मित्रांनो..... आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रत्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना?
खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.
https://www.the-qrcode-generator.com/
http://goqr.me/
http://www.qr-code-generator.com/
http://goqr.me/
http://www.qr-code-generator.com/
म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?
QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?
सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यासाठी काही शुल्क द्यावे लागते.
QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?
Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.
QR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे -
1- विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.
2- एखादा मोठा घटक कोड स्वरुपात साठवता येतो.
3- एखादी अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.
4- मोठ्यात मोठी माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात.