नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

राष्ट्रीय विज्ञान दिवस



राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!!


*28 फेब्रुवारी*
*राष्ट्रीय विज्ञान दिन* आर सी व्ही रामन

पूर्ण नाव-  चंद्रशेखर व्यंकट रामन

जन्म- ७ नोव्हेंबर १८८८ (तिरुचिरापल्ली, तामिळनाडू)

मृत्यू- २१ नोव्हेंबर १९७० ( बंगरूळ, कर्नाटक)

विशेष कार्य– सी. व्हि. रामन यांनी भौतीकशास्र या विषयात केलेल्या संशोधनातून प्रकाशाचे मॉलीक्युलर स्कॅटरिंग म्हणजेच रामन इफेक्ट हा सिद्धांत मांडला. त्याबद्दल त्यांना भौतीकशास्र या विषयातील नोबेल पारितोषिक मिळाले.

आपण ज्यांच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो त्या सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली या गावी ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे एस. पी. जी कॉलेज मध्ये भौतिक शास्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना घरात भौतीकशास्राच वातावरण मिळालं. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर वयाच्या बाराव्या वर्षीच अत्यंत कठीण मानली जाणारी मेट्रिक्स परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांना डॉ. अॅनि बेझंट याचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांचा प्रचंड पगडा सी.व्ही. रामन यांच्यावर पडला. त्या दरम्यान त्यांच्या वडिलांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या प्रकृतीचा विचार करता एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना विदेशात न पाठवण्याचे ठरले. त्यामुळे त्यांना आपल्या देशात राहूनच शिक्षण घेण गरजेच होत. त्यांनी १९०३ मध्ये चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे चालून त्यांनी प्रकाशाचे मॉलीक्युलर स्कॅटेरिंग हा शोधनिबंध प्रकाशित केला. ज्या दिवशी त्यांनी नेचर या मासिकात शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी पाठवला होता. त्या दिवसच स्मरण रहाव म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपला देश घडावा म्हणून इंडियन इंस्टिट्युत ऑफ सायन्स, बंगरूळ येथे त्यांनी ज्ञानदानाच कामही केल. त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी भौतीकशास्रात केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९३० सालचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यासोबतच लेनिन शांतता पुरस्कार, भारतातील सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. या महान शास्राज्ञाच्या नावाने  रॅन्चो नावाची संस्था २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबर मध्ये पुरस्कार देत असते. या महान शास्रज्ञाचा देहांत २१ नोव्हेंबर १९७० मध्ये बंगरूळ येथे झाला.

जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत? आणि यात *भारतीय किती*? असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर त्याच उत्तर आहे.
सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पाहिल्या दहा देशामध्ये म्हणजेच टॉप टेन मध्ये पहिल्या क्रमांकावर *अमेरिका* मग *ब्रिटन*, *चीन,* *जर्मनी* , *ऑस्ट्रेलिया*, *नेदरलँड*, *कॅनडा*, *फ्रान्स*, *स्विझर्लांड* आणि *स्पेन* आहे.

आपल्या मनात विचार आला असेल की *भारत का नाही* या यादीत? कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तरी त्या देशाचे लागतात. जसे अमेरिकेचे *2639* शास्त्रज्ञांचा या यादीत स्थान मिळाले आहे, ब्रिटनचे *546*, चीनचे *482* शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि *भारताचे फक्त दहा* शास्त्रज्ञांचा या यादीत समावेश आहे. म्हणजे किमान शंभर शास्त्रज्ञांची तरी यादी हवी आणि त्याच्या जवळपास पण आपण भारतीय नाही आहोत.

 *"गेल्या साठ वर्षात आपण असा एक तरी असा शोध लावला आहे का की जेणेकरून जग बदलले आणि आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली*" काय कारण असेल याचे? 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शंभर शास्त्रज्ञांचे नाव सुद्धा आपल्याला देता येत नाही.

आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो. आपल्या सर्वांना रेडीमेड उत्तराची सवय झाली आहे.

शिक्षणपद्धती ही प्रश्नांवर आधारित हवी. विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये तसे वातावरण हवे. *विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करावा लागतो.*

शास्त्र विषय शाळेत कॉलेजमध्ये शिकवणे वेगळे आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणे वेगळे. त्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासा, कुतूहल याला भरपूर वाव हवा. शिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचार हवे, *कारण अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर एक प्रक्रिया आहे.* तिचा देव धर्माशी संबंध नसतो. घराघरातून, शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतो. इथूनच त्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळूहळू त्याला किंवा तिला प्रश्नच पडत नाही.

*जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकिस्ता करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होत नाही.* जर पुढील काही वर्षात भारतीय शास्त्रज्ञांची यादी 10 वरून 100 वर न्यायची असेल तर आज शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजे. शाळेमध्ये असे काही वातावरण निर्माण करावे लागेल की विद्यार्थी सातत्याने हात आणि मेंदू याचा वापर करतील. अर्थात कृतिशील उपक्रम मुलांना करायला मिळाला हवे. त्यातून त्यांना असंख्य प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा ते स्वतःच शोधतील.
या करिता 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन प्रत्येक शाळेत प्रयोग करून साजरा करूया .


*28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन* आपण साजरा करतो त्या मागील कारण पण तसंच आहे.
Dr.C.V.Raman यांनी 28 फेब्रुवारी रोजी आपला शोध निबंध सादर केला होता त्या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळाले त्याची आठवण म्हणून आपण हा दिन साजरा करतो.

*आपण सर्वांनी विध्यार्थ्यांच्या  अवतीभवती जिज्ञासा, कुतूहल आणि प्रश्न निर्माण होतील वातावरण निर्माण करायचे आहे.* असे वातावरण प्रथम  घरातून शाळेत, शाळेतून कॉलेज, कॉलेज ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवे. चला आजपासून शिक्षणात सृजनशीलतेला वाव देऊ. लहान मुलांच्या प्रत्येक निरर्थक प्रश्नांची उत्तरे देऊ कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की *The Important things is not to Stop Questioning.*


आगामी झालेले