जिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म
जानेवारी १२ इ.स. १५९८ सिंदखेडराजा,
बुलढाणा.
मृत्यू
जून १७,
इ.स. १६७४ पाचड,
रायगडचा पायथा
वडील
लखुजीराव जाधव आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती
शहाजीराजे भोसले संतती
छत्रपती शिवाजीराजे भोसले संभाजी शहाजी भोसले राजघराणे भोसले
चलन
होन जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमत योगी।' असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' त्या मूलमंत्राचा उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. १२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वतीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ आणि ही गुणी पोर, बाबाजी आणि शहाजी भोसल्यांची अर्धांगिनी झाली ती १६०५ च्या रंगपंचमीला अर्थात फाल्गुन वदय पंचमीला. त्या भोसले घराण्याला 'पृष्णेश्वर'मंदिराच्या जीणोंद्धाराचे श्रेय जाते. जिचे वर्णन 'शिवभारत २-४५' मध्ये केले 'गड:गेव गुणगम्भीरा व्यराजत महोदधिन् (अर्थात गुणगंभीर अशी गंगा समुद्राला शोभून दिसते, तशी जिजाबाई शहाजीला शोभली.) 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' तद्वतच युगपुरुष घडत असताना ते बीज आणि त्यावर होणारे संस्कार यांचा अन्योन्य संबंध होता. कारण शिवबांच्या जन्माच्या पार्श्वभूमीचा विचार करताना हा गर्भ जिजाऊंच्या उदरी वाढत असताना काय परिस्थिती होती? सभोवताली किंवा उभ्या महाराष्ट्रात. जाधव आणि भोसले या घराण्यांची सोयरीक जुळली खरी; पण मने मात्र जुळली नाहीत, त्यामुळे जिजाबाईंना फार वाईट वाटे. एका अकल्पित प्रसंगी जाधव व भोसले घराण्यात युद्धही जुपले. महाराष्ट्रात आणि सर्वत्र मोगल आणि विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. जिजाबाईंना असह्य होई. मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशांची आणि तीर्थक्षेत्रांची दैना पाहून जिजाबाईंच्या हृदयाला पीळ 'झगडणे आणि संघर्ष’ हा त्यांच्या जीवनाचा पायाच होता. शिवबाच्या जन्मापासून प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याशी करताना त्या डगमगल्या नाहीत. ही माता ह्या पुत्राच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणारी ही माता, तिने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली असे म्हणावे लागेल. अस्मानी सुलतानी. संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन ‘शिवाई' देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पाजले, पुण्याच्या लालमहालात प्रवेश केल्यावर पुणे भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून येथील आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा त्यांनीच उमटविल्या असेच म्हणावे लागेल.
प्रसंग रांझयाच्या पाटलाचा असो त्यात न्यायनिवाडा करण्याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाबाईकडूनच. न्यायासनासमोर आपलाच अधिकारी गुंन्हेगार म्हणून आल्यावर कारवाई करण्याचे प्रशिक्षण मिळाले. निःस्पृह आणि नि:स्वार्थी आंबे तोडल्याचा व त्यावर उपाय म्हणून आयुष्यभर अधीं बाहीचा शर्ट वापरण्याचे ब्रीद पाळणा-या दादोजींची निवड ह्यात त्यांच्या मुत्सद्देगिरीचा भाग जाणवतो. पतीच्या अनुपस्थितीत मुसलमानी राजवटीविरुद्ध बाल शिवाजी व मावळ्यांमध्ये 'स्वराज्य स्थापना'चे बीज रोवून 'हिंदवी स्वराज्याचे' महान स्वप्न पाहण्याचे योगदान देणारी ती माऊली म्हणजे, 'स्त्री क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता असते' हे शब्दशः खरे करून त्यांनी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वात स्वत:चे योगदान दिले. A low aim is a crime' हे तत्त्व लक्षात घेऊन स्वराज्यनिर्मितीचे भव्य दिव्य स्वप्न उराशी बाळगले.
तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला प्रेरक ठरल्या त्या एकमेव जिजाऊ माँसाहेब! म्हणतात त्याप्रमाणे, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'
हे वाक्य शिवराय सार्थ ठरवू शकले ते केवळ माँ साहेबांच्या करारी व नि:पक्षपाती स्वभावाचा त्यांच्यात उतरलेला अंश म्हणूनच! नेताजी पालकरांचे धर्मातर घडवून ह्या वीराच्या घरी स्वत: जाऊन सांत्वन करण्यात किंवा दूरदृष्टीने कोंढण्याचे स्वराज्यातील महत्व ओळखण्यातच ह्या मातेचे योगदान होते. आग्रा सुटका - प्रसंगानंतर बैराग्याच्या वेषात आलेल्या प्रतापराव गुजर ह्यांना सोन्याचे कडे कबूल करून त्या देणा-या राजमाता जिजाऊ होत्या, म्हणूनच हे हिंदवी स्वराज्याचे तारू राज्यभिषेकाच्या काठावर पोहोचले.
पुण्यात राहण्यासाठी आल्यावर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली व जोगेश्वरी आणि केदारेश्वर यांचा जीणोंद्धार केला. जिजाबाई शिवाजीच्या मनावर सतत एक गोष्ट बिंबवीत राहिल्या की, 'हे राज्य आमचे नाही, इथे लोक कंगाल आहेत, देवळे पाडली जात आहेत. गोरगरिबांना वाली उरलेला नाही, शिवबा, तू मोठा हो, यांचा पालनवाला हो.”
तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालीत. जाती-जमातीत व घराण्यांन्यायनिवडांच्या बाबतीत त्या नि:पक्षपाती होत्या. संतमहंतांचा आणि विद्वानांचा त्या योग्य परामर्श घेत असत. परिणामतः संत तुकाराम यांसारखे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले हा त्यांचाच दृश्य परिणाम होता.
अफजलखानाचे संकट आणि सिद्दी जोहरने पन्हाळ्याला दिलेला वेढा हे जिजाबाईंच्या जीवनातील पडले होते. संभाजी व शिवाजी जगले आणि त्यातील शिवाजीवर हे अफजलखानाचे संकट! पण अशाही स्थितीत मन कठोर करून त्यांनी शिवाजींना आशीर्वाद दिला.
'शिवबा तू विजयी होशील!’
पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी स्वतःच युद्धावर निघाल्या होत्या; पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता आणि विलक्षण आवेश गोष्टी दिसून येतात. इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांना अपघात झाला आणि ते निवर्तले, हा वज्राघात झेलून त्या सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी विनवणी करून त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते. त्या कर्तबगार सर्व राज्यकारभार त्यांच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई ह्या ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न! उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!'
जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
🔱 *भोसले व जाधवांचे वैर* पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
🌀 *अपत्ये* जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले. *मुलाचे संगोपन व राजकारभार* शिवाजी राजे १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी राजांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
🔮 *जीवन* शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होय.
📚 *पुस्तके* राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही- जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर जेधे शकावली शिवभारत जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले ) जिजाई : मंदा खापरे ट गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव अग्निरेखा
🎞 *चित्रपट* जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी राजांवरच्या चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :- राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर) स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे) *जय जिजाऊ...जय शिवराय* 🚩 *हर हर महादेव...*🚩 🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳 🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
स्त्रोतपर संकलन