101) 👑🎤*बोधकथा - धाडसामुळे यश*
एक लोककथा आहे. एक शेतकरीदादा शेतात नांगरणी करत होता. तेवढ्यात एक वाघ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. वाघाने शेतक-याला धमकावले की तुझा बैल मला खायला दे नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. शेतकरी भीतीने थरथरत वाघाला म्हणाला,''वाघोबा, तुम्ही इथेच थांबा, मी घरी जाऊन तुमच्यासाठी माझी गाय घेऊन येतो. कारण माझा बैल जर तुम्ही खाल्ला तर मी नांगरणी कशी करणार.'' असे सांगून शेतकरी घरी गेला व घरी जाऊन त्याने वाघाचे सर्व म्हणणे बायकोला सांगितले. बायको धाडसी होती. ती शेतक-याला म्हणाली,''वाघाला जाऊन सांगा की माझी बायको तुला खाण्यासाठी घोडा घेऊन येत आहे. गायीने तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा घोडा खा.'' शेतकरी शेतात गेला व वाघाला त्याने बायकोचा निरोप सांगितला. शेतक-याच्या बायकोने राक्षसासारखा पोशाख केला. तिने कमरेला तलवार लटकावली व घोड्यावरून दौडत दौडत, मोठमोठ्याने किंचाळत ती शेतात गेली. तेथे पोहोचताच ती शेतक-यावर ओरडली,'' तुम्ही तर चार चार वाघांना धरले आहे असे सांगत होतात आणि मला तर इथे एकच वाघ दिसतोय बाकीचे तिघे कुठे गेले. तरीपण हा वाघ पटकन धरा आपण घरी जाऊन यालाच शिजवून खाऊया.'' हे ऐकताक्षणी वाघाने तिथून सुंबाल्या केला. वाघ पळून जात असताना एका रानडुकराने हा प्रसंग पूर्ण पाहिला होता. त्याने पळणा-या वाघाला थांबवून सांगितले,'' तू तर वाघ आहेस आणि एका बाईला घाबरला. ती राक्षस नसून त्याच शेतक-याची बायको आहे. नीट बघ आणि थोडा प्रयत्न कर तुला बैल मिळालाच म्हणून समज.'' पण वाघ राक्षसरूपातल्या शेतक-याच्या बायकोला इतका घाबरला होता की त्याने परत जाण्यास नकार दिला पण त्याने रानडुकरालाच तिच्याकडे जाण्यास सांगितले. रानडुकर पुढे गेले आणि वाघ त्याच्या मागोमाग गेला. रानडुकराला आपल्या येताना पाहून बायको जोरात ओरडली,'' अरे रानडुकरा, तुला तर मी चार वाघ शेपटीला बांधून आणायला सांगितले होते आणि तू फक्त एकच आणलास. याने माझी भूक भागणार नाही. हा वाघ येथेच ठेवून जा आणि बाकीचे तीन घेऊन ये.'' आता रानडुकर आणि वाघ दोघेही घाबरले आणि जोरात पळाले. जंगलात पुढे जाताच वाघाने रानडुकराची शिकार केली व त्यातच रानडुकराचा मृत्यू झाला.
तात्पर्य – प्रतिकूल परिस्थितीमध्येही शांतपणे व धाडसीवृत्तीने वागल्यास हमखास यश मिळतेच.
एकदा एक प्रसिद्ध व्यापारी एका साधुकडे गेला. म्हणाला, "स्वामीजी ! मी माझी सारी संपत्ती घरच्यांच्या नावावर केली आहे. सध्या मी कोणताही धंदा करीत नाही, पैसे मिळवीत नाही. इतकं करूनही मला ईश्वराचं दर्शन होत नाही. असं का ? आपण तर म्हणता की, सर्वस्वाचा त्याग करणाऱ्याला ईश्वर दर्शन देतो. मग मला का नाही ?
साधू म्हणाला, "शेठजी, तेलाच्या एखाद्या भांड्यातून संपूर्ण तेल जरी ओतून टाकलं, तरी तळाला थोडंसं तेल चिटकून राहतंच. बराच काळपर्यंत ते भांडं स्वच्छ होत नाही. त्याला वास हा राहतोच. त्याचप्रमाणे सुखी-संसारी जीवनाच्या खुणा सहजासहजी पुसून जाणार नाहीत. तुम्ही सारी संपत्ती जरी देऊन टाकली असली, तरी तुमच्या मनात मूळ धरून असलेली जगाविषयी आसक्ती मात्र सहजासहजी जाणारी नाही."
*तात्पर्य :* अंत:करणाच्या शुद्धीशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. आसक्ती ही ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील अडसर आहे.
103) 👑🎤*बोधकथा - उपयुक्तता*
दोन मित्र होते. दोघांनाही झाडाफुलांची आवड होती. दोघांनीही एकाच गावात जमीन खरेदी केली. रस्त्याच्या या बाजूला गोविंदाची आणि दुस-या बाजूला गोपाळाची जागा होती. दोघांनी मिळून ठरवले की आपण या जागांमध्ये झाडे लावायची. आपल्या बागेची जगात तारीफ झाली पाहिजे. दोघांनीही जमिनीची मशागत केली आणि मग तिथे झाडे लावली. रस्त्याच्या डाव्या बाजूला गोविंद उद्यान आणि उजव्या बाजूला गोपाळ उद्यान उभे राहिले. गोविंदाने आपल्या जागेत फक्त सुरुची झाडे लावली. उंच-उंच हिरवेगार सरळसोट सुरु वृक्ष वाढले. आभाळाच्या निळाईशी जणू त्या झाडांची टोके खेळत होती. दूरवरून पाहिलं तर शे-पाचशे सुरुच्या झाडांचे उद्यान फारच सुंदर दिसत होतं. रांगेने लावलेल्या झाडांमधून गोविंदाने छोट्या वाटा तयार केल्या होत्या. गोविंद उद्यान बघायला येणारे लोक खुश होऊन जात असत. गोपाळनं आपल्या बागेत निरनिराळी फळझाडं, फुलझाडं लावली होती. चमेली, जास्वंद, मोगरा, गुलाब, झेंडू, तर वड पिंपळ, आंबा, चिंच, बोरं अशी विविध झाडेझुडपे त्यांने आपल्या बागेत लावली होती. त्या बागेतून जातानासुद्धा छान वाटायचे. फुलांचा मंद सुवास तेथे दरवळत असे. एकदा एक परदेशी प्रवाशांचा जथा दोन्ही बागा बघायला तेथे आला. त्यांनी पहिल्यांदा गोविंदउद्यानाला भेट दिली. बाग बघून ते खुश झाले. त्यांनी गोविंदाची स्तुती केली. पण दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला आणि सुरुच्या झाडाला न फळ न सावली त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ लागला. ते लगेच गोपाळउद्यानात गेले. आंब्याच्या, वडाच्या झाडाखाली त्यांनी विश्रांती घेतली. तिथल्याच काही फळांचा त्यांनी आस्वाद घेतला. चिंचा, आवळे, पेरू, कै-या त्यांनी खाल्या. जाताना त्यांनी अभिप्राय तेथील वहीत लिहून ठेवला. '' गोविंद उद्यान केवळ सुंदर आहे पण गोपाळउद्यान हे सुंदर तर आहेच पण उपयुक्तही आहे.''
तात्पर्य – निसर्गाने दिलेल्या शक्तिंचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करता आला पाहिजे. निसर्गाचे धन जर योजकतेने वापरले तर ते उपयुक्त ठरतं.
104) 👑🎤*बोधकथा - आत्मविश्वास*
सहकारी गृनिर्मान सोसायट्यांच्या कारभार म्हणजे एकप्रकारचा त्रासदायक प्रकार असतो. सहकार्य करायला कोणी तयार नसतात, पण प्रश्न विचारण्यासाठी अनेकजण तोंड उघडतात. अशाच एका सोसायटीत अप्पासाहेब कारभार पाहत होते. त्यांच्या कामकाजाला नवे ठेवलेले अनेकजण संस्था अडचणीत आल्यावर त्यांनाच सेक्रेटरीपद घेण्याची गळ घालत असत. एकदा संस्थेच्या जनरल सभेला चांडाळचौकडीने बहिष्कार घातला. पत्रकबाजी केली. मात्र, अप्पासाहेब डगमगले नाहीत. त्यांनी उपस्थित मोजक्या सभासद संख्येत सभा चालवली आणि त्या सभेतले नियम गोंधळी सभासदांना मान्य करायला भाग पाडले. त्यानंतर सोसायटीची निवडणूक आली. गोंधळी सभासदांनी त्यांचे पॅनेल तयार केले. इतर सभासदांच्या गाठीभेटी सुरू केल्या. अप्पासाहेब आणि त्यांचे समिती सभासद शांत होते. निवडणुकीदिवशी ते सर्वजण निशिचंतपणे मतदान कक्षात गेले. त्यांच्या निशिचंतपणाने सभासदांची मने जिंकली आणि विरोधक भुईसपाट झाले.
*तात्पर्य :* स्वतःकडे असणाऱ्या सामर्थ्याची आपणाला ओळख पटायला हवी.
105)👑🎤*बोधकथा - अमूल्य मार्गदर्शन*
थॉमस अल्वा एडिसन फोनोग्राम तयार करण्याच्या कामात अगदी गढून गेले होते. नव्या शोधामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. एडिसन यांच्यापुढेही अशा अडचणी आल्या पण ते मागे हटले नाहीत. एक दिवस त्यांच्यासमोरील तीव्र व हलका आवाज काढणा-या मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यांनी ही समस्या त्यांचे सहाय्यक जॉर्ज यांना समजावून सांगितली व ती दूर करण्यास सांगितली. जॉर्जने ती समस्या दूर करण्यासाठी दोन वर्ष प्रयत्न केले पण जॉर्जना काही ती समस्या दूर करणे जमले नाही. शेवटी जॉर्जचे धैर्य संपले व एक दिवस ते एडिसनकडे गेले व म्हणाले,''मिस्टर एडिसन, मी तुमचे हजारो डॉलर आणि माझ्या आयुष्याची दोन वर्षे निष्फळ घालविली आहेत. जर तुमच्या जागी जर दुसरा कोणी असता तर मी इतके दिवस वाट न पाहता काम सोडून निघून गेलो असतो पण आता माझे धैर्य संपले आहे मी राजीनामा देतो आहे तो तुम्ही स्वीकारा.'' असे म्हणत त्यांनी राजीनामा एडिसनकडे दिला. एडिसन यांनी तो राजीनामा तात्काळ फाडून टाकला व जॉर्जना ते म्हणाले,'' मी तुझा राजीनामा नामंजूर करतो कारण माझा विश्वास आहे की प्रत्येक समस्या ही आपल्याला ईश्वराने दिलेली असते, त्या समस्येचे समाधानही त्याच्याकडेच असते. आपण बरेचदा त्याच्यापर्यत पोहोचत नसू पण कुणी ना कुणी तिथपर्यत पोहोचलेले असते किंवा पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. तु काही दिवस विश्रांती घेऊन परत ये, पुन्हा परिश्रम कर. काय सांगावे या परिश्रमातूनच तुला नवीन शोध लागू शकेल.'' एडीसनचे हे बोलणे ऐकून जॉर्ज पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले.
तात्पर्य :- परिश्रमाने केलेले कोणतेही कार्य हे निश्चितच फळ मिळवून देते. मात्र परिश्रम न करता फळाची आशा धरणे किंवा कोणीतरी मदत करेल ह्या अपेक्षेत राहणे मूर्खपणाचे ठरते.
106) 👑🎤*बोधकथा - लोभ*
एकदा आपल्या तानाजीरावचे ५०० रु. हरवले. त्याने जाहिरात दिली की, जो कोणी हे ५०० रुपयांचे पाकीट आणून देईल. त्याला शंभर रुपयांचे बक्षीस दिले जाईल.' एका प्रामाणिक गृहस्थाला ते पाकीट सापडले होते. बक्षिसाच्या आशेने नव्हे, पण ज्याचे पैसे त्याला मिळावेत म्हणून त्याने ते पाकीट परत आणून दिले. तानाजीरावाचे मित्र म्हणाले, 'आता या गृहस्थांना १०० रुपये दे.' परंतु तानाजीला आता त्या १०० रुपयांचाही लोभ झाला होता. त्याने पाकिटातले पैसे मोजले व तो त्या गृहस्थाला म्हणाला, "यात शंभर रुपये कमी आहेत. ते मला द्या. नाहीतर तेच तुम्हाला बक्षीस घ्या." चोरीचा आळ आल्याने ते गृहस्थ संतापले. त्याने तानाजीवर खटला भरला. न्यायाधीशने त्याच्या प्रमाणिकपणावर विश्वास ठेवला. ते तानाजीला म्हणाले, "तुझ्या पाकिटात किती रुपये होते ?" तानाजी म्हणाला, "पाचशे." न्यायाधीशांनी विचारले, "यांनी दिलेल्या पाकिटात किती रुपये होते ?" तानाजी म्हणाला, "चारशे." यावर न्यायाधीश म्हणाले, "तर मग हे पाकीट तुझे नव्हे. त्यांना ते परत देऊन टाक."
*तात्पर्य :* त्यागावर प्रमाणिकपणावर जग विश्वास ठेवते. लोभापायी मात्र सर्वनाश होतो.
107)👑🎤 *बोधकथा - कायद्यापेक्षा माणूसकी श्रेष्ठ*
एकदा एका राजाला सत्ता हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले होते. एकेदिवशी त्याच्या राज्यातील एका विधवेचे पत्र त्याच्या हाती पडले. त्या पत्रात असे लिहीले होते की, तिच्या घरात राज्याचे तहसील थाटण्यात आले असून सरकारतर्फे तिला काहीही भाडे देण्यात आले नव्हते. तिची अशी विनंती होती की, राजाने या गोष्टीत स्वत: लक्ष घालून तिला त्या घराचे भाडे मिळवून द्यावे. यावर राजाने त्या पत्रावर लिहीले की हे कार्यालय जप्त करण्यात यावे. या आदेशानंतर महिलेने तहसीलवर दावा ठोकला पण तहसीलतर्फे दिल्या गेलेल्या भाडेकराराची मुदत संपली असल्याने ती महिला खटला हरली. कायद्यानुसार हे कार्यालय सरकारचेच होते. कार्यालय सुरु असतानाच्या काळात सरकारने भाडे दिले नाही व आता कराराची मुदत संपली असल्याने सरकार कोणतेही भाडे देण्यास नाकारीत होते. यामुळे महिलेचा हक्क संपुष्टात आला होता. महिलेने पुन्हा राजाकडे धाव घेतली. राजाने सर्व प्रकरणाची माहिती घेतली व आदेश दिला की, मानवनिर्मित कायद्यानुसार विधवेला कोणतीही आर्थिक मदत मिळू शकणार नाही मात्र ईश्वरनिर्मित कायद्यानुसार तिचे पालनपोषण करण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याने तिला योग्य ती धनराशी मिळण्यास कोणतीच हरकत नाही. सरकारने तिची आर्थिक जबाबदारी उचलण्याचे निर्देश राजाने दिले. विधवेला माणुसकीच्या दरबारात योग्य न्याय मिळाला.
तात्पर्य :- गरजु व्यक्तिंची मदत करताना सर्व कायद्यांपेक्षा श्रेष्ठ अशा माणुसकीचा विचार करावा.
108) 👑🎤*बोधकथा - देवपूजा*
नारदमुनी कृष्णाला भेटायला गेले. ते एकांतात देवपूजा करीत आहेत. नारद तिथे पोहोचले. पाहतात तर काय, अतिशय छोट्या खोलीत आसनावर कृष्ण पाठमोरे बसले होते. अंधुक प्रकाश होता आणि समोर नारदाचीच मूर्ती होती. नारद खुश झाले. बाहेर पडले, तर कृष्णाला भेटायला अर्जुन आलेला. ते म्हणाले, अरे अर्जुना, कृष्ण माझीच पूजा करीत आहे. अर्जुनाला अर्जुनाला आश्चर्य वाटले. तो आत गेला. पाहतो तर कृष्ण अर्जुनाची पूजा करीत होता. त्याने तसे बाहेर येऊन नारदाला सांगितले. तर त्यांना पटेना. ते पुन्हा आत गेले तर कृष्ण नारदाचीच पूजा करत होता. असे चार-पाच वेळा झाले. जो आत जाई, त्याचीच पूजा करताना कृष्ण दिसे. शेवटी त्यांनी पूजा संपवून बाहेर आलेल्या कृष्णाला विचारले, आपण कोणाची पूजा करीत होता ? कृष्णाने दोघांनाही आत नेले. तर समोरच्या भिंतीवर त्या दोघांच्याही प्रतिमा होत्या. त्यांनी जवळ जाऊन भिंतीला हात लावून पाहिले, तर तिथे आरसा लावलेला होता. त्या दोघांचा अहंकार गळून पडला. कृष्ण म्हणाला, मी आरशात पाहून स्वतःच्याच आत्मरूपांच ध्यान करतो. प्रत्येक ठिकाणी देव आहे, आत, बाहेर... सर्वत्र.
*तात्पर्य :* आत्म्याशी संवाद हीच देवपूजा.
109) 👑🎤*बोधकथा - विवेकानंदांची एकाग्रता*
स्वामी विवेकानंद जर्मनीला गेले होते. तेथे कील शहरात त्यांनी काही काळ व्यतीत केला. यादरम्यान कील विद्यापीठातील संस्कृत विभागाचे प्रमुख पॉल डायसन यांची विवेकानंदांशी भेट झाली. डॉयसनना स्वामीजींची विद्वत्ता माहिती होती. दोघांत बराच वेळ चर्चा झाली. यादरम्यान डॉयसन काही कामासाठी बाहेर निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत स्वामीजी एक पुस्तक वाचू लागले. डॉयसन परतले तरीही स्वामीजी पुस्तक वाचण्यात इतके गढून गेले होते की डॉयसन तेथे आल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही. काही वेळाने त्यांचे वाचन पूर्ण झाल्यावर स्वामीजींनी पुस्तक बाजूला ठेवले व डॉयसन यांना समोर बसलेले त्यांनी पाहिले. स्वामीजींनी अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली मात्र डॉयसन यांनी स्वामीजींच्या एकाग्रतेला व ज्ञान मिळविण्याच्या प्रयत्नांना नमस्कार केला.
तात्पर्य : ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्र होणे गरजेचे आहे.
110)👑🎤*बोधकथा - मन*
एकदा साधू प्रतापबुवा भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर थांबला. आतून सुमनबाई भिक्षा घेऊन आल्या. म्हणाल्या, "महाराज ! काही तरी उपदेश करा." प्रतापबुवा म्हणाले, "बाई गं ! आज नाही, उद्या उपदेश करेन." बुवांचे हे उत्तर ऐकून सुमनबाईंना राग आला. त्या म्हणाल्या, "तर मग, भिक्षाही उद्याच मिळेल." दुसरे दिवशी बुवा त्या घराकडे येण्यास निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात केरकचरा व खडे भरून घेतले. इकडे सुमनही साधुबुवांना देण्यासाठी चांगले पदार्थ घेऊन तयार होती. प्रतापबुवांनी घरासमोर येऊन हाक दिली. सुमन भिक्षा घेऊन आली. पाहते तर काय, तिला बुवांच्या भिक्षापात्रात कचरा दिसला. ती म्हणाली, "महाराज ! भिक्षापात्रात घाण वस्तू असता मी भिक्षा कशी टाकू ?
बुवा म्हणाले, "असू देत बाई ! तू आपली भिक्षा वाढ पाहू." सुमन म्हणाली, "अशा मलिन पात्रात मी अन्न वाढणार नाही." तिचे हे उत्तर ऐकताच बुवा म्हणाले, "बाई, भिक्षापात्र स्वच्छ केल्यावर तुम्ही भिक्षा देणार. हाच तुम्हाला उपदेश आहे. मनात दुःख, चिंता, मोह, मत्सर असा कचरा असताना मी तुम्हाला उपदेश करून काय उपयोग ? त्यासाठी अगोदर मन निर्मळ व्हायला हवे."
*तात्पर्य :* मन निर्मळ, तर जीवन निर्मळ.
111) 👑🎤*बोधकथा - परिश्रमानेच सुख*
एका राजाच्या दरबारात हि-यांचे तीन व्यापारी येऊन म्हणाले,''महाराज आम्ही आपल्या राज्यात मौल्यवान हिरे विकण्यासाठी घेऊन येत होतो. वाटेत डाकूंनी आम्हाला लुटले. आता तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे.'' राजाने त्या तिघांना प्रत्येकी एक पोते गहू दिले व राजा म्हणाला,'' हा गहू तुम्ही स्वत:च निवडून व दळून त्याचे पीठ करावे. त्या पीठापासून अन्न तयार करून तुम्ही स्वत: खावे किंवा गरजूला खाऊ घालावे. एक महिन्यानंतर मला येऊन भेटावे.'' तिघांपैकी दोघे हे जरा आळशीच होते. त्यांनी पोत्यातील थोडे गहू काढून घेतले. बाकीचे गहू त्यांनी विकून टाकण्यासाठी गिरणीवाल्याला दिले. तिसरा व्यापारी मात्र मेहनती होता. त्याने गव्हाचे पोते निवडण्यासाठी रिकामे केले असता पोत्याच्या शेवटी त्याला एक मौल्यवान हिरा सापडला. त्याने तो हिरा पैलू पाडण्यास दिला. एक महिन्यानंतर तिघेही राजाकडे गेले तेव्हा तिस-या व्याप-याने पैलू पाडलेला हिरा राजाला भेट म्हणून दिला. तेव्हा राजा म्हणाला की मित्रा, हा हिरा तुझा आहे. याला विकून जितके काही धन मिळेल त्यातून तुझा व्यापार तू सुरु कर आणि इतर दोघांच्याही पोत्यामध्ये असाच हिरा होता पण त्यांच्या आळशीपणामुळे त्यांनी तो गमावून बसले.'' दोन आळशी व्यापा-यांना स्वत:ची चूक कळून चुकली पण वेळ निघून गेलेली होती.
तात्पर्य : कठोर परिश्रम करणारेच यशस्वी होतात. यशस्वी लोकांनाच सुख लाभते.
112) 👑🎤*बोधकथा - दोष !*
आपल्या सहदेव महाराजांना अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर एक सिद्धी प्राप्त झाली होती. त्यांना प्राण्यांची, पक्ष्यांची भाषा समजत होती. त्यांच्यात चाललेला संवाद समजत होता. असेच एकदा दिवसभर भ्रमंती करून ते समुद्र काठावर येऊन बसले होते. सायंकाळची वेळ होती. सुर्यस्ताची वेळ जवळ येत होती. त्या कलत्या सुर्यबिंबावर नजर ठेवून ते ध्यानस्थ बसले होते. सूर्यबिंब क्षितिजाआड गेले आणि काही वेळातच पुळणीवर खेकडे दिसू लागले. त्यांच्यातील संवाद महाराजांच्या कानावर पडू लागले. एक खेकडी आपल्या मुलाला सांगत होती, 'बाळा, असं वाकड तिकडं चालू नये. सरळ चालावं. एखाद्या मोठया खेकड्याला तुझं अंग घासेल. असं चालणं वाईट असतं. नीट नाकासमोर चालावं.' हे ऐकून त्या खेकडीचे बाळ म्हणाले, 'आई ते सारं ठीक आहे गं. पण मला केवळ उपदेश करण्यापेक्षा तू आधी सरळ चाल ना ! म्हणजे मी तुझ्याप्रमाणे चालायला शिकेन. बघावं तेव्हा रस्त्यातून दिसेल त्या खेकड्याला धडक मारत चालत असतेस. तू अगोदर नीट नाकासमोर चाल ना !'
*तात्पर्य :* दुसऱ्याचे दोष सांगण्या अगोदर स्वतःतील दोष दूर करावेत.
113) 👑🎤 *बोधकथा - खरे बोलणे फायदेशीर*
आईवडीलांचे छत्र हरपलेला निखील नावाचा एक आठ वर्षाचा चुणचुणीत मुलगा होता. आईवडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेल्याने तो त्या साठ वर्षाच्या आजीसोबत राहत असे. एकेदिवशी बाजार करून परत येत असताना जंगलामध्ये तो दरोडेखोरांच्या तावडीत सापडला. एकाने दरोडेखोराने रागावून निखीलला विचारले,'' कोण रे तू? इकडे काय करतो आहेस? बघू तुझ्या पिशवीत काय काय आहे ते?'' हे ऐकून खरे तर दुसरा कोणी रडू लागला असता पण निखीलने मनात दाटलेली भिती चेह-यावर न दाखवता मोठ्या हिंमतीने त्या दरोडेखोराला म्हणाला,'' हे बघा माझ्या पिशवीत काय आहे हे न बघण्याचे मी तुम्हाला पन्नास रूपये देऊ शकतो. कारण माझ्याकडे आत्ता पन्नास रूपये आहेत आणि ते मी माझ्या आजीला चप्पल घेण्यासाठी राखून ठेवले आहेत. रानावनात, काट्याकुट्यात फिरताना माझ्या आजीला खूप कष्ट पडतात. ती बिचारी तिच्या या वयातही माझ्यासाठी कष्ट करत आहे. कष्टाने मिळवलेल्या पैशावर आम्ही दोघेही जगत आहोत. आजीने मला भरपूर कष्ट करण्याची व खरे बोलण्याची शिकवण दिली आहे. तुम्हाला जर हे कष्टाचे पैसे ठेवून घ्यायचे असतील तर अवश्य घ्या पण मी माझे खरे बोलणे सोडणार नाही.'' निखीलचे हे बोलणे ऐकून दरोडेखोर मनातून शरमले व त्यांनी त्याच्या बोलण्यातून एक धडा घेतला. दरोडे घालण्याचे काम त्यांनी सोडून दिले.
114) 👑🎤 * बोधकथा - सत्तेचा सुविनियोग*
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारीबाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता. पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू. पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,”भाऊ !! तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत.” कंडक्टर हसून म्हणाला,”महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?” पुजारीबाबा हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला,” महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.” एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली. पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,” प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.
तात्पर्य – मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागते.
115) 👑🎤*बोधकथा - मन*
एकदा साधू प्रतापबुवा भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर थांबला. आतून सुमनबाई भिक्षा घेऊन आल्या. म्हणाल्या, "महाराज ! काही तरी उपदेश करा." प्रतापबुवा म्हणाले, "बाई गं ! आज नाही, उद्या उपदेश करेन." बुवांचे हे उत्तर ऐकून सुमनबाईंना राग आला. त्या म्हणाल्या, "तर मग, भिक्षाही उद्याच मिळेल." दुसरे दिवशी बुवा त्या घराकडे येण्यास निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात केरकचरा व खडे भरून घेतले. इकडे सुमनही साधुबुवांना देण्यासाठी चांगले पदार्थ घेऊन तयार होती. प्रतापबुवांनी घरासमोर येऊन हाक दिली. सुमन भिक्षा घेऊन आली. पाहते तर काय, तिला बुवांच्या भिक्षापात्रात कचरा दिसला. ती म्हणाली, "महाराज ! भिक्षापात्रात घाण वस्तू असता मी भिक्षा कशी टाकू ?
बुवा म्हणाले, "असू देत बाई ! तू आपली भिक्षा वाढ पाहू." सुमन म्हणाली, "अशा मलिन पात्रात मी अन्न वाढणार नाही." तिचे हे उत्तर ऐकताच बुवा म्हणाले, "बाई, भिक्षापात्र स्वच्छ केल्यावर तुम्ही भिक्षा देणार. हाच तुम्हाला उपदेश आहे. मनात दुःख, चिंता, मोह, मत्सर असा कचरा असताना मी तुम्हाला उपदेश करून काय उपयोग ? त्यासाठी अगोदर मन निर्मळ व्हायला हवे."
*तात्पर्य :* मन निर्मळ, तर जीवन निर्मळ.
116) 👑🎤*बोधकथा - परिश्रम*
एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का सांगितले?मग त्याच्या आत्म्याने म्हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.
*तात्पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख अवश्य येते.
117) 👑🎤*बोधकथा - कोल्हा आणि कोंबडी *
एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’
*तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसऱ्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.*
118) 👑🎤बोधकथा - यश *
थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.'
119)👑🎤* बोधकथा - अनुभव *
एका शेठजवळ अपार संपत्ती होती, एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की एक भव्य शिवमंदिर बनवावे. सहा महिन्यात मंदिर बनवून पूर्ण तयार झाले. मंदिर बनवून जे धन शिल्लक राहिले ते धन त्याने मंदिराच्या घुमटात गुप्त रितीने ठेवले. या गोष्टीचा उल्लेख त्याने आपल्या डायरीमध्ये करून ठेवला. त्यानंतर तो तीर्थयात्रेला निघुन गेला. परंतु तो रस्त्यातच मरण पावला. शेठला चार मुले होती. शेठजीच्या मृत्युनंतर काही दिवसातच त्यांना पैशाची चणचण भासु लागली, तेंव्हा त्यांनी आपल्या वडीलांची डायरी तपासायला सुरुवात केली. त्या डायरीत त्यांना घुमटातल्या धनाचा उल्लेख असलेली नोंद त्यांना पाहायला मिळाली. त्यात असेही लिहीलेले होते की, चैत्र शुद्ध नवमीला धन घुमटात ठेवण्यात आले आहे, त्या मुलांनी घुमट तोडला मात्र त्यात धन निघाले नाही. तेव्हा ते आपल्या वडिलांच्या बुजुर्ग मित्राकडे आले, आणि समस्या सांगितली. वडीलांच्या त्या बुजुर्ग मित्राने त्या चारही मुलांना चैत्र शुद्ध नवमीला रात्री बारा वाजता त्या ठिकाणी खोदायचे आहे जिथे तुमच्या वडीलांनी धन ठेवले आहे असे सांगितले, चंद्राच्या प्रकाशात घुमटाची सावली जेथे पडली होती, तेथे रात्री या म्हाता-या व्यक्तिने खोदायला स्वत: आधी सुरुवात केली आणि मग मुलांना खोदायला सांगितले. जेथे सावली पडली होती तेथेच बरोबर धन सापडले, मुलांना आनंद वाटला. मुलांनी बुजुर्ग व्यक्तिला धन्यवाद दिले, त्या धनाच्या मदतीने मुले व्यापारात पुन्हा उभे राहिले तसेच आपल्या पित्याच्या बुद्धीलाही दाद दिली.
*तात्पर्य- वृद्धांचा अनुभव हा संपन्न असतो आणि तो नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असतो.*
120) 👑🎤बोधकथा - संकटावर मात *
विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.
तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.
121) 👑🎤*बोधकथा - स्त्रीचा आदर*
स्वामी विवेकानंदांची कथा ! शिकागो येथील परिषदेनंतर ते जगभर व्याख्याने देत फिरत होते. त्यांच्या व्याख्यानाला गरीब, श्रीमंत सारेजण असत. स्वामीजींचे रूप अतिशय देखणे, राजबिंडे होते. योगसामर्थ्याने चेहऱ्याला एक प्रकारची झळाळी आली होती. असे स्वामी जेव्हा प्रवचन करीत, तेव्हा ते यूरोपीयन स्त्री-पुरुष देहभान हरपून जात. कुणाची नजर स्वामींच्या देखणेपणावर, तर कुणाचे कान त्यांच्या अमोघ वाणीकडे असत. एका व्याख्यानानंतर त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यावर आणि तेजस्वी कंतीवर भाळलेली स्त्री त्यांच्याजवळ येऊन लगट करू लागली. स्वामी तिच्यापासून सावध राहू लागले. अखेर तिने विचारलेच. ती म्हणाली, "महाराज, मला तुमच्यासारखा प्रतिभावंत आणि देखणा मुलगा हवाय, मिळेल ?" विवेकानंद म्हणाले, "अवश्य ? अवश्य मिळेल मते ! या क्षणापासून तू मलाच तुझा पुत्र मान. तुझी इच्छा तत्क्षणीच पूर्ण झालेली असेल."
*तात्पर्य -* परस्त्रीला पातेसमान मानणे हीच सर्वोच्च संस्कृती, हीच धर्माची शिकवण.
122) 👑🎤*बोधकथा - राजा शरमिंधा झाला*
कवी गुरु कालीदास हा एका कलावंतिणीला गाणं शिकवायला जाई. राजा भोजही तिच्याकडे अधूनमधून तिचं नृत्य पाहायला जाई. आपण जिच्याकडे जातो, तिच्याकडे कालीदासही जातो, असं कळताच राजानं त्याची फजिती करायचं ठरवलं.
तो त्या कलावंतिणीकडे गेला असता तिला म्हणाला, 'हे पहा शुभानना, कालीदास आज तुझ्याकडे येईल तेव्हा त्याला सांग की, संपूर्ण हजामत केल्याशिवाय उद्या तुम्ही माझ्याकडे यायचं नाही.'कलावंतिणीने कालीदासाला याप्रमाणं सांगताच याच्यामागे राजाचा हात असल्याचा त्याला संशय आला. तो तिला म्हणाला,‘ खरं सांग, तू मला हे जे हजामत करून यायला सांगितलंस, ते महाराजांच्या सांगण्यावरुन ना?’
तिनं ते मान्य करताच कालीदास तिला म्हणाला, 'महाराज या राज्याचे राजे असतील, पण मी तुझा गुरु आहे. तेव्हा त्यांच्यापेक्षा तू मलाच अधिक मानले पाहिजेस. म्हणून मी सांगतो तसं करायचं. मी तर तुझ्या इच्छेप्रमाणे उद्या रात्री संपूर्ण क्षौर करुन येतोच पण मी येऊन गेल्यानंतर महाराज तुझ्या घराचे पुढले दार ठोठावू लागले की त्यांना तू म्हण, महाराज ! गाढवासारखा आवाज काढल्याशिवाय मी आज आपल्याला आत घेणार नाही. तुझ्या भेटीसाठी आतूर झालेले महाराज तुझा हट्ट पुरविण्यासाठी तसे ओरडायला कमी करणार नाहीत.’
दुसऱ्या दिवशी राजा त्या कलावंतिणीकडे गेला व तिने हट्ट धरल्यामुळे गाढवासारखा ओरडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी कालीदासाला हजामत करुन दरबारात आल्याचे पाहून भोजराजानं खवचटपणे त्याला विचारलं, ‘काय कविराज ! आपण आज संपूर्ण क्षौर का बरं केलयं ?’यावर कालीदासानं उत्तर दिलं, ‘काल रात्री मी गाढवाचा आवाज ऎकला. गाढवाचा आवाज रात्री कानी पडला म्हणजे संकट ओढवतं, असं मानलं जातं. ते संकट येऊ नये म्हणून क्षौर करावं, असं शास्त्र सांगतं.’ कालीदासाच्या या चपलख उत्तरानं राजा शरमिंधा झाला.
123) 👑🎤*बोधकथा - फासेपारधी व पक्षी*, ©
एक घनदाट जंगल होते. अशा या जंगलात अनेक पशु तसेच रंगीबेरंगी पक्षी राहत होते. त्या जंगला जवळच एक गावं होत. त्या गावामध्ये एक फासेपारधी कुटूंबासोबत राहत होता. दररोज तो पक्ष्याना पकडून विकत होता व आपले जीवन जगत होता. एकदा पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो एका झाडाआड लपून जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात ते पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते. पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही. खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते. अजून थोडे, अजून थोडे थांबून खूप पक्षी पकडावे असे करता करता शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने जाळे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला.
*तात्पर्य - कोणत्याही कामात उतावीळपणा जसा चांगला नाही त्याप्रमाणे दिरंगाईही योग्य नाही.*
124) 👑🎤* बोधकथा - शेतकरी आणि रानडुक्कर*©
एका गावात एक शेतकरी राहत होता. तो आपल्या शेतात विविध पिके घेत असे. पण रानडुक्करे सतत पिकांचे नुकसान करत होती . शेतकरी या सततच्या नुकसानीला कंटाळला. प्रत्येक वेळी तो रानडुक्करांना पळवून लावत असे. पण पुन्हा ती येत असत. असे बरेच दिवस होत होते. शेवटी एकदा त्यानं शेतात जाळे लावले. काय गंम्मत शेतकऱ्याच्या जाळ्यात एक रानडुक्कर सापडले. तेव्हा त्याने त्याचा एक कान कापून सोडून दिले. काही दिवसांनी ते पुन्हा सापडले. तेव्हा त्याने त्याचा दुसरा कान कापून सोडले. परंतु, तरीही तिसऱ्या वेळेसही ते त्याच्या जाळ्यात सापडेल. तेव्हा नाईलाजाने त्याने त्याला ठार मारून त्याचे डोके फोडले आणि तो म्हणाला, 'खरंच की याच्या डोक्यात मेंदूच नाही. जर अक्कल असती तर दोनदा माझ्या हाती सापडल्यावर पुन्हा तो माझ्या जाळ्यात आलाच नसता.'
तात्पर्य - ज्याच्यावर उपदेशाचा अथवा शिक्षेचा काडीमात्र परिणाम होत नाही अशाला शहाणे करणे ही अशक्य गोष्ट आहे.
125)👑🎤* बोधकथा - भामटा ज्योतिषी*
एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एक रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा .दररोज तो समोर जन्मकुंडल्या घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा .लोकही त्याला आपले भविष्य विचारत.मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा .अशा प्रकारे त्याने अमाप धनदौलत कमावली.

एके दिवशी तो लोकांचे भविष्य सांगण्यात गुंतला असताना एक व्यक्ती त्याच्याकडे पळत-पळत येतो आणि म्हणतो की , त्याच्या घरामध्ये चोरी झाली आहे . त्यावर तो आपल्या घराकडे जात असताना मध्येच त्याला एक व्यक्ती अडवतो आणि अशाप्रकारे धावण्याचे कारण विचारतो..यावर तो ज्योतिषी स्वत:च्या घरी चोरी झाल्याचे सांगतो .यावर तो व्यक्ती म्हणतो ,ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे की, जो व्यक्ती दुसऱ्या लोकांचे दुर्भाग्य ओळखतो . त्याला स्वत:च्या दुर्भाग्याबद्दल माहित नाही. यावर तो ज्योतिषी शरमेने मन खाली घालतो आपला घमंडी , भामटेपणा लोकांसमोर व्यक्त करत असतो.
126)👑🎤*बोधकथा - आत्महत्या !*
दहा मित्र प्रवासाला निघाले होते. एकत्र प्रवासात मजा येत होती. त्यांना वाटेत एक नदी लागली. नदी ओलांडल्यावर कशी ? त्यांनी एक युक्ती केली. एकमेकांचे हात पकडून, परस्परांचा आधार घेत त्यांनी पैलतीर गाठला; परंतु पैलतीरी गेल्यानंतर त्यापैकी एकाच्या मनात शंका आली की, आपण सारेजण नदी ओलांडून आलोत का ? की आपल्या पैकी कुणी नदीतून वाहून गेला ? या शंकेने त्याला अस्वस्थ केले. तो चटकन पुढे झाला आणि त्याने सर्वांना मोजण्यास सुरुवात केली. तीन-चार वेळा मोजले तरी नऊच ! सर्वांनाच फार दुःख झाले. एकजण वाहून गेला म्हणून सारे शोक करू लागले. त्यांनी शोकाचे कारण सांगताच त्याने सर्वांकडे पाहिले. बरोबर दहाजण होते. त्या दहांपैकी एकाला बोलावून त्याने परत मोजण्यास सांगितले. त्याने मोजले तर नऊच ! तेव्हा तो वाटसरू म्हणाल, "अरे दहावा तूच आहेस." स्वतःला मोजावयाचे विसरल्याने सारा घोटाळा होत होता.
*तात्पर्य :* जीवनातल्या सर्व घोटाळ्यांचे कारण स्वतःला विसरणे हेच असते.
127) 👑🎤*बोधकथा - खेड्यातला उंदीर व शहरातला उंदीर*
एक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले. पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो, अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातला उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देउ लागला व तो चाखून 'अहाहा ! काय चविष्ट पदार्थ आहे हा !' असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वैपाक घराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'
*तात्पर्य - शहरात सुख फार पण त्याप्रमाणे दुःखेही फार. खेड्यात मजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.*
128)👑🎤*बोधकथा- बोधकथा*
एका गावात कॉलऱ्याची साथ आली. सारे लोक हैराण झाले. पण वैद्यकीय इलाज करण्याऐवजी, पाणी उकळून पिण्याऐवजी सारे लोक एका भोंदूबाबच्या नादी लागले. त्याने सांगितले की, 'देवीचा कोप झाला आहे. बळी द्या. सारं संकट दूर होईल.' त्यानुसार गावाच्या लोकांनी एक बोकड जिवंत पुरून देवीला बळी द्यावा, असे ठरविले. देवीच्या मंदिरासमोर खोल खड्डा खणण्यात आला. तिकडून बोकडाची मिरवणूक आली. खड्डयाजवळ येऊन पाहतात, तर त्या खड्डयात उभे राहून गाडगेबाबा, 'गोपाला गोपाला' असे भजन करीत होते. लोक म्हणाले, "बाहेर या. बोकडाचा बळी द्यायचा आहे."
गाडगेबाबा म्हणाले, " बोकडाचा बळी देऊन कॉलरा जाणार असेल, तर त्याच्याऐवजी मलाच पुरा. नरबळी दिल्याने देव संतुष्ट होईल. कायमचा कॉलरा जाईल." हे ऐकून लोक खजील झाले. त्यांना आपली चूक उमगली.
*तात्पर्य :* अंधश्रद्धेच्या आहारी न जाणे, हीच संतांची शिकवण आहे.
129)👑🎤*बोधकथा-
एका शेतकऱ्याला नदी पार करून जायचे होते, म्हणून पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर खालीवर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, 'जिथे पाणी संथ वाहतं तिथे ते फार खोल आहे व जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे ते अगदी उथळ आहे.'
*तात्पर्य - शांत वाटणारा अगदी आतल्या गाठीचा असल्याने त्याच्याकडून धोका असण्याचा जसा संभव असतो तसा बडबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसाकडून नसतो.*

130) 👑🎤*बोधकथा - कृतज्ञता !*
फार फार वर्षांपूर्वी आकाश आणि पृथ्वी यांनी स्वतःला प्रेमाने बांधून ठेवले होते. काही दिवसांनी त्यांना जगाचे बाळ झाले. या जगातील लहान बाळ म्हणजे सृष्टी. या बाळांसाठी पृथ्वीनं हिरव्या वनांच्या कुंच्या शिवून पाना-फुलांच्या वेलबुट्टीने त्या रंगविल्या. त्यांच्यासाठी नद्यानाल्यांचे अमृत, धान्यकोठारे तयार केली. जगाचे हे बाळ हळूहळू सुदृढ झाले. अवाढव्य वाढले. त्याला पृथ्वीची कूस पुरेना. आकाश-पृथ्वी तर जवळजवळ चिटकलेले होते. खेळायला-नाचायला अवकाशच नव्हता. मग पृथ्वीची उसळत्या उत्साहाची, स्वार्थाच्या उड्या मारणारी बाळे विचारात पडली. त्यांनी ठरवले, आपल्यातल्या छोट्यांनी आईला पायाने हळूहळू ढकलू. मोठ्यांनी हाताच्या रेट्याने बाबांना वर ढकलू. मग ते दोघे लांब जातील. आपणाला पुरेशी जागा मिळेल. त्यांना यश आले. पृथ्वी व आकाश कायमचे दूर गेले. फक्त क्षितिजावर पूर्वीच्या एकतेची खूण उरली. पुन्हा भेट झालीच नाही. आता वर्षातून एकदा पृथ्वी आपल्या पतीसाठी बाष्पाचे दूत वर पाठवते आणि त्यात सुजनाचे तेज मिसळून आकाश पृथ्वीवर बरसते. या मीलनावेळी पृथ्वी मोहरते. हिरवा शालू नेसून सजते. अशी ही मालव प्रांतातील लोककथा.
*तात्पर्य :* आकाश हे शक्तीचे प्रतीक, तर पृथ्वी ही निर्मितीचे, मायेचे, प्रतीक. शक्ती आणि माया दूर गेली, तर समाजात कृतज्ञता कुठून येणार ?
131) 👑🎤*बोधकथा - एकीचे बळ *
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला.
सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
*तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.*
132) 👑🎤 *बोधकथा - चालत रहा !*
एका माणसाला आपल्या गावशेजारी असणाऱ्या डोंगरावर जायची खूप इच्छा होती. पण आजवरच्या आयुष्यात कधी वेळच मिळाली नव्हती. म्हणून त्याने एकदा निश्चय केला की, उद्या सकाळी निघायचेच ! त्या डोंगरावर जायला चार-पाच तास लागायचे. दुपारपर्यंत जाऊन परत यायचे, म्हणजे पहाटे निघावे लागणार, असे मनाशी ठरवून तो झोपी गेला. पण काही केल्या झोप येईना. रात्री दोनच्या सुमारास तो उठला. कंदील हाताशी घेतला आणि चालू लागला. गावाबाहेर येताच त्याच्या लक्षात आले की, सभोवती गच्च अंधार आहे आणि-हातातल्या कंदीलाचा प्रकाश तर दहा पावलांचा पुढे पडत नाही. मग कसे करायचे ? एवढ्या दहा पावलांच्या प्रकाशात कसे पुढे जायचे ? असा विचार करीत तो तिथेच बसून राहिला. सकाळ झाली. त्या ठिकाणी एक साधू आला. त्याने विचारल्यानंतर याने सर्व काही सांगितले. तेव्हा साधू म्हणाला, "वेड्या चालणं सुरू तरी ठेवायचंस ! तू जसा पुढे पुढे जाशील तसं तुला पुढचा रास्ता दिसला असता. अरे एका पावलापुरता प्रकाश घेऊनही पृथ्वीप्रदक्षिणा करता येते."
*तात्पर्य :* थांबला तो संपला.
133) 👑🎤 *बोधकथा - गर्वहरण *
एक सांबर एकदा पाणी पीत असताना त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तो मनाशीच म्हणाला, 'माझी ही शिंगं किती सुंदर आहेत. तसंच माझं तोंड, डोळे फुलासारखं अंग सगळं कसं सुंदर आहे. पण माझे पायही असेच सुंदर असते तर काय मजा झाली असती. हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे !' असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला. त्याची चाहूल लागताच सांबर आपल्या बारीक पायांनी जोरजोरात पळू लागले. सिंहही त्याच्या मागे लागला. परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली. त्यामुळे त्याला पळता येईना. सिंहाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा सांबर म्हणाले, 'अरेरे ! ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली. पण ज्या शिंगांचा मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐनवेळी दगा दिला.'
134)👑🎤* बोधकथा - घोडा आणि नदी*
एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."
*तात्पर्य - उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....*
135) 👑🎤 *बोधकथा - पात्रता*
स्वातंत्र्यवीर सावरकरांची विध्यार्थीदशेतील एक कथा. एका वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विनायक दामोदर सावरकरांनी घणाघाती भाषण केले. आपल्या सडेतोड विवेचनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथातील उतारे तोंडपाठ सादर केले. वक्तृत्वाचा परिणाम योग्य प्रकारे साधला गेला. अन्य स्पर्धकांचीही भाषणे झाली आणि मग त्या स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या तिघा परीक्षकांनी निकाल जाहीर केला. त्यात सावरकरांचे भाषण अत्युत्तम असूनही त्यांला तिसरा क्रमांक दिला गेला होता. परीक्षा म्हणाले, "या मुलाने भाषण उत्तमच केलं. तरीही आम्ही याला तिसरा क्रमांक दिला. कारण याने मांडलेले विचार याचे नव्हते. त्याला ते भाषण कुणीतरी लिहून दिलं असावं."
एवढे ऐकताच सावरकर ताडकन उभे राहिले. व्यासपीठावर जाऊन त्यांनी खिशात असलेली संदर्भ ग्रंथांची टिपणे काढली. ती श्रोत्यांना दाखवीत ते म्हणाले, "ज्या ग्रंथांचं परिशीलन करून मी माझे विचार मांडले त्यांची ही टिपणं. आता ही पाहून कदाचित परीक्षक मला प्रथम क्रमांक देतील. पण मी तो स्वीकारणार नाही. कारण बक्षीस देणारी व्यक्ती बक्षीस स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या योग्यतेचीच असावी, असं मला वाटतं."
*तात्पर्य :* वय आणि अधिकार आहेत म्हणून पात्रता नसताना कुणाचे ज्ञान, अभ्यास यांची हेटाळणी करू नये.
136) 👑🎤*बोधकथा - रामबाण औषध *
एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते . तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह म्हणाला . महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही . नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल . त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम !
137)👑🎤*बोधकथा - त्रास *
गुरुगृही अध्ययन करुन घरी गेलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला व त्यांना म्हणाला, 'गुरुदेव ! मला रिकामटेकडया आप्तमित्रांचा अतिशय त्रास होतो. ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतात; तास्नतास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात, आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही, तर माझ्या वाचनात व चिंतनाही व्यत्यय आणतात. त्यांचा हा त्रास मी कसा टाळू?'
गुरु म्हणाले, 'वत्सा ! तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत आप्तमित्र येतील, त्यांच्याकडे तू पैसे उसने मागू लाग. असे केलेस म्हणजे तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत, म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील.'
शिष्य म्हणाला, 'गुरुदेव ! ही युक्ती मोठी नामी सांगितलीत, पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील, तो कसा चुकवू ?'गुरु म्हणाले, 'त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे उसने म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा. म्हणजे घेतलेले पैसे बुडविता यावेत, या हेतूनं तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील.'
138) 👑🎤*बोधकथा - घड्याळ *
एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे. जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भाावनिक मूल्य होते. बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना.
मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल.... बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली. पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना. नेमके जेंव्हा त्या शेतकऱ्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकऱ्याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला. शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...! हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी....... शेतकऱ्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.
थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला. शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले.........!
त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले.............!!
मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केल, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो.त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”
*तात्पर्य - एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
139) 👑🎤 *बोधकथा - भीमटोला *
एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला. धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. 'धर्मराजांचं ते अश्वासन ऎकुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं ऎकलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला.
दरबारातून बाहेर पड्ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. एक नगारा कुठ्ल्याही तर्हेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चर्यांची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता. नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. तो आवाज ऎकुन ‘काय आनंददायी घडले?’ हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा ! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास ?' भीम म्हणाला, 'दादा, आजपर्यंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. कुणाला केव्हा 'वरचं आमंत्रण ' येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढ्कलु नये.
पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.'या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली.
140)👑🎤*बोधकथा - चतुर सुना*
जपानमधील एका गावात राहणाऱ्या फांग फू नावाच्या शेतकर्याला दोन मुलगे होते. दोघांचीही लग्न झाली होती. एकदा त्याच्या दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या असता, त्यांनी त्याला विचारलं, 'मामंजे ! आम्ही तुमच्यासाठी काय आणू?'तो शेतकरी मोठया सुनेला म्हणाला, ' तु कागदातून अग्नी आण.' तिन होकार देताच तो धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, ' तु कागदातून वारा आण.' धाकटया सुनेनंही त्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले.
त्या दोन्ही सुना माहेरी गेल्या. पंधराएक दिवस माहेरी राहून त्या घरी आल्यावर शेतकर्याने मोठया सुनेला विचारलं, 'चिंगची ! आणलास का तू कागदातून अग्नी ?'यावर ती सून आतल्या खोलीत गेली, आणि थोड्याच वेळात, आतून पणती लावलेला कागदाचा कंदील घेऊन बाहेर आली. मोठया सुनेनं मोठया युक्तीनं आश्वासन पुर्ण केल्याचा त्याला आनंद झाला.
त्यानंतर त्या शेतकऱ्यांन धाकटया सुनेला विचारलं, 'मिंगजी ! कागदातून वारा आणलास का?'कोनाडयात ठेवलेला कागदाचा पंखा बाहेर काढून व तो सासऱ्याच्या हाती देऊन ती, त्याला म्हणाली, मांमजी ! हा पंखा हाती घेऊन हलवीत रहा. मी त्याच्याबरोबर वाराही आणला आहे या गोष्टीची तुम्हाला प्रचीती येईल.'दिलेलं आश्वासन धाकटया सुनेनही अशा तर्हेनं पूर्ण केल्याचे पाहून तो शेतकरी अंतरी संतुष्ट झाला आणि आपल्या दोन्ही सुना चतुर असल्याचा त्याला अभिमान वाटला.
141) 👑🎤 *बोधकथा - मदतीचे किरण*
संकटकाळी अगदी गवताची काडी सुद्धा आपणाला धीर देऊ शकते, हे सांगणारी ही कथा. राजा प्रतापरावांनी त्यांच्या विरोधात बंड करणाऱ्या एका क्रांतिकारकाला पकडले. त्याचा जनतेशी संपर्क येऊ नये आणि पर्यायाने हे बंडाचे लोण राज्यभर पसरू नये यासाठी त्याला शिक्षा म्हणून ३०० मिटर उंचीच्या स्तंभावरील खोलीत अन्नपाण्याविना बंद करून ठेवायचे असे राजाने ठरविले. ज्या दिवशी या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे ठरले, त्या दिवशी त्या क्रांतिकारकाला अखेरचा निरोप द्यायला सगळा गाव लोटला. तो करणतीकारक आपल्या पत्नीलाही भेटला. तिच्या कानात म्हणाला, "काहीही करून तू मला एक रेशमी दोरा पाठव. मग मी स्वतंत्र होईन" आणि तो निश्चिंत मनाने त्या स्तंभावरील खोलीत गेला. इतक्या उंचीवर रेशमी दोरा कसा पाठवायचा हे पत्नीला समजेना. तिनं सहदेव महाराजांना विचारले. ते म्हणाले, "सोपं आहे. एक भुंगा पकड. त्याच्या पायाला ३५० मीटरचा रेशमी दोरा बांध. त्या करणतीकारकाच्या मिशीला मध लाव आणि भुंगावर तोंड करून स्तंभावर सोड." तिने त्याप्रमाणे केले. मधाच्या वासाने भुंगा वर वर गेला. पाठोपाठ रेशमी दोरा. पुढे मग त्या दोऱ्याला बांधून सुतळी, मग त्याला काथ्या, दोर असे सारे वर गेले आणि तो क्रांतिकारक अखेर सुटला !
*तात्पर्य :* संकटकाळी अंधारलेल्या विश्वात मदतीचा एक किरणही पुरेसा असतो.
142) 👑🎤*बोधकथा - घर लहानच बरे*
सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?'
सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय!'
143) 👑🎤 *बोधकथा- रिटायरमेंट*
सीमाचे पती आता निवृत्त झाले होते. ते आता ६५ वर्षांचे होते. सीमाणेही आता साठी ओलांडली होती. त्यांची दोन्ही मुले-मुली आपापल्या घरी सुखाचा संसार करत होती. पती सकाळी लवकर उठून फिरायला जात. त्यांच्या रिटायरमेंट नंतर सीमाची कामं जरा जास्तच वाढली होती. पतीदेव चहाचे घुटके घेत वर्तमानपत्र वाचायचे. टी. व्ही. देखील बघायचे. आरामात स्नान करून नाश्ता व्हायचा. ते रिकामे असल्याने घरात सतत कुणी ना कुणी तरी येत-जात त्यांच्यासाठी चहा-बिस्किटे वगैरे सरबराई करणं सीमाला भागच होतं.
एक दिवस पतीदेव फिरून आल्यावर टेबलावर चहा ठेवता ठेवता सीमा म्हणाली, 'एक गोष्ट विचारू ?'
'हं विचार !' चहा आणि पेपर दोन्ही आपल्याजवळ घेत पतीदेव म्हणाले.
'माझी पण आता साठी उलटली. आपण साठीचे झालात, तेव्हा आपल्याला आपल्या कामापासून मुक्ती मिळाली. मला माझ्या कामापासून मुक्ती कधी मिळणार ?'
'कोणतं काम?' अनपेक्षित प्रश्नाने पतीदेव चमकले.
'हेच घरकाम.'
'ओह! मी तर विचारच केला नव्हता. असं करू या, जेवण बनवण्यासाठी एक स्वैपाकीण बाई ठेवू या. पण यापुढे पेन्शन मात्र मागू नकोस हं!'
पतीदेवांनी समस्या निकालात काढत म्हटलं.
'पण या वयात बाईंनी बनवलेलं जेवण आपल्याला आवडेल का? रुचेल का? मला नको रिटायरमेंट 'सीमा आपली ड्युटी पुन्हा जॉईन करत म्हणाली.
144) 👑🎤*बोधकथा - श्रद्धा*
आपल्यातल्या सामर्थ्याची आपणाला जाणीव झाली आणि आपण त्याचा पुरेपूर वापर केला की, कोणतेही असाध्य कार्य सिद्धीला जाते. आपणाला वाटते, ते कार्य प्रमेश्वरानेच केले. एक शेतकरी भर पावसात सामानाने भरलेली गाडी घेऊन निघाला. रस्ता मुळातच खाचखळग्यांचा, तशातच पावसाने सर्वत्र चिखल झालेला. त्यामुळे गाडी हकताना त्याला खूपच त्रास होत होता. त्यातच त्याची गाडी एका खड्डयात अडकली. काही केल्याने निघेना. तो वैतागला. त्याला द्रोणागिरी उचलून नेणाऱ्या मारुतीची आठवण यायला लागली. मारुती आपली गाडी सहज उचलू शकेल, असे वाटून त्याने मारुतीचे स्मरण केले आणि काय आश्चर्य... तिथे श्री हनुमान प्रकटले. त्यांनी विचारले, "कशासाठी माझा धावा केलास ?" शेतकऱ्याने आपली अडचण सांगतच, मारुती एवढेच म्हणाला, "एवढंच ना ! तू असं कर, तू पुढून गाडी ओढ, मी मागून ढकलतो. पण, अट एकच. तू मागं पाहायचं नाही." शेतकऱ्याने तसे केले. क्षणार्धात गाडी निघाली. शेतकरी मागे आला. मारुतीच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, "अरे, मी तुझ्या गाडीला हातही लावला नाही. तुझी गाडी तूच काढलीस. मी फक्त मागे उभा होतो."
*तात्पर्य :* आपल्या प्रत्येक कामामागे परमेश्वर उभा असतो, ही भावना ठेवली की यश लाभतेच !
145) 👑🎤*बोधकथा -तिर्थयात्रा आणि मन*
एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला स्नान घातले आणि शेवटी बुध्दांकडे गेले. बुध्दांनी त्यांना विचारले की कशी झाली तिर्थयात्रा त्यावर सर्वांना आपआपला अनुभव सांगीतला आणि सर्वांना खुप चांगले वाटले सर्वजण प्रसन्न वाटले . सर्वांचा अनुभव ऐकल्यांनंतर बुध्दांनी त्यांना ती काडी चावण्यास सांगीतले. सर्वांनी सांगीतल्याप्रमाणे ती काडी चावली तर सर्वांची चेहरे पाहण्या लायक होते .काडीचा कडुपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसु लागला . सर्वांच्या तिरकस नजरा बुध्दांकडे होत्या. त्यावर बुध्दांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थस्नान केले त्या त्या ठिकाणी या काडीने सुध्दा तिर्थस्नान केले . जसे तुम्ही पापमुक्त झालात तसेच ही काडीसुध्दा पापमुक्त व्हायला पाहीजे होती . तिर्थस्नानचा परिणाम या काडीवर सुध्दा व्हायला पाहीजे होता. त्यामुळे ही काडी गोड व्हायला पाहिजे होती परंतू तसे झाले नाही ती काडी कडुच राहीली . त्याप्रमाणे आपणाला सुध्दा शरीरशुध्दी करायची असेल तर ती आतुन करणे योग्य . बाहेरुन जरी तुम्ही आंघोळ केली तरी आतुन विचारांनी समृध्द होणे गरजेचे. आतुन मनाची शुध्दी करणे गरजेचे आहे. मनाच्या समृध्द विचारांनी केलेली कृती कल्याणकारी असते.
*बोध :- मनाची शुध्दी ही वरवर नसुन आतुन करावी लागते*
146) 👑🎤*बोधकथा - गैरसमज*
*स्वामी विवेकानंदांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे....*
एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,
राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला आले
एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच
पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या
सदस्यां प्रमाणे रूळते...
एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि निघून जातो... नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून सावित्री पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस....
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ...मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने
माखले होते...आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते.....तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने माखले होते सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन टाकले...पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते. मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला आणि क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला आणि घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच
होत आणि शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला....सावीत्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली ..*पण मुंगूस बिचारे जागेवर ठार झालते* सावित्रीने पुन्हा एकदा टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......*स्वामी विवेकानंद सांगतात जे दिसतय ते बघा पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा....कारण प्रश्न हा जीवलग माणूस गमवण्याच्या आहे...कारण गैरसमज हे जवळच्या माणसांकडूनच होतात.

147) 👑🎤*बोधकथा - भगवंताचे अस्तित्व*
थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर." हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायाला?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो , हे मी काहीच केलेलं नाही ,सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."
त्यावर प्रोफेसर म्हणाले "माझी चेष्टा करताय काय, अस आपोआप काही तयार होत होय?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली अस म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना , मग हे ब्रह्मांड आपोआपच निर्माण झालं हे मला कस पटेल."
पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात "Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists."
*तात्पर्य*- मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा देवाचे अस्तित्व मान्य केलं आहे.

148) 👑🎤*बोधकथा - अपमान आणि उपकार
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो.
ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.

*तात्पर्य-*"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*
149) 👑🎤*बोधकथा -गेलेला ऋतूच बरा*
हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला. लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.
*तात्पर्य*कुठलेही कसेही दिवस आले तरी अतृप्त मनाच्या माणसांचे कधीही समाधान होत नाही.*
150) 👑🎤*बोधकथा- नम्रता
हिरोजी इंदुलकर तथा इतळकरांची कथा. हे शिवछत्रपतींच्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते. यांनी रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांची उभारणी केली. राजधानीचा रायगड उभारल्यानंतर महाराजांनी त्यांना विचारले, 'हिरोजी, राजधानीचा गड उभारलात, तुम्हाला काय बक्षीस देऊ ? हिरोजी नम्रपणाने म्हणाले, 'महाराज मला काहीही नको. मी रायगड उभारला. गडावर जगदीश्वराचे मंदिर उभारलंय. आपण जेव्हा जेव्हा गडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल. आपलं प्रत्येक पाऊल इथल्या मंदिराच्या पायरीवर पडणार, आपली पायधूळ झडणार. तेव्हा या पायरीवर माझं नाव करण्याची परवानगी द्या. जेणेकरून आपली पायधूळ माझ्या नावावर, माझ्या मस्तकावर पडत राहील. राजांनी मान्यता दिली आणि हिरोजींनी तो शिलालेख खोदला. 'सेवेची ठायी तत्पर, हिरोजी इटळकर' आजही हा शिलालेख हिरोजीच्या नम्रतेची साक्ष देत टिकून राहे. शिवछत्रपतींनी ३६१ गडकोटांवरून राज्य केले. पण कुठेही स्वतःचे नांव कोरले नाही. पण हिरोजीला मात्र ती परवानगी दिली ती हिरोजीची नम्रता पाहून ! ज्याची साक्ष आजही जगदीश्वराच्या पायरीवर आहे.
151) 👑🎤*बोधकथा- गुणांचे बळ*
अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट अतिशय धैर्यवान. दुबळे डोळे लाभलेल्या रिझवेल्टची आपल्या व्यंगावर मात केली. ते शिकारी होते. निसर्गाचा अभ्यास करणारे कुशल शास्त्रज्ञ झाले. अनेक उत्तमोत्तम ग्रंथ वाचणारे चांगले वाचकही झाले. त्यांचा एक कान काही कारणामुळे कामातून गेला. तरीसुद्धा विविध पक्ष्यांच्या आवाजावरून तो पक्षी कोणता, हे ते सांगू शकत असत. अपघातामुळे त्यांच्या शरीरात असंख्य वेदना व्हायच्या. पण तरीसुद्धा बेशुद्ध पडेपर्यंत ते काम करत. एके दिवशी डॉक्टर त्यांना म्हणाले, 'रुझवेल्ट, तुम्हाला आता फक्त खुर्चीतच बसून काम करावे लागेल, अशी तुमच्या शरीराची स्थिती झाली आहे.' रुझवेल्ट हसत हसत म्हणाले, तशा पद्धतीने काम करण्याससुद्धा मी समर्थ आहे.
*तात्पर्य : जिद्द, प्रयत्न, मनोधैर्य या गुणांचंय बळावर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.*
152) 👑🎤*बोधकथा- त्याग हीच मनःशांती
पांडुरंग कोट्याधीश होता. पण, त्याला मनःशांती नव्हती. तो नेहमी त्या साधुकडे जाई. म्हणे, "मला शांती हवीय, महाराज ! त्यासाठी काहीतरी साधना शिकवा." महाराज म्हणत, "तू पैशाच्या दृष्टीनेच जगाकडे पाहतोस. त्याऐवजी स्वतःकडे पाहायला शिक." पांडुरंग म्हणे, "महाराज, पैसा हे माझं सर्वस्व आहे. त्याचा विचार मी कसा सोडू ?" त्याचे हे मत ऐकून महाराजांनी त्याला एक काच दिली व त्यातून पाहायला सांगितलं. पांडुरंग म्हणाला, "यातून तर पलीकडचे जग दिसते." नंतर महाराजांनी तशाच काचेचा बनविलेला आरसा दिला व त्यातून पाहायला सांगितले. पांडुरंग म्हणाला, "महाराज ! यात तर मीच दिसतो." महाराज म्हणाले, "बघ, सध्या काचेतून जग दिसते. पण, त्याच काचेला एका बाजूने लाख/चांदी लावली की, आपण स्वतःला पाहू शकतो. तसेच धन, सत्ता, संपत्तीच्या स्वार्थी काचेतून पाहिले, तर जग तसेच दिसते. पण, हे जग चालविणारी शक्ती जाणायची इच्छा हवी. 'मी' कोणी नाही, अशा निःस्वार्थी भावनेने जगाकडे पाहिले की, आत्मज्ञान होते. शांती लाभते."
तात्पर्य : मोह, लोभ आणि हव्यास यांचा त्याग हीच मनःशांतीची सुरुवात.
153) 👑🎤*बोधकथा, अत्याचार !*
पांडुरंग जरा वेगळाच होतो. समाजात जरा कुठे बिघडले, की तो अस्वस्थ व्हायचा. संबंधित व्यक्तींना, शासकीय अधिकाऱ्यांना तक्रारपत्र पाठवायचा. आता सर्वच ठिकाणी त्याचे कोण ऐकून घेणार ? मग तो चिडायचा. अस्वस्थ व्हायचा. त्याचा रक्तदाब वाढायचा. मग तो पत्नीवर चिडायचा, म्हणायचा, "तुम्ही सारेजण हा अन्याय कसा सहन करता ?" यावर त्याची पत्नी म्हणे, "मी म्हणते, लोकांच्या चुकांचा तुम्ही का एवढा त्रास करून घेता ? शांत का बसून राहत नाही ?" पण पांडुरंग कसला ऐकून घेतो ? 'मी बरोबर आहे, मग मी का स्वस्थ बसू' हा अहंकार त्याला गप्प बसू देत नसे. अशी काही वर्षे गेली. पांडुरंगाला रक्तदाबाचा त्रास होताच. हृदयविकाराची चाहुलही लागली. डॉक्टरांचे 'येणे' आणि 'देणे' वाढले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पांडुरंगाने सक्तीची विश्रांती घेतली. जीवाच्या भीतीने का होईना, पांडुरंग आता शांत झाला होता. पत्नी म्हणाली, 'मी म्हणते, एवढा मोठा आजार झाला कशामुळे याचा विचार करावा. जगात अत्याचार नसावेत म्हणून रागवताना आपणच आपल्या शरीरावर अत्याचार करतो, हे तुम्ही का समजून घेत नाही ?" पांडुरंग म्हणाला, "बरोबर आहे, 'मी' च चुकत होतो, आता मी बदलेन ."
**तात्पर्य : विनाकारण* *मनस्ताप करून घेणे हे शरीर त्रासाचे मूळ कारण आहे.*
राजा विरेंद्रसिंह एकदा शिकारीला निघाले होते. शिकार आणि घोडदौड हे त्यांच्या आवडीचे विषय होते. नेहमीप्रमाणे लवाजमा घेऊन विरेंद्रसिंह जंगलच्या रस्त्याला लागले. गाव मागे पडले अन् जंगलाचा रस्ता सुरू झाला. राजाने पाहिलं तर समोर एक वृद्ध गृहस्थ कसले तरी रोप लावत होता. राजाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, 'म्हातारबा, कसले रोप लावताहात ?' म्हातारा म्हणाला, 'राजा, आरं मी बदामाचं झाड लावतोय.' राजा म्हणाला, 'ते खरं म्हातारबा, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग ? हे झाड वाढणार कधी अन् त्याला बदाम लागणार कधी ? कदाचित तुम्ही तेव्हा असणारही नाही. कशाला एवढे कष्ट घेत आहात ?' म्हातारा शांतपणे म्हणाला, "ते मला कळतंया रं ! पण स्वतःच्या पोटापूरतं पाहणारा मनुष्य नीच असतो. मला फळं मिळाली नाहीत तर काय झालं ? कुणाला तरी मिळतीलच ना !"
**तात्पर्य : स्वार्थी माणूस स्वतःचाच विचार करतो.
155) 👑🎤*बोधकथा - आळसरूपी सैतान
एका कष्टाळू शेतकऱ्यांकडे एक सैतान गेला. म्हणाला, "चल मी तुला मदत करतो." पण त्या शेतकर्याने त्याची मदत नाकारली. सैतानाने मात्र प्रयत्न सोडले नाहीत. पुन्हा तो त्या शेतकऱ्याकडे गेला व म्हणाला, "तुमचे काम चालू ठेवा. तुम्ही जेवणासाठी सुटी कराल, तेवढ्या वेळेत मी शेत नांगरतो." शेतकऱ्याला यात काही विशेष वाटले नाही. त्याने सैतानाला परवानगी दिली. काही दिवसांनी सैतानाने रात्रीच्या वेळेत शेत नांगरायची परवानगी मागितली. शेतकऱ्याचे काम जास्त व्हायला लागले. दोघांत मैत्री झाली. काही दिवसांनी सैतान म्हणाला, "जेवण केल्यावर तू लगेच कामावर येतोस. थोडी विश्रांती घेत जा." शेतकऱ्याला ते पटले. काही दिवसांनी त्याने गडी ठेवले. मदतीला सैतान होताच. शेतकरी आता विश्रांती घेऊ लागला. एक-दोन वर्षे सुखात गेली. पुढे सैतानही काम करेना. गाडीही कामचुकारपणा करू लागले. उत्पन्न घटले.
दरम्यानच्या काळात सैतानाने काम केले नाही. पण शेतकऱ्याला दारूचे व्यसन लावले. ऐश-आरामाची सवय लावली. हळूहळू प्राप्ती शून्यावर आली. खर्च मात्र अफाट वाढला. सावकरांनी शेतकऱ्याचे घर, शेती जप्त केली. आता शेतकरी भानावर आला. पण सैतान तर दुसऱ्या सुखी शेतकऱ्यांच्या शोधार्थ निघून गेला होता.
तात्पर्य : आळसरूपी सैतान मित्र झाला की विनाश ठरलेलाच !

*तात्पर्य : आळसरूपी सैतान मित्र झाला की विनाश ठरलेलाच !*
157) 👑🎤**बोधकथा- स्वार्थ*
राजा विरेंद्रसिंह एकदा शिकारीला निघाले होते. शिकार आणि घोडदौड हे त्यांच्या आवडीचे विषय होते. नेहमीप्रमाणे लवाजमा घेऊन विरेंद्रसिंह जंगलच्या रस्त्याला लागले. गाव मागे पडले अन् जंगलाचा रस्ता सुरू झाला. राजाने पाहिलं तर समोर एक वृद्ध गृहस्थ कसले तरी रोप लावत होता. राजाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, 'म्हातारबा, कसले रोप लावताहात ?' म्हातारा म्हणाला, 'राजा, आरं मी बदामाचं झाड लावतोय.' राजा म्हणाला, 'ते खरं म्हातारबा, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग ? हे झाड वाढणार कधी अन् त्याला बदाम लागणार कधी ? कदाचित तुम्ही तेव्हा असणारही नाही. कशाला एवढे कष्ट घेत आहात ?' म्हातारा शांतपणे म्हणाला, "ते मला कळतंया रं ! पण स्वतःच्या पोटापूरतं पाहणारा मनुष्य नीच असतो. मला फळं मिळाली नाहीत तर काय झालं ? कुणाला तरी मिळतीलच ना !"
*तात्पर्य : स्वार्थी माणूस स्वतःचाच विचार करतो.*
158) 👑🎤* *बोधकथा - सत्कार्य*
स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा. साने गुरुजी आपल्या ओघवत्या, चित्रमय शैलीत खेडोपाडी सभा घेत. त्यामुळे जनजागृतीचे एक नवे वातावरण तयार झाले होते. एरंडोलच्या अशाच एका सभेत गुरुजींनी 'लोकांनी देशासाठी काही तरी त्याग करावा' असे आवाहन केले.गुरुजींच्या त्या वक्तृत्वाचा चांगलाच परिणाम झाला. एका वृद्ध स्त्रीला आपणही देशासाठी काही तरी करावे, असे वाटू लागले. सभा संपताच, तिने गुरुजींची भेट घेतली आणि आपल्या पायातील मोठा चांदीचा तोडा देशकार्यास देणगी म्हणून दिल्याचे जाहीर केले. पण, खूप प्रयत्न करूनही तो तोडा तिला पायातून काढता येईना. यात आता खूप वेळ जणार म्हणून गुरुजींसोबतचे कार्येकर्ते तिला म्हणाले, "आजी आता राहू द्या. उद्या पाहू. आपण देणगी देण्याची इच्छा व्यक्त केलीत, हेही खूप मोठं आहे." यावर ती म्हातारी म्हणाली, "नाही रे बाबा ! उद्या सकाळपर्यंत माझं मन बदललं, तर काय घ्या आणि फक्त इच्छा काय कामाची ? तशी कृती हवी." तिची ती जिद्द पाहून सोनारांना तिथे बोलाविण्यात आले आणि तिच्या पायातील चांदीचा तोडा तोडून काढला गेला.
*तात्पर्य : स्तकार्याची इच्छा झाली की, लगेच कृती करावी.*
*
159) 👑🎤* बोधकथा- सेठ आणि गरीब व्यक्ती *
एक धनिक सेठ आपल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याचे ताटात पुजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे. ईश्वर प्रसन्न होईल या आशेने त्याने हे दीर्घकाळ केले. मात्र तसे झाले नाही, एके दिवशी त्याला मंदिरात जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली, ती ईश्वराला म्हणत होती,"हे ईश्वरा! तुझे लाख लाख आभार ! मी तुझ्या कृपेने सुखी झोपत आहे माझा कोणी शत्रू नाही आणि मला कसला त्रास नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा असू दे." घरी आल्यावर हि सेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती कि ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून त्याचे कष्ट कमी होत नव्हते मग तो गरीब ईश्वराला काहीही न देता इतका सुखी कसा? बराच विचार करून सेठ आपल्या दु:खाचे आणि गरीब माणसाच्या सुखाचे कारण शोधण्यासाठी संतांकडे गेला संत त्याची गोष्ट ऐकून म्हणाले, "सेठजी! आपण ज्या प्रमाणे सामान्य माणसाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचे बघत आहात. मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात त्या ईश्वराला साठवून ठेवले आहे. तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेवून जात नाही. तर निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानत आहे. ज्यादिवशी आपला ईश्वराबाबतचा भाव बदलेल त्यादिवशी तुला ईश्वराचे दर्शन होईल.
*तात्पर्य-ईश्वराशी सदैव नि:स्वार्थी भक्तीभाव असावा; सुख आणि मनशांती निश्चित मिळते*
* 160) 👑🎤* बोधकथा- असंतुष्ट मोर*
एके दिवशी मोराला आपला आवाज फार कर्कश आहे ह्याचे दुःख झाले. म्हणून त्याने सरस्वती देवीची प्रार्थना केली, हे देवी मी तुझे वाहन असता स्वरामध्ये कोकिळेने मला लाजवावे हे तुझ्या किर्तीस शोभण्यासारखे नाही. कोकिळा बोलू लागली म्हणजे सर्व लोकांचे कान तिकडे लागतात आणि मी तोंड उघडलं की लोक माझी थट्टा करतात. मोराचे हे बोलणे ऐकून देवी त्याची समजूत घालत म्हणाली, अरे, कोकिळा तिच्या गोड आवाजामुळे श्रेष्ठ आहे असे तुला वाटते, पण देखणेपणा व मोठेपणा यांच्या बाबतीत तुही भाग्यवान आहेस. देवीचे हे बोलणे ऐकून मोर म्हणाला, देवी, आवाज गोड नाही तर देखणेपणा काय करायचा आहे ? त्यावर देवी म्हणाली, अरे देवाने प्रत्येकास एकेक गुण दिला आहे. तुला सौंदर्य, गरुडाला बळ, कोकिळेला आवाज, पोपटाला बोलण्याची शक्ती, पारव्याला शांती. हे पक्षी जसे आपापल्या गुणांवर संतुष्ट आहेत, तसे तुही असावंस, उगाच आशा वाढवून दुःखी करण्यात अर्थ नाही.
*तात्पर्य : आपल्या अंगी जो गुण असेल त्याचाच चांगला उपयोग करून आपण समाधानी असावे.*
* 161) 👑🎤* बोधकथा- 'मी' पणाचा त्याग*
एकदा एक नागपाल नावाचा प्रवासी विविध देशांना भेटी देण्याच्या दृष्टीने बाहेर पडला होता. दूरदूरची ठिकाणे जवळून पाहावीत, त्याची माहिती जाणून घ्यावी अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने बरोबर कोणालाही घेतले नाही. एकट्यानेच तो सर्व प्रवास करत होता. अनेक दिवस त्याचा प्रवास चालूच होता. दिवसभर चालायचे आणि रात्री एखाद्या ठिकाणी मुक्काम करायचा असा त्याचा नियम होता. एकदा प्रवासात त्याला वेळेचे भानच राहिला नाही व चालत जात असताना रात्र झाली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाव मागेच राहिले आहे आणि आता आपण जंगलात आहोत. जंगली श्वापदांचे आवाज ऐकू येऊ लागले व त्याला भीतीच वाटू लागली. थोडे अंतर तशाच भीतीच्या वातावरणात चालत होता. पुढे गेल्यावर त्याला एका झोपडीतून कंदिलाचा प्रकाश दिसून आला. त्या प्रकाशाच्या रोखाने तो चालत गेला व पाहिले तर झोपडीचे दार बंद होते. नागपलाने झोपडीजवळ उभे राहून हाक मारली. आतून आवाज आला, "कोण आहे" नागपालने उत्तर दिले, "मी आहे" त्यानंतरही झोपडीचे दार उघडले गेले नाही. त्याने परत आवाज दिला, परत तोच प्रश्न आला व नागपलाने यावेळीही "मी आहे" असे उत्तर दिले. पुन्हा झोपडीचे दार बंदच राहिले. असे चार-पचवेळेला झाल्यावर नागपालने पुन्हा दार ठोठावले तेव्हा आतून पुन्हा कोण आहे असे विचारताच त्याने "दारात नागपाल नावाचा प्रवासी उभा असून रातरभरासाठी विश्रांती द्यावी अशी विनंती करतो" असे उत्तर देताच झोपडीचे दार पटकन उघडले गेले. झोपडीत एक साधूमहाराज राहात होते. त्यांनी नागपलाला आत घेतले व सांगितले, "मित्रा या झोपडीत "मी"पणाला स्थान नाही. प्रवासी आहेस तर आरामात राहा.
*तात्पर्य : "मी" पणाला कोठेही स्थान नसावे.*
* 162) 👑🎤* बोधकथा- कुणाला कमी समजू नये*
प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमगे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या. माझ्या जवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. लोभी आणि पंडित पैशाची हाव असलेल्या पंडितांनी सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस एका पंडिताने पिंडदान करण्याची तयारी दर्शवली. तो म्हणाला, भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो. त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी ! काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार केला. त्यानंतर राजा निघून गेला. पंडितला घरी जेवायला बसल्यावर अचानक लाडूची आठवण झाली. त्याने गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.
*तात्पर्य : कधीही कुणाला कमी समजू नये. कारण कोणत्या रुपात कोण असेल, याचा भरवसा नाही.*
* 163) 👑🎤* बोधकथा- गुणांचे बळ
अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट अतिशय धैर्यवान. दुबळे डोळे लाभलेल्या रिझवेल्टची आपल्या व्यंगावर मात केली. ते शिकारी होते. निसर्गाचा अभ्यास करणारे कुशल शास्त्रज्ञ झाले. अनेक उत्तमोत्तम ग्रंथ वाचणारे चांगले वाचकही झाले. त्यांचा एक कान काही कारणामुळे कामातून गेला. तरीसुद्धा विविध पक्ष्यांच्या आवाजावरून तो पक्षी कोणता, हे ते सांगू शकत असत. अपघातामुळे त्यांच्या शरीरात असंख्य वेदना व्हायच्या. पण तरीसुद्धा बेशुद्ध पडेपर्यंत ते काम करत. एके दिवशी डॉक्टर त्यांना म्हणाले, 'रुझवेल्ट, तुम्हाला आता फक्त खुर्चीतच बसून काम करावे लागेल, अशी तुमच्या शरीराची स्थिती झाली आहे.' रुझवेल्ट हसत हसत म्हणाले, तशा पद्धतीने काम करण्याससुद्धा मी समर्थ आहे.
तात्पर्य : जिद्द, प्रयत्न, मनोधैर्य या गुणांचंय बळावर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.
* 164) 👑🎤* बोधकथा- त्याग हीच मनःशांती
पांडुरंग कोट्याधीश होता. पण, त्याला मनःशांती नव्हती. तो नेहमी त्या साधुकडे जाई. म्हणे, "मला शांती हवीय, महाराज ! त्यासाठी काहीतरी साधना शिकवा." महाराज म्हणत, "तू पैशाच्या दृष्टीनेच जगाकडे पाहतोस. त्याऐवजी स्वतःकडे पाहायला शिक." पांडुरंग म्हणे, "महाराज, पैसा हे माझं सर्वस्व आहे. त्याचा विचार मी कसा सोडू ?" त्याचे हे मत ऐकून महाराजांनी त्याला एक काच दिली व त्यातून पाहायला सांगितलं. पांडुरंग म्हणाला, "यातून तर पलीकडचे जग दिसते." नंतर महाराजांनी तशाच काचेचा बनविलेला आरसा दिला व त्यातून पाहायला सांगितले. पांडुरंग म्हणाला, "महाराज ! यात तर मीच दिसतो." महाराज म्हणाले, "बघ, सध्या काचेतून जग दिसते. पण, त्याच काचेला एका बाजूने लाख/चांदी लावली की, आपण स्वतःला पाहू शकतो. तसेच धन, सत्ता, संपत्तीच्या स्वार्थी काचेतून पाहिले, तर जग तसेच दिसते. पण, हे जग चालविणारी शक्ती जाणायची इच्छा हवी. 'मी' कोणी नाही, अशा निःस्वार्थी भावनेने जगाकडे पाहिले की, आत्मज्ञान होते. शांती लाभते."
तात्पर्य : मोह, लोभ आणि हव्यास यांचा त्याग हीच मनःशांतीची सुरुवात.
* 165) 👑🎤*बोधकथा - विचार*
प्रत्येकाची नजर वेगळी असते. कारण तुमच्या द्या विचारधारेचा प्रभाव तुमच्या नजरेवर पडलेला असतो हे सांगणारी ही कथा. एका बैलगाडीत बसून तिघेजण जात होते. एक पुरुष, त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ. तो पुरुष त्या कुटुंबाचा कर्ता होता आणि तोच गाडी हाकत होता. अधूनमधून चाबकाचे फटके मारत होता. बैल तात्पुरते धावे. पुन्हा फटके मारल्यानंतर पुन्हा थोडे धावे. असे चालू होते. चाबकाच्या या फटाक्यामुळे बैलाचे रक्त निघाले होते. ते पाहून ती स्त्री म्हणाली, 'अहो ! बैलाला मारू नका. तो हळू चालला तरी चालेल. त्याचे रक्त येते आहे. मारू नका ! त्या कर्त्या पुरुषाचा भाऊ म्हणाला, अरे दादा ! त्याला का मारतोस ? त्याची चामडी रक्ताळली आहे. तिला छिंद्र पडतील ना ? ती स्त्री बोलली त्यामागे तिचे दयाळू अंतःकरण होते. पण भावाच्या बोलण्यामध्ये व्यापारी दृष्टी होती. कारण तो चामड्याचा व्यापारी होता. त्या बैलाच्या चामड्याला भोके पडली तर पुढे त्याची किंमत कमी होईल हा त्याचा विचार होता. दोघांच्या नजरेतील फरक होता तो हा.
*तात्पर्य : जसे विचार तशी दृष्टी.*
* 166) 👑🎤* बोधकथा - मदत*
शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हाताऱ्याला द्यायला अन्न नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरीण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हाताऱ्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले.
*तात्पर्य :* आपण दुसऱ्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.
* 167) 👑🎤*बोधकथा - आयुष्याची गुरुकिल्ली*
आयुष्यात फक्त काम उपयोगाचे नाही. फक्त विश्रांतीही हितकारक नाही. काम आणि विश्रांती यांचा मेळ घातला आला पाहिजे. प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेलचे उदाहरण मोठे मार्मिक आहे. तो मोठा लेखक व तत्त्वज्ञ होता. सतत कामात असायचा. आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्यायचा. सुट्टीच्या दिवशी सर्वसाधारणपणे आपण झोप घेतो, मजा करतो. पण रसेल सुट्टी-दिवशी झोपायचा नाही. तो म्हणे, "आज सुट्टी. मी रोज बसून लिहितो, चिंतन करतो. आज मी व्यायाम करेन." म्हणून तो सुट्टीच्या दिवशी न चुकता लांब अंतर चालण्याचा व्यायाम करी. चालून चालून दमल्यावर रत्याच्या कडेला एखाद्या दगडावर बसे. विश्रांती घेई. म्हणे, "या अशा नुसत्या बसण्यातही परमानंद आहे." कामात बदल म्हणजे विश्रांती, हे तत्त्व रसले आचरणात आणत असे. काम-श्रम आणि विश्रांती यांचा असा समन्वय आपणाला घालता यायला हवा.
*तात्पर्य :* कष्ट, विश्रांती आणि मौन यांचा समतोल म्हणजे सुखी आयुष्याची सुरुवात.
* 168) 👑🎤*बोधकथा - सुवर्णसंधी*
एकदा जंगलातून फिरत असताना प्रतापरावांना एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्वंगावर लोखंडी साखळदंड होता. ती व्यक्ती चालताना रस्त्यातील दगड हातात घेत होती. अंगावरील साखळदंडाला लावत होती आणि टाकून देत होती. हे सारे पाहून न राहवून प्रतापरावांनी विचारले, "काय करता आहात ?" ती व्यक्ती म्हणाली, "गेली दहा वर्षं परिस शोधतोय मी. पण अजून सापडला नाही." हे ऐकून ती व्यक्ती मूर्ख आहे, असे समजून प्रतापराव निघून गेले. बरीच वर्षे गेली. पुन्हा त्याच मार्गावर तीच व्यक्ती प्रतापरावांना भेटली. फरक इतकाच की, अंगावरील साखळदंड सोन्याचे होते. पण कृती मागच्याप्रमाणेच सुरू होती. प्रतापरावांनी विचारले, "अरे ! आता अंगावरील साखळदंड तर सोन्याचे झालेत. याचा अर्थ तुम्हाला परिस सापडला होता. मग आता तुम्ही काय शोधत आहात ?"
ती व्यक्ती म्हणाली, "दगड उचलणे, साखळीला लावणे आणि टाकून देणे ही क्रिया वर्षानुवर्षे करून इतकी यंत्रवत घडून गेली की, परिस हातात आला कधी आणि निघून गेला कधी कळलंच नाही."
*तात्पर्य :* प्रत्येकाच्या आयुष्यात परिसासारखी सुवर्णसंधी येते, तो क्षण पकडणे महत्वाचे.
* 169) 👑🎤*बोधकथा - न्याय*
जपानमध्ये एका न्यायालयात एका म्हाताऱ्या माणसावर ब्रेड चोरल्याप्रकरणी खटला सुरु होता. त्याने न्यायाधीशांसमोर गुन्हा कबुल केला. तो काही दिवसांपासून उपाशी होता आणि ब्रेड पाहिल्यावर न राहवल्याने त्याने चोरी केली. 'ब्रेड चोरला नसता तर मरण पावलो असतो'. असेही त्याने सांगीतले.
न्यायाधीश म्हणाले "तुम्ही गुन्हा कबुल केल्यामुळे दहा डाॅलर ईतकी दंडाची शिक्षा देतो. पण तुमच्याकडे दंड भरण्याइतके पैसे नाहीत याची मला कल्पना आहे. ते असते तर तुम्ही चोरी केली नसती म्हणुनच मी हा दंड भरतो." न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीश उभे राहीले आणि उपस्थीतांना म्हणाले, "सर्व उपस्थीतांना दहा दहा डाॅलर ची शिक्षा फर्मावतो कारण तुम्ही अशा देशात राहता, जिथे एका गरीब माणसाला पोट भरण्यासाठी ब्रेडची चोरी करणे भाग पडते. ही बाब कोणत्याही देशासाठी लज्जास्पद आहे." न्यायाधिशांचे बोलणे ऐकून सगळे स्तब्ध झाले. त्या प्रत्येकाने दहा दहा डाॅलरची रक्कम जमा केली. त्यातून 500 डाॅलर जमा झाले. न्यायाधीशांनी ती रक्कम वृध्दाला दिली आणि छोटा व्यवसाय सुरु करा असे सांगीतले. जेणेकरुन तुम्हाला ब्रेडसाठी पुन्हा चोरी करावी लागणार नाही.
*तात्पर्य: माणसाकडे माणूस म्हणून पाहील्याने न्याय होतो. शेवटी "माणूसकी म्हणजे तरी काय माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे* "
* 170) 👑🎤*बोधकथा - कर्मवीर भाऊराव*
कर्मवीर भाऊरावांची कथा. १९४७ मध्ये अण्णांनी सातारा येथे छ. शिवाजी महाराज विद्यालय सुरू केले. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण-सुविधा मोफत देणाऱ्या या महाविद्यालयावर आर्थिक संकट आले. शासकीय अनुदानही काही कारणाने मिळेनासे झाले. यातून बाहेर पडण्यासाठी अण्णांनी पदयात्रा काढून देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. अगदी गिरणी-कामगारांकडून एक-एक रुपयादेखील गोळा केला. ही बातमी खानदेशातील एका धनाढ्या गृहस्थाला समजली. त्याने अण्णांना निरोप पाठविला. 'असे एक-एक रुपया गोळा करण्यापेक्षा मी एकरकमी काही रुपये देतो. फक्त त्या महाविद्यालयाला माझ्या वडिलांचे नाव द्या.' यावर अण्णांनी उत्तर पाठविले, 'एक वेळ मी माझ्या बापाचे नाव बदलेन, पण पैशाच्या लोभाने छत्रपती शिवरायांचे नाव बदलणार नाही.
*तात्पर्य : स्वाभिमान आणि गौरवशाली परंपरेची किंमत पैशात होत नसते.*
* 171) 👑🎤*बोधकथा - सदविचारांची संगत सोडू नका!*
तिरुवल्लुवर हे दक्षिण भारतातील एक महान संत. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी एक शिष्य काही कारणामुळे त्यांना सोडून गेला. बाहेर जाऊन त्यांच्याबद्दल लोकांना उलट-सुलट सांगू लागला. तिरुवल्लूवरांचा एका शिष्याच्या कानावर या वार्ता आल्या, तसा तो अतिशय अस्वस्थ झाला.ताबडतोब महाराजांकडे आला व म्हणाला, "महाराज, आपली बदनामी करणाऱ्या त्या गाढवाला ताबडतोब येथे बोलावून घ्या आणि त्याचा समाचार घ्या. जरा कडक शब्दांत करडपट्टी काढा." यावर स्वामीजी म्हणाले, "राम राम! हे माझ्याने होणार नाही. तो करतो ते निश्चितच अयोग्य आहे. कधीतरी त्याच्या मनाला टोचणी लागेल. त्याला सद्बुद्धी होईल. पण त्याला इथं बोलावून घेऊन मी त्याची निंदा करण्यास सुरुवात केली की मलाही तीच सवय लागेल. मग माझ्यात ईर्ष्या निर्माण होईल. दुसऱ्याची निंदा करण्याची सवय कठीण. मला हे शक्य नाही."
*तात्पर्य : सदविचारांची संगत सोडू नये.*
* 172) 👑🎤*बोधकथा - तुमची तत्त्वे जपा!*
अलेक्झांडर स्वर्स्की. विमान तयार करण्यात तरबेज असणारा कारागीर. पहिल्या महायुद्धात त्याला आपला एक पाय गमवावा लागला. त्या जागी लाकडी पाय लावून तो दुसऱ्या महायुद्धात काम करत होता. युद्धात जखमी झालेल्या जवानांना दवाखान्यात जाऊन धीर देत होता. आपला पाय कसा गमावला याची हकीकत सांगून तो म्हणे, 'पण एक फायदा झाला. त्या पायाला कितीही जोरात लागलं, तर वेदना होत नाहीत." असे सांगून त्याने एका सैनिकाला एक वेताची छडी दिली व पायावर मारायला सांगितली. त्याप्रमाणे त्या सैनिकाने केले. सगळेजण कुतूहलाने पाहत होते. अलेक्झांडरही साऱ्यांकडे पाहत हसू लागला. म्हणाला, "पाहा मित्रांनो, मला काहीच झालं नाही." सारे जण स्तिमित झाले. त्यांनी आदराने टाळ्या वाजविल्या. त्या खोलीतून बाहेर पडताच अलेक्झांडरने झटकन खाली वाकून आपला पाय धरला. त्याला चोळू लागला. हे पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आश्चर्य वाटून विचारले, "काही त्रास होतोय का अलेक्झांडर?" तेव्हा तीव्र वेदनेने क्षणभर कळवळणारा अलेक्झांडर म्हणाला, "फार नाही. फक्त त्या सैनिकाने चुकीच्या पायावर छडीचा फटका मारला."
*तात्पर्य : आपल्या तत्त्वांच्या जपणुकीसाठी असाच आत्मविश्वास, मनोधैर्य हवे.*
* 173) 👑🎤*बोधकथा - चांगले कर्तृत्व आठवणीत राहते*
एका घरात एक आजी आपल्या दोन नातींसह राहत होत्या. त्यांच्या घरी एक संन्यासी पाहुणा आला. आजीने त्यांना पाहुणचार केला ते सारेजण गुप्पा मारत बसले असतानाच बातमी आली की, शेजारचे कोणी तरी मरण पावले. आजी आपल्या नातीला म्हणाली, 'जा ग ! पाहून ये बरं. त्याला सदगती मिळाली की दुर्गती ?' थोड्या वेळातच नात धावत आली आणि म्हणाली 'आजी त्याला सदगती मिळाली' गप्पा पुन्हा सुरू झाल्या एवढ्यात आणखी कोणी तरी मरण पावले. पुन्हा तसेच घडले. यावेळी मात्र नात परत येऊन म्हणाली, 'आता याला दुर्गती मिळाली' न राहवून संन्याशाने त्या आजीला विचारलं. 'हे कसं शक्य आहे ?" तेव्हा आजी म्हणाली. 'साधी गोष्ट आहे महाराज. जो माणूस मेल्यानंतर माणसे रडतात. त्यांना त्याची पोकळी जाणवते. त्याला सदगती मिळते. तर जो मेल्यावर लोक म्हणतात. 'जमिनीचा भार हलका झाला, पीडा गेली' अशाला दुर्गती मिळते.
*तात्पर्य : आयुष्यात असे कर्तृत्व करावे की, आपण मेल्यानंतरही लोक आपली आठवण काढत राहतील.*
* 174) 👑🎤* बोधकथा - मदत*
शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हाताऱ्याला द्यायला अन्न नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरीण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हाताऱ्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले.
*तात्पर्य :* आपण दुसऱ्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.
* 175) 👑🎤*बोधकथा - आयुष्याची गुरुकिल्ली*
आयुष्यात फक्त काम उपयोगाचे नाही. फक्त विश्रांतीही हितकारक नाही. काम आणि विश्रांती यांचा मेळ घातला आला पाहिजे. प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेलचे उदाहरण मोठे मार्मिक आहे. तो मोठा लेखक व तत्त्वज्ञ होता. सतत कामात असायचा. आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्यायचा. सुट्टीच्या दिवशी सर्वसाधारणपणे आपण झोप घेतो, मजा करतो. पण रसेल सुट्टी-दिवशी झोपायचा नाही. तो म्हणे, "आज सुट्टी. मी रोज बसून लिहितो, चिंतन करतो. आज मी व्यायाम करेन." म्हणून तो सुट्टीच्या दिवशी न चुकता लांब अंतर चालण्याचा व्यायाम करी. चालून चालून दमल्यावर रत्याच्या कडेला एखाद्या दगडावर बसे. विश्रांती घेई. म्हणे, "या अशा नुसत्या बसण्यातही परमानंद आहे." कामात बदल म्हणजे विश्रांती, हे तत्त्व रसले आचरणात आणत असे. काम-श्रम आणि विश्रांती यांचा असा समन्वय आपणाला घालता यायला हवा.
*तात्पर्य :* कष्ट, विश्रांती आणि मौन यांचा समतोल म्हणजे सुखी आयुष्याची सुरुवात.
* 176) 👑🎤*बोधकथा - सुवर्णसंधी*
एकदा जंगलातून फिरत असताना प्रतापरावांना एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्वंगावर लोखंडी साखळदंड होता. ती व्यक्ती चालताना रस्त्यातील दगड हातात घेत होती. अंगावरील साखळदंडाला लावत होती आणि टाकून देत होती. हे सारे पाहून न राहवून प्रतापरावांनी विचारले, "काय करता आहात ?" ती व्यक्ती म्हणाली, "गेली दहा वर्षं परिस शोधतोय मी. पण अजून सापडला नाही." हे ऐकून ती व्यक्ती मूर्ख आहे, असे समजून प्रतापराव निघून गेले. बरीच वर्षे गेली. पुन्हा त्याच मार्गावर तीच व्यक्ती प्रतापरावांना भेटली. फरक इतकाच की, अंगावरील साखळदंड सोन्याचे होते. पण कृती मागच्याप्रमाणेच सुरू होती. प्रतापरावांनी विचारले, "अरे ! आता अंगावरील साखळदंड तर सोन्याचे झालेत. याचा अर्थ तुम्हाला परिस सापडला होता. मग आता तुम्ही काय शोधत आहात ?"
ती व्यक्ती म्हणाली, "दगड उचलणे, साखळीला लावणे आणि टाकून देणे ही क्रिया वर्षानुवर्षे करून इतकी यंत्रवत घडून गेली की, परिस हातात आला कधी आणि निघून गेला कधी कळलंच नाही."
*तात्पर्य :* प्रत्येकाच्या आयुष्यात परिसासारखी सुवर्णसंधी येते, तो क्षण पकडणे महत्वाचे.
* 177) 👑🎤*बोधकथा - न्याय*
जपानमध्ये एका न्यायालयात एका म्हाताऱ्या माणसावर ब्रेड चोरल्याप्रकरणी खटला सुरु होता. त्याने न्यायाधीशांसमोर गुन्हा कबुल केला. तो काही दिवसांपासून उपाशी होता आणि ब्रेड पाहिल्यावर न राहवल्याने त्याने चोरी केली. 'ब्रेड चोरला नसता तर मरण पावलो असतो'. असेही त्याने सांगीतले.
न्यायाधीश म्हणाले "तुम्ही गुन्हा कबुल केल्यामुळे दहा डाॅलर ईतकी दंडाची शिक्षा देतो. पण तुमच्याकडे दंड भरण्याइतके पैसे नाहीत याची मला कल्पना आहे. ते असते तर तुम्ही चोरी केली नसती म्हणुनच मी हा दंड भरतो." न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीश उभे राहीले आणि उपस्थीतांना म्हणाले, "सर्व उपस्थीतांना दहा दहा डाॅलर ची शिक्षा फर्मावतो कारण तुम्ही अशा देशात राहता, जिथे एका गरीब माणसाला पोट भरण्यासाठी ब्रेडची चोरी करणे भाग पडते. ही बाब कोणत्याही देशासाठी लज्जास्पद आहे." न्यायाधिशांचे बोलणे ऐकून सगळे स्तब्ध झाले. त्या प्रत्येकाने दहा दहा डाॅलरची रक्कम जमा केली. त्यातून 500 डाॅलर जमा झाले. न्यायाधीशांनी ती रक्कम वृध्दाला दिली आणि छोटा व्यवसाय सुरु करा असे सांगीतले. जेणेकरुन तुम्हाला ब्रेडसाठी पुन्हा चोरी करावी लागणार नाही.
*तात्पर्य: माणसाकडे माणूस म्हणून पाहील्याने न्याय होतो. शेवटी "माणूसकी म्हणजे तरी काय माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे* "
* 178) 👑🎤*बोधकथा - कर्मवीर भाऊराव*
कर्मवीर भाऊरावांची कथा. १९४७ मध्ये अण्णांनी सातारा येथे छ. शिवाजी महाराज विद्यालय सुरू केले. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण-सुविधा मोफत देणाऱ्या या महाविद्यालयावर आर्थिक संकट आले. शासकीय अनुदानही काही कारणाने मिळेनासे झाले. यातून बाहेर पडण्यासाठी अण्णांनी पदयात्रा काढून देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. अगदी गिरणी-कामगारांकडून एक-एक रुपयादेखील गोळा केला. ही बातमी खानदेशातील एका धनाढ्या गृहस्थाला समजली. त्याने अण्णांना निरोप पाठविला. 'असे एक-एक रुपया गोळा करण्यापेक्षा मी एकरकमी काही रुपये देतो. फक्त त्या महाविद्यालयाला माझ्या वडिलांचे नाव द्या.' यावर अण्णांनी उत्तर पाठविले, 'एक वेळ मी माझ्या बापाचे नाव बदलेन, पण पैशाच्या लोभाने छत्रपती शिवरायांचे नाव बदलणार नाही.
*तात्पर्य : स्वाभिमान आणि गौरवशाली परंपरेची किंमत पैशात होत नसते.*
* 179) 👑🎤*बोधकथा - सदविचारांची संगत सोडू नका!*
तिरुवल्लुवर हे दक्षिण भारतातील एक महान संत. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी एक शिष्य काही कारणामुळे त्यांना सोडून गेला. बाहेर जाऊन त्यांच्याबद्दल लोकांना उलट-सुलट सांगू लागला. तिरुवल्लूवरांचा एका शिष्याच्या कानावर या वार्ता आल्या, तसा तो अतिशय अस्वस्थ झाला.ताबडतोब महाराजांकडे आला व म्हणाला, "महाराज, आपली बदनामी करणाऱ्या त्या गाढवाला ताबडतोब येथे बोलावून घ्या आणि त्याचा समाचार घ्या. जरा कडक शब्दांत करडपट्टी काढा." यावर स्वामीजी म्हणाले, "राम राम! हे माझ्याने होणार नाही. तो करतो ते निश्चितच अयोग्य आहे. कधीतरी त्याच्या मनाला टोचणी लागेल. त्याला सद्बुद्धी होईल. पण त्याला इथं बोलावून घेऊन मी त्याची निंदा करण्यास सुरुवात केली की मलाही तीच सवय लागेल. मग माझ्यात ईर्ष्या निर्माण होईल. दुसऱ्याची निंदा करण्याची सवय कठीण. मला हे शक्य नाही."
*तात्पर्य : सदविचारांची संगत सोडू नये.*
* 180) 👑🎤* बोधकथा - सरदार व त्याचा घोडा*
*एक सरदार लढाईच्या वेळी आपल्या घोड्याच्या खाण्यापिण्याविषयी फार काळजी घेत असे. पुढे काही दिवसांनी लढाई संपली व त्या सरदाराचा पगार कमी झाला, त्यामुळे तो आपल्या घोड्याला अगदी निष्काळजीपणे वागवू लागला. ज्या घोड्याने पूर्वी त्याला भर लढाईच्या जागी मोठ्या शौर्याने आपल्या पाठीवर नेले होते त्याच घोड्याला तो आता मोठमोठी लाकडे वाहून नेण्याच्या कामाला लावू लागला. शिवाय त्याची काळजी घेईनासा झाला. त्यामुळे घोडा अशक्त होत चालला. पुनः एकदा लढाई सुरू झाल्याची बातमी आली असता सरदाराला लढाईवर जाण्याचा हुकूम आला. सरदार घोड्याची काळजी घेऊ लागला, तो शक्तीशाली व्हावा म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली, पण घोड्याला त्याचे ओझे उचलण्याची ताकद नसल्याने तो वरचेवर अडखळू लागला. मग तो घोडा सरदाराला म्हणाला, 'तू आपल्या निष्काळजीपणाने ही स्थिती प्राप्त करून घेतलीस. माझ्या पाठीवर लाकडं लादून नि माझं खाणं तोडून तू मला घोड्याचा गाढव बनवलंस. अशा स्थितीत लढाईच्या कामी मी जर पूर्वीसारखा तुझ्या उपयोगी पडेनासा झालो तर त्यात माझ्याकडे दोष नाही.'*
* तात्पर्य - एखाद्या प्राण्याची जरुरी नसली म्हणजे त्याला पायाखाली तुडवायचे व जरुरीच्या वेळी मात्र त्याची फार काळजी घ्यायची हे हितकारक नाही.*
* 181) 👑🎤*बोधकथा - तुमची तत्त्वे जपा!*
अलेक्झांडर स्वर्स्की. विमान तयार करण्यात तरबेज असणारा कारागीर. पहिल्या महायुद्धात त्याला आपला एक पाय गमवावा लागला. त्या जागी लाकडी पाय लावून तो दुसऱ्या महायुद्धात काम करत होता. युद्धात जखमी झालेल्या जवानांना दवाखान्यात जाऊन धीर देत होता. आपला पाय कसा गमावला याची हकीकत सांगून तो म्हणे, 'पण एक फायदा झाला. त्या पायाला कितीही जोरात लागलं, तर वेदना होत नाहीत." असे सांगून त्याने एका सैनिकाला एक वेताची छडी दिली व पायावर मारायला सांगितली. त्याप्रमाणे त्या सैनिकाने केले. सगळेजण कुतूहलाने पाहत होते. अलेक्झांडरही साऱ्यांकडे पाहत हसू लागला. म्हणाला, "पाहा मित्रांनो, मला काहीच झालं नाही." सारे जण स्तिमित झाले. त्यांनी आदराने टाळ्या वाजविल्या. त्या खोलीतून बाहेर पडताच अलेक्झांडरने झटकन खाली वाकून आपला पाय धरला. त्याला चोळू लागला. हे पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आश्चर्य वाटून विचारले, "काही त्रास होतोय का अलेक्झांडर?" तेव्हा तीव्र वेदनेने क्षणभर कळवळणारा अलेक्झांडर म्हणाला, "फार नाही. फक्त त्या सैनिकाने चुकीच्या पायावर छडीचा फटका मारला."
*तात्पर्य : आपल्या तत्त्वांच्या जपणुकीसाठी असाच आत्मविश्वास, मनोधैर्य हवे.*
* 182) 👑🎤*बोधकथा - चांगले कर्तृत्व आठवणीत राहते*
एका घरात एक आजी आपल्या दोन नातींसह राहत होत्या. त्यांच्या घरी एक संन्यासी पाहुणा आला. आजीने त्यांना पाहुणचार केला ते सारेजण गुप्पा मारत बसले असतानाच बातमी आली की, शेजारचे कोणी तरी मरण पावले. आजी आपल्या नातीला म्हणाली, 'जा ग ! पाहून ये बरं. त्याला सदगती मिळाली की दुर्गती ?' थोड्या वेळातच नात धावत आली आणि म्हणाली 'आजी त्याला सदगती मिळाली' गप्पा पुन्हा सुरू झाल्या एवढ्यात आणखी कोणी तरी मरण पावले. पुन्हा तसेच घडले. यावेळी मात्र नात परत येऊन म्हणाली, 'आता याला दुर्गती मिळाली' न राहवून संन्याशाने त्या आजीला विचारलं. 'हे कसं शक्य आहे ?" तेव्हा आजी म्हणाली. 'साधी गोष्ट आहे महाराज. जो माणूस मेल्यानंतर माणसे रडतात. त्यांना त्याची पोकळी जाणवते. त्याला सदगती मिळते. तर जो मेल्यावर लोक म्हणतात. 'जमिनीचा भार हलका झाला, पीडा गेली' अशाला दुर्गती मिळते.
*तात्पर्य : आयुष्यात असे कर्तृत्व करावे की, आपण मेल्यानंतरही लोक आपली आठवण काढत राहतील.*
* 183) 👑🎤 * बोधकथा - आळशी रामू*
*एका गावात एक टुमदार बंगला होता. त्या बंगल्याचा मालक श्रीमंत होता. जमीनजुमला, नोकरचाकर, गाडीघोडे अशा सगळ्याच सुखसोयी त्याच्या पदरी होत्या. त्याला सकाळी लवकर उठून स्वत:ची कामं स्वत:च करण्याची सवय होती. सर्व नोकरांनीसुद्धा सकाळी त्याच्याबरोबरच लवकर उठून घरातील इतर कामं करावीत अशी त्याची अपेक्षा असे.
सर्वच नोकर मालकाची आज्ञा पाळून त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असत. पण त्यातील एक नोकर रामू मात्र फारच आळशी होता.त्याला लवकर उठण्याचा फार कंटाळा येई. सूर्य डोक्यावर येईपर्यंत तो झोपून राहत असे. दुपारी उशीरा कामं करण्यासाठी जागा होत असे.त्याचा हा स्वभाव मालकाला आवडत नसे.मालकाने रामूला समजावून पाहिलं. पण रामूच्या स्वभावात काहीच फरक पडत नव्हता. शेवटी मालकाने त्याला धडा शिकवायचं ठरवलं.
मालकाने रामू झोपला असताना त्याच्या खोलीत एक कोंबडा ठेवला. हा कोंबडा त्याचा आवडता होता. पहाटे त्याच्या बांगेच्या आवाजाने मालक उठत असे. निदान कोंबड्याच्या आरवण्याने तरी रामू जागा होईल असा विचार मालकाने केला. पण हा अविचार होता हे नंतर त्याच्या लक्षात आलं. पहाटे सवयीप्रमाणे रामूच्या खोलीतील कोंबडा आरवला. नेहमीपेक्षा फार लवकर झोपमोड झाल्यामुळे रामू वैतागला. कोंबड्याचा त्याला राग आला. तिरीमिरीतच तो उठला आणि रागाच्या भरात खोलीतील चाकूने कोंबड्यावर वार केला. कोंबड्याचा आवाज ऐकून मालक धावतच आला. पण तोपर्यंत कोंबडा जागीच मेला होता. मालकाच्या एकूण प्रकार लक्षात आला. रागावलेल्या मालकाने ताबडतोब रामूला नोकरीवरुन काढून टाकलं. त्याबरोबर रामूचे डोळे खाडकन उघडले. कोंबड्याला मारल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. तो मालकाच्या हातापाया पडू लागला. पण मालकाचा प्रिय कोंबडा मेल्यामुळे रामूचं जरासुद्धा ऐकून घेतलं नाही. रामूचा आततायीपणा नडला. पश्चात्तापाची वेळ निघून गेली होती.
*तात्पर्य- कोणतीही कृती करताना संयम बाळगणं हिताचं असतं.*
* 184) 👑🎤 *️बोधकथा - घामाचा पैसा*
एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.*
अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.*
हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली.*
*तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.*
* 185) 👑🎤 *️बोधकथा - गरुड आणि चिमणी *
*एकदा एक गरुड एका लहान सशाला आपल्या चोचीत पकडून एका झाडावर जाऊन बसला. त्या सशाने गरुडाला बरीच विनवणी करून जीवदान मागितले. त्या झाडावरील एका चिमणीनेही त्याची विनवणी केली व सशाला सोडून देण्यास सांगितले, पण गरुडाने त्यांचे न ऐकता त्या बिचार्याला फाडून खाल्ले. चिमणीला या कृत्याबद्दल फार वाईट वाटले व त्या गरुडाचा सूड घेण्याचा तिने निश्चय केला. गरुडाच्या मागोमाग जाऊन त्याचे घरटे तिने पाहून ठेवले. एक वेळ तो घरी नसताना त्याची अंडी घरट्यातून तिने बाहेर ढकलून दिली. तेव्हा ती अंडी खाली पडून फुटली. दुसर्या वेळी गरुडाने खूप उंचावर घरटे बांधून तेथे आपली अंडी ठेवली. पण चिमणीने तेथूनही ती अंडी खाली पाडून फोडून टाकली. तेव्हा गरुडाने ही सर्व हकीगत वनदेवाच्या कानावर घालून त्याची मदत मागितली. तेव्हा आपल्या मांडीवर अंडी घालण्याविषयी वनदेवाने गरुडाला सांगितले. त्याप्रमाणे गरुडाने वनदेवाच्या मांडीवर अंडी घातली. एकदा वनदेवाचे लक्ष नाही असे पाहून त्या चिमणीने संधी साधून त्याच्या पायाला कडकडून चावा घेतला. तेव्हा वनदेव घाबरून उठला. त्यामुळे ती सर्व अंडी खाली पडून फुटली. नंतर वनदेवाने गरुडाला व चिमणीला आपल्यासमोर बोलावून सर्व हकीगत विचारली. तेव्हा प्रथम खोडी गरुडानेच केली असे त्याला समजले. तेव्हा त्याने चिमणीलाही सोडून दिले.*
*तात्पर्य :जुलमाचे राज्य थोडे दिवस भरभराटीचे दिसले तरी त्याचा नाश व्हायला एखादे क्षुल्लक कारणही फुटते.* * 186) 👑🎤 *️बोधकथा - लाडूची चोरी*
*पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला,''तुम्ही दोघेचजण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,''*
*यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,''देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.'' ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,'' देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.'' दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.*
*तात्पर्य: भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.*
* 187) 👑🎤 *️बोधकथा - राजज्योतिषी*
*अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्योतिष्याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. राजज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले.
या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही.
अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,''तुम्ही भविष्य कसे सांगता'' ज्योतिषी म्हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,''हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत.
अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णुशर्माची आठवण झाली. विष्णुशर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णुशर्माला विचारले,'' तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राजज्योतिषी होणे आवडत नाही काय'' विष्णुशर्माने सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.'' राजाला विष्णुशर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णुशर्माला राजज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
*तात्पर्य: ज्यांचा स्वत:वर व स्वत:च्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.*
* 188) 👑🎤 * बोधकथा - ओळख*
*राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले.
सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.
*तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.*
* 189) 👑🎤 *बोधकथा - मूर्ख डोमकावळा*
एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.
'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली.
तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक डोमकावळा आहे.''
*तात्पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.*
* 190) 👑🎤 * बोधकथा- पिसन हारीची विहीर*
प्राचीन भारतात बालविवाहाची प्रथा होती. याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे त्याकाळी मुलीना अशिक्षित ठेवले जायचे आणि एखाद्या मुलीचा पती मृत्यू पावल्यास तिला आयुष्यभर दुख:च सोसावे लागे. मेहनत आणि मजुरीशिवाय तिच्याकडे पर्याय नसे. अशीच एक गरीब बालविधवा जिचे नाव पिसन हारी पूर्व मथुरेजवळ राहत होती. ती एकटीच होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची. एक दिवस तिच्या मनात गावातून शहराकडे जाणा-या रस्त्यावर एक विहीर खोदण्याचा विचार आला. कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नव्हती. मात्र त्या बिचाऱ्या गरीब विधवेकडे विहीर खोदून घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी तिने विचार केला कि दिवसभरात ती दोन आणे मिळवते त्यातील दोन पैसे पाठीमागे टाकायला पाहिजेत. तिने पैसे जमवायला सुरुवात केली.*
असे करता करता तिने अनेक वर्षे पैसे मागे टाकले. वृद्धावस्थेत तिच्याकडे एक हजार रुपये जमा झाले. (त्या काळी हजार रुपयांना खूप किंमत होती) त्यावेळी तिने आज दिल्ली-आग्रा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर एक पक्की विहीर खोदली. आजही ती विहीर तिच्या नावाने ओळखली जाते. लोक त्या विहिरीला पिसन हारीची विहीर म्हणून ओळखतात. त्या मार्गावर ती गरीब विधवा तिच्या पश्चात पण प्रसिद्ध आहे. लोक तिथे थांबतात, पाणी पितात आणि मनातून तिच्या कार्याचे आभार मानतात.*
*तात्पर्य -मर्यादित साधने असतील पण दृढ संकल्पशक्ती असेल तर अशक्य वाटणारे काम शक्य होते.*
* 191) 👑🎤 * बोधकथा - देवांचा अहंकार*
उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवाकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देव ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हा यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवाकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज आला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला.*
*तात्पर्य :- अहंकार आणि अहंका-याचे पतन निश्चितच होते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास सार्थक होत असते.*
* 192) 👑🎤 * बोधकथा - बुद्धीच सर्वश्रेष्ठ**
दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.
त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.*
*तात्पर्य-बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.*
* 193) 👑🎤 *बोधकथा - गुरुनानक आणि नवाब*
एकदा गुरुनानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले. नवाबानी गुरुदेवांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोघांच्यामध्ये धर्मावर चर्चा सुरु झाली. नवाबानी म्हटले, आपण हिंदू-मुस्लीम यामध्ये काहीच अंतर करत नाही. त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला. नानकदेव म्हणाले,देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे तर मी कोण अंतर करणारा? चला मशिदीत चला. दोघेही मशिदीत गेले.
नवाबसाहेब नमाज अदा करू लागले, नानकही ध्यानमग्न होवून एका मुद्रेत उभे राहिले. नमाज होताच नवाब म्हणाले, आपण तर नमाज अदा केली नाही. नानक म्हणाले, "माफ करा! आपण जेंव्हा नमाज अदा करत होता तेंव्हा माझे मन माझ्या स्वामींकडे होते. त्या वेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मात्र आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय? आपण देवाचा धावा करतो तेंव्हा आपले मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला आहे." नवाब खजिल होवून म्हणाले, "खरे आहे! माझे लक्ष तुम्ही काय करता यात लागले होते. आम्ही देवाकडे काही तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता." गुरु नानक म्हणाले,"आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, नावे वेगळी दिली तरी देव बदलतो काय? तो सर्व पाहत आहे."
*तात्पर्य-ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे.*
* 194) 👑🎤 *बोधकथा - पेला खाली ठेवा*
एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणीला सुरुवात केली.त्यांनी तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थीना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे वजन किती?
५० ग्रम …. १०० ग्रम …..१२५ ग्रम … विद्यार्थीनी उतरं दिले.
जोपर्यंत मी या पेल्याचे वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार कि त्याचे वजन किती."शिक्षक म्हणाले.”
“जर मी हा पेला थोडा वेळ असाचं उचलून धरू तर काय होईल?
काहीच नाही होणार असे विद्यार्थी म्हणाले.
हा पेला मी अजून एक तास उचलून ठेऊ तर काय होईल?असे शिक्षक म्हणाले.
तुमचा हात दुखेल असे एक विद्यार्थी म्हणाला.
खरे आहे पण हा पेला मी पूर्ण एक दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल?
तुमचा हात सुन्न होऊ शकतो , तुमच्या मांशपेशीवर खूप ताण येऊ शकतो, हाताला लकवा मारू सकतो आणि यामुळे तुम्हांला इस्पिताळामध्ये जाणायची वेळ येऊ शकते… असे एक विद्यार्थी म्हणाला आणि त्यांच्या या बोलण्यांवर काही विद्यार्थी हसू लागले.
खूपच छान पण या क्रियेमध्ये पेल्याचे वजन बदलले का? शिक्षक म्हणाले.
उत्तरं आले.. “नाही”.
तर मग हात दूखून, माझ्या मांशपेशीवर ताण का आला.*
विद्यार्थीना या गोष्टीचे आश्चर्य वाटले.शिक्षकाने पुन्हा विद्यार्थीना विचारले या दुखण्यातून सावरण्यासाठी मी काय करू?*
पेल्याला खाली ठेवा. एक विद्यार्थी म्हणाला.
“अगदी बरोबर” शिक्षक म्हणाले.
जीवनात येणाऱ्या समस्या पण काहीशा अशाच आहेत.
या समस्या काही क्षण डोक्यात ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सर्व ठीक आहे.
पण पुन्हा याच समस्या खूप वेळ तुमच्या डोक्यात ठेवा. जर तुम्ही या समस्या खूप वेळ डोक्यात ठेवल्या तर त्या तुम्हाला अपंग करतील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही.
*आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे पण जेव्हा आपण झोपायला जातो,तेव्हा या समस्यांवर जास्त विचार करू नये. यामुळे तुम्ही सकाळी उठल्यांवर तुम्हांला ताजे-तवाने वाटेल.आणि समोरून येणाऱ्या कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्याची तुम्हांला शक्ती मिळेल.*
* 195) 👑🎤 * बोधकथा - रानटी व गावठी हंस*
एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे.
त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले.एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले.
ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.
*तात्पर्य: जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय.*
* 196) 👑🎤 *बोधकथा- जीभ*
ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वयंपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’
रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’
इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’
दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.
*तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.
* 197) 👑🎤 *बोधकथा - नैतिकतेचा आदर्श*
आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु ?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.*
*ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.
* 198) 👑🎤 *बोधकथा - राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*
राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे.
एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता.*
तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला.
अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’
राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’
तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्हणणे आहे.
मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’
*तात्पर्य: कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.*
* 199) 👑🎤 *बोधकथा - शिकारी, कोल्हा व वाघ*
एका शिकार्याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.
*तात्पर्य :अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.*
* 200) 👑🎤 * बोधकथा - विवेक आणि उपकार*
मुल्ला नसिरुद्दीन रात्री जंगलातून जात होते. अचानक गूढ आवाज त्यांच्या कानी पडला. हा भूताखेताचा प्रकार असावा असे वाटून ते घाबरले. त्यांनी हळूच मागे पाहिले तर गुहेत बसलेला एक मनुष्य त्यांना दिसला, मुल्लांनी विचारले ,"कोण आहेस तू?" तो म्हणाला," मी एक फकीर आहे. इथे बसून साधना करतोय." घाबरलेल्या मुल्लांनी रात्र गुहेत घालविण्यासाठी फकिराकडे परवानगी मागितली व ती त्यांनी दिली. थोड्या वेळाने मुल्लांनी फकिराकडे पिण्यासाठी पाणी मागितले, फकिराने एक भांडे देवून नदीवरून पाणी आणण्यास सांगितले. मुल्ला म्हणाले,"मी खूप घाबरलोय! " तेंव्हा फकिराने स्वतः पाणी आणण्यास जातो म्हणाला.
तर मुल्ला पुन्हा म्हणाले,"तुम्ही गेल्यावर मला येथे भीती वाटेल." हे ऐकताच फकिराने कट्यार काढून दिली. फकीर पाणी घेवून परतला तर मुल्ला मोठ्यानी ओरडू लागले,"खबरदार! जर पुढे आलास तर मारून टाकीन !" फकिराने आपली ओळख सांगितली. तर मुल्ला म्हणाला,"कशावरून तू भूत पिशाच्च नाहीस !फकिराचे रूप घेवून भूत पिशाच्च येवू शकते." वैतागून फकीर म्हणाला,"अरे मीच तुला माझ्या गुहेत आश्रय दिला आणि मलाच तू आत येवू देत नाहीस. असली कसली रे बाबा तुझी भीती !" मुल्लाने काही त्या फकिराला रात्रभर गुहेत येऊ दिले नाही. फकीर बिचारा रात्रभर गुहेबाहेर थांबला. सकाळी मुल्ला उठले व जाऊ लागले. जाताना फकिराला म्हणाले,"भाई ! मला माफ करा ! पण भीती अनेकदा माणसाला विवेक सोडायला भाग पाडते. त्यावेळी तो उपकारकर्त्यालासुद्धा विसरतो."
*तात्पर्य- भीतीमुळे माणूस काही वेळेला विवेक गमावतो आणि उपकारकर्त्याला विसरतो, त्याचे उपकार विसरून जातो.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा