नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

संत नामदेव महाराज Sant Namdev Maharaj

नाव: नामदेव दामाशेटी रेळेकर
Sant Namdev Maharaj
जन्म: २६ ऑक्टोबर १२७०
गाव: नरसी नामदेव जि. हिंगोली मराठवाडा
मृत्यू: ३ जुलै १३५० शनिवार (शके १२७२)
संत नामदेव महाराज
इ.स. १२७० मध्ये संत नामदेवांचा जन्म पंढरपूर येथे झाला.
त्यांचे मूळ गाव – नरसी बामणी (जि. हिंगोली) हे होते.
त्यांचे संपूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी शिंपी (नामदेव दामाशेटी रेळेकर) असे होते.
वडील : दामाशेटी आई : गोणाई पत्नी : राजाई अपत्ये : नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई मोठी बहीण : आऊबाई
संत नामदेवांच्या गुरुचे नाव संत विसोबा खेचर असे होते.
आद्य कीर्तनकार या नावाने नामदेवांना ओळखल्या जात असे.
ज्ञानेश्वर, सावतामाळी, चोखामेळा, गोराकुंभार, विसोबा खेचर यांच्या सोबत घेऊन नामदेवांनी भारतभर तीर्थयात्रा केली.
‘नामदेवजी की मुखबानी’ या त्यांच्या ओव्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ शीख धर्माच्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.
ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार म्हणून संत नामदेवांना संबोधले जात असे.
इ. स. १३५० मध्ये संत नामदेव यांचा मृत्यू झाला.
वारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी |’ असा विश्वास मनाशी बांधून केले. नामदेव स्वत:ला त्या संप्रदायाचे ‘किंकर’ मानतात. नामदेवांनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल ‘आम्हा सापडले वर्म | करू भागवत धर्म ||’ असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केली. अभंग हे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब. त्यामधून त्यांच्या जीवनात आणि काव्यात घडलेली परिवर्तने यांचा मेळ घालता येतो. त्या अभंगांमधून ज्ञानदेवांचे लोकोत्तर जीवन, ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळचे वर्णन, ‘आदि’, ‘तीर्थावेळी’ आणि ‘समाधी’ यांचे स्वरूप वाचकांसमोर येते. त्यांतून समकालीन संतांची चरित्रेही स्पष्ट होतात. ते ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही पातळ्यांवरचे विवेचन करतात.संत नामदेवांचे कुटूंब वारकरी संप्रादयाचे होते. जवळ- जवळ अठरा माणसांचे कुटुंब पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते. घरच्या या वातावरणाचा प्रभाव संत नामदेवावर झाला. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. नामदेवांचे वडील दामाशेठी व आई गोणाई हे प्रामाणिक विठ्ठल भक्त होते.
संत नामदेवांची भक्ती सर्वश्रुत होती व ते भगवान विठ्ठलाचे सर्वात लाडके होते. एकदा त्यांचे वडील बाहेर काही कामानिमित बाहेर गेले होते तेव्हा देवाचा नैवेद्य घेऊन नामा गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातांनी पांडुरंगाला जेऊ घातले यामुळे ते लोकांत प्रसिद्ध झाले. संत नामदेवांनी आपले सगळे जीवन वारकरी सेवेत घालवले त्यांना कधीही अहंकार आला नाही. ते नेहमी देवाच्या गुण नामातच रमले. संत ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, सोपानदेव, गोरोबा, मुक्ताई, चोखामेळा हे त्यांचे समकालीन संत होते. त्यांचे अध्यात्मिक गुरु विसोबा खेचर होते. आपल्या वारकरी जीवनात अनेक प्रकारचे अभंग, गौळणी अशा अनेक प्रकारचे लिखाण नामदेवरायांनी केले. संत जनाबाईंना त्यांच्या घरी आश्रय दिला गेला व त्यांना देखील अध्यात्मिक ज्ञान दिले. हे सर्व नामदेवरायामुळे झाल्यामुळेच जनाबाईचा उल्लेख नेहमी, ‘ दासी जनी नामयाची’ असाच होतो.
नामदेवरायांचे कीर्तन हे त्यावेळेला चर्चेचा विषय ठरत असे. खुद्ध विठ्ठल भगवान कीर्तनाला हजर राहत असे.
‘नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ।’
इतकी शक्ती त्यांच्याकडे होती. त्यांचा शुद्ध भाव होता जो देवाला देखील आवडत असे.
भागवत धर्माची पताका त्यांनी महाराष्ट्राबाहेर नेली लोकांना भक्तीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गोविंद ग्रंथ साहिब या शिख लोकांच्या पवित्र ग्रंथात नामदेवरायांची अभंग व वर्णने केलेली आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाना या ठिकाणी नामदेवरायांची मंदिरे देखील बांधलेली आहे. त्याकाळी भक्ती बरोबरच देशप्रेमाचे बीज लोकांच्या मनात रुजवण्याचे काम केले. 
🌀 *संत नामदेवांसंबंधी आख्यायिका* नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे. 
📚 *संत नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य* घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट) 
चिरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव (सुभाष कि. देशपांडे) 
आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर) 
नामदेव गाथा (संपादक : नाना महाराज साखरे) 
नामदेव गाथा (संपादक: ह.श्री. शेणोलीकर) 
संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित (डॉ. श्रीपाल सबनीस) 
नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग) 
संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
 श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन) 
श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी) 
श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत) 
श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर) 
श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)
 संत नामदेव (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
 संत नामदेव चरित्र (बालवाङ्‌मय, शैलजा वसेकर) 
संत नामदेवांचे कवित्व आणि संतत्व (डॉ. श्रीपाल सबनीस) 
संत शिरोमणी बाबा नामदेव (दीपक बिचे) 
🗽 *नामदेवांची स्मारके* ▪️महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात. 
▪️पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
 ▪️पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे. 
▪️पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. 
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.
 मराठी भाषांमधील सर्वाधिक जूंन्या काळामधील कवींपैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज. प्रल्हाद बाळांचा अवतार संत शिरोमनी नामदेवांनी १०० कोटी अभंग लिहण्याचा संकल्प केला होता. त्यांनी वज्र भाषेमधेही काव्ये रचली. भागवत धर्माचा प्रचार थेट पंजाब पर्यंत करणारे संत नामदेव शीख धर्मियांचे देखील श्रद्धास्थान आहेत. संत नामदेवांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सुमारे २५०० अभंग लिहिले आहेत. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना केली.
 त्यातील सुमारे ६२ अभंग नामदेवजीकी मुखबानी नावाने शीख पंतांच्या 'गुरुग्रंथसाहेब' मध्ये समाविष्ट आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी या ग्रंथातील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार संत श्रेष्ठ नामदेवांनी केला. प्रतिकूल परिस्तिथी मध्येही महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम संत नामदेवांनी केले. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहेता, मलुकदास अश्या संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. महाराष्ट्र आणि पंजाब बरोबरच राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाना, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश मध्ये संत नामदेवांची मंदिरे आहेत.
 संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदि संतांचा मेळा जमला होता. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरु झाली. माणसाला माणूस बनवण्याची त्यांची धडपड होती. १२९१ मध्ये संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांची भेट झाली. ज्ञानदेव नामदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. संत नामदेव कीर्तन करत, चोखामेळा टाळकरी बनून त्यांना साथ देत आणि जनाबाई कीर्तनाचे संचलन करत. यानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले