नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

लोकराजा राजर्षी शाहू महाराज Shahu Maharaj


लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य हा केवळ इतिहास नाही तर...तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता ही मूल्य आपल्या कार्यातून सप्रमाण सिद्ध करून,वंचित, शोषित, उपेक्षित घटकांना माणुसकी बहाल करणारा असा राजा पुन्हा या पृथ्वीतलावर होणार नाही..
"माणसातील राजा आणि राजातील माणूस....
लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! शत शत नमन !!!"💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
जन्म : २६ जून १८७४ (लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल)
मृत्यू : ६ मे १९२२ (मुंबई)
अधिकारकाळ इ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहण एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा
राजधानी : कोल्हापूर
पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले
पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
राजाराम ३
उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले
वडील : आबासाहेब घाटगे
आई : राधाबाई
पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणे : भोसले
राजब्रीदवाक्य :जय भवानी

राजर्षी !!
हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.
वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.
आजच ह्या राजाला का आठवायच ?
जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा ‘ परवडत नाहीत ‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा आठवायचा.
जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा राजा आठवायचा.
जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा राजा आठवायचा.
जेव्हा ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाला पुढाकार घेणारा राजा आठवायचा.
जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजा आठवायचा.
जेव्हा महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा आठवायचा.
जेव्हा लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा आठवायचा.
पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा आठवायचा.
राजर्षी शाहू महाराज !! 
"श्रीमन्महाराज छत्रपती स्वामी सरकार करवीर"
करवीर संस्थानातील "हुजुर ठराव बुकातील" शाहू महाराजांची
" शाहु छत्रपती " अशी मोडी सही.

असे हजारो ठराव हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी राज्याची प्रतिके आहेत.
कलाकारांचा जन्मदाता |
कुस्तीगीरांचा शक्तीदाता ||
करवीर काशीचा सौंदर्यदाता |
सकलजनांचा आश्रयदाता ||

छत्रपती शिवाजी महाराज आणि भद्रकाली महाराणी ताराराणी सरकार यांच्या संकल्पनेतील हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य वास्तवात उतरवणारे; असे आमचे 
श्रीमन छत्रपती शाहू महाराज !!

तत्कालीन करवीर संस्थान मधील सर्व सामान्य जनतेला विनाकारण हात लावण्यापूर्वी ब्रिटीश अधिकारी ज्यांच्यामुळे 10 वेळा विचार करायचे; असे आमचे 
लोकराजा शाहू महाराज !!

खुद्द ब्रिटीशांना ज्यांचा दरारा वाटायचा; असे आमचे राजर्षी शाहू महाराज!!

त्रिवार मुजरा !! शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.
शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
💥इतर कार्ये:
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.
कलेला आश्रयः
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
स्वातंत्रलढ्यातील योगदान :
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.
👉👉पारंपारिक जातीभेदाला विरोधः
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले. राज्यातील शेतकरी शेतमजूरांची ते काळजी घेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्माण केली. त्यांनी विधवेच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहान दिले . कुलकर्ण्यांची वतने रद्द केली. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारा हा पहिला राजा भारतातील राजा होता. आजही महाराजांच्या कार्याचा अलौकीक ठसा कोल्हापूर परिसरात दिसून येतो. महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींचे वारसदार होते. एकदा जंगलात अस्वल त्यांच्या अंगावर आले असतांना त्यांनी त्याचा सक्षमपणे मुकाबला केला होते.
एकदा व्हाईसरायने संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी देशातील सर्व संस्थानिकांना निमंत्रीत केले होते. त्यामध्ये महाराज आपल्या शरीरयष्टीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचासारखा पराक्रमी प्रजेचे हीत पहाणारा साहित्य कला संस्कृतीची पाठराखण करणारा. समाजवादी समाजरचनेचा स्विकार करणारा राजा होणे नाही.
🎬🎥📺चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका
'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे.
👉📚📚 *शाहूंवरील प्रकाशित साहित्य*
'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)
राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)
कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)
राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)
राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)
समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)
‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)
लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)
पुरस्कार
📖 📝📚📕📒शैक्षणिक कार्य
शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा

🏤 🔘👨👩शैक्षणिक वसतिगृहे
शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.
१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)
🏆🔲शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

📜📝 छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य
बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले.

इ. स.१९०१ मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ ची स्थापना केली. त्यांनी कोल्हापुरात निरनिराळ्या जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली.

इ. स. १९०२ मध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.

इ. स. १९०६ मध्ये शाहू महाराजांनी ‘शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल’ चा पाया घातला.

इ. स. १९०७ मध्ये सहकारी तत्वावर एका कापड गिरणीची त्यांनी उभारणी केली.

इ. स. १९०७ मध्येच शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे वसतिगृह उघडले.

इ. स. १९०७ मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे ५५ कि.मी. अंतरावर दाजीपूरजवळ भोगावती नदीला बंधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी आखली. ती इ. स. १९०८ मध्ये अमलात आणून त्या बंधान्याला ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ असे नाव देण्यात आले.

इ.स. १९११ मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुन स्थापना झाली.

१९१३ मध्ये शाहूंच्या आदेशानुसार खेड्यांमध्ये चावडी, धर्मशाळा, मंदिरे व होते. या इमारतींमधून शाळा सुरू झाल्या.

इ. स. १९१६ मध्ये बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली.

इ. स. १९१७ मध्ये शाहूंनी प्राथमिक शाळेतील फी माफीची घोषणा केली. २१ नोव्हेंबर १९१७ रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले.

इ. स.१९१७ मध्येच त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळून दिली.

इ. स. १९१८ मध्ये शाहूनी आपल्या संस्थानातील महार वतने रद्द केली आणि जमीन अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. अस्पृश्यांकडून वेठबिगारी पद्धतीने कामे करून घेण्यास कायद्याने बंदी घातली.

इ.स. १९१८ मध्येच शाहूंनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले.

इ.स. १९१८ मध्येच शाहूंनी वतनदारांच्या जाचातून शेतकन्यांची मुक्तता करण्यासाठी खेड्यातील कुलकर्णी वतने रद्द केली आणि त्या जागी पगारी तलाठी नेमण्याची व्यवस्था केली.

आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी इत्यादी ठिकाणी समानतेने वागवावे, असे आदेश त्यांनी काढले.

इ.स. १९१९ मध्ये बलुतेदार पद्धत बंद करण्याविषयीच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला त्यांनी १०० रु. दंड व चार दिवसांची कारावासाची शिक्षा देणारा कायदा केला.

इ.स. १९२० मध्ये कोल्हापर संस्थानातील माणगाव येथे त्याना अस्पृश्याची परिषद भरविली.

इ. स. १९२० मध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला.

इ. स. १९२० मध्ये हुबळी येथे ब्राह्मणेतर सामाजिक परिषद भरली होती. तिचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविले होते.

२६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.

शाहु महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते.

२० मार्च १८८६ रोजी शाहु महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झाला.

०८ मे १८८८ रोजी “कोल्हापूर ते मिरज” या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली.

१८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी “धारवाड येथील “एस.एम.फ्रेजर” यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहु महाराजाना एस.एम.फ्रेजर यांनी दिले.

०१ एप्रील १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या “लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराज यांचा विवाह झाला.

शाहु महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी एकुण ०४ आपत्ये होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्याहुन पडुन मृत्यु झाला होता. १८९३ मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले.

०२ एप्रील १८९४ रोजी शाहु महाराजांचा “राज्याभिषेक” होवुन वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहु महाराजांनी स्विकारली व शाहु महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली.

शाहु महाराजांच्या राज्याभिषेक साहेळ्या दरम्यान ब्रिटीश सरकार तफै मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता.

१८९५ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ सुरु केली.

१८९६ साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थांसाठी शाहू महाराजांनी “राजाराम” हे वस्तीगृह सुरु केले व याच सालापासुन शाहू महाराजांच्या वस्तीगृह निर्मातीच्या कार्याला सुरुवात झाली.

१८९७ साली महारोग्यांसाठी “हिक्टोरीया लेप्रसी” या हॉस्पीटलची स्थापना शाहू महाराजांनी केली.

नोव्हेंबर १८९९ मध्ये शाहू महाराजांच्या जिवनास कलाटणी देणारे “वेदोक्त प्रकरण” घडले. शाहू महाराज पंचगंगा नदी काठी स्थानासाठी गेले असतान त्यांचे पुरोहीत नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणुन दिले. या बाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगतीले. येतुन खऱ्या अर्थाने ब्राम्हणेत्तर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली.

१९०१ मध्ये शाहु महाराजंनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे बतने जप्त केली. व नारायण भट्ट सेवकरी यांच्या कडुन वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली.

वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी ब्राम्हणांची बाजु घेतली शाहू महाराजांवर टिका केली.

१६ एप्रील १९०२ रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटीश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहुंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला.

राजर्षी शाहु महाराज हे “डेक्कन एज्युकेशन सोसायटी” चे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहु महाराजांनी या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

१९०१ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानामध्ये “गोहत्या प्रतीबंधक कायदा लागु केला.

१९०१ साली शाहू महाराजांनी “ब्हिक्टोरीया मराठा बोडीग’ ची स्थापना केली. परंतु या बोडीगमध्ये फक्त ब्राम्हण मुलेच राहु लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. ०१८ एप्रील १९०१ रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्याच्यांसाठी स्वतंत्र्य वस्तीगृहे शाहु महाराजांनी स्थापन केली.

०२ जुन १९०२ रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या ०७ व्या एडवर्ड च्या राज्यरोहन संमारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाचे वेळी केंब्रिज विद्यापीठाने शाहु महाराजांना LLD ही पदवी बहाल केली.
- संकलित माहिती

1 टिप्पणी:

लक्षवेधी म्हणाले...

छत्रपती शाहूंना विनम्र अभिवादन 💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले