नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

मुधोजी राजे उर्फ अप्पासाहेब भोसले Mudhoji Raje


मुधोजी राजे उर्फ 🤺 अप्पासाहेब भोसले 🏇
(नागपूर)
वीरमरण : 1851

नागपूरचे रघूजी राजे (दुसरे) १२ मार्च १८१६, निधन पावले, तेव्हा त्यांची आवडती राणी बाकाबाई हिने ठरविले की, रघुजीचा दासीपुत्र धर्माजी याला गादीवर बसवावे. कारण रघुजीचा मुलगा परसोजी (दुसरा) हा शरीराने अपंग होता. धर्माजी हा अनौरस असल्याने परसोजीचा चुलत भाऊ (बांकाबाईचा पुतण्या) मुधोजी यांचा धर्माजीला विरोध होता. बांकाबाईचा हेका पाहुन मुधोजीने तिला व धर्माजीला कैदेत टाकले. मुधोजी शूर, पराक्रमी व बाणेदार होते. त्यांनी परसोजीस राज्याभिषेक करवून त्याला नागपूरच्या गादीवर बसविले. स्वतः त्याचा कारभारी झाला. त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व राज्यकारभार पाहू लागला.

मध्यंतरी ५ मे १८१६ रोजी धर्माजीचा अज्ञातात खून झाला. खूनी सापडला नाही. नतर मुधोजी चांद्याला (चंद्रपूरला) गेले असता १ फेब्रुवारी १८१७ रोजी रात्री परसोजी अंथरूणातच निधन पावला. परसोजीच्या खुनाचा आरोप मुधोजीवर त्यांच्या विरोधकांनी ठेवला. नागपूरच्या कंपनीसरकारच्या रेसिडेंटने नागपूर दरबारातील नारायण पंडित व नागो त्र्यंबक या दोघा
मारेक-यांच्या साह्याने मुधोजीवरचा तो आरोप खोटी ठरविला. त्यात इंग्रज रेसिडेंटचा स्वार्थी हेतू होता. त्याच्या बदल्यात नारायण पंडित आणि नारो त्र्यंबक यांच्या मध्यस्थीने इंग्रजांची तैनाती फौज नागपूरला ठेवण्यात मुधोजीला भाग पाडले.

मुधोजी २१ फेब्रुवारी १८१७ रोजी रीतसर नागपूरच्या गादीवर बसले. परंपरागत पद्धतीप्रमाणे पुण्याच्या पेशव्याकडून (दुस-या बाजीरावाकडून) मुधोजीला 'सेनासाहेब सुभा' ही पदवी मानाच्या वस्त्रासह आली. ती मुधोजींनी स्वीकारु नये, असे रेसिडेंटने मुधोजींना कळविले. "पेशव्यांचा व आमचा बिघाड झाला आहे. तुम्ही ही वस्त्रे स्वीकारु नयेत" असे रेसिडेंट म्हणाला. पण मुधोजींनी रेसिडेंटला न जुमानता ती पदवी आणि मानाची वस्त्रे स्वीकारली. कारण नागपूरच्या भोसल्यांचा तो परंपरागत हक्क होता.
कंपनी सरकारने नागपूर राज्यातील होशंगाबाद येथे वखार घालण्याची परवानगी मुधोजीराजांना मागितली. ती मुधोजीराजांनी फेटाळून लावली या दोन घटनांमुळे कंपनी सरकार मुधोजीराजांवर नाराज झाले. फितूर नारायण पंडित व नारो त्र्यंबक यांच्यामुळेच रेसिडेंट मुधोजीशी तैनाती फौजेचं तह करू शकले. त्यामुळे कंपनी सरकार या दोघांवर खुश झाले आणि या दोघा ब्राम्हणांना कंपनी सरकारने प्रत्येकी १५ हजार रुपयांची नेमणूक तह हयात दिली.
मुधोजी दुस-या बाजीराव पेशव्याचे अनुकरण करून लढाई करू नये, म्हणून जेन्किसने बैतूल, होशंगाबादहून इंग्रजी सैन्य नागपूरला आणून घेतले. इंग्रज फौजेचा मुख्य अधिकारी लेफ्ट. कर्नल स्कॉट हा सुद्धा तेलखेडीहून सैन्यासह नागपूरला येऊन ठेपला. २५ नोव्हेबर १८१७ रोजी रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत नारायण पंडित हा वेषांतर करून रेसिडेन्सीत आला व त्याने जेन्किसला सांगितले, "अप्पासाहेबाने तुमच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सावध राहा." बातमीमुळे सावध होऊन जेन्किसने लढाईची पूर्व तयारी केली.
अप्पासाहेबांच्या १० हजार घोडेस्वारांनी व ६ हजार पायदळाने सीताबर्डीच्या परिसरात इंग्रज सैन्याला चहुबाजूंनी घेरले. त्या सैन्याजवळ २५ तोफ़ाही होत्या. या सैन्याचा प्रमुख अप्पासाहेबाचा एकनिष्ठ सरदार मनभट्ट उपाध्ये हा होता. अप्पासाहेब मात्र रणांगणावर नव्हते. सीताबर्डीच्या या लढाईत इंग्रजांच्या विजय झाला. लढाई संपल्यानंतर अप्पासाहेबांनी नारायण पंडितामार्फत जेन्किसला निरोप पाठविला की, ' मनभट आणि त्याच्या अरब सैन्याने माझ्या हुकुमाशिवाय ही लढाई केली. "बांकाबाई ही इंग्रजांस अनुकूल होती. लढाई संपल्यावर तिने जेन्किसला निरोप पाठविला, तो असा "झालेल्या घटनेशी आपला मुळीच संबंध नाही. इंग्रजांनी भोसले घराण्याशी आपला संबंध पूर्ववत कायम ठेवावा."
लढाईनंतर जेन्किस याने अप्पासाहेबांस इंग्रज - भोसले संबंध पूर्ववतच आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कारण जेन्किसला इंग्रज सैन्याची मोठी कुमक येण्यास अजून अवकाश होता.
१२ डिसेंबर १८१७ रोजी कॕ. डव्हटन एक डिव्हिजन इंग्रज सेनेसह नागपूरात येऊन धडकला. त्यानंतर जन्किसला जोर चढला. त्याने नारायण पंडितामार्फत अप्पासाहेबाला कळविले की, “अप्पासाहेबाने आपले सारे राज्य इंग्रजांच्या ताब्यात द्यावे, आपला तोफखानाही आमच्या ताब्यात द्यावा. अरब सैन्यास नोकरीतून मुक्त करावे व त्या सैन्याने आम्ही सांगू तेथे निघून जावे. या सर्व अटी पूर्ण होईपर्यंत अप्पासाहेबाने आमच्या रेसिडेन्सीत आमच्या देखरेखीखाली राहावे. त्यानंतरच भोसले - इंग्रज संबंध सलोख्याचे राहतील. तेव्हा यापुढे अप्पासोबाने लढाईच्या फंदात मुळीच पडू नये. यापुढे राज्याच्या अंतर्गत कारभारावर इंग्रजांचे योग्य नियंत्रण राहील." या अटी अत्यंत अपमानास्पद होत्या व अप्पासाहेबांसारख्या स्वाभिमानी व शूर व्यक्तीस त्या मान्य होणे शक्यच नव्हते.
१६ डिसेंबर रोजी जन. डव्हटन आपल्या सैन्यासह सक्करद-याकडे निघाला. अटीतटीची लढाई होऊन मराठ्यांचा पराभव झाला. या लढाईत इंग्रजांना अप्पासाहेबांच्या ७५ तोफा , ४० हत्ती, राजाचा शाही तंबू इतर बहुमोल वस्तू मिळाल्या. लढाई संपल्यावर मनभट व त्याच्या अन्य सैन्याने नागपूर शहर ताब्यात घेतले. नारायण पंडिताने फितुरी केली, म्हणून मनगट उपाध्ये याने त्याच्या घरावर हल्ला केला व त्याची संपूर्ण संपत्ती लूटून नेली. मनभटाने नारायण पंडितास त्याच्या फितुरील चांगलेच शासन केले.
शहर मुकाट्याने आमच्या ताब्यात द्या, असे जेन्किसने मनभटास कळविले. मनभटाने ते मानले नाही. शुक्रवार दरवाजाजवळ तुंबळ युद्ध झाले. त्यात इंग्रजांनी अप्पासाहेबांच्या सैन्याकडून हस्तगत केलेल्या ७५ तोफाचा उपयोग केला. २४ डिसेंबर रोजी इंग्रजांनी नागपूर शहरावर निकराचा हल्ला केला. ६ जानेवारी १८१८ पर्यंत नागपूर शहर इंग्रजांनी ताब्यात घेतले. इंग्रजांनी अप्पासाहेबांशी नवा तह केला, त्यानुसार नागपूर राज्याच्या उत्तरेकडील सर्व प्रदेश सिरगुजा व जसपूर ही संस्थाने, गाविलगड व नरनाळा हे किल्ले त्यांच्या सभोवतालच्या प्रदेशासह एकंदर साडेबावीस लाख उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना मिळाला. अप्पासाहेबाला नामधारी राजा बनवून राज्याचा सगळा कारभार इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर बांकाबाई हिच्या सल्ल्याने जन्किन्सने १५ मार्च १८१८ रोजी अप्पासाहेबाला अटक करुन कैदेत टाकले. हेस्टिंग्जच्या आदेशानुसार अप्पासाहेब व त्याचे दोन सहकारी रामचंद्र वाघ आणि नागो यांना अलाहाबादला पाठवून तेथे कैदेत टाकण्याचे ठरविले. कैप्टन ब्राउन त्यांना घेऊन पुरेशा सैन्यासह वाटखर्चाची रक्कम घेऊन ३ मे १८१८ रोजी अलाहाबाद कडे निघाला. त्यांचा मुक्काम जबलपूरच्या अलीकडे रायचूर येथे असतांना अप्पासाहेब बेमालूमपण तेथून निसटले आणि हरईचा गोंड राजा चैनशहा याच्या आश्रयाला गेले. हरईचा प्रदेश डोगराळ व घनदाट अरण्याने व्यापलेला असल्याने तेच स्थान अप्पासाहेबाला सुरक्षित वाटले.
कॕ. ब्राऊनने या दिशांना आपले घोडेस्वार आप्पासाहेबाचा शोध लावण्या साठी पाठविले परंतु त्यांना रिकाम्या हातांनी परत यावे लागले. अप्पासाहेब हरईला गेलेषअसावे, म्हणून जबलपूरचा इंग्रज अधिकारी ओब्रेन याने व ब्रिगेडिअर जनरल वॉटसन याने हरईकडे घोडेस्वारे पाठविले पण त्यांच्याही हाती अप्पासाहेब लागले नाही. नंतर जेन्किसने अप्पासाहेबाला पकडून देणा-यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जबलपूरच्या कमिशनरने सुद्धा त्यासाठी आधी २५ हजार नंतर एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. पण बक्षीसाच्या लोभाने कोणीही ते काम करण्यास तयार झाला नाही. म्हणून जेन्किसने दोन लाख रुपये व एक हजार रुपये उत्पन्नाची जहागीर देण्याचे घोषित केले. परंतु या बक्षीसाचा कोणावरही थोडा सुद्धा परिणाम झाला नाही. अप्पासाहेब त्यानंतर कधीही इंग्रजांच्या हाती लागले नाही.
अप्पासाहेबानी आता नागपूरचे राज्य इंग्रजांच्या हातुन मुक्त करण्यासाठी लढा सुरु केला. दिवसेंदिवस त्यांच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. याकामी त्यांची पत्नी उमाबाई व अन्य नातेवाईक त्यांना गुप्तपणे आर्थिक साहाय्य देऊ लागले. दुस-या बाजीरावाने जन. माल्कमपुढे शरणागती पत्करल्यानंतर त्याचे सैन्यही अप्पासाहेबांस येऊन मिळाले. हरईचा गोंडराजा चैनशहा व पंचमढीचा ठाकूर मोहनसिंग हे तर आधीपासूनच त्यांच्या पाठीशी उभे होते. तन, मन, धनाने सहाय्य करीत होते. अप्पासाहेबांनी आपल्या सैन्यासह बैतूल येथिल छावणीवर २० जुलै १८१८ रोजी अचानक हल्ला करुन कैप्टन स्पार्क याला त्याच्या १०० शिपायांसह कापून काढले. मेळघाट , भैंसदेही, सातनेर , अतनेर व आमला वगैरे भागावर अप्पासाहेबाने आपला अंमल बसविला. सा-या नागपूर राज्यात अप्पासाहेबांच्या सैनिकांनी धुमाकूळ गाजविला. बालाघाट जिल्यातील कामथ्याचा जमीनदार चिमणा पटेल यानेही इंग्रजांविरुद्ध युध्द पुकारले. अप्पासाहेबाने आरंभिलेला स्वातंत्र्यलढा हळूहळू सा-या नागपूर राज्यात पसरला.
नागपूरलाही इग्रजांविरुद्ध कट शिजू लागला. त्यात आप्पासाहेबांच्या त्या ५ नातेवाईकांना जेन्किसनने अलाहाबादला पाठवून दिले. दिवसेंदिवस अप्पासाहेबांना वाढता पाठिंबा मिळत होता. ब्रिगेडिअर जनरल जॉन माल्कम याने लाला शिवप्रसाद मार्फत अण्णासाहेबांना कळविले की, तो जर शरण आला, तर त्याला कैद केले जाणार नाही, पेन्शन देण्यात येईल. गव्ह. जनरल सांगेल त्या स्थानी सन्मानाने राहता येईल. पण अप्पासाहेब इंग्रजी कावा ओळखून होता. त्याने माल्कमचे म्हणणे धुडकावून लावले.
लवकरच अप्पासाहेबांन चित्तू पेंढारी आपल्या अनुयायांसह येऊन मिळाला. इंग्रज अप्पासाहेबाचा शोध घेतच होते. चित्तू पेंढा-यासह अप्पासाहेब अशीरगडाकडे गेले. अशीरगडाचा किल्लेदार यशवंतराव लाड याचेकडे किल्ल्यावर अप्पासाहेब सैन्यासह राहिले. कॕ. डव्हटन हा मोठी इंग्रज सेना तोफखान्यासह घेऊन अशीरगडाजवळ आला. कर्नल स्मिथ पुण्याहून मोठे सैन्य व प्रचंड तोफखाना घेऊन आला. अशीरगड त्यावेळी ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी दौलतरावांतर्फे यशवंतराव लाड याला अशीरगढ इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा हुकूम आणला. तेव्हा यशवंतराव म्हणाला, 'आमच्या किल्ल्यात अप्पासाहेब नाही.' तोपर्यंत जॉन माल्कम हा महू येथून सैन्य घेऊन अशीरगडाजवळ येऊन पोहचला.
इंग्रजांनी अशीरगडावर हल्ला केला. यशवंतरावांनेही जिद्दीने किल्ला लढविला. शेवटी यशवंतरावांने काही अटीवर अशीरगड इंग्रजांच्या ताब्यात दिला. किल्ल्यात अप्पासाहेब नव्हताच. तो अशीरगडापासून फार लांब निघून गेला होता. अप्पासाहेबांनी रणजितसिंहाच्या राज्यात आश्रय मागितला. पण रणजितसिंहाने आश्रय देण्याचे नाकारले. शिखांच्या राज्यातून टेहरी गढ़वाल मंडी इ. भागात अप्पासाहेब ससैन्य हिंडत होता. नंतर ते बिकानेर येथे व त्यानंतर जोधपूरच्या राजाकडे गेले. जोधपूरच्या राजाने त्यांना आपल्याकडे मोठ्या इतमामाने ठेवले.
नोव्हेंबर १८१७ पासून अप्पासाहेब इंग्रजाशी झुंज देत होते. १८२९ साली त्यांनी जोधपूरच्या राजाकडे आश्रय घेतला. त्यानंतर १८४० सालपर्यंत ते जोधपूर येथेच राहिले असावे. ते १५ जुलै १८४० मध्ये जोधपूर येथे मरण पावले. असा आतापर्यंतचा समज होता. परंतु नवीन संशोधनानुसार अप्पासाहेब जोधपूरहून दक्षिणेकडे गेले व हैद्राबाद येथे पोचले. १८५१ मध्ये त्यांनी हैद्राबादच्या कारागृहात देह ठेवला. नागपूरचे राज्य इंग्रजांकडून परत मिळविण्याचा त्यांचा अखेरपर्यंत निर्धार होता. परंतु मनुष्यबळ व साधनसामुग्री अभावी त्यांची ती महत्वाकांक्षा पूरी होऊ शकली नाही व हा झुंजार स्वातंत्र्यसेनानी अपयश पदरी घेऊन या जगातून कायमचा निघून गेला. 'घरकी फूट जगतमें बुरी' हेच खरे. त्या महान क्रांतिकारकाचे स्मरण नव्या पिढीला सतत स्फूर्तिदायी ठरावे.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *विनम्र अभिवादन* 🙏

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

छत्रपती प्रतापसिंह भोसले Pratap Singh


छत्रपती प्रतापसिंह भोसले
मराठा साम्राज्य - सातारा संस्थान
अधिकारकाळ : १८०८ - ४ सप्टेंबर १८३९
राज्याभिषेक : ३ मे १८०८
राज्यव्याप्ती : सातारा
राजधानी : सातारा

पूर्ण नाव : छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले
जन्म : १८ जानेवारी १७९३ (अजिंक्यतारा)
मृत्यू : ४ ऑक्टोबर १८४७ (वाराणसी)
पूर्वाधिकारी : छत्रपती शाहूराजे भोसले (दुसरे शाहू)
वडील : छत्रपती शाहूराजे भोसले
राजघराणे : भोसले

हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.
सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले.
महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रतापसिंह भोसलेप्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला. सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९).
ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने प्रकट केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले.
एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले, राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या : शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठी बरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती.
या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने ५ एप्रिल १८२२ च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी १८१८-२२ दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५-३८) याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली.
शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब (शहाजी) यास नामधारी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे प्रतापसिंह स्थानबद्धतेत मरण पावले.
आप्पासाहेबाच्या मृत्यूनंतर सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा करण्यात आले (१८४८).

🚩 🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🚩

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

साक्षरता घोषवाक्य (Education Slogans)


साक्षरता घोषवाक्य (Education Slogans)

1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.
2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.
3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.
4. जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.
5. शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो.
6. शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे.
7. एकाने एकास शिकवावे.
8. साक्षरतेचा एकच मंत्र;शिक्षण देणे हेच तंत्र.
9. घरी सर्वांना शिक्षित करा,कुटुंबात आनंद आणा.
10. शिक्षण ही एक मजबूत शिडी,जेणेकरून पुढे जाईल पिढी.
11. शिक्षण हा आपला शृंगार आहे,अन्यथा संपूर्ण जीवन व्यर्थ आहे.
12. आमचा भारत साक्षर असो;साक्षर भारत संपन्न असो.
13. सुख समृद्धीचा झरा;शिक्षण हाच मार्ग खरा.
14. अज्ञानात आपली अधोगती,शिकण्यातच आहे खरी प्रगती.
15. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
16. विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
17. एक एक अक्षर शिकूया;ज्ञानाचा डोंगर चढूया.
18. शिक्षणामुळे देशाचे सामर्थ्य ठरते
19. राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
20. केवळ सुशिक्षित लोकच मुक्त आहेत
21. शिक्षण हे एक साधन आहे जे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करते
22. शिक्षणाने समृद्धी मिळते
23. अक्षर कळे,संकट टळे.
24. आजचे शिक्षण,उद्याचे भविष्य शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे,जे जग बदलू शकते
25. जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.
26. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
27. गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
28. शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.
29.  स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते शिक्षण.
30. मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण.
31. विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.
32. विद्येविना मनुष्य पशू आहे.
33. ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे शिक्षण होय.
34. विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
35. एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .
36. वाचाल तर वाचाल.
37. साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.
38. देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.
39. साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.
40. एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.
41. देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.
42. होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.
43. ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.
44. आधी विद्यादान; मग कन्यादान.
45. राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
46. माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.
47. नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.
48. अक्षर कळे संकट टळे.

आगामी झालेले