नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुढीपाडवा..... हिंदू नववर्ष दिवस Gudi Padwa

सण, उत्सव आणि व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते अन् त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते. सर्वांकडून सण, उत्सव आदींमागील शास्त्र लक्षात घेऊन ते श्रद्धापूर्वक साजरे केले जावोत आणि त्यायोगे जीवन कल्याणमय होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना करूया ! हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात ‘गुढीपाडवा’.
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !
१. तिथी: युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा
२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ?
याचा प्रथम उद्‍गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. आच सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का, याला शास्त्रीय आधार नाही.
याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व– वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व
१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस रामाने वालीचा वध या दिवशी केला. ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.
२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.




ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.
इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व
१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
२. १ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते.
गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्‍या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारी हा नव्हे, तर गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे.’
कडुलिंबाचं पान खायला देतात:
या दिवशी आई, आजी-आजोबा हे तुम्हाला कडुलिंबाची पानं खायला लावतात. त्या मागचं शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं, पवित्र्याचं, समृद्धीचं प्रतिक आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अ्भिष्टचिंतन ही केले जाते. ह्या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.
या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन सांगितले आहे.

🚩 गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या असतीलच पण खरंच आपल्याला हिंदू वर्षाबद्दल माहीत आहे का ? 🚩

🕉️हिंदू कालगणनेत दोन प्रमुख कॅलेंडर मानले जातात .
1) विक्रम संवत 2) शालिवाहन शक
विक्रम संवत इ स पूर्व 57 मध्ये सुरू झाले तर शालिवाहन शक इ स 78 मध्ये सुरू झाले. त्यापूर्वी शेकडो वर्षे हिंदू कालगणना होती मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे संवत असल्याने ते प्रचलित राहिले नाहीत.
यानुसार ग्रेगरियन (इंग्रजी) वर्ष यामधील फरक स्पष्ट दिसेल. विक्रम संवत ५७ वर्ष पुढे तर शालिवाहन शक ७८ वर्षे मागे दिसून येते.
दोन्ही ही कालगणना चंद्रानुसार होते. म्हणजे चांद्र वर्ष . चंद्रावरून कालगणना नेपाळ, थायलंड, चीन यासोबतच अनेक मुस्लिम देशात होते.

नेपाळमध्ये विक्रम संवत मानले जाते. आज नेपाळ व थायलंड मध्ये ही नवीन वर्ष साजरा केला जात आहे.
चंद्र वर्ष हा 354 दिवसांचा असतो. 12 महिने असतात व महिना 29.5 दिवसांचा असतो. चैत्र हा पहिला महिना तर फाल्गुन/ फागून हा शेवटचा महिना असतो .
काही देशात ( विशेषतः मुस्लिम कॅलेंडर ) मध्ये सौर वर्षाशी समन्वय साधला जात नाही.
मात्र हिंदू कॅलेंडर मध्ये सौर राशींशी याचा समन्वय साधला जातो व दर तीन वर्षांने हे जास्तीचे दिवस समायोजित करून एक अधिक महिना दिला जातो त्यामुळे मराठी महिना व ऋतू यांचे नाते टिकून राहते.
काही राज्यात नवीन महिना पौर्णिमे नंतरच्या प्रतिपदेला तर काही राज्यात अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला नवीन महिना सुरू झाल्याचे मानले जाते. त्यामुळे काही सणांमध्ये उत्तर भारतात 14/15 दिवसांचा फरक पडतो.
प्रत्येक महिन्यात दोन पक्ष ( 15 दिवसांचा पक्ष ) असतात . शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष . आमवास्येनंतर शुक्ल पक्ष सुरू होतो तर पौर्णिमेनंतर कृष्णपक्ष सुरू होतो. पक्षाच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.
प्रतिपदा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी व पौर्णिमा ह्या शुक्ल पक्षातील तिथी असतात . कृष्ण पक्षात फक्त 15 वी तिथी पौर्णिमे ऐवजी आमावस्या असते.
एखादी तिथी लिहताना महिना पक्ष व तिथी असे लिहितात उदा आज चैत्र शु"||1 किंवा चैत्र शु प्रतिपदा

भारतात ग्रेगोरीयन कॅलेंडर ने सर्व व्यवहार होत असले तरी बहुतेक सण हे चांद्र वर्षाने साजरे केले जातात. बौद्ध धर्माचा मोठा सण बुद्धपौर्णिमा हा सण वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो.
मुस्लिम वर्ष हे मुहम्मद पैगंबर यांनी केलेल्या मक्का ते मदिनाच्या स्थलांतर ( हिजरत) दिनापासून सुरू केले गेले ( इस 622) . मोहर्रम हा वर्षाचा पहिला महिना असतो.

तरीही भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत व वेगवेगळ्या दिवसांत नवीन वर्ष मानण्याची प्रथा आहे. उदा . गुजरात ,राजस्थान मध्ये दिवाळी नंतरच्या प्रतिपदेला नर्व वर्ष समजले जाते.
माहिती आवडल्यास नावासाहित किंवा नाव डिलिट करूनही शेअर करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले