विहिरीत टाकून दिली व ती विहीर मातीने बुजवून टाकली.
४० नावांवरील इंग्रजाची बिबिघरातील बायकालांची कत्तल नानासाहेबाने केली असा खोटा प्रचार इंग्रज इतिहासकारांनी केला. पण १८५९ साली इंग्रज सरकारने इग्रजांच्या या दोन्ही कत्तलींच्या चौकशीसाठी कर्नल विल्यमचे कमिशन नेमले. त्या कमिशनने शेकडो लोकांच्या जबान्या घेतल्या. त्यात एकानेही ' या हत्याकांडांना नानासाहेबांची संमती होती ' असे एकाही व्यक्तीने सांगितले नाही. तसे पुरावेही त्या कमिशनला मिळाले नाहीत. सर जॉन फाॕरेस्ट, मिचेल, कॕपबेल इ. ग्रंथकारांनी इंग्रज स्त्री - पुरुषांच्या व मुलांच्या कत्तलीशी नानासाहेबाचा मुळीच संबंध नव्हता. हे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.
कानपूर नानासाहेबाने जिंकले व तेथे हिलर्डसन आणि व्हीलर ठार झाले ही बातमी कळताच हॅवलॉक भयंकर संतापला. तो क्रुरकर्मा नील याच्यासह मोठे सैन्य घेऊन कानपूरवर चालून आला. नानासाहेबांना हेरांकरवी ते समजताच ते आपल्या सैन्यासह युद्धसज्ज झाले होतेच. कानपूरला तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात नानासाहेब , तात्या टोपे , बाळासाहेब, रावसाहेब, टिकासिंह, अजीमुल्लाखाँ, ज्वालाप्रसाद, शमसुद्दीन हे वीर तर लढलेच, त्याबरोबर नर्तकी अजीज़न ही सुद्धा पुरुषवेषात आपल्या पुरुषवेषी स्त्री सैन्यासह लढली. या युद्धात नानासाहेबाचा दारुण पराभव झाला व तो आपल्या माणसांसह विठूरला निघून गेला. अजीजन पकडली गेली व तिला इंग्रजांनी गोळ्या घालून ठार केले.
नानासाहेभ विठूरला आले. त्यांनी आपला कुटुंबकबिला व बरेचसे धन बरोबर घेतले व ते १८ जुलै रोजी रात्रीच्या वेळी नावेतून गंगापार झाले. त्याआधी त्यांनी आपली उरलेली तीस लाखांची संपत्ती आपल्या महालातल्या खोल विहिरीत टाकून दिली होती. कानपूरची व्यवस्था लावल्यावर हॕवलाॕक व नील यानी तेथील अपराध - निरपराध हजारो लोकांची कत्तल केली आणि ते विठूरला आले. त्यांनी तोफ डागून नानासाहेबाचा महाल, अन्य इमारती व सर्व मंदिरे जमीन दोस्त केली. महालातल्या विहिरीत नानासाहेबाचा मोठा खजिना आहे, हे समजल्यावर त्या विहिरीतले पाणी काही दिवसात उपसून काढून तो तीस लाखांचा खजिना हरतगत केला. त्यांनी विठूरलाही मोठा नरसंहार केला. मैना ही नानासाहेबांची मुलगी महालाच्या भग्नावशेषावर बसून रडत होती. तिलाही हॕवलाॕकने त्या भग्नावशेषासह जाळून टाकले. कानपूर व विठूर येथे त्यांनी प्रचंड लूटमार केली.
कानपूर इंग्रजांनी जिंकले व नानासाहेब गंगापार निघून गेले, हे कळताच तात्या टोपे २० हजार फौजेसह कानपूरवर चालून आला व त्याने कानपूर जिंकले पण ६ डिसेंबर रोजी हॅवलाकने पुन्हा कानपूरवर ताया मिळविला. नानासाहेब गंगापार होऊन रोहीलखंडात शिरले व अवधची बेगम हजरत महल हिच्या मदतीला गेले . बेगम हजरत महल, नानासाहेब , मौलवी अहमदशाह इ. नी लखनौच्या बचावासाठी इंग्रजांशी अनेक झुंजी दिल्या. पण १४ मार्च १८५८ रोजी इंग्रजांनी त्यांचा पूर्ण पाडाव केला. बेगम सर्वांसह लखनौमधून उतरेकडे निघाली. नानासाहेबाला पकडून देणा-यास कंपनी सरकारने एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. पण त्याच्या लोभात कोणीही पडले नाही. कोलिन कँप बेलला त्यांच्या पाठलागावर मोठे सैन्य घेऊन पाठविण्यात आले. बेगम हजरत महल, खान बहादुर खान, नानासाहेब, राजा बेनी माधोसह एकत्रितपणे नेपाळच्या सरहद्दीजवळील राप्ती नदीच्या तीरावर तळ ठोकून होते. तेथे त्यांची गाठ कोलिन कँपबेलच्या सैन्याशी पडली. तेथे त्यांच्यात निर्वाणीचे युद्ध झाले. आपली हार होत आहे , असे पाहून नानासाहेब , बेगम हजरत महल , बाळासाहेब नेपाळच्या हद्दीत शिरले. त्यांच्या बरोबर भले मोठे सैन्यही होते. तो प्रदेश मोठमोठ्या टेकड्यांनी व्यापलेला , नद्यानाल्यांचा व घनदाट जंगलाचा असल्याने कोलिन कँपबेल आपल्या सैन्यासह परत लखनौकडे निघाला.
सुमारे एक वर्षभर या क्रांतिकारकांचे त्या जंगलात पार हाल झाले. १ नोव्हेंबर रोजी व्हिक्टोरिया राणीने ईस्ट इंडिया कंपनीकडून हिंदुस्थानचा कारभार आपल्या पार्लमेंटच्या हाती घेतला व हिंदुस्थानातील क्रांतिकारकां साठी माफीचा जाहीरनामा त्याच दिवशी काढला. ती बातमी ऐकताच नेपाळमधील क्रांतिकारकांचे बहुतेक सैन्य नेपाळमधून आपापल्या गावी निघून गेले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी शरण यावे, म्हणून नेपाळचा राजा जंगबहादूर यांच्या मार्फत खूप प्रयत्न केले. पण त्यांनी इंग्रजांचा कावा ओळखला हो. त्यांनी बाणेदारपणे नकार दिला. मध्यंतरी तापाने आजारी पडून बाळासाहेब वारला. नानासाहेबालाही त्याच तापाने घेरले. त्यातच त्याचा अंत देवखरी या गावाजवळच्या ओढ्याच्या काठी ऑक्टोबर १८५९ मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे क्रियाकर्मांतर करण्यासाठी त्यांच्या दत्तक आईजवळ पैसा नव्हता. तिने आपले जडजवाहिर विकण्यासंबंधी सिद्धमानसिंहा मार्फत जंगबहाद्दुरास विनती केली. तो पैसा हाती येताच ५ नोव्हेंबर १८५९ रोजी नानासाहेबांचे अखेरचे क्रियाकर्मांतर नेपाळातच करण्यात आले. त्यानंतर राजा जंगबहादुराने त्याच्या उर्वरित कुटुंबाला व बेगम हजरत महल हिला तिच्या पुत्रासह काठमांडू येथे आश्रय दिला.
नानासाहेब तात्या टोपे, कुवरसिंह, मौलवी अहमदशाह व बेगम हजरत महल ही १८५७ च्या युद्धातील दिव्य रत्ने होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अखेरच्या काळात अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या. पण ते इंग्रजांना मुळीच शरण गेले नाहीत. त्यांनी पुढच्या ९०वर्षात भारतातील क्रांतिकारकांना स्फुर्ती दिली व १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य बलिवेदीवर हौतात्म्य पत्करलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

स्त्रोतपर माहिती 
संकलन

आगामी झालेले