मराठी मोजमापे…
धान्य मोजण्याची मापं :
दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी
चार शेर= एक पायली
आठ पायली= एक कुडव
आठ कुडव= एक गिध
वीस कुडव= एक खंडी.
एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली म्हणजे ४.५ किलोला थोडे कमी भरते. म्हणजे एक मापटे म्हणजे सुमारे ४२५ ग्राम.
मण आणि खंडी हे धान्य मोजण्याचे एक माप आहे. आजही शेतकरी कुटुंबात खालील प्रमाणे धान्य मोजण्यासाठी मापे वापरली जातात.
पावशेर
अर्धाशेर
आदली
पायली (सरासरी ५ किलो)
१६ पायल्या चा १ मण (सव्वा मण म्हणजे १ क्विंटल)
२० मणाची एक खंडी..
असे हे मोजमाप आहे.
सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :
गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज
आठ गुंजा = एक मासा
बारा मासे = एक तोळा
अंक :
१ – एक
१० – दहा
१०० – शंभर
१००० – हजार
१०००० – दहा हजार
१००००० – लक्ष
१०००००० – दशलक्ष
१००००००० – कोटी
१०००००००० – दशकोटी
१००००००००० – अब्ज
१०००००००००० – खर्व
१००००००००००० – निखर्व
१०००००००००००० – महापद्म
१००००००००००००० – शंकू
१०००००००००००००० – जलधी
१००००००००००००००० – अन्त्य
१०००००००००००००००० – मध्य
१००००००००००००००००० – परार्ध
चलन :
तीन पै = एक पैसा
दोन पैसे = एक ढब्बू पैसा
दोन ढब्बू पैसे = एक आणा
दोन आणे = एक चवली
दोन चवल्या = एक पावली
दोन पावल्या = एक अधेली
दोन अधेल्या = एक रुपया
अंतर :
तीन फूट = एक यार्ड
१७६० यार्ड = एक मैल
दोन मैल = एक कोस
माप हे एक अन्नधान्य, पाणी-तेल-दूध-तूप, कपडे-पादत्राणे यांचे आकारमान दर्शवायचे साधन आहे.
पूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी त्याचे आकारमान मोजत असत. त्यासाठी चिपटे, मापटे, अधोली, पायली इत्यादी एकके होती. नवीन सून घरात येताना उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून येते ते हेच माप.
पाणी-तेल-दूध-तूप हे लिटरमध्ये मोजतात. (तूप हे किलोमध्ये मोजावे असा कायदा आहे.)
मोठ्या माणसाच्या कपड्यांची भारतीय मापे : S (Small : ३२"-३४"/८०-८५ सेंटिमीटर), M (Medium : ३६"/९० सेंटिमीटर), L ( Large : ३८"/९५ सेंटिमीटर), XL ( Extra Large : ४०"/१०० सेंटिमीटर), XXL (Bigger than extra large : ४२"/१०५ सेंटिमीटर), XXXL (3XL : ४४"/११० सेंटिमीटर) (Still Bigger).
मोठ्या पुरुष माणसांच्या पादत्राणांची मापे : ६, ७, ८, ९
स्त्रियांच्या पादत्राणांची मापे : ५, ६, ७.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा