नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

अक्षय्य तृतीया Akshay Tritiya

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.
तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.
अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे.अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.पुराणकथेनुसार या दिवशी महाभारताचे युध्द संपुन महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची  रचना करण्यास आरंभ केला आणि लिहीण्याचे कार्य श्री गणेशाने केले असल्याचे नमुद आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीरास सांगितले की या दिवशी केलेल्या दानाचा कधीही क्षय होत नाही म्हणुन या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. परमेश्वराला आणि आपल्या पुर्वजांना स्मरण करून जे कार्य केले जाते ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी होते.
या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला.
या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.
या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो.
या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
हा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. या दिवशी केलेल देवपूजेमुळे घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात. माणसाच्या हातून रोज अनेक चुका होत असतात. शुभ कार्य घडले, परीक्षेत यश मिळाले, लग्न झाले, पैसा मिळाला, सफल समारंभ झाले, एखाद्याला आशीर्वाद दिला अशा घटना घडल्यावर आपली पूर्ण पुण्याई कमी होत असते.
जोर्पत पूर्वपुण्याई शिल्लक असते तोर्पत काही त्रास होत नाही, पण त्यानंतर त्रासाचे दिवस सुरू होतात. हाती घेतलेली कामे होत नाहीत. आरोग्य वारंवार बिघडू लागते. आर्थिक अडचणी सुरू होतात. निष्कारण गैरसमज निर्माण होतात. भांडणतंटे सुरू होतात. व्यसने जडतात, घरातील वातावरण बिघडते. यासाठी पुण्याईचा साठा वाढविणे ही काळाची गरज आहे. कुणाचे प्रारब्ध कसे असेल त्यानुसार पुण्य कमी जास्त होत असते. विनाशकाली विपरीत बुध्दी असं म्हणतात. आपला विनाशकाळ जवळ आला म्हणजे माणसाची बुध्दी बिघडते. हे कलियुग असल्याने कुणी कुणाचा मान ठेवत नाहीत. माणसाचा कल देवधर्माकडे नसतो. पुण्याई शिल्लक असेर्पत परिणाम दिसून येत नाहीत. नंतर मात्र दुष्कर्माचे चटके बसू लागतात.
पुण्याईचा साठा वाढणण्यासाठी अक्षय तृतीयेचे पूजन सांगितले आहे. शक्यतो कुलदेवतेची पूजा करावी. कुलदैवत माहिती नसल्यास कुठल्याही देवाची पूजा करून कुलदैवतौ नम: असे म्हणावे. या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. जलदान, वृक्षसंवर्धन आणि मुक्या प्राणंना जीवनदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात.अक्षय ततीयेला केलेली पूजा ही घराणतील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उध्दार करते. शक्य असेल तर या दिवशी पाणपोया सुरू कराव्यात. पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी. झाडे जगवा झाडे वाचवा हे तत्त्व धनात ठेवावे.
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. मातीत आळी घालणे व पेरणी : अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.
वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.
अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे?
या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.

२ टिप्पण्या:

लक्षवेधी म्हणाले...

छान लिहिलेत , अक्षय्य तूत्तीयेच्या आपणास ही शुभेच्छा 💐💐

Master म्हणाले...

धन्यवाद 🙏 लक्षवेधी कार श्री आलोरकर सर

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले