नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मराठा मावळे

 🏇🚩🚩🤺महादजी शिंदेे
 जन्म : 3 डिसेंबर इ.स. १७३० उज्जैन
मृत्यू : १२ फेब्रुवारी १७९४ पुणे
पिता/माता :  सरदार रानोजी राव शिंदे, चीमा बाई
राज्याभिषेक  : 18 जानेवारी 1768 ई.
युद्ध : द्वितीय मराठा युद्ध- 1803 ई.-1806 ई.
शासन काल : 18 जानेवारी  1768 ई.-12 फेब्रुवारी 1794 ई.
धर्म : हिन्दू
महादजी शिंदे हे पेशवाईतील एक मुत्सद्दी. होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यास सशक्त ठेवणारे अनेक मराठा नेते होते. महादजी शिंदे हे त्यापैकीच एक प्रसिद्ध मराठी वीर. हा राणेजीचा चिमाबाई नांवाच्या रजपूत बाईंच्या पोटी झालेला मुलगा.
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
🤺 *सैनिकी कारकीर्द*👮🎠
दक्षिण भारत
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
⚜ *उत्तर भारत
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
🔮 *ग्वाल्हेरचे शासक*👑
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
🎠 *पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द*🎠🎠
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
🤺 🎠🎠*पहिले इंग्रज-मराठा युद्ध*🔫🔫
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
🏇 *🔫🔫वडगावची लढाई*🎠🎠
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
♻ *सिप्री येथील हार📝
ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, कर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं  बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
⚛📃📃📝 *सालबाईचा तह १७ मे १७८२*
मुख्य पान: सालबाईचा तह
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*🙏

🚩🚩  *नरवीर तानाजी काळोजीराव मालुसरे  ( शिवरायांचे सरदार )
 *जन्म : इ.स. १६२६ (जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)*
 वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७० *(सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)*
टोपणनाव : तान्हाजी
अपत्ये : रायबा
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.
🙎‍♂️ *?*बालपण*
सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.
🤺 *कामगिरी*
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
🤺 *नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई*
तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.
संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :
दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.
तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.
तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच ताने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.
संदर्भ - शिवभारत
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.
🤺 *कोंढाण्याची लढाई*
स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.
कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  *"गड आला पण सिह गेला".* अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.
 *तानाजीची स्मारके*
तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.
रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.
📚 *पुस्तक*
दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे
गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे
नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक
तानाजी (अमर चित्र कथा -६८२)
मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स
राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन
सिंहगड - पुरंदरे प्रकाशन
सिंहगड - प्र. के. घाणेकर
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे
🎖️ *पुरस्कार*
तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.
🎞️ *चित्रपट*
▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.
▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.
 🚩 *हर हर महादेव....!* 🚩
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
  🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
♾️♾️♾️  🏇
🤺🚩🚩आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक* 🤺
जन्म : 7 सप्टेंबर 1791 (भिवडी, पुरंदर, पुणे)*
फाशी : 3 फेब्रुवारी 1832  *(पुणे)*
            सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.
           सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.
          सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.
           ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
          सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.
            त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.
             रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.
             शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला.
           1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे.
          उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे, अशी त्याची इच्छा होती."
          आम्हाला मात्र त्याने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रज सरकारशी दिलेल्या दीर्घकालीन लढ्याची जाणीव नाही हे आपल्या देशाचे दुर्देव होय.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*🙏

🚩🚩🤺नरवीर शिवाजी काशीद*
    *वीरगती : १३ जुलै १६६०*
पन्हाळ्यावर म्हणे बरसवु कहर.. मोगलांचा सरदार सिद्दी जौहर..
घेरती सैतान पन्हाळ्याचा पायथा.. चक्रव्युव्हात स्वराज्याचा कर्ताकरीविता..
गडाचा झोंबती अंगाला वारा.. आठवे तो विशालगडाचा आसरा..
निघाला राज्या भेदन्या चक्रव्यु.. डोळ्यात रुते फसलेला अभिमन्यू..
एक विर ऐसा.. परी छत्रपति जैसा.. छत्रपतिसाठी सांडु म्हणे रगद..
नाव तयाचे शिव काशिद.. शिवबांना लपवावे.. त्या दाखवावे..
हुबेहुब ऐसा कोणी न ओळखावे.. राजापरी प्रेम जणु विर थोपटी मांडी..
क्षणभर राजा म्हणविन्या शिर देई तोफे तोंडी.. सुखरुप पोचावा स्वराज्याचा भ्रमर..
पिळ देऊन मिशीला होईल तया मि अमर.. बेत ठरला.. प्रति शिवा मोगलानी हेरला..
मावळा राजा म्हणुनी कैद होई.. लाभली जन्मो जन्मीची पुण्याई..
खदखदुन हसे ऐसा सिद्दी.. म्हणे मि आहेच जिद्दी..
काळ भासवि स्वताःला.. पेश करा आमच्या समोर कैद्याला..
शिवा काशिद चाले तोऱ्यात.. आग लाविली जणु तुफाणी वाऱ्यात..
उभा राहीला सिद्दी समोर.. पाहुन मर्दाला सिद्दी करे घुर घुरं..
दिवठ्याच्या पेटल्या मशाली,. अंधाराचीही उजळे सावली..
नजर रोखुन सिद्दी पाही.. शंकेचा धुर करी तया लाही लाही..
आग गेली तळपायाची मस्तकात.. ओरडुन म्हणे झाला घात..
ऐकुन काशिद हसला.. मोगलांचा तर आवाज बसला..
दिसतो खरा राजा शिवछत्रपति.. ओळखले त्यास तो तर प्रति छत्रपति..
पाहुन विरा तो बोले जौहर.. मरणे का डर नही क्या काफर..
तो असे मावळा निडर.. बोलतो कसा बेफिकिर..
आलोया ईथे मृत्युला न जुमानुन भाग्य उजळन्या.. राजा म्हणुन मरण्या..
आम्हा मावळ्या असे माज.. स्वराज्यासाठी मरण्या उभीआमची फौज..
तु फक्त मारीशी देहाला,. पण हा आत्मा तृप्त होई अमरतेला..
सुटला तोल सिद्दीचा.. वेध घेई मर्दाच्या मानेचा..
त्यागीतो देहा काशिद तो स्वराज्यविर.. लाख मरती पोशिंद्यासाठी धडा वेगळे होती शिर..
ऐसा शिवछत्रपति राजा.. लाभली तया जिव्हाळ्याची प्रजा..
ऐसे जन्मले कैक विर.. झेलती स्वराज्याचे वार ..
असे त्यांना या मातिचा लळा.. शुल छातित रोवुनी सोसती शिवबासाठी कळा..
झुरती नसे मावळे सत्तेच्या गर्दित.. शिवछत्रपति होई धन्य धन्य तो शिवा काशिद शिवा काशिदला मानाचा त्रिवार मुजरा ।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।
शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले.
🚩 *शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा*
             फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ", तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं... मै ही शिवाजी महाराज हूं". पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती. तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही. कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते. यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी  महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला, मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले, ’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे  तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत. आता हाती लागणे शक्य नाही. छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत. जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.
            सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू..... त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल. यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही. त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही, तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ?
               माझा शिवाजी राजा... त्यांची सर  तुझ्यासारख्याला यायची नाही. तू पोटार्थी हबशी... तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे, पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला. थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला, वैसाही होगा...... मरने को हो तैयार.. तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला, त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं. स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो, कसंही येवो... मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते. त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.
               शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला. तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले. खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी; रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.
या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी, विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे. नेबापूरच्या (चव्हाण) "पाटलांनी" शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर (चव्हाण) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांशी थेट बैठक आयोजित केली. कारण पन्हाळा नुकताच स्वराज्यात सामील झाला होता. त्या काळात शिवाजी महाराज नवीन पन्हाळ्याचे व्यवस्थापन करण्याची योजना करीत होते. मानवी संसाधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेबापूर (चव्हाण) पाटील यांची होती. असेही सांगितले जाते की सिद्दी जौहरला दिशाभूल करण्याचे धोरण आखण्यात नेबापूर (चव्हाण)पाटील हे मुख्य सूत्रधार होते. नेबापूर (चव्हाण) पाटील हा सर्वात विश्वासू वैयक्तिक हेर होता. हे देखील सांगण्यात आले आहे की बाजी प्रभू आणि नेबापूर पाटील यांनी एकत्रितपणे योजना आखली आणि अंमलात आणली. सर्व माहितींपैकी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला तेव्हा शिवाजीराजे सारखे दिसण्याबद्दल शिवा काशिदचे प्रथम नेबापूर पाटलांनी कौतुक केले. पण लवकरच शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली."मानाची पायरी" हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे.
स्वराज्यासाठी अनेक हेरांनी काम केले होते, पण त्यांच्या कामाच्या गुप्ततेमुळे आणि कामाच्या व्याप्तीमुळे त्याची इतिहासात नोंद झाली नाही.
 🚩 *हर हर महादेव....* 🚩
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*

🚩🚩🤺*रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे*
मृत्यू : १८ जून १६९७*
संताजी घोरपडे  हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे संताजी घोरपडे यांनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.
संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी - म्हाळोजीराव घोरपडे यांनी- कुरुंदवाड येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर एक सुब्रह्मण्येश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. कुरुंदवाड संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे एक महान सरसेनापतींच्या नावे(संताजी घोरपडे) .
या ठिकाणी दरवर्षी सत्संग व घाटपरिसर स्वच्छता मोहीम राबवली जाते.
🏵 *🌌👪सेनापती संताजी घोरपडे : पूर्वज
शिवाजी महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले; तीच परंपरा पुढे संभाजीच्या कालात हंबीरराव मोहिते यांनी चालू ठेवली. संभाजीराजांना आणि कवी कलशांना संगमेश्वर गावी शेख निजाम याने पकडले आणि त्याच वेळेस म्हाळोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोघलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि संभाजीच्या तालमीत तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्तावलेल्या मोघल बादशाहला गाडला. या योद्ध्यांत एक आघाडीचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होऊच शकत नाही.
चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बाजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोळची जहागीर संभाळून होता, तर त्याचा दुसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजींचा नातू म्हणजे "म्हाळोजी घोरपडे" . यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली, तो वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, (sources- डॉ.जयसिंह पवार)
म्हाळोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वारानिशी येऊन मिळाले. म्हाळोजी हे पुढे पन्हाळगडाचे तट-सरनौबत होते. संभाजी जेव्हा दिलेरखानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पन्हाळ्यावर केली होती, आणि सोबतीस म्हाळोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो. संभाजीच्या संपूर्ण कारकिर्दीत म्हाळोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे काम चोख करीत होते. शिरक्यांचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः संभाजीराजांच्या सोबत म्हाळोजी घोरपडे होते. मोगल सरदार मुकर्रबखान जेव्हा संगमेश्वर येथे संभाजीराजांस कैद करण्यास पोचला, तेव्हा म्हाळोजी घोरपडे यांनी लढाई केली, पण ते मारले गेले.
🔶 *हंबीरराव मोहिते आणि संताजी घोरपडे*💐
संताजी घोरपडे यांचे नक्की जन्म साल माहीत नसले, पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबीररावांच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुरहानपूर, जालना, सिंदखेड हे मुलूख लुटत हंबीरराव स्वराज्यात आले. हंबीररावांच्या विनंतीवरून संताजीस जुमलेदारी मिळाली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्त्वाची योजना होती. कोपल हे आदिलशाहीचे सरदार हुसैनखान आणि कासीम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबीरराव यांनी या पठाण बंधूंचा पाडाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले. पण जालन्याच्या स्वारीत संताजीच्या हातून काही तरी चूक झाली म्हणूनच शिवाजीमहाराजांनी त्यास मुजऱ्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालन्याची मोहीम ही शिवाजीमहाराजांच्या जीवनातील शेवटची मोहीम. जालना शहर मराठयांनी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि तो बरीच लूट परत घेऊन गेला, या युद्धात सिधोजी निंबाळकर कामी आले.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोघलांनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला. जुल्फिकारखान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खऱ्या अर्थाने एक नेता म्हणून उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर विळख्यातून सुखरूप बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाळा करत बेदनूरच्या राणीच्या साह्याने जिंजीस सुखरूप निघून गेले. येथे महाराष्ट्रात, संभाजीच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपणार या धुंदीत मोघल गाफील झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजीने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने व अवघ्या २००० सैन्यानिशी तुळापूर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानी करून सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) नंतर संताजींनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेऊन ते थेट पन्हाळ्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हें- डिसें) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजीने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जखमी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध). बहुधा तो युद्धातील जखमांमुळे मेला असावा.
पुढे हाच स्वातंत्र्य लढा संताजी-धनाजीने बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याची तर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)
जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजीत आणि राजारामराजांत वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते, त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडळी सल्ले देत होती. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासीमखान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासीम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरमनजीक कावेरीपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणि खान कांचीपुरमला पळून गेला, तिथे त्याने देवळांचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपून बसला. याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केली आणि ते याचप्पा नायका संगे मोगलांविरोधात लढू लागले. राजारामने संताजीससुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवांकडे देण्यात आले. येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोगलांविरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा जो १८५७ च्या क्रांतीपेक्षा ही किती तरी पटीने सरस होता. जाने १६९५ दरम्यान संताजीने कर्नाटकातून मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २००० सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पळून गेला. मराठ्यांनी बुरहानपूर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुभेदारास बांगड्यांचा आहेर पाठवला. नंतर संताजीने सुरत लुटण्याचा बेत आखला होता, पण शेवटी तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजीबरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध
संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासीमखानाबरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक नामवंत सरदार पाठवले होते. कासीमखानाबरोबर सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि कामबक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. त्यांना आपल्या गुप्तहेराकडून बित्तंबातमी मिळत होती. कासीमखानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाजाद खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री फौजेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृतसुद्धा दिले नाही.(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध)
अवघ्या २००० सैन्यासोबत लाखोंच्या पटीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशाहाच्या छावणीचे कळस कापले. असे साहस करण्यासाठी ध्येयवेड असावे लागते .ते संताजी घोरपडेनीं दाखवले. प्रत्येक इतिहासप्रेमीच्या अंगावर रोमांच उभे रहावे असेच हे धाडस होते.
🔷🎠🎠 *घोडे पाणी पीत नसतील तर..*
मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील तर त्यांना 'पाण्यात संताजी-धनाजी दिसतात का,’ असे विचारले जाई.
⏳ *मृत्यू*📝
नागोजी माने याने संताजी घोरपडेंना बेसावध असताना मारल्याची नोंद इतिहासात आहे.तसेच या कटामध्ये नागोजी माने सोबतच छत्रपती राजारामराजे आणि धनाजी जाधव सुद्धा तितकेच जबाबदार आहेत।.
🏛 🏠*समाधी*🏠
कुरुंदवाड येथल्या (दत्ताचे प्रसिद्ध ठिकाण नरसोबाचीवाडी वरून हे ठिकाण दिसते. अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे.) पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. येथे संताजी घोरपडे यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन केले गेले.
आणखी एक समाधी :- सातारा जिल्ह्यात आहे. म्हसवड गावापासून दहा किलोमीटर अंतरावर कारखेल गाव आहे. त्या गावात ही समाधी आहे.
🛤🗾 *रस्त्याला नाव*
पुणे शहरातल्या कसबा पेठेतील एका रस्त्याला 'वीर संताजी घोरपडे रस्ता' असे नाव दिले आहे. (आधीचे नाव - जुना बाजार रस्ता
🎞 *🎬🎬चित्रपट*📺
संताजीच्या आयुष्यावर दिनकर द. पाटील यांनी १९६८ साली 'धन्य ते संताजी धनाजी' हा मराठी चित्रपट काढला होता.
📚📕 *संताजी घोरपडे यांची चरित्रे*📒📓
अजिंक्य (कादंबरी, अजिंक्य दशरथ पाटील)
अद्वितीय सेनानी सेनापती संताजी घोरपडे (बाळासाहेब माने, म्हसवड)
कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास (स.मा.गर्गे, शं.ह वर्टीकर)
झुंजार सेनापती संताजी घोरपडे (प्रभाकर बागुल)
नरवीर सेनापती संताजीराव घोरपडे (चित्रकार शशिकांत बापूसाहेब पाटील)
रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे (महेश तेंडुलकर)
रणधुरंधर संताजी घोरपडे (शीला रिसबुड)
संताजी (कादंबरी, काका विधाते),
सेनापती संताजी घोरपडे (जयसिंगराव पवार)
    🚩 *हर हर महादेव...*🚩
          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
 संकलनपर माहिती ब्लॉग 
  
 *स्वराज्याचा तिसरा डोळा*
        👁️ *बहिर्जी नाईक* 🤺
समाधी : बाणूरगड, खानापूर,    
               सांगली, महाराष्ट्र 
      
             मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगत असलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.
          बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.
       शिवाजीच्‍या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्‍यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची.
         बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहिती ते ठेवत.
         शिवाजी राजे व संभाजी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.
       शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाचा बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इथंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्‍याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
         सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.
          महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.
        युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्‍न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.
      बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. *बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.* आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणार्‍यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
       स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
        इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
        पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते. शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि 
ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही).
          शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
       तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.
          बहिर्जी नाईक भिकार्‍याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
      आग्र्‍याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.
        शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्या शिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
         शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.
        बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखात देखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्यंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनी देखील त्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.
      इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेर यंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक’.
         गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळात
देखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.
         बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.
        जेम्स बाँड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.
        जेम्स बाँड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !
          बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.
        बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणार्‍या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणार्‍या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.
          २१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!
        बाणूरगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे.
              ⛰🚩🌋
    🚩 *हर हर महादेव* 🚩
🙏 *स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात - अज्ञात नरवीर मावळ्यांना विनम्र अभिवादन* 🙏

 

  *प्रतिशिवाजी नेताजी पालकर*
      *मराठी साम्राज्याचे सरसेनापती*      

       *जन्म : 1620 (खालापूर, रायगड जिल्हा, महाराष्ट्र)
     *मृत्यू : अंदाजे 1681*

नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली.. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुळे त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले. तेव्हा त्यांनी मोगलांची चाकरी केली, पण पश्चाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. मोगलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास भाग पाडले. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला, व स्वतःच्या मुलीशी त्यांचा विवाह करून दिला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्‍याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्र्‍याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्‍याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे ९ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई यांचे नेताजींशी काय नाते होते हे फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. 'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

 [स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथांमधून घेतलेली आहे.

♻ *धर्मांतर ते धर्मांतर*

नेताजी पालकर म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांचं नाव मुळात नेतोजी. त्याचं नेताजी कसं झालं हे माहित नाही. पण त्यांच्या पत्रातून मात्र नेतोजी असंच नाव येत.

तर हे नेतोजी पालकर शिवाजी महाराजांचे सरनौबत. महाराजांनी त्यांना हाकलून दिल्यावर ते आधी आदिलशाहीला आणि नंतर मुगलांना सामिल झाले. महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाने नेतोजी पालकरला कैद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नेतोजीला धारुर इथं दग्याने पकडण्यात आलं आणि आग्र्याला पाठविण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. मुहम्मद कुलीखान असं नाव आणि तीन हजाराची मनसब त्यांना देण्यात आली. आणि मग त्यांना काबूल-कंदहारला पाठविण्यात आलं. तेथून पळून जाण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळेस त्यांना पकडण्यात आलं. 1676मध्ये दिलेरखानाच्या सैन्याबरोबर ते दक्षिणेत आले. आणि संधी मिळाली तसे ते मुगलांकडून शिवाजी महाराजांकडे परतले. नंतर त्यांची शुद्धी करण्यात आली आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आलं. "जेधे शकावली'नुसार ""शके 1598 नळ संवत्सर, आषाढ वद्य चतुर्दशी (11 जून 1676) नेताजी पालकर याने प्रायश्‍चित्त घेतले आणि ते शुद्ध झाले.''

शिवाजीने नेतोजीची शुद्धी केली ही कथा जाणीवपूर्वक उच्चरवाने सांगितली जाते. पण शुद्धी महाराजांनीच केली याला कसलाही कागदोपत्री पुरावा नाही! की नेतोजी मुगलांकडून परतल्यानंतर महाराजांनी त्यांना आपल्या नोकरीत ठेवल्याबद्दल कोणतीही कागदपत्रं उपलब्ध नाहीत! "शिवचरित्र साहित्य' खंड 3 मधील काही पत्रांनुसार इ.स. 1690च्या सुमारास, म्हणजे संभाजीराजांच्या मृत्युनंतर स्वराज्य संकटात सापडले असताना नेतोजी परत मुगलांना सामील झाल्यासारखा दिसतो. शिवाजीराजांनी इंदापूरच्या मशिदींची वतनं बंद केली होती. ती त्यांनी परत सुरू केली. यावेळी ते मुगल मनसबदार झालेले असावेत.

राजवाडे खंडात एका पत्रात नेतोजीबद्दल आणखी माहिती मिळते. शंकराजी नारायण सचिव यांनी बाजी सर्जाराव जेध्याला लिहिलेल्या या पत्रात असं म्हटलं आहे, की "औरंगजेब पातशहाने या देशीचे कित्येक मुसलमान करावे ऐसे केले आहे. त्याउपर नेतोजीराजे.... घाटगे, जानोजीराजे यासहित कित्येक ब्राह्मणांसही मुसलमान केले आहे.'' हे पत्र 1690 मधील आहे. यातील नेतोजीराजे म्हणजे नेतोजी पालकर आणि जानोजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे जावई जानोजीराजे पालकर!

म्हणजे काय तर खुद्द शिवाजी महाराजांचे व्याही आणि जावई हे दोघे धर्मांतर करून मुसलमान झाले होते!!

नेतोजी पुढे नांदेडजवळ वारले. त्यांच्या वारसांकडे अनेक मुगल फर्मानं मिळाली आहेत.

संदर्भ -
- इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998.
- छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, एनबीटी, सहावी आवृत्ती 2004, पृ. 79.

नेताजी पालकर यांची समाधी तामसा (तालुका .हदगाव, जि.नांदेड) येथे आहे.

📽 *चित्रपट*

नेताजी पालकर (चित्रपट, १९७८, दिग्दर्शक कमलाकर तोरणे)

📚 *नेताजी पालकर यांच्याविषयी लिहिली गेलेली मराठी पुस्तके*

अग्निदिव्य (कल्याणीरमण बेन्नुरवार)
नेताजी पालकर (जगदीश खेबुडकर)
नेताजी पालकर : स्वराज्याच्या पहिल्या घनघोर संग्रामात, मिचेल मॅकमिलन यांनी पाहिलेले (लेखक - मायकेल मॅकमिलन, मराठी अनुवाद - पंढरीनाथ सावंत)
शिवबाचा शिलेदार (कादंबरी, ल.ना. जोशी)
                 
         *हर हर महादेव.....!*
*जय भवानी... जय शिवराय*
        🚩 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
                                               
🚩🤺🏇🚩👳‍♀🚩🏇🤺🚩

         *शिवरायांचे शूर शिलेदार *येसाजी कंक*

जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल अशाच एका रणझुंझार मावळ्याची कथा.

१६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी. त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली. गोवळकोंड्यात महाराजांचे जंगी स्वागत झालं. मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभे राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.

गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय... महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हुई लेकीन ताजूब की बात ये है की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा. यावर महाराज उत्तरले आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे. यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कस शक्य आणि असेल एखादा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही.. यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल.

कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं. क्या ये सिपाई लढेगा हाथी से ? महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं का नाही माझा हा मावळा तुमच्या उन्मत्त हत्तीलाच काय इंद्राच्या ऐरावतालही लोळण घालायला भाग पाडेल. मग युद्धाचा दिवस ठरला किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात गोलाकार मैदान बनवण्यात आले महाराज आणि कुतुबशहा साठी बाजूला शामियाना उभारण्यात आला. येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला. हत्तीला ही साखदंडांतून मोकळ करून मैदानात आणण्यात आले.

युद्धाला सुरुवात झाली येसाजीला पाहून हत्ती चवताळून येसाजीच्या अंगावर धावून गेला. येसाजीने डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली. हत्ती आपला वेग रोखू न शकल्या मूळे तसाच पुढे गेला. हत्ती आता चवताळला होता. दोन अडीच तास झुंज चालू होती. कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे. आता हत्ती बेभान झाला होता. त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं. लोकांना वाटल आता संपला येसाजी, पण येसाजी न हत्तीच्या सोंडवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला तो पुन्हा आलाच नाही.

कुतुबशहा च्या हट्टपायी एका हत्तीचा जीव गेला होता.

पण महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं.

कुतुबशहा न येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो अस सांगितलं.

💎 *धोरण*

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता येसाजी कंक जलसागर म्हणतात.

🎞 *चित्रपट*

शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांनी फत्ते केलेल्या एका कामगिरीवर 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट आधारित आहे.
     🚩 *हर हर महादेव...!* 🚩
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
 
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले