नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

निबंध लेखन स्पर्धा निकाल

सहर्ष स्वागत........  स्वागतम..... सुस्वागतम.....
*सात्विक प्रतिष्ठान आयोजित- प्रमाणपत्रे लिंक १ ली ते ८ वी
👉**  निबंध लेखन स्पर्धा
किंवा
https://tinyurl.com/nibandha-spardha

💁📝📝 * निबंध लेखन स्पर्धा* 📝📝
सर्वांना सुचित करण्यात आनंद वाटतो की, टाळेबंदी (लॉकडाउन) काळामध्ये आपण भरपूर चढ-उतार बघितले. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच त्यांच्यात असलेले सुप्त गुण जाणून घेण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न.
सात्विक प्रतिष्ठान आयोजित- 
निबंध लेखन स्पर्धा विजेता नावे
👉**स्पर्धा विषय **👈
1) गट अ - वर्ग १ ली ते २ री
विषय - मला देव भेटला तर
विजेते - 1) Saumya Shailesh Padyal
Arnav Rakesh Gaddi
रुद्र राहुल सपकाळ
2) तन्वी राकेश दिवेकर
संचित शेट्ये
आराध्या अविनाश पाटील

2) गट ब - वर्ग ३ री ते ४ थी
विषय - स्वच्छतेचे महत्त्व
विजेते - 1) Soham Santosh Bhuwad
2) कोमल दिलीप भोईर
आर्या लवु बागवे

3) गट क - वर्ग ५ वी ते ६ वी
विषय - कोरोना - मृत्यू वादळ
विजेते - 1) चिन्मय अनिल कटके
सिद्धि अनाप
2) अनन्या बाजीराव शिंदे
अनन्या अभिजित कर्णिक

4) गट ड - वर्ग ७ वी ते ८ वी
विषय - केल्याने होत आहे रे....
विजेते - 1) प्रांजली जीवन सावंत
नेहल दिलीप भोईर
2) ईश्वरी संदिप लांडे
तन्वी हणमंत कुंभार
*सर्व सहभागी विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा !!* आभार पुढील कार्याला शुभेच्छा
💐💐💐💐💐



मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

You Tube channel कसे बनवायचे

You Tube channel कसे बनवायचे
आज सर्व teachers विद्यार्थीचे Work For Home चे video बनवून ग्रुप वर सेंड करत आहेत,परंतु तेच video आपण स्वतःचे You Tube channel बनवून टाकले तर नेट पॅक, कमी लागेल
💻 कसे you tube channel बनवायचे⌨
1)सर्व प्रथम तुमचा मोबाईल मध्य gmail login करणे गरजच आहे,पासवर्ड विसरु नका,एका book मध्य लिहून ठेवा
2)You Tube ऍप्स open करा
3)वरती कोपऱ्यात गोल ला click करा
4)त्यानंतर create Channel येईल त्याला clik करा
5) नंतर You Tube as असे येईल त्याला open करा
6)त्यात tilte, व description भरा, म्हणजे तुमच्या channel चे नाव टाका मग save करून परत मागे या
7) वरील number 1 प्रमाणे पुन्हा yoउ tube च्या वरती गोल ला click करून Your channel setting ला click करा
8) मग Setting मध्य जा व add description मध्य  तुम्ही जो video टाकणार आहे त्याची short मध्य माहिती भरा
9) नंतर खाली privacy मध्य जाऊन 3नंबर चा point फक्त on ठेवा
10)नंतर त्याच page वरती एक video चा लोगो दिसेल त्याला click करा व तुमच्या gallery मध्य जो विडिओ आहे तो uplode करा व खाली आलेले title व description मध्य video चे नाव टका
11) नंतर त्याच page वरती  असा ▶️ logo दिसेल त्याला click करा व शेवटी तुमचा video uplode होऊन channel तयार होईल,
12) नंतर हवे त्याला तुम्ही तुमचा You Tube channel Video send करू शकतात
✅आशा प्रकारे तुमचे channel तयार✅
आजच Try करा व आपले स्वतःचे Channel बनवा

Mobile च्या साह्याने Education Video, Video कसा बनवायचा

‼️Mobile वर class साठी subjectची  Education Video निर्मिती कशी करावीस्वतःचा sound कसा द्यायचा‼️
     ----------------–-----------+++
  ✅ STEP✅
1) सर्व प्रथम तुमच्या कडे ज्या  topic चे teaching Aids असतील किंवा photo ते gallery मध्य save करून ठेवा किंवा You Tube वरचा  video असेल तो downlod करा t तो video gallery मध्ये जाऊन वरती 3 dot येतील तेथे mute option येईल त्याला click करून mute करा
2)  Video Show नावाचा aps Download करा व aps open केल्यावर Edit video मध्ये जा
3) मग तुमच्या कडे असलेले teaching Aidsचे photo किंवा downlode केलेला video uplode करा
4) नंतर खाली  Edit ला clik करून त्या त्या त्या photo,व video च्या खाली हवे ते points 📍SUBtitle मध्ये जाऊन decoration  करून देऊ शकतात
5) सर्व points देऊन झाल्यावर Sound मध्ये जा,🎙Voiceover ला click करा
6)खाली  चांदणी व 🎙 दिसतोय त्या पैकी आधी चांदणी ला click करून🎙 याला cilck करा आणि तुमचा आवाज द्या.🎙 तुमचा sound देताना आजू बाजूला शांतता ठेवा,किंवा बंद रुम मध्ये रेकॉर्ड करा
7) नंतर वरती✅ या मार्क ला clik करा व  वरती EXPORT ला click करून save to gallery ला क्लिक करा व नंतर HD mode मध्य uplode करा आणि तुमचा
Educational video तुमच्या आवाजात तयार होईल,
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
आशा प्रकारे तुम्ही तुमचा Education video तयार करू शकतात


शिक्षकाने Mobile च्या साह्यानेVideo कसा बनवायचा📲📲🎥
आज अनेक शिक्षक शाळेत  वर्गात वेगवेगळ्या प्रकारचे videos बनवत असतात.परंतु ते व्हिडिओ व्यवस्थित edit किंवा नाव,विषय टाकून बनवता येत नाही. मग त्यासाठी कोणते aps वापरणे गरजेचे आहे?
आज playstore वर अनेक प्रकारचे aps आहेत,पण त्यातील सर्वात उत्तम  aps म्हणजे (Video show)  हे aps सिंगापूर देशाचे असून पूर्णपणे सुरक्षित व HD+ Quality च आहे
    ✅वापर कसा करावा✅
1) सर्व प्रथम aps downlod करणे
2) सर्व permission allow करणे
3) Edit video मध्ये जा
4)तुम्ही mobile मधून shoot केलेला                    video किंवा photo त्यात टाका
5) नंतर खाली तुम्हाला Theme  - sound-edit- setting असे ऑप्शन येतील
6) Theme मध्ये जाऊन हवी ती थीम सिलेक्ट करून टाकू शकतात( 100 प्रकारच्या theme आहेत)
7) Sound मध्ये जाऊन  music ला क्लिक करा वरती My music ला क्लिक करून तुमच्या मोबाइल मध्ये किंवा हवे ते song downlode करून select करा. Time फिट करा
8) हेडिंग, नावं टाकायचे असेल किंवा मेसेज द्यायचा असेल तर Edit या वर clik करा,त्यात sub title ला click करून हव्या त्या  कलर fonts व sticker मध्ये टाकू शकतात.तसेच जर तुम्हला फुलांचा पाऊस, चांदण्या पडताना ,आग लागताना, प्रकाश चमकताना दाखवायचे असेल effect ला क्लिक करा आणि हवा तो effect select करा
8) setting मध्ये जाऊन  time fix ठेवू शकतात
9)  video तयार झाल्यावर वरती लाल अक्षरात EXPORT ला क्लिक करा नंत save to gallery ला click करा व हव्या त्या normal, HD mode मध्ये अपलोड करा
10) शेवटी हवा त्याला तो तुम्ही share करा
तर आशा प्रकारे मोबाईल च्या साहयाने तुम्ही सर्वात उत्तम video बनवू शकतात
तर try करा आजच,आणि स्वतः video बनवा

Google फॉर्म कसा तयार करायचा

Google फॉर्म कसा तयार करायचा♻   
1) Google फॉर्म  बनवताना सर्व प्रथम आपला Gmail असणे गरजेचे आहे  
2)  Chrome ऍप्स ओपन करावे
3) Google form असे टाईप करावे  
4)  Google Forms - create या वर क्लिक करावे 
5)  फॉर्म ओपन झाल्यावर  Untitled form वर तुमचा aim  किंवा subject type करावे 
6)  नंतर Untited question वर तुमचा प्रश्न टाईप करवा  ⚫ multiple choice वर क्लीक करावे त्यावर  तुम्हाला पर्याय येतील short answer, paragraph, multiple choice ,त्यापैकी एक निवडावा  
7)  पुन्हा question बनवण्यासाठी खाली + या  सिम्बॉल वर क्लिक करत जावे ,तुमचे सर्व प्रश्न type करून झाल्यावर खाली  required वर क्लिक करावे 
8)  नंतर फॉर्म च्या वरती 3 डॉट दिसतील त्याला क्लिक करून preview वर क्लिक करावे
9)  submit वर क्लिक करून  तुमचा फॉर्म तयार होईल
10)  तुम्ही फॉर्म कसा बनवला आहे हे बगण्यासाठी back जाऊन वरती  >  या वर क्लिक करून ती लिंक तुम्ही कोणालाही whatsapp , G-mail, facebook,twitter किंवा इतरवर सेंट करू शकतात 🔴 🔵.⚫ 
 किती जणांनी तुमचा फॉर्म भरलाय हे फक्त तुम्हीच response मद्य जाऊन चेक करू शकतात,

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

मराठी भाषा NAS वर आधारित ऑनलाइन Test* इयत्ता दुसरी ते आठवी

NAS / SLAS सराव प्रश्नपत्रिका
NAS EXAM - 2021 साठी विद्यार्थ्यांनी सरावाकरिता मागील वर्षांच्या वर्गनिहाय नमुना प्रश्नपत्रिका Download करण्याकरिता खालील दिलेल्या वर्गवार क्लिक करावे आणि प्रश्नपत्रिका Download कराव्यात..!!


इयत्ता - 3री प्रश्नपत्रिका

इयत्ता - 5वी प्रश्नपत्रिका

इयत्ता - 8वी प्रश्नपत्रिका

मराठी भाषा ऑनलाइन Test* इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी NAS वर आधारित प्रश्न


https://forms.gle/6Rbbs92DT8t233S88
(टेस्ट सोडविण्यासाठी टेस्ट क्रमांक वर किंवा चित्र खालील लिंकवर क्लिक करावे )


https://forms.gle/VHaCSxxAtRaCPyue9


https://drive.google.com/uc?export=download&id=1d4QcBUneVi35zqBs6twUzIM-ItYDfpop


https://drive.google.com/uc?export=download&id=10deJLq1yGDZ9omWdjnOCF1EF-dropi80

https://forms.gle/VHaCSxxAtRaCPyue9



https://forms.gle/VHaCSxxAtRaCPyue9


NAS 3 std

NAS 8 std


इयत्ता-तिसरी

२०१७-१८ प्रश्नपत्रिका pdf file

NAS काय आहे?

NAS म्हणजे *National Achievement Survey*
याला *राष्ट्रीय संपादणुक चाचणी/सर्वेक्षण* असेही म्हणतात..
या वर्षीच्या (2017) च्या सर्वेक्षणासाठी आपल्या शाळांची/ वर्गांची निवड केली आहे. *हि निवड NCERT यांनी Random (यादृच्छिक) पद्धतीने केली आहे*
दि. 13 नोव्हेंबर 2017 रोजी संपूर्ण देशामध्ये एकाच दिवशी हे सर्वेक्षण होणार आहे.
सर्वेक्षणात इ. 3 री, 5 वी आणि 8 वी या इयत्तांचा समावेश असेल.
वरील तीनही वर्गांसाठी एक चाचणी होणार आहे, चाचणीतील प्रश्न पर्यायी (multiple choice questions) प्रकारातील असतील-
🎯 *चाचणी चे स्वरूप खालील प्रमाणे असेल?*
इयत्ता 3 री, 5 वी:-
भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित 45 प्रश्न (वेळ 90 मिनिट)
इयत्ता 8 वी:-
भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित 60 प्रश्न (वेळ 120 मिनिट)
🎯 *पर्यवेक्षण कोण करणार?*
SCERT/ DIECPD व जि.प. यांच्याकडून आपल्या वर्गासाठी पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आपणांस त्याला फक्त सहकार्य करायचे आहे. वर्गाचे पर्यवेक्षण पर्यवेक्षक करतील तर तालुक्यावर काही खास अधिकारी निरीक्षक म्हणून असतील, त्यांचे एक भरारी पथक असेल.
🎯 *उत्तरपत्रिका कोण तपासणार?*
प्रत्येक उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाणार आहे. यासाठी राज्यावर स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. पर्यवेक्षक चाचणी संपल्यावर पर्यवेक्षक सर्व उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका सीलबंद पॅकेट मध्ये घालून पुढील यंत्रनेकडे पाठवतील
🎯 *मुख्याध्यापक/ वर्गशिक्षक म्हणून आपली भूमिका काय?*
-- सीलबंद चाचणी प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका जिल्हा/तालुका स्तरावरून ताब्यात घेणे
-- चाचणीच्या दिवशी ( रोजी) आपल्याला संबधित वर्गाची उपस्थिती 100% ठेवायची आहे.
-- वर्गातील सर्व मुलांचे आधार नंबर एका कागदावर लिहून घेऊन आपल्या दप्तरी ठेवायचे आहेत. ज्यांच्याकडे आधार नसतील त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आधार काढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे.

NCERT BOOKS and CBSE BOOKS

NCERT BOOKS and CBSE BOOKS LINK

1 st to 12 th standred books
NCERT
NCERT BOOKS and CBSE BOOKS

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

जागतिक पुस्तक/कॉपीराइट दिवस


जागतिक पुस्तक/कॉपीराइट दिवस
२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिन. याच दिवसाला पुस्तक दिन म्हटलं जातं.

२३ एप्रिलच का?
विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात. शेक्सपिअर यांचा जन्म व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख. जन्मगाव व मृत्यूगावही एकच. जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं गाव एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला. शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे. लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती (प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. 38 नाटकं व 154 कविता ही त्यांची लेखन संपदा. 38 नाटकांपैकी 10 नाटके ऐतिहासिक, 16 नाटके सुखात्मक व 12 नाटकं शोकात्मक. शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ठ्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.
कॉपीराइट म्हणजे काय?

कॉपीराइट कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

                     📕📓 *पुस्तकं*📔📒

पुस्तके  स्वप्नात येतात आणि विचारतात,
'तू आम्हास ओळखले कां?'
बोलता बोलता पुस्तके वितळतात
आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात
'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'
पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
आणि विचारात ,
'आमची फळे खाल्लीस कां
छायेत कधी विसावलास कां?'
पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात
नि विचारतात ,
'श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलेस कां?'
पुस्तके असेच काही विचारीत राहतात
एकामागून एक.
प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.
तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
नि म्हणतात ,
'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'
पुस्तके मूक होतात,
झुरत जातात,
स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
शेवटी आत्महत्या करतात ती-
घरातल्या घरात,
बंद कपाटाच्या कारागृहात...
*शंकर वैद्य*

वाचनाचं महत्त्व?
वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी.जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा केला जात आहे. युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1995मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणे.  वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी , म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.,
सहज होणारे वाचन आणि जाणीवपूर्व केले जाणारे वाचन, असे वाचनाचे दोन प्रमुख प्रकार मानले तर, सहज होणारे वाचन हे एकेकाळी केवळ वृत्तपत्र वाचनापुरते मर्यादित होते ते आता मोबाइल, इंटरनेटमुळे सोशल मीडियाकडे वळलेले आहे. जाणीवपूर्वक केले जाणारे वाचन, म्हणजे पुस्तकांचे, ग्रथांचे वाचन करणारांची संख्या तुलनेने कायमच कमी होती आणि आहे; तरीही मराठीतला ग्रंथ व्यवहार आज करोडो रुपयांचा आहे, शेकडो प्रकाशक आहेत आणि हजारो लेखक आहेत. सहज केल्या जाणाऱ्या वाचनाच्या स्वरूपात इंटरनेटमुळे जो क्रांतिकारी बदल गेल्या दशकभरात झालेला आहे, तसाच तो पुढील दशकात पुस्तक व्यवहारातही होऊ घातलेला आहे. म्हणूनच जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आजचा आणि आगामी काळातला पुस्तक व्यवहार, ई-बुक्स, भविष्यात पुस्तकांच्या बदलणार असलेल्या संकल्पना आहेत.
पु. ल. देशपांडे म्हणतात पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइस्क्रीम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली, तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या या पदार्थाचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यर्थ्यांच्या मनात पुस्तकासंबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पाठय़पुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही; नाही वाचलं तर नापास होऊ या भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे; तो म्हणजे ते पुस्तक ‘पाठय़पुस्तक आहे’ अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात की, आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का? साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा.
(‘रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका’मधून साभार)

📒📔 पुस्तक दिन
मीच ग्रंथ,मीच पोथी,
मीच पुस्तक शेवटी

झालो सखा मी 
मानवाचा
भूक त्याची गोमटी
तोच माझा जन्मदाता
तो पिता अन सोबती

पर्ण होते,ताल वृक्षा
रस फुलांचा काढुनी
रेखिले मजवरी जे,ते
 ठेविले जतन करुनी 

एक नव्हे बहुत ऐसे
एकमेका बांधुनी
निर्मितीचा आनंद घेई
पुस्तकाला साकारूनी

प्रिय झालो बहू जनांना
मग रक्षिले मज आदरे
अग्नी अन जला पासून
दूर तयांनी ठेविले

रूप माझे बदलले
झालो अधिक की गुणी
उपकार त्याचे फेडण्यास
करण्यास त्याला शतगुणी

साथ नाही सोडली 
 माझी तयाने आजही
दिव्य रूप देऊनी
ठेविले मज भ्रमणध्वनी

भेटतो तो क्षणोक्षणी
हाक मारी गुगल म्हणुनी
 हा भुकेला तृप्त होई
पुस्तके बहू वाचूनी

नाही आता प्रगट रूपे
सूक्ष्म रुपी राहिलो
परी सखा मी आजही ना
तुझ्या सोबती राहिलो

विसरलास नाहीच म्हणुनी
तुही झालास समृद्ध रे
सांग तुझ्या आज्यास आता
रूप माझे वेगळे

जन्मो जन्मीची मैत्री
कशी मोजावी नकळे
सांगतो मी तुम्हाला
प्रिय माझे रूप आगळे
(सौ.आरती आठवले)

📒📔 पुस्तकांशी मैत्री

रस्त्याच्या दुतर्फा जशी झाडे
सावली देतात वाटसरूंना
प्रवासात सोबत करतात सुखाची
जीवन होते समृद्ध पुस्तक वाचताना

जीवनाच्या अथांग सागरात पोहताना
पानोपानी पुस्तकांच्या सापडतो राजमार्ग 
संकटांशी दोन हात करताना
सुकर होतो जीवनाचा महामार्ग

वाचाल तर वाचाल
पुस्तक वाचनाकडे वळा
जीवनाच्या भूईवर
फुलवा ज्ञानाचा मळा

       प्रा.जाई म्हात्रे

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

इ.४थी. गणित Online Test

*१)भौमितिक आकृत्त्या*
    📥👇🏻👇🏻
     https://bit.ly/34HwYMF
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️    
*२)  संख्याज्ञान*
      📥 👇🏻👇🏻
    https://bit.ly/3bk6QK4
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 *३)विस्तारीत रूप*
    📥 👇🏻👇🏻
     https://bit.ly/3biip4v
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*४)  स्थानीक किंमत*
📥👇🏻👇🏻    
 https://bit.ly/3aieuDB
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 *५)  लहान मोठी संख्या* 
   📥👇🏻👇🏻 
 https://bit.ly/2Vgcx6n
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️    
 *६) लगतची पुढची मागची संख्या*
   📥👇🏻👇🏻        
 https://bit.ly/34IQ0Ca
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️      
*७) चढता उतरता क्रम*   
  📥👇🏻👇🏻    
 https://bit.ly/2Kb2lFQ
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*८) आंतरराष्ट्रीय  व देव नागरी संख्या चिन्हे*
    📥👇🏻👇🏻        
 https://bit.ly/2XIxsAu
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*९) बेरीज करा.*
   📥👇🏻👇🏻     
 https://bit.ly/2xEo8mA
 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️     
*१०)  वजाबाकी करा.*
      📥👇🏻👇🏻           
 https://bit.ly/3cs7vcH
 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️         
*११) गुणाकार करा.भाग १*
📥👇🏻👇🏻    
   https://bit.ly/2RQZ7eT
  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️   
*१२) भागाकार भाग १*
 📥👇🏻👇🏻  
  https://bit.ly/2VhybHo
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️      
*१३)   नाणी व नोटा*
  📥👇🏻👇🏻   
https://bit.ly/2Vi7m5Y
  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️       
*१४)  कालमापन*
   📥👇🏻👇🏻
 https://bit.ly/2VE61W6
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*१५)  दिनदर्शिका*
 📥👇🏻👇🏻   
 https://bit.ly/2ViYU6k
 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️  
 *१६) शाब्दीक उदाहरणे बेरीज वजाबाकी*
📥👇🏻👇🏻 
https://bit.ly/3aiYTDT
 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 
*१७)अपूर्णांक*
📥👇🏻👇🏻 
   https://bit.ly/2yxLPwX
  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️    
*१८) मापन ( लांबी)*
📥👇🏻👇🏻 
https://bit.ly/2VG7Lhv
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*१९ )  मापन (वजन)*
  📥👇🏻👇🏻 https://bit.ly/3bnihRx
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*२०)  मापन  ( धारकता)*
  📥👇🏻👇🏻 https://bit.ly/2XQu6f6
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️              
*२१ परिमिती व क्षेत्रफळ*
    📥👇🏻👇🏻 https://bit.ly/2ysuXIc
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*२२)   गुणाकार    भाग २*
     📥👇🏻👇🏻👇🏻 
   https://bit.ly/2XO7X0H
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
  *२३) भागाकार करा.*
  📥👇🏻👇🏻  https://bit.ly/2VKGXwu


घरीच मनोरंजक पद्धतीने अभ्यास

Grammar व्याकरण 


1) Connect the blocks to form meaningful sentence.
https://pschool.in/activity/sequence
2) Select the action word in the below sentence.
https://pschool.in/activity/selectWord

Quick Math इंग्रजीतुन 


Clock घड्याळ इंग्रजीतुन 

लोगो बनविणे

लोगो बनविणे


 मित्रांनो नमस्कार,

LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....
🎯 प्रथम Google play store वरून किंवा अन्य कोठुन पण Pics Art
हे app घ्या.

🎯 pics art  open करा

🎯Draw हे option निवडा.
🎯 Blank हे option निवडा
🎯Canvas Size निवडा

🎯🔺⚪ या option मधून ⚪(वर्तुळ)  घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.

🎯 drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.

🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch  करून ok करा.

🎯 A-Text निवडा.
Matter type करा. तुम्हाला जो हवा असेल.
उदा - जि. प.प्राथमिक शाळा.......
नंतर  color select करा.

🎯 खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap  हवे तसे set करा.

🎯 Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.

🎯 तुमचा LOGO तयार.🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

आपले व्यवसायिक

आपले व्यवसायिक
परिसरातील व्यवसाय कारागीरांची माहिती घेऊया
(१) शेतकरी -
---  शेतकरी ही शेती करणारी व्यक्ती असते. शेतकरी अनेक प्रकारची धान्ये पिकवतो. 
     भात, कापूस,भुईमूग ,ऊस  व  ताग ,भाजीपाला यांची लागवड करतो.
(२) कुंभार -
---   कुंभार ओल्या मातीपासून सुरईमाठ, खुजे, रांजणकुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो.
(३) सुतार --
---  सुतार लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.दरवाजे, खिडक्या, कपाटे, खुर्च्या वगैरे लाकडाच्या वस्तू तयार करतो.
(४) गवंडी --
---  गवंडी घरासाठी विटांच्या भिंती रचतो. हातात थापी, ओळंबा आणि रंधा घेऊन गवंडी काम करतात. दरजा भरणे, गिलावा करणे ही कामे गवंडी करतो.

(५) शिंपी –
--- शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. शिंपी निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे शिवतो. भारतातील शिंप्यांची उपकरणे म्हणजे कात्री, सुया आणि गज. गजाने कापड मोजणे, दोरीने ग्राहकाची मापे घेणे, कात्रीने कपडा कापणे आणि सुई-दो-याने शिवणे. 
(६) शिक्षक --
 --- शिक्षक विद्यार्थी घडवणे . मुलांना शिकवून त्यांना ज्ञान देतात . शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक .  गुरु ,मास्तर ,गुरुजी ,बाई ,सर ,ताई आणि मॅडम असेही म्हणतात. 
(७) डाॅक्टर –
 
---   वैद्य ह्या मराठी शब्दाचे इंग्रजी समानार्थी रूप डॉक्टर. वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे ज्ञान असून रोग्यांवर त्या पद्धतीने औषधोपचार करणारा भिषग्वर. 
डाॅक्टर आजारी लोकांना औषध देऊन बरे करतात.
(८) चांभार –
---  बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.चांभार चामड्याच्या बॅगा बनवतो.
(९) सोनार –
 
---   सोनार सोन्या - चांदीचे निरनिराळे दागिने बनवतो. सोनार म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार हा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणार्‍या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. पारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड,फुंकणी, इ. हत्यारे वापरली जात असत.
(१०) बुरूड --
--- बुरूड समाजाचा बांबूच्या विणकामाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुबक कलाकुसर. टोपल्या, पंखे, सुपे, डोबूल, परड्या इतर वस्तू ह्या बुरूड समाजातील व्यक्ती सराईतपणे सुंदर विणतात, वस्तू तयार करतात.बुरूड बांबू , गवत यांच्या चट्या व तट्टे तयार करतो.
(११) विणकर  (कोष्टी ) –
 
---   विणकर  (कोष्टी ) हातमाग व यंत्रमाग यांवर  कापड विणतो. धाग्यांपासून कापड बनविणाऱ्या कारागिरास विणकर असे नामाभिधान आहे. हा व्यवसाय मूळ बारा बलुतेदारांपैकी एक आहे. सुत कातणे हे काम स्त्रियांकडे तर वस्त्र विणणे हे पुरूषाचे काम होते.
(१२) लोहार –

---   लोहार कडी -कोयंडे, कोयते इत्यादी लोखंडाच्या वस्तू तयार करतो. लोहार म्हणजे 
लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत. तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची/ बागकामाची अवजारे उदा. विळे, कोयते, खुरपी, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे,बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव,पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, घमेली, खिडक्यांचे गज इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.

आगामी झालेले