नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

विज्ञान दिवस - २८ फेब्रुवारी



विज्ञान दिन विषयावर PDF फाईल पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
विज्ञान दिवस  
👆👆👆👆

*चंद्रशेखर वेंकट रामन* भौतिकशास्त्रज्ञ*
जन्म - नोव्हेंबर ७, १८८८
मृत्यू -  नोव्हेंबर २१, १९७०) 
हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

जीवन
रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगळुरात देखील होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.भौतिकशास्त्र व गणिताचे प्राध्यापक असलेले वडील आणि संस्कृतवर प्रभुत्व असलेली आई अशा विद्वत्तापूर्ण वातावरणात असलेल्या रामन यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा प्रभाव अतिशय लहान वयातच पाहायला मिळत होता. वयाच्या केवळ १६व्या वर्षी पदवी आणि भौतिकशास्त्राचे सुवर्णपदक मिळवणा-या रामन यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच वयाच्या केवळ १८व्या वर्षी पहिला संशोधन निबंध प्रसिद्ध केला. मासे रात्री झोपतात का; रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या सकाळ झाली की कुठे जातात; उंच फेकलेला चेंडू काही वेळाने जमिनीवर येतो, पण मग आकाशातला चंद्र जमिनीवर कसा पडत नाही; असे एक ना दोन, अनेक प्रश्न बालवयात पडतात. कालांतराने वाढत्या वयाबरोबर जसजसं ज्ञान वाढत जातं, तशी काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काही प्रश्न तसेच मनात अनुत्तरित राहतात, तर काही प्रश्न आपण काळाच्या ओघात विसरूनही जातो.

आकाश निळे का दिसते, हा असाच एक प्रश्न – कधीतरी आपल्या मनात आलेला; आणि या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे फारसं काही अडत नसल्याचे लक्षात आल्यावर विस्मृतीत गेलेला! नेमका हाच प्रश्न सर सी. व्ही. रामन यांना पडला होता. युरोपातून समुद्रमार्गे भारतात येत असताना दिसणाऱ्या विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाचा निळा रंग रामन यांच्यातल्या संशोधकापुढे प्रश्न निर्माण करत होता.. यातूनच भारतीय विज्ञान क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारा म्हणजे सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी लावलेला ‘रामन इफेक्ट’ हा शोध. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी त्यांनी लावलेला हा शोध समस्त भारतीयांची मान उंचावणारा तर होताच पण जागतिक विज्ञानामध्ये द्रव्य आणि त्यातून उत्सर्जित होणा-या ऊर्जेचा अभ्यास करणा-या ‘स्पेक्ट्रोस्कोपी’ या शाखेमध्ये क्रांती घडवणारा होता. रामन यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे भारतातील वैज्ञानिक प्रगतीचे एक नवे पर्व सुरू झाले व ही प्रक्रिया निरंतर सुरूच असून भारताला महासत्ता बनवण्यामध्ये ही वैज्ञानिक प्रगती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रामन इफेक्ट म्हणजे काय?
प्रकाशाचे हे विखुरणे किंवा अपस्करण या संकल्पनेमुळे झपाटले गेलेल्या रामन यांनी प्रयोग करण्याचा सपाटा लावला. त्यांनी घनरूप पदार्थाबरोबरच द्रवरूप पदार्थाकडून परावर्तित होणा-या प्रकाशाचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये त्यांना के. एस. कृष्णन यांचे सहकार्य लाभले. रामन यांनी त्यासाठी विविध प्रयोग तर केलेच पण त्याचबरोबर त्यांनी गणिती मोजमापे करूनही त्यांच्या सिद्धांताला बळकटी दिली. प्रकाशकिरणांच्या मार्गात येणा-या रेणूंमुळे त्यांचे विचलन होऊन तरंगलांबीमध्ये(वेव्हलेंग्थ) बदल होतो, असा सिद्धांत रामन यांनी मांडला. ज्यावेळी धूळमुक्त वातावरणात प्रकाश किरण एखाद्या पारदर्शक रासायनिक मिश्रणातून प्रवास करतात त्यावेळी त्या प्रकाशकिरणामधील काही भाग मूळ दिशेपासून विचलित होतो. या विचलित झालेल्या भागाची तरंगलांबी मूळ किरणांप्रमाणेच असते, मात्र काही ठरावीक भागाच्या तरंगलांबीत बदल होतो, यालाच रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. रामन यांचा हा शोध क्रांतिकारक ठरला. रामन यांच्या संशोधनामुळे विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे, रचनेसंबंधीचे भांडारच खुले झाले. रामन यांच्या संशोधनानंतर केवळ १० वर्षांमध्ये दोन हजारांहून जास्त रासायनिक संयुगांची रचना ‘रामन इफेक्ट’च्या सहाय्याने निश्चित केली गेली. लेसर किरणांच्या शोधानंतर ‘रामन इफेक्ट’ हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण साधन ठरलं. या परिणामामुळे द्रव आणि वायूरूप पदार्थामध्ये होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास करणं सोपं झालं.
संशोधन
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करिता ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
युरोपमध्ये एका पार्टीमध्ये त्यांना मद्य घ्यायचा आग्रह झाला. दारूला स्पर्शही न करणारे रामन उद्गारले, “तुम्ही ‘अल्कोहोल’वर ‘रामन परिणाम’ पाहू शकता, पण ‘रामन’वर ‘अल्कोहोल’ परिणाम.. कदापि नाही.” रामन परिणाम हा शोध त्यांनी फक्त २०० रुपयांची साधनसामग्री वापरून सिद्ध केला होता. 
सन्मान
चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धिसाठी पाठवला होता.
कोणतीही अत्याधुनिक साधनसामग्री न वापरता केलं असलं तरी आपलं संशोधन नोबेल पुरस्कार मिळण्याच्या योग्यतेचं असल्याची रामन यांना खात्री होती. त्यामुळे या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाल्यावर त्यांना निश्चितच आनंद झाला. पण, त्यांच्या या आनंदाला दु:खाची एक किनार होती. रामन यांनी म्हटलं आहे, ‘‘नोबेल पुरस्कार प्रदान समारंभाला जमलेल्या लोकांकडे पाहिल्यावर मला वाटलं की, जणू हा गोऱ्या लोकांचा महासागर आहे. डोक्याला पगडी बांधलेला मी एकमेव भारतीय या सभागृहात आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या समोर त्यांच्या देशाचा ध्वज आहे, पण माझ्यासमोर माझ्या देशाचा ध्वज नसून ब्रिटिशांच्या युनियन जॅकसमोर मी उभा आहे. आज हा नोबेल पुरस्कार स्वीकारताना माझ्या देशाचा ध्वज माझ्यासमोर नाही, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते’’.
इतर शास्त्रज्ञ
1) आर्यभट्ट गणितज्ञ माहिती मराठी
जन्म – इ.स. ४७६
मृत्यू- इ.स. ५५०
उल्लेखनीय कार्य– जगाला दिलेली शून्याची देणगी.
शून्य ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी अमूल्य देणगी आहे असे आपण म्हणतो पण याच शून्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न जर आपणास विचारला तर लगेच उत्तर येते आर्यभट्ट. याच आर्यभट्टाचा जन्म शके ३९८ म्हणजेच इ.स. ४७६ मध्ये बिहारमधील पाटलीपुत्र येथे झाला. हा सामान्य आर्यभट्ट आपल्या असामान्य कर्तुत्वाने इतिहासात अजरामर झाला. आर्यभट्टांचे बालपण तसेच त्यांचे उर्वरित आयुष्य पाटलीपुत्र मध्येच गेले. त्यांनी लिहिलेल्या खगोलशास्रीय ग्रंथात प्रथम ‘आर्यभटिय’ किंवा आर्यसिद्धांत हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथास आर्यभटिय हे नाव स्वतः आर्यभटानीच दिले आहे. त्यास त्यांचे शिष्य आर्यासिद्धांत असे म्हणत असत. याच आर्यभटीय ग्रंथात दशगीतिका व आर्यष्ठशत असे दोन भाग आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हे दोन भाग नाहीत तर ते दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्हीही ग्रंथ हे एकमेकांवर अवलंबून असल्याने यास एकच ग्रंथ मानता येईल. त्यास पद असून फक्त एकशे एकवीस श्लोक आहेत.
आर्यभट्ट यांच्या दशगीतिका भागातील तेरा श्लोकापैकी दहा श्लोकात हे ग्रहभगणासंबंधी विवेचन केले आहे (भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्रमंडळातून एक प्रदक्षिणा) तर इतर तीन श्लोक हे प्रार्थनेवर आधारित आहेत. त्यांनी लिहिलेल्या चार पदे –
१) गीतिका पाद
 २) गणितपाद
 ३) कालक्रियापाद
 ४) गोलपाद.
 त्यासोबतच बीजगणित, भूमिती, अंकगणित या गणिती शाखांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांनी बीजगणित व ज्योतिषशास्रावर वयाच्या तेविसाव्या वर्षी ग्रंथ लिहिला. त्यामुळे त्यांना बीजगणिताचे जनक असेही म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते म्हणजेच तिला स्वताची दैनंदिन गती आहे हे सांगणारे आर्यभट्ट हे पहिले शास्रज्ञ होते. आर्यभट्टने वर्षातील ३६५ दिवस, १५ घटी, ३९ पळे व १५ विपळे इतक्या सूक्ष्म भागापर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. त्यांनी पाय नावाच्या संकल्पनेची ६३,८३२/२०००० आहे असेही नोंदवले आहे. त्याने सूर्य सिद्धांतावर लिहिलेला टीका ग्रंथ सूर्य सिद्धांत प्रकाश या नावाने प्रसिध्द आहे. आर्यभट्ट यांनी खगोलीय निरीक्षणात ११ ऑगस्ट इ.स. ५१९ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल त्यांना समाजाच्या रोषास सामोरे जावे लागले होते. त्यांना समाजाने बहिष्कृत केले होते. पण शेवटी त्यांनी सिद्ध केले की अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडून जगाचा, ग्रहाच, तार्यांचे निरीक्षण करायला हवं. आज त्यांच्यामुळेच कितीही मोठी आकडेमोड क्षणात होते. त्यामुळे त्यांना He is Good Mathematician असे गौरवल गेल. त्यांचा मृत्यू  इ.स.५५० मध्ये झाला.
भारत सरकारने त्यांच्या गौरवार्थ १९ एप्रिल १९७५ मध्ये आर्यभट्ट नावाचा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला.

2) डॉ. होमी जहांगीर भाभा
जन्म- ३० ऑक्टोबर १९०६ ( मुंबई)
मृत्यू- २४ जानेवारी १९६६ (माँत, ब्यांको, इटली.)

विशेष कार्य-
डॉ.होमी भाभा हे भारतीय अणुशास्रज्ञ होते. त्यांनी भारतात अणुउर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचला म्हणून त्यांना भारताच्या अणुउर्जा व अण्वस्र विकासकार्याचे प्रणेते मानले जातात.
भारताला जगाच्या पंक्तीत नेऊन बसवणारे डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारशी कुटुंबात झाला. वडील पेशाने बॅरीस्टर असल्याने घरात पुस्तकांची रेलचेल असायची. त्यात विज्ञानाची खूप पुस्तके होती. त्यामुळे लहानपणापसूनच त्यांची पुस्तकांशी मैत्री जमली. त्यासोबतच त्यांना चित्रकला, कविता व वक्तृत्व करण्याचाही छंद होता. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईमध्येच झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी इंजिनियरिंग करावी. पण भाभांनी वडिलांना स्पष्टपणे सांगितले कि मला भौतीकशस्र व गणित या विषयांची आवड आहे. वडिलांनी त्यांना आधी इंजिनियरिंग व मग तुला काय करायचे आहे ते कर असे सांगितले. तेव्हा वडिलांच्या परवानगीनंतर भाभांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला व  १९३० साली ते प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. त्यावेळी ते पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचाही अभ्यास करत होते. त्यासोबतच कॅव्हेंडीश लॅबोरटरीत न्युक्लीयर फिजिक्सचाही अभ्यास करून त्यांनी इ.स.१९३३ मध्ये डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांनी अनेक शिष्यवृत्या व बक्षिसेही मिळवली होती.
इ.स.१९४० साली परदेशातून परत आल्यावर त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगरूळ येथे काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केले. तसेच १९४५ मध्ये त्यांनी टाटा मुलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास मदत केली. डॉ. होमी जहांगीर भाभा आपले संशोधन कार्य संभाळून टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन अणुउर्जा आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे संचालक म्हणून ते स्वताच काम पाहू लागले. त्यांनी केलेल्या अपार कष्टाच फळ म्हणूनच भारत देशात अणुभट्ट्याची स्थापना होऊ शकली. ज्यावेळी पश्चिमी देशातील शास्रज्ञ अल्पविकसित देशांच्या अणु कार्याक्रमाच्या विरोधात होते तेव्हा अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच औद्योगिक विकासासाठी व्हावा अस स्पष्ट मत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अणुभट्ट्या सुरु करून त्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जाऊ लागला. सर की.व्ही. डॉ. होमी जहांगीर भाभा  विषयी बोलतांना म्हटले होते कि भाभा हा भारताचा लिओनार्डो द विन्ची आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत कमी संशोधकांच्या साथीने भारतीय अवकाश संशोधनाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आल होते. त्यांना भारतीय संशोधनातील पूर्ण पुरुष असाही म्हटलं जत असे. त्यांचा मृत्यू संयुक्त राष्ट्र सभेच्या बैठकीला जात असतांन २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रांसच्या सरहद्दीजवळ विमान अपघातात झाला आणि भारतीय संशोधनातला हिरा हरवला.

