नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

प्रतापराव गुजर Prataprao Gujar


प्रतापराव गुजर Prataprao Gujar (हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती)
जन्म : १६१५ (भोसरे (खटाव))
मृत्यू : २४ फेब्रुवारी १६७४ (नेसारी)

प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो.
५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे.
प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान याच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले. (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास)
महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला.

काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन धडकल्या. प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’

२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'

या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.

मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' याच नावाचे व्यवसायिक नाटक लिहिले.

सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर शाहू झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला.

आता आपल्या राजाच्या बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजे कधी विसरले नाहीत. त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला.. (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनी लक्षात घ्यावे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती.)

" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रांमधुन दिसते स्वराज्यासाठी केलेले हे धर्मांतर खूप मोलाचे होते त्यावर महाराजांनी त्यांना परळी खोऱ्यातील साठ गावाची जमीन इनाम म्हणून दिली. खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला. त्यांची मुस्लिम वंशज आज देखील परळी नजीक कामठी गावात राहतात भाऊसाहेब हैभतराव गुजर, देशमुख, इनामदार परळी सरकार आणी त्यांचा मुलगा सत्तार अमीन साहेब इनामदार आणी त्यांची मुले १.सिकंदर सतार इनामदार 2.ज़ुबेर सत्तार इनामदार
आज मुस्लिम म्हणून सातारा मध्ये राहतात. आता कामठी हे गाव धरणामध्ये गेले असून त्यांचा सध्याचा रहिवास हा परळी नजीक जकातवाडी या गावामध्ये आहे . या घराण्याचा मोलाचा वाटा स्वराज्याच्या साठी आहे.

🏛️ समाधी

प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे. तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.

🚩 हर हर महादेव...!! 🚩

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन🙏

स्त्रोतपर माहिती

आगामी झालेले