नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

१५ मे जागतिक कुटुंब दिन’ world family day


१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱया मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आजीच्या हातचे जेवण, आजी-आजोबांच्या गोष्टी या सुखाला मुले मुकतात. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी १५ मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिन’ साजरा केला जातो. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही हे आहे. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ या घोषणेच्या आजच्या जगात एकत्र कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. परंतु असं असलं, तरी अलीकडच्या या विभक्त कुटुंब पद्धतीला तडा देत आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, चुलत भावंडे अशा भल्या मोठया गोतावळ्यासह राहणारी काही ‘मोठी सुखी कुटुंबं’ही आहेतच.
भारतीय कुटुंब पद्धतीबाबत विचार केला असता प्राथमिक व संयुक्त कुटुंब पद्धत एकविवाही व बहुविवाही कुटुंबद्धत, मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धत आढळून येते. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह खरतर माणसामधील नाती ही आपल्या जन्मावरून विवाहवरून अथवा एखाद्याला दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. खर तर एकत्र कुटुंबपद्धती इतर दुय्यम नातेसंबंधाचा अंतर्भाव होतो. एकत्र कुटुंबसंस्थेत आजी-आजोबा, आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, काका-काकू त्यांची मुले-मुली असे घटक असतात. साधारण: वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारताच्या काळात आपण पाहिले तर, एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. आज बायका संसाराला हातभार म्हणून नोकर्याळ करायला लागल्या आहेत. त्यामुळे नवरा बायको दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. त्यांची मुले शाळेत असली तरी, त्यांना डब्यात पोळी-भाजी ऐवजी कुरकुरे, केक, ड्रायफुड असे काहीतरी दिले जाते. खर तर कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना करतात. कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही.
जागतिक पातळीवर सलोख्याचे महत्त्व लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात १४० देशांनी या ठरावाला संमती दर्शविली. या सलोख्याचा खरा प्रारंभ १९९९ मध्ये इस्त्रायली आणि पॉलिस्टनी कुटुंबात निर्वासित छावण्यांत गळाभेट घडवून करण्यात आला होता. पुढच्याच वर्षी अमेरिकेने या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा दिला आणि 'जागतिक कुटुंब' दिन साजरा करण्याचा ठरावही मंजूर केला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीने हा दिवस साजरा करावा, अहिंसा, शांती आणि सहभाग यासंबंधी व्यक्तिगत प्रतिज्ञा करून आपला समाज, आपले जग सुरक्षित असल्याची ग्वाही एकमेकांना द्यावी असा यामागील उद्देश आहे.
लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक करणाऱ्या महिलेने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे सलग १० वर्षे या दिनाचा जगभर प्रसार केला. त्यांच्या चळवळीने जागतिक कुटुंब दिनाच्या सोहळ्यात विविध उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली. या चळवळीचे उद्दिष्टच मुळी 'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा' अशा असून, हे सारे कार्य जागतिक पातळीवरील सरकारे, विविध कार्यालये, संस्था यांच्यामार्फत व्हायला हवे, असा त्यांचा कटाक्ष असतो. 'ग्लोबल फॅमिली' ही न्यूयॉर्कमधली स्वयंसेवी संस्था संयुक्त राष्ट्राच्या या उपक्रमाला हिरीरीने हातभार लावत असते. 
कुटुंबापेक्षा मोठं
धन कोणतंच नाही…
वडिलांपेक्षा चांगला
सल्लागार कोणीही नाही…
आईच्या सावलीपेक्षा मोठं
जग कोणतंच नाही…
भावापेक्षा उत्तम
भागिदार कोणीही नाही…
बहिणीपेक्षा जवळची
शुभचिंतक कोणीही नाही…
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं
दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही…..


1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

छान लिहिले , शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले