नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

प्रतापराव गुजर Prataprao Gujar


प्रतापराव गुजर Prataprao Gujar (हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती)
जन्म : १६१५ (भोसरे (खटाव))
मृत्यू : २४ फेब्रुवारी १६७४ (नेसारी)

प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो.
५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे.
प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान याच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले. (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास)
महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला.

काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन धडकल्या. प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’

२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'

या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.

मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' याच नावाचे व्यवसायिक नाटक लिहिले.

सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर शाहू झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला.

आता आपल्या राजाच्या बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजे कधी विसरले नाहीत. त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला.. (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनी लक्षात घ्यावे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती.)

" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रांमधुन दिसते स्वराज्यासाठी केलेले हे धर्मांतर खूप मोलाचे होते त्यावर महाराजांनी त्यांना परळी खोऱ्यातील साठ गावाची जमीन इनाम म्हणून दिली. खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला. त्यांची मुस्लिम वंशज आज देखील परळी नजीक कामठी गावात राहतात भाऊसाहेब हैभतराव गुजर, देशमुख, इनामदार परळी सरकार आणी त्यांचा मुलगा सत्तार अमीन साहेब इनामदार आणी त्यांची मुले १.सिकंदर सतार इनामदार 2.ज़ुबेर सत्तार इनामदार
आज मुस्लिम म्हणून सातारा मध्ये राहतात. आता कामठी हे गाव धरणामध्ये गेले असून त्यांचा सध्याचा रहिवास हा परळी नजीक जकातवाडी या गावामध्ये आहे . या घराण्याचा मोलाचा वाटा स्वराज्याच्या साठी आहे.

🏛️ समाधी

प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे. तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.

🚩 हर हर महादेव...!! 🚩

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन🙏

स्त्रोतपर माहिती

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

श्री संत सेवालाल महाराज Sevalal Maharaj


सेवालाल महाराज

पूर्ण नाव : सेवा भीमासिंह रामावत

जन्म : फेब्रुवारी १५, १७३९

(गुलालडोडी ता. गुत्ती जि.अनंतपुर आंध्रप्रदेश)

*मृत्यू : जानेवारी ४, १७७३*

(रुईगड, यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र)

पूर्वाधिकारी : नाही

उत्तराधिकारी : रामराव महाराज

वडील : भीमासिंह नायक

आई : धरमणीमाता

राजघराणे : बंजारा (गौर)

सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा, बाबा लखीशाह बंजारा, संत रूपसिंह महाराज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा यासह हा शुरवीर गोरराजवंशी बंजारा समुदाय संत सेवालाल महाराजांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते.

🧕🏻 *धर्मणीयाडी (मातोश्री)*

संत सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी होते. ती जयराम वडतीया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची राजकन्या होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे.

सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे. आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही काळाच्या कसोटीवर तंतोतंत खरी ठरली आहे. बंजारा समाजातील महायोद्धा राजा लखीशाह बंजारा, गोर राजाभोज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा ,बाबा मख्खनशाह बंजारा, शूरवीर बल्लुराय बंजारा, वीरांगना मल्लिका बंजारन , गोरा -बादल , आला उदल , नायक मनिसिंह पवार , राजागोपीचंद गोर , वीरांगना दूर्गावती बंजारन , वीर दुर्गादास राठोड , जयमल फत्ता सिंह या शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आजही बंजारा साहित्य बरोबरच शिख इतिहासात सुद्धा दिसून येते. माता जगदंबा बंजारा देवी , व्यंकटेश्वर बालाजी , संत हाथीराम बाबा महाराज , संत रूपसिंह महाराज यासह संत सेवालाल महाराज आणि संत सामकी माता यांना समाजात विशेष आस्थेचे स्थान आहे.

🏵️ *क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांची शिकवण*

जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.

कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.

सन्मानाने आयुष्य जगा.

इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका.

स्त्रियांचा सन्मान करा, आणि मुली जिवंत देवी आहेत.

काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.

पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणीपुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा / पाप आहे.

वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.

जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.

मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा.

माणुसकीवर प्रेम करा.

आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.

कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.

धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.

🔮 *सेवालाल महाराज यांचे वचन*

क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी आपल्या गौर बंजारा भाषेत दिलेला उपदेश.

रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।

कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीकला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।

जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका।

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका।

जाणंजो छाणंजो पछच माणजो। -भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।

ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव। – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।

संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏




रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

जगन्नाथ (नाना) शंकरशेठ Jagannath Shankarsheth


जगन्नाथ (नाना)शंकरशेठ
हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
◆जन्म :~ १० फेब्रुवारी १८०३
◆मृत्यू :~ ३१ जुलै १८६५
🔷ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्‌फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्‌स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
🔶नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्‍हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.
♦ एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.16 एप्रिल 1853 रोजी पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे धावली
     बोरीबंदर स्थानकातून दुपारी 3.30 वाजता 21 तोफांची सलामी घेऊन ठाण्याच्या दिशेने निघालेल्या या गाडीला 14 डबे होते. साहिब,सिंध आणि सुलतान अशी शक्तीशाली 3 वाफेची इंजिने लावलेली होती.21 मैल म्हणजे 34 किलोमीटर प्रवासाला या रेल्वेला 1 तास 12 मिनिटे लागली. लोकांनी या रेल्वे गाडीला चाक्या म्हसोबा हे नाव दिले होते.
     मोजक्याच प्रतिष्ठित अशा 400 माणसांना गाडीत बसण्याचे निमंत्रण होते. 25 व्हिआयपी होते त्यात ही रेल्वे सुरू करण्यासाठी ज्यांचे मोठे योगदान होते ते नाना शंकरशेठ होते.त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून रेल्वेने त्यांना सोन्याचा रेल्वे पास दिला होता.
🔷पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत. मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्‍या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.


आगामी झालेले