3) विजय पांडुरंग भटकर
जन्म- ११ ऑक्टोबर १९४६
विशेष कार्य-
महासंगणकाची निर्मिती करून भारताला तंत्रज्ञानाच्या जगात मजबूत अस्तित्व निर्माण करून दिले.
डॉ विजय पांडुरंग भटकर यांचा जीवनप्रवास
अमेरिकेने घातलेल्या तंत्रज्ञानाच्या अटी नाकारून भारताला तंत्रज्ञानाच्या जगात मजबूत अस्तिव निर्माण करून देणारे  सुपरकम्पुटरचे जनक विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा या अडीचशे ते तीनशे लोकवस्तीच्या गावात झाला. महान महत्वाकांक्षा आणि चाणाक्ष बुद्धीमत्ता यांमुळे ते सर्वांचे प्रिय होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरंबा येथे तर शालेय शिक्षण करजागाव या ठिकाणी झाले. त्यापुढील इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ते पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण मुर्तीजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा तसेच दिल्ली या ठिकाणावरून पूर्ण केले. त्यावेळी त्यांना परदेशी नोकर्यांची अनेक आमंत्रणे येत असतांना त्यांनी भारत मातेची सेवा करण्यासाठी देशातच राहायचं ठरवलं.
त्यावेळी विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली १९६८ साली इलेक्ट्रोनिक्स कमिशनची स्थापना झाली. तेव्हा भटकरांना त्या कमिशनवर तब्बल दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यासोबतच भटकर हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचारसाठी १९७२ मध्ये नेमलेल्या महत्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रोनिक्स रिसर्च अॅँड डेव्हलपमेंट हि भारतातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेची स्थापना केली. तसेच त्यांनी १९८०-१९८७ या काळात या संस्थेचे संचालक पदही भूषवले. विजय भटकरांनी अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लांट मध्ये सुधारणा करून दिल्या. वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता येथील भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली डॉ विजय भटकरांनी विकसित केली. केरळमध्ये आठरा कारखाने उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. ते १९८७ मध्ये टाटा कन्सलटीत उपाध्याक्षाही झाले.
अमेरिकेने भारताला संगणक विक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून कोणताही अनुभव पाठीशी नसतांना डॉ. विजय भटकर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शब्दाखातर त्यांनी स्थापन केलेल्या पुणे विद्यापीठातील सी.डॅक या संस्थेत काम करण्यासाठी आले. त्यांनी महासंगणक परम-८०० हा संगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किमतीच्या अगदीच निम्म्या किमतीत व निम्म्या वेळेत बनवला. त्यानंतर त्यांची झेप उंचच राहिली. त्यांनी १९९८ मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम हा संगणक सर्वश्रेष्ठ आहे. हा संगणक प्रती सेकंद अब्ज गणिते सोडवू शकतो. अंतराळातील संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकिय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी परम संगणक उपयोगी पडत आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेचा संगणक अमेरिका व जपान वगळता फक्त भारतात आहे. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना संगणकाच प्रशिक्षण दिले व संगणक साक्षर बनवले. आज भारत जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे त्यामागे डॉ विजय भटकर यांचे प्रचंड परिश्रम आहेत.
त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल आहे. त्यापैकी महाराष्ट्र भूषण, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत.

4) जयंत विष्णू नारळीकर
जन्म- १९ जुलै १९३८ (कोल्हापूर)
विशेष कार्य-
डॉ जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्या सोबत कान्फोर्माल ग्रॅविटी थियरी मांडली.
जीवनप्रवास-
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर या सुप्रसिध्द गणितज्ज्ञाच्या घरी झाला. जयंत नारळीकरांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांचे शालेय शिक्षण बनारस येथेच झाले. त्यांनी इ.स.१९५७ साली विज्ञानात पदवी संपादन केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटन मधील केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी बीए, एमए, पीएचडी च्या पदव्या संपादन केल्या. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम करून रँगलर ही पदवी संपादन केली.  त्यांनी अत्यंत मानाचे असणारे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार व बक्षिसे पटकावली.
त्यांचा विवाह १९६६ साली मंगला राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत. गीता, गिरीजा व लीलावती. ते १९७२ साली पुन्हा भारतात परतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा संशोधन संस्थेच्या खगोलशास्र या विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. त्यानंतर पुणे येथील १९८८ साली आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
डॉ. नारळीकरांनी स्थिर स्थिती सिद्धांत मांडला. तसेच चार दशकाहून अधिक काळापासून त्यांनी खगोलीय क्षेत्रात संशोधन सुरु आहे. माणसाला खगोलशास्र समजण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तक लिहिली आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी नभात हासते तारे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. तसेच चार नगरांतील माझे विश्व हे डॉ नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे.
त्यासोबतच त्यांना १९६५ व २००४ साली पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर २०१० मध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

विज्ञानाचे  सोपे प्रयोग

विज्ञानाचे  सोपे प्रयोग संकलित लिंक ,
विनंती – कृपया सदर विडीओ लिंक जास्तीत विद्यार्थी तथा विज्ञान शिक्षकांपर्यंत शेयर करावी.
PART 1
001 ELECTRIC BELL
https://youtu.be/7TqI8aiWu8M
002 ELECTRIC MAZE
https://youtu.be/3ap2Q9nVFa8
003 CONDUCTORS AND INSULATORS
https://youtu.be/3SEHLnDy-8U
004 ELECTRICAL RESISTANCE OF MATERIALS
https://youtu.be/fyVHqxizQF0
005 CHANGE IN ELECRTICAL RESISTANCE DUE TO DIMENSION
https://youtu.be/Hg4dpKmHxd8
006 series and parallel circuits
https://youtu.be/LLg87NaNAh8
007 Human battery
https://youtu.be/OHoXM7mbjVk
008 Freely suspended magnet
https://youtu.be/gFG38MIFKKc
009 MAGNETIC SPRING
https://youtu.be/BtF2hgS-6d8
010 Magnetic field visualization using compasses
https://youtu.be/DBxvoOKcuB8
011 Magnetic effect of electric current with compass
https://youtu.be/7wgw_aXXH4M
012 SHAPE OF EARTH DUE TO ROTATION-
https://youtu.be/brSr_9Fj1g8
013 The Climbing monkey-
https://youtu.be/jP-kEjiAWQ0
14 Conservation of momentum
https://youtu.be/V6Jm0qVbEfs
015 Double cone-
https://youtu.be/YRWItkYtsDo
016 Self-Balancing doll
https://youtu.be/a0UfodATAOs
017 TOWER OF PISA-
https://youtu.be/n7SIjAqtOkw
018 Bed of nails-
https://youtu.be/veYLpZ-HCVs
019 The Floating Ball
https://youtu.be/ueB1yvzjDY4
020 Heat spiral
https://youtu.be/3oRgq7DrJDo
021 Bernoulli balls
https://youtu.be/xQV1CDgLn9U
022 mmagic water tap
https://youtu.be/GM8nD8vWRO8
023 Archimedes' Screw
https://youtu.be/anLEm0nPfaU
024 Simple machines-To understand the functions of Lever- Pulley-
https://youtu.be/Vqz1b1IFD_w
025 WHEEL AND AXLE LOAD LIFTING  -
https://youtu.be/SLFVIrTpRIQ
026 Anamorphose-
https://youtu.be/YYN6E6-JnDI
027 Combined vision
https://youtu.be/fERHNIkhvac
028 zoetrope-
https://youtu.be/i4ukqwImUfI
029 coloured shadows-
https://youtu.be/NE2Ac2e_naU
030 Periscope-
https://youtu.be/iQFcGxrJ4sQ
031 viscosity-
https://youtu.be/fB87A4mkOWo
032 Thaumatrope-
https://youtu.be/EKHEsPCJkDE
033 Internal reflection Tube-
https://youtu.be/-XZwRNZcrS4
034 Newton's Disc
https://youtu.be/PBjSDbbUY0I
035 Benham's disc-
https://youtu.be/xkSlNUDcLCQ
036 MULTIPLE REFELECTION OF LIGHT
https://youtu.be/JqWjK0Dv_w4
037 Human kaleidoscope-
https://youtu.be/E58uYI1_Qpk
038 The odd dining table
https://youtu.be/VGZ0UIAUe4s
039 Reflection & Transmission
https://youtu.be/BvcICm6vKsI
040 Lateral shift
https://youtu.be/hhM-tKzrv-s
41 Angle of vision/दृष्टीचा कोन
https://youtu.be/Wd4FdOhULyU
42 Day & Night
https://youtu.be/25ApTpd1WyU
43 The Universe- Solar System
https://youtu.be/GFqitLJda2c
44 SATELLITES
https://youtu.be/SwGZIKvTVfU
45 Heat absorption-
https://youtu.be/K3rgAMYb-R0
46 HAND POWERED GENERATOR
https://youtu.be/ZZ6l2BGNk_0
47 RADIOMETER
https://youtu.be/wXb9xvBfhUM
48 Solar kit
https://youtu.be/lFb08ii4HiM
49 Simple Pendulum
https://youtu.be/e7TgiI1LFPI
50 Pendulums of varying lengths
https://youtu.be/ZYSZw_E87As

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले