नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

दादासाहेब गायकवाड Bhaurao Gaikwad

दादासाहेब गायकवाड (भारतीय सामाजिक कार्यकर्ते)
पूर्ण नाव : भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड 
 जन्म : १५ ऑक्टोबर १९०२ (दिंडोरी) 
 मृत्यू : २९ डिसेंबर १९७१ (नवी दिल्ली)
नागरिकत्व : भारतीय
पक्ष : भारतीय रिपब्लिकन पक्ष
पद : राज्यसभा सदस्य

पुरस्कार : सामाजिक कार्यामध्ये पद्मश्री (इ.स. १९६८) दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.

♨️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड, नाशिक सामाजिक कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. मार्च २, इ.स. १९३०च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.
अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे स्वतः दलित समाजातून आले असल्याने दलितांच्या व्यथा व त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना या गोष्टींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. म्हणूनच दलित समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्रसमितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते.

🌀 धर्मांतर
१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

⚜️ राजकीय कारकीर्द
इ.स. १९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर इ.स. १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. इ.स. १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते.

🔮 रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व
भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती.
१९३७ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते अनुक्रमे १९५७ ते १९६२ आणि १९६२ ते १९६८ सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता.
सन २००१-०२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली.

📚 चरित्रे/गौरवग्रंथ
दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---

’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.

’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’—लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले

दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.

अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ

भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.

दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.

🎖️ पुरस्कार व सन्मान
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना' या नावाची एक योजना २००४ पासून आहे. २०१२ साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
भारत सरकारने गायकवाडांना १९६८ मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
मुंबईत अंधेरीभागात 'दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र' नावाची संस्था आहे.
दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

स्त्रोतपर माहिती 

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे Tatyasaheb Kore


सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे Tatyasaheb Kore
(सहकार महर्षितथा स्वातंत्र्य सैनिक)

जन्म : १७ आॕक्टोबर १९१४
मृत्यू : १३ डिसेंबर १९९४

वारणा नगरी म्हणजे एका सामान्य माणसाचं पाहिलेलं स्वप्न लोक म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नाही, परंतु याच उत्तम उदाहरण म्हणजे वारणा नगरी एवढी मोठी वारणानगरी वसवणे म्हणजे चेष्टा नव्हे आज वारणा नगरीचे नाव पंचक्रोशीत गाजत आहे. त्याचे विधाते म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. तात्यासाहेब कोरे यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९१४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आण्णासाहेब व आईचे नाव भागीरथी असे होते, प्लेगच्या साथीमुळे तात्यासाहेबांच्या आई त्यांच्या लहानपणीच वारल्या कृष्णा काकूनी त्यांचा सांभाळ केला. १९२१ साली त्यांना कोडोली प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. संख्या, लेखन, आणि अंकगणित हे तात्यासाहेबांच्या आवडीचे विषय तात्यासाहेब लहानपणापासूनच मेहनत व अथक परिश्रम करत होते. जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी विद्यानगरी उभारली त्यांचे गुरुवर्य रामचंद्र राजमाने यांनी त्यांना अनुशासन आणि आदर्श वर्तन याच्या सोबत खेळ आणि शिक्षेची जीवन मूल्य शिकवली गुरुजी श्रीधरपंत कुलकर्णी यांनी त्यांना संस्कृत इंग्रजी मराठीचे ज्ञान दिलं गुरु जणांकडून राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, सुख, त्याग याची समर्पकता तात्यासाहेबांना समजली. १९२९ पासून तात्यासाहेबांचे शिक्षण सांगलीत झाले. तिथे त्यांची मैत्री केशवराव पाटील कामेरी, डॉक्टर मगदूम आणि बी. ए. चौगुले यांच्याशी झाली परंतु म्हणतात ना कधीकधी जबाबदारी आपली परीक्षा घेते तसं काहीच तात्यासाहेबांच झालं, जबाबदारीमुळे त्यांना शिक्षण सोडून परंपरागत तराजू घेऊन घरचा व्यवसाय सांभाळायला लागला.
घरची जबाबदारी खांद्यावर असतानाच विसाव्या वर्षी म्हणजेच २२ डिसेंबर १९३४ मध्ये बेडग गावच्या वीर संगाप्पा आवटी यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी तात्यासाहेब यांचा विवाह झाला. तात्यासाहेबांच्या म्हणण्यानुसार सावित्रीबाई अत्यंत समजूतदार सुसंस्कृत मनमिळावू होत्या, ते सावित्रीबाईंना प्रोफेसर असेही म्हणत. सावित्रीबाई वर्षातून दोन ते तीन मुलं आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत या कारणामुळे त्यांना सगळे आक्का म्हणत असत. तात्यासाहेबांनी सन १९४२ साली भारत छोडो आणि चले जाओ आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. इन्कलाब जिंदाबाद करेंगे या मरेंगे परंतु चाळीस करोड लोक नाही दबणार अशा घोषणा सुद्धा दिल्या. वारणा नदीकाठचा डाग मळा तात्यासाहेबांनी भूमिगत कार्यकर्ते व प्रतिसरकार चालवण्यासाठी दिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत पुढे तात्यासाहेबांनी गांधीजी व साने गुरुजी यांच्या तत्वावर चालण्याचा निर्णय घेतला.
सन १९५१ मध्ये गुळाच्या व्यवसायात होणारा तोटा चिंताजनक होता यादरम्यान शेतकरी सहकारी संघ यांचे तात्यासाहेब मोहिते यांचा सहकारी साखर कारखाना तात्यासाहेबांनी पाहिला त्याची माहिती घेतली. त्यांना समजलं परंपरागत शेतीपेक्षा शास्त्रीय व आधुनिक यांत्रिक शेती करणे गरजेचे आहे. बाजारात गुळा पेक्षा साखरेला जास्त किंमत आहे. सन १९५२ मध्ये तात्यासाहेबांनी गावागावात घराघरात जाऊन कारखान्यासाठी सभासद तयार केले. या कार्यात लोकांचा चांगला सहभाग त्यांना मिळाला, आणि सहकारी तत्त्वावर तात्यासाहेबांनी कारखाना सुरू केला. दिनांक २६ ऑगस्ट १९५४ साली वारणानगर ची निर्मिती झाली. अनेक संकटांना सामोरे जात परदेशातून तात्यासाहेबांनी यंत्रसामग्री मिळवली. कारखान्याचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ १६ फेब्रुवारी १९५९ ला सावित्री अक्कांच्या शुभहस्ते हा समारंभ झाला. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा होता. हा तात्यासाहेबांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. या दरम्यान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्या हस्ते यंत्रसामग्रीची पूजा केली. आणि वारणा सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ झाला.
तात्यासाहेबांनी १९६४ मध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि २० जून १९६४ च्या दिवशी प्राचार्य भा.शं. भणगे यांच्या हस्ते शारदा पूजन करून वारणा महाविद्यालयाचा शुभारंभ केला. १२८ विद्यार्थी आणि १२ शिक्षक यांच्यासमवेत या महाविद्यालयालाचा शुभारंभ झाला. यावरून तात्यासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. आज वारणेच्या मुलांना जवळ शिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे क्लर्क पासून कलेक्टर पर्यंत मुलांनी झेप घेतली, तात्यासाहेबांनी सर्वप्रथम उच्च शिक्षणाची सोय केली. आज सुद्धा वारणामहाविद्यालय तात्यासाहेबांच्या तत्त्वावर कार्य करत आहे. वारणा साखर कारखाना व महाविद्यालयाच्या स्थापने नंतर रोजगार करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून १९६९ मध्ये तात्यासाहेबांनी वारणा विद्यामंदिर ची स्थापना केली. कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी व गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावेत, म्हणून तात्यांनी वारणा सहकारी बँकेची स्थापना केली. घरातल्या महिलांना सुद्धा काम मिळावं म्हणून जनावरांपासून मिळणारे दूध विकून त्यांना चार पैसे मिळावे. या हेतूने तात्यासाहेबांनी २० जुलै १९६८ रोजी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि., ची स्थापना केली.
सावित्री आक्कांच्या म्हणण्यानुसार येथील महिलांना सुद्धा घरबसल्या काम मिळावे, म्हणून वारणा भगिनी मंडळ व महिला गृह उद्योग लिज्जत पापड केंद्र १९७४ ला सुरू केले. याच हेतूने लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जावं लागू नये म्हणून १९७६ मध्ये वारणा ग्राहक मंडळ म्हणजेच वारणा बजार ची स्थापना केली. १९८३ मध्ये आय.टी.आय कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज तर १९८४ मध्ये ट्रेनिंग आणि प्रोडक्शन सेंटर सोबतच कुकुट पालन केंद्र व महात्मा गांधी हॉस्पिटल सुरू केले. त्यांनी साखर कारखान्या सोबतच अन्य मुख्य लघु तथा सहायक उद्योग सुरू केले, तात्यासाहेबांचे स्वप्न होतं की आपल्या माणसांनी इथेच मेहनत करावी, इथेच कमवा व इथेच खर्चावा अर्थात इथे जो पैसा येईल तो इथेच राहावा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे जावे लागू नये. रोजगारासाठी भटकंती होऊ नये, व सर्वांचे जीवन सुखकर व सोयीस्कर व्हावे या विचाराने तात्यासाहेबांनी या संस्थांची स्थापना केली.
आणि अखेर १३ डिसेंबर १९९४ रोजी या महामावाची प्राणज्योत मावळली. आजही १३ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन मोठ्या समारंभाने साजरा केला जातो. विद्यमान आमदार आणि तात्यांसाहेबांचे नातू डॉ. विनयरावजी कोरे सावकर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, कृषिप्रदर्शन या आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात आजही वारणा समूहाशी संबंधित शंभर हून अधिक गावातून लोक पहाटेचा अंधार चिरत हातात मशाली घेऊन तात्यांच्या स्मृतींचा जागर करत येतात, म्हणतात तात्यासाहेब कोरे अमर रहे! अमर रहे! अमर रहे! तात्यासाहेब कोरे अमर रहे!

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 विनम्र अभिवादन🙏

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

क्रांतिकारक वीर भागोजी नाईक Bhagoji Naik


क्रांतिकारक वीर भागोजी नाईक Bhagoji Naik 

वीरमरण : ११ नोव्हेंबर १८५९
भारताचा स्वातंत्र्यलढा अनेक शूरवीरांनी लढला. देशासाठी कित्येकांनी प्राण सांडले. मात्र इतिहासाने यातील प्रत्येकाची नावे आपल्या पर्यंत पोहचवलीच असे नाही. अशाच अज्ञात क्रांतीवीरामध्ये नाव येतं भागोजी नाईक यांचं.

भागोजी नाईक यांचा जन्म १८०४ साली नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे इथे एका भिल्ल कुटुंबात झाला. त्यांचे वडील कोतवाल होते मात्र घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं. शिक्षण घेण्याची ऐपत नव्हतीच, भागोजी लहानपणापासून आपल्या सोबत्यांच्या बरोबर गुरे राखायला जायचे.

रानावनात भटकताना काठी फिरवणे, तीरकमठा चालवणे अशा कलांमध्ये ते पारंगत झाले. एकदा त्यांच्या कळपातील एका वासरावर वाघाने हल्ला चढवला. त्याचे रक्षण करण्यासाठी भागोजी वाघावर चालून गेले. फक्त कुऱ्हाडीच्या जोरावर त्यांनी वाघ मारला. त्यांच्या या शौर्याचं कौतुक पंचक्रोशीत पसरलं.

वाघ मारणाऱ्या या तरुणाला इंग्रज कंपनी सरकारने पोलिसात नोकरी दिली.

रानावनात स्वातंत्र्य प्यायलेले भागोजी ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या नोकरीत फार काळ टिकणे शक्य नव्हते. नगर इथे अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांचा वरिष्ठांशी वाद झाला. ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या लढ्याच्या कहाण्या भागोजींनी ऐकल्या होत्या, आणि आपल्याच लोकांच्या विरोधात कारवाई करणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला मानवत नव्हते.

‘भागोजी क्रांतीकारकांना साहाय्य करतो’, असा संशय इंग्रज अधिकार्‍याना येऊ लागला. त्यांनी त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावून बडतर्फ केले.

*भागोजी तुरुंगातून बाहेर पडले ते स्वातंत्र्याची शपथ घेऊनच.* अकोले, संगमनेर, सिन्नर, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्लांनी केलेल्या उठावाचे प्रेरणास्थान होण्यात भागोजी नाईकांचे नाव आघाडीवर होते. युध्द करणे त्यातही इंग्रजांसारख्या बलशाली शत्रूबरोबर युध्द करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी मनुष्यबळ, आर्थिकबळ, शस्त्रास्त्रे नियोजन, सावधपणा यांची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भागोजीने तशी तयारी केली.

अठराशे सत्तावन्नचा हा धगधगता काळ. संपूर्ण देशात इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष पसरला होता. ठिकठिकाणी उठाव होत होते.

भागोजी नाईक यांनी इतर ठिकाणी उठावाच्यादृष्टीने ज्या हालचाली सुरू होत्या, त्यांच्याशी संपर्क वाढवला. निजाम राज्यातून काही मदत मिळवली. याच काळात खान्देशात ब्रिटीश विरोधात काजीसिंगने (कजरसिंग) उठाव केला होता. सुरूवातीच्या काळात ब्रिटीशांनी या हालचालीकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही.

भिल्ल कोळ्यांचा उठाव म्हणून ब्रिटीशांनी याकडे सुरवातीला दुर्लक्ष केले, याचा फटका त्यांना बसला.

भागोजी नाईक यांनी राहुरी पर्यंत आपला विस्तार वाढवला. अनेक क्रांतिकारी युवक त्यांना सामील झाले. त्यांच्या कारवाया वाढलेल्या पाहून इंग्रजांनी त्यांच्यावर कारवाई करायचे ठरवले.

या आदिवासी वीराचा बंदोबस्त करण्यासाठी ४ ऑक्टोबर १८५७ रोजी ब्रिटीश सुपरिटेंडेंट जेम्स विल्यम हेन्री निघाला. त्याच्याबरोबर टेलर आणि थँकर यांच्या हुकूमतीखालील फलटणी होत्या.

नांदूर शिंगोटय़ाजवळ भागोजी नाईक आणि ब्रिटीश सैन्यात लढाई सुरू झाली. पहिली चकमक नांदूर शिंगोटय़ामधील टेकडय़ात झाली. त्यावेळी हेन्रीने भागोजीला शरण येण्यासाठी निरोप पाठविला. परंतु स्वातंत्र्य मिळवण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीने प्रेरित झालेल्या भागोजीने तो निरोप धुडकावून लावला. भागोजीचा नकार ऐकताच हेन्रीने जोराची चढाई केली. झालेल्या चकमकीत प्रथम हेन्रीचा घोडा भागोजीच्या बंदुकीला बळी पडला. त्यामुळे भागोजीच्या सैन्यात जोम निर्माण झाला. भागोजीने मारलेल्या दुसऱ्या गोळीला हेन्री बळी पडला. थँकरने आपल्या दोन्ही फलटणीसह माघार घेतली.

*हेन्री जिथे मारला गेला तिथे त्याच्या पत्नीने समाधी उभारली आहे.*

हेन्रीच्या सेनेचा पराभव केल्यावर भागोजींच्या सहकाऱ्यांमध्ये आणि सैन्यात उत्साह वाढला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर ठिकाणच्या भिल्लांनीही उठाव केला. राहुरी भागातील पाथर्जी नाईक यांनी देखील उठाव केला.

यामुळे पिसाळलेले इंग्रज भागोजींच्या मागावर होते. त्यांनी भागोजीचा भाऊ महिपती आणि नंतर मुलगा यशवंत असे कुटुंबातील प्रमुख ठार केले पण तरीही भागोजी नाईकांनी क्रांतीची मशाल खाली ठेवली नाही. इंग्रजांच्या बरोबर त्यांच्या तीन लढाया झाल्या.

अखेरची लढाई सिन्नर तालुक्यातील मिठसागरे, पंचाळे व सांगवी या भागात झाली. समोरासमोरच्या लढाईत इंग्रजांना भागोजीवर विजय मिळविणे शक्य नव्हते आणि याचा त्यांना आधीच अंदाज आला होता. म्हणूनच त्यांनी फितूरीचा मार्ग अवलंबला. पंचाळेतील पाटलाने मिठसागरे येथील इंग्रज अधिकारी फ्रँक सुटर याला भागोजी नाईक पंचाळेत असल्याची खबर दिली. इंग्रजांनी रात्रीतून पंचाळेला वेढा दिला.

*११ नोव्हेंबर १८५९ ची ती काळरात्र*

खंडेराव काळे यांच्च्या घरात लपलेल्या भागोजीना कल्पनाच नव्हती की आपल्याला इंग्रज सेनेने संपूर्णपणे वेढले आहे. ते घरातून बाहेर पडले आणि इंग्रज सैनिकांनी थेट गोळीबार सुरु केला. इंग्रजांना प्रतिउत्तर देत स्वतःचा जीव वाचवत भागोजी नाईक व त्यांचे साथीदार सांगवीच्या दिशेने निघाले.

सांगवी इथल्या देवनदी व गोदावरीच्या संगमावर घनघोर युद्ध झाले. या युद्धात इंग्रजांच्या गोळीने भागोजींचा ठाव घेतला. त्यांना वीरमरण आले. भागोजींच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले व त्यांची समाधी उभारली.

भागोजी नाईकां ची समाधी उभारली म्हणून इंग्रजांनी सांगवीकरांचा प्रचंड छळ केला. त्यांनी आपल्या क्रांतीविरासाठी हि लढाई लढली म्हणूनच सांगवीला लढाईची सांगवी म्हटले जाऊ लागले. पुराच्या तडाख्यात या समाधीचेही प्रचंड नुकसान झाले होते पण सांगवीमधील तरुणांनी त्यांचा डागडुजी करून आणली.

इतिहास भागोजी नाईकांच्या शौर्याला विसरला मात्र सांगवीच्या ग्रामस्थांनी हा ठेवा जपला. आजही गोदावरीच्या संगमावर हि समाधी उभी आहे.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷

स्त्रोत~ bolbhidu.com

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

कर्मवीर भाऊसाहेब हिरे Bhausaheb Hire


कर्मवीर भाऊसाहेब हिरे Bhausaheb Hire
(स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक)
स्मृतीदिन : ६ नोव्हेंबर १९६१

भाऊसाहेब हिरे हे मराठी समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ते निवडणुकांमध्ये मालेगाव किंवा दाभाडी मतदारसंघातुन निवडून गेले. भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रिपदे भूषविली. भाऊसाहेब हिरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय मोलाचे योगदान आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील क्रांतिकारी कूळ कायद्याचे ते जनक होते. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते जनक होते.
*'सत्य'शोधक समतेचे पुजारी:कर्मवीर भाऊसाहेब हिरे*
छत्रपती शिवरायांपासून सुरू झालेला बहुजन हिताचा बहुजन सुखाचा महायज्ञ पुढे महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहु महाराज, रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख सारख्या समाजधुरीनांनी, महान विभूतींनी, आपल्या अहर्निश कार्यकर्तुत्वाने अखंडपणे प्रज्वलित ठेवला. त्यावर लोभाची, लाभाची, स्वार्थाची, अर्थाची, जातीची, नातीची वा अनितीची राख साचू दिली नाही. म्हणून तर वर्ष्यानुवर्षं मुक्या समजल्या जाणाऱ्या समाजाला आवाज मिळाला. शोषित, पीडित समाजाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, अज्ञानाच्या जोखडातून मुक्त झाला.

*बहुजन उद्धाराची ही लोकचळवळ जातीसाठी नाही तर मानवजातीच्या उत्थानासाठी होती . मन माणूस आणि मानवजातीच्या हितासाठी आपल्या व्यक्तिगत सुखाला तिलांजली देत समाजासाठी आपल्या आयुष्याची या पवित्र महायज्ञात आहुती देणारे अनेक पुण्यात्मे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आहेत*.ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली अशा पुण्यपुरुषांमध्ये ज्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते ते म्हणजे नाशिक जिल्ह्यात असलेल्या मालेगाव तालुक्यातील *निमगाव या छोट्या खेड्यात जन्मलेले मोठया कर्तृत्वाचे* बहुजनउद्धारक जे पुढे महाराष्ट्राला ,देशाला कुळकायद्याचे जनक, शिक्षण, सहकार महर्षी म्हणून परिचित झालेले कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याशिवाय बहुजन चळवळ पूर्ण होऊ शकत नाही.कर्मवीरांनी या चळवळीला नवी दिशा दिली गती दिली आणि ही चळवळ एका उंचीवर नेऊन ठेवली.

कै.सखाराम पाटील या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन *नाशिक जिल्ह्यातुन बहुजन समाजात प्रथम श्रेणीत एल एल बी उत्तीर्ण होण्याचा मान या कुणब्याच्या पोरानं मिळवला होता.* शेतीवर गायगुजरान करणाऱ्या कुटूंबात उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याकारणाने कधी सावकाराकडून तर कधी आपल्या धर्मपत्नी रेणुकाबाई तसेच मातोश्री झेलाबाई यांनी अतिरिक्त काबाडकष्ट करून साचवलेल्या पैशातून आपली ज्ञानपीपासा ज्ञानलालसा भाऊरावला पूर्ण करावी लागली होती. *खरेतर आपल्या मातोश्रीच्या कमरेला असलेली पिशवी हीच भाऊसाहेबांच्या शिक्षणासाठी अर्थपुरवठा करणारी पहिली बँक ठरली असे म्हटले तर वावगे ठरू नये.*

भाऊसाहेब ज्या परिस्थितीतुन पुढे आले,लढले घडले त्या परिस्थितीची,समाजाची जाणीव कर्मवीर भाऊसाहेबांनी जीवनाच्या अंतापर्यंत ठेवली. म्हणून तर एल.एल. बी होताच बहुजन समाजातील कामकरी, कष्टकरी, शेतकरी लोकांसाठी कधी फुकट तर कधी पावशेर बाजरीच्या तर कधी शेरभर बाजरीच्या मोबदल्यात केस लढवण्यास सुरुवात केली. खरेतर वकिली व्यवसायातील पांढरपेशा समाजात ही खूपच हास्यास्पद बाब होती म्हणून तर *भाऊसाहेबांची पावशेर,शेरभर बाजरीच्या मोबदल्यात केस लढवणारा वकील म्हणून टिंगल केली जायची.* भाऊसाहेबांनी असल्या क्षुल्लक तजन्य गोष्टींकडे कधी लक्ष दिले नाही. समाजाशी असलेली बांधिलकी कधी ढळू दिली नाही

*बहुजन चळवळ ही लोकहितासाठी होती,ती न्याय,स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या तत्वावर उभी राहिलेली होती. माणूस हा तिच्या कार्याचा केंद्रबिंदू होता किंबहुना या उदात्त हेतुपुर्तीसाठीच तीचा जन्म झाला होता.* आजच्या संधीसाधू, सत्तापिपासू, सत्तांध राजकारणाच्या वावटळीत तीच्या मूळ तत्वांची धूळधाण होतांना दिसत आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, व्यक्तिगत हित, लाभ, लोभासाठी जातीचा, धर्माचा आधार घेत लोकभ्रम वाढवून समाजाला अक्षरशः वेठीस धरले जात आहे,बहुजन समाजाची दिशाभूल केली जात आहे. *समाजापेक्षा नेता महत्वाचा वाटू लागला आहे समाजहितापेक्षा व्यक्तिगत हित जपले जात आहे. समतेच्या मशाली पेटवल्या जात आहे मात्र प्रकाश सर्वत्र विषमतेचा पडताना जाणवत आहे. विषमतेच्या बीजाला समतेची फळ तरी कशी बरं लागतील? ज्या पुण्यभूमीत कर्मवीरांसारख्या महापुरुषाने समतेची बीज रोवली त्या भूमीत राजकीय स्वार्थासाठी विषमतेवर आधारित नेतृत्व वाढली. फोफावली ही बहुजन समाजासाठी चिंतेची अन चिंतनाची बाब झाली आहे

म्हणून तर आज कर्मवीरांसारख्या सत्तेपेक्षा सत्याच्या शोधार्थ आयुष्य पणाला लावणाऱ्या एका मानवतेच्या, समतेच्या पुजाऱ्याच्या जन्मदिनी त्यांच्या समताधिष्ठित कार्याची आठवण येणं त्याचे पुन्हा स्मरण गरजेचं झालं आहे.त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळलेल्या अनेक क्षेत्रांपैकी मी आज फक्त एकाच पैलूवर भाष्य करत आहे. *ते म्हणजे समता आणि मानवता.* या नाशिक जिल्ह्यात समतेचा पाया सर्वप्रथम कोणी घातला असेल तर तो कर्मवीर भाऊसाहेब हिरे या लोकोत्तर पुरुषानेच...

देश पारतंत्र्यात असतांना समाज अशिक्षित असतांना वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1925 साली आपल्या जन्मगावी सत्यशोधक चळवळींचा प्रचार प्रसार सुरू केला. प.पू.ठक्कर बाप्पा यांच्या आदेशानुसार 1941-42 साली मालेगाव येथील सौदाने या गावी आदिवासी शाळा तसेच छत्रालय सुरू केले. एवढेच नव्हे 1945 साली आदिवासी सेवा समितीची स्थापना करून या वंचित, शोषित पीडित समाजाच्या चंद्रमौळी झोपडीत ज्ञानाचा प्रकाश पाडून वर्षानुवर्षाचा अंधार दूर करण्याचे महान कार्य करणाऱ्या या समतेच्या सात्विक पुजाऱ्याच्या भूमीत स्वार्थी, सत्तांध लोकांनी विषमतेची बीज रोवून सत्तेची फळं चाखण्याचा दुर्दैवी आत्मघातकी प्रकार केला आणि *समता* फक्त राजकारणात सोयीने वापरला जाणारा एक गुळगुळीत शब्द मात्र राहून गेला. सत्यशोधक समाजाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुलेंनी फार पूर्वीच म्हटले होते की,

*आनंद करावा।। भांडू नये*
*धर्म,राज्य भेद मानवा नसावे*

*सत्याने वर्तावे ईशासाठी।* लोकराजा सयाजीराव गायकवाड , कर्मवीर भाऊसाहेब हिरे या पुण्यपुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत बहुजन हिताय, बहुजन सुखाय तर जाऊ द्या मात्र गेल्या दोन तीन दशकात शेती, शिक्षण, सिंचन, सहकार, तसेच न्याय, बंधुता, समता या तत्वांचा जणू विसरच पडत चालला आहे की काय असे वाटू लागले आहे. याचे राहून राहून दुःखही होते. मनाला अनंत यातनाही होतात. सारेकाही दिसत असून समजत असून मुकदर्शक बनून फक्त बघ्याची भूमिकेमुळे आपल्याला निष्क्रियतेचा आपमतलबीपणाचा शाप लागतो की काय याची भीती येथील संवेदनशील जनमानसाला वाटू लागली आहे.

या जिल्ह्याचा, तसेच मालेगाव तालुक्यातील राजकारणाचा हा काय दैवदुर्विलास म्हणवा की ज्या भाऊसाहेब हिरेंनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी लोकांच्या मनात परस्पर विश्वास निर्माण व्हावा म्हणून जाणीवपूर्वक मुस्लिमबहुल ठिकाणी म्हणजेच मामलेदार गल्लीत आपला संसार थाटला. दोन धर्मीयांत कधी कटुता येऊ दिली नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करत राहिले, त्यांच्या या कार्यामुळे लोकांना भाऊसाहेब *मसीहा* वाटू लागले होते. परंतु *याच मानवतेच्या उपासकाच्या भूमीत त्यांचाच लोकहिताचा, मानवतेचा दिव्य वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक वारशाचा शेवट एका धार्मिक दंगलीतून व्हावा* यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असणार या तालुक्याचे ! पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली झाले असे जे म्हटले जाते ते हेच का? असा प्रश्न पडतो.

हे ही कमी की काय जातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीसाठी कार्य करणाऱ्या समतेच्या पुजाऱ्याच्या सामाजिक कार्याचा शेवटही जातीय अभिनिवेशातून व्हावा. *समतेच हेलीकॉप्टर आकाशात गिरक्या घेत घेत आपली दिशा चुकलं,भरकटल आणि विषमतेच्या राजकीय टोळीत अदृश्य झालं* परिणामी पुन्हा एकदा सामाजिक समरतेचे कैवारी कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या बहुजन हिताच्या कार्याला खीळ बसली. याचे शल्य आजही या लोकहितावादी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. कर्मवीरांच्या तसेच, लोकनेत्यांच्या जयंती वा पुण्यतिथीच्या निमित्ताने तर ही जाणीव अधिकच तीव्र होत जाते, *पुण्याचे भागीदार होण्याचे भाग्य आमच्या पिढीच्या वाटेला आलेच नाही मात्र पापाचे साक्षीदार होण्याचे नाहक दुर्भाग्य आमच्या वाटेला आले असे नाइलाजाने म्हणावेसे वाटते* कदाचित चंगळवादी तमोगुणाच्या अतिरेकी वृत्तीमुळे, मतलबीपणाच्या संकुचिंत मनोवृत्तीमुळे, सामाजिक, राजकीय जीवनातील प्रत्येक घडामोडींबाबत उदासीनता बाळगत निष्क्रियता दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्या तालुक्यातील भावी पिढीचे भवितव्य अंधकारमय होत आहे हे मात्र नक्की, म्हणून कर्मवीरांच्या कार्याचा विचारांचा जागर करणं अगत्याचे झाले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की *,"समाज शिक्षित झाल्याशिवाय खरी लोकशाही तसेच लोकशाहीची मूल्य सत्यात येणार नाही"* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारख्या ज्ञानतपस्वीची ही भावना किती यथार्थ होती याची जाणीव आज प्रकर्षाने होत आहे. मात्र कर्मवीर भाऊसाहेब हिरे नावाच्या शिक्षणतपस्वी ने या लोकशिक्षणाचे महत्व फार पूर्वीच जाणले होते म्हणूनच *जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ प्रदेशात(धुळे,ठाणे,डांग कुलाबा) जवळ जवळ पंधराशे व्हॉलेंटरी शाळा,दोन हजार शिक्षक आणि पंचेचाळीस हजार विद्यार्थी अशी एक लोकशिक्षणाची जणू एक चळवळच उभारून टाकली होती* एवढेच नव्हे तर ग्रामीण शिक्षणाची सुरुवात करून असंख्य शाळा सुरू केल्या. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे तेव्हाही सत्य होते ते आजही सत्य आहे.
कधी जातीच्या, कधी धर्माच्या नावावर राजकारण करून माणसे, मने दुभंगवून, कधी गरीबीचे, कधी सामान्यपणाचे सोंग ढोंग करून करोडोची माया जमवणाऱ्या *राजकीय भोप्यांनी* राजकारणाचा स्तर इतका निम्न पातळीवर आणून सोडला आहे की, कर्मवीरांसारख्या महापुरुषाचे तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार लोकहिताचे कार्य करणाऱ्या लोकहितवादी, तत्वनिष्ठ राजकीय लोकांचे जीवन आणि कार्य नव्या पिढीसमोर मांडताना, समजावून देताना किती दमछाक होते हे न बोललेलच बरं. माणसा -माणसात, घराघरात, भावा-भावात समाजा-समाजात, गावा-गावात भांडणे लावून राजकारण करण्याचा कपाळकरेंटपणा जनतेच्या नशिबी येणं हे किती वेदनादायी आहे ! आणि याच हलकट, हेकट, रोगट सत्ता, पदासाठी लापट राजकीय प्रवृत्तीमुळे सभ्य, सत्वशील, कृतीशील लोकांना *नको ते राजकारण म्हणण्याच्या स्थितीपर्यंत आणून सोडले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते*

यासंदर्भात मला कर्मवीर भाऊसाहेबांचा एक प्रसंग सांगावासा वाटतो,मालेगाव मतदारसंघात 1957 च्या निवडणुकीत भाऊसाहेबांच्या विरोधात *वऱ्हाणे येथील कौतीक आनंदा पवार हे उभे होते* भाऊसाहेब प्रचाराच्या निमित्ताने वऱ्हाणे गावी गेले असता लोकांसमोर प्रश्न पडला की,मतदान कोणाला करावे आपल्याच गावातील उमेदवाराला की लोकहितार्थ कार्य करणाऱ्या भाऊसाहेब हिरेंना? लोकांच्या मनातील द्विधा भाऊसाहेबांनी ओळखली. गावातील लोकांसमोर भाषण करतांना भाऊसाहेब म्हणाले, " लोकहो! निवडणुका येतात, निवडणुका जातात. मात्र गाव सदैव राहील, तुम्हाला एकमेकांशिवाय पर्याय नाही,म्हणून गावात सलोखा राहिला पाहिजे, एकमेकांत राजकारणामुळे कटुता यायला नको, गावातील लोकांमध्ये वितृष्टता येऊ द्यायची नसेल तर तुम्ही कौतिक आनंदा पवार यांनाच मतदान करावं अशी माझी इच्छा आहे.

*आपल्या प्रतिस्पर्ध्याला मतदान करा हे सांगण्याचे औदार्य दाखवणाऱ्या भाऊसाहेबांसारख्या विशाल हृदयाच्या राजकारण्याच्या भूमीत फोडा फोडी, तोडा तोडी, झोडा झोडी, पाडा पाडी करून राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या भंपक राजकारण्यांनी भाऊसाहेब वाचावे, समजून घ्यावे* जेणेकरून आपल्या उर्वरित आयुष्याला अन भावी पिढीच्या उज्वल भविष्याला चालना तरी मिळेल, काही दिशा बोध तरी होईल.

समर्पित वृत्तीने बहुजन हितासाठी आयुष्य झिझवणाऱ्या, या कर्मयोग्याच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा या जिल्ह्यात, तालुक्यात विकासाचे, समताधिष्ठित लोककल्याणाचे बहुजन हिताचे, बहुजन सुखाचे वारे वाहू लागोत. *सत्तेच्या शोधात सत्व विकणाऱ्या संकोचिंत मनोवृत्तीच्या राजकीय नेतृत्वापेक्षा 'सत्य'शोधनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या नव्या नेतृत्वाची,सत्यशोधक समाजाची मंगलकामना करूयात. *थोडीशी पानगळ झाली म्हणून झाडाचे अस्तित्व संपत नाही, काहिक्षण ढग आडवे आल्याने सूर्य झाकोळून गेला म्हणून सूर्याचे तेजाळण, उगवण थांबत थांबत नाही, स्वार्थप्रेरीत राजकारणात अनेक भरती, लाटा येतात आणि जातात, लाटा कीतीही प्रचंड असू देत मात्र एकदिवस त्या ओसरतातच, त्यांना ओहोटी लागतेच* ...मात्र पुरुषार्थाने लोकहितासाठी केलेली लोककल्याणकारी महद कार्य विशाल समुद्रासारखी धीरगंभीरपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. कर्मवीर भाऊसाहेबांसारख्या थोर पुरुषांची कार्य अशा प्रकारची आहेत.

त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नव्या विचाराने,नव्या जोमाने, नव्या उर्मीने समाजहितासाठी झटत राहणं त्यातून सदैव स्फुर्ती घेऊन कर्मनिष्ठा जपत राहणं हेच सुखी,संपन्न,उन्नत सुरक्षित समाजासाठी आज गरजेचं झालं आहे. म्हणून *कर्मवीर भाऊसाहेब हिरे या समतेच्या पुजाऱ्याची जयंती म्हणजे बहुजन हिताच्या उन्नती, विकासाचा,सामाजिक समरसतेचा,समतेचा एक आनंद सोहळा म्हणून साजरा करूयात.*

प्रा. अनिल देवरे

*"कर्मवीर भाऊसाहेब हिरे: महाराष्ट्राच्या पायाभरणीचे दिव्यकर्तृत्व"*

" इ.स. २०व्या शतकाच्या पुर्वाधित ज्या थोर पुरुषांनी बहुजन समाजाची मनोभावे सेवा करुन भारतास उन्नती पथावर आणण्याचे सफल प्रयत्न केलेत त्यामध्ये भाऊसाहेब हिरे यांची गणना इतिहास अवश्य करील. महाराष्ट्राच्या राजकारणात भाऊसाहेब हिऱ्याप्रमाणे चमकून गेले. - (चिंतामणराव देशमुख.)

महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वतःच्या स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या दुरदृष्टी, राजकारणातील सैद्धांतिक कळवळ, निस्सीम देशभक्ती, मराठी मातीचा लळा, अनुशासन, वैचारिक अधिष्ठान, कष्टकरी, शेतकरी, बारा बलुतेदार व सामान्य माणसांच्या हिताची काळजी करनारे लोकोत्तर नेतृत्व म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे होय!

"प्रतिष्ठा यत्र विद्याया: शीलस्यच श्रमस्यच |
उन्नते: शिखर राष्ट्रं तत्प्राप्नोति न संशय:||"

यानुसार आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात हिमालयाच्या उंचीचे अफाट कर्तृत्व गाजवलेल्या या महान कर्मवीरांनी विद्येला, चारित्र्याला आणि श्रमाला शोषीतांच्या जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देत त्यांच्या जीवनात नवसंजीवनी फुलविण्याबरोबर 'कर्मण्येवाधिकारस्तू' या सुत्राने सदैव कार्यरत राहत सामाजिक चळवळ, राजकारण, सहकार, शिक्षण, अर्थकारण, कृषी, जलसिंचन व उद्योग यांमाध्यमातून महाराष्ट्र राज्याला उन्नतीच्या शिखरावर नेऊन पोहचविण्यात बहुमुल्य गौरवशाली कामगिरी बजावली.

अंधाराला हरवणारी स्फूर्तीज्योत व तेजसुर्य कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा जन्म ०१ मार्च १९०५ रोजी निमगाव (ता.मालेगाव) येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला कर्मवीर चिकाटी, सचोटी व दुर्दम्य महत्वकांक्षा या जोरावर नाशिक येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत असताना नाशिक हे क्रांतिकारकांच्या कटकारस्थानाचे शक्तिशाली केंद्र होते या सर्व घटनांच्या परिणामांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची आस असलेल्या भाऊसाहेबांना स्वातंत्र्यसंग्रामात ओढले. स्वातंत्र्यासाठी कठोर तरुंगवास भोगला. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचना व त्यातून संयुक्त महाराष्ट्राचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी स्वतःचे राजकीय अस्तित्व पणाला लावून दिल्ली दरबारी न झुकता मराठी मातीचा लळा असलेल्या या स्वाभिमानी व प्रामाणिक नेतृत्वाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सुवर्ण अक्षरात स्वकर्तृत्वाचा चिरस्मरणीय ठसा उमटवला व यानंतर महाराष्ट्र राज्याची विकासात्मक पायाभरणी करत असताना या तेजोमय कर्मवीर लोकनेत्याने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला जमीनदारांच्या व जुलमी सावकारांच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी ऐतिहासिक कायदा(Tenancy Act) मंजूर करून मराठी जनमानसात नवचैतन्य फुलविले. महाराष्ट्रातील अज्ञानाच्या गर्तेत अडकलेल्या बहुजन समाजाच्या भवितव्याला कलाटणी देण्यासाठी तत्कालीन शिक्षणाचा एकाधिकार हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या उच्चभ्रु लोकांकडेच एकटवलेला होता त्याला तडा देत त्यांचे स्वामित्व संपुष्टात आणीत; संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानप्रकाश पसरविण्याचा अविरत झपाटा लावला. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या माध्यमांतून कर्मवीर भाऊसाहेबांनी बहुजन-हरिजन-गिरीजन ते सामान्यातील सर्वसामान्यांचे जीवन उजळून टाकीत राष्ट्रलोककल्याणाचे महान कार्य उभारले. यांतून अनेक शिक्षक, इंजीनिअर, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, समाजसेवक, राजकारणी, पत्रकार,उद्योजक, कलाकार असे अनेक रत्न घडले.यानंतर या महान कार्यसम्राट लोकराजाने शेतकरीपुत्र या नात्याने शेतकऱ्यांचे कैवारी होत त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सहकाराचा मूलमंत्र दिला. या माध्यमातून खासकरून नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी निफाड सहकारी कारखाना, गिरणा सहकारी साखर कारखाना,नाशिक जिल्हा सहकारी बँक, नाशिक जिल्हा कृषी-औद्योगिक संघ, तालुका शेतकरी संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांसारख्या अनेक सहकारी संस्थांचे जाळे विणून कोयना, गिरणा व झाडी धरणांची निर्मिती केली.यासर्वांचा परिपाक म्हणजे नाशिक जिल्हा विकासाच्या बाबतीत या दुरदर्शी नेतृत्वाच्या प्रज्वल कामगिरीमुळे उज्वल होऊन सर्वच आघाड्यांवर पुढारला गेला. स्वयंप्रकाशित, क्रांतिकारी, सामान्यातील सामान्यांचे अफाट उर्जाकेंद्र, मातीशी इमान राखनारे नेतृत्व...भुमीपुत्रात चैतन्य निर्माण करणारे कर्तृत्व...निस्वार्थ लोकसेवेमुळे खान्देशच्या मातीत जन्मलेल्या या महामानवाच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र चंदनाप्रमाणे दरवळत आहे. दुःखाच्या मुलखातील प्रकाशयात्री ठरलेल्या या महान कर्मवीरांचा खालील पंक्तीत यथार्थ महिमा गाइला जावू शकतो:

"ज्ञानाचे गाणे, सुर्याची भाषा
तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा.
बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने;
घरे मोडकी उभी राहिली तुमच्याच आधाराने"
महाराष्ट्राच्या पायाभरणीचे दिव्यकर्तृत्व ठरलेल्या
 चंदनाच्या वासे । तरु चंदन जाले स्पर्शे॥

अशा नवसृष्टीच्या भाग्यविधात्यास विनम्र अभिवादन!!!!!! ---- प्रा.हिरालाल नरवाडे.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌷🙏

स्त्रोतपर माहिती

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

भुलाबाईची गाणी Bhulabai Songs


भुलाबाईची गाणी Bhulabai Songs 
(संकलित माहिती)
महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात. महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला, हादगा विदर्भात भुलाबाई च्या रूपात साजरा होतो.

भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.

भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपऱ्या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
या गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.
गणपतीच्या आगमनानंतर भुलजा-भुलाबाई येतात. १६ वर्षांखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. हयामध्ये शिव-शक्तीच्या पुजेकरिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृशी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते. भुलाबाई हा सृजनाचा विधी असतो. भुलजा-भुलाबाईला पाटावर बसवतात व ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर त्यांच्या भौवती ठेवतात. त्यांना पिवळे वस्त्र चढवितात. हा कुळाचार आहे. शेजारी अन्नाच्या ढिगार्‍यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे.

विदर्भातील हा लोककथा-गीत कला प्रकार फार मजेशीर आहे. या उत्सवा मध्ये ज्यांच्या घरी भूलाबाई बसतात त्यांच्या घरी शेजारच्या मुली गोळा होतात. आणि भुलाबाई समोर बसून मजेशीर गाणी म्हणतात. या उत्सवामध्ये ज्यांच्या घरी भुलाबाई बसतात ते घर म्हणजे भुलाबाईच माहेर आणि ज्या मुली गाणी म्हणतात त्या मुलींना जणू काही भुलाबाईने आपल्या सासुरवासाच्या सर्व कथा तेथील त्रास, आनंद सगळा स्वत: प्रत्यक्ष सांगितला आहे. आणि या मुली भुलाबाईच्या प्रतिनिधी म्हणून जणू काही सगळयांना त्या कथा गीतांद्वारे सांगत आहे असे वाटते. या लोककथा-गीत कला प्रकारात कुठल्या ही प्रकारचे वाद्य वाजविले जात नाही, परंतु मुली एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन ही गाणी म्हणतात. व ती खूपच दूतगतीने म्हटली जातात.

१….

पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ

ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे

भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार

एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली

सरपा आड लपली

सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय

चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली

तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या

थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या

जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे

२….

आपे दूssध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुssलाबाई

साखळ्यांचा जोड
कशी लेऊ दादा
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा कssरपली

नंदा गं लपली
नंदाचा बैल

डोलत येईल

सोन्याच कारलं

झेलत येईल

३….

घरावर घर बत्तीस घर

इतका कारागीर कोणाचा

भुलोजी च्या राणीचा

भूलोजीची राणी

भरत होती पाणी

धावा धावा कोणी

धावतील तिचे दोनी

दोनी गेले ताकाला

विंचू चावला नाकाला

४….

नंदा भावजया दोघी जणी

दोघी जणी

घरात नाही तिसर कोणी

तिसर कोणी

शिक्यातल लोणी खाल्ल कोणी

तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी

आता माझे दादा येतील गं येतील गं

दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं

दादाची बायको चोट्टी चोट्टी

असू दे माझी चोट्टी चोट्टी

घे काठी लगाव काठी

घरा घराची लक्ष्मी मोठी

५….

काळा कोळसा झुकझुक पाना

पालखीत बसला भुलोजी राणा

भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले

सारे पिंपळ एक पान

एक पान दरबारी

दुसर पान शेजारी

शेजाऱ्याचा डामा डुमा

वाजतो तसा वाजू द्या

आम्हाला खेळ मांडू द्या

खेळात सापडली लगोरी

लगोरी गेली वाण्याला

वाण्या वाण्या सोपा दे

सोपा माझ्या गाईला

गाई गाई दुध दे

दुध माझ्या बगळ्याला

बगळ्या बगळ्या गोंडे दे

(गोंडे माझ्या राज्याला)

तेच गोंडे लेऊ सासर जाऊ

सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे

पंढरीच्या वाटे नारळ फुटे

६….

नदीच्या काठी राळा पेरला

बाई राळा पेरला

एके दिवशी काऊ आला

बाई काऊ आला

एकच कणीस तोडून नेल

बाई तोडून नेल

सईच्या अंगणात टाकून दिल

बाई टाकून दिल

सईन उचलून घरात नेल

बाई घरात नेल

कांडून कुंडून राळा केला

बाई राळा केला

राळा घेऊन बाजारात गेली

बाई बाजारात गेली

चार पैशाची घागर आणली

बाई घागर आणली

घागर घेऊन पाण्याला गेली

बाई पाण्याला गेली

मधल्या बोटाला विंचू चावला

बाई विंचू चावला

७….

आला गं सासरचा वैद्दय

हातात काठी जळक लाकूड

पायात जोडा फाटका तुटका

नेसायचं धोतर फाटक तुटक

अंगात सदरा मळलेला

डोक्यात टोपी फाटकी तुटकी

तोंडात विडा शेणाचा

कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी

गं बाई म्हायरावाणी

आला गं माहेरचा वैद्दय

हातात काठी पंचरंगी

पायात जोडा पुण्यशाई

नेसायचं धोतर जरीकाठी

अंगात सदरा मलमलचा

डोक्यात टोपी भरजरी

तोंडात विडा लालेला

कसा गं दिसतो बाई राजावाणी

गं बाई राजावाणी

८….

सा बाई सू sss सा बाई सू sss

बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू

कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी

खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी

काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय

कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर

डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल माझ्या पार्वतीलाss पार्वतीला

९….

काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी

जाईच तेल आणू कशी आणू कss शी

जाईच तेल आणल आणल

सासूबाईच न्हाण झाल

वन्साबाईची वेणी झाली

मामाजीची शेंडी झाली

उरलेलं तेल झाकून ठेवलं

रानोबाचा पाय पडला

सासूबाई सासूबाई अन्न द्या

दुधभात जेवायला द्या

आमच उष्ट तुम्ही खा

विडा घेऊन खेळायला जा

१०….

आमचे मामा व्यापारी व्यापारी

तोंडात चिक्कण सुपारी सुपारी

सुपारी काही फुटेना फुटेना

मामा काही उठेना उठेना

सुपारी गेले गडगडत गडगडत

मामा आले बडबडत बडबडत

सुपारी गेली फुटून फुटून

मामा आले उठून उठून

११….

अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई

जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई

गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई

रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई

करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई

तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई

शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई

खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई

कोंडू कोंडू मारीते …


१२….

कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला

मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला

दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला

जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला

वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला

भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला

पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही

आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा

आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा

१३….

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी

सासूरवाशीण सून घरात येना कैसी

सासू गेली समजावयाला

चला चला सुनबाई अपुल्या घराला

मी नाही यायची तुमच्या घराला

माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला

तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला

मी नाही यायची तुमच्या घराला

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी

सासरे गेले समजावयाला

चला चला सुनबाई अपुल्या घराला

मी नाही यायची तुमच्या घराला

माझी घोडागाडी देतो तुम्हाला

तुमची घोडागाडी नको मजला

मी नाही यायची तुमच्या घराला

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी

सासूरवाशीण सून घरात येना कैसी

………………………….

………………………

………………. …………………

पतीराज गेले समजावयाला

चला चला राणीसाहेब अपुल्या घराला

माझा लाल चाबूक देतो तुम्हाला

तुमचा लाल चाबूक हवा मजला

मी तर यायची अपुल्या घराला

यादवरा या राणी घरात आली कैसी

१४….

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला

हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

..................................................

.................................................


१५….

झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई

चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई

कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

………………………………

.........................................

झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई

चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई

कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

पतीराज पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

१६….

पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

चिंचा बहुत लागल्या

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।१।।

...........................................

दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

पेरू बहुत लागले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।२।।

.................................................

तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

संत्री बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।३।।

..................................................

चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

मोसंबी बहुत पिकल्या

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।४।।

..................................................

पाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

डाळिंब बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।५।।

..................................................

सहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

द्राक्ष बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।६।।

..................................................

सातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

आंबे बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।७।।

..................................................

आठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

खरबूज बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।८।।

..................................................

नवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

टरबूज बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।९।।

१७-….

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू

पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता

हन्मंताचे --------------------------

---------------येता जाता कंबर मोडी

नीज रे नीज रे तान्ह्या बाळा

मी तर जातो सोनार वाडा

सोनार वाड्यातून काय काय आणले

----------------------------------------

एक गेला खारीला एक गेला खोबरीला

खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल

आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची

बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची

पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई

तामण बाई तामण अस कस तामण

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

.................................................. …………………।

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला

भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला

आणा आणा पारीस उगळा उगळा काथ

आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस

शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे

बाणा बाई बाणा सुरेख बाणा

गाणे संपले खिरापत आणा

आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन

१८- ……

हत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर

मगरच्या राजाने शाळा मस्त केली

शाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे

एवढ्या रातरी धून कोण धुते

धून धुय ग बाई चंदन गोटयावरी

वाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी

आला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू गुलाबी

आपण सारे हत्ती घोडे हत्ती घोडे रवे रवे

रव्याचे भाऊ वाणीला गेले

एक गेला खारीला एक गेला खोबरीला

खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल

आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची

बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची

पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई

तामण बाई तामण अस कस तामण

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

……………………………………………………

…………………………… ………………………

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला

भूलोजीला लेक झाली नाव ठेवा सरला

आणा आणा पारीस उगळा उगळा काथ

आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस

शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे

बाणा बाई बाणा सुरेख बाणा

गाणे संपले खिरापत आणा

आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

STARS प्रकल्पांतर्गत (प्रथम सत्र) (PAT) संकलित मूल्यमापन चाचणी क्र.१

संकलित मूल्यमापन चाचणी- १ (२०२३-२४ साठी)
वेळापत्रक :-
संकलित मूल्यमापन चाचणी 1 चे वेळापत्रक, अभ्यासक्रम व परीक्षा आयोजनाबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा.

STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ८वी वर्गासाठी संकलित मूल्यमापन क्र.१ आयोजनाबाबत..!!

उपरोक्त विषयान्वये STARS (Strengthening Teaching Learning And Results for States ) केंद्रपुरस्कृत प्रकल्पामधील SIG-2 (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीचे आयोजन पूर्ण झालेले आहे. सदर चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे परीक्षा साहित्य (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) राज्यस्तरावर छपाई करुन. या कायालयमार्फत शाळांना पुरवठा करण्यात आलेला आहे.

संदर्भ क्र. २ अन्वये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ.3री ते ८वी वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी सकलित मूल्यमापन चाचणी १ चे आयोजन दि. ३० ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ साठी छापील परीक्षा साहित्याचा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) पुरवठा राज्यस्तरावरुन करण्यात येणार आहे. याबाबत पुढीलप्रमाणे सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

वेळापत्रक (2023-24)
संकलित मूल्यमापन चाचणी क्र. १
टिप :- १ प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

टीप :- २ प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्तं केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल.

टीप :- ३ सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये याची दक्षता घ्यावी. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृतीकार्यक्रमाची आखणी करणे हा आहे.

चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :-
१. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
२. चाचणीचे माध्यम व विषय :- सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.
३. चाचणीचा अभ्यासक्रम :- प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल. 
४. चाचणीचे स्वरुप :- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल.
५. चाचणी निर्मिती :- सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.
६. चाचणी कोणासाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल.
७. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजरअसल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.
८. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या-त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
९. शिक्षकांनी चाचणीचे धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे
१०. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
११. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुणनोंद करावी.
१२. चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.
१३. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
१४. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्यांचाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.

प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य वाहतूक व सूचना :-
१. जिल्हास्तरावर चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांची असेल.
२. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका, शाळेस एक याप्रमाणे शिक्षक सूचनापत्र व विषयनिहाय उत्तरसूची याप्रमाणे तालुका स्तरापर्यंत पुरवठा करण्यात येईल.
३. तालुकास्तरावर परीक्षा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित व स्वतंत्र खोली गट शिक्षणाधिकारी यांनी ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
४. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांनी केंद्र स्तर व शाळास्तरावर वेळेत पोचतील याची व्यवस्था करावी.
५. इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका समन्वयकांनी करून घ्यावी.
६. केंद्रस्तरावर शाळांच्या पटसंख्याप्रमाणे प्रश्नपत्रिका, शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे. त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे..
७. कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये. अथवा • झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तथापि,
८. तालुका अंतर्गत कमी- जादा संख्या तपासून शाळानिहाय परीक्षा साहित्याचे समायोजन करता येईल.
९. जिल्हांतर्गत कमी- जादा समायोजनासाठी जिल्हास्तरावर ०५ टक्के अतिरिक्त परीक्षा साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदर साहित्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याचे ताब्यात असेल व जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरसे परीक्षा साहित्य पोच झाले असलेची खात्री चाचणी पूर्वी करणे आवश्यक असेल.
१०. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
११. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वय / गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१२. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्याना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत :-
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुनयांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व वर्गाची चाचणी होईल याप्रमाणे कार्यवाही करण्याची जवाबदारी शाळा मुख्याध्यापकांची असेल. दिलेल्या दिवशी शाळेच्या वेळेत चाचणीचे आयोजन करण्यात यावे. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अपरिहार्य कारणास्तव चाचणी वेळापत्रकात अंशत: बदल करणे आवश्यक असल्यास असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घ्यावा व तसे या कार्यालयास अवगत करावे.

प्राप्त गुणांची नोंद चॅट बॉट च्या माध्यमातून करणे :-

चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या चॅट बॉट वर तात्काळ करण्यात यावी.

शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झालेनंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

वीर बाबूराव पुल्लासुर शेडमाके Baburao Shedacame


वीर बाबुराव पुल्लासूर शेडमाके Baburao Shedacame
जन्म: १२ मार्च १८३३ (मोलामपल्ली, अहेरी, गडचिरोली)
फाशी: २१ ऑक्टोबर १८५८ (वय २५) (चांदा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
कार्य: लष्करी नेता
सक्रिय वर्षे: १८५७-५८

लोकगीतातील उल्लेख ठरला महत्त्वाचा...
तेलंगणा, आंध्र प्रदेशातील भिक्षुक घरोघरी जाऊन लोकगीत सादर करतात आणि भिक्षा मागतात. अशाच एक भिक्षेकऱ्याच्या तोंडून ऐतिहासिक लोकगीत ऐकलं.त्या लोकगीताच्या ओळी होत्या "चंपलहेटी दौर्रा गारू वीर बाबुराव".यातील चंपलहेटी हे गावाचे नाव असून दौर्रा या तेलुगु शब्दाचा अर्थ राजा, पाटील, जमीनदार, साहेब असा होतो. गारू शब्दांचा अर्थ राया किंवा जी असा होतो. अतिशय प्रिय असलेल्या व्यक्तीच्या नावासमोर "गारू" हा शब्दप्रयोग तेलगूत केला जातो. वरील शब्दांचा अर्थ चंपल हेटी येथील राजा वीर बाबुराव असा आहे. चंपलहेटी हे गाव म्हणजे आजचे चपराळा असल्याचा दावा झगडकर यांनी केला आहे. वीर बाबुराव शेडमाके यांना फासावर लटकवलेला दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चपराळा येथील या समाधीवर माता टेकायला लोक दूरवरून येत असतात.


यासाठी प्रसिद्ध: 1857 च्या भारतीय बंडाच्या वेळी चांदा (चंद्रपूर-गडचिरोली) जिल्ह्यातील बंड 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातही चंद्रपूर जिल्ह्याचे अमूल्य योगदान आहे. आपल्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी चंद्रपूरच्या मातीच्या सुपुत्रांनी आनंदाने बलिदान दिले आणि इतिहासात अजरामर झाले. जरी आपल्या इतिहासकारांनी त्यांचे नाव, कार्य आणि बलिदान कमी लेखले असले तरी ते या वीरांचे शौर्य नाकारू शकत नाहीत. आपल्या जन्मभूमीची इज्जत वाचवताना असे किती आदिवासी वीर शहीद झाले कुणास ठाऊक, पण त्यांची नावेही इतिहासात दुर्मिळ आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर हुतात्मा क्रांतिसूर्य बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्त्वाचे आहे, ते क्रांतीची मशाल होते. वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी मोलमपल्ली (अहेरी) येथील श्रीमंत शेडमाके जमीनदारी येथे झाला, त्यांच्या आईचे नाव जुर्जयाल (जुर्जाकुंवर) होते. बाबुरावांना वयाच्या 3 व्या वर्षी गोटूल येथे पाठविण्यात आले जेथे त्यांना कुस्ती, तिरंदाजी, तलवार आणि भाला यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तो आपल्या साथीदारांसह जंगलात शिकारीला जात असे आणि शस्त्रांचा सरावही करत असे. ब्रिटिश एज्युकेशन सेंट्रल इंग्लिश मीडियम, रायपूर, (मध्य प्रदेश) येथून चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मोलामपल्ली येथे परतले. जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याला सामाजिक मूल्येही कळत गेली.
हळुहळू त्यांनी आपल्या जमीनदारीच्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली, त्यामुळे सावकार आणि ठेकेदारांकडून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती त्यांना मिळाली. तसेच इंग्रज आल्यानंतर त्यांनी केलेल्या छळाची माहिती मिळू लागली. त्यामुळे त्यांची समज आणखीनच वाढली. राजघराण्यातील असूनही, त्याच्याकडे जमिनीच्या मालकीपेक्षा समाजाप्रती समर्पणाची भावना अधिक होती, जी कालांतराने अधिक परिपक्व होत गेली. त्यांचा विवाह आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील चेन्नूर येथील मडावी राजघराण्यातील कन्या राजकुंवर यांच्याशी झाला होता. राजकुंवर हे बाबुरावांच्या कार्याप्रती तितकेच समर्पित होते.
त्यावेळी चंदगड आणि आसपासच्या परिसरात गोंड, परधान, हलबी, नागची, माडिया आदिवासींची संख्या जास्त असल्याने वैष्णव, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रभाव अधिक होता. 18 डिसेंबर 1854 रोजी चंदगड येथे आर.एस. एलिस यांची जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि इंग्रजांकडून गरिबांवर अत्याचार सुरू झाले. ख्रिश्चन मिशनरी निरपराध आदिवासींना विकासाच्या नावाखाली धर्मांतरित करून फसवत असत. तसेच हा परिसर वनसंपत्ती आणि खनिज संपत्तीने परिपूर्ण होता आणि इंग्रजांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी या संपत्तीची गरज होती, त्यामुळेच इंग्रज आदिवासींच्या जमिनी बळजबरीने बळकावत आहेत हे बाबुरावांना आवडले नाही. जमिनीवर आदिवासींचा हक्क आहे आणि तो त्यांना नक्कीच मिळाला पाहिजे. आदिवासींनी सामुदायिक जीवनात आणि सांस्कृतिक जीवनशैलीत जसे जगावे तसे जगावे आणि इस्लाम धर्म स्वीकारून आपली खरी ओळख गमावू नये, असे त्यांचे मत होते. अशा गोष्टींमुळे त्यांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटली आणि त्यांनी मरेपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढून आपल्या जनतेचे रक्षण करण्याचा संकल्प केला. हा ठराव पूर्ण करण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८५७ रोजी 'जंगोम सेना' स्थापन केली.
त्यांनी अडपल्ली, मोलामपल्ली, घोट आणि त्यांच्या आजूबाजूच्या जमीनदारांमधून 400-500 आदिवासी आणि रोहिल्यांची फौज तयार केली, त्यांना औपचारिक शिक्षण दिले आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध घोषित केले. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी चंदगडला लागून असलेला राजगड निवडला, राजगड इंग्रजांच्या ताब्यात होता, त्याची जबाबदारी रामशाह गेडाम यांच्याकडे सोपवण्यात आली. ७ मार्च १८५८ रोजी बाबुरावांनी आपल्या साथीदारांसह राजगडावर हल्ला करून संपूर्ण राजगड ताब्यात घेतला. या युद्धात राजगडचा जमीनदार रामजी गेडामही मारला गेला.राजगडमधील पराभवामुळे कॅप्टन प. एच. क्रिचटनला काळजी वाटली आणि राजगड परत मिळवण्यासाठी 13 मार्च 1858 रोजी कॅप्टन क्रिचटनने बाबुरावांच्या सैन्याला ताब्यात घेण्यासाठी आपले सैन्य पाठवले. राजगड पासून 4 कि.मी. दुर नांदगाव घोसरीजवळ बाबुराव आणि इंग्रज यांच्यात घनघोर युद्ध झाले. अनेक लोक मारले गेले, बाबुराव शेडमाके यांनी हे युद्ध जिंकले.
राजगडच्या लढाईनंतर अडपल्ली-घोटचे जहागीरदार व्यंकटराव राजेश्वर राजगोंड हेही बाबुरावांसह या बंडात सामील झाले. त्यामुळे कॅप्टन क्रिचटन अधिक अस्वस्थ झाला. त्यांनी बाबुराव आणि त्यांच्या साथीदारांनंतर आपले सैन्य तैनात केले, बाबुराव सावध होते, त्यांना इंग्रजांच्या कारवायांची माहिती होती. त्यांचा शोध घेण्यासाठी क्रिचटन नक्कीच आपले सैन्य पाठवेल, हे त्यांना माहीत होते, म्हणूनच ते पूर्ण तयारीनिशी गडिचुर्ला पर्वतावर थांबले. ही बातमी इंग्रजांना मिळताच २० मार्च १५१८ रोजी पहाटे साडेचार वाजता सैन्याने संपूर्ण डोंगराला वेढा घातला आणि गोळीबार केला. बाबुरावांच्या सतर्क सैनिकांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर दगडफेक केली, इंग्रजांच्या गोळ्या सुटल्या पण दगडांचा पाऊस थांबला नाही, अनेक इंग्रज गंभीर जखमी होऊन पळून गेले. डोंगरावरून खाली आल्यावर बाबुरावांच्या जंगोम सैन्याने तिथे पडलेल्या तोफा आणि तोफ जप्त करून सर्वसामान्यांसाठी धान्याचे भांडार खुले केले. अशा प्रकारे बाबुराव आणि त्यांच्या सैनिकांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.
बाबुराव, व्यंकटराव आणि त्यांच्या साथीदारांचे बंड संपवण्यासाठी त्रासलेल्या कॅप्टन क्रिचटनने पुन्हा चंदगडहून ब्रिटीश सैन्य पाठवले. 19 एप्रिल 1858 रोजी सगणापूरजवळ बाबुरावांचे साथीदार आणि ब्रिटीश सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले, ज्यात ब्रिटीश सैन्याचा पुन्हा पराभव झाला. परिणामी बाबुरावांनी २९ एप्रिल १८५८ रोजी अहेरी जमीनदारीतील चिचगुडी येथील इंग्रज छावणीवर हल्ला केला. अनेक ब्रिटिश सैनिक जखमी झाले तर टेलिग्राम ऑपरेटर गार्टलाड आणि हॉल मारले गेले. त्याचा एक साथीदार पीटर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने कॅप्टन क्रिचटनला सर्व गोष्टींची माहिती दिली. या हल्ल्यानंतर बाबुराव आणि व्यंकटराव इंग्रज सैन्यात घाबरले. त्यांना पकडण्याच्या सर्व इंग्रजांच्या योजना अयशस्वी झाल्या, दोन टेलिग्राम ऑपरेटरच्या मृत्यूमुळे कॅप्टन क्रिचटन संतप्त झाला. या घटनेची माहिती इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाला मिळताच तिने बाबुरावांना मृत किंवा जिवंत पकडण्याचा आदेश काढला आणि बाबूराव शेडमाकेला पकडण्यासाठी नागपूरचे कॅप्टन शेक्सपियर नेमले.
शूर बाबुराव शेडमाके यांना पकडण्यासाठी कॅप्टन शेक्सपियरने त्यांची मावशी राणी लक्ष्मीबाई, अहेरीच्या जमिनदार यांचा वापर केला आणि त्या बदल्यात बाबुराव शेडमाके यांच्या जमीनदारीतील २४ गावे आणि व्यंकटराव, राजेश्वर यांच्या जमीनदारीतील ६७ गावे मिळवली. एकूण ९१ गावे.) देण्याचे आमिष दाखवले. नकार दिल्यास अहेरीची मालमत्ता जप्त करण्याची धमकीही दिली. राणी लक्ष्मीबाई लोभाला बळी पडून बाबुरावांना पकडण्यासाठी इंग्रजांशी सामील झाल्या. बाबुरावांना याची कल्पना नव्हती. बाबुराव आपल्या साथीदारांसह घोट गावात पर्सापान पूजेसाठी आले होते, ही बातमी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना दिली आणि ते बाबुरावांना अटक करण्यासाठी घोटला पोहोचले. बाबुराव आणि इंग्रज सैन्यात घनघोर युद्ध झाले आणि पुन्हा एकदा त्याला पकडण्यात इंग्रजी सैन्य अपयशी ठरले आणि बाबुराव तेथून सुखरूप निसटले. या पराभवानंतर शेक्सपियर चिडला आणि त्याने घोटची इस्टेट ताब्यात घेतली. आकस्मिक युद्धात बाबुरावांचे अनेक साथीदार मारले गेले आणि सामान्य लोकही त्याला बळी पडले. बाबुरावांच्या चळवळीत अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या जमिनी व जप्ती जप्त करण्यात आल्या. व्यंकटराव जंगलात लपले.जंगोम सैन्याचे विघटन होऊ लागले आणि बाबुराव एकटे पडले.
घोट येथील पराभवानंतर इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईंवर अधिक दबाव आणला. बाबुराव एकटे असल्याची बातमी लक्ष्मीबाईंना मिळताच तिने रोहिल सैन्याला बाबुरावांना पकडण्यासाठी भोपाळपट्टणमला पाठवले, बाबुराव काही दिवस तिथेच राहिला. रात्री झोपेतच रोहिल्लास त्यांना पकडले.त्यावेळी बाबुरावांनी त्यांना विरोध न करता त्यांना त्यांच्या कामाचा उद्देश समजावून सांगितला. आणि योग्य वेळ पाहून ते शांतपणे तिथून निघून गेले. बाबुराव लक्ष्मीबाई सैन्यातून पळून गेल्याची बातमी कॅप्टनला मिळताच त्याला धक्काच बसला. बाबुराव अहेरीला आले. राणी लक्ष्मीबाई यांना याची माहिती मिळताच त्यांनी बाबुरावांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आणि लक्ष्मीबाईंच्या घरी पोहोचले.लक्ष्मीबाईंनी ही बातमी इंग्रजांना दिली. जेवताना इंग्रजांनी लक्ष्मीबाईंच्या घराला वेढा घातला आणि बाबुरावांना कैद केले. बाबुरावांना इंग्रजांनी पकडल्याची बातमी व्यंकटरावांपर्यंत पोहोचली आणि ते बस्तरला गेले. बाबुरावच्या अटकेनंतर त्याच्या इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली. बाबुराव आणि त्यांच्या साथीदारांवर गार्टलँड आणि हॉलच्या हत्येबद्दल आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध कारवाई केल्याबद्दल क्रिचटनच्या न्यायालयात खटला चालवला गेला.
21 ऑक्टोबर 1858 रोजी या प्रकरणी निकाल देण्यात आला, तो पुढीलप्रमाणे होता -
१) पुराव्याच्या आधारे कैदी (बाबुराव) याला ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंड केल्याबद्दल, सशस्त्र सैन्य उभे केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले, 10 मे 1858 रोजी घोट गावात सरकारी सैन्याला विरोध केला आणि 27 एप्रिल 1858 रोजी बामनपेटा या दोन सरकारी सैनिकांना तुरुंगात टाकण्यात आले. 12 दिवसांसाठी. कैद्यांना नेणे, त्यांना लुटणे, 29 एप्रिल 1858 रोजी चिंचगुंडी येथील मिस्टर गार्टलँड आणि मिस्टर हॉलच्या छावणीवर त्याच्या सैनिकांना हल्ला करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांची लुटलेली मालमत्ता हिसकावणे या आरोपांमध्ये दोषी आढळले.
२) न्यायालयाने, वरील आरोपांमध्ये कैद्याला दोषी ठरवून आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे लक्षात घेऊन त्याला ही शिक्षा सुनावली.
३) की पूलैसूर बापूचा मुलगा बाबुराव याला दुपारी चार वाजता चंद्रपूरच्या कारागृहात तुझा मृत्यू होईपर्यंत फाशी द्या.
४) कैद्याची सर्व मालमत्ता जिल्ह्याचे उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी कॅप्टन डब्ल्यू. एच. क्रिस्टन यांनी जप्तीचे आदेश दिले आहेत. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता बाबुराव शेडमाके यांना चंद्रपूर कारागृहात फाशी देण्यात आली.
आपल्या निर्णयात त्यांनी बाबुराव आणि त्यांच्या साथीदारांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी बाबुरावांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 21 तारखेला दुपारी 4 वाजता त्यांना चंदगड राजमहालच्या पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली, ज्याचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले. त्यावेळी कॅप्टन क्रिचटन त्याच्या उजवीकडे आणि कॅप्टन शेक्सपियर डावीकडे उभा होता. बंदुकीच्या सलामीसोबतच दोन्ही कर्णधारांनीही सलामी दिली. मृत्यूची चौकशी केल्यानंतर त्याला कारागृहाच्या आवारात दफन करण्यात आले. ज्या पिंपळाच्या झाडावर वीर बाबुरावांना फाशी देण्यात आली ते आजही चंद्रपूर कारागृहात ऐतिहासिक वारसा म्हणून उभे आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जनता आणि समाज पिंपळाच्या झाडाजवळ जमतात आणि वीर बाबुरावांना आदरांजली अर्पण करतात.
वीर बाबुराव शेडमाके यांच्याबद्दल एक आश्चर्यकारक घटना नेहमी सांगितली जाते की त्यांनी एकदा ताडोबाच्या जंगलात 'तडवा' नावाचे बांबूचे फळ खाल्लेले असते.ते फळ अतिशय विषारी असून ते खाणाऱ्या व्यक्तीचे ते पचन होते आणि त्याचे शरीर बनते. वज्रदेही. बाबुरावांनी त्यांना मारहाण केली त्यामुळे ते बेशुद्ध झाले पण काही वेळाने ते शुद्धीवर आले आणि त्यानंतर त्यांच्या शरीरावर कोणताही आघात न झाल्याने त्यांच्यात एक अद्भुत शक्ती निर्माण झाली. ते खचून न जाता मैल वेगाने धावू शकत होते. जेव्हा इंग्रजांनी त्यांना लक्ष्मीबाईच्या घरी पकडले तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर म्हणून अनेक सैनिकांना पिण्याच्या भांड्याने जखमी केले, त्यापैकी एक मरण पावला. तुरुंगात फासावर लटकले तेव्हा त्याचे शरीर दगडासारखे होते आणि मानही ताठ झाली होती, त्यामुळे फाशीची दोरी सैल झाली होती. त्याला पुन्हा फाशी देण्यात आली पण नंतर दोरी सैल झाली. असे तीन वेळा घडले.चौथ्या फाशीनंतर त्यांचा मृत्यू निश्चित झाला, परंतु इंग्रजांना त्यांची इतकी भीती वाटली की त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी त्यांनी बाबुराव शेडमाके यांचा मृतदेह उकळत्या भट्टीत टाकला. या घटनेचा महाराष्ट्राच्या चांदा जिल्हा गॅझेटियर्समध्येही उल्लेख आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की:-
““This rising in Chandrapur was spontaneous. It practically speared towards the end of the great Revolt. Though un-successful it stands out as a brilliant attempt of the Raj Gond Zamindars to regain their freedom. Many folk tales and songs are current in the Chandrapur area extolling the heroic exploits of the two Gond leaders. Baburao the Zamindar of Molampalli. According to one story had consumed tadava, and as a result of its extraordinary powers, when hanged, managed to break the noose four times. He was finally immersed in quick lime, and killed.”
बाबुरावांच्या फाशीनंतर त्यांचा साथीदार व्यंकटराव यालाही २ वर्षांनी इंग्रजांनी पकडले आणि ३० मे १८६० रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बाबुरावांना अटक करणाऱ्या लक्ष्मीबाईंना बाबुराव आणि व्यंकटराव यांच्या जमिनीचे बक्षीस मिळाले. ज्या जमीनदारीसाठी लक्ष्मीबाईंनी बाबूरावांना लोभापोटी अटक केली होती तीही 1951 मध्ये रद्द करण्यात आली. आणि चंद्रपूर जिल्ह्याची बदनामी करणाऱ्या राजद्रोहाबद्दल लक्ष्मीबाईंचा निषेध करण्यात आला.
अशा प्रकारे वयाच्या 25 व्या वर्षी बाबुराव शेडमाके यांनी शौर्य दाखवून स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. त्‍यांच्‍या शौर्य आणि शौर्याचा गौरव करण्‍यासाठी, भारत सरकारने 12 मार्च 2007 रोजी त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी भारतीय टपालाने त्‍यांच्‍या नावावर एक तिकिट जारी केले. अशा या महान शूर सुपुत्राच्या स्मरणार्थ चंद्रपुरात स्मारक उभारण्यासाठी आपला आदिवासी समाज अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे परंतु आजपर्यंत शासन यावर मौन बाळगून आहे. ऐतिहासिक चंदगड किल्ल्याची अवस्था बिकट होत चालली असून शासन या प्रश्नावर मौन बाळगून आहे.मात्र पुरातत्व विभागाचा फलक लावून किल्ल्याचे संरक्षण करता येणार नाही, त्याचीही डागडुजी व्हावी. दरवर्षी वीर बाबुराव शेडमा यांच्या हौतात्म्य दिनी हजारो आदिवासी चंद्रपूर कारागृहातील पिंपळाच्या झाडाजवळ जमून त्यांना आदरांजली वाहतात.
संदर्भ:-
– 1857 चे स्वाधीनता शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर बापू राजगोंड – पुरूषोत्तम सेडमाके
– भारतीय स्वातंत्र्य संग्राम में चंद्रपुर – भगवती प्रसाद मिश्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी
– आदिवासी संस्कृति, त्यांच्या पुर्वजांचे कार्य व आता नवी दिशा – मधुकर उ. मडावी
– क्रांतीरत्न शहीद वीर बाबुराव पुलेसूरबापू राजगोंड – धिरज सेडमाके
– गोंडवानाचा सांस्कृतिक इतिहास – शेषराव एन. मंडावी

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

संकलित माहिती

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्री दिवस - इंटरनॅशनल फ्रेन्डशिप डे Frendship day



मैत्री दिन ( फ्रेंडशिप डे)
मैत्री दिन हा जागतिक स्तरावर 30 जुलै (International Friendship Day) रोजी साजरा केला जातोय. तर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (National Friendship Day) साजरा केला जातो. मैत्री दिन हा आपल्या मित्र-मैत्रीणींप्रती प्रेम, आदर आणि भावना व्यक्त करणारा दिवस आहे.
फ्रेंडशिप डेची सुरूवात १९३५ मध्ये अमेरिकेतून झाली. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिका सरकारने एका निर्दोष व्यक्तीला मारले होते. त्याच्या हत्येचे सर्वात जास्त दुःख त्याच्या मित्राला झाले होते. मित्राच्या विरहात त्याने आम्तहत्या केली.
त्यांचे हे मैत्री प्रेम पाहता अमेरिकेतील नागरिकांनी ऑगस्टचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला, मात्र अमेरिका सरकारला ही गोष्ट मंजुर नव्हती. २१ वर्ष लोक हा प्रस्ताव घेऊन लढत होते. अखेर१९५८ मध्ये अमेरिका सरकारने नागरिकांच्या प्रस्तावला मान्यता दिली आणि ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.
यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने २७ एप्रिल २०११ मध्ये झालेल्या बैठकीत ३० जुलै हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता. मात्र, काही वर्ष झाले ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी भारतात ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. तसेच भारतासोबत दक्षिण अशियातील काही देशाही साजरा करतात.
काही देश मात्र ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात पण, तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी नव्हे. तर, त्यांना सोईच्या असणाऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या दिवशी. ८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.


मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असे म्हटल्यासही वावगे ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येकच दिवस खास असतो. पण तरीही जगभरात ऑगस्ट महिन्यात फ्रेन्डशिप डे धडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र एकत्र येऊन धमाल करतात. तर काही लोक नवीन मैत्रिच्या नव्या नात्याला सुरुवात करतात. पण फ्रेन्डशिप डे ची नेमकी सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? बहुदा अनेकांना हे माहीत नसतं. त्यामुळे चला जाणून घेऊ फ्रेन्डशिप डे ची सुरुवात कशी झाली.
'फ्रेन्डशिप डे' साजरा करण्याचा ट्रेन्ड हा तसा इतर डेज प्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. पण भारतात गेल्या काही वर्षांपासून हा डे तरुणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. ग्रिटींग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याचं वचन घेतात. पण या दिवसाच्या सुरुवातीची कहाणी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे.
असे म्हटले जाते की, पहिल्या महायुद्धानंतर लोकांमध्ये आणि देशांमध्ये आपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. हे संपवण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेन्डशिप डे ची सुरुवात केली होती. त्यावेळी हे ठरवण्यात आले की, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा साजरा केला जाणार. त्यामागचं कारण हे आहे की, रविवारी सुट्टी असते आणि लोक एकत्र येऊन हा दिवस साजरा करु शकतात.
असेही म्हटले जाते की, १९३५ मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीन घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला.
जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेन्डशिप डे वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो. तर काही जागांवर हा डे पहिल्या रविवारी नाही तर २ तारखेला हा डे साजरा करतात. ओहायोच्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो.
१९९७ मध्ये अमेरिकेतील सरकारने प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर 'विनी द पू' याला फ्रेन्डशिप डे ब्रॅन्ड अँबेसिडर केलं होतं. २७ एप्रिल २०११ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत ३० जुलैला अधिकृतपणे 'इंटरनॅशनल फ्रेन्डशिप डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.

विश्वास

मैत्रीचा पहिला नियम म्हणजे विश्वास. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो. म्हणूनच असे कोणतेही काम कधीही करू नका, ज्यामुळे तुमच्या मित्राचा तुमच्यावरील विश्वास उडेल. तुमच्या मित्राशी तुमचे नाते प्रामाणिकपणे जपा आणि असा विश्वास ठेवा की तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, तरीही तुमचा मित्र तुमच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवेल.

पैसा

मैत्रीमध्ये पैसा कधीच येऊ नये. पैसा ही तुमच्या जीवनाची गरज नक्कीच आहे, पण तुमचे नाते पैशापेक्षा जास्त आहे. जर तुमचा खरा मित्र पैशाने कमकुवत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्या योग्यतेनुसार त्याचा न्याय करा. माणसाची माणुसकी बघून मैत्री केली जाते आणि ती पैशापेक्षा खूप मोठी असते. खऱ्या मित्रावर तुमच्या स्थितीत फरक नाही. जे लोक तुमची संपत्ती आणि दर्जा पाहून मित्र बनवतात, ते तुमचे कधीच मित्र होऊ शकत नाहीत.

शेअरिंग
तुम्ही आयुष्यात खूप मित्र बनवता, पण तुमचं सगळ्यांशी ते बॉन्डिंग नसतं, ज्यामुळे तुम्ही त्यांना सगळं सांगू शकता. असे मित्र फार कमी असतात. जर तुमचा असा मित्र असेल तर त्याचे नेहमी कौतुक करा. जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा तुमच्या मनातील गोष्टी त्याच्याशी शेअर करा. लपविण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा हा प्रयत्न त्याला कोणत्याही परिस्थितीत समजेल आणि तुमच्या छुप्या वागण्याबद्दल त्याला वाईट वाटेल. तुमचा मित्र तुमच्या कठीण काळात कधीही चुकीचा सल्ला देणार नाही, त्यामुळे तुमची कोंडी त्याच्यासोबत शेअर करा.

स्वार्थ
तुमचा खरा मित्र तोच असतो जो कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर आपणही त्याला पूर्ण पाठिंबा द्यावा. कठीण काळ ही मैत्रीची कसोटी असते, अशा वेळी जर तुम्ही मित्राला साथ दिली नाही तर तुम्ही स्वार्थी असल्याचे समजले जाईल आणि तुमचा खरा मित्रही कायमचा गमावाल.

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते ….!
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना जीव घ्यायचा असतो इथे
फक्त जीव लावायचा असतो …!!

✨Happy Friendship Day.✨


मैत्री म्हणजे…….खांद्यावरचा हात
मैत्री म्हणजे……. सदैव साथ
मैत्री म्हणजे…….वाट पाहणे
मैत्री म्हणजे…….. सोबत राहणे
मैत्री म्हणजे…….. एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे…….. एकत्र आईस्क्रीम खाणे
मैत्री म्हणजे……… सल्ले घेणे
मैत्री म्हणजे………मार्ग देणे
मैत्री म्हणजे…….. कधी राग
मैत्री म्हणजे…….कधी भडकते आग
मैत्री म्हणजे……..कधी खरी कधी खोटी 
मैत्री म्हणजे………कधी पड़ते छोटी
मैत्री म्हणजे….आजचं सत्य
मैत्री म्हणजे……… नसेलच नित्य
मैत्री म्हणजे………. लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे……. सुखातच साथीची हमी….

❤️💫 माझ्या लाडक्या मित्राला

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️✨

रविवार, २ जुलै, २०२३

सेतू अभ्यासक्रम २०२३

पूर्व चाचणी PDF  Click Here

अभ्यासक्रम इयत्ता - २ री

मराठी माध्यम – Click Here


इयत्ता - ३ री

मराठी माध्यम – Click Here


इयत्ता- ४ थी

मराठी माध्यम – Click Here

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्याची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.


करावयाची कार्यवाही


पूर्व चाचणी-

दि. ३० जून ते ३ जुलै २०२३


२० दिवसांचा सेतू अभ्यास-


दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३.


उत्तर चाचणी-


दि. २७ ते ३१ जुलै २०२३.



बुधवार, १४ जून, २०२३

शाळा प्रवेशोत्सव


😊 शाळा प्रवेशोत्सव 😊

 💐  शाळेचा पहिला दिवस म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात हा विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी एक उत्सवच असतो.शाळा प्रवेशोत्सव माहिती ,फळकलेखन व English, मराठीत घोषवाक्ये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .👇👇👇👇👇👇

👉👉👉👉 शाळा प्रवेशोत्सव 👈👈👈👈


शनिवार, २० मे, २०२३

20 मे मधमाशी दिवस World Bee Day

20 मे रोजी ( मधमाशी दिवस) World Bee Day
मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात ता. २० मे, १७३४ रोजी एका गरीब मधमाशीपालकाच्या कुटूंबात एन्टोन जान्सा या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांनी १७६६ मध्ये युरोपातील पहिले मधमाशी शिक्षण केंद्र सुरू केले व १७७१ मध्ये त्यांनी मधमाशी पालनावरील पहिले पुस्तक प्रसिध्द केले. १७७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्य मदतीने संयूक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला, यानुसार २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून २०१८ पासून साजरा केला जावु लागला.
मधमाशांची अज्ञात रहस्ये
मधमाश्या पाळणे ही स्लोव्हेनियन परंपरेत खोलवर रुजलेली गोष्ट आहे आणि मधमाश्या पाळणाऱ्यांच्या बाबतीत तो आघाडीच्या युरोपीय देशांपैकी एक आहे.
भारतात मधमाशांच्या 4 प्रजाती आढळतात, 1. एपिस सेर्ना इंडिका, 2. एपिस फ्लोरेरिया, 3. एपिस डोरसट्टा, 4 . एपिस ट्रॅगोना. Apis cerna ही एकमेव मधमाशी आहे जी पाळली जाऊ शकते आणि बाकीच्या जातीतील मधमाश्या सहसा झाडांच्या पोकळीत, गुहेत राहतात.
मेगा पीस – उपप्रजाती मेगा पीस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही उंच झाडांवर, कड्यावर किंवा उंच इमारती वर एक किंवा अनेक पोळी बांधणारी जात असून ती अत्यंत आक्रमक असते. यांच्या पोळ्या मधील मद जर अधून मधून माणसाने काढण्याचा प्रयत्न केला तर या माशा उत्तेजित झाल्यावर माणसावर हल्ला करून मधमाशांच्या दंशाने व्यक्ती मृत्युमुखी पडू शकतो.
मिकऱ्या पीस – एपीस फ्लोरिया आणि एपीस अँड्रेणी फोर्मिस या दोन्ही मधमाशांच्या जाती एपिस प्रजातीच्या मेक्रिपीस या उपप्रजाती मधील आहेत या मधमाशांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लहान उघडे पोळे झुडपावर तयार करतात. या मधमाशांची नांगी लहान आकाराचे असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही.
एपीस मॅलिफेरा – ही मधमाशांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखडा याचा पूर्ण अभ्यास झाला आहे.उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली.
लोकांच्या आयुष्यात गोडवा वाढवणाऱ्या मधाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण ते मध कसे बनवतात, आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
आफ्रिकन मधमाशी – या माशांना किलर बी या नावाने देखील ओळखले जाते. युरोपियन मधमाशा आणि आफ्रिकेतील एपीस मेलिफेरा स्कुतेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. या प्रजातीची मधमाशी ही कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असते. या सहसा रोगांना बळी पडत नाहीत.
शास्त्रज्ञांच्या मते, मधमाश्या 'हीटर' किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या पोळ्यांचे काम करतात. ते जटिल सामाजिक संरचनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या उत्तराधिकारी नंतर आणि प्रौढ झाल्यावर कोणत्या मधमाश्या काय करतील हे निर्धारित करण्यासाठी देखील ते कार्य करतात. ज्या ठिकाणी मधमाश्या आपली अंडी घालतात, तेथे त्यांची पिल्ले, ज्याला प्युपे म्हणतात, ते प्रौढ होईपर्यंत मेणाच्या पेशींमध्ये गुंफलेले असतात.
मधमाश्यांपासून मिळणारा मध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट हृदय आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. हे आयुर्वेदिक औषध म्हणून ओळखले जाते. त्यात ग्लुकोज, सुक्रोज आणि माल्टोज, व्हिटॅमिन-6 बी, व्हिटॅमिन सी, अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट्स प्रामुख्याने आढळतात. हे सर्दी आणि फ्लूपासून मुक्त होण्यासाठी आणि घसा खवखवण्यापासून आराम देण्यासाठी देखील उपयुक्त आहे. सर्वात प्राणघातक हाऊसफ्लाय आहे. त्याच्या शरीरात 10 लाखांहून अधिक जंतू असतात. हे अन्न दूषित करू शकते, ज्यामुळे उलट्या किंवा जुलाब देखील होऊ शकतात. त्यामुळे अन्न नेहमी झाकून ठेवावे.
महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले की, जर पृथ्वीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर मानवजातीचे अस्तित्व या जगातून 4 वर्षात संपेल.
आपण या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे की आपल्या मानवी क्रियाकलापांचे दुष्परिणाम, वाढते प्रदूषण, औद्योगिकीकरण, झाडे आणि वनस्पतींवर कीटकनाशकांची फवारणी यामुळे जगभरात मधमाशांची संख्या कमी होत आहे, ज्यामुळे आपल्याला चिंता करावी लागते. येणा-या काळात मानवी जीवनावर मोठे संकट येऊ शकते.
जगभरातील शेतजमिनी परागणावर अवलंबून असतात. त्यामुळे केवळ माणसांच्याच नव्हे तर सर्व प्राणी-पक्ष्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून लोकांना मधमाशांचे महत्त्व पटवून देण्याचे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे.
World Honey Bee Day
दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मधमाशीपालक, मधमाशी प्रेमी यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. तर जाणून घेऊया जागतिक मधमाशी दिवस म्हणजेच “World Honey Bee Day” का साजरा केला जातो.
हा दिवस मधमाशा आणि पोळ्या सांभाळणारे मधमाशी पाळणारे यांच्यासाठी समर्पित आहे. या दिवसाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मधमाशांना बद्दल शिकणे आणि त्यांना पोषक वातावरण प्रदान करणे.
मागील वर्ष २०२२ की थीम मधमाश्या आणि मधमाश्या पालन प्रणालीची विविधता साजरी करण्यात गुंतलेली मधमाश्या ‘Bee engaged – Celebrating the diversity of bees and beekeeping systems’ 2021  ‘Bee Engaged: Build Back Better for Bees‘ (बी एंगेज्ड: मधुमक्खियों के लिए बेहतर निर्माण करें) 2020 ‘मधुमक्खियों को बचाओ’ (Save the Bees) 
संकलित माहिती 

गुरुवार, २३ मार्च, २०२३

जागतिक हवामान दिन- २३ मार्च World Meteorological Day


जागतिक हवामान दिन- २३ मार्च
World Meteorological Day
जागतिक हवामान दिन दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेच्या स्थापनेच्या तारखेला जागतिक हवामान दिन असे नाव देण्यात आले आहे. ही संस्था दरवर्षी जागतिक हवामान दिनासाठी घोषणा देते आणि हा दिवस सर्व सदस्य देशांमध्ये साजरा केला जातो.
सदर दिवस राष्ट्रीय हवामान व जलविज्ञान सेवा यांच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो. १९६१ मध्ये हा दिवस सर्वप्रथम साजरा झाला. यावर्षी, जागतिक जल दिन आणि जागतिक हवामान दिनी समान विषय सामायिक केला आहे:- “पाणी आणि हवामान बदल”.
अधिक समन्वित आणि टिकाऊ पद्धतीने हवामान आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित केले जात आहे कारण ते एकमेकांशी गुंतलेले विषय आहेत.
जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ)( World Meteorological Organization-WMO) ही एक आंतरशासकीय संस्था असून त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे.
जागतिक हवामान संघटनेचे १९१ सदस्य देश आणि प्रांतांचे सदस्यत्व आहे.
निसर्गचक्रात वर्षानुवर्ष बिनचूकपणे होणा-या घटनांपैकी एक म्हणजे १ जूनला भारतात दाखल होणारा मान्सूनचा पाऊस परंतु गेल्या काही वर्षात जगभराच नैसर्गिक नियमितता नाहीशी होऊन अनपेक्षित बदलांचे प्रमाण वाढत आहे. हवामानातील हे बदल आणि त्यांचे परिणाम ग्लोबल असले तरी त्यावरच्या उपाययोजना लोकल (स्थानिक) स्वरूपातही करता येतात.
१९५० साली जागतिक हवामानशास्त्र संघटना ( WMO) स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्या-या ३१ देशांत भारत ही होता. यानंतर जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणा-या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. कारण स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात आले.
हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे मानवी साधनसंपत्तीचे तर नुकसान होतेच; शिवाय अनेकांचा मृत्यूही ओढवतो. इतर प्राणी - पक्षीही यातून सुटत नाही. कारण जगातील एका भागचे हवामान इतर ठिकाणांहून भिन्न असू शकत नाही तर एका घटकातील बदलाचा परिणाम इतर घटकांवर झालेला आढळतो. हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली आजही सुरु असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते. हवामानातील बदल. त्यामागील कारणे व उपाय याबाबी सरकारपासून सर्वसामान्यंपर्यंत प्रत्येकाने समजून घेण्याची तातडीची गरज आज निर्माण झाली आहे.


मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक हवामान दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. दरवर्षी जागतिक हवामान दिवसाची एक थीम निश्चित केली जाते. २०२३ वर्षी “The Future of Weather, Climate and Water across Generations” ही थीम ठेवण्यात आली आहे.

संकलित माहिती

आगामी झालेले