आपले व्यवसायिक
परिसरातील व्यवसाय व कारागीरांची माहिती घेऊया
(१) शेतकरी -
--- शेतकरी ही शेती करणारी व्यक्ती असते. शेतकरी अनेक प्रकारची धान्ये पिकवतो.
भात, कापूस,भुईमूग ,ऊस व ताग ,भाजीपाला यांची लागवड करतो.
(२) कुंभार -
--- कुंभार ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर.
तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो.
--- सुतार लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर,
दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या
बांधकामासाठीही सुतारकाम करतात.दरवाजे, खिडक्या,
कपाटे, खुर्च्या वगैरे लाकडाच्या वस्तू तयार करतो.
(४) गवंडी --
--- गवंडी
घरासाठी विटांच्या भिंती रचतो. हातात थापी, ओळंबा आणि रंधा घेऊन गवंडी काम करतात. दरजा भरणे, गिलावा
करणे ही कामे गवंडी करतो.
--- शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. शिंपी निरनिराळ्या
तऱ्हेचे कपडे शिवतो. भारतातील शिंप्यांची उपकरणे म्हणजे कात्री, सुया आणि
गज. गजाने कापड मोजणे, दोरीने ग्राहकाची मापे घेणे, कात्रीने कपडा कापणे आणि सुई-दो-याने
शिवणे.
(६) शिक्षक --
--- शिक्षक विद्यार्थी घडवणे . मुलांना शिकवून त्यांना ज्ञान देतात . शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक . गुरु ,मास्तर ,गुरुजी ,बाई ,सर ,ताई आणि मॅडम असेही म्हणतात.
(७) डाॅक्टर –
--- वैद्य ह्या मराठी शब्दाचे इंग्रजी समानार्थी रूप डॉक्टर. वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे ज्ञान असून रोग्यांवर त्या
पद्धतीने औषधोपचार करणारा भिषग्वर.
डाॅक्टर आजारी लोकांना औषध देऊन बरे करतात.
--- बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे.
चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून
वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे,
कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.चांभार चामड्याच्या
बॅगा बनवतो.
(९) सोनार –
--- सोनार सोन्या -
चांदीचे निरनिराळे दागिने बनवतो. सोनार म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार हा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या
जाणार्या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. पारंपारिक व्यवसायात हातोडी,
एरण, पकड,फुंकणी, इ. हत्यारे वापरली जात असत.
(१०) बुरूड --
--- बुरूड समाजाचा बांबूच्या विणकामाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुबक कलाकुसर. टोपल्या, पंखे, सुपे, डोबूल, परड्या इतर वस्तू ह्या बुरूड समाजातील व्यक्ती सराईतपणे सुंदर विणतात, वस्तू तयार करतात.बुरूड बांबू , गवत यांच्या चट्या व
तट्टे तयार करतो.
--- विणकर (कोष्टी ) हातमाग व यंत्रमाग यांवर कापड
विणतो. धाग्यांपासून कापड बनविणाऱ्या
कारागिरास विणकर असे नामाभिधान आहे. हा व्यवसाय मूळ बारा बलुतेदारांपैकी एक आहे. सुत
कातणे हे काम स्त्रियांकडे तर वस्त्र विणणे हे पुरूषाचे काम होते.
--- लोहार कडी -कोयंडे, कोयते इत्यादी लोखंडाच्या वस्तू तयार
करतो. लोहार म्हणजे
लोखंडाच्या वस्तू
घडवणारे कारागीर होत. तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची/
बागकामाची अवजारे उदा. विळे, कोयते, खुरपी, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया,
भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे,बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव,पाण्याच्या
मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, घमेली, खिडक्यांचे गज इत्यादी लोखंडी वस्तू
बनवतात.
--- शिक्षक विद्यार्थी घडवणे . मुलांना शिकवून त्यांना ज्ञान देतात . शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक . गुरु ,मास्तर ,गुरुजी ,बाई ,सर ,ताई आणि मॅडम असेही म्हणतात.