पहिली ते पाचवी १००% विद्यार्थी मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम
शब्दांचा डोंगर Word Hill Marathi Mountain
उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे.
2) शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे.
3) शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे.
4) विशेषणांना योग्य वापर करता येणे.
5) निबंध लेखनाची पूर्वतयारी
6) कल्पना शक्तीला चालना
पान🍀
पान दे.
दादा पान दे.
दादा मला पान दे.
दादा मला हिरवे पान दे.
दादा मला हिरवे छोटे पान दे.
दादा मला हिरवे छोटे सुंदर पान दे.
दादा मला हिरवे छोटे सुंदर व गोल पान दे.
दादा मला ते हिरवे टोकदार पान पण दे.
पोळा
माझा पोळा
हा सण माझा पोळा.
हा सण बैलाचा माझा पोळा .
हा सण बैलाचा, कष्टकऱ्यांचा माझा पोळा.
हा सण बैलाचा कष्टकऱ्यांचा, दीन दुबळ्याचा माझा पोळा.
कावळा
हा कावळा.
हा काळा कावळा.
हा कावळा काळा आहे.
हा कावळा खूप काळा आहे.
कावळ्याचा रंग काळा कुळकुळीत आहे.
विमान ✈️
हे विमान आहे.
आकाशात हे विमान आहे.
आकाशात हे विमान उडत आहे.
आकाशात हे विमान उंच उडत आहे.
आज आकाशात हे विमान सतत उडत आहे.
फुल 🌼
गुलाबाचे फुल.
गुलाबाचे फुल आवडते.
मला गुलाबाचे फुल आवडते.
मला लाल गुलाबाचे फुल आवडते.
मला लाल गुलाबाचे फुल खूप आवडते.
मांजर🐇🐈
मांजर आहे.
घरात मांजर आहे.
घरात मांजर बसली आहे.
घरात मांजर दुध पीत बसली आहे.
आमच्या घरात मांजर दुध पीत बसली आहे.
ससा 🐰
हा ससा
हा ससा पहा.
हा पांढरा ससा पहा .
हा पांढरा ससा पहा.
हा काळा, पांढरा ससा पहा.
हा काळा, पांढरा मऊ ससा पहा.
बाहुला 🧍
हा बाहुला.
हा बाहुला आहे.
हा बाहुला छान आहे.
हा बाहुला छान नाचत आहे.
हा बाहुला छान नाचत गात आहे.
फुलपाखरू 🦋
फुलपाखरू पाहिले.
मी फुलपाखरू पाहिले.
मी सुंदर फुलपाखरू पाहिले.
मी सुंदर फुलपाखरू बागेत पाहिले.
मी सुंदर फुलपाखरू बागेत उडताना पाहिले.
नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
आगामी झालेले
-
अभ्यास....रजा नियम..... Leave Rules in Maharashtra (EL & CL) महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ दिनांक २८ जानेवारी २०२५ पर्यंत सुधारित ...
-
सात्विक प्रतिष्ठान आयोजित कोविड -19 (कोरोना) आजार जनजागृती करीता इयत्ता 1ली ते 8 वी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा *🔲 भव्य कोरोना ज...













1 टिप्पणी:
very nice
टिप्पणी पोस्ट करा