✒🌹✒शाळासिद्धि कार्यक्रम विशेष*
*सत्र २०१९ - २०२० साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत*✒🌹✒
*_महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पत्रान्वये सत्र २०१९ - २०२० साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक , भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे ._*
*सत्र २०१९-२०२० साठी शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .*
*आपल्या जिल्ह्याचे कार्य देशात सर्वोत्तम असावे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्वरित लॉगिन होऊन उपरोक्त वेबपोर्टलवर आपले स्वयंमूल्यमापन त्वरित करावे व त्याची माहिती पंचायत समिती मध्ये मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी .*
🌹 *_स्वयंमूल्यमापन लवकरच करावे_* 🌹
✒🌹✒
*शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती*
*माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत*
🌹 *शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.*
🌹 *शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.*
🌹 *७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके*
🌹 *प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.*
*माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या*
*जातवार पटसंख्या* - _३० सप्टेंबर २०१९ ची अपेक्षित आहे._
*वार्षिक उपस्थिती* _सत्र २०१८ - २०१९ ची अपेक्षित आहे._
*मुख्य विषय संपादणुक* - _इयत्ता आठवी ते बारावीची मागील ( २०१८ - २०१९ )शैक्षणिक वर्षाची लिहावी_
*सत्र २०१८-२०१९ चा निकाल*- _इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल *टक्केवारीत* लिहावा._
*शिक्षक संख्या* - ३० सप्टेंबर २०१९ नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी.
*शिक्षकांच्या रजा* - _१ जानेवारी २०१९ ते माहिती भरलेल्या दिनांकापर्यंत - या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._
*स्तर निश्चिती*- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_
*सुधारणेचे नियोजन* - _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे._
🌹 *प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित केलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹
*स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*
_महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._
_स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._
*श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी.*
*श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण*
*श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण*
*श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_*
🌹 *स्वयं मूल्यमापनासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 🌹