मातृदिन (पिठोरी अमावस्या माहिती)
आई म्हणजे आई असते... जगभरात मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. मात्र भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा केला जातो. या दिवशी आईच्या ऋणाची जाणीव ठेवत तिच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये आईला विशेष आणि सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पुत्रवती आईने आपल्य मुलाचे आयुष्य वाढवण्यासाठीचा हा सण म्हणून मातृदिन असे म्हणू...
पुराणातील कथे नुसार, श्रीधर आणि सुमित्रा या दांम्पत्याच्या सुनेला झालेली मुलं जगत नसतं. एका श्रावण अमावस्यादिनीदेखील त्यांना झालेले मूल मरण पावले. घरात श्राद्ध पाहून सासूने सुनेला बाहेर काढले. मृत बालकासह सून अरण्यात गेली. तिथे तिची एका देवीशी गाठा पडली. त्या देवतेने तिला आश्रमात राहण्याचा सल्ला दिला. त्या रात्री 64 योगिनी येऊन 'कोणी अतिथी आहे का?' असा प्रश्न विचारतील त्यावेळेस त्यांना शरण जाऊन नमस्कार कर, तुझे दु;ख सांग असा सल्ला दिला. त्यानुसार सुनेने सारी कहाणी झाल्यानंतर तिची मुलं पुन्हा जीवंत झाली.
आजही भारतीय संस्कृतीमध्ये आई जी जन्माची शिदोरी, ती उरत ही नाही आणि पुरत ही नाही अशीच आहे. तिच्या ऋणांमधून कधीच उतराई होऊ शकत नाही म्हणून आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणार्या त्या माऊलीला आपल्या कृतीमधून कृतज्ञता, आदर व्यक्त करून तिचे आशिर्वाद घ्या.
मास अमावस्या या दिवशी दोन सण साजरा करण्यात येतात पाहिला म्हणजे या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला 'पिठोरी अमावस्या' म्हणतात.
वरीलप्रमाणे पूजा मांडून "अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र" यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण करतात.
पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, "आतीत कोण?" ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात.
स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.
ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते. प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंचीदेखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय. दुसरा सण बैल पोळा या विषयावर दुसर्या लेखात माहिती देतो..
श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जीला अपत्यसुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या त्याच्या देवता आहेत.
श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापाव्यात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करावी. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.
अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.
आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. आई ह्या दोन अक्षरी छोटयाशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य वं त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला ‘माऊली’ असे आदराने म्हणले जाते.
समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे मातृदिन साजरा झाला पाहिजे. जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलांची, घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे.
जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो तर आपल्याला जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, ओदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे.
ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते त्यांची पूजा आपली आई करते. तेपण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी. तर मग या दिवशी 'मातृदिन' का साजरा करत नाहीत?
🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा