नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, २७ जून, २०२०

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा


 Field Marshal Sam Manekshaw: फिल्ड मार्शल सॅम माणेकशा हे नाव ठाऊक नसलेला क्वचित एखादा भारतीय असेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी माणेकशा यांना मिळाली. अर्थात त्यांच्या युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुणांमुळेच. कोणत्याही युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्या अनुषंगाने मुत्सद्देगिरीने श्रेष्ठ युद्धनीती आखणारा सेनापती युद्धातील विजयावर शिक्कामोर्तब करत असतो. ही बाब भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल. पाकिस्तानी लष्कराला १८ दिवसांत शरण आणणारे आणि भारतीय लष्कराचा मानबिंदू ठरलेले माणेकशा यांची आज जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊयात भारतीय लष्कारातील सर्वात लोकप्रिय अधिकारी ठरलेल्या माणेकशा यांच्याबद्दल…
३ एप्रिल १९१४ साली सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमधील एका पारशी कुंटुंबामध्ये झाला.
त्यांचे पूर्ण नाव सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा होते
भारतीय लष्करामध्ये फाइव्ह स्टारपर्यंतची बढती मिळून फिल्ड मार्शल झालेले ते पहिले अधिकारी ठरले
सॅम यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला विरोध केला. त्यावेळस सॅम यांनी मला लष्कारात जाऊ देत नसाल तर लंडनला पाठवा तिथे मी डॉक्टरीची पदवी घेऊन मोठा गायनोकोलॉजिस्ट होईल असे इच्छा वडिलांना बोलून दाखवली. मात्र वडिलांनी या गोष्टीलाही नकार दिला. त्यामुळे सॅम यांनी अखेर भारतीय लष्कराची प्रवेश परिक्षा दिली.
सॅम चाळीस वर्षे भारतीय लष्करात कार्यरत होते. आपल्या चाळीस वर्षाच्या लष्करी सेवेत त्यांनी पाच मोठ्या लढाया लढल्या. यामध्ये दुसरे महायुद्ध, १९४७चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९६२चे भारत-चीन युद्ध, १९६५चे भारत- पाकिस्तान युद्ध आणि १९७१चे बांगलादेश स्वतंत्र्य झाला ते भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा समावेश होतो. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशा यांना भारतीय लष्कर युद्धासाठी तयार आहे का असा प्रश्न विचारला असता, ‘मी कायमच तयार असतो स्वीटी’ (I am always ready sweetie)असे उत्तर दिले होते. ते स्वत: पारसी होते आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधीही पारसीच होते. त्यामुळे भावनिक जवळीक असल्याने ते प्रिय या शब्दाऐवजी स्वीटी हा पारसी शब्द वापरायचे.
युद्धभूमीवर लढताना अनेकदा सॅम हे थोडक्यात बचावले आहेत. १९४२ साली लष्करामध्ये कॅप्टन पदावर असताना ते जपानविरुद्ध बर्मा येथे लढाईमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना ९ गोळ्या लागल्याने ते युद्धभूमीवरच गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांचे सहकारी शिपाय शेर सिंग हे त्यांच्या मदतीला धावून गेल्याने त्यांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. त्यांची अनेक वाक्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकी भारतीय लष्करातील गुरखा बटालीयन आणि गुरखा समाजातील व्यक्तींच्या शौर्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेले दोन ओळीतील मत आजही गुरखा बटालीयन मोठ्या आदबीने वापरते. गुरखा लोकांबद्दल बोलताना एकदा सॅम म्हणाले होते, ‘जर एखादी व्यक्ती मरणाला घाबरत नाही असं म्हणतं असेल तर एकतर ती खोटं बोलतं असेल नाहीतर ती गुरखा असेल’
सॅम माणेकशा हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जात. असेच एकदा त्यांना फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला असता तर काय झाले असते? हा प्रश्न कोणीतरी विचारला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उत्तर दिले की, ‘तर सगळ्या लढाया पाकिस्तान जिंकले असले’
🏆१९७२ साली राष्ट्रपतींच्या आदेशानुसार त्यांच्या सेवाकाळात सहा महिन्यांनी वाढ करण्यात आली होती. केवळ राष्ट्रपतींचा आदेश असल्याने तब्बेत ठीक नसतानाही त्यांनी कोणताच आक्षेप न घेता ही मागणी मान्य केली. सॅम माणेकशा यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
👉'थिएटर कमांड'ची गरज सर्वप्रथम १९७१च्या लढाईनंतर भारताचे सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी व्यक्त केली होती. कारण, १९७१च्या लढाईनंतर त्यांना हे लक्षात आले होते की, जर सर्व एकत्रित असते तर झालेली लढाई अजून जास्त चांगल्या पद्धतीने लढता आली असती. युद्धाचे डावपेच सदैव बदलत असल्यानेच, युद्ध किंवा युद्धसदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. युद्धातील अशा बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच भारतात 'थिएटर कमांड' गरजेचे आहे. १९७१ मध्ये भूदल आणि वायुदल यांनी एकत्रित कारवाई केली, त्याचे मुख्य कारण होते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तुंग, भव्य व्यक्तिमत्त्व़!
तसेच ते अखिल भारतीय क्रीडांगण खेळ समितीचे अध्यक्षही होते . सर्व शिपाई त्यांना ‘सॅम बहाद्दूर’ या नावाने संबोधीत असत. यावरून त्यांची लोकप्रियता निदर्शनास येते.
🏠वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. सॅम यांच्या अत्यसंस्काराला कोणताही राजकीय नेता उपस्थित राहिला नाही किंवा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला नाही ही शोकांकिकाच म्हणावी लागेल.
एक गोष्ट.....
महागडा सौदा!

ब्रिटीशांच्या राजवटीतल्या भारतीय लष्करात एक गोरागोमटा-देखणा पारशी अधिकारी होता. स्वभावाने हूड असलेल्या या अधिकाऱ्याला मोटरसायकलचे प्रचंड वेड होते. त्याने १९४७ च्या काळात जेम्स मोटरसायकल १६०० रुपयांना विकत घेतली. मात्र या मोटरसायकलवर त्याच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा डोळा होता. बहुतेक वेळेस तोच ही मोटरसायकल चालवत असे.

भारत-पाकिस्तान अशी फाळणी निश्चित झाली आणि मेजर हुद्यावर असलेला तो कनिष्ठ अधिकारी पाकिस्तानात जाणार हे ठरले. फाळणीच्या जेमतेम दोन दिवस आधी तो मेजर या अधिकाऱ्याला म्हणाला; "सर तुम्हाला भारतात सगळे काही मिळेल; मला पाकिस्तानात काहीही मिळणार नाही, त्यामुळे तुमची बाईक मला विका ही विनंती!"
अधिकाऱ्यानेदेखील मोठ्या मनाने आपली लाडकी मोटरसायकल १००० रुपयात विकायचे मान्य केले!

आता माझ्याजवळ पैसे नाहीत, मी पाकिस्तानात गेलो की लगेच पाठवून देतो, असे सांगून मेजर गाडी घेऊन गेला. शब्दाला जागला तर तो पाकिस्तानी कसला? अर्थात, हे एक हजार रुपये कधीच मिळाले नाहीत.

पुढे नंतर १९७१ च्या युद्धात हे अधिकारी भारताचे नेतृत्व करत होते; तर तो मेजर पाकिस्तानचे. युद्ध संपल्यावर बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळी या अधिकाऱ्याने सांगितले; "पाकिस्तानच्या लष्कराला त्यांचा भूतकाळ खूप महागात पडला! मी तर माझ्या मोटरसायकलचे फक्त १००० रुपये मागितले होते, ते न मिळाल्याने  मी त्यांच्याकडून अर्धा पाकिस्तानच घेतला आणि माझ्या बाईकची किंमत वसूल केली!"

पैसे बुडवणारा मेजर होता याह्याखान.......
आणि तो शूर अधिकारी म्हणजे अन्य कोणी नसून;
"जर एखादा माणूस मृत्यूला घाबरत नाही असे म्हणाला; तर एक तर तो खोटं तरी बोलतोय किंवा तो गुरखा आहे!" असे म्हणणारे फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा अर्थात भारताचे लाडके सॅम बहादूर!

*फिल्ड मार्शल सॅम माणेकशा* यांचा आज (२७ जून २००८) स्मृतिदिन!
त्यांच्या स्मरणदिनी त्यांच्या स्मृतींना सादर वंदन.....!           🙏🇮🇳🙏 संकलित माहिती 

आगामी झालेले