नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, २१ जून, २०२०

फादर्स डे (पितृदिन ) Father's day

Father's day 


दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अनेक देशात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. फादर्स डे सर्वप्रथम १९ जून १९१० रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. सोनेरा डोड यांनी आपला सांभाळ करणाऱ्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती, पुढे भारतातही हा दिवस स्वीकारून साजरा केला जाऊ लागला.
खरं तर आई-वडीलांविषयी व्यक्त होण्यासाठी कोणत्या खास दिनाची गरजच नाही. कारण प्रत्येक दिवस हा त्यांचाच असतो. पण कधी कधी आदरयुक्त दरारा असल्यामुळे आपण त्यांच्याजवळ व्यक्त होणं टाळतो. आपल्याला जन्म देण्यापासून ते ओळख देण्यापर्यंत आणि ती ओळख कशी जपावी याचे धडे देणाऱ्या वडिलांना थँक्यू म्हणण्याचा हा दिवस आहे. याच खास दिनी व्यक्त होण्यासाठी या टिप्स तुमच्या कमी येऊ शकतात.आज पितृदिन अर्थात फादर्स डे! आपण नेहमीच असं ऐकत आलो आहोत की मूलं आईपेक्षा वडिलांना जास्त घाबरतात. त्यामुळे कधी आपलं प्रेम वडिलांकडे ते व्यक्त करत नाहीत. अर्थात याला आताची आधुनिक मूलं अपवाद आहेत. पण अगदी १०-२० वर्षांपूर्वीही सामान्यत: वडिलांचा घरात खूप धाक असायचा. काहीही झालं की प्रत्येक मुल हे आईवर विसंबून असायचं कारण वडील रागावतील. ओरडतील अशी त्यांना भीती असे. पण जस जसं वय वाढत जातं, मुलं मोठी होतात तस तसे वडील मुलांना रागावणे ओरडणे बंद करतात आणि खूप शांत होतात. पण शेवटी वडिलांचा धाक हा मनात असतोच. तुम्ही सुद्धा आजवर कधीच वडिलांपुढे व्यक्त झाला नसाल किंवा कधीतरी त्यांच्या पुढे व्यक्त व्हावं असं वाटत असले तर पितृदिनापेक्षा खास दिन दुसरा कोणता नाही. त्यामुळे या पितृदिनाचे औचित्य साधून विसरा मनातील सगळी भीती आणि द्या आपल्या वडिलांना शूभेच्छा त्या सुद्धा आपल्या मातृभाषेतून अर्थात मराठीमधून!
१) प्रिय बाबा, आजवर कधी बोललो नाही पण खरंच तुमच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. लहानपणापासून तुमच्याकडे पाहत मी मोठा झालोय आणि मी नेहमी देवाचे आभार मानतो कि मी तुमचा मुलगा म्हणून जन्म घेतला. बाबा नेहमी तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू दे हीच इच्छा! तुम्हाला पितृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
२) बाबा म्हणजे झरा मायेचा, बाबा म्हणजे आधार आयुष्याचा, बाबा म्हणजे धडा मुल्यांचा, बाबा म्हणजे अवतार देवाचा, बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"बाप बाप असतो...
तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो...
मुलासाठी राब-राब राबतो...
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.


अमेरिकेत या दिवसाची सुरूवात झाली. या दिवसाबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला सगळ्यात लोकप्रिय कहाणी सांगणार आहोत. फादर्स डे ची सुरूवात अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये सोनोरा लुईस स्मार्ट नावाच्या या महिलेनं केली. लहान वयातच सोनोराचं आपल्या आईला गमावलं होतं. त्यानंतर सोनोराच्या वडीलांनी संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. वडीलांसह आईचेही प्रेम दिले.
१९१० ला पहिल्यांदा साजरा केला होता फादर्स डे
१९०९ मध्ये सोनोरानं एक सभेत मातृ दिनाबद्दल ऐकले तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला की, आईची माया, ममता यासाठी एक दिवस समपर्ण केला जाऊ शकतो कर पित्याच्या योगदानासाठी का नाही? त्यानंतर फादर्स डे साजरा करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला, लोकांशी बोलावं लागलं. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला. त्यानंतर १९ जून १९१० ला फादर्स डे साजरा केला गेला.
वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो फादर्स डे
जगभरातील सगळ्या देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जात नाही. भारत, अमेरिकेसह अन्य काही देशात तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह अन्य काही देशात १९ मार्च ला पितृ दिन साजरा केला जातो. तर न्यूजीलँड, फिजी आणि पापुआ, न्यू गिनीमध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो.
बापाला प्रेम करणारे सुज्ञ पोरं लाभण ही त्याची फार मोठी उपलब्ध मानली जाते. संपत्ती कितीही असूनही अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरते. ज्यांना चांगले अपत्य लाभतात खरंच ती माणसं भाग्यवान. कारण अनेकांना मुलांचं प्रेम मिळत नाही, सन्मान मिळत नाही. मुलांच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बापाच्या हृदयाच्या ठिकऱ्या होतात, हे किती जणांच्या लक्षात येत असेल. बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डॉक्टर उपचार करु शकत नाही. यावर मुलांचं प्रेम हेच एकमेव औषध रामबाण औषधी ठरते. मुलाची अधोगती पाहून' माझं कसं होईल याची चिंता बाप करत नाही लेकराचं कसं होईल म्हणून तो तळमळतो, हे समजायला बापच व्हावे लागते.
आईच्या तुलनेत बापाला फारच कमी मिळते महत्व दिले गेले आहे. आई जितकी महत्त्वाची तितकाच बापही महत्वाचा असतो. परंतु साहित्यिकांनी, लोकवाड्मय निर्मात्यांनी आईची सर्वाधिक महती गायली. बापाकडे दुर्लक्ष झाले. आई प्रेम व्यक्त करते. आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलांना ऐकायला आणि वाचायला मिळत असते. खरं तर आई म्हणजे व्यक्त प्रेम आणि बाप म्हणजे काही राग नसतो. बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते, याची जाणीव मुलांना करुन देणे गरजेचे आहे. सतत आई कृती आणि उक्तीतून व्यक्त होत राहते.
आपल्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाच्या वरुन प्रगती साधत पुढे जाणे ही बाब बापासाठी सर्वांत मोठी भेट ठरेल, असा संकल्प करणे, बापाला समजून घेणे, प्रेम देणे, सन्मान देणे असे घडले तर फादर्स डे अर्थपूर्ण ठरेल.

आंतरराष्ट्रीय योग दिन

 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन


       योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.

योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात.

सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात. हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.

योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते.

योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. योगाभ्यासाचे हे फायदे लक्षात घेऊन २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

याआधी डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान आणि योग गुरू श्री श्री रविशंकर आणि इतर योग गुरूंनी पुर्तगाली योग परिसंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन केले आणि संपूर्ण दुनियेत २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर ‘योग: विश्व शांतीसाठी एक विज्ञान’ नावाचे संमेलन ४-५ डिसेंबर २०११ मध्ये भरविण्यात आले.

जगत गुरु अमृत सूर्यानंद यांच्या म्हणण्यानुसार, विश्व योग दिनाचा विचार त्यापूर्वी दहा वर्षांपासून डोक्यात होता. पण संपूर्ण भारतातून इतक्या मोठ्या संख्येने या विचाराचे समर्थन करणे हे प्रथमच होत होते.

त्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व योग दिवस २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र आणि यूनेस्कोद्वारा घोषित करण्यासाठी स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कित्येक मोठमोठे योगविद्येत पारंगत असलेले योगी याला उपस्थित होते.

या उपक्रमाचे सूतोवाच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते,

“योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.

योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो. चला तर, एक आंतरराष्ट्रीय योग दिवस दत्तक घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करूयात.”

यानंतर २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली.

प्रधानमंत्री मोदी यांचा हा प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला. लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती’ अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले. सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. “आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती. ११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली.

भारतात २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर झाला ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजपथावर जवळजवळ ३६००० लोकांबरोबर योगासने केली.

*२१ जून हाच योग दिवस का ?*

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.

याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.

योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला.

 *आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.*

तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.

*विश्व योग दिवसाची उद्दिष्टे:*

◆ योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
◆ योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
◆ योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
◆आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
◆ संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
◆ लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
◆ योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
◆ लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
◆ मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
◆ योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे.

म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.  आपणही या अभियानात सामील होऊयात…
संकलित माहिती 

आगामी झालेले