नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

स्वर्णीम पराक्रम पर्व 24 फेब्रुवारी 1674 Swarnim Parakram Parv



Swarnim Parakram Parv

24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रचंड स्वामीनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा असलेल्या सप्तवीरांच्या बलिदानातुन एक #स्वर्णीम_पराक्रम_पर्व होऊन गेले या स्वर्णीम पराक्रम पर्वाची शौर्य गाथा सांगण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या दिनविशेषच्या निमित्ताने आपल्या समोर.........[१) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउत ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोजी शिंदे
७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर]

🚩✒🚩📖✒🚩📖✒🚩📖🚩

काळ होता 1674 सालचा महाराजांनी आदिलशहा कडून पन्हाळा मिळवल्यानंतर आदिलशहा पिसळला आणि याचा राग मनामध्ये धरून बहलोल खानास स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठविले. बहलोल खानाच्या रूपाने स्वराज्यात आलेला हा गनीम स्वराज्यावर अन्याय अत्याचार करत स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. बहलोल खान रुपी या आसुरी शक्तीला वेळीच रोखण्यासाठी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. वास्तविक प्रतापरावांचे मूळ नाव कुडतोजी पण त्यांचा पराक्रम पाहून त्यांना महाराजांनी प्रतापराव हे नाव देऊन स्वराज्याचे सरनोबत हा किताब दिला. प्रतापरावांसाठी महाराजांनी दिलेली आज्ञा म्हणजे परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादापेक्षाही जास्त मोलाची होती. क्षणाचाही विलंब न लावता प्रतापराव बहलोल खानवर तुटून पडले. सह्याद्रीच्या कडे कपारीत महाराजांच्या गमीनी काव्याचा वापर करून त्यास जेरीस आणले. अखेरीस उमरणी जवळ बहलोल खानाच्या छावणीस वेढा घातला गेला आणि बहलोल खान जेरबंद झाला. स्वराज्याच्या सारनोबतसमोर तो शरण आला. त्याच वेळी युद्धनीती नुसार शरण आलेल्याला जीवनदान देण्याच्या विचाराने प्रतापरावांच्या मधील शिपाईधर्म जागा झाला आणि बहलोल खानास अभय दिले गेले... बहलोल खानाने तोंडामध्ये तृण धरून शपथ घेतली पुन्हा स्वराज्याकडे वक्र दृष्टीने पाहणार नाही... पण त्यावेळी भाबड्या प्रतापरावांना याची विस्मृती झाली असेल की लांडग्याच्या बोलण्यावर फार विश्वास ठेवायचा नसतो हे...... प्रतापराव मागे स्वराज्यात परतले पण गनीम दिलेल्या आणाभाका सोयीस्कररित्या बाजूला ठेवून पुन्हा स्वराज्यावर चालून आला. ही खबर महाराजांना समजली आणि महाराजांनी ‘सला काय म्हणोन केला?’ असा प्रश्न करीत ‘बहलोलखानास मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नये’ असा खलिता पाठविला. महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मावळ्यासाठी ही खूप मोठी शिक्षा होती. महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच यक्ष प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सतावत होता. जिवाची तगमग होत होती. त्यांच्या दृष्टीने महाराजांशीवाय जगणे म्हणजे आपल्या शरीरातून आपल्या आत्म्याला बाहेर ठेवल्यासारखं होत. त्यामुळे प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र आपले हेर पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. 24 फेब्रुवारी 1674 चा दिवस होता तो महाशिवरात्री चा. एका ठिकाणी सैन्याचा तळ पडला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठविले सैन्याला स्वारीचे आदेश दिले. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना राहवलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सरदार जीवाची पर्वा न करता सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर तुटून पडले. शिवरात्रीच्या दिवशी हर हर महादेवाच्या गर्जनेत जणू साक्षात महादेवच या सात सरदारांच्या रूपाने तांडव नृत्य करत होते. तलवारीच्या सपासप वारावर गणिमांची मुंडकी छाटली जात होती. पण पंधरा हजार सैन्यासमोर या सात शूरवीरांचा किती काळ निभाव लागणार होता. शेवटी काळाने घाला घातलाच. घायाळ झालेल्या वाघांचे भेकरही लचके तोडतात. अगदी तशीच अवस्था या सरदारांची झाली आणि हे भागव्याचे सप्तवीर धारातीर्थी पडले. पण या शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळाले होतं आणि म्हणूनच मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.

आपल्या आठ तासाच्या नोकरीमध्ये पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण वेळ आपल्या कर्तव्याची पूर्तता न करू शकणारे आपण आणि आपल्या कर्तव्यापरी समोर नजरेस पडणाऱ्या मृत्यूशैयेवर हसत मुखाने चढणारे हे सात वीर, त्यांचे हे बलीदान आपण खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकतो की नाही यात शंका आहेच. पण त्यांची पराकोटीची स्वामिनिष्ठता आणि स्वराज्यवरील प्रेम, त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान आपणास अंतर्मुख करायला लावते. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नसतो तर त्यातून काहीतरी बोध घेण्यासाठी असतो.... प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सहकारी म्हणजे विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे , कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि सरदार विठोजी शिंदे यांच्या असामान्य बलिदानातून राष्ट्रप्रेम आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिकपणा या दोन गोष्टी जरी अंगी बानवण्याचा प्रयत्न जरी केला तर तर तो प्रयत्न म्हणजे या भगव्याचा सात वीरांसाठी ती खरी श्रद्धांजली ठरेल.

म्हणूनच कुसुमाग्रजांची ही कविता आपल्या मन:पटलावरती सदैव कोरून ठेवलीच पाहिजे.......

म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात… ॥धृ.॥

ते फ़िरता बाजुस डोळे…किन्चित ओले…सरदार सहा सरसवुनी उठले शेले रिकबित टाकले पाय…झेलले भाले उसळित धुळिचे मेघ सात निमिषात…॥१॥

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात…॥२॥

खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात…॥३।।

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४

म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात…



🚩✒🚩✒📖📖✒🚩✒🚩

संकलित माहिती

आगामी झालेले