नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मातृभाषा दिवस [२१ फेब्रुवारी ]


आज २१ फेब्रुवारी.... आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस......आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व व्यवहार आपण मातृभाषेतच करण्याचा संकल्प करुया...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या मनापासुन शुभेच्छा ‼️
✨✨✨✨✨✨✨✨✨🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित.

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची,
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची.

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची,
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची.

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी,
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली.

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर.

हिचे स्वरूप देखणे
हिची चाल तडफेची,
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची.

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती,
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती.

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी,
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी.
(कवी - वि. म. कुलकर्णी)


मराठी, हिंदी आणि भारतीय भाषांबद्दल बोलत असताना जागतिक स्तरावरही अनेक मातृभाषा आहेत. या जगभरातील मातृभाषा जपल्या जाव्यात या निमित्ताने आज (२१ फेब्रुवारी) जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राकडून (UN) २००० या वर्षापासून हा दिवस साजरा करायला सुरूवात झाली. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक मातृभाषा लोप पावत चालल्याचे चित्र आहे. मात्र असे होऊ नये यासाठी युनेस्कोने पुढाकार घेत मातृभाषा आणि त्यासोबत संबंधित संस्कृती टिकावी यासाठी आजच्या दिवसाची निवड केली आहे. त्यामुळे जगभरात आजचा दिवस International Mother language day म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी २१ साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.


२००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात शांतता,  बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी १९५२ मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी वापरल्या जाणार्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राज्य केले. ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. रझाकुल इस्लाम, कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये राहणारी बंगाली या संकल्पनेची सुचना देण्यात आली. त्यांनी ९ जानेवारी १९९८ रोजी कोफी अन्नान यांना पत्र लिहिले की त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित करून जगातील भाषा वाचविण्यापासून एक पाऊल उचलण्यास सांगितले.
भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत.
भारतात देखील शेकडो भाषा बोलल्या जातात. वर्ष 1961 च्या जनगणनेनुसार, भारतात 1652 भाषा बोलल्या जातात. तसेच सध्याच्या रिपोर्टनुसार, भारतात 1365 मातृभाषा आहेत.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला टंग डे (Tongue Day), मदर लँग्वेज डे (Mother language Day), मदर टंग डे (Mother Tongue Day) , लँग्वेज मूव्हमेंट डे (Language Movement Day) आणि Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते.
वर्ष 2015 के अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस का विषय समावेशी शिक्षा के माध्यम से भाषा के साथ- भाषा मैटर्स (Inclusive Education through and with Language - Language Matters) रखा गया.
2016 में इस दिवस का मुख्य विषय (Theme)-“Quality education, language
2017 को यूनेस्को द्वारा दुनियाभर में अंतर्राष्ट्रीय मातृभाषा दिवस (IMLD) मनाया जा रहा है. इस वर्ष इसका थीम (विषय) 'बहुभाषी शिक्षा के माध्यम से सतत भविष्य की ओर' है. सतत विकास को बढ़ावा के लिए, शिक्षार्थियों को अपनी मातृभाषा एवं अन्य भाषाओँ में शिक्षा देनी होगी. 
वर्ष 2018 में इस दिवस का मुख्य विषय (Theme) ‘सतत विकास के लिए भाषायी विविधता और बहुभाषावाद की संख्या’ (Linguistic diversity and multilingualism count for sustainable development) है।
2019 वर्ष  मातृभाषा दिवस की थीम- विकास, शांति और संधि में देशज भाषाओं के मायने है।
अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 2020 के लिए संयुक्त राष्ट्र द्वारा चुना गया विषय है ‘Languages without borders’. यूनेस्को के अनुसार, 'स्थानीय, क्रॉस-बॉर्डर भाषाएं शांतिपूर्ण संवाद को बढ़ावा दे सकती हैं और स्वदेशी विरासत को संरक्षित करने में मदद कर सकती हैं 
वर्ष 2021 के लिए इस दिन की थीम रखी गई है, “Fostering multilingualism for inclusion in education and society” यानि "शिक्षा और समाज में समावेश के लिए बहुभाषावाद को बढ़ावा देना".
सांस्कृतिक और बौद्धिक विरासत को बचाने के लिए अंतर्राष्ट्रीय मातृभाषा दिवस 2022 की थीम 'बहुभाषी शिक्षा के लिए प्रौद्योगिकी का उपयोग: चुनौतियां और अवसर' पर रखी गई है।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले