नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

आधार कार्डवरील नाव-पत्ता बदलणे

आधार कार्डवरील नाव-पत्ता बदलणे

आधार कार्डवरील नाव-पत्ता बदलणे सोपे, मोबाइलवरून स्वतः 'असा' करा बदल


Aadhaar Card मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही आता तो तुमच्या मोबाइलवरून करू शकता. यासाठी तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही.


खासगी काम असो की सरकारी. आधार कार्ड आवश्यक बनले आहे. अनेकदा आधार कार्डवरील नावात काही तरी चूक किंवा आपण दिलेल्या पत्त्यात चूक झालेली असते. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील झालेली चूक किंवा पत्त्यात झालेली चूक दुरूस्त करायची असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाइलवरून यात दुरूस्ती करू शकता. UIDAI ने काही वेळेआधी आधार कार्डमध्ये सेल्फ अपडेट सर्विसला बंद केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा ही सर्विस सुरू करण्यात आली आहे.

खालील बदल करू शकता :-

आधार कार्डमध्ये केवळ नाव नव्हे तर जन्मतारीख, घराचा पत्ता, मोबाइल नंबर सुद्धा बदलता येवू शकतो.

वरील पैकी कोणताही बदल करण्यासाठी फक्त तुमच्या आधार कार्ड मधील रजिस्टर मोबाइल नंबर तुमच्या जवळ असायला हवा. तसेच मोबाइल वरुण बदल करण्यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेट आवशयक आहे . जाणून घ्या आधार कार्डवरील काही बदल करायचा असेल तर सोपी पद्धत कोणती आहे. अवघ्या काही मिनटात आधार कार्डवरील नाव, पत्ता, बदलू शकता.

आधार कार्डमध्ये ऑनलाइन असा बदल करा



Ø आधार कार्ड च्या ऑफिशल वेबसाइट वर जाण्यासाठी क्लिक करा https://uidai.gov.in/




Ø होमपेजवर तुम्हाला आधी "MY Aadhaar" ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.



Ø आता तुम्हाला "Update Your Aadhaar" सेक्शन मध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिसेल. "Update your Demographics Data Online"चे. यावर क्लिक करा.



Ø यावर क्लिक करताच तुम्ही UIDAI च्या "सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलच्या" अधिकृत वेबसाइटवर ssup.uidai.gov.in पोहोचाल.




Ø या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या “Proceed to Update Aadhaar” यावर क्लिक करा.



Ø या ठिकाणी तुम्हाला तुमचा "१२ डिजिट आधार" नंबरने लॉग इन करावे लागेल.




Ø यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या "कॅप्चेला" भरा. आणि "सेंड ओटीपी" वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.



Ø ओटीपी टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही आपली वैयक्तिक माहिती, जसे, पत्ता, जन्मतारीख, नाव, जेंडर, सह अन्य माहिती भरावी लागेल.



Ø आता तुम्हाला त्या सेक्शनला निवडावे लागेल. ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे. तुमच्यासमोर नाव, जन्मतारीख, पत्ता बदल करण्याचे ऑप्शन असतील. ज्यात बदल करायचा आहे. त्यातील अपडेट नाववर क्लिक करा.


Ø या ठिकाणी नावाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड अपलोड करू शकता.


Ø सर्व डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल. त्याला व्हेरिफाय करावे लागेल. त्यांतर सेव्ह चेंज करावे लागेल.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले