नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, ३ जुलै, २०२१

जागतिक प्लॅस्टिक पिशवी(बॅग) मुक्ती दिन World Plastic Bag Emancipation Day

 जागतिक प्लॅस्टिक पिशवी(बॅग) मुक्ती दिन....

World Plastic Bag Emancipation Day



अनेक गुरे वासरे हे रस्त्यावरील प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडत आहेत. संपूर्ण जलसृष्टी या प्लास्टिक मुळे धोक्यात आली आहे. प्लास्टिक व त्यात असलेल्या विषारी रसायनांमुळे समुद्री जीव गुदमरून जात आहेत, आणि काही संशोधनामुळे हे पण सिद्ध झाले आहे की प्लास्टिकचे सुक्षम बारीक बारीक कण आपल्या पिण्याच्या पाण्यात व अन्न पदार्थात मिसळू लागले आहेत.

हे प्लास्टिकचे प्रदूषण रोखले नाही गेले तर मानवी जीवनातस खूप मोठा धोका आहे. आज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी ही काळाची गरज बनली आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे या सजीवसृष्टीचा त्रास होऊ लागला आहे.

प्लास्टिक

कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणार तेल प्रथम शुद्ध करून घ्याव लागत. त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते. 

प्लास्टिक प्रदूषण   

शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.  

समुद्री जीवनावर प्लास्टिकचा प्रभाव 


प्लास्टिक बॅग, अन्य प्लास्टिक कण तसेच पाण्याच्या बाटल्या हवा तथा पाणी द्वारे समुद्र आणि महासागरात पोहोचतात. पाण्यामध्ये हे कण मिसळल्याने समुद्रामधील पाणी दूषित होते आणि जर हे प्लास्टिक चे कण मासे, कासव आणि अन्य समृद्धी जीवांचा पोटात गेले तर त्यांच्या मृत्यू होतो. दरवर्षी कितीतरी समुद्री जीव प्लास्टिकमुळे मारले जातात. 

मनुष्य व प्राण्यांवर प्लास्टिकचा प्रभाव


समुद्रातील प्राण्यांप्रमाणेच प्लास्टिक प्रदूषण मनुष्य व धरतीवर राहणाऱ्या प्राण्यांनाही हानीकारक आहे. प्लास्टिक मध्ये असलेले कचरा अन्न समजून खाल्ल्याने दरवर्षी हजारो पशूंची मृत्यू होते. हे प्लास्टिक त्यांच्या आतड्यांमध्ये अडकून जाते. वेळेनुसार प्लास्टिक कचरा अधिक खराब होत जातो. त्यामुळे त्यात डास, माश्या आणि दुसऱ्या प्रकारचे किडे तयार व्हायला लागतात. या मुळे माणसामध्ये रोगराई पसरते.

प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या

प्रथम हे समजणे खूप महत्त्वाचे आहे की प्लास्टिक ही एक अत्यंत उपयुक्त सामग्री आहे. प्लास्टिकचे उत्पादन करणे सोपे आहे, ते स्वस्त आहे आणि खूप सारे उद्योग प्लास्टिकचा वापर कुठल्या ना कुठल्या रूपांमध्ये करतात. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात आणि उद्योगांमध्येही प्लास्टिकचा वापर केला जातो.

काही उद्योगांमध्ये प्लास्टिक बंदी लगेचच लागू करता येणार नाही उदा. रिटेल, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स. परंतु लँडफिल, नद्यांमध्ये आणि महासागरांमध्ये प्लास्टिक जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकच्या मर्यादित वापर आणि प्लास्टिक बंदी उपयोगी पडू शकते. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक ज्याचा पुनर्वापर करता येत नाही अर्थात पीईटी बाटल्या, प्लास्टिक फोम कंटेनर, कॅरी बॅग इत्यादी. हे प्लास्टिक लँडफिल, नद्या आणि समुद्रांमध्ये जाते जे पर्यावरणाला प्रदूषित करते आणि शेवटी आपल्या अन्नात येते. 

भारत दररोज 25940 टन प्लास्टिक तयार करतो त्यातील दिवसाला 10300 टन संकलन होत नाही. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि कोलकाता ही शहरे सर्वाधिक प्लास्टिक कचरा उत्पादक आहेत. प्लास्टिक कचरा ही एक जागतिक समस्या आहे; जागतिक स्तरावर 6.3 अब्ज टन प्लास्टिक कचरा साचला जातो, त्यातील 79% प्लास्टिकचा आणि कचरा जमीन आणि नैसर्गिक वातावरणात जमतो. दरडोई सर्वाधिक म्हणजे 109 किलो प्लास्टिकचा वापर अमेरिकेत होतो. दुसऱ्या नंबरवर चीन आहे जे प्रति व्यक्ती 38 किलो प्लास्टिक वापरतात आणि तिसर्‍या स्थानावर आपण भारतीय दरडोई 11 किलो प्लास्टिक वापरतो. (संदर्भः इकॉनॉमिकटाइम्स.कॉम).

भारतात, सिक्कीम राज्य कचरा व्यवस्थापनात अग्रेसर आहे. 1998 पासून ते यावर काम करत आहेत. सिक्किम हे सेंद्रिय उत्पादनांमध्येही अव्वल राज्य आहे. सिक्कीम हे एक छोटेसे राज्य आहे, म्हणून तेथे कार्य केलेले धोरण उच्च औद्योगिक आणि भौगोलिकदृष्ट्या मोठ्या राज्यांमध्ये जसे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान करेलच असे नाही. पण पण बाकी राज्यांना सिक्किम कडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी नक्कीच आहेत.

देशोदेशी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

डेन्मार्कमध्ये २००३ पासून प्लास्टिक पिशव्यांवर रिटेलर्ससाठी कर

वेल्समध्ये २०११ ऑक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवर शुल्क

इटलीमध्ये २०११पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

जर्मनीमध्ये दुकानदारांसाठी प्लास्टिक पिशव्यांवर पुनíनमाणासाठी शुल्क

इंग्लडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शुल्क

अमेरिकेत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

आर्यलडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर

मेक्सिकोत २०१० पासून दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दंड

ऑस्ट्रेलियात काही ठिकाणी अति पातळ पिशव्या वापरण्यास बंदी

द.आफ्रिकेत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी व शुल्क

चीनमध्ये २००८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

बांगलादेशमध्ये २००२ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

फ्रान्समध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दुकानदारांकडून शुल्क

बेल्जियममध्ये २००७ पासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर

कविता-

अगं माये अरे भाऊ नका प्लास्टिक वापरू

नका नका प्लास्टिक वापरू , अगं माये अरे भा

पिशवीमंदी कचरा भरून नको फेकून तू देवू

गुरंढोरं कचरा खाती, प्लास्टिक पोटा मंदी 

चारा नाही त्यांच्या पोटी, प्लास्टिकचा गोळा हो

प्लास्टिक होत जिथं गोळा पाण्या नाही देत वा

धरित्री ना घेई पोटी, खत नाही पीक भे

समिंदरा प्लास्टिक जाता तरास होतो जल

मासे, प्राणी मुकं जीव त्यांचा विचार करा जरा

प्लास्टिकला तू दूर कर, मनापासनं दे न

तुझ्याकडे शहाणपण ठेवू नको तू गहा

वापर तू कागद कापड आपलसं त्यास 

देवा दिले तुले मग तेचा कर तू सन्मा

मुंबई नगरी आपली माय तिला ठेवू सांभा

प्रत्येकानं ठरवू मनी प्लास्टिकला नाही 

संकलित माहिती


1 टिप्पणी:

लक्षवेधी म्हणाले...

महत्वपूर्ण माहिती आपण या लेखाव्दारे दिली .💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले