नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग Phrases and Sentences



वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग
Meaning of Phrases and Use in Sentences
वाक्प्रचार म्हणजे काय ?
वाक्प्रचार(Vakprachar/Vakyaprachar) म्हणजे काही शब्दसमूहांचा मराठी भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात.

1) अंग चोरून काम करणे
अर्थ :- फारच थोडे काम करणे
वाक्य:- आळशी माणूस नेहमीच अंग चोरून काम करतो.

2) अधीर होणे
अर्थ :- उत्सुक होणे.
वाक्य:- मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला.

3) अवगत असणे 
अर्थ:- माहित असणे.
वाक्य:- आदिवासी स्त्रियांना टोपली विकण्याची कला अवगत असते.

4) अबाधित ठेवणे
अर्थ :- बंधन न घालणे.
वाक्य :- वडिलांच्या निधनानंतर राजाने शेतावरच हक्क अबाधित ठेवला.

5) अन्नान होणे 
अर्थ :- गरीबीमुळे खायला न मिळणे.
वाक्य:- लॉकडाऊन मुळे मोलमजुरी करणारे लोक अन्नान झाले.

6) असंतोष निर्माण होणे
अर्थ :- चीड निर्माण होणे, राग येणे.
कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला.

7) अभिमान वाटणे
अर्थ :- गर्व वाटणे.
शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना अभिमान वाटला.

8) अभिवादन करणे
अर्थ :- नमस्कार करणे.
वाक्य :- विशाखाने आई बाबांना अभिवादन केले.

9) असंतोष निर्माण होणे
अर्थ :- चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.
वाक्य :- इंग्रजी राजवटीविरोधी भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

10) अभिप्राय देणे
अर्थ :- मत देणे, प्रतिक्रिया करणे.
वाक्य :- राजूने लिहिलेले पत्रलेखन चांगले आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

11) अलगद उचलणे
अर्थ :- सावकाश उचलणे.
वाक्य :- समीरने आपले पुस्तक अलगद उचलले.

12) अटक करणे
अर्थ :- कैद करणे.
वाक्य :- खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी अखेर अट्टल चोरांना अटक केली.

13) अभिलाषा धरणे
अर्थ :- एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.
वाक्य :- आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची कधीच अभिलाषा धरू नये.

14) अचूक वेध घेणे
अर्थ :- न चुकता नेम साधणे.
वाक्य :- नेमबाज अभिनव बिंद्रा ने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

15) अवाक होणे
अर्थ :- आश्चर्यचकित होणे.
वाक्य :- अचानक आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य पाहून हर्षा अवाक झाली.

16) अढी नसणे
अर्थ :- मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.
वाक्य :- स्पष्ट बोलणे झाल्यामुळे मनीषच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.

17) अहोरात्र झटणे
अर्थ :- रात्रंदिवस कष्ट करणे.
वाक्य : शेतकरी मातीतून पीकरूपी सोने पिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतो.

18) अद्दल घडणे
अर्थ :- शिक्षा करणे.
वाक्य :- गजांआड टाकून पोलिसांनी चोरांना चांगलीच अद्दल घडवली.

19) अंत होणे
अर्थ :- मृत्यू होणे.
वाक्य :- अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला.

20) अंदाज बांधणे
अर्थ :- अटकळ बांधणे, तर्क करणे.
वाक्य :- हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी चार दिवसात पाऊस लागण्याचा अंदाज बांधला.

21) अन्नाला जागणे
अर्थ :- कृतज्ञ असणे.
वाक्य :- कुत्रा घराची राखण करून मालकाच्या अन्नाला जागतो.

22) अत्तराचे दिवे जाळणे
अर्थ :- मूर्खपणाने उधळपट्टी करणे.
वाक्य :- विशालला लॉटरी लागल्याने त्याने अत्तराचे दिवे जाळले.

23) आश्चर्य वाटणे
अर्थ :- नवल वाटणे.
वाक्य :- नेहमी मस्ती करणारा राजू शांत बसलेला पाहून आईला आश्चर्य वाटले.

24) आकाश ठेंगणे वाटणे
अर्थ :- खूप आनंद होणे.
वाक्य :- निशांत शाळेत पहिला आलेला पाहून आई-बाबांना आकाश ठेंगणे वाटले.

25) आव्हान देणे
अर्थ :- संघर्षाला आमंत्रण देणे.
वाक्य :- पैलवानाने कुस्तीसाठी उपस्थित पैलवानांना आव्हान दिले.

26) आरंभ होणे
अर्थ :- सुरुवात होणे.
वाक्य :- देशाच्या शाळेच्या प्रवेशाने शिक्षणाला आरंभ झाला.

27) अजरामर होणे
अर्थ :- कायम स्मरणात राहणे.
वाक्य :- ज्या वीर सैनिकांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले, ते अजरामर झाले.

28) अन्नान दशा होणे
अर्थ :- उपासमारीची पाळी येणे.
वाक्य :- महापुरामुळे उत्तराखंडातील शेकडो खेडेगावांतील लोकांची अन्नान दशा झाली आहे.

29) अवगत होणे
अर्थ :- माहित होणे, कळणे, आकलन होणे.
वाक्य : चार दिवसांच्या अभ्यासाने रोनित ला कॉम्पुटर चालवण्याची कला अवगत झाली.

30) अचंबा वाटणे
अर्थ :- नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.
वाक्य :- चार वर्षाच्या संगीताला सहजपणे संगणक चालवताना पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.

31) अभिनंदन करणे
अर्थ :- कौतुक करणे.
वाक्य :- दहावीच्या परीक्षेत विद्यालयात पहिल्या आलेल्या केशवचे गुरुजींनी अभिनंदन केले.

32) अवहेलना करणे
अर्थ :- अपमान करणे, अनादर करणे.
वाक्य :- चांगल्या माणसाचा अवहेलना करू नये.

33) अधीर होणे
अर्थ :- उत्सुक होणे.
वाक्य :- आजोबांनी नवीन आणलेल्या खेळणीशी खेळण्यासाठी पूर्वाचे मन अधीर झाले होते.

34) इनाम देणे
अर्थ :- बक्षीस देणे.
वाक्य :- स्पर्धेत जिंकलेल्या मुलांना पाहुण्यांनी इनाम दिले.

35) उदरनिर्वाह करणे
अर्थ :- उपजीविका करणे.
वाक्य :- मोलमजुरी करून शामराव आपला उदरनिर्वाह करतात.

36) उघड्यावर टाकणे
अर्थ :- निराधार करणे.
वाक्य :- केशवने आईबाबांना घराबाहेर काढून उघड्यावर टाकले.

37) उपकार फेडणे
अर्थ :- उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
वाक्य :- आपणांस मदत करणाऱ्यांचे उपकार फेडावेत.

38) उंबरठा ओलांडणे
अर्थ :- मर्यादा सोडणे.
वाक्य :- आईबाबांना आपमन करून विलासने उंबरठा ओलांडला.

39) उत्तेजन देणे
अर्थ :- प्रोत्साहन देणे.
वाक्य :- शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी उत्तेजन दिले.

40) उपकार फेडणे
अर्थ :- उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
वाक्य :- ज्यांनी आपणांस मदत केली, आपण त्यांचे उपकार फेडावेत.

41) कंठ दाटून येणे
अर्थ :- गहिवरून येणे, रडू येणे.
वाक्य :- मित्राची वाईट अवस्था पाहून तिचा कंठ दाटून आला.

42) कानाडोळा करणे
अर्थ :- दुर्लक्ष करणे.
वाक्य :- आईने पियुच्या चुकांकडे कानाडोळा केला.

43) कंबर कसणे
अर्थ :- तयार होणे.
वाक्य :- दिक्षा ने स्पर्धा परीक्षेसाठी कंबर कसली.

44) कान देणे
अर्थ :- लक्षपूर्वक ऐकणे.
वाक्य :- सरांनी सांगितलेली कथा मुलांनी कान देऊन ऐकली.

45) खडानखडा माहिती असणे
अर्थ :- बारीकसारीक गोष्टी माहिती असणे.
वाक्य :- मोगलीला जंगलाची खडानखडा माहिती होती.

46) कानात वारे शिरणे
अर्थ :- बेभान होणे.
वाक्य :- वासरू कानात वारे शिरल्यासारखे धावत सुटले.

47)कागाळी करणे
अर्थ :- तक्रार करणे.
वाक्य :- सम्यकने आईकडे पियुषची कागाळी केली.

48) कंप पावणे
अर्थ :- थरथरणे.
वाक्य :- भूकंप आल्यावर जमीन कंप पावली.

49) कोसळणे
अर्थ :- जोरात पडणे.
वाक्य :- भरपूर पावसामुळे झाडे कोसळली.

50) कुरवाळणे
अर्थ :- गोंजारणे.
वाक्य :- आई आपल्या मुलाला कुरवाळते.

51) कान झाकून घेणे
अर्थ :- न ऐकणे, दुर्लक्ष करणे.
वाक्य :- शिक्षक शिकवत असताना राजेशने कान झाकून घेतले.

52) गुबगुबीत होणे
अर्थ :- लठ्ठ होणे.
वाक्य :- राजू चमचमीत खाऊन गुबगुबीत झाला.

53) करुणा करणे
अर्थ :- दया दाखवणे.
वाक्य :- सर्व प्राण्यांवर करुणा करावी.

54) संघर्ष करणे
अर्थ :- झुंजणे, लढणे.
वाक्य :- देशाच्या संरक्षणासाठी भारतीय जवान सीमेवर संघर्ष करतात.

55) मुग्ध होणे
अर्थ :- मोहित होणे.
वाक्य :- स्मिताचा नृत्याविष्कार पाहून सर्व प्रेक्षक मुग्ध झाले.

56) दंग असणे
अर्थ :- मग्न असणे.
वाक्य :- वारकरी कीर्तनात दंग झाले.

57) चिंतेत पडणे
अर्थ :- काळजीत पडणे.
वाक्य :- चैतन्य घरी लवकर आला नाही त्यामुळे आई चिंतेत पडली.

58) घाम गाळणे
अर्थ :- कष्ट करणे.
वाक्य :- शेतकरी दिवसभर शेतात घाम गाळतो.

59) डोळा लागणे
अर्थ :- झोप लागणे.
वाक्य :- पियुषचा टीव्ही बघत बघत डोळा लागला.

60) रस असणे
अर्थ :- रुची असणे, आवड असणे.
वाक्य :- अनुला गाणी म्हणण्यात रस आहे.

61) संकल्प करणे
अर्थ :- एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे.
वाक्य :- आयुषने दररोज व्यायाम करण्याचा संकल्प केला.

62) पोटात कावळे ओरडणे
अर्थ :- खूप भूक लागणे.
वाक्य :- जेवायला उशीर झाल्यावर राजुच्या पोटात कावळे ओरडायला लागले.

63) घाबरगुंडी उडणे
अर्थ :- खूप घाबरणे.
वाक्य :- साप दिसल्यावर अनुजाची घाबरगुंडी उडाली.

64) खडानखडा माहिती असणे
अर्थ :- बारीकसारीक माहिती असणे.
वाक्य :- आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामाची खडानखडा माहिती आहे.

65) खडकातून पाणी काढणे
अर्थ :- अशक्य गोष्ट साध्य करणे.
वाक्य :- नापीक जमिनीतून चांगले पीक काढून माधवने जणू खडकातून पाणी काढले.

66) खोडा घालणे
अर्थ :- संकट निर्माण करणे, विघ्न आणणे.
वाक्य :- गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.

67) खुसपट निघणे
अर्थ :- काहीतरी दोष निघणे.
वाक्य :- विकासने कोणताही व्यवसाय सुरु केला, तरी त्यात काही ना काही खुसपट निघतच होती.

68) खांदे पडणे
अर्थ :- निराश होणे, दीनवाणे होणे.
वाक्य :- अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे दिव्याचे खांदे पडले

69) खूणगाठ बांधणे
अर्थ :- निश्चय करणे.
वाक्य :- न चुकता, रोज कसरत करण्याची निखिलने मनाशी खूणगाठ बांधली.

70) खनपटीला बसने
अर्थ :- पिच्छा पुरवणे.
वाक्य :- आईने दिलेला अभ्यास पूर्ण करण्याचे दीपाच्या खनपटीला बसवले.

71) खिळून राहणे
अर्थ :- जागच्या जागी स्थिर होणे.
वाक्य :- समोर साप पाहताच विनोद खिळून राहिला.

72) खोडी उलटणे
अर्थ :- आपण केलेली खोडी अंगाशी येणे.
वाक्य :- ऋषी धीरजची मस्करी करायला गेला, पण त्याची त्याच्यावरच खोडी उलटली.

73) खसखस पिकणे
अर्थ :- मोठयाने हसणे.
वाक्य :- सरांनी चुटकुला सांगताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.

74) खळखळ करणे
अर्थ :- नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.
वाक्य :- ताटात कारल्याची भाजी वाढली की, रेणू आईपाशी खळखळ करते.

75) खडे फोडणे
अर्थ :- दोष देणे.
वाक्य :- सचिनकडून अंगठी हरवल्यामुळे सर्वजण त्याच्यावर खडी फोडत आहेत.

76) खोऱ्याने पैसा ओढणे
अर्थ :- खूप पैसा मिळवणे.
वाक्य :- दिवसरात्र अभ्यास करून डॉक्टर झालेला प्रणव आज खोऱ्याने पैसा ओढत आहे.

77) खुशीत मान डोलवणे
अर्थ :- आनंदाने होकार देणे.
वाक्य :- खेळणे हवे का, असे विचारताच छोटयाश्या विहानने खुशीत मान डोलावली.

78) खाली मान घालणे
अर्थ :- शरम वाटणे.
वाक्य :- चूक समजल्यामुळे अनुने खाली मान घातली.

79) खपणे
अर्थ :- कष्ट करणे.
वाक्य :- चांगले पीक पिकण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.

80) खेद वाटणे
अर्थ :- वाईट वाटणे.
वाक्य :-आईला वाईट बोलल्याबद्दल, जीवनला खेद वाटला.

81) खंड न पडणे
अर्थ :- एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
वाक्य :- नित्यनियमाने देवपूजा करण्यात आईचा कधीही खंड पडला नाही.

82) ख्याती मिळवणे
अर्थ :- प्रसिद्ध होणे, नाम कमावणे.
वाक्य :- मदर तेरेसा यांनी गरिबांची सेवा करून ख्याती मिळवली.

83) खल करणे
अर्थ :- चर्चा करणे.
वाक्य :- पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेतील सदस्य गंभीर खल करत आहेत.

84) खुशामत करणे
अर्थ :- स्तुती करणे.
वाक्य : मित्रांसोबत सहलीस जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून सचिनने वडिलांची खुशामत करत होता.

85) वीरगती प्राप्त होणे
अर्थ :- देशासाठी लढताना मरण येणे.
युद्धात लढताना भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली.

86) सुगावा लागणे - शोध लागणे, तपास लागणे.
वाक्य :- पोलिसांना चोराचा सुगावा लागला.

87) प्रशंसा करणे
अर्थ :- स्तुती करणे.
वाक्य :- अक्षय ने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याची सर्व शिक्षकांनी प्रशंसा केली.

88) घर डोक्यावर घेणे
अर्थ :- खूप दंगा करणे.
वाक्य :- सुट्टीच्या दिवशी मुलं घर डोक्यावर घेतात.

89) धुळीस मिळणे
अर्थ :- नष्ट होणे.
वाक्य :- मुसळधार पावसाने भाताचे पीक धुळीस मिळाले.

90) डोळ्याचे पारणे फिटणे - अतिशय प्रसन्न होणे.
वाक्य :- मनाली ने शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यावर बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

91) बाचाबाची होणे
अर्थ :- शाब्दिक भांडण होणे.
वाक्य :- अजय आणि विजयमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.

92) मान्य करणे
अर्थ :- कबूल करणे.
वाक्य :- सुमितने त्याची चूक आईसमोर मान्य केली.

93) मार्ग काढणे
अर्थ :- रस्ता काढणे, मार्ग काढणे.
वाक्य :- जंगलातून जात असताना सुजयने मार्ग काढला.

94) तगादा लावणे
अर्थ :- पुन्हा पुन्हा विचारणे
वाक्य :- सावकाराने कर्ज घेतलेल्या व्यक्ती कडे पैश्यासाठी तगादा लावला.

95) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले.

96) भांबावून जाणे.
अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो भांबावून गेला.

97) निकाल लावणे
अर्थ :- सोक्षमोक्ष लावणे
वाक्य :- खूप दिवस चालत असलेल्या केस चा वकील सुनील राणे यांनी योग्य तो निकाल लावला

98) अचंबित होणे
अर्थ :- आश्चर्यचकीत होणे
अचानक भावाला आलेला पाहून वडील अचंबित झाले.

99) समाधानाची ढेकर देणे
अर्थ :- जेवून तृप्त होणे.
वाक्य :- आईने केलेल्या पुरणपोळ्या खाऊन पियूषने समाधानाचा ढेकर दिला.

100) संगोपन करणे.
अर्थ :- पालनपोषण करणे.
वाक्य:- आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने तिचे संगोपन केले.

101) रवाना होणे
अर्थ :- निघून जाणे.
वाक्य :- काही अचानक जरुरी कामामुळे सुट्टीवर आलेल्या अजयला कामाच्या गावी तातडीने रवाना व्हावे लागले.

102) टेकीला येणे
अर्थ :- हैरान होणे.
वाक्य :- आज कालच्या वाढत्या महागाईने सर्वांना टेकीला आणले आहे.

103) आटापिटा करणे
अर्थ :- खूप प्रयत्न करणे.
वाक्य :- कार्तिक ने जिवाचा आटापिटा करून अखेर यश संपादन केले.

104) सतर्क असणे
अर्थ :- दक्ष असणे.
वाक्य :- पोलिस नेहमीच लोकांच्या सेवेसाठी सतर्क असतात.

105) स्तुती करणे
अर्थ :- प्रशंसा करणे, गुणगान गाणे.
वाक्य :- सम्यकने परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर शिक्षकांनी त्याची स्तुती केली.

106) सहाय्य करणे
अर्थ :- मदत करणे.
वाक्य :- लोकांनी पूरग्रस्तांना खूप सहाय्य केले.

107) पोटाशी धरणे
अर्थ :- मायेने कुशीत घेणे.
वाक्य :- आई आपल्या तान्ह्या बाळाला पोटाशी धरते.

108) पारा चढणे
अर्थ :- राग येणे.
वाक्य :- वर्गात मुलांचा गोंधळ पाहून शिक्षकांचा पारा चढला.

109) दिवस पालटणे
अर्थ :- चांगले दिवस येणे.
वाक्य :- पाऊस पडल्यावर शेतकऱ्याचे दिवस पालटले.

110) ताव मारणे
अर्थ :- भरपूर खाणे.
वाक्य :- हॉटेलमध्ये गेल्यावर सम्यकने रोटीवर ताव मारला.

111) वनवन करणे
अर्थ :- खूप भटकणे.
वाक्य :- राजुने कामासाठी दिवसभर वनवन केली.

112) हंबरडा फोडणे
अर्थ :- मोठ्याने रडणे.
वाक्य :- वडील अपघातात गेल्याचे समजताच ताईने हंबरडा फोडला.

113) बेत करणे
अर्थ :- योजना आखणे.
वाक्य :- आज आईने पोळ्यांचा बेत केला.

114) उदास होणे
अर्थ :- खिन्न होणे.
वाक्य :- राजुला गणितात पडलेले गुण पाहून त्याचे वडील उदास झाले.

115) देखरेख करणे
अर्थ :- राखण करणे.
वाक्य :- मनोज घराची खूप चांगली देखरेख करतो.

116) तोंड देणे
अर्थ :- सामना करणे.
वाक्य :- सर्व भारतीयांनी कोरोनाच्या संकटाला धैर्याने तोंड दिले.

117) प्राणाला मुकले
अर्थ :- जीव जाणे, मरण येणे.
वाक्य :- कोरोनामुळे जगात अनेक लोक आपल्या प्राणाला मुकले.

118) आवर्जून पाहणे
अर्थ :- मुद्दाम पाहणे.
वाक्य :- कोल्हापूरला भेट दिल्यानंतर शाहू पॅलेस आवर्जून पहावा.

119) लळा लागणे
अर्थ :- ओढ वाटणे.
वाक्य :- भरपूर दिवस गावी राहिल्यामुळे पियुषला वासराचा लळा लागला.

120) काखा वर करणे
अर्थ :- आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.
वाक्य :- आईच्या आजारपणात महेश दादाकडे पैसे मागायला आला तेव्हा दादांनी काखा वर केल्या.

121) केसाने गळा कापणे
अर्थ :- वरकरणी प्रेम दाखवून कपटाने घात करणे.
वाक्य :- रमेशने आपल्या मित्राचा केसाने गळा कापला.

122) गर्भगळीत होणे
अर्थ :- अतिशय घाबरणे.
वाक्य :- समोर पोलिसांना पाहून चोर गर्भगळीत झाले.

123) गळ घालणे
अर्थ :- अतिशय आग्रह करणे.
वाक्य :- दिपकने विशालला मुंबईला येण्यासाठी गळ घातली.

124) गुजराण करणे
अर्थ :- निर्वाह करणे.
वाक्य :- लॉकडाऊन काळात मिळेल ते खाऊन लोकांनी आपली गुजराण केली.

125) अंगाची लाही होणे
अर्थ :- खूप राग येणे.
वाक्य :- स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून मनीषाच्या अंगाची लाही लाही झाली.

126) चक्कर मारणे
अर्थ :- फेरफटका मारणे.
वाक्य :- आजोबा नातवासोबत बागेत चक्कर मारून आले.

127) धडपड करणे
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य :- बाबा मुलांच्या शिक्षणासाठी खूप धडपड करतात.

128) नाळ तोडणे
अर्थ :- संबंध तोडणे.
वाक्य :- अजय मुंबईला आल्यापासून त्याची आपल्या भावाची नाळ तुटली.

129) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब सोंग काढतो.

130) अंगाची लाही लाही होणे
अर्थ :- अतिशय संताप येणे
वाक्य :- आपल्यासाठी आणलेले खेळणे भावाने तोडून टाकलेले पाहताच छोट्या शुभमच्या अंगाची लाही लाही झाली.

131) अंगात वीज संचारणे
अर्थ :- अचानक बळ येणे
वाक्य :- हर हर महादेव हे शब्द कानावर पडताच मराठ्यांच्या अंगात वीज संचारते.

132) अंगवळणी पडणे
अर्थ :- सवय होणे
वाक्य :- असं म्हणतात एखादी गोष्ट सतत एकवीस दिवस केल्याने ती अंगवळणी पडते.

133) उर भरून येणे
अर्थ :- गदगदून येणे
वाक्य :- सीमेवरून खूप दिवसांनी आपल्या सैनिक मुलाला घरी आलेला पाहून आईचा उर भरून आला.

134) कपाळमोक्ष होणे
अर्थ :- मृत्यू ओढवणे
वाक्य :- खूप वेगाने गाडी चालवणाऱ्या प्रतिकचा अचानक झालेल्या अपघातामुळे कपाळमोक्ष झाला.

135) कपाळाला हात लावणे
अर्थ :- हताश होणे, निराश होणे
वाक्य :- कमी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने कपाळाला हात लावला.

136) काढता पाय घेणे
अर्थ :- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे
वाक्य :- आईला दादाला ओरडताना पाहून छोट्या सईने तेथून गुपचूप काढता पाय घेतला.

137) कानउघडणी करणे
अर्थ :- चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे
वाक्य :- सतत टीव्ही बघून परीक्षेत नापास झाल्यामुळे बाबांनी राजुची चांगलीच कानउघडणी केली.

138) कान उपटणे
अर्थ :- कडक शब्दांत समजावणे
वाक्य :- कॉपी करताना पकडलेल्या सिद्धेशचे शिक्षकांनी चांगलेच कान उपटले.

139) डोक्यावर घेणे.
अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर घेतले.

140) आळा घालणे.
अर्थ :- बंदी आणणे.
वाक्य :- जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.

141) तीरासारखे धावणे.
अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश स्पर्धेत तीरासारखा धावतो.

142) मर्जी राखणे.
अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:- निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.

143) डोळा असणे
अर्थ :- नजर असणे, पाळत ठेवणे
वाक्य :- दहशतवाद्यांच्या हालचालींवर भारतीय सैनिकांचा बारीक डोळा असतो.

144) डोळा लागणे
अर्थ :- झोप लागणे
वाक्य :- दिवसभर काम करून थकल्यामुळे बाबांचा रात्री पडल्या पडल्या डोळा लागला.

145) डोळे उघडणे
अर्थ :- अनुभवाने सावध होणे
वाक्य :- जास्त वेगाने गाडी चालवू नकोस असे सांगूनही न ऐकणाऱ्या प्रदीपचे अपघाताने चांगलेच डोळे उघडले.

146) डोळेझाक करणे
अर्थ :- दुर्लक्ष करणे
वाक्य :- पालक आपल्या मुलांच्या अनेक लहानमोठ्या चुकांकडे डोळेझाक करतात.

३७. डोळे निवणे
अर्थ :- समाधान होणे
वाक्य :- पांडुरंगाच्या भेटीची ओढ असणाऱ्या वारकऱ्यांचे विठ्ठलाच्या दर्शनाने डोळे निवतात.

24) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
25) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी केले आणि स्वराज्याची स्थापना केली.

कासावीस होणे
अर्थ :- व्याकूळ होणे.
वाक्य :- उन्हात फिरून तहानेने मंगेशचा जीव कासावीस झाला.

कालवा करणे
अर्थ :- गोंधळ करणे.
वाक्य :- लग्नात गौरीचा सोन्याचा हार चोरी झाल्याचे कळताच तिने कालवा सुरु केला.

कंठ दाटून येणे
अर्थ :-गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.
वाक्य :- स्वर्गवासी झालेल्या बाबांची आठवण येताच आकृतीचा कंठ दाटून आला.

कानाडोळा करणे
अर्थ :- लक्ष न देणे.
वाक्य :- आईकडे मी बहिणीची तक्रार करत होतो, पण आईने माझ्याकडे कानाडोळा केला.

कौतुक करणे
अर्थ :- तारीफ करणे.
वाक्य :- परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे सर्वजण अक्षयचे कौतुक करत आहेत.

काळ पालटणे
अर्थ :- रूप पालटणे.
वाक्य :- परिस्तिथी बदलली की आपली जवळची माणसे सुद्धा काळ पलटतात.

कंबर कसणे (कंबर बांधणे)
अर्थ :- हिंमत दाखविणे, तयार होणे.
वाक्य :- नोकरी सोडून नवीन उद्योग सुरु करण्यासाठी अमितने कंबर कसली.

कानउघडणी करणे
अर्थ :- चुकीची जाणीव कडक शब्दात करून देणे.
वाक्य :- रोज गृहपाट न करण्याच्या संदीपच्या वाईट सवयीमुळे सरांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली.

कोप-यापासून हात जोडणे
अर्थ :- संबंध न यावा अशी इच्छा करणे.
वाक्य :- शशांकचे शेजारच्या अमितशी भांडण झाल्यामुळे, त्याने त्याचे कोपऱ्यापासून हात जोडले.

कच्छपी लागणे
अर्थ :- एखाद्याच्या नादी लागणे.
वाक्य :- मूर्ख माणसाच्या कधीच कच्छपी लागू नये.

कळस होणे
अर्थ :- चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.
वाक्य :- कोणत्याही गोष्टीचा कळस होणे, हे चांगले नव्हे.

कणीक तिंबणे
अर्थ :- मार देणे.
वाक्य :- पोलिसांनी एका गुन्हेगाराची कणीक तिंबून गुन्ह्याची कबुली करून घेतली.

कणव येणे
अर्थ :- दया येणे.
वाक्य :- रस्त्यावर पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहून राकेशला त्याच्यावर कणव आली.

कान देणे
अर्थ :- लक्षपूर्वक ऐकणे
वाक्य :- आजोबांनी सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.

कपाळाला आठ्या पडणे
अर्थ :- नाराजी दिसणे.
वाक्य :- प्रणालीचे प्रगतीपत्र पाहून तिच्या वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

कवडीही हातास न लागणे अर्थ :- एका पैशाचीही प्राप्ती न होणे.
वाक्य :- कोरोना महामारीमुळे, धंदा बंद असल्या कारणाने गोपूला कवडीही हातास नाही लागली.

कळीचा नारद अर्थ :- भांडणे लावणारा.
वाक्य :- दोन अति घनिष्ट मित्रांमध्ये भांडण लावणाऱ्या हितेशला, कळीचा नारद म्हणणे चुकीचे नव्हे.

१२. कान फुंकणे अर्थ :- चुगली करणे, चहाडी करणे

वाक्य :- काही लोकांना दुसऱ्यांचे कान फुंकायची सवयच असते.

१३. कानाला खडा लावणे – एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे

वाक्य :- शुभमला खूप वेगाने गाडी चालवताना पाहून त्याच्या बाईकवर बसायचे नाही असा तेजसने कानाला खडा लावला.

१४. कानावर हात ठेवणे अर्थ :-नाकबूल करणे

वाक्य :- घरातील आरसा कोणी फोडला असे आईने विचारताच आम्ही दोघं भावंडानी कानावर हात ठेवले.
दवंडी पिटणे :

अर्थ : जाहीर करणे.

वाक्य :- सईच्या स्पर्धात्मक परीक्षेतील उल्लेखनीय यशाची तिच्या आईने गावभर दवंडी पिटली.



१५. कानीकपाळी ओरडणे अर्थ :-एकसारखे बजावून सांगणे

वाक्य :- घरात स्वच्छता ठेवण्याबाबत आई नेहमी आमच्या कानीकपाळी ओरडत असते.

१६. कानावर घालणे अर्थ :- लक्षात आणून देणे

वाक्य :- पबजी च्या नादात आपले अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे ही गोष्ट बाबांनी तुषारच्या कानावर घातली.

१७. कानोसा घेणे अर्थ :- अंदाज घेणे

वाक्य :- प्रगतीपुस्तक दाखवताना सुप्रियाने अगोदर बाबांच्या मूडचा कानोसा घेतला.

१८. केसाने गळा कापणे अर्थ :- घात करणे

वाक्य :- हल्ली पैशांसाठी कोणीही कोणाचाही केसाने गळा कापतो.

१९. कंठ दाटून येणे अर्थ :- गहिवरून येणे

वाक्य :- स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या आपल्या मुलाचे यश पाहून आईचा कंठ दाटून आला.

२०. कंठस्नान घालणे अर्थ :- ठार करणे

वाक्य :- सीमेवर पहारा देण्याऱ्या सैनिकांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

४४. डोळे विस्फारणे अर्थ :- आश्चर्याने पाहणे

वाक्य :- खूप दिवसांपासून संपर्कात नसलेल्या मित्राला अचानक समोर पाहताच सोहमचे डोळे विस्फारले.

१)काळ बनणे अर्थ :-साक्षात मृत्यू बनणे
वाक्य :- २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस हेमंत करकरे यांच्या आयुष्यात काळ बनून आला.


२)गोड मानून घेणे
अर्थ :- स्वीकार करणे.
वाक्य:- ताईच्या लग्नात केलेले मानसन्मान सर्व वर पक्षांनी गोड मानून घेतले.
३) धांदल होणे - घाई गडबड होणे.
वाक्य:- पाऊस अचानक आल्यामुळे रस्त्यावरील लोकांची धांदल झाली.
४) धारेला लागणे अर्थ :- पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणे.
वाक्य:- नदीला महापूर आल्यामुळे गावातील बरीचशी गुरेढोरे धरेला लागली.
५) दे माय धरणी ठाय करणे अर्थ :- पळवून लावणे, सळो की पळो करणे
वाक्य - कारगिल युद्धात भारतीय सेनेने शत्रूच्या सैन्याला दे माय धरणी ठाय करून सोडले.
६) फेर धरणे अर्थ :- रिंगण करणे
वाक्य - मंगळागौरीला सुहासिनी फेर धरून नाचतात.
७) तालेवार असणे अर्थ :- श्रीमंत असणे
वाक्य - कोकणातील माझ्या मामांचे घर तालेवार आहे.
८) तोड नसणे अर्थ :- अन्य पर्याय नसणे
वाक्य - आजच्या युगात स्पर्धा परीक्षांना तोड नाही.
९) विसर्जन करणे अर्थ :- सन्मानाने पाण्यात बुडवणे
वाक्य - आमच्या घरातील गणेशमूर्तीचे आम्ही विसर्जन केले.
१०) चढाओढ लागणे अर्थ :- स्पर्धा लागणे , शर्यत लागणे
वाक्य - शिक्षकांनी घातलेले कोडे सोडवण्यासाठी वर्गातील सर्व मुलांची चढाओढ लागली.
११) उसंत मिळणे अर्थ :- विसावा मिळणे
वाक्य - कामाच्या रगाड्यातून माझ्या आईला दुपारीच थोडी उसंत मिळते.
१२) पण वाढणे अर्थ :- जेवायला देणे
वाक्य - पाहुणे आल्या बरोबर आईने त्यांची पाने वाढली.
१३) नादात असणे अर्थ :- धुंदीत असणे
वाक्य - बाबांनी सायकल घेऊन दिल्यामुळे राहुल हल्ली आपल्याच नादात असतो.
१४) सूने वाटणे अर्थ :- एकटेपणा वाटणे, रिकामे वाटणे
वाक्य - राजश्री सासरी गेल्यापासून आईला घर सुने वाटते.
१५) जगात मिरवणे अर्थ :- लोकांमध्ये दिमाख दाखवणे
वाक्य - जगात मिरवता येईल असे कर्तृत्व माणसाने करायला हवे.

४५. डोळे मिटणे अर्थ :- मरण पावणे

वाक्य :- आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या आयुष्यात स्थिर स्थावर झालेले पाहून सदा काकांनी आनंदाने डोळे मिटले.

४६. डोळे वटारणे अर्थ :- रागावणे

वाक्य :- सकाळपासून मोबाईलवर गेम खेळत असलेल्या प्रसादला दोन वेळा सांगूनही ऐकत नसल्याचे पाहून बाबांनी डोळे वटारले.

४७. तळपायाची आग मस्तकी जाणे अर्थ :-अतिशय संतापणे

वाक्य :- रमेश आणि सुरेश च्या भांडणात रमेशने अपशब्द उच्चरताच सुरेशच्या तळपायाची आग मस्तकी गेली.

४८. तोंड काळे करणे अर्थ :- कायमचे निघून जाणे

वाक्य :- घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे संतोष घर सोडून कायमचे तोंड काळे करून निघून गेला.

४९. तोंड देणे अर्थ :- सामना करणे

वाक्य :- येणाऱ्या प्रत्येक संकटाला निर्भयपणे तोंड देणे हे यशस्वी माणसाचे लक्षण आहे.

५०. तोंड भरून बोलणे अर्थ :- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे

वाक्य :- मेहनत करून पोलीस अधिकारी बनलेल्या सतिश बद्दल त्याची आई नेहमी तोंडभरून बोलते.

५१. तोंडघशी पडणे अर्थ :- विश्वासघात होणे

वाक्य :- सतीशने दुसऱ्याकडून उसने घेऊन मित्राला पैसे दिले परंतु मित्राने ते पैसे वेळेत परत न करून सतीशला तोंडघशी पाडले.

५२. तोंडचे पाणी पळणे अर्थ :- अतिशय घाबरणे

वाक्य :- अचानक कुत्रा मागे लागताच सुमनच्या तोंडचे पाणी पळाले.

५३. तोंडाची वाफ दवडणे अर्थ :- वायफळ बडबड करणे

वाक्य :- काही लोक उगाच तोंडाची वाफ दवडतात. होत तर त्यांच्याकडून काहीच नाही.

५४. तोंडात बोटे घालणे अर्थ :- आश्चर्यचकित होणे.

वाक्य :- सर्कशीतील विदूषकाचा विविध करामती पाहून प्रेक्षकांनी तोंडात बोटे घातली.

५५. तोंडाला कुलूप घालणे अर्थ :- गप्प बसणे

वाक्य :- सत्य परिस्थिती माहित असूनही तोंडाला कुलूप घालून राहिल्यामुळे बिचाऱ्या प्रमोदला दोषी ठरवण्यात आले.

५६. तोंडाला तोंड देणे अर्थ :- भांडणे

वाक्य :- प्रसादने अपशब्द वापरताच खूप वेळ शांत बसलेल्या समीरनेही त्याच्या तोंडाला तोंड देण्यास सुरुवात केली.

१) जीवाची पर्वा न करणे अर्थ :-प्राणाची काळजी न करणे.
वाक्य - पुरात वाहून जाणाऱ्या बालकाला वाचवताना महेश ने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.


२) कानावर हात ठेवणे
अर्थ :- बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.
वाक्य - गोंगाट ऐकू येऊ नये म्हणून महेशने कानावर हात ठेवला.
३) कौतुक करणे
अर्थ :- प्रशंसा करणे.
वाक्य - बालवयात उत्कृष्ट हस्ताक्षर काढणाऱ्या श्रेयसचे सर्वांनी कौतुक केले.
४) मत मांडणे
अर्थ :- स्वतःचे विचार सांगणे.
वाक्य - सहलीच्या ठिकाणाबद्दल वर्गात चर्चा सुरू असताना अथर्वने आपले मत मांडले.
५) हळहळत राहणे
अर्थ :- दुःख किंवा खेद व्यक्त करणे.
वाक्य - धावण्याच्या शर्यतीत पहिला नंबर हुकल्यामुळे राजेश हळहळ त राहणे .
६) पदराने डोळे पुसणे
अर्थ :- रडू आवरणे, रडणे.
वाक्य- मुलगी सासरी निघाली तेव्हा सीताबाई पदराने डोळे पुसत होत्या.
७) तोंडावर येणे
अर्थ :- अगदी जवळ येणे.
वाक्य- परीक्षा तोंडावर आल्यामुळे जो तो अभ्यासात गढून गेला होता.
८) हात पसरणे
अर्थ :- याचना करणे.
वाक्य- कष्ट न करता दुसऱ्यांकडे हात पसरणे अगदी अयोग्य आहे.
९) सुटकेचा नि:श्वास टाकणे
अर्थ :- जीव भांड्यात पडणे ,निर्धास्त वाटणे.
वाक्य- इमारत कोसळली; पण मनुष्यहानी झाली नाही, हे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
१०) काकुळतीला येणे
अर्थ :-विनवणी करणे , व्याकूळ होणे.
वाक्य- दोन दिवस उपाशी असल्यामुळे भिकारी अगदी काकुळतीला आला.
११) आयोजित करणे
अर्थ :- योजना आखणे , आखणी करणे.
वाक्य- आमच्या शाळेत या वर्षी क्रीडामहोत्सव आयोजित करण्यात आला.
१२) विचारांशी सहमत होणे- विचार पटणे.
वाक्य- वर्गातील सर्व मुले सरांनी मांडलेल्या विचारांशी सहमत झाली.
१३)मध्यस्थी करणे- तडजोड घडवून आणणे.
वाक्य- आरुष आणि कृष्णा यांच्या भांडणात वरदने मध्यस्थी मध्यस्थी केली.
१४) डोळे पाणावणे- डोळे आश्रूंनी भरणे .
वाक्य- राधाबाईची दुःखद कहाणी ऐकून गंगुबाईचे डोळे पाणावले.
१५) संधी मिळणे- मोका मिळणे.
वाक्य -राहुल परीक्षेत पास झाल्यामुळे त्याला नोकरीची संधी मिळाली.

५७. तोंडाला पाणी सुटणे – हवं निर्माण होणे

वाक्य :- आईने बिर्याणीचा बेत केलेला पाहून सचिनच्या तोंडाला पाणी सुटले.

५८. दात विचकणे अर्थ :- निर्ल्लजपणे हसणे

वाक्य :- शिक्षक ओरडत असताना सुद्धा शेवटच्या बाकावरचा तेजस दात विचकत होता.

५९. दात ओठ खाणे अर्थ :- चीड व्यक्त करणे

वाक्य :- गावकऱ्यांसमोर आपला अपमान होत असल्याचा पाहून सरपंच तेथून दात ओठ खात निघून गेले.

६०. नजर चुकवणे अर्थ :- न दिसेल अशी हालचाल करणे

वाक्य :- काही मुले वर्गामध्ये शिक्षकांची नजर चुकवून डबा खातात.

उगम होणे अर्थ :- सुरुवात होणे.
वाक्य – त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.

उघड्यावर टाकणे – निराधार करणे, जबाबदारी झटकणे.
वाक्य – कर्मचाऱ्यांनी संप करून, शासकीय काम उघड्यावर टाकले.

उधळून टाकणे अर्थ :- विखरून टाकणे.
वाक्य – खोडकर वासराने धान्याची रास उधळून लावली.

उपकार फेडणे अर्थ :- उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
वाक्य – ज्यांनी आपणांस मदत केली, आपण त्यांचे उपकार फेडावेत.

उरी फुटून मरणे अर्थ :- अतिश्रमाने मरण येणे.
वाक्य – पावसाअभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.

उजळ माथ्याने फिरणे – उघडपणे वावरणे.
वाक्य – अनेक गुंड जामिनावर सुटून येऊन उजळ माथ्याने फिरतात.

उन्माद होणे अर्थ :- गुर्मी चढणे.
वाक्य – लॉटरीत 50 लाखांचे बक्षीस मिळताच पंकजच्या वागण्यात उन्माद आला.

उंडारने अर्थ :- बागडणे, हुंदडणे.
वाक्य – अभ्यास सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे आई रमेशला समजावून सांगत होती.

६१. नवल वाटणे अर्थ :- आश्चर्य वाटणे

वाक्य :- उनाडपणा करणाऱ्या साहिलने परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याचे पाहून सर्वानाच नवल वाटले.

६२. नाक कापणे अर्थ :- घोर अपमान करणे

वाक्य :- आपल्या कुटुंबातील मुलीने प्रेमविवाह केला म्हणजे आपल्या कुटुंबाचे नाव कापले असा पूर्वीच्या लोकांचा समज होता.

६३. नाक खुपसणे अर्थ :- नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे

वाक्य :- काही लोकांना मको तिथे नाक खुपसण्याची सवयच असते.

६४. नाक घासणे अर्थ :- लाचार होऊन माफी मागणे

वाक्य :- सावकाराविरुद्ध वाईट शब्द बोलल्यामुळे सावकाराने पांडबाला सर्व गावासमोर नाक घासायला लावले.

अवहेलना करणे अर्थ :- अपमान करणे, अनादर करणे.
वाक्य – चांगल्या माणसाचा अवहेलना करू नये.

अहोरात्र झटणे अर्थ :- रात्रंदिवस कष्ट करणे.
वाक्य – शेतकरी मातीतून पीकरूपी सोने पिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतो.

६५. नाक मुरडणे अर्थ :- नापसंती दर्शवणे
वाक्य :- आईने आणलेले कपडे पसंत न आल्यामुळे सीताने नाक मुरडले.

६६. नाकी नऊ येणे अर्थ :- फार दगदग होणे
वाक्य :- आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवताना नाकी नऊ येते.

अवगत असणे अर्थ :- माहित असणे.
वाक्य – आदिवासी स्त्रियांना टोपली विकण्याची कला अवगत असते.

अवगत होणे अर्थ :- माहित होणे, कळणे, आकलन होणे.
वाक्य – चार दिवसांच्या अभ्यासाने रोनित ला कॉम्पुटर चालवण्याची कला अवगत झाली.

अवगत करणे अर्थ :- माहित करून घेणे.
वाक्य – कल्याणीने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे.

अवलंब करणे अर्थ :- अंगीकारणे, स्वीकारणे.
वाक्य – गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाचा सईने वेळेत अवलंब केला.

अमर होणे अर्थ :- चिरकाल नाव राहणे.
वाक्य – जे सैनिक देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले.

अजरामर होणे अर्थ :- कायम स्मरणात राहणे.
वाक्य – ज्या वीर सैनिकांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले, ते अजरामर झाले.

अचूक वेध घेणे अर्थ :- न चुकता नेम साधणे.
वाक्य – नेमबाज अभिनव बिंद्रा ने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

अमलात आणणे अर्थ :- कारवाई करणे.
वाक्य – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बरेच नियम अमलात आणले.

खल करणे अर्थ :- चर्चा करणे.
वाक्य – पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेतील सदस्य गंभीर खल करत आहेत.

खडे फोडणे अर्थ :- दोष देणे.
वाक्य – सचिनकडून अंगठी हरवल्यामुळे सर्वजण त्याच्यावर खडी फोडत आहेत.

खपणे अर्थ :- कष्ट करणे.
वाक्य – चांगले पीक पिकण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.

खसखस पिकणे अर्थ :- मोठयाने हसणे.
वाक्य – सरांनी चुटकुला सांगताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.

खळखळ करणे अर्थ :- नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.
वाक्य – ताटात कारल्याची भाजी वाढली की, रेणू आईपाशी खळखळ करते.

खनपटीला बसने अर्थ :- पिच्छा पुरवणे.
वाक्य – आईने दिलेला अभ्यास पूर्ण करण्याचे दीपाच्या खनपटीला बसवले.

खडकातून पाणी काढणे अर्थ :- अशक्य गोष्ट साध्य करणे.
वाक्य – नापीक जमिनीतून चांगले पीक काढून माधवने जणू खडकातून पाणी काढले.

खडानखडा माहिती असणे अर्थ :- बारीकसारीक माहिती असणे.
वाक्य – आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामाची खडानखडा माहिती आहे.

खाली मान घालणे अर्थ :- शरम वाटणे.
वाक्य – चूक समजल्यामुळे अनुने खाली मान घातली.

खिळून राहणे अर्थ :- जागच्या जागी स्थिर होणे.
वाक्य – समोर साप पाहताच विनोद खिळून राहिला.

खुशीत मान डोलवणे अर्थ :- आनंदाने होकार देणे.
वाक्य – खेळणे हवे का, असे विचारताच छोटयाश्या विहानने खुशीत मान डोलावली.

खुसपट निघणे अर्थ :- काहीतरी दोष निघणे.
वाक्य – विकासने कोणताही व्यवसाय सुरु केला, तरी त्यात काही ना काही खुसपट निघतच होती.

खुशामत करणे अर्थ :- स्तुती करणे.
वाक्य – मित्रांसोबत सहलीस जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून सचिनने वडिलांची खुशामत करत होता.

खूणगाठ बांधणे अर्थ :- निश्चय करणे.
वाक्य – न चुकता, रोज कसरत करण्याची निखिलने मनाशी खूणगाठ बांधली.

खेद वाटणे अर्थ :- वाईट वाटणे.
वाक्य -आईला वाईट बोलल्याबद्दल, जीवनला खेद वाटला.

खेटून उभे राहणे अर्थ :- जवळ बिलगून उभे राहणे.
वाक्य – लहानगी सारिका आपल्या आईला अगदी खेटून उभी होती.

१)बरकत येणे - अर्थ :- वाढ होणे, प्रगती होणे .
वाक्य- दोन वर्षानंतर रामच्या व्यवसायाला बरकत आली.



२)पाठलाग करणे – अर्थ :-पकडण्यासाठी मागे धावणे.

वाक्य- लोक चोरी करुन धावणा-या चोरचा पाठलाग केला.



३)संशयाने पाहणे –अर्थ :-शंकेने बघणे.

वाक्य- वर्गात आवाज झाला, तसे सरांनी मधूकडे संशयाने पाहिले.



४)मोकळा श्वास घेणे – अर्थ :-निर्धास्त होणे.

वाक्य-परीक्षा संपल्यावर मीनाने मोकळा श्वास घेतला.



५)पाय ठेवायला जागा नसणे – अर्थ :-खूप गर्दी होणे.

वाक्य- सोमवारच्या बाजारात पाय ठेवायला जागा नसते..



६)फायदा उचलणे –अर्थ :- स्वार्थ साधणे.

वाक्य- पुर्वीचे सावकार शेतक-यांच्या अज्ञानाचा फायदा उचलत.

७)कपाळाला लावणे –अर्थ :- नतमस्तक होणे,नमस्कार करणे..

वाक्य- लढाईवर जाताना सदाशिवने गावची माती कपाळाला लावली.

८)जिवाच्या आकांताने पळणे – अर्थ :- खूप जोरात पळणे.

वाक्य- जंगलात वाघ पाठीमागे लागल्यामुळे गणेश जिवाच्या आकांताने पळाला.

९)गलका करणे –अर्थ :- गोंगाट करणे.

वाक्य- लागोपाठ दोन गाड्या रद्द झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्टरच्या कचेरीसमोर गलका केला.

१०)ईशारा करणे - अर्थ :- खूण करणे.चिन्ह दाखवणे.

वाक्य- किनारा दिसताच खलाशांनी झेंडे उभारून इशारा केला.



११)विलंब करणे –अर्थ :- उशीर करणे.

वाक्य- आजारी पड्ल्यावर डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करण्यात अर्थ नाही.

१२)धापा टाकणे – अर्थ :- श्वास जोरात चालणे.

वाक्य- चार किलो मीटर पळत आल्याने राम धापा टाकू लागला.

१३)कडकडून मिठी मारणे- अर्थ :- गच्च कवळणे.

वाक्य- अर्थव पळण्याच्या शर्यतीत पहिला आल्याबरोबर बाबांनी त्याला कडकडून मिठी मारले.

१४)गैरसमज होणे- अर्थ :- चुकीचा समज होणे.

वाक्य- -एकमेकांवर विश्वास नसेल, तर मित्रांमध्ये उगाचच गैरसमज होतात.

१५)बेत आखणे 
अर्थ :- योजना तयार करणे.
वाक्यांत उपयोग- राहूलनी पुढच्या सहा महिन्याचा बेत आखला.

१६)रद्द करणे 
अर्थ :- रहित करणे.
वाक्य- - तुफान पावसामुळे आईने बाजारात जाण्याचा बेत रद्द केला.

१७)बलिदान करणे-
अर्थ :- प्राण अर्पण करणे.
वाक्य- सैनिक देशाच्या रक्षणासाठी स्वःताच्या प्राणांचे बलिदान करतात.

१८)गुणगान करणे .
अर्थ :- गुणांची प्रशंसा करणे.
वाक्य- रमेशने मुलींचे प्राण वाचवल्यामुळे गावकरी त्याचे गुणगान करत होते.

१९) शान राखणे
अर्थ :- प्रतिष्ठा राखणे.
वाक्य- राज्यात परीक्षेत सर्व प्रथम येऊन आपल्या शाळेची शान राखली.

२०)खूप जीव असणे 
अर्थ :- खूप प्रेम असणे.
वाक्य- पोरक्या राजवर त्याच्या काकूचा खूप जीव होता.

खोडा घालणे 
अर्थ :- संकट निर्माण करणे, विघ्न आणणे.
वाक्य – गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.

खोडी उलटणे अर्थ :- आपण केलेली खोडी अंगाशी येणे.
वाक्य – ऋषी धीरजची मस्करी करायला गेला, पण त्याची त्याच्यावरच खोडी उलटली.

खोऱ्याने पैसा ओढणे अर्थ :- खूप पैसा मिळवणे.
वाक्य – दिवसरात्र अभ्यास करून डॉक्टर झालेला प्रणव आज खोऱ्याने पैसा ओढत आहे.

ख्याती मिळवणे अर्थ :- प्रसिद्ध होणे, नाम कमावणे.
वाक्य – मदर तेरेसा यांनी गरिबांची सेवा करून ख्याती मिळवली.

खंत करणे 
अर्थ :- काळजी करणे, चिंता करणे.
वाक्य – बाहेरगावी शिकायला गेलेल्या चिन्मयची आई खंत करते.

खंड न पडणे 
अर्थ :- एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
वाक्य – नित्यनियमाने देवपूजा करण्यात आईचा कधीही खंड पडला नाही.

खंत न करणे – काळजी न करणे.
वाक्य – खूप संकटे वाटयाला आली, तरी अमितरावांनी कधी खंत बाळगली नाही.

खांदे पडणे – निराश होणे, दीनवाणे होणे.
वाक्य – अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे दिव्याचे खांदे पडले.

अटक करणे
अर्थ :-
वाक्य:- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

12) अपशब्द वापरणे
अर्थ :-
वाक्य:- चंदूचा अमरला धक्का लागताच,अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

13)अग्निदिव्य करणे
अर्थ :-
वाक्य:- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

14) अचंबा वाटणे 
अर्थ :-
वाक्य:-भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

15) अभिमान वाटणे 
अर्थ :-
वाक्य:- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

16) अटकाव करणे 
अर्थ :-
वाक्य:- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

17) अठराविश्व दारिद्र्य 
अर्थ :-
वाक्य:-कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

18) अनुकरण करणे 
अर्थ :-
वाक्य:- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

19)अभिप्राय देणे 
अर्थ :-
वाक्य:- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

20) अभिवादन करणे 
अर्थ :-
वाक्य:- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले