प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!
खालील लिंकवर क्लिक करा आणि चाचणी सोडवा.
👇👇👇👇
प्रजासत्तक दिन चाचणी
👉👉आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🇮🇳🇮🇳
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.
🏇 इतिहास📒📓🎬📝📖
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधानन तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.
🇮🇳 उत्सव
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे आहात संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
सन २०१९ मध्ये, गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.
⛱ राष्ट्रीय सुट्टी
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
🚚 चित्ररथ
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.
🏃♂ शालेय संचलन प्रजासत्ताक दिन
भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.
🏃♂ विशेष संचलन
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन ड्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले
🌹 संदेश व शुभेच्छापत्रे
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंगा ध्वज आदि संकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.
🤴 👑प्रमुख अतिथी
सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.
वर्ष प्रमुख अतिथी देश
१९५० - राष्ट्रपती सुकर्णो - इंडोनेशिया
१९५१ – राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह - नेपाळ
१९५२ – ----
१९५३ – ----
१९५४ - राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक - भूतान
१९५५ - गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद - पाकिस्तान
१९५६ – कुलपती आरए बटलर - युनायटेड किंगडम

मुख्य न्यायाधीश कोटारो तानाका - जपान
१९५७ – संरक्षण मंत्री जॉर्जी झुकोव्ह - सोव्हिएत युनियन
१९५८ – मार्शल ये जियानिंग - चीन
१९५९ – ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप - युनायटेड किंगडम

१९६० - राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह - सोव्हियेत संघ
१९६१ - राणी एलिझाबेथ दुसरी - युनायटेड किंग्डम
१९६२ – पंतप्रधान विगो कॅम्पमन - डेन्मार्क
१९६३ - राजा नोरोडोम सिहांनौक - कंबोडिया
१९६४ – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लॉर्ड लुईस माउंटबॅटन - युनायटेड किंगडम
१९६५ - खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद - पाकिस्तान
१९६६ – -------
१९६७ – राजा मोहम्मद जहीर शाह - अफगाणिस्तान
१९६८ - पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन - सोव्हियेत संघ
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो - युगोस्लाव्हिया
१९६९ - पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह - बल्गेरिया
१९७० – बेल्जियनचा राजा बॉडोइन - बेल्जियम
१९७१ - राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे - टांझानिया
१९७२ - पंतप्रधान शिवसागर रामगुलाम - मॉरिशस
१९७३ - राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको - झैर
१९७४ - राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो - युगोस्लाव्हिया
पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके - श्रीलंका
१९७५ - राष्ट्रपती केनेथ काँडा - झांबिया
१९७६ - पंतप्रधान जाक शिराक - फ्रान्स
१९७७ - प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक - पोलंड
१९७८ - राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि - आयर्लंड
१९७९ - पंतप्रधान माल्कम फ्रेझर - ऑस्ट्रेलिया
१९८० - राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें - फ्रान्स
१९८१ - राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो - मेक्सिको
१९८२- राजा हुआन कार्लोस पहिला - स्पेन
१९८३ - राष्ट्रपती शेहु शगारी -नायजेरिया
१९८४ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान
१९८५ - राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन - आर्जेन्टिना
१९८६ - पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु - ग्रीस
१९८७ - राष्ट्रपती ॲलन गार्शिया - पेरू
१९८८ - राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने - श्रीलंका
१९८९ - जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह - व्हियेतनाम
१९९० - पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ - मॉरिशस
१९९१ - राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम - मालदीव
१९९२ - राष्ट्रपती मारिओ सोआरेस - पोर्तुगाल
१९९३ - पंतप्रधान जॉन मेजर - युनायटेड किंग्डम
१९९४ - पंतप्रधान कोह चोक थोंग - सिंगापूर
१९९५ - राष्ट्रपती नेल्सन मंडेला -दक्षिण आफ्रिका
१९९६ - राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो - ब्राझील
१९९७ - पंतप्रधान बसदेव पांडे - त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९९८ - राष्ट्रपती जॅक शिराक - फ्रान्स
१९९९ - राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव - नेपाळ
२००० - राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो - नायजेरिया
२००१ - राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका - अल्जीरिया
२००२ - राष्ट्रपती कस्साम उतीम - मॉरिशस
२००३ - राष्ट्रपती मोहम्मद खातामी - इराण
२००४ - राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा - ब्राझील
२००५ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान
२००६ - अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद - सौदी अरेबिया
२००७ - राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन - रशिया
२००८ - राष्ट्रपती निकोला सार्कोझी - फ्रान्स
२००९ - राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव - कझाकस्तान
२०१० - राष्ट्रपती ली म्युंग बाक - दक्षिण कोरिया
२०११ - राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो - इंडोनेशिया
२०१२ - पंतप्रधान यिंगलक शिनावत - थायलंड
२०१५ - राष्ट्रपती बराक ओबामा - अमेरिका
२०१६ - राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद - फ्रान्स
२०१७ - राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान - संयुक्त अरब अमिराती
२०१८ - आशियान शिखर परिषद नेते - प्रधानमंत्री ली सियन लूंग सिंगापुर, प्रायुत चान - ओचा थाईलैंड, आंग सान सू की, म्यांमार, सुल्तान बोल्किया- ब्रुनेई, हुन सेन-कंबोडिया, जोको विडोडो- इंडोनेशिया, नजीब रजाक- मलेशिया, न्गुयेन शुयान फुक-वियतनाम, थॉन्गलौन सिसोलिथ- लाओस, राष्ट्रपति रॉड्रिगो दुतेर्ते- फिलीपींस
२०१९ - राष्ट्रपति सिरिल रामाफोसा - दक्षिण अफ्रीका
२०२० - ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियास बोल्सोनारो

२०२१ - कोरोना कोविड- १९ काळ
२०२२ - कोरोना कोविड - १९ काळ
२०२३ - इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी
२०२४ - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
संदर्भ - संकलन ~