नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

वटपौर्णिमा



हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री,नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.
पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.पूजन विधी:-प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. हे मंत्र म्हणावे- ” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.या प्रकारे प्रार्थना करावी - `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
पारंपरिक कथा --
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदालासत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.
वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला पूजण्याचा संपूर्ण स्त्री जातीच्या सन्मानाचा सण. वटपौर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्व आहे. वड हा आपल्या सावलीत आंपल्या सानिध्यात अनेक जिवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो. म्हणून वडाची पूजा करण्यामागे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ची जाणीव पेरणे हा ही एक उद्देश आहेच. वडाच्या पारंब्या सारख्याच जन्मोजन्मीच्या गाठी ह्या बांधलेल्या असतात.
वटपौर्णिमा उपवास हा काय असतो? (What is Vatpoornima fasting?)
हिंदू धर्मात म्हणजेच हिंदू पौराणिक कथानुसार असे मानले जाते कि वटवृक्ष म्हणजेच “त्रिमूर्ती” होय, तर त्रिमूर्ती म्हणजे काय? तर भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान सिव यांचे प्रतिक आहे. असे म्हटले जाते कि ब्रह्मा या झाडाच्या मुलाशी वास करतात, मध्य भागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करत असतात. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केल्यास भाविकांचे भले होते.
खर तर या व्रताचे महत्व व वैभव कित्येक शास्त्रात आणि पुराणातही याचा उल्लेख केला गेला आहे. जसे कि स्कंद पुराना, भव्य पुराना, महाभारत यांच्यात याचा संपूर्ण पणे उल्लेख हा आपल्याला पाहण्यास मिळेल.
वटपौर्णिमा वर्त आणि पूजा हिंदू विवाहित महिलांनी केल्या आहेत जेणेकरून त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होवो आणि सुख व समृद्धी प्राप्त होवो.
वटपौर्णिमा व्रत साजरा करणे हे विवाहित सरीने तिच्या पाटीवर भक्ती आणि सत्य प्रेमाचे प्रतिक व्यक्त करते.
वटपौर्णिमाच्या दिवशी उपवासाला काय खालले पाहिजे? (What should be eaten on the day of Vatpoornima?)
वटपौर्णिमा या दिवशी सर्व स्रिया या उपवास करत असतात, या चे कारण तर आपण पहिले परंतू या दिवशी उपवासाला काय खावे हे बहुतेक कमी लोकांना माहित असेल या दिवशी फक्त स्रिया फक्त फळांचे सेवन हे करत असतात. फळा व्यतिरिक्त काहीच ग्रहण करीत नाही. तसेच गायीचे दूध, दही, तूप, मुळा, आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्री आणि केळी इत्यादी पदार्थ व्रतच्या वेळी खाण्यासाठी उपयुक्त आहे.

केळी :- केळी या दिवशी जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते कारण केळी हि आपण दुधात केळीचे छोटे छोटे पीस बनवून, दुधात थोडी साखर टाकून आणि त्यात केळीचे छोटे पीस करून त्याला थोडा वेळ उकळून तुम्ही केळी आणि दुध खाऊ शकतात.

आंबा :- तुम्हाला तर माहितीच असेल कि जेष्ठ महिन्यात आंबा यांचा सीजन असतो. त्यामुळे आपण आंब्याचे रस करून किंवा आंबा कापून हि खाऊ शकतो.

वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नये. (These things should not be done on the day of Vatpoornime)
अनेकदा पाणी हि पेऊ नये.
क्षार, लवण, मध आणि मांस यांचे सेवन करू नये.
आपल्या शरिराला आणि मस्तकाला तेल लाऊ नये.
विडा खाऊ नये.
अंगाला उटी लाऊ नये.
ज्याप्रमाणे ज्या गोष्टींच्या योगाने शारीरिक सामर्थ्य किंवा मनोविकार बळावतील अशा गोष्टी करू नये.
या दिवशी राग, लोभ, मोह अणि आळस या गोष्टी करू नये.
धूम्रपान, चोरी करणे आणि दिवसा झोपणे या गोष्टी करू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले