नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

लक्ष्मी देवी

लक्ष्मी देवी

राजा रवीवर्मा यांच्या बालकृष्णन नायर यांनी मल्याळी भाषेत लिहिलेल्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. राजा रविवर्मा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये बसले होते. याच वेळी त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये एक विद्वान व्यक्तीही होती. बोलणं चालू असताना काही कारणानं त्यांनी बाजूला उभ्या असणाऱ्या एका सामान्य असणाऱ्या माणसाला एका चित्राविषयी अभिप्राय विचारला. विद्वान व्यक्तीला याचं मोठं आश्चर्य वाटलं. त्या काळात एखाद्या मोठ्या चित्रकारानं सामान्य व्यक्तीला अभिप्राय विचारावा ही गोष्ट थोडी आश्चर्याचीच होती. विद्वान व्यक्तीनं आश्चर्य व्यक्त करत ह्या विषयी विचारलं. राजा रवीवर्मा म्हणाले, "खरंय.. (आज ह्या सामान्य व्यक्तीला कलेतलं फारसं काही काळात नसेल.) कदाचित आज सामान्य लोकांपर्यंत कला पोहोचली नसेल. पण कुणी सांगावे, आज राजेमहाराजांसाठी रंगवलेली चित्रं उद्याच्या काळात कला संग्रहालयात जातील आणि पुढच्या पिढीतली  सर्वसामान्य माणसं ती पाहू शकतील. मी असं ऐकलंय की पाश्चात्य देशांमध्ये सर्वांसाठी खुली असणारी कलेची सार्वजनिक दालनं असतात." आपली चित्रं, कला सामान्य लोकांपर्यंत पोहोचावीत अशी राजा रवी वर्मा यांची प्रामाणिक तळमळ होती. या प्रसंगानंतर काही वर्षांनी ओलिओग्राफ्सचं तंत्रज्ञान आल्यानंतर राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या प्रती सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवातही झाली.
आज, सव्वाशे वर्षांनंतर राजा रवी वर्मा यांची चित्रं साऱ्या भारताला ओळखीची झालेली आहेत. दिवाळीमध्ये जवळपास सारे भारतीय लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या ज्या प्रतिमेचं पूजन करतात ती प्रतिमा म्हणजे राजा रवी वर्मा यांनी १८९६ च्या दरम्यान काढलेलं लक्ष्मी देवीचं काढलेलं चित्र !! अक्षरश: करोडो भारतीयांना हे चित्र परिचित आहे. खरंतर, यामुळं, एका प्रकारे राजा रवी वर्मा यांना जगातला सर्वात लोकप्रिय कलाकार असं म्हणता येईल !!
लक्ष्मी देवीचा जन्म समुद्रमंथनात झाला होता असं मानण्यात येतं. पारंपारिक पद्धतीनं लक्ष्मी देवीची प्रतिमा बनवताना ज्या गोष्टी दाखवण्यात येतात त्या साऱ्या गोष्टी राजा रवी वर्मा यांनी दाखवल्या आहेत.
सर्वसाधारणपणे लक्ष्मी देवीचा रंग सावळा, पिवळसर सोनेरी, शुभ्र किंवा गुलाबी असा दाखवण्यात येतो. ती विष्णूसोबत असते तेंव्हा तिचा रंग सावळा दाखवण्यात येतो. संपत्तीचा स्रोत म्हणून तिला दाखवायचं असेल तर तिचा रंग पिवळसर सोनेरी दाखवला जातो. निसर्गाचं, प्रकृतीचं शुद्ध असं रूप म्हणून दाखवताना तिला शुभ्र रंगात दाखवतात. तर (माता असल्यानं) सर्व जीवांवर दया असणारी अशी दाखवताना तिला गुलाबी रंग दाखवण्यात येतो. या चित्रात आपल्याला लक्ष्मीची गुलाबी रंगाची छटा पाहायला मिळते.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ पूर्ण होण्यासाठीचं वरदान लक्ष्मी देऊ शकते. तिच्यात असणारी ही शक्ती दाखवण्यासाठी लक्ष्मीच्या प्रतिमेत चार हात दाखवले जातात. राजा रवी वर्मा यांनीही या चित्रात चार हात दाखवले आहेत. (जेंव्हा ती विष्णूसोबत असते तेंव्हा तिला २ हात दाखवले जातात तर जेंव्हा तिचं स्वतंत्र मंदिर असतं तेंव्हा तिला चार हात दाखवले जातात.)
लक्ष्मी देवीच्या दोन हातांमध्ये कमळाची फुलं दाखवली जातात. ह्या चित्रातही आपल्याला देवीच्या हातात दोन कमळाची फुलं दिसतात. देवीचा पाण्याशी असणाऱ्या संबंधामुळं कमळाची फुलं दाखवण्यात येतात असं मानलं जातं. कमळाची मुळं पाण्यात असतात. खरंतर देवीच्या गळ्यात कमळांच्या फुलांचा हारही दाखवला जातो. पण ह्या चित्रात तो दाखवलेला नाही. दक्षिण भारतात १६व्या शतकात लिहिल्या गेलेल्या शिल्पशास्त्र या ग्रंथात लिहिल्याप्रमाणं लक्ष्मी देवीच्या गळ्यात मोत्यांचा हार असतो. ह्या चित्रातही आपल्याला लक्ष्मी देवीच्या गळ्यात मोत्यांचा हार दिसतो.
आपण मागं बघितल्याप्रमाणं कमळ फुलांचं (चिखलात उगवूनही येणाऱ्या सुंदर फुलामुळं) आपल्या इकडं खूप महत्व आहे. लक्ष्मी देवी नेहमी कमळाच्या फुलात दाखवली जाते. ह्या चित्रातही आपल्याला लक्ष्मी देवी कमळाच्या फुलात उभी दिसते.
बहुतेकवेळा लक्ष्मीच्या चित्रात हत्ती सोंडेनं पाण्याचे फवारे मारताना दाखवला जातो. कारण हत्तीचा राजसत्तेशी संबंध असतो. आणि सोंडेनं पाणी सोडणं हे एक प्रकारे राजसत्तेनं केलेला अभिषेक दर्शवतो. या चित्रात मात्र राजसत्तेचं प्रतीक असणाऱ्या हत्तीनं देवीसाठी सोंडेत हार धरलेला दिसतोय.
राजा रविवर्मा यांचं हे चित्र दशकानुदशकं दिवाळी आणि लक्ष्मीपूजन यांचा अविभाज्य भाग बनलं आहे हे मात्र निश्चित !!
संकलित ब्लॉग..... 

आगामी झालेले