नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

छत्रपती शिवाजी महाराज Chattrapati Shivaji Maharaj

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ! सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
( खालील लिंक क्लिक करा आणि चाचणी सोडवा 👇👇 )

🚩 छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,🚩
🚩त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,🚩
🚩प :- परत न फिरणारे,🚩
🚩ति :- तिन्ही जगात जाणणारे,🚩
🚩शि :- शिस्तप्रिय,🚩
🚩वा :- वाणिज तेज,🚩
🚩जी :- जीजाऊचे पुत्र,🚩
🚩म :- महाराष्ट्राची शान,🚩
🚩हा :- हार न मानणारे,🚩
🚩रा :- राज्याचे हितचिंतक,🚩
🚩ज :- जनतेचा राजा.🚩
इयत्ता ४ थी मध्ये असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली. पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते . इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराज्यांच पराक्रम सांगत होतं .
          शौर्य , धैर्य , बुध्दिमत्ता , चातुर्य , लढाऊपणा , सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं. शिवरायांचे बालपण , शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो , रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा वाहयाचं होतं ते चित्र आठवतो. अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिँगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या . आगऱ्‍याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं . गड आला पण सिँह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या...
           त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले. बालपणाच्या आठवणीत घुसावसं वाटतं तेव्हा ते पुस्तक काढतो अन् पुन्हा वाचत बसतो. माझ्या सारख्याचं अनेक शिवभक्तांना शिवचरित्रावरील अभ्यासाची पहिल्यांदा गोडी लावली , ज्याने पहिल्यांदा महाराज , हिन्दवी स्वराज्य , त्यांचे ते मावळे , ते बाजी , ते तानाजी , त्यांचे विजयी अश्व , शिवराज्याभिषेक या साऱ्‍यांची पहिली ओळख ज्या पुस्तकाने करुन दिली ते इयत्ता चौथीचं पुस्तक आजही हातात घ्यावसं वाटतं , त्यापुस्तकाचा सुगंध घेतला की अंगावर शहारा येतो.
           आपल्या पैकी अनेक जण आज व्याख्याते झाले असाल , शिवचरित्रावर अनेक पुस्तके वाचली असाल , पण ते पुस्तक आठवते का ? इयत्ता चौथी इतिहास पुस्तकावर ठळक अक्षरात लिहिलेलं 'शिवछत्रपति' आठवतं का ? आजच्या तरुणपिढीला ते सुख मिळत असेल का ? पुस्तके वाचण्याआधी ज्याने माझ्या बालवयातच माझी आणि शिवछत्रपतिची भेट घालून दिली , फक्त माझीच नाही तर तुमच्यासारख्या शिवभक्तांना पहिल्यांदा राजे कळले ते याच इयत्ता चौथीच्या पुस्तकामुळे.!!
माझ्या सारख्या लाखोँ शिवभक्तांना शिवचरित्राकडे ओढणाऱ्‍या त्या इतिहासाच्या पुस्तकाचे ऋण मी कधीही विसरणार नाही..
लाज  वाटत  असल  तर  वाचु  नका .
अभीमान  वाटला  तर  शेयर  करा .

छत्रपती_शिवाजी_राजे_भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
🚺महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)
👪मुले - संभाजी, राजाराम,
👪मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराज चा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय-- काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.
इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.
शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.
📖📒📓📚📚शिवाजीमहाराजांविषयी पुस्तके
क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र (लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर). हे शिवाजीचे मराठीतले १९०६ साली लिहिलेले पहिले चरित्र.
असे होते शिवराय (सौरभ म. कर्डे)
ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
उद्योजक शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)
डच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
छत्रपती शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)
छत्रपती शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)
छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण (शिवप्रसाद मंत्री)
झुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)
डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार
श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)
मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - चिंतामण विनायक वैद्य
महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी (प्रा. डॉ. आनंद पाटील)
छत्रपती शिवाजी महाराज' प्रकाशन १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते   (पूर्वार्ध व उत्तरार्ध,पृष्ठसंख्या १२००) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)
श्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, (गजानन भास्कर मेहेंदळे)
राजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५)
शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख : (हिंदी अ्नुवादसुद्धा उपलब्ध)
शिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती (डॉ. राम फाटक)
शिवकालीन दंतकथा (सुरेंद्र साळोखे)
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ
शिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)
शिवछत्रपती समज-अपसमज (आनंद घोरपडे)
शिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)
शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)
शिवाजी - दी ग्रेट गोरिल्ला (R..D. Palsokar)
शिवाजी - ((सर यदुनाथ सरकार)
शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
शिवजयंती (नामदेवराव जाधव)
शिवराय (भाग १, २, ३, नामदेवराव जाधव)
शिवरायांची युद्धनीती (डाॅ. सच्चिदानंद शेवडे)
शिवाजीचे उर्दू भाषेतील संक्षिप्त चरित्र (लाला लजपत राय
शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)
शिवाजी निबंधावली खंड १ व २
शिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या दोन खंडांत श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.
पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेखही या ग्रंथात आहेत.
शिवाजीची कर्नाटक मोहीम (एम.एस. नरवणे)
शिवाजी जीवन आणि काळ (गजानन भास्कर मेहेंदळे)
Shivaji Maharaj (नामदेवराव जाधव)
शिवाजी महाराज & एम.बी.ए. (नामदेवराव जाधव)
Shivaji Maharaj the greatest (हेमंतराजे गायकवाड)
शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू (नामदेवराव जाधव, मराठी, हिंदी, इंग्रजी) + (व्याख्यानाची सीडी)
शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ ([[श्रीपाद दामोदर सातवळेकर)
शिवाजी महाराजांची डायरी (नामदेवराव जाधव)
शिवाजी महाराजांची पत्रे (नामदेवराव जाधव)
शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (नामदेवराव जाधव)

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदर्भ -अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते
||

प्रतिज्ञा कुणी लिहीली आहे माहीत नाही पण ज्याने कुणी लिहिली आहे त्याला मैत्रीपूर्ण जय शिवराय..!!

                      ।।  प्रतिज्ञा ।।
       शिवराय   माझे  दैवत आहे.  सारे  शिवप्रेमी  माझे  बांधव  आहेत.
       माझ्या  शिवरायांच्या  स्वराज्यावर माझे  प्रेम  आहे.
          माझ्या  देशातल्या  समृद्ध    आणि  विविधतेने  नटलेल्या  शिवशाहीचा  मला  अभिमान आहे.
         छत्रपती शिवाजी राजे यांची विचारधारना  प्रत्येक शिवप्रेमींच्या  अंगी  यावी आणि  संपूर्ण  भारतदेश  शिवधर्म  करण्यासाठी  मी   सदैव  प्रयत्न  करीन .
        मी माझ्या शिवरायांचा   आणि  तिरंगा ध्वजाचा  मान  ठेवीन. आणि  प्रत्येकाला  शिवरायांची  आणि  त्यांच्या स्वराज्याची विचाराची  ओढ  लागण्यासाठी  मी  सदैव  प्रयत्न करीन .
               माझे शिवराय आणि  माझे  शिवप्रेमी  यांच्याशी  निष्ठा  राखण्याची  मी  प्रतिज्ञा करीत  आहे.
       सर्व  शिवप्रेमींना आव्हान शिव कार्य  सतत  चालू  राहो  यातच  माझे  सौख्य  सामावले  आहे.
         🚩।। जय शिवराय ।।🚩
            🚩।। जय भारत ।। 🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🙏संकलित माहितीपर पोस्ट 

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

1maratha lakh maratha jay shivray jagdabh....

लक्षवेधी म्हणाले...

विनम्र अभिवादन 💐💐🙏 व शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा 💐🙏

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले