२३ मे जागतिक कुस्ती दिन Jagtik Kusti Din
World Wrestling Day
२३ मे १९०४ रोजी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे पहिले जागतिक ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
जगातील १३० पेक्षा जादा देश कुस्ती खेळतात, त्याचबरोबर कुस्ती बघण्यासाठी नेहमीच प्रेक्षक गर्दी करत असतात.
कुस्ती या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्रानेच सर्वात मोठे महत्त्व दिले आहे. तसा हा पारंपरिक खेळ आहे. छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिला आणि पश्चिम महाराष्ट्रात खास करून कोल्हापूर जिल्ह्यात कुस्तीचे आजही महत्त्व आहे. खासबागच्या मैदानावर आजही हजारो लोक कुस्तीच्या दंगलीला गर्दी करतात.
अजूनही ग्रामीण भागात, खेड्यापाड्यातसुद्धा तालमी आहेतच. लाल आखाड्यात माती आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हय़ांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरत आहेत. त्यातूनच महाराष्ट्र केसरी तयार होतात. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले, पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील एकाही मल्लाला त्यांच्याएवढी उंची गाठता आली नाही.
कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.
त्यांची सकाळ रोज ४ वाजता होते. ५ वाजता सुरू झालेला सराव ४ तास चालतो. दुपारचं जेवण झालं की पुन्हा थोड्या वेळात सरावासाठी सज्ज. पुन्हा चार तासांचा व्यायाम. जोर बैठका. सपाट्या. कार्टव्हिल. ब्रिजिंग. मुद्गल व्यायाम. दोराचे व्यायाम. आखाडा उकरणे. लिफिक्ट. यापेक्षाही बरंच काही. सगळं रोजचंच. ताकदवान खुराक रोजचाच. आपल्या चुका हेरून त्यानुसार करायचा आपला सराव ही रोजचाच. चमचमीत, दमदमीत खाणं, मोबाईलवर रेंगाळणं, मित्रांचा फड जमवून फिरायला जाणं यासाठीचा वेळही फक्त आखाड्याचाच. आखाडा आणि कुस्ती. जग त्या भोवतीच फिरत असतं. एकलव्या सारखं फक्त ध्येय दिसत असतं. मनात कलाजंग, दसरंग, सालतु, भारंदाज असे नानाविध डाव मांडलेले असतात. मेंदुवर फक्त त्यांचाच ताबा असतो. जिद्द, चिकाटी, कष्ट, मेहनत हे शब्द ते जिवंतपणे जगत असतात. त्यातही कोणाला खुराकाच्या खर्चाची भ्रांत, कोणाला घर चालवण्याची. जगाचा नकार पत्करून पाठीशी उभ्या असलेल्या बापाला यश दाखवायचं असतं. काहींना कुस्ती खेळते म्हणून रोखल्या गेलेल्या नजरांना उत्तर द्यायचं असतं. दुखापतींनी काहिंना चितपट केलेलं तर काहींना आपल्याचं मागच्या कुस्तीतलं हरणं बोचलेलं. पण याने थांबुन न राहता ते मनात रोज एक प्रकाशमान करणारी ज्योत लावत असतात. अंधार भेदून आखाड्यातल्या मातीत पाय घट्ट रोवून उभे असतात. आपल्याकडून असलेल्या अपेक्षांसाठी, आनंदासाठी, स्वप्नपूर्तीसाठी, कधी कधी तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनिवार्य म्हणूनही जिंकत असतात. सतत लढत असतात. आयुष्यासाठी लढणं की लढण्यासाठी आयुष्य या फंदातही न पडता प्रामाणिकपणे लढत असतात. म्हणूनच दुरदेशी कुठे तरी कधीतरी राष्ट्रगान अभिमानाने घुमतं. चांदीच्या गदेला सोन्याचं महत्त्व मिळतं आणि पदकांच्या खैराताने आयुष्याचं सोनं होतं. खरंच, कुस्तीगीर होणं सोपं नसतं. तमाम कुस्तीगिरांना, त्यांना घडवणाऱ्या वस्तादांना, त्यांना मनात जपणाऱ्या कुस्ती शौकिनांना, लाल मातीसाठी झटणाऱ्या, राबणाऱ्या मंडळींना, आयुष्याची कुस्ती झालेल्या सगळ्या सगळ्यांना. कुस्तीगिरांना आर्थिक मदत करणाऱ्या प्रायोजकाना, संघटनेना मदत करणाऱ्या जाहिरात दारांना; कुस्तीगीर, पालक, कुस्ती शौकिन, कुस्ती प्रेमी, आयोजक, प्रायोजक, संघटक, कोच, वस्ताद, मार्गदर्शक या सर्वांना जागतिक कुस्ती दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून कुस्ती जिवंत आहे, या दिवसाला महत्त्व आहे.
आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातीलमल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुध्दात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुध्दात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधलाही ठार मारले.
इ. स. पू. ३००० वर्षे इजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यातील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुध्दाचा उल्लेख आढळतो. हामरच्या इलीअड या सुप्रसिध्द महाकाव्यात ऍजेक्स ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक सांस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांत मल्लयुध्दाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिध्द ग्रीक तत्ववेत्याचा शिष्य मिलो याने मल्लयुध्दात पराक्रम केला होता.
ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्ती पध्दतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरूपद्रवी चितपटीची कुस्ती आली.
तसे पाहायला गेले तर प्रांत बदलला की परंपरा बदलतात.काही ठिकाणी कुस्ती मातीत खेळली जाते तर काही ठिकाणी गवतावर खेळली जाते.काही देशात गादीवर तर काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील वाळूतही कुस्ती खेळली जाते.
व्यवस्थित बघितले तर ज्युडो, कराटे, सॅम्बो, कुराश यासह विविध मार्शल आर्ट प्रकार यांचाही उगम कुस्तीतूनच झालेला दिसून येतो.सुमो,भारतीय कुस्ती,समुद्री तट कुस्ती अशा विविध परंपरा प्रत्येक देशाने त्यांच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीला स्वीकारून जपली आहे.परंतु हे सर्व देश जेव्हा ऑलिम्पिक,जागतिक अथवा खंडीय स्पर्धा अशा मानाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होतात ते जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमांनी बांधलेल्या कुस्तीतच.जागतिक कुस्ती संघटना कुस्तीतील विविध प्रकारांना संशोधन करून अद्ययावत नियमांनी बांधून त्या प्रकाराला मान्यता देत असते आणि या कुस्ती प्रकारांच्या वाढीसाठी झटत असताना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करत असते.त्याला जगातील जवळपास सर्वच देश सलग्न राहून कुस्तीच्या कार्यवाढीसाठी झटत असतात.
जागतिक कुस्ती संघटना अर्थात UWW ने फ्री स्टाईल रेसलिंग, ग्रीको रोमन रेसलिंग,वुमेन्स रेसलिंग,बेल्ट रेसलिंग,बीच रेसलिंग, पॅनक्रेशन, ग्रॅपलिंग,अल्याश, कजाक कुरेशी, पहलवानी, तुर्कमेन गोरेश या प्रकारांना मान्यता दिली आहे.
आपल्या भारत देशात जागतिक कुस्ती संघटनेला सलग्न असलेल्या चार संघटना आहेत.प्रत्येक संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे.यामध्ये प्रामुख्याने भारतीय कुस्ती संघ,ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलींग अँड पॅनक्रेशन फेडरेशन,ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांचा समावेश आहे.काही महिन्यांपूर्वीच भारतीय शैली कुस्तीला समाविष्ट करण्यात आले आहे.
संकलित माहिती