नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

सावित्रीबाई फुले (बालिका दिन , घोषवाक्ये)


सावित्रीबाई जोतीराव फुले
🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏
ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही.
स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली
अश्या *"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत"*,
भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका,
*सावित्रीबाई फुले* निमित्त विनम्र अभिवादन.....!!!
🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा;
३ जानेवारी, इ.स. १८३१
मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७
या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री.त्यांच्या सहवासात व संस्कारात पन्नास वर्षे राहिली. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर झाली. जोतिरावांच्या मनात स्त्रीशिक्षणविषक विचार प्रबळ होऊ लागला. तेव्हा स्त्रियांना कसे शिकवावे, याचा वस्तूपाठ घेण्यासाठी काही दिवस अहमदनगरला जाऊन राहिली आणि एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून १८५२ सालीच सरकार दरबारी तिचा सन्मान झाला. जोतिरावांनी समाजाची दशा व दिशा सावित्रीला समजावून दिली. सावित्रीला स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचा वसा घेतला. दीनदलित स्त्रियांची गुलामगिरी तिला अस्वस्थ करीत होती. तिचे नाव भावनाळले. विचारांचा कल्लोळ उठला व ती कव‍ियत्री झाली.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
पुणे विद्यापीठाव्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले.
पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 'आदर्श माता' पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्‍न पुरस्कार : आदर्श माता रत्‍न, उद्योग रत्‍न, कला रत्‍न, क्रीडा रत्‍न, जिद्द रत्‍न, पत्रकारिता रत्‍न, प्रशासकीय रत्‍न, वीरपत्‍नी रत्‍न, शिक्षण रत्‍न
मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्व्प्त्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक/शैक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार
माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २०१६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.
युनाइटेड ओबीसी फोरमचा सावित्रीवाई फुले वैचारिक वाङ्मय पुरस्कार.
वसईच्या लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार
**
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घोषवाक्ये 
१) नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी .
२) मुलगी शिकली, प्रगती झाली .
३) मुलीला शिकू द्या ,वाढू द्या ,माणूस म्हणून जगू द्या.
४) मोळी विक, पण शाळा शिक.
५) उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.
६) मुलींचे शिक्षण , प्रगतीचे लक्षण.
७) मुलगा मुलगी दोघे समान, दोघाींनाही शिकवू छान
८) आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य.
९) जिच्या हाती पेन्सिल पाटी,तिच सुखाचे मंदिर गाठी.
१०) बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान.
११) सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार.
१२) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा.... विजय असो.
१३) पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा....विजय असो. १४) दीन, दलितांची माऊली सावित्रीबाई फुलेंचा....विजय असो.
१५) ज्ञानाची ज्योती सावित्रीबाई फुलेंचा...विजय असो.
१६) स्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी...तुझ्यामुळेच आज शिकते आहे प्रत्येक नारी. 
१७) शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार...तीच सावित्री आज जगाची शिलेदार.
 
"बालिका दिनानिमित्त घोषवाक्ये"
1.मुलगा, मुलगी समान... दोघांनाही द्यावे शिक्षण छान.
2.मुलगी वाचवा.....देश वाचवा.
3.मुलगी वाचवा....मुलगी शिकवा.
4.मुलापेक्षा मुलगी बरी....प्रकाश देते दोन्ही घरी.
5.लेक वाचवा...लेक शिकवा.
6.मुलीला समजू नका भार...तीच आहे तुमच्या जीवनाचा आधार.

संकलन (विकिपिडीया व इतर )

बालिका दिन प्रतिज्ञा
मी स्वतंत्र बालिका आहे. माझे भवितव्य मी घडविणार आहे. यासाठी येणाऱ्या संकटांना, अडीअडचणींना धैर्याने तोंड देण्याची, हाल अपेष्टा सहन करण्याची माझी तयारी आहे.
मी माझे शिक्षण अर्धवट सोडणार नाही. १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही. भारतीय राज्य घटनेने व्यक्ती म्हणून दिलेल्या हक्काचा मी पूर्णपणे वापर करेन.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेल्या पंरपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारी सुजाण नागरिक बनेन.

सावित्रीबाईंच्या काही कविता
सावित्रीबाईंनीदेखील आपल्या काव्यप्रतिभेने ज्योतिबांना पुढील शब्दांत वंदन केले आहे-
ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार)’
‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट)’

शिक्षणाशिवाय बहुजन समाजाच्या, शूद्रांच्या जीवनात बदल घडून येणार नाही, हे त्यांनाही उमगले होते. म्हणूनच पुढील शब्दांत त्यांनी अक्षरांचा श्रम केला आहे-
‘शूद्रांना सांगण्याजोगा।
आहे शिक्षणमार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व।
पशुत्व हाटते पहा’ (शूद्रांचे दुखणे)
‘विद्या हे धन आहे रे।
श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी।
ज्ञानी तो मानती जन’ (श्रेष्ठ धन)
‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी
उठा बंधूंनो, शिकण्यासाठी उठा ’ (शिकण्यासाठी जागे व्हा)

मनुचा हा कपटी कावा लोकांना कळावा म्हणून त्या लिहितात- ‘शूद्र जन्म घेती।
पूर्वीची पापे ती।
जन्मी या फेडती शूद्र सारे
विषम रचती समाजाची रीती
धूर्ताची ही नीती। अमानव...’ (मनू म्हणे)
‘दोन हजार वर्षांचे। शूद्रा दुखणे लागले ब्रह्मविहित सेवेचे।
भू - देवांनी पछाडले (शूद्राचे दुखणे)’

‘पिवळा चाफा’, ‘जाईचे फूल’, ‘फुलपाखरू’ या कविता उल्लेखनीय आहेत. अत्यंत तरल अशा शब्दकळेतून या कविता रसिकांपुढे येतात.
‘पिवळा चाफा रंग हळदीचा
फुलला होता हृदयी बसतो (पिवळा चाफा)’
‘फुल जाई पहात असता
ते मज पाही मुरका घेऊन (जाईचे फूल)’

महाराष्ट्र शासनाने बालिका दिन हा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

📢 *पालकांसाठी स्पर्धा *📢

३ जानेवारी रोजी *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या जयंतीनिमित्त इ. १ ली ते ४ थी च्या माता पालकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करू शकता.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍
◼स्मरणशक्ती स्पर्धा
◼संगीत खुर्ची
◼फुग्यात हवा भरून कागदी कप पाडणे. (वेळ १ मिनिट)
◼ कवितागायन (बहिणाबाईच्या कविता)
📍📍📍📍📍📍📍📍📍📍



आगामी झालेले