नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

जागतिक महिला दिन .. ८ मार्च

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

असा आहे इतिहास
🎯 *महिला दिन आणि जीवसृष्टी*
काल जागतिक महिला दिन साजरा झाला. जसे आपण हा दिवस साजरा करतो, तसेच प्राणीसुद्धा करत असतील का, असा विचार मनात येऊन गेला. एखादी सिंहीण आपल्यासाठी काय काय करते, असा विचार सिंहाने कधी केला असेल का? ‘आई कुठे काय करते..’ असा विचार एखाद्या वाघिणीचा बछडा करत असेल का?
प्राण्यांमध्ये नर आणि मादी यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. आशिया आणि आफ्रिकेतील मादी सिंह आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असते. तिने केलेली शिकार संपूर्ण कुटुंबासाठी असते. काही वेळा तर मादी आपण केलेली शिकार नराला देतसुद्धा नाही.. ऑक्टोपस, जायंट वूड स्पायडर, प्रार्थना कीटक या प्रजातींतील माद्या मैथुनानंतर नरांना गिळंकृत करतात.. मधमाश्यांमध्ये तर नरांचा जन्म हा केवळ आपला वंश पुढे नेण्यासाठी झालेला असतो. पोळ्याची प्रमुख राणी माशी असते. तिची काळजी घ्यायला कामकरी माश्या असतात. नराचे काम फक्त पुनर्निर्मितीचे.. डासांमध्ये आपल्याला चावणारी मादीच असते; कारण नर डास केवळ फुलांच्या रसावर जगतो. मादीला अंडी तयार करताना काही प्रथिनांची आवश्यकता असते, जी रक्तामधून मिळतात.. स्पॉटेड हाएना किंवा ठिपकेदार तरस या प्राण्याची मादीदेखील अतिशय कणखर आणि संपूर्ण चमूची जबाबदारी सांभाळणारी असते. यांच्या चमूमध्ये जवळपास १०० तरस असतात.. आपल्यापैकी बहुतांश जणांचा लाडका प्राणी हत्ती. आशिया आणि आफ्रिकेतील हत्ती प्रजातींमध्ये हत्तिणीला जास्त महत्त्व आहे. त्यांच्याही चमूचे नेतृत्व हत्तीण करते. जेव्हा नर हत्ती वयात येतो, तेव्हा तो चमू सोडून एकटा राहतो; परंतु त्याच्या कुटुंबाला हत्तीण सांभाळते.. प्राण्यांप्रमाणेच बहुतांश शिकारी पक्ष्यांच्या माद्या नरांपेक्षा आकाराने मोठय़ा तसेच बळकट असतात.. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मनुष्यप्राणीदेखील याच निसर्गाचा एक घटक आहे. मात्र, काळाच्या ओघात आपण निसर्गापासून दूर होत आलो आहोत. त्यामुळेच प्राणी प्रजातींमधील मादीला निसर्गात एवढे महत्त्व असताना, फक्त मनुष्यप्राणी प्रजातीमध्ये तिला कमी लेखले जाते. तिला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडावे लागते. आपल्याला महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी महिला दिन साजरा करावा लागतो. हे योग्य आहे का? थोडा विचार करून पाहा.
🏃🏻‍♀👮‍♀👩‍🎓👸🏻👩‍🚀👩🏻💃
*जागतिक महिला दिन*
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
⛲ *इतिहास*
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
🇮🇳 *भारतात*
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.
महिला दिन-मातृदिन
काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.
🌹 *शुभेच्छा देण्याची पद्धती*
इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. . तुम्हीसुद्धा 8 मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची तयारी करत असाल ना. कदाचित आतापर्यंत काहींना शुभेच्छाही पाठवल्या असतील.🌹🌷🌺
*मात्र, आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो आणि याची सुरुवात कधी झाली, हे तुम्हाला माहिती आहे का?*
जगभरात गेली कित्येक वर्ष लोक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
*जागतिक महिला दिन कधी सुरु झाला?*
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या - चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा.
या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.
*हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना कशी सुचली ?*
ही कल्पनासुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
सर्वप्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. मात्र, तांत्रिकदृष्ट्या यावर्षी आपण 109वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत.
1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.
पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती 'Celebrating the Past, Planing for the Future' (भूतकाळाचा आनंद, भविष्यासाठी योजना).
8 मार्च हीच तारीख का?
8 मार्च रोजीच महिला दिन का साजरा करतात, हा प्रश्न तर तुम्हालाही पडला असेल. खरंतर क्लारा जेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नव्हती.
🙋‍♀ *महिला दिन*
1917 साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी 'ब्रेड आणि पीस' (भाकरी आणि शांतता) अशी मागणी केली. महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो का?
तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो. जागतिक पुरूष दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा करतात. 1990 सालापासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी अजून त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.
60 हून जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांचं आरोग्य, जेंडर रिलेशन, लैंगिक समानता आणि सकारात्मकतेला चालना देणं, हा यामागचा उद्देश आहे.
जगभरात कसा साजरा होतो आंतरराष्ट्रीय महिला दिन?
अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुट्टी असते. रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वधारतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री-पुरुष एकमेकांना फुलं देतात.
चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते. तर अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना 'Women's History Month' म्हणून साजरा करतात.
"आम्ही महिलांना मताधिकार देतो. महिला दिन, 8 मार्च 1914. आतापर्यंत भेदभाव आणि प्रतिक्रियावादी मनोवृत्तीमुळे महिलांनी कामगार, माता आणि नागरिक या नात्याने कर्तव्यनिष्ठपणे कर्तव्य बजावलेल्या आणि नगरपालिका तसेच राज्याकडे कर लादल्या गेलेल्या पूर्ण नागरी हक्कांपासून वंचित ठेवले आहे. पैसे द्यावे लागतील. प्रत्येक स्त्रीने या नैसर्गिक मानवी हक्कांसाठी दृढ आणि अटल हेतूंनी संघर्ष केला पाहिजे. या युद्धामध्ये कोणत्याही प्रकारची स्थिरता किंवा विश्रांती घेण्याची परवानगी नाही. सर्व महिला आणि मुलींनी रविवारी, 8 मार्च 1914 रोजी दुपारी 3 वाजता 9 व्या महिला सभेत सामील होण्यासाठी यावे. "
*हेतू*
_नागरिक जागृती दिन महिला व मुलींचा, लैंगिकता विरोधी दिन_
काही क्षेत्रांमध्ये, दिवसाची राजकीय उत्पत्ती गमावली आहे आणि आता 'मदर्स डे' आणि 'व्हॅलेंटाईन डे'प्रमाणेच महिलांवरील त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचा हा एक प्रसंग आहे. तथापि, इतर क्षेत्रांमध्ये अद्यापही महिलांच्या राजकीय आणि सामाजिक उन्नतीसाठी ते संयुक्त राष्ट्रांनी निवडलेल्या राजकीय आणि मानवी हक्कांच्या थीमसह जोरदारपणे साजरे केले जाते. काही लोक जांभळा रिबन घालून हा दिवस साजरा करतात.
पहिला दिवस न्यूयॉर्क शहरात १ 190 ० in मध्ये समाजवादी राजकीय कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात आला होता. १ 17 १ In मध्ये सोव्हिएत युनियनने त्या दिवसाला राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आणि ती इतर आसपासच्या देशांमध्ये पसरली. आता हा पूर्व अनेक देशांमध्येही साजरा केला जातो.
*इतिहास*
अमेरिकेत सोशलिस्ट पक्षाच्या आवाहनावर हा दिवस 24 फेब्रुवारी 1909 रोजी प्रथम साजरा करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यास सुरुवात झाली. 1910 मध्ये समाजवादी आंतरराष्ट्रीय च्या कोपेनहेगन परिषदेत याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला होता. त्या काळी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळविणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट होते कारण त्या काळी बहुतेक देशांमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता.
1914 मध्ये, रशियाच्या महिलांनी महिला दिनाच्या दिवशी भाकर आणि कपड्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. हा संपही ऐतिहासिक होता. अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा हक्क देऊन झारने सत्ता सोडली. त्यावेळी ज्युलियन दिनदर्शिका रशियामध्ये होती आणि उर्वरित जगात ग्रेगोरियन कॅलेंडर. या दोन तारखांमध्ये काही फरक आहे. ज्युलियन कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी 1914 चा शेवटचा रविवार 23 फेब्रुवारीला होता, ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार तो दिवस 6 मार्च होता. यावेळी, ग्रेगोरियन कॅलेंडरर जगभरात (अगदी रशियामध्येही) कार्यरत आहे. म्हणूनच 7 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.
प्रसिद्ध जर्मन कार्यकर्त्या क्लारा झेटकिनच्या जोरदार प्रयत्नांमुळे 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि सार्वजनिक सुट्टीला या दिवशी मान्यता दिली. याचा परिणाम म्हणून 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि जर्मनी येथे पहिला आयडब्ल्यूडी आयोजित करण्यात आला होता. तथापि, महिला दिनाची तारीख अखेर 1921 मध्ये 8 मार्च करण्यात आली. त्यानंतर, 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा केला जातो.
🤷♀ *जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!*

नारी शक्ती चा उत्सव म्हणजेच : जागतिक महिला दिन
मित्रानो महिलांमध्ये अपार शक्ती आणि क्षमता आहेत. व्यावाहारीक जगात सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपली कीर्ती स्थापित केली आहे. आपल्या अद्भुत साहस, अथक परिश्रम तसेच दूरदर्शी बुद्धिमत्तेच्या जोरावर विश्वपलटावर स्वतःची अशी एक ओळख बनविण्यात ती यशस्वी झाली आहे. मानसिक संवेदना, करुणा, वात्सल्य अश्या भावनांनी परिपूर्ण असलेल्या अनेक स्त्रियांनी जग निर्माण करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. अश्याच या स्त्रियांचे व्यक्तित्व तसेच कार्यत्वाला संक्षिप्त अशी ओळख करून देण्याचा प्रयत्न महिला दिनाच्या दिवशी केला जातो.

अश्याच काही महिलांचे कर्तुत्व जाणून घेऊया
एक असा क्षेत्र, जिथे महिला सक्षमीकरण करण्याच्या वाटेवर आहेत आणि आपल्या पक्षाची मजबूत बाजू दाखवत आहेत. हा क्षेत्र म्हणजे देशाची सुरक्षा (देशाचे सैन्य). देशाची सुरक्षा खूप महत्वाची आहे, तर मग या क्षेत्रात देखील महिलेची भागेदारी कमी का आकारली जावी. देशाच्या मिसाईल सुरक्षेमध्ये असलेले ५००० किलोमीटर अग्नीक्षामक वाला मिसाईल म्हणजे "अग्नी-५" , या मिसाईल चे संपूर्ण परीक्षण करून जगाच्या नकाशात भारताचे नाव लौकिक करणारी महिला म्हणजे "टेसी थॉमस".
डॉ. टेसी थॉमस यांना काही लोक ‘मिसाइल वूमन' म्हणून ओळखतात, तर काहींनी त्यांना 'अग्नी-पुत्री' अशी पदवी दिली आहे. गेले २० वर्षांपासून टेसी थॉमस ह्या क्षेत्रात खंबीर पणे उभ्या आहेत. डॉ. टेसी थॉमस ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्या देशाचा मिसाईल प्रोजेक्ट सांभाळत आहेत. डॉ. टेसी थॉमस यांनी हे यश असेच सहज नाही मिळवले, त्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. साधारणपणे रणनैतिक अवजारे आणि परमाणु क्षामक मिसाईल वाल्या क्षेत्रात फक्त पुरुषांचे वर्चस्व असायचे परंतु ह्या धारणेला तोडून डॉ. टेसी थॉमस ने सिद्ध केल कि उंच भरारी हि हिमतीच्या जोरावर देखील घेतली जाऊ शकते.

डॉ. किरण बेदी, भारतीय पोलीस सेवेची प्रथम वरिष्ठ महिला अधिकारी आहे. त्यांनी वेगेवगळ्या पदांवर राहून आपल्या कार्यकुशलतेची ओळख करून दिली. त्यांनी संयुक्त आयुक्त पोलीस प्रशिक्षण तसेच दिल्ली पोलीस स्पेशल आयुक्त (खुफिया) या पदावर काम केले आहे. ‘द ट्रिब्यून’ च्या वाचकांनी त्यांना ' वर्षाची सर्वश्र्ष्ठ महिला ' म्हणून निवडले. त्यांच्या मानसिक तसेच निडर दृष्टिकोनामुळे पोलीस कार्यप्रणाली तसेच कैदिंसाठी अनेक आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान आहे.
खेळाच्या क्षेत्रात देखील महिलांनी आपले वर्चस्व यशस्वी पणे बनवले.
भारतीय ट्रैक ऍण्ड फ़ील्ड ची राणी मानली जाणारी 'पी.टी.उषा' भारतीय खेळत १९७९ पासून आहे. त्या भारतीय खेळाडूपैकी आता पर्यंतच्या उत्कृष्ठ खेळाडू मानल्या जातात. त्यांना "पय्योली एक्स्प्रेस" हि उपमा देण्यात आली आहे. १९८३ मध्ये सियोल येथे झालेल्या दहाव्या एशियाई खेळांमध्ये धावण्या मध्ये , पी.ती.उषा यांनी ४ सुवर्ण व १ रोप्य पदक पटकावले.
एक भारतीय महिला बॉक्सर आहे, 'मेरी कॉम'पाच वेळा विश्व बॉक्सर प्रतीयोगीतेमध्ये विजेत्या राहिल्या आहेत. २ वर्षाच्या अभ्यासाने व प्रोत्साहाने त्यांनी परत खेळात सहभागी होऊन सलग ४ वेळा विश्व गैर-व्यावसायिक बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यांच्या या वापसी वर प्रभावित होऊन एआइबीए ने त्यांना 'मॅग्नीफ़िसेन्ट मैरी (प्रतापी मैरी)' या नावाने संबोधले. त्या २०१२ च्या लंडन ओलम्पिक मध्ये महिला बॉक्सिंग मध्ये भारताकडून सहभागी होणारी एकमेव महिला होती.


'मेरी क्युरी' ह्या भौतिक व रसायनशास्त्रात विख्यात होत्या. मेरी यांनी रेडियम चा शोध लावला. विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये (भौतिक व रसायन विज्ञान) मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या प्रथम महिला आहेत. ह्या वैज्ञानिक आईच्या दोन्ही मुलीनी देखील नोबेल पुरस्कार प्राप्त केले आहे.

ह्या सगळ्या महिलां व्यतिरिक्त अनेक महान स्त्रिया आपल्या भारताला मिळाल्या आहेत. भारतासारख्या शक्तिशाली देशाची कमान इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील यांसारख्या स्त्रीयांद्वारा संचालित केले गेले आहे. लोकसभा अध्यक्ष मीना कुमारी त्याच बरोबर बाकी अनेक राज्यांच्या महिला मुख्यमंत्री आजही आपल्या कार्याची यशस्वी रित्या अंबलबजावणी करत आहेत.

महादेवी वर्मा, सुभद्रा कुमारी चौहान, महाश्वेता देवी, आशापूर्णा देवी, मैत्रिय पुष्पा अश्या अनेक महिलांनी असामन्य परिस्थिती मध्ये देखील साहित्य क्षेत्र उत्कृष्ट रचनांनी सुशोभित केले आहे.
८ मार्च ला साजरा केला जाणाऱ्या महिला दिन निमित्त साऱ्या स्त्रियांना संबोधित ह्या काही कवितेच्या ओळी.
ज्याला स्त्री ‘आई’ म्हणुन कळली तो जिजाऊचा “शिवबा” झाला…
ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणुन कळली तो मुक्ताईचा “द्यानदेव” झाला…
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणुन कळली तो राधेचा “श्याम” झाला…
आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा “राम” झाला…
“प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे”
म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम “जागतिक महिला दिनाच्या”
“हार्दीक शुभेच्छा”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले